01-04-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, तुमचे हे जीवन देवतांपेक्षा देखील उत्तम आहे, कारण तुम्ही आता रचयिता आणि रचनेला यथार्थरित्या जाणून आ स्तिक बनले आहात”

प्रश्न:-
संगमयुगी ईश्वरीय परिवाराची विशेषता काय आहे, जी साऱ्या कल्पामध्ये असणार नाही?

उत्तर:-
संगमयुगामध्ये स्वयं ईश्वर पिता बनून तुम्हा मुलांचा सांभाळ करत आहेत, टीचर बनून शिक्षण देत आहेत आणि सतगुरू बनून गुल-गुल (फुल) बनवून सोबत घेऊन जातात. सतयुगामध्ये दैवी परिवार असेल परंतु असा ईश्वरीय परिवार असू शकणार नाही. तुम्ही मुले आता बेहदचे संन्याशी देखील आहात आणि राजयोगी देखील आहात. राजाईसाठी शिकत आहात.

ओम शांती।
ही शाळा अथवा पाठशाळा आहे. कुणाची पाठशाळा आहे? आत्म्यांची पाठशाळा. हे खरे आहे की आत्मा शरीराशिवाय काहीही ऐकू शकत नाही. जेव्हा म्हटले जाते - ‘आत्म्यांची पाठशाळा’ तेव्हा हे लक्षात घेतले पाहिजे की, आत्मा शरीराशिवाय तर समजू शकणार नाही. मग म्हणावे लागते - जीव-आत्मा. आता जीव आत्म्यांच्या पाठशाळा तर सर्वच आहेत म्हणूनच असे म्हटले जाते की, ही आहे आत्म्यांची पाठशाळा आणि परमपिता परमात्मा येऊन शिकवतात. ते आहे भौतिक शिक्षण आणि हे आहे आत्मिक शिक्षण जे बाबा शिकवत आहेत. तर ही झाली गॉडफादरची युनिव्हर्सिटी. भगवानुवाच आहे ना. हा भक्तिमार्ग नाहीये, हे शिक्षण आहे. शिक्षण शाळेत दिले जाते. भक्ती, मंदिर ठिकाणे इत्यादीमध्ये केली जाते. या ठिकाणी कोण शिकवतात? भगवानुवाच. इतर कोणत्याही पाठशाळेमध्ये भगवानुवाच असत नाही. हे फक्त एकच ठिकाण आहे जिथे भगवानुवाच आहे. सर्वश्रेष्ठ परमपिता परमात्म्याला ज्ञान सागर म्हटले जाते, तेच ज्ञान देऊ शकतात. बाकी सर्व आहे भक्ति. भक्ति विषयी बाबांनी समजावून सांगितले आहे की, भक्तिने सद्गती मिळत नाही. सर्वांचे सद्गती दाता एक परमात्मा आहेत ते येऊन राजयोग शिकवतात. आत्मा ऐकते शरीराद्वारे. इतर कोणत्याही शिक्षण इत्यादीमध्ये भगवानुवाचच नाही आहे. एक भारतच आहे जिथे शिवजयंती देखील साजरी केली जाते. भगवान तर निराकार आहेत तर मग शिवजयंती कशी साजरी करतात. शिवजयंती तर तेव्हा साजरी केली जाते जेव्हा शरीरामध्ये प्रवेश करतात. बाबा म्हणतात की, मी तर कधीही गर्भामध्ये प्रवेश करत नाही. तुम्ही सर्व गर्भामध्ये प्रवेश करता. तुम्ही ८४ जन्म घेता. सर्वात जास्त जन्म हे लक्ष्मी-नारायण घेतात. ८४ जन्म घेऊन मग सावळे, खेडुताचा मुलगा बनतात. लक्ष्मी-नारायण म्हणा नाहीतर राधे-कृष्ण म्हणा. बालपणी आहेत राधे-कृष्ण. ते जेव्हा जन्म घेतात स्वर्गातच घेतात, ज्याला वैकुंठ सुद्धा म्हटले जाते. पहिल्या नंबरचा जन्म यांचा आहे, आणि ८४ जन्म देखील हेच घेतात. श्याम आणि सुंदर, सुंदर सो श्याम. श्रीकृष्ण सर्वांनाच प्रिय वाटतो. श्रीकृष्णाचा जन्म तर होतोच नवीन दुनियेमध्ये. मग पुनर्जन्म घेत-घेत जुन्या दुनियेमध्ये पोचतात तर मग श्याम बनतात. हा खेळच असा आहे. पहिला भारत सतोप्रधान सुंदर होता, आता काळा झाला आहे. बाबा म्हणतात हे सर्व आत्मे माझी मुले आहेत. आता सर्व काम-चितेवर बसल्यामुळे जळून काळी झाली आहेत. मी येऊन सर्वांना परत घेऊन जातो. हे सृष्टीचे चक्रच असे आहे. फुलांची बाग मग पुन्हा काट्यांचे जंगल बनते. बाबा समजावून सांगत आहेत की, तुम्ही मुले किती सुंदर विश्वाचे मालक होता, आता पुन्हा बनत आहात. हे लक्ष्मी-नारायण सुध्दा विश्वाचे मालक होते. हे ८४ जन्म भोगून पुन्हा असे बनत आहेत अर्थात त्यांची आत्मा आता शिकत आहे.

तुम्ही जाणता सतयुगामध्ये अपार सुख आहे, ज्यामुळे बाबांची कधी आठवण करण्याची गरजच पडत नाही. गायन आहे - ‘दु:ख में सिमरण सब करें…’ कोणाची आठवण? बाबांची. इतक्या सर्वांची आठवण करायची नाहीये. भक्तीमध्ये किती आठवण करतात. जाणत काहीच नाहीत. श्रीकृष्ण केव्हा आला, तो कोण आहे - काहीच जाणत नाहीत. श्रीकृष्ण आणि श्रीनारायण यांच्यातला फरक सुद्धा जाणत नाहीत. शिवबाबा आहेत उच्च ते उच्च. मग त्यांच्या नंतर ब्रह्मा, विष्णु, शंकर… त्यांना मग देवता म्हटले जाते. लोकं तर सर्वांनाच भगवान् म्हणत राहतात. सर्वव्यापी म्हणतात. बाबा म्हणतात - सर्वव्यापी तर माया ५ विकार आहेत जे प्रत्येकामध्ये आहेत. सतयुगामध्ये कोणताही विकार असत नाही. मुक्तीधाममध्ये देखील आत्मे पवित्र असतात. अपवित्रतेचा प्रश्नच नाही. तर हे रचयिता बाबाच येऊन स्वतःचा परिचय करुन देतात, आदि-मध्य-अंताचे रहस्य समजावून सांगतात, ज्याद्वारे तुम्ही आस्तिक बनता. तुम्ही एकदाच आस्तिक बनता. तुमचे हे जीवन देवतांपेक्षा देखील उत्तम आहे. गायले देखील जाते - मनुष्य जीवन दुर्लभ आहे. आणि जेव्हा पुरुषोत्तम संगमयुग असते तेव्हा जीवन हिऱ्या समान बनते. लक्ष्मी-नारायणाला हिऱ्या समान म्हणणार नाही. तुमचा जन्म हिऱ्या समान आहे. तुम्ही आहात ‘ईश्वरीय संतान’, ते आहेत ‘दैवी संतान’. इथे तुम्ही म्हणता आम्ही ईश्वरीय संतान आहोत, ईश्वर आमचा पिता आहे, ते आम्हाला शिकवतात कारण ज्ञानाचा सागर आहेत ना, राजयोग शिकवतात. हे ज्ञान फक्त एकदाच पुरुषोत्तम संगमयुगामध्ये मिळते. हे युग उत्तम ते उत्तम पुरुष बनण्याचे युग आहे, ज्याला दुनिया जाणतही नाही. सर्वजण कुंभकर्णाच्या अज्ञान निद्रेमध्ये झोपून पडले आहेत. सर्वांचा विनाश समोर उभा आहे त्यामुळे मुलांनी आता कोणाशीही संबंध ठेवायचा नाही. असे म्हणतात - ‘अन्तकाल जो स्त्री सिमरे…’ अंतिम समयी शिवबाबांची आठवण कराल तर नारायण योनीमध्ये याल. ही शिडी (शिडीचे चित्र) खूप चांगली आहे. लिहिले आहे - हम सो देवता पुन्हा सो क्षत्रिय, इत्यादी. या वेळी आहे रावण राज्य, जेव्हा ते आपल्या आदि सनातन देवी-देवता धर्माला विसरून इतर धर्मांमध्ये अडकले आहेत. ही सर्व दुनिया लंका आहे. बाकी सोन्याची कोणती लंका नव्हती. बाबा म्हणतात - ‘तुम्ही तुमच्या पेक्षा माझीच जास्त निंदा केली आहे, आपणासाठी ८४ लाख आणि मला कणाकणामध्ये आहे असे म्हणता. अशा अपकारींवर मी उपकार करतो’. बाबा म्हणतात - यात तुमचा काहीही दोष नाही, हा ड्रामाचा खेळ आहे. सतयुग आदि पासून कलीयुग अंतापर्यंत हा खेळ आहे, जो होतच राहणार आहे. याला बाबांशिवाय दुसरा कोणीही समजावून सांगू शकणार नाही. तुम्ही सर्व ब्रह्माकुमार-कुमारी आहात. तुम्ही ब्राह्मण आहात ईश्वरीय संतान. तुम्ही ईश्वरीय परिवारामध्ये बसले आहात. सतयुगामध्ये असणार दैवी परिवार. या ईश्वरीय परिवारामध्ये बाबा तुम्हाला सांभाळतात देखील, शिकवतात देखील आणि मग (गुल-गुल) फुल बनवून सोबत देखील घेऊन जाणार. तुम्ही शिकता मनुष्यापासून देवता बनण्यासाठी. ग्रंथामध्ये देखील आहे ‘मनुष्य से देवता किये…’ म्हणून परमात्म्याला जादूगार म्हटले जाते. नरकाला स्वर्ग बनविणे जादूचा खेळ आहे ना. स्वर्गा पासून नरक बनण्यासाठी ८४ जन्म आणि मग नरका पासून स्वर्ग चुटकीसरशी (सेकंदामध्ये) बनतो. एका सेकंदात जीवनमुक्ती. मी आत्मा आहे, आत्म्याला जाणले, बाबांना देखील जाणले. इतर कोणताही मनुष्य हे जाणत नाही की, आत्मा काय आहे? गुरू अनेक आहेत, सद्गुरु एक आहे. असे म्हणतात - ‘सद्गुरु अकाल’. परमपिता परमात्मा एकच सद्गुरु आहेत. परंतु गुरू तर अनेक आहेत. निर्विकारी तर कुणीच नाही. सगळे विकारातूनच जन्म घेतात.

आता राजधानी स्थापन होत आहे. तुम्ही सर्व इथे राजाईसाठी शिक्षण घेत आहात. राजयोगी आहात, बेहद संन्यासी आहात. ते हठयोगी आहेत हदचे संन्यासी. बाबा येऊन सर्वांची सद्गती करून सुखी बनवतात. मलाच म्हणतात - ‘सद्गुरू अकाल मूर्त’. तिथे (सतयुगामध्ये) आपण घडोघडी एक शरीर सोडून दुसरे घेत नाही. काळ खात नाही. तुमची आत्मा देखील अविनाशी आहे, परंतु पतित आणि पावन बनते. निर्लेप नाहीये. ड्रामाचे रहस्य देखील बाबाच समजावून सांगतात. रचयिताच रचनेच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य समजावून सांगतील ना. ज्ञानाचा सागर तेच एक बाबा आहेत. तेच तुम्हाला मनुष्यापासून देवता डबल सिरताज (डबल मुकुटधारी) बनवतात. तुमचा जन्म कवडी समान होता. आता तुम्ही हिऱ्या समान बनत आहात. बाबांनी ‘हम सो, सो हम’चा मंत्र देखील समजावून सांगितला आहे. ते (दुनियावाले) म्हणतात - ‘आत्मा सो परमात्मा, परमात्मा सो आत्मा, हम सो, सो हम’. बाबा म्हणतात - ‘आत्मा सो परमात्मा कशीकाय बनू शकते! बाबा तुम्हाला समजावून सांगत आहेत - आम्ही आत्मे या वेळी तर ब्राह्मण आहोत मग आम्ही आत्मे ब्राह्मण सो देवता बनणार, नंतर सो क्षत्रिय बनणार, नंतर शुद्र सो ब्राह्मण. सर्वात श्रेष्ठ जन्म तुमचा आहे. हे ईश्वरीय घर आहे. तुम्ही कुणाजवळ बसले आहात? मात-पित्याजवळ. सर्वजण भाऊ-बहिणी आहेत. बाबा आत्म्यांना शिक्षण देतात. तुम्ही सर्व माझी मुले आहात, वारशाचे अधिकारी आहात, त्यामुळे परमात्मा पित्याकडून सर्वजण वारसा घेऊ शकतात. वृध्द, लहान, थोर, सर्वांना बाबांकडून वारसा घेण्याचा अधिकार आहे. तेव्हा मुलांना देखील हेच समजावून सांगा - ‘स्वतःला आत्मा समजा आणि बाबांची आठवण करा तर पापे नष्ट होतील’. भक्ति मार्गातील लोकांना या गोष्टी अजिबात समजणार नाहीत. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

रात्री क्लास

मुले बाबांना ओळखतात देखील आणि समजतात देखील की बाबा शिकवत आहेत, त्यांच्याकडून बेहदचा वारसा मिळणार आहे. परंतु समस्या हि आहे की, माया विसरायला लावते. काही ना काही विघ्न आणते ज्यामुळे मुले घाबरून जावीत. त्यातूनही पहिला नंबर आहे विकाराला बळी पडतात. डोळे धोका देतात. डोळे काढून टाकण्याची काही गोष्ट नाहीये. बाबा ज्ञानाचा नेत्र देतात, ज्ञान आणि अज्ञान यांचे युद्ध चालू असते. ज्ञान आहे - बाबा, अज्ञान आहे - माया. यांचे युद्ध अतिशय जबरदस्त आहे. कोसळतात (आहारी जातात) तेव्हा लक्षात येत नाही. नंतर लक्षात येते मी आहारी गेलो आहे, मी माझे खूप अकल्याण केले आहे. मायेने एकदा हरवले तर मग पुन्हा चढणे (त्यातून बाहेर पडणे) अवघड होते. बरीच मुले म्हणतात की, आम्ही ध्यानामध्ये जातो, परंतु त्यामध्ये देखील माया प्रवेश करते. लक्षात देखील येत नाही. माया चोरी करायला भाग पाडेल, खोटे बोलायला लावेल. माया काय करायला लावत नाही! काही विचारुच नका. घाणेरडे बनवते. फुल बनता-बनता घाणेरडे (पतित) बनतात. माया अशी जबरदस्त आहे की घडो-घडी पाडून घालते (आहारी जायला भाग पाडते).

मुले म्हणतात - ‘बाबा, आम्ही घडो-घडी विसरून जातो’. तदबीर (पुरुषार्थ) करवून घेणारे तर एक बाबाच आहेत, परंतु कुणाच्या तकदिरमध्ये (नशिबात) नसेल तर तदबीर (पुरुषार्थ) सुद्धा करू शकत नाहीत. यामध्ये कोणती तडजोड देखील होऊ शकत नाही. ना कुणाला जास्तीचे शिकवत. त्या (लौकिक) शिक्षणामध्ये एक्स्ट्रा शिकण्यासाठी टीचरला बोलावतात. हे तर तकदीर (नशीब) घडविण्यासाठी सर्वांना एकसारखे शिकवतात. प्रत्येकाला वेग-वेगळे कुठपर्यंत शिकवणार? किती खंडीभर मुले आहेत! त्या शिक्षणामध्ये कोणा मोठ्या व्यक्तीची मुले असतात, जास्त खर्च करू शकत असतील तर त्यांना एक्स्ट्रा देखील शिकवतात. टीचरला माहीत असते की हे डल (बुद्धीने कमजोर) आहेत त्यामुळे त्यांना जास्त शिकवून स्कॉलरशिपच्या लायक बनवतात. हे बाबा असे काही करत नाहीत. ते तर सर्वांनाच एकसारखे शिकवतात. तो झाला टीचरचा एक्स्ट्रा पुरूषार्थ करणे. इथे तर कुणाकडून वेगळा एक्स्ट्रा पुरूषार्थ करवून घेत नाहीत. एक्स्ट्रा पुरूषार्थ अर्थात टीचर काही कृपा (आशीर्वाद) करतात. भले त्यासाठी अधिकचे पैसे घेतात. खास टाईम देऊन त्यांना शिकवतात ज्यामुळे ते शिकून जास्त हुशार बनतात. इथे तर जास्त काही शिकण्याची गोष्टच नाही. यांची 2. तर एकच गोष्ट आहे. एकच महामंत्र देतात - ‘मनमनाभव’ चा. आठवण केल्याने काय होते, ते तर तुम्ही मुले समजताच आहात. बाबाच पतित-पावन आहेत, तुम्ही जाणता त्यांची आठवण केल्यानेच आपण पावन बनणार. अच्छा - शुभ रात्री!

धारणेसाठी मुख्य सारांश:-

१) सारी दुनिया आता कब्रदाखल होणार आहे. विनाश समोर आहे, त्यामुळे कोणाशीही संबंध ठेवायचा नाही. अंतिम समयी केवळ एका बाबांचीच आठवण राहावी.

२) श्याम पासून सुंदर, पतिता पासून पावन बनण्याचे हे पुरुषोत्तम संगमयुग आहे, हीच वेळ आहे उत्तम पुरुष बनण्याची, सदैव याच स्मृतीमध्ये राहून स्वतःला कवडी पासून हिऱ्या समान बनवायचे आहे.

वरदान:-
ज्ञान-धनाद्वारे प्रकृतीची सर्व साधने प्राप्त करणारे पद्मा-पदमपती भव

ज्ञान-धनाने स्थूल धनाची प्राप्ती आपोआप होते. जिथे ज्ञान-धन आहे तिथे प्रकृती स्वतः दासी बनते. ज्ञानधनामुळे प्रकृतीची सर्व साधने स्वतः प्राप्त होतात म्हणून ज्ञान-धन सर्व धनाचा राजा आहे. जिथे राजा आहे तिथे सर्व पदार्थ स्वतः प्राप्त होतात. हे ज्ञान-धनच पद्मा-पदमपती बनविणारे आहे, परमार्थ आणि व्यवहाराला स्वतः सिद्ध करते. ज्ञान-धनामध्ये एवढी शक्ती आहे की अनेक जन्मांसाठी राजांचाही राजा बनविते.

बोधवाक्य:-
“कल्प-कल्प का विजयी हूँ” - हा रुहानी शुद्ध नशा इमर्ज असेल तर मायाजीत बनाल.