02-02-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो - उच्च पद प्राप्त करण्यासाठी बाबा तुम्हाला जे शिकवत आहेत त्याला जसेच्या तसे धारण करा, सदैव श्रीमतावर चालत रहा

प्रश्न:-
कधीही पश्चात्ताप होऊ नये, यासाठी कोणत्या गोष्टीवर चांगल्या रीतीने विचार करायचा आहे?

उत्तर:-
प्रत्येक आत्मा जो पार्ट बजावत आहे, तो ड्रामामध्ये ॲक्युरेट नोंदलेला आहे. हा अनादि आणि अविनाशी ड्रामा आहे. या गोष्टीवर विचार कराल तर कधीही पश्चात्ताप करावा लागणार नाही. पश्चात्ताप त्यांना होतो जे ड्रामाच्या आदि-मध्य-अंताला समजत नाहीत. तुम्हा मुलांना या ड्रामाला जसा आहे तसा साक्षी होऊन बघायचे आहे, यामध्ये रडण्या, रूसण्याचे काही कारण नाही.

ओम शांती।
रुहानी बाबा बसून रुहानी मुलांना समजावून सांगत आहेत की आत्मा किती छोटी आहे. खूप छोटी आहे आणि छोट्याशा आत्म्यापेक्षा शरीर किती मोठे दिसते. छोटी आत्मा वेगळी होते तर मग काहीही पाहू शकत नाही. आत्म्यावर विचार केला पाहिजे. एवढी छोटी बिंदू काय-काय काम करते. मॅग्नीफाय ग्लास (भिंग) जे असते, त्यामधून छोट्या-छोट्या हीर्यांचे निरीक्षण करतात. काही डाग इत्यादि तर नाही ना. तर आत्मा देखील किती छोटी आहे. कसे मॅग्नीफाय ग्लास आहे - ज्यामधून बघता. राहते कुठे? काय कनेक्शन आहे? या डोळ्यांनी केवढी मोठी धरती, आकाश दिसते! बिंदू निघून गेल्यावर काहीही राहत नाही. जसे बाबा बिंदू तशी आत्मा बिंदू. एवढी छोटी आत्मा पवित्र आणि अपवित्र बनते. या खूप विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. इतर कोणीही हे जाणत नाहीत कि, आत्मा काय आहे, परमात्मा काय आहे. एवढी छोटी आत्मा शरीरामध्ये राहून काय-काय बनवते. काय-काय बघते. त्या आत्म्यामध्ये सारा ८४ चा पार्ट भरलेला आहे. ती कशी काम करते, वंडर आहे. एवढ्या छोट्याशा बिंदुमध्ये ८४ जन्मांचा पार्ट नोंदलेला आहे. एक शरीर सोडून दुसरे घेते. शरीरामधून आत्मा निघून गेली तर शरीर मरते. केवढे मोठे शरीर आहे आणि केवढी छोटी आत्मा आहे. हे देखील बाबांनी खूप वेळा समजावून सांगितले आहे की, मनुष्यांना कसे समजणार की या सृष्टीचे चक्र दर ५ हजार वर्षानंतर फिरते. अमका मेला, ही काही नवीन गोष्ट नाही. त्याच्या आत्म्याने हे शरीर सोडून दुसरे घेतले. ५ हजार वर्षांपूर्वी देखील या नावा-रूपाला याच वेळी सोडले होते. आत्मा जाणते मी एक शरीर सोडून दुसर्यामध्ये प्रवेश करते.

आता तुम्ही शिवजयंती साजरी करता. दाखवता ५ हजार वर्षांपूर्वी सुद्धा शिवजयंती साजरी केली होती. प्रत्येक ५ हजार वर्षानंतर शिवजयंती जी हिरेतुल्य आहे, साजरी करतच येतात. या गोष्टी खऱ्या आहेत. विचार सागर मंथन करायचे असते जेणेकरून इतरांना समजावून सांगू शकाल. हे सण-उत्सव होतात, तुम्ही म्हणाल काही नवीन गोष्ट नाही, हिस्ट्री रिपीट होत आहे जी पुन्हा ५ हजार वर्षानंतर जो कोणी पार्टधारी आहे तो आपले शरीर घेतो. एक नाव, रूप, देश, काळ सोडून दुसरे घेतात. यावर विचार सागर मंथन करून असे काही लिहा की मनुष्य आश्चर्यचकित होतील. मुलांना आम्ही विचारतो ना - अगोदर कधी भेटलो होतो? इतक्या छोट्या आत्म्यालाच विचारले जाते ना. तुम्ही या नावा-रूपामध्ये अगोदर कधी भेटला होता? आत्म्याने ऐकले. तर खूपजण म्हणतात - हो बाबा, तुम्हाला कल्पापूर्वी भेटलो होतो. ड्रामाचा सारा पार्ट बुद्धीमध्ये आहे. ते असतात हदच्या ड्रामातील ॲक्टर्स. हा आहे बेहदचा ड्रामा. हा ड्रामा एकदम ॲक्युरेट आहे, यामध्ये जरादेखील फरक होऊ शकत नाही. ते चित्रपट असतात हदचे, मशीनवर चालवतात. दोन-चार रोल सुद्धा असू शकतात, जे फिरत राहतात. हा तर अनादि अविनाशी एकच बेहदचा ड्रामा आहे. यामध्ये केवढी छोटी आत्मा एक पार्ट बजावून पुन्हा दूसरा बजावते. ८४ जन्मांचा किती मोठा फिल्म रोल असेल. हा निसर्ग आहे. हे काहींच्याच बुद्धीमध्ये बसेल! आहे तर रेकॉर्डसारखे, खूप वंडरफुल आहे. ८४ लाख तर असू शकत नाहीत. ८४ चेच चक्र आहे, याची ओळख कशी देता येईल. न्यूजपेपरवाल्यांना सुद्धा समजावून सांगा तरी छापतील. मासिकामध्ये सुद्धा वेळोवेळी देऊ शकता. आम्ही या संगमयुगाच्या वेळच्याच गोष्टी सांगत आहोत. सतयुगामध्ये तर या गोष्टी असणार नाहीत. ना कलियुगामध्ये असणार. जनावरे इत्यादि जे पण काही आहे, सर्वांसाठी म्हणणार पुन्हा ५ हजार वर्षानंतर बघणार. फरक पडू शकत नाही. ड्रामामध्ये सर्व नोंद आहे. सतयुगामध्ये जनावरे देखील खूप सुंदर असणार. ही सर्व वर्ल्डची हिस्ट्री-जिओग्राफी (इतिहास-भूगोल) रिपीट होणार. जसे चित्रपटाचे शूटिंग होते. माशी उडाली ती देखील निघून गेली तरी पुन्हा रिपीट होणार. आता आपण या छोट्या-छोट्या गोष्टींचा विचार तर करणार नाही. पहिले तर बाबा स्वत: सांगतात - मी कल्प-कल्प संगमयुगामध्ये या भाग्यशाली रथामध्ये येतो. आत्म्याने विचारले - यामध्ये कसे येतात, एवढा छोटा बिंदू आहे. यांना मग ज्ञानाचा सागर म्हणतात. या गोष्टी देखील तुम्हा मुलांमध्ये जे हुशार आहेत, ते समजू शकतात. प्रत्येक ५ हजार वर्षानंतर मी येतो. हे किती अमूल्य शिक्षण आहे. बाबांकडेच ॲक्युरेट नॉलेज आहे जे मुलांना देतात. तुमच्यामध्ये कोणाला विचारले तर तुम्ही लगेच सांगाल सतयुगाचे आयुर्मान १२५० वर्षांचे आहे. प्रत्येक जन्माचे आयुर्मान १५० वर्षांचे असते. केवढा पार्ट बजावला जातो. बुद्धीमध्ये सारे चक्र फिरते. आपण ८४ जन्म घेतो. सारी सृष्टी अशी चक्रामध्ये फिरत राहते. हा अनादि अविनाशी पूर्व नियोजित ड्रामा आहे. यामध्ये नवीन ॲडिशन होऊ शकत नाही. गायन देखील आहे - चिंता ताकी कीजिए जो अनहोनी होए. जे काही होत आहे ड्रामामध्ये नोंदलेले आहे. साक्षी होऊन बघावे लागते. त्या (लौकिक दुनियेमधील) नाटकामध्ये कोणता असा पार्ट असतो तेव्हा जे कमजोर मनाचे असतात ते रडायला लागतात. आहे तर नाटक ना. हा ड्रामा रियल आहे, यामध्ये प्रत्येक आत्मा आपला पार्ट बजावते. ड्रामा कधी बंद होत नाही. यामध्ये रडण्याची, रुसण्याची काही गोष्ट नाही. कोणतीही नवीन गोष्ट थोडीच आहे. पश्चात्ताप त्यांना होतो जे ड्रामाच्या आदि-मध्य-अंताला समजत नाहीत. हे देखील तुम्ही जाणता. या वेळेला जे आम्ही या ज्ञानामुळे पद प्राप्त करतो, फेरी मारून पुन्हा तेच बनणार. या खूप आश्चर्यकारक विचार सागर मंथन करण्यासारख्या गोष्टी आहे. कोणीही मनुष्य या गोष्टींना जाणत नाहीत. ऋषि-मुनि सुद्धा म्हणतात - आम्ही रचता आणि रचनेला जाणत नाही. त्यांना काय माहीत की रचता एवढा छोटा बिंदू आहे. तेच नवीन सृष्टीचे रचता आहेत. तुम्हा मुलांना शिकवतात, ज्ञानाचा सागर आहेत. या गोष्टी तुम्ही मुलेच समजावून सांगता. तुम्ही असे थोडेच म्हणणार की आम्ही जाणत नाही. तुम्हाला या वेळी बाबा सर्वकाही समजावून सांगतात.

तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये खंत करण्याची गरज नाही. सदैव हर्षित रहायचे आहे. त्या ड्रामाची फिल्म चालवून चालवून जीर्ण होऊन जाईल, जुनी होऊन जाईल मग बदलतील. जुन्याला नष्ट करतात. हा तर बेहदचा अविनाशी ड्रामा आहे. अशा-अशा गोष्टींवर विचार करून पक्के केले पाहिजे. हा ड्रामा आहे. आपण बाबांच्या श्रीमतावर चालून पतिता पासून पावन बनत आहोत दुसरी अशी कोणती गोष्ट असू शकत नाही, ज्यामुळे आम्ही पतितापासून पावन बनू अथवा तमोप्रधाना पासून सतोप्रधान बनू. पार्ट बजावता-बजावता आम्ही सतोप्रधाना पासून तमोप्रधान बनलो आहोत पुन्हा सतोप्रधान बनायचे आहे. ना आत्म्याचा विनाश होऊ शकत, ना पार्ट विनाश होऊ शकत. अशा प्रकारच्या गोष्टींवर कोणाचाही विचार चालत नाही. मनुष्य तर ऐकून आश्चर्यचकित होतील. ते तर फक्त भक्तिमार्गाची शास्त्रच वाचतात. रामायण, भागवत, गीता इत्यादि तेच आहे. यामध्ये तर विचार सागर मंथन करायचे असते. बेहदचे बाबा जे समजावून सांगतात त्याला जसेच्या तसे आम्ही धारण करू तर चांगले पद प्राप्त करू शकतो. सर्वच एकसारखी धारणा करू शकत नाहीत. कोणी तर अगदी बारकाईने समजावून सांगतात. आज-काल जेलमध्ये सुद्धा भाषण करायला जातात. वेश्यांकडे देखील ज्ञान सांगायला जातात, मुके-बहिरे यांच्याजवळ देखील मुले जात असतील कारण त्यांचा देखील अधिकार आहे. इशार्याने समजू शकतात. समजणारी आत्मा तर आत आहे ना. चित्र समोर ठेवा, वाचू तर शकतील ना. बुद्धी तर आत्म्यामध्ये आहे ना. भले आंधळे, लुळे-पांगळे आहेत परंतु कोणत्या ना कोणत्या प्रकारे समजू शकतील. आंधळ्यांना कान तर आहेत. तुमचे शिडीचे चित्र तर खूप चांगले आहे. हे नॉलेज कोणालाही देऊन स्वर्गामध्ये जाण्यालायक बनवू शकता. आत्मा बाबांकडून वारसा घेऊ शकते. स्वर्गामध्ये जाऊ शकते. कारण ऑरगन्स डिफेक्टेड (कर्मेंद्रिये खराब) आहेत. तिथे तर लुळे-लंगडे असत नाहीत. तिथे आत्मा आणि शरीर दोन्ही कंचन (सोन्याचे) मिळते. प्रकृति देखील कंचन आहे, नविन गोष्ट जरूर सतोप्रधानच असते. हा देखील ड्रामा बनलेला आहे. एक सेकंद दुसर्या सेकंदाशी मेळ खावू शकत नाही. काही ना काही फरक पडतो. अशा ड्रामाला जसा आहे तसा साक्षी होऊन बघायचे आहे. हे नॉलेज तुम्हाला आत्ता मिळते नंतर कधीही मिळणार नाही. अगोदर हे नॉलेज थोडेच होते, याला अनादि अविनाशी पूर्व नियोजित ड्रामा म्हटला जातो. याला चांगल्या रितीने समजून घेऊन आणि धारण करून इतरांना समजावून सांगायचे आहे.

तुम्ही ब्राह्मणच या ज्ञानाला जाणता. ही तर चोबचीनी (शक्तिवर्धक औषध) तुम्हाला मिळते. चांगल्यात चांगल्या गोष्टीची महिमा केली जाते. नविन दुनिया कशी स्थापन होते, पुन्हा हे राज्य कसे होणार तुमच्यामध्ये देखील नंबरवार जाणतात. जे जाणतात ते दुसर्यांना देखील समजावून सांगू शकतात. खूप आनंद वाटतो. काहीजणांना तर नया पैशाची सुद्धा खुशी नाही आहे. सर्वांचा आपला-आपला पार्ट आहे. ज्यांच्या बुद्धीमध्ये राहत असेल, विचार सागर मंथन करत असतील तर दुसर्यांना देखील समजावून सांगतील. तुमचे हे आहे शिक्षण ज्यामुळे तुम्ही हे बनता. तुम्ही कोणालाही समजावून सांगा की तुम्ही आत्मा आहात. आत्माच परमात्म्याची आठवण करते. सर्व आत्मे भाऊ आहेत. म्हण आहे - गॉड इज वन (ईश्वर एक आहे). बाकी सर्व मनुष्यांमध्ये आत्मा आहे. सर्व आत्म्यांचा पारलौकिक पिता एक आहे. जे पक्के निश्चय बुद्धी असतील त्यांना कोणी बदलू शकणार नाही. कच्चे असणाऱ्यांना लगेच बदलून टाकतील. सर्वव्यापीच्या ज्ञानावर किती डीबेट करतात. ते सुद्धा त्यांच्या आपल्या ज्ञानावर ठाम आहेत, असू शकेल कि आपल्या या ज्ञानातील नसेल. त्यांना देवता धर्माचे कसे म्हणू शकणार. आदि सनातन देवी-देवता धर्म तर प्राय:लोप आहे. तुम्हा मुलांना माहीत आहे, आपलाच आदि सनातन धर्म पवित्र प्रवृत्तिवाला होता. आता तर अपवित्र झाला आहे. जे पहिले पूज्य होते तेच पुजारी बनले आहेत. खूप पॉईंट्स पाठ असतील तर समजावून सांगत राहतील. बाबा तुम्हाला समजावून सांगतात तुम्ही मग इतरांना समजावून सांगा की हे सृष्टी चक्र कसे फिरते. तुमच्याशिवाय इतर कोणीही जाणत नाहीत. तुमच्यामध्ये देखील नंबरवार आहेत.

बाबांना देखील वारंवार पॉईंट्स रिपीट करावे लागतात कारण नवीन-नवीन येत राहतात. सुरूवातीला स्थापना कशी झाली, तुम्हाला विचारतील तर मग तुम्हालादेखील रिपीट करावे लागेल. तुम्ही खूप व्यस्त रहाल. चित्रांवर सुद्धा तुम्ही समजावून सांगू शकता. परंतु ज्ञानाची धारणा सर्वांना एकसारखी तर होऊ शकत नाही. यामध्ये ज्ञान पाहिजे, आठवण पाहिजे, धारणा खूप चांगली पाहिजे. सतोप्रधान बनण्यासाठी बाबांची आठवण जरूर करायची आहे. काही मुले तर आपल्या धंद्यामध्ये अडकलेले असतात. काहीसुद्धा पुरुषार्थ करत नाहीत. हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. कल्पापूर्वी ज्यांनी जेवढा पुरुषार्थ केला आहे तेवढाच करतील. शेवटी तुम्हाला एकदम भाऊ-भाऊ बनून रहायचे आहे. नअंगे (अशरिरी) आला आहात, नअंगे जायचे आहे. असे होऊ नये कि शेवटी कोणाची आठवण येईल. आता तर कोणीही परत जाऊ शकत नाही. जोपर्यंत विनाश होणार नाही, स्वर्गामध्ये कसे जाऊ शकणार. जरूर एक तर सूक्ष्मवतनमध्ये जाणार नाहीतर इथेच जन्म घेणार. बाकी जी कमी राहिली आहे त्यासाठी पुरुषार्थ करतील. ते देखील मोठे होतील तेव्हा समजू शकतील. ही देखील ड्रामामध्ये सर्व नोंद आहे. तुमची एकरस अवस्था तर शेवटीच होणार. असे नाही लिहिल्यामुळे सर्व आठवणीत राहू शकते. मग लायब्ररी इत्यादी ठिकाणी एवढी पुस्तके का आहेत. डॉक्टर, वकील लोक खूप पुस्तके ठेवतात. स्टडी करत राहतात, ते मनुष्य, मनुष्यांचे वकील बनतात. तुम्ही आत्मे, आत्म्यांचे वकील बनता. आत्मे, आत्म्यांना शिकवतात. ते आहे भौतिक शिक्षण. हे आहे आत्मिक शिक्षण. या आत्मिक शिक्षणामुळे मग २१ जन्मात पुन्हा कधी चूक होणार नाही. मायेच्या राज्यामध्ये खूप चुका होत रहातात, ज्यामुळे सहन करावे लागते. जे पूर्ण शिकणार नाहीत, कर्मातीत अवस्थेला प्राप्त करणार नाहीत तर सहन करावेच लागेल. मग पद सुद्धा कमी दर्जाचे होईल. विचार सागर मंथन करून इतरांना ऐकवत रहाल तेव्हा चिंतन चालेल. मुले जाणतात कल्पापूर्वी देखील असेच बाबा आले होते, ज्यांची शिवजयंती साजरी केली जाते. लढाई इत्यादिची तर कोणती गोष्ट नाही. त्या सर्व आहेत शास्त्रांमधल्या गोष्टी. हे शिक्षण आहे. कमाईमध्ये आनंद होतो. ज्यांच्याकडे लाख असतात, त्यांना जास्त आनंद होतो. कोणी लखपति सुद्धा असतात, कोणी कखपति सुद्धा असतात अर्थात कमी पैसेवाले सुद्धा असतात. तर ज्यांच्याकडे जेवढी ज्ञान रत्ने असतील तेवढी खुशी देखील होईल. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-

१) विचार सागर मंथन करून स्वत:ला ज्ञान रत्नांनी भरपूर करायचे आहे. ड्रामाच्या रहस्याला चांगल्या रितीने समजून घेऊन इतरांना समजावून सांगायचे आहे. कोणत्याही गोष्टीसाठी खंत न करता सदैव हर्षित रहायचे आहे.

२) आपली अवस्था दीर्घकाळासाठी एकरस बनवायची आहे जेणेकरून अखेरीस एका बाबांशिवाय दुसर्या कोणाचीही आठवण येऊ नये. अभ्यास करायचा आहे - आपण भाऊ-भाऊ आहोत, आता परत जात आहोत.

वरदान:-
निष्काळजीपणाच्या लाटेला निरोप देऊन सदैव उमंग-उत्साहामध्ये राहणारी हुशार आत्मा भव

काही मुले दुसर्यांना पाहून स्वत: निष्काळजी होतात. विचार करतात - हे तर होतेच... चालतेच... काय एकाने ठोकर खाल्ली तर त्याला बघून निष्काळजी बनून आपण देखील ठोकर खाणे - ही हुशारी आहे काय? बापदादांना दया येते कि असे निष्काळजी रहणार्यांसाठी पश्चात्तापाची वेळ किती कठीण असेल; म्हणून हुशार बनून निष्काळजीपणाच्या लाटेला, दुसर्यांना बघाण्याच्या लाटेला मनापासून निरोप द्या. दुसऱ्यांना बघू नका, बाबांना बघा.

बोधवाक्य:-
वारसदार क्वालिटी तयार करा तेव्हा प्रत्यक्षतेचा डंका वाजेल.