01-02-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो - आतापर्यंत जे काही वाचले आहे ते सर्व विसरून जा, एकदम बाल्यावस्थेमध्ये जा तेव्हाच या रूहानी अभ्यासामध्ये उत्तीर्ण होऊ शकाल

प्रश्न:-
ज्या मुलांना दिव्य बुद्धी मिळाली आहे, त्यांचे लक्षण काय असेल?

उत्तर:-
ती मुले या जुन्या दुनियेला या डोळ्यांनी बघत असून देखील पाहणार नाहीत. त्यांच्या बुद्धीमध्ये सदैव हेच राहते की, ही दुनिया नष्ट झाली की झाली. हे शरीर देखील जुने तमोप्रधान आहे तर आत्मा देखील तमोप्रधान आहे, यावर काय प्रेम करावे. अशा दिव्य बुद्धीवाल्या मुलांवर बाबांचे देखील प्रेम जडते. अशी मुलेच निरंतर बाबांच्या आठवणीमध्ये राहू शकतात. सेवेमध्ये देखील पुढे जाऊ शकतात.

ओम शांती।
गोड-गोड रूहानी मुलांना रुहानी बाबा समजावून सांगतात. जसे हदचे संन्यासी आहेत, ते घरदार सोडतात कारण ते समजतात की, आपण ब्रह्ममध्ये लीन होणार, त्यामुळे या दुनियेमधून आसक्ती काढून टाकली पाहिजे. अभ्यास देखील असाच करत असतील. जाऊन एकांतामध्ये राहतात. ते आहेत हठ योगी, तत्त्वज्ञानी. समजतात कि ब्रह्ममध्ये लीन होणार, म्हणून मोह नष्ट करण्यासाठी घरदार सोडतात. वैराग्य येते. परंतु एका फटक्यात मोह नष्ट होत नाही. पत्नी, मुले इत्यादींची आठवण येत राहते. इथे तर तुम्हाला ज्ञानाच्या बुद्धीद्वारे सर्वकाही विसराचे असते. कोणतीही गोष्ट सहजासहजी विसरता येत नाही. आता तुम्ही हा बेहदचा संन्यास करता. आठवण तर सर्व संन्याशांना देखील राहते. परंतु बुद्धीने असे समजतात आपल्याला ब्रह्ममध्ये लीन व्हायचे आहे, म्हणून आपल्याला देहभान ठेवायचे नाही आहे. तो आहे हठयोग मार्ग. समजतात आपण हे शरीर सोडून ब्रह्ममध्ये लीन होणार. त्यांना हे माहीतही नाही की आपण शांतीधाममध्ये कसे जाऊ शकतो. तुम्ही आता जाणता - आपल्याला आपल्या घरी जायचे आहे. जसे परदेशातून येतात तर समजतात आपल्याला मुंबईला जायचे आहे व्हाया आता तुम्हा मुलांना देखील पक्का निश्चय आहे. बरेचजण म्हणतात - यांची पवित्रता चांगली आहे, ज्ञान चांगले आहे, संस्था चांगली आहे. माता मेहनत चांगली करतात कारण अथक होऊन समजावून सांगतात. आपले तन-मन-धन लावतात म्हणून चांगल्या वाटतात. परंतु आपण देखील असा अभ्यास करावा, हा विचार देखील येणार नाही. कोणी विरळाच निघतो. हे तर बाबा देखील म्हणतात - कोटीं मधून कोणी अर्थात जे तुमच्या जवळ येतात, त्यांच्यातून कोणी एखादा निघतो. बाकी ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे. तुम्ही जाणता आता बाबा आलेले आहेत. साक्षात्कार होवो अथवा न होवो, विवेक म्हणतो बेहदचे बाबा आलेले आहेत. हे देखील तुम्ही जाणता कि बाबा एक आहेत, तेच पारलौकिक पिता ज्ञानाचा सागर आहेत. लौकिक पित्याला कधी ज्ञानाचा सागर म्हणणार नाही. हा देखील बाबाच येऊन तुम्हा मुलांना स्वतःचा परिचय देतात. तुम्ही जाणता आता जुनी दुनिया नष्ट होणार आहे. आपण ८४ जन्मांचे चक्र पूर्ण केले. आता आपण पुरुषार्थ करत आहोत परत सुखधामला जाण्यासाठी व्हाया शांतीधाम. शांतीधामला तर जरूर जायचे आहे. तिथून मग इथे परत यायचे आहे. मनुष्य तर या गोष्टींमध्ये गोंधळलेले आहेत. कोणाचा मृत्यू झाला तर असे समजतात वैकुंठामध्ये गेला. परंतु वैकुंठ आहे कुठे? हे वैकुंठाचे नाव तर भारतवासीच जाणतात इतर धर्मवाले जाणतही नाहीत. फक्त नाव ऐकले आहे, चित्र पाहिली आहेत. देवतांची मंदिरे इत्यादी खूप पाहिली आहेत. जसे हे दिलवाडा मंदिर आहे. लाखो-करोडों रुपये खर्च करून बनवले आहे, बनवतच राहतात. देवी-देवतांना, वैष्णव म्हणतात. ते विष्णूची वंशावळी आहेत. ते तर आहेतच पवित्र. सतयुगाला म्हटले जाते पावन दुनिया. ही आहे पतित दुनिया. सतयुगातील वैभव (पक्वान्ने) इत्यादी इथे नसतात. इथे तर धान्य इत्यादी सर्व तमोप्रधान बनते. स्वाद देखील तमोप्रधान. मुली ध्यानामध्ये जातात, आणि म्हणतात आम्ही शुबिरस पिऊन आलो. खूप स्वादिष्ट होता. इथे देखील तुमच्या हातचे खातात तर म्हणतात खूप स्वादिष्ट आहे कारण तुम्ही चांगल्या रीतीने बनवता. सर्वजण मनसोक्त खातात. असे नाही, तुम्ही योगमध्ये राहून बनवता म्हणून स्वादिष्ट होते! नाही, याची देखील प्रॅक्टिस होते. कोणी खूप चांगले भोजन बनवतात. तिथे तर प्रत्येक वस्तू सतोप्रधान असते, म्हणून खूप शक्ती असते. तमोप्रधान झाल्यामुळे शक्ती कमी होते, मग त्यामुळे आजारपण, दुःख इत्यादी देखील होत राहते. नावच आहे दुःखधाम. सुखधाममध्ये तर दुःखाची गोष्टच नसते. आपण इतक्या सुखामध्ये जातो, ज्याला स्वर्गसुख म्हटले जाते. फक्त तुम्हाला पवित्र बनायचे आहे, ते देखील या जन्मामध्ये. मागचा विचार करू नका, आता तर तुम्ही पवित्र बना. पहिला हा तर विचार करा की, हे सांगत कोण आहे! बेहच्या बाबांचा परिचय द्यावा लागेल. बेहदच्या बाबांकडून सुखाचा वारसा मिळतो. लौकिक पिता देखील पारलौकिक पित्याची आठवण करतात. बुद्धी वर निघून जाते. तुम्ही मुले जी निश्चय बुद्धी पक्के आहात, त्यांच्या मनात राहील की या दुनियेमध्ये आपण बाकी थोडे दिवस आहोत. हे तर कवडीतुल्य शरीर आहे. आत्मा देखील कवडीतुल्य बनली आहे, याला वैराग्य म्हटले जाते.

आता तुम्हा मुलांनी ड्रामाला जाणले आहे. भक्तिमार्गचा पार्ट चालणारच आहे. सर्व भक्तीमध्ये आहेत, यामध्ये तिरस्कार करण्याची गरज नाही. संन्यासी स्वतः तिरस्कार उत्पन्न करतात. घरामध्ये सर्वजण दु:खी होतात आणि ते जाऊन आपल्याला थोडे सुखी करतात. परत मुक्तीमध्ये कोणीही जाऊ शकत नाही. जे कोणी आले आहेत, परत कोणीही गेलेला नाही आहे. सर्वजण इथेच आहेत. एक देखील निर्वाणधाम अथवा ब्रह्ममध्ये गेलेला नाही. ते समजतात आमका ब्रह्ममध्ये लीन झाला. हे सर्व भक्तीमार्गातील शास्त्रांमध्ये आहे. बाबा म्हणतात - या शास्त्र इत्यादींमध्ये जे काही आहे, सर्व भक्तीमार्ग आहे. तुम्हा मुलांना आता ज्ञान मिळत आहे त्यामुळे तुम्हाला इतर काहीही शिकण्याची आवश्यकता नाही. परंतु काहीजण असे आहेत ज्यांना कादंबऱ्या इत्यादी वाचण्याची सवय आहे. ज्ञान तर पूर्ण नाही आहे. त्यांना म्हटले जाते - कुक्कड ज्ञानी (दुसऱ्यांना जागे करून स्वतः अज्ञान निद्रेमध्ये झोपी जाणारे). रात्री कादंबरी वाचून झोपले तर त्यांची गती काय होणार? इथे तर बाबा म्हणतात - जे काही वाचले आहे ते सर्व काही विसरून जा. या रूहानी अभ्यासाला लागा. हे तर स्वयं भगवान शिकवत आहेत, ज्यामुळे तुम्ही २१ जन्मांसाठी देवता बनता. बाकी जे काही वाचले आहे ते सर्व काही विसरावे लागते. एकदम बाल्यावस्थेमध्ये परत जा. स्वतःला आत्मा समजा. भले या डोळ्यांनी पाहता परंतु बघत असताना देखील पहायचे नाही. तुम्हाला दिव्यदृष्टी, दिव्यबुद्धी मिळाली आहे तर असे समजता ही सर्व जुनी दुनिया आहे. हि नष्ट होणार आहे. हे सर्व कब्रस्तानी आहेत, त्यांच्यावर काय प्रेम करायचे. आता परिस्तानी बनायचे आहे. तुम्ही आता कब्रस्तान आणि परिस्तानच्या मध्यभागी बसले आहात. परिस्तान आता बनत आहे. आता बसले आहात जुन्या दुनियामध्ये. परंतु मध्येच बुद्धियोग तिथे गेला आहे. तुम्ही पुरुषार्थच नवीन दुनियेसाठी करत आहात. आता मध्यभागी बसले आहात, पुरुषोत्तम बनण्यासाठी. या पुरुषोत्तम संगमयुगा विषयी कोणालाही माहिती नाही आहे. पुरुषोत्तम मास, पुरुषोत्तम वर्ष, याचा देखील अर्थ समजत नाहीत. पुरुषोत्तम संगमयुगाला थोडा वेळ मिळाला आहे. उशिरा युनिव्हर्सिटीमध्ये आलात तर खूप मेहनत करावी लागेल. आठवण खूप मुश्किलीने टिकते, माया विघ्न आणत राहते. तर बाबा समजावून सांगत आहेत की, ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे. बाबा (ब्रह्मा बाबा) भले इथे बसले आहेत, बघत आहेत परंतु बुद्धीमध्ये आहे हे सर्व नष्ट होणार आहे. काहीही राहणार नाही. ही तर जुनी दुनिया आहे, यापासून वैराग्य येते. शरीरधारी देखील सर्व जुने आहेत. शरीर जुने तमोप्रधान आहे तर आत्मा देखील तमोप्रधान आहे. अशा वस्तूला बघून आम्ही काय करणार! हे तर काहीच राहणार नाही आहे, त्यावर प्रेम नाही. मुलांमध्ये देखील बाबांचे प्रेम त्यांच्यावर जडते जे बाबांना चांगल्या रीतीने आठवण करतात आणि सेवा करतात. बाकी संतान तर सगळेच आहेत. किती भरपूर मुले आहेत. सर्वजण तर कधी बघणार देखील नाहीत. प्रजापिता ब्रह्माला तर जाणतही नाहीत. प्रजापिता ब्रह्माचे तर नाव ऐकले आहे परंतु त्यांच्याकडून काय मिळते - हे काहीच माहिती नाही आहे. ब्रह्माचे मंदिर आहे, दाढीवाला दाखवला आहे. परंतु त्यांची कोणी आठवण करत नाहीत कारण त्यांच्याकडून वारसा मिळणार नाहीये. आत्म्यांना वारसा मिळतो एका लौकिक पित्याकडून, दुसरा पारलौकिक पित्याकडून. प्रजापिता ब्रह्माला तर कोणी जाणतही नाहीत. ही वंडरफुल गोष्ट आहे. पिता असून वारसा देत नाहीत तर अलौकिक झाले ना. वारसा असतोच हदचा आणि बेहदचा. मधला वारसा नसतो. भले प्रजापिता म्हणतात परंतु वारसा काहीच नाही. या अलौकिक पित्याला (ब्रह्मा बाबांना) देखील वारसा पारलौकिक कडून मिळतो तर मग हे देणार कसे! पारलौकिक पिता यांच्या थ्रू देतात. हा (ब्रह्माचे तन) आहे रथ. यांची काय आठवण करायची. यांना स्वतःला देखील त्या पित्याची आठवण करावी लागते. ते लोक असे समजतात कि हे ब्रह्मालाच परमात्मा समजतात. परंतु आपल्याला वारसा यांच्याकडून मिळत नाही, वारसा तर शिवबाबांकडून मिळतो. हे तर मधले दलाल रूपामध्ये आहेत. हे देखील आपल्यासारखे स्टुडंट आहेत. घाबरण्याची कोणती गोष्ट नाही.

बाबा म्हणतात - यावेळी सारी दुनिया तमोप्रधान आहे. तुम्हाला योगबलाने सतोप्रधान बनायचे आहे. लौकिक पित्याकडून हदचा वारसा मिळतो. तुम्हाला आता बुद्धी लावायची आहे बेहदमध्ये. बाबा म्हणतात - बाबांशिवाय इतर कोणाकडूनही काहीही मिळणार नाही, भले मग ते देवता असले तरी. यावेळी तर सर्वजण तमोप्रधान आहेत. लौकिक पित्याकडून वारसा तर मिळतोच. बाकी या लक्ष्मी-नारायणा कडून तुम्हाला काय पाहिजे? ते लोक तर असे समजतात हे अमर आहेत, कधी मरत नाहीत. तमोप्रधान बनतच नाहीत. परंतु तुम्ही जाणता जे सतोप्रधान होते तेच तमोप्रधानतेमधे येतात. श्रीकृष्णाला लक्ष्मी-नारायणापेक्षा देखील उच्च समजतात कारण ते विवाहित आहेत. श्रीकृष्ण तर जन्मापासूनच पवित्र आहे म्हणून श्रीकृष्णाची खूप महिमा आहे. पाळण्यात देखील श्रीकृष्णाला झुलवतात. जयंती देखील श्रीकृष्णाची साजरी करतात. लक्ष्मी-नारायणाची का साजरी करत नाहीत? ज्ञान नसल्याकारणाने श्रीकृष्णाला द्वापरमध्ये घेऊन गेले आहेत. असे म्हणतात गीतेचे ज्ञान द्वापारयुगामध्ये दिले आहे. किती कठीण आहे कुणाला समजावून सांगणे! म्हणतात ज्ञान तर परंपरेने चालत आले आहे. परंतु परंपरा देखील केव्हापासून? हे कोणीही जाणत नाहीत. पूजा केव्हापासून सुरू झाली हे देखील जाणत नाहीत म्हणून म्हणतात - रचता आणि सृष्टीच्या आदि-मध्य-अंताला जाणत नाही. कल्पाची आयु लाखो वर्ष म्हटल्यामुळे परंपरा असे म्हणतात. तिथी-तारीख काहीच जाणत नाहीत. लक्ष्मी-नारायणाचा देखील जन्मदिवस साजरा करत नाहीत. याला म्हटले जाते अज्ञान अंधःकार. तुमच्यापैकी देखील काहीजण यथार्थ रीतीने या गोष्टींना जाणत नाहीत. तेव्हाच तर म्हटले जाते - महारथी, घोडेस्वार आणि प्यादे. गजाला ग्राह ने खाल्ले (हत्तीला मगरीने गिळंकृत केले), मगरी मोठ्या असतात, एकदम हप करतात (गिळंकृत करतात). जसे साप बेडकाला गिळंकृत करतो.

भगवंताला बागवान, माळी, खिवैया (नावाडी) का म्हणतात? हे देखील तुम्हाला आता समजते आहे. बाबा येऊन विषय सागरातून पार घेऊन जातात, तेव्हाच तर म्हणतात - नैया मेरी पार लगा दो. तुम्हाला देखील आता माहित झाले आहे की आपण कसे पार जात आहोत. बाबा आपल्याला क्षीरसागरामध्ये घेऊन जातात. तिथे वेदना-दुःखाची कोणती गोष्ट नाही. तुम्ही ऐकून इतरांना देखील सांगता की नाव पार करणारे खिवैया म्हणत आहेत की - हे मुलांनो, तुम्ही सर्व स्वतःला आत्मा समजा. तुम्ही अगोदर क्षीरसागरामध्ये होता, आता विषय सागरामध्ये येऊन पोहोचले आहात. आधी तुम्ही देवता होता. स्वर्ग आहे वंडर ऑफ वर्ल्ड. साऱ्या दुनियेमध्ये रूहानी वंडर आहे - स्वर्ग. नाव ऐकूनच खुशी होते. स्वर्गामध्ये तुम्हीच राहता. इथे सात वंडर्स दाखवतात. ताजमहालाला देखील वंडर म्हणतात परंतु त्यात रहायचे थोडेच आहे. तुम्ही तर वंडर ऑफ वर्ल्डचे मालक बनता. तुम्हाला राहण्यासाठी बाबांनी किती वंडरफुल वैकुंठ बनवले आहे, २१ जन्मांसाठी पद्मा-पदमपती बनता. तर तुम्हा मुलांना किती खुशी झाली पाहिजे. आपण पार पलीकडे जात आहोत. अनेक वेळा तुम्ही मुले स्वर्गामध्ये गेला असाल. हे चक्र तुम्ही फिरतच राहता. पुरुषार्थ असा केला पाहिजे की नवीन दुनियेमध्ये आपण सर्वप्रथम यावे. जुन्या घरामध्ये जाण्याची इच्छा थोडीच होते. बाबा जोर देऊन सांगतात कि पुरुषार्थ करून नवीन दुनियेमध्ये जा. बाबा आपल्याला वंडर ऑफ वर्ल्डचे मालक बनवतात. तर अशा बाबांची आपण आठवण का बरे करणार नाही! खूप मेहनत करायची आहे. यांना (ब्रह्मा बाबांना) बघत असून देखील पाहू नका. बाबा म्हणतात भले मी बघतो, परंतु माझ्यामध्ये ज्ञान आहे - मी थोड्या दिवसांचा प्रवासी आहे. तसे तर तुम्ही देखील इथे पार्ट बजावण्यासाठी आले आहात त्यामुळे यामधून मोह काढून टाका. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-

१) रुहानी अभ्यासामध्ये सदैव व्यस्त रहायचे आहे. कधीही कादंबऱ्या इत्यादी वाचण्याची खराब सवय लावून घ्यायची नाही, आतापर्यंत जे काही वाचले आहे त्याला विसरून बाबांची आठवण करायची आहे.

२) या जुन्या दुनियेमध्ये स्वतःला पाहुणा समजून रहायचे आहे. त्याच्यावर जीव लावायचा नाही, बघत असताना देखील पहायचे नाही.

वरदान:-
हिम्मत आणि उमंग-उत्साहाच्या पंखांद्वारे उडत्या कलेमध्ये उडणारे तीव्र पुरुषार्थी भव

उडत्या कलेचे दोन पंख आहेत - हिम्मत आणि उमंग-उत्साह. कोणत्याही कार्यामध्ये सफलता प्राप्त करण्यासाठी हिम्मत आणि उमंग-उत्साहाची खूप गरज असते. जिथे उमंग-उत्साह नसतो तिथे थकवा जाणवतो आणि थकलेला कधीही सफल (यशस्वी) होत नाही. वर्तमान समयानुसार उडती कला असल्याशिवाय ध्येया पर्यंत पोहोचू शकणार नाही कारण पुरुषार्थ एका जन्माचा आणि प्राप्ती केवळ २१ जन्मांसाठीच नाही तर साऱ्या कल्पासाठी आहे. तर जेव्हा काळाची जाणीव लक्षात राहते तेव्हा पुरुषार्थ स्वतःच तीव्र गतीने होतो.

बोधवाक्य:-
सर्वांची मनोकामना पूर्ण करणारेच कामधेनू आहेत.