02-05-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - ज्ञानाची बुलबुल बनून आप समान बनविण्याची सेवा करा, चेक करा की, मी किती जणांना आप समान बनविले आहे, आठवणीचा चार्ट कसा आहे?”

प्रश्न:-
ईश्वर, आपल्या मुलांना कोणते प्रॉमिस करतात जे मनुष्य करू शकत नाही?

उत्तर:-
ईश्वर प्रॉमिस करतात - मुलांनो, मी तुम्हाला जरूर आपल्या घरी घेऊन जाणार. तुम्ही श्रीमतावर चालून पावन बनाल तर मुक्ती आणि जीवन मुक्तीमध्ये जाल. तसेही मुक्तीमध्ये प्रत्येकाला जायचेच आहे. कोणाची इच्छा असो वा नसो, जबरदस्तीने सुद्धा हिशोब चुकते करून घेऊन जाईन. बाबा म्हणतात - जेव्हा मी येतो तेव्हा तुम्हा सर्वांची वानप्रस्थ अवस्था असते, मी सर्वांनाच घेऊन जातो.

ओम शांती।
मुलांनी आता अभ्यासावर लक्ष दिले पाहिजे. जे गायन आहे - ‘सर्वगुण संपन्न, १६ कला संपूर्ण…’ हे सर्व गुण धारण करायचे आहेत. तपासून पहायचे आहे, माझ्यामध्ये हे गुण आहेत? कारण जे बनतात, तिथेच तुम्हा मुलांचे लक्ष जाणार. आता हे अवलंबून आहे शिकणे आणि शिकविण्यावर. आपल्या मनाला विचारायचे आहे की, मी किती जणांना शिकवतो? संपूर्ण देवता तर कोणी बनलेले नाहीत. चंद्रमा जेव्हा संपूर्ण बनतो तेव्हा त्याचा किती प्रकाश पडतो. इथे सुद्धा पाहिले जाते - नंबरवार पुरुषार्थ अनुसार आहेत? ते तर मुले देखील समजू शकतात. टीचर सुद्धा समजतात. प्रत्येक मुलावर लक्ष असते की काय करत आहेत? माझ्यासाठी काय सेवा करत आहेत? सर्व फुलांना पाहतात. फुले तर सर्वच आहेत. बगीचा आहे ना. प्रत्येकजण आपल्या अवस्थेला जाणतो. आपल्या खुशीला जाणतो. अतींद्रिय सुखमय जीवन प्रत्येकाला आपले-आपले चांगले वाटते. एक तर बाबांची खूप-खूप आठवण करायची आहे. आठवण केल्यानेच मग आठवण परत मिळणार. तमोप्रधाना पासून सतोप्रधान बनण्यासाठी तुम्हा मुलांना एकदम सोपा उपाय सांगतो - आठवणीची यात्रा. प्रत्येकाने आपल्या मनाला विचारावे की, माझ्या आठवणीचा चार्ट चांगला आहे? अजून कोणाला आप समान सुद्धा बनवतो का? कारण ज्ञान बुलबुल आहात ना. कोणी पोपट आहेत, कोणी काय आहेत! तुम्हाला कबूतर नाही तर पोपट बनायचे आहे. आपणच आपल्याला विचारणे खूप सोपे आहे. मला कितपत बाबांची आठवण येते? अतींद्रिय सुखामध्ये कितपत राहतो? मनुष्यापासून देवता बनायचे आहे ना. मनुष्य तर मनुष्यच आहे. पुरुष अथवा स्त्री दोघेही दिसायला तर मनुष्यच दिसतात. मग तुम्ही दैवी गुण धारण करून देवता बनता. तुमच्या शिवाय दुसरे कोणीही देवता बनणारच नाहीत. इथे येतातच दैवी घराण्याचे सदस्य बनण्यासाठी. तिथे (सतयुगामध्ये) सुद्धा तुम्ही दैवी घराण्याचे सदस्य आहात. तिथे तुमच्यामध्ये कुठलाही राग-द्वेषाचा अंश सुद्धा असणार नाही. अशा दैवी परिवारातील बनण्यासाठी खूप पुरुषार्थ करायचा आहे. शिकायचे देखील नियमानुसार आहे, कधीही क्लास चुकवता कामा नये. भले आजारी असाल तरी सुद्धा बुद्धीमध्ये शिवबाबांची आठवण असायला हवी. यामध्ये तर बोलण्याची काहीच गरज नाही. आत्मा जाणते, आम्ही शिव बाबांची संतान आहोत. बाबा आम्हाला घेऊन जाण्यासाठी आले आहेत. ही प्रॅक्टिस (सवय) खूप चांगली पाहिजे. भले कुठेही असा परंतु बाबांच्या आठवणीमध्ये रहा. बाबा आलेच आहेत शांतीधाम-सुखधाममध्ये घेऊन जाण्यासाठी. किती सोपे आहे. असे बरेच आहेत जे फारशी धारणा करू शकत नाहीत. ठीक आहे, मग आठवण करा. इथे सर्व मुले बसली आहेत, यामध्ये सुद्धा नंबरवार आहेत. हो, बनायचे जरूर आहे. शिवबाबांची आठवण जरूर करतात. इतर संग तोडून एक संग जोडणारे तर सर्वच असतील. दुसऱ्या कोणाची आठवण राहत नसेल. परंतु यामध्ये शेवटपर्यंत पुरुषार्थ करावा लागतो. मेहनत करायची आहे. आतल्याआत सदैव एका शिवबाबांचीच आठवण असावी. कुठेही बाहेर हिंडा-फिरायला जाता तेव्हा देखील आतल्याआत बाबांचीच आठवण रहावी. काहीही बोलण्याची सुद्धा आवश्यकता राहत नाही. सोपा अभ्यास आहे. शिकवून तुम्हाला आप समान बनवतात. अशा अवस्थेमध्येच तुम्हा मुलांना जायचे आहे. जसे सतोप्रधान अवस्थेमध्ये आले आहात, त्याच अवस्थेमध्ये परत जायचे आहे. हे समजावून सांगण्यासाठी किती सोपे आहे. घरचे कामकाज करता-करता, चालता-फिरता स्वतःला फुल बनवायचे आहे. स्वतःचे परीक्षण करायचे आहे की, माझ्यामध्ये काही गडबड तर नाही? स्वतःचे परीक्षण करण्यासाठी हिऱ्याचा दृष्टांत सुद्धा खूप चांगला आहे. तुम्ही स्वतः एक मॅग्नीफाय ग्लास (भिंग) आहात. तर आपण आपले परीक्षण करायचे आहे माझ्यामध्ये कणभर सुद्धा देह-अभिमान तर नाही ना? भले या समयी सर्वजण पुरुषार्थी आहेत, परंतु ध्येय तर समोर आहे ना. तुम्हाला सर्वांना संदेश द्यायचा आहे. बाबांनी सांगितले होते - वर्तमानपत्रामध्ये देण्यासाठी भले खर्च होऊ दे, परंतु हा संदेश सर्वांना मिळाला पाहिजे. सांगा, ‘एका बाबांचीच आठवण करा तर विकर्म विनाश होतील आणि पवित्र बनाल’. आता कोणीही पवित्र नाही आहे. बाबांनी समजावून सांगितले आहे कि, पवित्र आत्मे असतातच नवीन दुनियेमध्ये. ही जुनी दुनिया अपवित्र आहे. एकही पवित्र असू शकत नाही. आत्मा जेव्हा पवित्र बनते तेव्हा मग जुने शरीर सोडून देते. सोडायचेच आहे. आठवण करता-करता तुमची आत्मा एकदम पवित्र बनेल. शांतीधाम मधून आपण एकदम पवित्र आत्मे आलो आणि गर्भ महालामध्ये बसलो. मग इतका पार्ट बजावला. आता चक्र पूर्ण केले मग पुन्हा तुम्ही आत्मे आपल्या घरी जाल. तिथून मग सुखधाममध्ये याल. तिथे गर्भ महाल असतो. तरी सुद्धा पुरुषार्थ करायचा आहे उच्च पद प्राप्त करण्यासाठी, हा अभ्यास आहे. आता नरक वेश्यालयाचा विनाश होऊन शिवालय स्थापन होत आहे. आता तर सर्वांना परत जायचे आहे.

तुम्ही देखील समजता कि, आम्ही हे शरीर सोडून जाऊन नवीन दुनियेमध्ये राजकुमार-राजकुमारी बनणार. काहीजण समजतात की, आम्ही प्रजेमध्ये जाणार, यामध्ये समज एकदम चांगली स्पष्ट असायला हवी. एका बाबांचीच आठवण रहावी, दुसऱ्या कशाचीही आठवण येऊ नये. याला म्हटले जाते - ‘पवित्र भिकारी’. शरीराची सुद्धा आठवण राहू नये. हे तर जुने घाणेरडे शरीर आहे ना. इथे जिवंतपणी मरायचे आहे हे बुद्धीमध्ये ठेवायचे आहे. आता आपल्याला परत घरी जायचे आहे. तुम्ही आपल्या घराला विसरून गेला होता. आता बाबांनी पुन्हा आठवण करून दिली आहे. आता हे नाटक पूर्ण होत आहे. बाबा समजावून सांगत आहेत - तुम्ही सर्व वानप्रस्थी आहात. साऱ्या विश्वामध्ये जे काही मनुष्य मात्र आहेत, सर्वांची या समयी वानप्रस्थ अवस्था आहे. मी आलो आहे, सर्व आत्म्यांना वाणी पासून परे (दूर) घेऊन जातो. बाबा म्हणतात - आता तुम्हा लहान-थोर सर्वांची वानप्रस्थ अवस्था आहे. वानप्रस्थ कोणाला म्हटले जाते, हे सुद्धा तुम्ही जाणत नव्हता. असेच जाऊन गुरु करत होता. तुम्ही अर्धा कल्प लौकिक गुरूंच्या मार्फत पुरुषार्थ करत आला आहात, परंतु ज्ञान काहीच नव्हते. आता बाबा स्वतः म्हणतात - तुम्हा लहान-थोर सर्वांची वानप्रस्थ अवस्था आहे. मुक्ती तर सर्वांनाच मिळणार आहे. लहान-थोर सगळेच नष्ट होणार आहेत. बाबा आले आहेत सर्वांना घरी घेऊन जाण्यासाठी. यासाठी तर मुलांना खूप आनंद झाला पाहिजे. इथे (जुन्या दुनियेमध्ये) दुःखाची जाणीव होते, म्हणूनच आपले घर स्वीट होमची आठवण करतात. घरी जाऊ इच्छितात परंतु अक्कल नाहीये. म्हणतात - ‘आम्हा आत्म्यांना आता शांती हवी आहे’. बाबा विचारतात, किती वेळासाठी पाहिजे? इथे तर प्रत्येकाला आपला-आपला पार्ट बजावायचा आहे. इथे कोणी शांत थोडेच राहू शकतात. अर्धा कल्प या गुरु इत्यादींनी तुमच्याकडून खूप मेहनत करून घेतली, मेहनत करता-करता, भटकता-भटकता अजूनच अशांत झाले आहात. आता जे शांतीधामचे मालक आहेत, ते येऊन सर्वांना परत घेऊन जातात. शिकवत देखील राहतात. भक्ती करतात देखील निर्वाण धाममध्ये जाण्यासाठी, मुक्ती करीता. हे कधीही कोणाच्या मनातही येणार नाही की आपण सुखधामध्ये जावे. सर्वजण वानप्रस्थमध्ये जाण्यासाठी पुरुषार्थ करतात. तुम्ही तर पुरुषार्थ करता सुख धाममध्ये जाण्यासाठी. तुम्ही जाणता - पहिली तर वाणी पासून परे अवस्था जरूर पाहिजे. स्वयं भगवान देखील मुलांना प्रॉमिस करतात - मी तुम्हा मुलांना आपल्या घरी जरूर घेऊन जाणार, ज्यासाठी तुम्ही अर्धाकल्प भक्ती केली आहे. आता श्रीमतावर चालाल तर मुक्ती-जीवनमुक्ती मध्ये याल. तसे तर शांती धाममध्ये सर्वांना जायचेच आहे. कोणाला येण्याची इच्छा असो अथवा नसो, ड्रामा अनुसार सर्वांना जरूर जायचे आहे. तुम्हाला आवडो अथवा न आवडो, मी आलो आहे सर्वांना परत घेऊन जाण्यासाठी. बळजबरीने सुद्धा हिशोब चुकते करून घेऊन जाईन. तुम्ही सतयुगामध्ये जाता, बाकी सर्वजण वाणी पासून परे (दूर) शांती धाममध्ये राहतात. कोणालाही सोडणार नाही. नाही आलात तर शिक्षा देऊन मारून-मुटकून सुद्धा घेऊन जाईन. ड्रामामध्ये पार्टच असा आहे त्यामुळे आपली कमाई करून यायचे आहे, तर पद सुद्धा चांगले मिळेल. शेवटी येणाऱ्यांना काय सुख मिळणार? बाबा सर्वांना सांगत आहेत जायचे तर जरूर आहे. शरीरांना पेटवून देऊन बाकी सर्व आत्म्यांना घेऊन जाईन. आत्म्यांनाच माझ्या सोबत यायचे आहे. माझ्या मतावर सर्वगुण संपन्न, १६ कला संपूर्ण बनाल तर पद सुद्धा चांगले मिळेल. तुम्हीच तर बोलावले आहे ना की, ‘येऊन आम्हा सर्वांना मरण द्या’. आता मृत्यू आला की आला. कोणीही वाचणार नाही. घाणेरडी शरीरे राहणार सुद्धा नाहीत. बोलावलेच आहे, परत घेऊन जा म्हणून. तर आता बाबा म्हणतात - मुलांनो, या घाणेरड्या दुनियेतून तुम्हाला परत घेऊन जाईन. तुमचे यादगार (स्मृती रूप) देखील उभे आहे. दिलवाडा मंदिर आहे ना - दिल घेणाऱ्याचे मंदिर, आदि देव बसले आहेत. शिवबाबा देखील आहेत, बाप-दादा दोघेही आहेत, यांच्या (ब्रह्मा बाबांच्या) शरीरामध्ये शिवबाबा विराजमान आहेत. तुम्ही तिथे (दिलवाडा मंदिरात) जाता तर तेव्हा ‘आदि देव’ना पाहता. तुमची आत्मा जाणते की हे तर बापदादा बसले आहेत.

या वेळी तुम्ही जो पार्ट बजावत आहात त्याची निशाणी म्हणून स्मारक उभे आहे. महारथी, घोडेस्वार, प्यादी सुद्धा आहेत. ते आहेत जड, हे आहेत चैतन्य. वरती वैकुंठ सुद्धा आहे. तुम्ही मॉडेल पाहून येता, देलवाडा मंदिर कसे आहे, तुम्ही जाणता, कल्प-कल्प असेच हे मंदिर बनते, जे तुम्ही जाऊन पाहणार. काहीजण गोंधळून जातात, म्हणतात - ‘हे सर्व डोंगर-कपारी इत्यादी तुटून गेले आहेत पुन्हा बनणार! कसे बरे?’ परंतु असा विचार करता कामा नये. अजून तर स्वर्ग सुद्धा नाहीये, मग ते कसे काय बनतील! पुरुषार्थानेच सर्व काही बनते ना. तुम्ही आता तयारी करत आहात, स्वर्गामध्ये जाण्यासाठी. काहीजण गोंधळून जाऊन मग शिक्षणच सोडून देतात. बाबा म्हणतात - यामध्ये गोंधळून जाण्याची तर काहीच गरज नाही. तिथे (सतयुगामध्ये) सर्व काही आपणच आपले बनवणार. ती दुनियाच सतोप्रधान असणार. तिथली फळे-फुले इत्यादी सर्व पाहून येतात, शुबी-रस पितात. सूक्ष्म वतन, मूल वतनमध्ये तर असे काहीच नाही आहे. बाकी हे सर्व काही आहे वैकुंठामध्ये. दुनियेची हिस्ट्री-जिऑग्राफी रिपीट होते. हा निश्चय तर पक्का असला पाहिजे. बाकी कोणाच्या नशिबात नसेल तर म्हणतील, ‘हे कसे काय होऊ शकते! हिरे-माणके जी आता पहायला सुद्धा मिळत नाहीत ती पुन्हा कशी असतील! पूज्य कसे बनणार?’ बाबा म्हणतात - पूज्य आणि पुजारीचा हा खेळ पूर्व नियोजित आहे. आपण सो ब्राह्मण, देवता, क्षत्रिय... हे सृष्टी चक्र जाणून घेतल्याने तुम्ही चक्रवर्ती राजा बनता. तुम्ही समजत आहात, म्हणून तर म्हणता - ‘बाबा, कल्पापूर्वी सुद्धा तुम्हाला भेटलो होतो’. आमचेच स्मारक मंदिर समोर उभे आहे. यानंतरच स्वर्गाची स्थापना होईल. ही जी तुमची चित्रं आहेत हि अद्भुत आहेत, किती आवडीने येऊन पाहतात. संपूर्ण दुनियेमध्ये कुठेही कोणीही पाहिलेली नाहीत. न कोणी असे चित्र बनवून ज्ञान देऊ शकणार. त्याची कॉपी करू शकणार नाहीत. ही चित्रं तर खजिना आहे, ज्यामुळे तुम्ही पद्मा-पदम भाग्यशाली बनता. तुम्ही समजता आमच्या पावला-पावलामध्ये पद्म आहेत. या शिक्षणाचे पाऊल. जितका योग कराल, जितका अभ्यास कराल, तितके जास्त पद्म. एका बाजूने माया सुद्धा पूर्ण ताकतीनिशी येईल. तुम्ही फक्त या वेळीच श्याम-सुंदर बनता. सतयुगामध्ये तुम्ही सुंदर होता - गोल्डन एजड, कलियुगामध्ये आहात श्याम - आइरन एजड. प्रत्येक गोष्ट अशीच होते. इथे तर धरणी सुद्धा ओसाड आहे. तिथे (सतयुगामध्ये) तर धरणी सुद्धा फर्स्ट क्लास असेल. प्रत्येक गोष्ट सतोप्रधान असते. अशा राजधानीचे तुम्ही मालक बनत आहात. अनेक वेळा बनले आहात. तरी देखील अशा राजधानीचा मालक बनण्यासाठी संपूर्ण पुरुषार्थ केला पाहिजे. पुरुषार्था शिवाय प्रारब्ध कसे मिळेल. कसलाही त्रास नाहीये.

मुरली छापली जाते, पुढे जाऊन लाखो-करोडोंच्या प्रमाणात छापल्या जातील. मुले म्हणतील - जे काही पैसे आहेत ते यज्ञामध्ये लागावेत, ठेवून काय करणार? पुढे जाऊन पहा काय-काय होणार आहे. विनाशाची तयारी सुद्धा पहाल. रंगीत तालीम होत राहणार. मग शांती होणार. मुलांच्या बुद्धीमध्ये संपूर्ण ज्ञान आहे. आहे तर खूप सोपे. फक्त बाबांची आठवण करायची आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) या शरीराला विसरून संपूर्ण पवित्र भिकारी बनायचे आहे. बुद्धीची लाईन एकदम क्लियर ठेवायची आहे. बुद्धीमध्ये असावे - आता नाटक पूर्ण झाले, आम्ही आमच्या गोड घरी जात आहोत.

२) अभ्यासाच्या प्रत्येक पावलामध्ये पद्म आहे, त्यामुळे दररोज चांगल्या रीतीने शिकायचे आहे. देवता घराण्याचा सदस्य बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. आपणच आपल्याला विचारायचे आहे की, मला अतींद्रिय सुखाचा अनुभव कितीसा होतो? ती खुशी राहते का?

वरदान:-
बुद्धीच्या साथीने आणि सहयोगाच्या हाता द्वारे सुखाचा अनुभव करणारे भाग्यवान आत्मा भव

जसे सहयोगाची निशाणी - हातामध्ये हात दाखवतात. तसे बाबांचे सदैव सहयोगी बनणे - हे आहे हातात हात आणि सदा बुद्धीद्वारे सोबत राहणे; अर्थात मनाची ओढ एकामध्येच असावी. सदैव हीच स्मृती असावी की, गॉडली गार्डनमध्ये (ईश्वरीय बागेमध्ये) हातात हात देऊन सोबत चालत आहोत. यामुळे सदैव मनोरंजनाचा अनुभव करत रहाल, सदैव आनंदी आणि भरपूर रहाल. असे भाग्यवान आत्मे सदैव सुखाचा अनुभव करत राहतात.

बोधवाक्य:-
आशीर्वादांचे खाते जमा करण्याचे साधन आहे - संतुष्ट राहणे आणि संतुष्ट करणे.