03-02-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो - स्वदर्शन चक्रधारी भव - तुम्हाला लाईट हाऊस बनायचे आहे, स्वतःला आत्मा समजा, यामध्ये निष्काळजीपणा करू नका

प्रश्न:-
तुम्ही सर्वात वंडरफुल स्टुडंट आहात - ते कसे?

उत्तर:-
तुम्ही गृहस्थ व्यवहारामध्ये राहता, शरीर निर्वाहासाठी ८ तास कर्म देखील करता, त्यासोबतच भविष्य २१ जन्मांसाठी ८ तास बाप समान बनविण्याची सेवा देखील करता, सर्वकाही करत बाबांची आणि घराची आठवण करता - हेच तुमचे वंडरफुल स्टुडंट लाइफ आहे. नॉलेज खूप सोपे आहे, फक्त पावन बनण्यासाठी मेहनत करता.

ओम शांती।
बाबा मुलांना विचारतात नंबरवार पुरुषार्थानुसार. मूलवतन देखील जरूर नंबरवार आठवणीत येत असेल. मुलांना याची देखील जरूर आठवण येत असेल की, आपण पहिले शांतीधामचे राहणारे आहोत नंतर मग येतो सुखधाममध्ये, हे तर जरूर मनातून समजत असतील. मूलवतन पासून हे जे सृष्टीचे चक्र आहे ते कसे फिरते - हे देखील बुद्धिमध्ये आहे. यावेळी आपण ब्राह्मण आहोत मग देवता, क्षत्रिय, वैश्य, शूद्र बनणार. हे तर बुद्धीमध्ये विचार चक्र चालत राहिले पाहिजे ना. मुलांच्या बुद्धीमध्ये हे संपूर्ण नॉलेज आहे. बाबांनी समजावून सांगितले आहे, पूर्वी जाणत नव्हता. आता तुम्हीच जाणता. दिवसें-दिवस तुमची वृद्धी होत राहील. खूप जणांना शिकवत राहता. जरूर पहिले तुम्हीच स्वदर्शन चक्रधारी बनाल. इथे तुम्ही बसले आहात, बुद्धीद्वारे जाणता ते आपले पिता आहेत. तेच सुप्रीम टीचर आहेत शिकविणारे. त्यांनीच समजावून सांगितले आहे - आम्ही ८४ चे चक्र कसे फिरतो. बुद्धीमध्ये जरूर स्मृती असेल ना. बुद्धीमध्ये सतत याची आठवण करायची आहे, लेसन काही मोठा नाही आहे. सेकंदाचा लेसन आहे. बुद्धीमध्ये असते की आपण कुठले रहिवासी आहोत, मग इथे पार्ट बजावण्यासाठी कसे येतो. ८४ चे चक्र आहे. सतयुगामध्ये इतके जन्म, त्रेता मध्ये इतके जन्म या चक्राची आठवण तर कराल ना. आपल्याला जी पोजीशन मिळाली आहे, पार्ट बजावला आहे, त्याची देखील बुद्धीमध्ये जरूर स्मृती राहील. म्हणतील आम्ही असे डबल मुकुटधारी होतो मग सिंगल मुकुटवाले बनलो. आणि नंतर मग पूर्ण राजाईच गेली, तमोप्रधान बनलो. हे चक्र तर फिरले पाहिजे ना; म्हणून नावच ठेवले आहे - स्वदर्शन चक्रधारी. आत्म्याला ज्ञान मिळाले आहे. आत्म्याला दर्शन झाले आहे. आत्मा जाणते, मी असे-असे चक्र फिरते. आता पुन्हा घरी जायचे आहे. बाबांनी सांगितले आहे - माझी आठवण कराल तर घरी पोहोचाल. असे देखील नाही की यावेळी तुम्ही त्या अवस्थेमध्ये बसाल. नाही, बाहेरच्या खूप गोष्टी बुद्धीमध्ये येतात. कोणाला काय आठवत असेल, कोणाला काय आठवत असेल. इथे तर बाबा म्हणतात - इतर सर्व गोष्टींना समेटून एकाचीच आठवण करा. श्रीमत मिळते त्याच्यावर चालायचे आहे. स्वदर्शन चक्रधारी बनून तुम्हाला शेवटपर्यंत पुरुषार्थ करायचा आहे. अगोदर तर काहीच माहित नव्हते, आता तर बाबा सांगतात. त्यांची आठवण केल्याने सर्व काही येते. रचयिता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताचे संपूर्ण रहस्य बुद्धीमध्ये येते. हा तर पाठ मिळतो, याची तर घरी देखील आठवण करू शकता. हि आहे बुद्धीने समजून घेण्याची गोष्ट. तुम्ही वंडरफुल स्टुडंट आहात. बाबांनी समजावून सांगितले आहे - ८ तास आराम देखील भले करा, ८ तास शरीर निर्वाहासाठी कामकाज देखील भले करा. तो धंदा इत्यादी देखील करायचा आहे. त्या सोबत हा बाबांनी जो धंदा दिला आहे - आप समान बनविण्याचा, हा देखील शरीर निर्वाह झाला ना. तो आहे अल्पकाळासाठी आणि हा आहे २१ जन्म शरीर निर्वाहासाठी. तुम्ही जो पार्ट बजवता, त्यामध्ये याचे देखील खूप जबरदस्त महत्त्व आहे. जे जितकी मेहनत करतात तितकीच नंतर मग भक्तीमध्ये त्यांची पूजा होते. या सर्व धारणा तुम्हा मुलांनाच करायच्या आहेत.

तुम्ही मुले पार्टधारी आहात. बाबा तर फक्त ज्ञान देण्याचा पार्ट बजावतात. बाकी शरीर निर्वाहासाठी पुरुषार्थ तुम्ही कराल. बाबा तर करणार नाहीत ना. बाबा तर येतात मुलांना समजावून सांगण्यासाठी की ही वर्ल्डची हिस्ट्री-जिओग्राफी कशा प्रकारे रिपीट होते, चक्र कसे फिरते. हे समजावून सांगण्यासाठीच येतात. युक्तीने समजावून सांगत राहतात. बाबा समजावून सांगतात - मुलांनो, निष्काळजीपणा करू नका. स्वदर्शन चक्रधारी किंवा लाईट हाऊस बनायचे आहे. स्वतःला आत्मा समजायचे आहे. हे तर जाणता शरीर, आत्म्या शिवाय पार्ट बजावू शकत नाही. मनुष्यांना काहीच माहित नाही आहे. भले तुमच्याकडे येतात, चांगले-चांगले म्हणतात, परंतु स्वदर्शन चक्रधारी बनू शकत नाहीत, यासाठी खूप प्रॅक्टिस करावी लागते. तर मग कुठेही जाल तर जसे काही ज्ञानाचे सागर बनाल. ज्याप्रमाणे स्टुडंट शिकून टीचर बनतात मग कॉलेजमध्ये शिकवतात आणि धंद्यामध्ये लागतात. तुमचा धंदाच आहे टीचर बनणे. सर्वांना स्वदर्शन चक्रधारी बनवा. मुलांनी चित्र बनवले आहे - डबल मुकुटधारी राजे नंतर मग सिंगल मुकुटवाले राजे कसे बनतात, हे तर ठीक आहे; परंतु कधी पासून कधी पर्यंत डबल मुकुटधारी होते? कधी पासून कधी पर्यंत सिंगल मुकुटधारी बनले? मग कसे आणि कधी राज्य हिरावून घेतले गेले? ती तारीख लिहिली पाहिजे. हा बेहदचा मोठा ड्रामा आहे. हे निश्चित आहे कि आपण पुन्हा देवता बनतो. आता ब्राह्मण आहोत. ब्राह्मणच संगमयुगातील आहेत. जोपर्यंत तुम्ही हे सांगणार नाही तोपर्यंत कोणालाही कळत नाही. हा तुमचा अलौकिक जन्म आहे. लौकिक आणि पारलौकिक कडून वारसा मिळतो. अलौकिक कडून वारसा मिळू शकत नाही. यांच्या द्वारे (ब्रह्मा बाबांद्वारे) बाबा तुम्हाला वारसा देतात. गातात देखील - हे प्रभू. असे कधी म्हणणार नाहीत - हे प्रजापिता ब्रह्मा. लौकिक आणि पारलौकिक पित्याची आठवण करतात. या गोष्टी कोणीही जाणत नाहीत, तुम्हीच जाणता. पारलौकिक पित्याचा आहे अविनाशी वारसा, लौकिक पित्याचा आहे विनाशी वारसा. समजा कोणी राजाचा मुलगा आहे, ५ करोडचा वारसा मिळत असेल आणि बेहदच्या पित्याचा वारसा समोर बघेल तर म्हणेल - त्याच्या तुलनेमध्ये तर हा अविनाशी वारसा आहे आणि तो तर सर्व नष्ट होणारा आहे. आजचे जे करोडपती आहेत त्यांना माया चिकटलेली आहे, ते येणार नाहीत. बाबा आहेत गरीब निवाज. भारत खूप गरीब आहे, भारतामध्ये बरीच लोक देखील गरीब आहेत. आता तुम्ही अनेकांचे कल्याण करण्याचा पुरुषार्थ करत आहात. जास्त करून आजारी असलेल्यांना वैराग्य येते. समजतात जगणे काय कामाचे. असा रस्ता मिळावा जेणेकरून मुक्तीधाममध्ये निघून जाऊ. दु:खातून सुटण्यासाठी मुक्ती मागतात. सतयुगामध्ये मागत नाहीत कारण तिथे दुःख नाहीये. या गोष्टी आता तुम्हाला समजल्या आहेत. बाबांच्या मुलांची वृद्धी होतच राहील. जे सूर्यवंशी-चंद्रवंशी देवता बनणारे आहेत तेच येऊन ज्ञान घेतील, नंबरवार पुरुषार्थानुसार. हे ज्ञान बाबांशिवाय इतर कोणीही देऊ शकणार नाही. आता तुम्ही बेहदच्या बाबांना सोडून कुठेही जाणार नाहीत, ज्यांचे बाबांवर प्रेम आहे ते समजू शकतात नॉलेज तर खूप सोपे आहे, बाकी पावन बनण्यामध्ये माया विघ्न टाकते. कोणत्याही गोष्टीमध्ये निष्काळजीपणा केला तर निष्काळजीपणामुळेच गमावतात. याचे उदाहरण बॉक्सिंगशी चांगले लागू होते. बॉक्सिंगमध्ये एक-मेकांवर विजय प्राप्त करतात. मुले जाणतात माया आपल्याला पराजित करते.

बाबा म्हणतात - गोड मुलांनो, स्वतःला आत्मा समजा. बाबा स्वतः समजतात यामध्ये मेहनत आहे. बाबा खूप सोपी युक्ती सांगतात - मी आत्मा आहे, एक शरीर सोडून दुसरे घेतो, पार्ट बजावतो, बेहदच्या बाबांची संतान आहोत, हे चांगल्या प्रकारे पक्के करायचे आहे. बाबा फील करतात - माया यांचा बुद्धियोग तोडून टाकते. नंबरवार तर आहेतच, तर याच हिशोबाने राजधानी बनते. सर्व एकरस होतील तर राजाई बनणार नाही. राजा, राणी, प्रजा, श्रीमंत सर्व बनायचे आहेत. या गोष्टी तुमच्या शिवाय कोणीही जाणत नाहीत. आपण आपली राजधानी स्थापन करत आहोत. या सर्व गोष्टी तुमच्यामध्ये देखील जे अनन्य आहेत त्यांच्याच लक्षात राहतात. या गोष्टी कधी विसरता कामा नयेत. मुले जाणतात आम्ही विसरून जातो. नाही तर खूप खुशी राहिली पाहिजे कि आपण विश्वाचे मालक बनत आहोत. पुरुषार्थानेच बनता येते, केवळ सांगितल्याने नाही. बाबा तर क्लासमध्ये येताच विचारतात - मुलांनो सावधान, स्वदर्शन चक्रधारी होऊन बसले आहात ना? बाबा देखील स्वदर्शन चक्रधारी आहेत ना, जे यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) प्रवेश करतात. मनुष्य तर समजतात - स्वदर्शन चक्रधारी विष्णू आहे. त्यांना तर हे माहीतच नाही आहे की हे लक्ष्मी-नारायण आहेत! त्यांना ज्ञान कोणी दिले? ज्या ज्ञानाद्वारे यांनी हे लक्ष्मी-नारायणाचे पद प्राप्त केले. दाखवतात कि स्वदर्शन चक्राने मारले. तुम्हाला हे चित्र बनविणाऱ्यावर हसू येते. विष्णू आहे कंबाइंड गृहस्थ आश्रमाची निशाणी. चित्र छान आहे, बाकी हे काही राईट चित्र नाही आहे. पहिले तुम्ही जाणत नव्हता. ४ भुजावाले इथे कुठून आले. या सर्व गोष्टींना तुमच्यामधील सुद्धा नंबरवार जाणतात. बाबा म्हणतात - सर्व काही तुमच्या पुरुषार्थावर अवलंबून आहे. बाबांच्या आठवणीनेच पापे नष्ट होतात. सर्वात जास्त नंबरवन पुरुषार्थ हाच करायचा आहे. वेळ तर बाबांनी दिलेला आहे. गृहस्थ व्यवहारामध्ये देखील रहायचे आहे. नाही तर मुले इत्यादींना कोण सांभाळणार! ते सर्व काही करत असताना देखील प्रॅक्टिस करायची आहे. बाकी इतर कोणती गोष्ट नाही. श्रीकृष्णासाठी दाखवले आहे अकासुर, बकासुर इत्यादींना स्वदर्शन चक्राने मारले. आता हे तुम्ही समजता, चक्र इत्यादीची तर गोष्टच नाही. किती फरक आहे. हे बाबाच समजावून सांगतात. मनुष्य, मनुष्याला समजावून सांगू शकत नाही. मनुष्य, मनुष्याची सद्गती करू शकत नाहीत. रचता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य कोणी समजावून सांगू शकणार नाहीत. स्वदर्शन चक्राचा अर्थ काय आहे, तो देखील आता बाबांनी समजावून सांगितला आहे. शास्त्रांमध्ये कहाण्या तर अशाकाही बनवल्या आहेत काही विचारू नका, देवतांना देखील हिंसक बनवले आहे. आता या सर्व गोष्टींवर एकांतामध्ये बसून विचार सागर मंथन करायचे आहे. रात्रीला जी मुले पहारा देतात त्यांना खूप चांगला वेळ मिळतो, ते खूप आठवण करू शकतात. बाबांची आठवण करत स्वदर्शन चक्र देखील फिरवत रहा. आठवण कराल तर आनंदामध्ये झोप देखील उडून जाईल. ज्यांना धन मिळते ते खूप आनंदामध्ये राहतात. कधी डुलक्या काढणार नाहीत. तुम्ही जाणता आपण एवर हेल्दी, वेल्दी बनतो. तर याच्यामध्ये चांगल्या रीतीने गढून गेले पाहिजे. हे देखील आता बाबा जाणतात ड्रामा अनुसार जे काही चालते ते योग्यच आहे. तरी देखील पुरुषार्थ करवून घेत राहतात. आता बाबा शिकवण देत आहेत, असे बरेच आहेत ज्यांच्यामध्ये ना ज्ञान आहे, ना योग आहे. कोणी बुद्धीवान, विद्वान इत्यादी आले तर त्यांना सांगू शकणार नाहीत. सर्विसएबुल (सेवायोग्य) मुले जाणतात आपल्याजवळ कोण-कोण चांगल्यारितीने समजावून सांगणारे आहेत? मग बाबा देखील बघतात - हा बुद्धिवान चांगला शिकलेला माणूस आहे आणि समजावून सांगणारा बुद्धू आहे तर स्वतः प्रवेश करून त्यांना समजावून सांगू शकतात. तर जी खरी मुले आहेत, ती सांगतात - माझ्यामध्ये तर एवढे ज्ञान नव्हते जितके बाबांनी बसून यांना समजावून सांगितले. कोणाला तर स्वतःविषयी अहंकार येतो. हे देखील त्यांचे येणे, मदत करणे ड्रामामध्ये पार्ट नोंदलेला आहे. ड्रामा खूप विचित्र आहे. हे समजून घेण्यासाठी मोठी विशाल बुद्धी पाहिजे.

आता तुम्ही मुले जाणता आपण ती राजधानी स्थापन करत आहोत ज्यामध्ये सर्व गोरेच गोरे होते. काळे तिथे असत नाहीत. तुम्ही हे देखील गोरे आणि काळे चित्र बनवून लिहा. ६३ जन्म काम चितेवर बसून असे काळे बनलो आहोत. आत्माच बनली आहे. लक्ष्मी-नारायणाचे देखील काळे चित्र बनवले आहे. हे समजत नाहीत की आत्मा काळी बनते. हे तर सतयुगाचे मालक, गोरे होते, मग काम चितेवर बसल्याने काळे बनतात. आत्मा पुनर्जन्म घेत-घेत तमोप्रधान बनते. तर आत्मा देखील काळी आणि शरीर सुद्धा काळे होते. तर तुम्ही हसत-हसत विचारू शकता की, लक्ष्मी-नारायणाला कोठे काळे, कोठे गोरे का दाखवले आहे, कारण काय? ज्ञान तर नाही आहे. श्रीकृष्णच गोरा आणि मग श्रीकृष्णच सावळा का बनवतात? हे तर तुम्ही आता जाणता. तुम्हाला आता ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-

१) आनंदाने भरपूर राहण्यासाठी एकांतामध्ये बसून मिळालेल्या ज्ञान धनाचे चिंतन करायचे आहे. पावन किंवा सदा निरोगी बनण्यासाठी आठवणीमध्ये राहण्याची मेहनत करायची आहे.

२) बाप समान मास्टर ज्ञान सागर बनून सर्वांना स्वदर्शन चक्रधारी बनवायचे आहे. लाईट हाऊस बनायचे आहे. भविष्य २१ जन्मांच्या शरीर निर्वाहासाठी रूहानी टीचर जरूर बनायचे आहे.

वरदान:-
त्रिकालदर्शी स्थिती द्वारे तिन्ही काळांचा स्पष्ट अनुभव करणारे मास्टर नॉलेजफुल भव

जे त्रिकालदर्शी स्थितीमध्ये स्थित राहतात ते एका सेकंदामध्ये तिन्ही काळांना स्पष्ट पाहू शकतात. काल काय होतो, आज काय आहोत आणि उद्या काय होणार - त्यांच्यासमोर सर्व स्पष्ट होते. ज्याप्रमाणे कोणत्याही देशामध्ये जेव्हा टॉप पॉईंटवर उभे राहून संपूर्ण शहराला पाहतात तेव्हा मजा येते, तसाच संगमयुग टॉप पॉईंट आहे, यावर उभे राहून तिन्ही काळांना पहा आणि अभिमानाने म्हणा की, आम्हीच देवता होतो आणि पुन्हा आम्हीच बनणार, यालाच म्हटले जाते मास्टर नॉलेजफुल.

बोधवाक्य:-
प्रत्येक क्षण अंतिम क्षण आहे, या स्मृतीद्वारे एव्हर रेडी बना.