02-04-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाकी सर्व संग सोडून एक संग जोडा, भावा-भावाच्या दृष्टीने बघाल तर हा देह दिसणार नाही, दृष्टी बिघडणार नाही, वाणीमध्ये ताकद राहील”

प्रश्न:-
बाबा मुलांचे कर्जदार (ऋणी) आहेत का मुले बाबांची?

उत्तर:-
तुम्ही मुले तर अधिकारी आहात, बाबा तुमचे ऋणी आहेत. तुम्ही मुले दान देता तर तुम्हाला एकाचे शंभर पटीने बाबांना द्यावे लागते. ईश्वर अर्थ तुम्ही जे देता दुसऱ्या जन्मामध्ये त्याचे रिटर्न मिळते. तुम्ही मुठभर तांदूळ देऊन विश्वाचे मालक बनता तर तुम्हाला किती मोठ्या मनाचे असले पाहिजे. मी बाबांना दिले, हा विचार देखील कधी येता कामा नये.

ओम शांती।
म्युझियम, प्रदर्शनीमध्ये समजावून सांगायचे आहे की, ‘हे पुरुषोत्तम संगमयुग आहे’. समजदार तर फक्त तुम्हीच आहात, तर सर्वांना किती समजावून सांगावे लागते की हे पुरुषोत्तम संगमयुग आहे. सर्वात जास्त सेवेचे स्थान आहे - म्युझियम. तिथे खूपजण येतात, चांगली सेवायोग्य मुले कमी आहेत. सर्व सेंटर्स सेवा स्टेशन आहेत. दिल्लीमध्ये लिहिले आहे - ‘स्पिरिच्युअल म्युझियम’. याचा देखील योग्य अर्थ निघत नाही. खूप लोक प्रश्न विचारतात कि, ‘तुम्ही भारताची काय सेवा करत आहात?’ भगवानुवाच आहे ना - हे आहे जंगल. तुम्ही यावेळी संगमावर आहात. तुम्ही आता ना जंगलातील आहात, ना गार्डनमधील आहात. आता गार्डनमध्ये जाण्याचा पुरूषार्थ करत आहात. तुम्ही या रावण राज्याला रामराज्य बनवत आहात. तुम्हाला प्रश्न विचारतात - ‘एवढा खर्च कुठून येतो?’ तुम्ही बोला, आम्ही बी. के. च करतो. राम राज्याची स्थापना होत आहे. तुम्ही थोडे दिवस येऊन समजून घ्या की आम्ही काय करत आहोत, आमचे एम ऑब्जेक्ट काय आहे? ते लोक सावरंटीला (राजेशाहीला) मानत नाहीत, म्हणून राजेशाहीच नाहीशी करून टाकली आहे. यावेळी ते देखील तमोप्रधान बनलेले आहेत, म्हणून चांगले वाटत नाहीत. त्यांचाही ड्रामा अनुसार काहीच दोष नाही. जे काही ड्रामामध्ये असते त्याप्रमाणे आपण पार्ट बजावतो. कल्प-कल्प बाबांद्वारे स्थापनेचा हा पार्ट चालू असतो. खर्च देखील तुम्ही मुलेच करता, स्वतःसाठी. श्रीमतावर स्वतःचा खर्च करून स्वतःसाठी सतयुगी राजधानी बनवत आहात, याची इतर कोणालाच कल्पना देखील नाहीये. तुमचे नाव प्रसिद्ध आहे - अननोन वॉरियर्स (अज्ञात योद्धे). खरे पाहता त्या सेनेमध्ये अननोन वॉरियर्स कोणी असत नाहीत. सेनेमधील प्रत्येक शिपायाचे रजिस्टर ठेवले जाते. असे कोणीही असत नाही ज्याचे नाव, नंबर रजिस्टरमध्ये नाही. वास्तविक अननोन वॉरियर्स तुम्ही आहात. तुमचे कोणत्याही रजिस्टरमधे नाव नाहीये. तुमच्याकडे कोणतीही शस्त्र-अस्त्र नाहीत. यामध्ये कोणती शारीरिक हिंसा तर नाहीये. योगबलाने तुम्ही विश्वावर विजय प्राप्त करता. ईश्वर सर्वशक्तिमान आहेत ना. आठवणीने तुम्ही शक्ती घेत आहात. सतोप्रधान बनण्यासाठी तुम्ही बाबांसोबत योग लावत आहात. तुम्ही सतोप्रधान बनलात की मग राज्य देखील सतोप्रधान पाहिजे. ते तर तुम्ही श्रीमतावर स्थापन करता. इनकाग्नीटो (गुप्त) त्यांना म्हटले जाते, जे असतात परंतु दिसत नाहीत. तुम्ही शिवबाबांना देखील या डोळ्यांनी पाहू शकत नाही. तुम्ही देखील गुप्त, तर शक्ती देखील तुम्ही गुप्तपणे घेत आहात. तुम्ही समजता आपण पतितापासून पावन बनत आहोत आणि पावन असणाऱ्यांमध्येच शक्ती असते. तुम्ही सतयुगामध्ये सर्व पावन असणार. त्यांच्याच ८४ जन्मांची कहाणी बाबा सांगतात. तुम्ही बाबांकडून शक्ती घेऊन, पवित्र बनून मग पवित्र दुनियेमध्ये राज्यभाग्य घेणार. बाहुबळाने कधी कोणी विश्वावर विजय प्राप्त करू शकत नाही. हि आहे योगबलाची गोष्ट. युद्ध ते करतात आणि राज्य मात्र तुमच्या हातामध्ये येणार आहे. बाबा सर्वशक्तिमान आहेत तर त्यांच्याकडून शक्ती मिळाली पाहिजे. तुम्ही बाबांना आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताला देखील जाणता.

तुम्ही जाणता आपणच ‘स्वदर्शन चक्रधारी’ आहोत. ही स्मृती सर्वांनाच राहत नाही. तुम्हा मुलांना स्मृती राहिली पाहिजे कारण तुम्हा मुलांनाच हे नॉलेज मिळते. बाहेरचे तर कोणीही समजू शकणार नाहीत म्हणून त्यांना सभेमध्ये बसवले जात नाही. पतित-पावन बाबांना सर्वजण बोलावतात, परंतु कोणीही स्वतःला पतित समजत नाहीत, फक्त गात राहतात - ‘पतित-पावन सीताराम…’. तुम्ही सर्वजण आहात ब्राइड्स (वधू), बाबा आहेत ब्राईडग्रुम (नवरदेव). ते येतातच सर्वांची सद्गती करण्यासाठी. तुम्ही (ब्रह्मा बाबा) मुलांना शृंगार करायला लावता. तुम्हाला (ब्रह्मा बाबांना) डबल इंजीन मिळाले आहे. रोल्स रॉयल्समध्ये इंजिन खूप चांगले असते. बाबा देखील असेच आहेत. दुनियावाले म्हणतात - ‘पतित-पावन या, आम्हाला पावन बनवून सोबत घेऊन जा’. तुम्ही सर्वजण शांतीमधे बसले आहात. कोणते टाळ-चिपळ्या इत्यादी वाजवत नाही. त्रासाची तर गोष्टच नाही. चालता-फिरता बाबांची आठवण करत रहा, जो कोणी भेटेल त्याला रस्ता सांगत रहा. बाबा म्हणतात - ‘माझे किंवा लक्ष्मी-नारायण, राधा-कृष्ण इत्यादींचे जे भक्त आहेत, त्यांना हे दान द्यायचे आहे, व्यर्थ घालवायचे नाही’. पात्र असणाऱ्यालाच दान दिले जाते. पतित मनुष्य, पतितालाच दान देत राहतात. बाबा आहेत सर्वशक्तिमान, त्यांच्याकडून तुम्ही शक्ती घेऊन उत्तम बनता. रावण जेव्हा येतो तेव्हा त्रेता आणि द्वापरचा देखील संगम आहे. हा संगम आहे कलियुग आणि सतयुगाचा. ज्ञान किती काळ आणि भक्ती किती काळ चालते - या सर्व गोष्टी तुम्हाला समजून घेऊन मग इतरांना समजावून सांगायच्या आहेत. मुख्य गोष्ट आहे - बेहदच्या बाबांची आठवण करा. जेव्हा बेहदचे बाबा येतात तेव्हा विनाश देखील होतो. महाभारत लढाई केव्हा सुरू झाली? जेव्हा भगवंताने राजयोग शिकवला होता. लक्षात येते की, नवीन दुनियेची सुरुवात आणि जुन्या दुनियेचा अंत अर्थात विनाश होणार आहे. दुनिया घोर अंधारामध्ये पडून आहे, आता त्यांना जागे करायचे आहे. अर्ध्या कल्पा पासून झोपून पडले आहेत. बाबा समजावून सांगत आहेत - स्वतःला आत्मा समजून भावा-भावाच्या दृष्टीने पहा, तरच तुम्ही जेव्हा कोणाला ज्ञान द्याल तर तुमच्या वाणीमध्ये ताकद येईल. आत्माच पावन आणि पतित बनते. आत्मा जेव्हा पावन बनेल तेव्हा मग शरीर देखील पावन मिळेल. आता तर मिळू शकणार नाही. पावन तर सर्वांनाच बनायचे आहे. कोणी योगबलाने, कोणी सजा खाऊन. मेहनत आहे आठवणीच्या यात्रेची. बाबा प्रॅक्टिस देखील करून घेतात. कुठेही जाल तर बाबांच्या आठवणीमध्ये जा. जसे पादरी लोक शांतीमध्ये क्राइस्टच्या आठवणीमध्ये चालत असतात आणि क्राईस्टचीच आठवण करतात. भारतवासी तर अनेकांची आठवण करतात. बाबा म्हणतात - एकाशिवाय इतर कोणाचीही आठवण करू नका. बेहदच्या बाबांकडून आपण मुक्ती आणि जीवनमुक्तीचे अधिकारी बनतो. सेकंदामध्ये जीवनमुक्ती मिळते. सतयुगामध्ये सर्वजण जीवनमुक्ती मध्ये होते, कलियुगामध्ये सर्व जीवन-बंध मध्ये आहेत. हे कोणालाच माहिती नाहीये, या सर्व गोष्टी बाबा मुलांना समजावून सांगतात. मुले मग बाबांचा शो करतात. सर्व बाजूंना फेरी मारतात. तुमचे कर्तव्य आहे मनुष्य मात्रांना संदेश देणे; तर हा संदेश द्यायचा आहे की, ‘हे पुरुषोत्तम संगमयुग आहे. बेहदचे बाबा बेहदचा वारसा देण्यासाठी आलेले आहेत’. बाबा म्हणतात - ‘मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर विकर्म विनाश होतील. पापे भस्म होतील’. ही आहे सत्य गीता, जी बाबा शिकवतात. मनुष्यमतामुळे अधोगती झाली आहे, भगवंताच्या मताद्वारे तुम्ही वारसा घेत आहात. मूळ गोष्ट आहे - उठता-बसता, चालता-फिरता बाबांची आठवण करत रहा आणि परिचय देत रहा. बॅज तर तुमच्याकडे आहे, मोफत द्यायला काहीच हरकत नाही; परंतु योग्यता पाहून.

बाबा मुलांकडे तक्रार करतात की, तुम्ही लौकिक पित्याची आठवण करता आणि मज पारलौकिक पित्याला विसरता, लाज वाटत नाही. तुम्हीच पवित्र प्रवृत्ती मार्गाच्या गृहस्थ व्यवहारामध्ये होता, आता पुन्हा बनायचे आहे. तुम्ही आहात भगवंताचे सौदागर (व्यापारी). स्वतःमध्ये बघा बुद्धी कुठे भटकत तर नाही ना? बाबांची किती वेळ आठवण केली? बाबा म्हणतात - ‘और संग तोड़ एक संग जोड़ो’. चुका करायच्या नाहीत. हे देखील समजावून सांगितले आहे कि, भावा-भावाच्या दृष्टीने बघा तर मग देह दिसणार नाही. दृष्टी बिघडणार नाही. ध्येय आहे ना. हे ज्ञान आत्ताच तुम्हाला मिळते. ‘भाऊ-भाऊ’ असे तर सगळेच म्हणतात, मनुष्य म्हणतात - ब्रदरहुड (बंधुत्व). हे तर बरोबर आहे. परमपिता परमात्म्याची आपण संतान आहोत. मग इथे कशासाठी बसलो आहोत? बाबा स्वर्गाची स्थापना करत आहेत, तर अशा प्रकारे समजावून सांगत उन्नतीला प्राप्त करत रहायचे आहे. बाबांना सेवाभावी मुली खूप पाहिजेत. सेंटर्स उघडत जातात. मुलांना आवड आहे, समजतात की अनेकांचे कल्याण होईल. परंतु सांभाळणारी टीचर देखील चांगली महारथी पाहिजे. टीचर्स देखील नंबरवार आहेत. बाबा म्हणतात - जिथे लक्ष्मी-नारायणाचे मंदिर असेल, शिवाचे मंदिर असेल, गंगातीर असेल, जिथे खूप गर्दी होते तिथे सेवा केली पाहिजे. समजावून सांगा की, ‘भगवान म्हणतात - काम महा शत्रू आहे’. तुम्ही श्रीमत प्रमाण सेवा करत रहा. हा तुमचा ईश्वरीय परिवार आहे, इथे ७ दिवस भट्टीसाठी येऊन मग परिवारा सोबत राहता. तुम्हा मुलांना खूप खुशी झाली पाहिजे. बेहदचे बाबा ज्यांच्याद्वारे तुम्ही पद्मा-पदम भाग्यशाली बनता. दुनिया जाणत नाही की भगवान देखील शिकवू शकतात. इथे तुम्ही शिकता तर तुम्हाला किती खुशी झाली पाहिजे. आपण उच्च आणि उच्च जाण्यासाठी शिकत आहोत. किती फ्राकदिल (उदार चित्त) बनले पाहिजे. बाबांवर तुमचे ऋण आहे. ईश्वर अर्थ जे देता, दुसऱ्या जन्मामध्ये त्याचे रिटर्न घेता ना. बाबांना तुम्ही सर्वकाही दिले तर बाबांना देखील सर्वकाही द्यावे लागते. मी बाबांना दिले, असा विचार कधीही येता कामा नये. खूप जणांच्या मनामध्ये चालते - आम्ही इतके दिले, आमचा पाहुणचार का होत नाही? तुम्ही मुठभर तांदूळ देऊन विश्वाची बादशाही घेता. बाबा तर दाता आहेत ना. राजे लोक रॉयल असतात, ते पहिल्यांदा जेव्हा भेटतात तेव्हा आपण जी भेटवस्तू देतो, तर ती कधीही ते आपल्या हातात घेणार नाहीत; सेक्रेटरीकडे इशारा करतील. तर शिवबाबा जे दाता आहेत ते कसे बरे घेतील! हे बेहदचे बाबा आहेत ना. यांच्यासमोर तुम्ही नजराणा (भेटवस्तू) ठेवता. परंतु बाबा तर रिटर्नमध्ये शंभर पटीने देतील. तर ‘मी दिले’, असा विचार कधीही येता कामा नये. नेहमी असे समजा की, ‘मी तर घेतो’. तिथे तुम्ही पद्मपती बनणार. तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये पद्मा-पदम भाग्यशाली बनता. बरीच मुले उदार मनाची देखील आहेत, तर काही कंजूस देखील आहेत. समजतच नाहीत की, मीच पद्मापदमपती बनतो, मीच खूप सुखी बनतो. जेव्हा परमात्मा बाबा गैरहजर असतात तेव्हा इनडायरेक्ट अल्पकाळासाठी फळ देतात. जेव्हा हजर असतात तेव्हा २१ जन्मांसाठी देतात. हे गायले जाते - ‘शिवबाबा का भण्डारा भरपूर’. बघा, भरपूर मुले आहेत, कोणालाही हे माहिती नाही आहे की, कोण काय देत आहे? बाबा जाणे आणि बाबांची गोथरी (ब्रह्मा) जाणे, ज्यांच्यामध्ये बाबा राहतात - बिलकुल साधारण. याच कारणामुळे मुले जेव्हा इथून बाहेर जातात तर तो नशाच निघून जातो. ज्ञान-योग नसतो त्यामुळे खिट-पिट होत राहते. चांगल्या-चांगल्या मुलांना देखील माया हरवते. माया बेमुख करते. शिवबाबा, ज्यांच्याकडे तुम्ही येता, त्यांची तुम्ही आठवण करू शकत नाही! आतून अथाह खुशी झाली पाहिजे. आज तो दिवस आला, ज्यांच्यासाठी आपण म्हणत होतो - ‘आप आयेंगे तो हम आपके बनेंगे’. भगवान येऊन दत्तक घेतात तर किती भाग्यशाली म्हणणार. किती आनंदात राहिले पाहिजे. परंतु माया आनंद घालवून टाकते. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) भगवंताने आपल्याला दत्तक घेतले आहे, तेच आम्हाला टीचर बनवून शिकवत आहेत, अशा आपल्या पद्मा-पदम भाग्याची आठवण करत खुशीमध्ये रहायचे आहे.

२) आपण आत्मे भाऊ-भाऊ आहोत, ही दृष्टी पक्की करायची आहे. देहाला पहायचे नाहीये. भगवंता सोबत सौदा केल्यानंतर परत बुद्धीला भटकू द्यायची नाही.

वरदान:-
या अलौकिक जीवनामध्ये संबंधाच्या शक्तीने अविनाशी स्नेह आणि सहयोग प्राप्त करणारी श्रेष्ठ आत्मा भव

या अलौकिक जीवनामध्ये संबंधाची शक्ती तुम्हा मुलांना डबल रूपामध्ये प्राप्त झाली आहे. एक बाबां द्वारे सर्व संबंध, दुसरा दैवी परिवारा द्वारे संबंध. या संबंधाने सदैव निस्वार्थ स्नेह, अविनाशी स्नेह आणि सहयोग सदैव प्राप्त होत राहतो. तर तुमच्याजवळ संबंधाची शक्ती देखील आहे. असे श्रेष्ठ अलौकिक जीवनवाले शक्ती संपन्न वरदानी आत्मे आहात म्हणून विनंती करणारे नाही तर सदैव राजी राहणारे बना.

बोधवाक्य:-
कोणताही प्लॅन विदेही, साक्षी बनून विचार करा आणि सेकंदामध्ये प्लेन स्थिती बनवत चला.