01-05-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही हे सिद्ध करून सांगा की, बेहदचे बाबा आमचे बाबा सुद्धा आहेत, शिक्षक सुद्धा आहेत आणि सद्गुरु सुद्धा आहेत, ते सर्वव्यापी असू शकत नाहीत”

प्रश्न:-
दुनियेमध्ये या वेळी अतीव दुःख का आहे, दुःखाचे कारण सांगा?

उत्तर:-
साऱ्या दुनियेवर या वेळी राहूची दशा आहे, या कारणामुळेच दुःख आहे. वृक्षपती बाबा जेव्हा येतात तेव्हा सर्वांवर बृहस्पतीची दशा बसते. सतयुग-त्रेतायुगामध्ये गुरूची दशा आहे, रावणाचे नामोनिशाण सुद्धा नाहीये त्यामुळे तिथे दुःख असत नाही. बाबा आले आहेत सुखधामची स्थापना करण्यासाठी, त्यामध्ये दुःख असू शकत नाही.

ओम शांती।
गोड-गोड आत्मिक मुलांना आत्मिक बाबा बसून समजावून सांगत आहेत कारण सर्व मुले हे जाणतात - बाबा आत्मा आहेत, आपल्या घरून ते खूप दूरवरून इथे येतात. येऊन या शरीरामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) प्रवेश करतात, पार्ट बजावण्यासाठी. पार्ट आत्माच बजावते. इथे मुले बसली आहेत स्वतःला आत्मा समजून बाबांच्या आठवणीमध्ये, कारण बाबांनी सांगितले आहे की, आठवण केल्यानेच तुम्हा मुलांची जन्म-जन्मांतरीची पापे भस्म होतील. तसेही याला योग देखील म्हणता कामा नये. योग तर संन्यासी लोक शिकवतात. विद्यार्थ्याचा शिक्षकाशी सुद्धा योग असतो, मुलांचा बाबांसोबत योग असतो. हा आहे आत्म्यांचा आणि परमात्म्याचा अर्थात मुलांचा आणि बाबांचा मेळावा. हे आहे कल्याणकारी मिलन. बाकी तर सर्व आहेत अकल्याणकारी. पतित दुनिया आहे ना. तुम्ही जेव्हा प्रदर्शनीमध्ये किंवा म्युझियममध्ये समजावून सांगता तेव्हा आत्मा आणि परमात्म्याचा परिचय देणे ठीक आहे. आत्मे, सर्व मुले आहेत आणि ते आहेत परमपिता परम-आत्मा जे परमधाम मध्ये राहतात. कोणतेही मूल आपल्या लौकिक पित्याला ‘परमपिता’ म्हणणार नाही. परमपित्याची दुःखातच आठवण करतात - ‘हे परमपिता परमात्मा’. परम-आत्मा रहातातच परमधाम मध्ये. आता तुम्ही जेव्हा आत्मा आणि परमात्म्याचे ज्ञान समजावून सांगता तर फक्त एवढेच सांगायचे नाही की, दोन पिता आहेत; परंतु ते पिता देखील आहेत, शिक्षक सुद्धा आहेत - हे देखील जरूर समजावून सांगायचे आहे. आपण सर्व भाऊ-भाऊ आहोत, ते सर्व आत्म्यांचे पिता आहेत. भक्तीमार्गामध्ये सर्व ईश्वर-पित्याची आठवण करतात कारण भगवंताकडून भक्तीचे फळ मिळते अथवा पित्याकडून मुले वारसा घेतात. भगवान भक्तीचे फळ देतात - मुलांना. काय देतात? विश्वाचा मालक बनवतात. परंतु तुम्हाला केवळ पित्यालाच सिद्ध करायचे नाही आहे. ते पिता देखील आहेत तर शिक्षण देणारे सुद्धा आहेत, सद्गुरू सुद्धा आहेत. अशा प्रकारे समजावून सांगाल तर सर्वव्यापीची कल्पना नाहीशी होईल. तर याची भर घाला. ते बाबा ज्ञानाचा सागर आहेत. येऊन राजयोग शिकवतात. तुम्ही सांगा, ‘ते शिकविणारे शिक्षक देखील आहेत, तर मग सर्वव्यापी कसे असू शकतील?’ शिक्षक नक्कीच वेगळे आहेत, विद्यार्थी वेगळे आहेत. जसे बाबा वेगळे आहेत, मुले वेगळी आहेत. आत्मे, परमात्मा बाबांची आठवण करतात, त्यांची महिमा सुद्धा करतात. बाबाच मनुष्य सृष्टीचे बीजरूप आहेत. तेच येऊन आम्हाला सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान ऐकवतात. बाबा स्वर्गाची स्थापना करतात, आपण स्वर्गवासी बनतो. तसेच हे देखील समजावून सांगतात की, दोन पिता आहेत. लौकिक पित्याने पालन-पोषण केले कि मग शिक्षणासाठी शिक्षकाकडे जावे लागते. नंतर ६० वर्षानंतर वानप्रस्थ अवस्थेमध्ये जाण्यासाठी गुरू करावा लागतो. पिता, टीचर, गुरु वेगवेगळे असतात. हे बेहदचे बाबा तर सर्व आत्म्यांचे पिता आहेत, ज्ञान सागर आहेत. मनुष्य सृष्टीचे बीजरूप सत्-चित-आनंद स्वरूप आहेत. सुखाचा सागर, शांतीचा सागर आहेत. त्यांची महिमा करायला सुरुवात करा कारण दुनियेमध्ये मतभेद खूप आहेत ना. ते जर सर्वव्यापी असतील तर मग शिक्षक बनून शिकवतील कसे? आणि मग सद्गुरु सुद्धा आहेत, गाईड बनून सर्वांना घेऊन जातात. शिकवण देतात अर्थात आठवण करायला शिकवतात. भारताच्या प्राचीन राजयोगाचेही गायन आहे (प्रसिद्ध आहे). सर्वात एकदम जुने आहे संगमयुग. नव्या आणि जुन्या दुनियेचा मध्य-काळ. तुम्हाला समजते की, आजपासून ५ हजार वर्षांपूर्वी बाबांनी येऊन आपले बनवले होते आणि आपले शिक्षक-सद्गुरु सुद्धा बनले होते. ते आमचे केवळ बाबाच नाहित, तर ते ज्ञानाचा सागर अर्थात शिक्षक सुद्धा आहेत, आम्हाला शिकवण देतात. सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य समजावून सांगतात कारण बीजरूप, वृक्षपती आहेत. ते जेव्हा भारतामध्ये येतात तेव्हा भारतावर बृहस्पतीची दशा बसते. सतयुगामध्ये सर्वजण सदा सुखी देवी-देवता असतात. सर्वांवर बृहस्पतीची दशा बसते. आणि जेव्हा दुनिया तमोप्रधान होते तेव्हा सर्वांवर राहूची दशा बसते. वृक्षपतीला कोणीच जाणत नाहीत. जर जाणले नाहीत तर मग वारसा कसा बरे मिळू शकेल!

तुम्ही जेव्हा इथे बसता तेव्हा अशरीरी होऊन बसा. हे तर ज्ञान मिळते की, आत्मा वेगळी आहे, घर वेगळे आहे. ५ तत्त्वांचा पुतळा (शरीर) बनतो, त्यामध्ये आत्मा प्रवेश करते. सर्वांचा पार्ट निश्चित आहे. सर्वात पहिली ही गोष्ट समजावून सांगायची आहे की बाबा सुप्रीम पिता आहेत, सुप्रीम टीचर आहेत. लौकिक पिता, शिक्षक, गुरू यांच्यातील फरक सांगितल्यावर मग लगेच समजतील, डिबेट (वादविवाद) करणार नाहीत. आत्म्यांच्या पित्याकडे सर्व ज्ञान आहे. हे वैशिष्ट्य आहे. तेच आम्हाला रचनेच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य समजावून सांगतात. पूर्वी ऋषी-मुनी इत्यादी तर म्हणायचे - ‘आम्ही रचता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणत नाही’; कारण त्या वेळी ते सतो होते. प्रत्येक गोष्ट सतोप्रधान, सतो, रजो, तमो मध्ये येतेच. नव्याची जुनी नक्की होते. तुम्हाला या सृष्टी चक्राच्या आयु (कालावधी) विषयी देखील माहीत आहे. मनुष्य हे विसरले आहेत की, सृष्टी चक्राचे आयुर्मान किती आहे. बाकी ही शास्त्रे इत्यादी सर्व भक्ती मार्गासाठी बनवतात. बऱ्याच अतिशयोक्ती असलेल्या गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. सर्वांचे पिता तर एकच आहेत. सद्गती दाता एकच आहेत. गुरू अनेक आहेत. सद्गती करणारा सद्गुरु एकच असतो. सद्गती कशी होते - ते देखील तुमच्या बुद्धीमध्ये आहे. आदि सनातन देवी-देवता धर्मालाच सद्गती म्हटले जाते. तिथे फार थोडे मनुष्य असतात. आता तर किती भरमसाट मनुष्य आहेत. तिथे तर फक्त देवतांचे राज्य असेल मग डिनायस्टी (घराण्याची) वृद्धी होत जाते. लक्ष्मी-नारायण पहिले, दुसरे, तिसरे असे चालते. जेव्हा पहिले असतील तेव्हा किती थोडे मनुष्य असतील. हे विचार देखील फक्त तुमचेच चालतात. हे तुम्ही मुले समजता की, भगवान, तुम्हा सर्व आत्म्यांचे पिता एकच आहेत. ते आहेत बेहदचे पिता. हदच्या बाबांकडून हदचा वारसा मिळतो, बेहदच्या बाबांकडून बेहदचा वारसा मिळतो - २१ पिढ्या स्वर्गाची बादशाही. २१ पिढ्या म्हणजे जेव्हा वृद्ध होतात तेव्हा शरीर सोडतात. तिथे स्वतःला आत्मा समजतात. इथे देह-अभिमान असल्यामुळे जाणत नाहीत की आत्माच एक शरीर सोडून दुसरे घेते. आता देह-अभिमानी असलेल्यांना आत्म-अभिमानी कोण बनवणार? यावेळी एक सुद्धा आत्म-अभिमानी नाहीये. बाबाच येऊन आत्म-अभिमानी बनवतात. तिथे हे जाणतात - आत्मा एक मोठे शरीर सोडून छोटे बाळ जाऊन बनणार. सापाचे सुद्धा उदाहरण आहे; हे सर्प, भुंगा इत्यादींची उदाहरणे सर्व इथली आहेत आणि या वेळची आहेत. जी मग भक्ती मार्गामध्ये देखील उपयोगी पडतात. खरे पाहता ब्राह्मणी तर तुम्ही आहात, जे विष्ठेतील किड्यांना भूँ-भूँ करून मनुष्या पासून देवता बनविता. बाबांना ज्ञान आहे ना. तेच ज्ञानाचे सागर, शांतीचे सागर आहेत. सर्वजण शांती मागत राहतात. ‘शांती देवा…’ असे कोणाला बरे हाक मारतात? जे शांतीचे दाता किंवा सागर आहेत, त्यांची महिमा सुद्धा गातात, परंतु अर्थ माहीत नसतो. फक्त बोलतात, समजत काहीच नाहीत. बाबा म्हणतात - हि वेद-शास्त्रे इत्यादी सर्व भक्तीमार्गाची आहेत. ६३ जन्म भक्ती करायचीच आहे. किती खंडीभर शास्त्रे आहेत. परंतु बाबा म्हणतात - ‘मी, कोणते शास्त्र वाचल्याने भेटत नाही’. मला बोलावतात देखील की, येऊन पावन बनवा. ही आहे तमोप्रधान घाणीची दुनिया, जी काहीही कामाची नाही. किती दुःख आहे. दुःख आले कुठून? बाबांनी तर तुम्हाला खूप सुख दिले होते, मग तुम्ही शिडी खाली कशी उतरलात? गायले सुद्धा जाते ‘ज्ञान आणि भक्ती’ ज्ञान, बाबा ऐकवतात आणि भक्ती रावण शिकवतो. ना बाबा दिसण्यात येत, ना रावण दिसण्यात येतो. दोघांनाही या डोळ्यांनी पाहू शकत नाही. आत्म्याला बुद्धीद्वारे समजले जाते. आपण आत्मा आहोत तर आत्म्याचा पिता देखील जरूर आहे. बाबा मग शिक्षक सुद्धा बनतात, बाकी कोणी असे असत नाही.

आता तुम्ही २१ जन्मांसाठी सद्गतीचे चक्र फिरता, त्यामुळे मग गुरूची आवश्यकताच भासत नाही. बाबा सर्वांचे पिता देखील आहेत, तर शिकविणारे शिक्षक सुद्धा आहेत. सर्वांची सद्गती करणारे सद्गुरु सुप्रीम गुरू देखील आहेत. तिघांनाही मग सर्वव्यापी तर म्हणू शकणार नाही. ते तर सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य सांगतात. मनुष्य आठवण देखील करतात - ‘हे पतित-पावन या, सर्वांचे सद्गती दाता या, सर्वांचे दुःख दूर करा, सुख द्या. हे गॉडफादर, हे मुक्तीदाता (लिबरेटर). आणि मग घेऊन जाण्यासाठी आमचा गाईड देखील बना. या रावण राज्यातून मुक्त करा’. रावण राज्य काही लंकेमध्ये नाहीये. ही सारी धरती जी आहे, त्यावर या वेळी रावण राज्य आहे. रामराज्य फक्त सतयुगामध्येच असते. भक्तीमार्गामध्ये मनुष्य किती गोंधळून गेले आहेत.

आता तुम्हाला श्रीमत मिळत आहे - श्रेष्ठ बनण्यासाठी. सतयुगामध्ये भारत श्रेष्ठाचारी होता, पूज्य होता. आतापर्यंत सुद्धा त्यांचे पूजन करत आहेत. भारतावर बृहस्पतीची दशा होती तेव्हा सतयुग होते. आता राहूच्या दशेमध्ये बघा भारताचे काय हाल झाले आहेत. सर्व अन-राइटियस (असत्यवादी) बनले आहेत. बाबा राइटियस (सत्यवादी) बनवतात, रावण अधर्मी बनवतो. म्हणतात देखील - रामराज्य पाहिजे. म्हणजेच रावण राज्यामध्ये आहेत ना. नरकवासी आहेत. रावण राज्याला नरक म्हटले जाते. स्वर्ग आणि नरक अर्धे-अर्धे आहेत. हे देखील तुम्ही मुलेच जाणता - राम राज्य कशाला आणि रावण राज्य कशाला म्हटले जाते? तर सर्वात पहिले म्हणजे यामध्ये निश्चयबुद्धी बनायचे आहे. ते आमचे पिता आहेत, आपण सर्व आत्मे भाऊ-भाऊ आहोत. बाबांकडून वारसा घेण्याचा सर्वांना अधिकार आहे. मिळाला होता. बाबांनी राजयोग शिकवून सुखधामचे मालक बनवले होते. बाकी सर्व निघून गेले शांतिधाममध्ये. हे देखील मुले जाणतात वृक्षपती आहेत चैतन्य. सत्-चित-आनंद स्वरूप आहेत. आत्मा, सत्य देखील आहे तर चैतन्य देखील आहे. बाबा देखील सत् आहेत, चैतन्य आहेत, वृक्षपती आहेत. हे उलटे झाड आहे ना. याचे बीज वरती आहे. बाबाच येऊन समजावून सांगतात - जेव्हा तुम्ही तमोप्रधान बनता तेव्हाच बाबा सतोप्रधान बनविण्यासाठी येतात. हिस्ट्री-जिऑग्राफीची पुनरावृत्ती होते. आता तुम्हाला म्हणतात - ‘हिस्ट्री-जिऑग्राफी... इंग्रजी शब्द बोलू नका. हिंदीमध्ये म्हणूया - इतिहास-भूगोल’. इंग्रजी तर सर्व लोक वाचतातच. समजतात भगवंताने गीता संस्कृतमध्ये ऐकवली. आता श्रीकृष्ण सतयुगाचा राजकुमार. तिथे ही भाषा होती, असे तर काही लिहिलेले नाही आहे. भाषा आहे नक्की. जो-जो राजा बनतो तिथली भाषा त्याची आपली असते. सतयुगी राजांची भाषा त्यांची आपली असेल. संस्कृत तिथे नाहीये. सतयुगातील रीती-रिवाजच, वेगळे आहेत. कलियुगी मनुष्यांचे रीती-रिवाज वेगळे आहेत. तुम्ही सर्व मीरा आहात, ज्या कलियुगी लोक-लाज, कुळाच्या मर्यादा पसंत करत नाही. तुम्ही कलियुगी लोक-लाज सोडता तर किती भांडणे होतात. तुम्हाला बाबांनी श्रीमत दिले आहे - काम महाशत्रू आहे, याच्यावर विजय मिळवा. जगतजीत बनणाऱ्यांचे हे चित्र (लक्ष्मी-नारायणाचे चित्र) सुद्धा समोर आहे. तुम्हाला तर बेहदच्या बाबांकडून सल्ला मिळतो की विश्वामध्ये शांती स्थापन कशी होणार? ‘शांती देवा’ म्हटले कि बाबांचीच आठवण येते. बाबाच येऊन कल्प-कल्प विश्वामध्ये शांती स्थापन करतात. कल्पाचा कालावधी मोठा केल्यामुळे मनुष्य कुंभकर्णाच्या निद्रेमध्ये जणू झोपून पडले आहेत.

सर्वात पहिले तर मनुष्यांना हा निश्चय पक्का करा की ते आपले पिता सुद्धा आहेत, शिक्षक सुद्धा आहेत. शिक्षकाला सर्वव्यापी कसे म्हणणार? तुम्ही मुले जाणता कि बाबा, कसे येऊन आम्हाला शिकवतात. तुम्ही त्यांच्या जीवन-चरित्राला जाणता. बाबा येतातच - नरकाला स्वर्ग बनविण्यासाठी. शिक्षक सुद्धा आहेत तर सोबत सुद्धा घेऊन जातात. आत्मे तर अविनाशी आहेत. ते आपला पूर्ण पार्ट बजावून घरी जातात. घेऊन जाणारा गाईड तर पाहिजे ना. दुःखातून मुक्त करतात आणि मग गाईड बनून सर्वांना घेऊन जातात. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) कलियुगी लोक-लाज, कुळाची मर्यादा सोडून ईश्वरीय कुळाच्या मर्यादा धारण करायच्या आहेत. अशरीरी बाबा जे ऐकवतात ते अशरीरी होऊन ऐकण्याचा अभ्यास पक्का करायचा आहे.

२) बेहदचे बाबा, बाबा देखील आहेत, शिक्षक सुद्धा आहेत, सतगुरु सुद्धा आहेत, हा फरक सर्वांना समजावून सांगायचा आहे. हे सिद्ध करायचे आहे की, बेहदचे बाबा सर्वव्यापी नाहीत.

वरदान:-
हदचे नखरे सोडून रुहानी नाजमध्ये (आत्मिक अभिमानामध्ये) राहणारे प्रीत बुद्धी भव

बरीच मुले हदच्या स्वभाव, संस्कारांचे नखरे खूप करतात. जिथे ‘माझा स्वभाव’, ‘माझे संस्कार’ हे शब्द येतात तिथे नखरे सुरू होतात. हा ‘माझा’ शब्दच अडचणीमध्ये आणतो. परंतु जे बाबांपासून वेगळे आहे ते ‘माझे’ नाहिच आहे. माझा स्वभाव बाबांच्या स्वभावा पेक्षा वेगळा असू शकत नाही. त्यामुळे हदचे नखरे सोडून आत्मिक अभिमानामध्ये रहा. प्रीत बुद्धी बनून स्नेहाच्या प्रेमाचे नखरे भले तुम्ही करा.

बोधवाक्य:-
बाबांवर, सेवेवर आणि कुटुंबावर प्रेम असेल तर मेहनती पासून मुक्त व्हाल.