03-04-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबांच्या आठवणीमध्ये सदैव हर्षित रहा, जुन्या देहाचे भान सोडत जा, कारण तुम्हाला योगबलाने वायुमंडळाला शुद्ध करण्याची सेवा करायची आहे”

प्रश्न:-
स्कॉलरशिप घेण्यासाठी अथवा स्वतःला राजाईचा तिलक देण्यासाठी कोणता पुरुषार्थ केला पाहिजे?

उत्तर:-
राजाईचा तिलक तेव्हा मिळेल जेव्हा आठवणीच्या यात्रेचा पुरुषार्थ कराल. आपसात भाऊ-भाऊ समजण्याचा अभ्यास करा तर नावा-रूपाचे भान निघून जाईल. फालतू गोष्टी कधीही ऐकू नका. बाबा जे ऐकवतात तेच ऐका, बाकी सर्व गोष्टींपासून कान बंद करा. शिक्षणावर पूर्ण लक्ष द्या तेव्हा स्कॉलरशिप मिळू शकेल.

ओम शांती।
मुले जाणतात आम्ही श्रीमतावर स्वत:साठी राजधानी स्थापन करत आहोत. मनसा-वाचा-कर्मणा जितकी जे सेवा करतात, स्वतःचेच कल्याण करतात. यामध्ये कोलाहल इत्यादी माजविण्याची काहीच गरज नाही. बस्स, या जुन्या देहाचे भान विसरत-विसरत तुम्ही तिकडे जाऊन पोहोचता. बाबांची आठवण केल्यामुळे अतिशय आनंद सुद्धा होतो. सदैव आठवण राहिली तर आनंदच आनंद राहील. बाबांना विसरल्यामुळे शुष्कता येते. मुलांनी सदैव हर्षित राहिले पाहिजे. आपण आत्मे आहोत. आम्हा आत्म्यांचे पिता या मुखाद्वारे (ब्रह्मामुखद्वारा) बोलत आहेत, आम्ही आत्मे या कानांद्वारे ऐकतो. अशा प्रकारे स्वतःला सवय लागण्यासाठी मेहनत करायची असते. बाबांची आठवण करत-करत परत घरी जायचे आहे. ही आठवणीची यात्राच खूप ताकद देते. तुम्हाला एवढी ताकद मिळते जे तुम्ही विश्वाचे मालक बनता. बाबा म्हणतात - तुम्ही मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर तुमची विकर्म विनाश होतील. या गोष्टीला पक्के करायचे आहे. शेवटी हाच वशीकरण मंत्र कामी येईल. सर्वांना संदेश सुद्धा हाच द्यायचा आहे - स्वतःला आत्मा समजा, हे शरीर विनाशी आहे. बाबांचा आदेश आहे - ‘माझी आठवण करा तर पावन बनाल’. तुम्ही मुले बाबांच्या आठवणीमध्ये बसला आहात. सोबत ज्ञान देखील आहे कारण तुम्ही रचता आणि रचनेच्या आदी-मध्य-अंताला सुद्धा जाणता. स्व-आत्म्यामध्ये सर्व ज्ञान आहे. तुम्ही स्वदर्शन चक्रधारी आहात ना. तुमची इथे बसल्या-बसल्या खूप कमाई होत आहे. तुमची दिवस आणि रात्र कमाईच कमाई आहे. तुम्ही इथे येताच मुळी सच्ची कमाई करण्यासाठी. अशी सच्ची कमाई आणखी कुठेही होत नाही, जी सोबत येईल. तुम्हाला इथे आणखी कोणता धंदा इत्यादी तर नाही आहे. वातावरण देखील असे आहे. तुम्ही योगबलाने वातावरणाला देखील शुद्ध करता. तुम्ही खूप सेवा करत आहात. जे स्वतःची सेवा करतात तेच भारताची सेवा करतात. नंतर हि जुनी दुनिया सुद्धा राहणार नाही. तुम्ही देखील असणार नाही. दुनियाच नवीन बनेल. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये सर्व ज्ञान आहे. हे देखील जाणता कि, कल्पापूर्वी जी सेवा केली आहे ती आता करत राहतो. दिवसेंदिवस अनेकांना आप समान बनवतच राहतो. या ज्ञानाला ऐकून खूप आनंद होतो. रोमांच उभे होतात. म्हणतात - असे ज्ञान कधी कोणाकडून ऐकलेले नाही. तुम्हा ब्राह्मणांकडूनच ऐकले आहे. भक्तिमार्गामध्ये तर काहीच मेहनत नसते. यामध्ये सर्व जुन्या दुनियेला विसरायचे असते. हा बेहदचा संन्यास बाबाच करवितात. तुम्हा मुलांमध्ये देखील नंबरवार आहेत. आनंद देखील नंबरवार होतो, एक सारखा नाही. ज्ञान-योग सुद्धा एक समान नाही. इतर सर्व मनुष्य तर देहधारींकडे जातात. इथे तुम्ही त्यांच्याकडे येता, ज्यांना आपला देहच नाही.

आठवणीचा जितका पुरुषार्थ करत रहाल तितके सतोप्रधान बनत जाल. आनंद वाढत राहील. हे आहे आत्मा आणि परमात्म्याचे शुद्ध प्रेम. ते आहेत देखील निराकार. तुमची जेवढी कट (गंज) उतरत जाईल, तेवढी कशिश (आकर्षण) होईल. स्वतःची डिग्री तुम्ही पाहू शकता - आम्ही किती आनंदामध्ये राहतो? यामध्ये आसन इत्यादी घालण्याची गरज नाही. हा हठयोग नाहीये. आरामात बसून बाबांची आठवण करत रहा. पडून देखील आठवण करू शकता. बेहदचे बाबा म्हणत आहेत - ‘माझी आठवण करा तर तुम्ही सतोप्रधान बनाल आणि पापे भस्म होतील’. बेहदचे बाबा जे तुमचे टीचर देखील आहेत, सतगुरु सुद्धा आहेत, तर त्यांची खूप प्रेमाने आठवण केली पाहिजे. यामध्येच माया विघ्न आणते. बघायचे आहे - मी बाबांच्या आठवणीमध्ये राहून हर्षित होऊन जेवण केले? आशिकला माशूक मिळाला आहे तर नक्कीच आनंद होणार ना. आठवणीमध्ये राहिल्यामुळे तुमचे खूप जमा होत जाईल. ध्येय खूप मोठे आहे. तुम्ही कोणापासून कोण बनता! अगोदर तुम्ही अडाणी होता, आता तुम्ही खूप हुशार बनले आहात. तुमचे एम ऑब्जेक्ट किती फर्स्ट क्लास आहे. तुम्ही जाणता की आम्ही बाबांची आठवण करत-करत या जुन्या शरीराला सोडून जाऊन नवीन धारण करणार. कर्मातीत अवस्था झाल्यामुळे नंतर हे शरीर सोडून देणार. जवळ आल्यामुळे घराची आठवण येते ना. बाबांचे नॉलेज खूप गोड आहे. मुलांना किती नशा चढला पाहिजे. भगवान या रथामध्ये बसून तुम्हाला शिकवतात. आता तुमची आहे चढती कला. ‘चढती कला तेरे भाने सर्व का भला’. तुम्ही कोणत्या नवीन गोष्टी ऐकत नाही आहात. जाणता की, अनेक वेळा आम्ही ऐकले आहे, तेच पुन्हा ऐकत आहोत. ऐकल्यावर आतल्याआत गदगदून येईल. तुम्ही आहात अननोन वॉरियर्स आणि व्हेरी वेल नोन (अज्ञात योद्धे आणि अतिशय सुप्रसिद्ध). तुम्ही साऱ्या विश्वाला हेवन बनविता, म्हणूनच देवींची इतकी पूजा होते. करणारे आणि करून घेणारे दोघांचीही पूजा होते. मुले जाणतात देवी-देवता धर्मवाल्यांचे सॅपलिंग (कलम) लागत आहे. हा रिवाज आता पडला आहे. तुम्ही स्वतःला तिलक लावता. जे चांगल्या रीतीने शिकतात ते स्वतःला स्कॉलरशिप लायक बनवतात. मुलांनी आठवणीच्या यात्रेचा खूप पुरुषार्थ केला पाहिजे. स्वतःला भाऊ-भाऊ समजा तर नावा-रूपाचे भान निघून जाईल, यामध्येच मेहनत आहे. खूप अटेन्शन द्यायचे आहे. फालतू गोष्टी कधीही ऐकायच्या नाहीत. बाबा म्हणतात - मी जे सांगेन, तेच ऐका. झरमुई-झगमुई (निरर्थक-व्यर्थ) गोष्टी ऐकू नका. कान बंद करा. सर्वांना शांतिधाम आणि सुखधामाचा मार्ग सांगत रहा. जितके जे अनेकांना मार्ग दाखवतात, तितका त्यांना फायदा मिळतो. कमाई होते. बाबा आले आहेत सर्वांचा शृंगार करण्यासाठी आणि घरी घेऊन जाण्यासाठी. बाबा मुलांचे सदैव मदतगार बनतात. जे बाबांचे मदतगार बनले आहेत, त्यांना बाबा देखील प्रेमाने बघतात. जे खूप जणांना मार्ग दाखवतात, तर बाबा देखील त्यांची खूप आठवण करतात. त्यांनादेखील बाबांच्या आठवणीची ओढ लागते. आठवण केल्यानेच कट (गंज) उतरेल, बाबांची आठवण करणे म्हणजे घराची आठवण करणे. सदैव ‘बाबा-बाबा’ करत रहा. हि आहे ब्राह्मणांची रुहानी यात्रा. सुप्रीम रुहची आठवण करता-करता घरी पोहोचाल. जितका देही-अभिमानी बनण्याचा पुरुषार्थ कराल तितकी कर्मेंद्रिये वश होत जातील. कर्मेंद्रियांना वश करण्याचा एकच उपाय आहे - तो म्हणजे आठवण करणे. तुम्ही आहात - ‘रुहानी स्वदर्शन चक्रधारी ब्राह्मण कुल भूषण’. तुमचे हे सर्वोत्तम श्रेष्ठ कुळ आहे. ब्राह्मण कुळ देवतांच्या कुळापेक्षा देखील उच्च आहे कारण तुम्हाला बाबा शिकवतात. तुम्ही बाबांचे बनले आहात, बाबांकडून विश्वाच्या बादशाहीचा वारसा घेण्यासाठी. बाबा म्हटल्यानेच वारशाचा सुगंध येतो. ‘शिव’ यांनाच नेहमी ‘बाबा-बाबा’ म्हणतात. शिवबाबाच सद्गती दाता आहेत इतर कोणीही सद्गती देऊ शकत नाही. खरे सद्गुरु एक निराकारच आहेत जे अर्ध्या कल्पासाठी राज्य देऊन जातात. तर मूळ गोष्ट आहे आठवण करण्याची. अंतिम समयी कोणतेही शरीराचे भान अथवा धन दौलतीची आठवण येऊ नये. नाहीतर पुनर्जन्म घ्यावा लागेल. भक्तीमध्ये काशी कलवट खातात (पाप क्षालन करतात), तुम्ही देखील काशी कलवट खाल्ले (पाप क्षालन केले) आहे किंवा बाबांचे बनले आहात. भक्ती मार्गामध्ये सुद्धा काशी कलवट खाऊन समजतात की, सर्व पापे भस्म झाली. परंतु परत तर कोणी जाऊ शकत नाही. जेव्हा सर्व वरून खाली येतील तेव्हा विनाश होईल. बाबा सुद्धा जातील, तुम्ही सुद्धा जाणार. बाकी असे म्हणतात कि, पांडव पहाडावर विरघळून गेले. तो तर जसा अपघात झाला. बाबा चांगल्या प्रकारे समजावून सांगतात - ‘मुलांनो, सर्वांचा सद्गती दाता एक मी आहे, कोणी देहधारी तुमची सद्गती करू शकत नाही.’ भक्तीमुळे शिडी खालीच उतरत आले आहेत, शेवटी बाबा येऊन वेगाने चढवतात. याला म्हटले जाते अचानक बेहदच्या सुखाची लॉटरी मिळते. ती असते घोड्यांची शर्यत. हि आहे आत्म्यांची शर्यत. परंतु मायेमुळे अपघात होतो अथवा सोडचिठ्ठी देतात. माया बुद्धियोग तोडून टाकते. काम विकारामुळे हार खातात मग केलेली कमाई नाहीशी होते. काम विकार मोठे भूत आहे, कामविकारावर विजय मिळविल्याने जगतजीत बनाल. लक्ष्मी-नारायण जगतजीत होते. बाबा म्हणतात - हा अंतिम जन्म पवित्र जरूर बनायचे आहे, तेव्हाच विजय होईल. नाही तर हार खाल. हा आहे मृत्युलोक मधील अंतिम जन्म. अमरलोकच्या २१ जन्मांचे आणि मृत्युलोकच्या ६३ जन्मांचे रहस्य बाबाच समजावून सांगतात. आता मनाला विचारा कि, मी लक्ष्मी-नारायण बनण्यासाठी लायक आहे? जितकी धारणा होत राहील तितका आनंद देखील होईल. परंतु नशिबामध्ये नसेल तर माया टिकू देत नाही.

या मधुबनचा प्रभाव दिवसेंदिवस जास्त वाढत राहील. मुख्य बॅटरी इथे आहे, जी सेवायोग्य मुले आहेत, ती बाबांना खूप प्रिय वाटतात. जी चांगली सेवायोग्य मुले आहेत त्यांना शोधून-शोधून बाबा सर्चलाईट देतात. ती देखील जरूर बाबांची आठवण करत असतात. सेवायोग्य मुलांची बापदादा दोघेही आठवण करतात, सर्चलाईट देतात. म्हणतात - ‘मिठरा घुर त घुराय…’ आठवण कराल तर आठवणीला प्रतिसाद मिळेल. एका बाजूला आहे सर्व दुनिया, दुसऱ्या बाजूला आहात तुम्ही सच्चे ब्राह्मण. उच्च ते उच्च बाबांची तुम्ही मुले आहात, जे बाबा सर्वांचे सद्गती दाता आहेत. तुमचा हा दिव्य जन्म हिऱ्यासमान आहे. आम्हाला कवडी पासून हिरा देखील तेच बनवितात. अर्ध्या कल्पासाठी एवढे सुख देतात जे पुन्हा त्यांची आठवण करण्याची गरज भासत नाही. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, तुम्हाला मी प्रचंड प्रमाणात धन देतो. तुम्ही सर्व गमावून बसला आहात. माझ्याच मंदिरामध्ये किती हिरे-माणके लावता. आता तर पहा हिऱ्याची किती किंमत आहे! अगोदर हिऱ्यांवर देखील रुंग (सोबत दुसरी भेट) मिळत असे, आता तर भाजीवर सुद्धा जी रुंग (भाजी सोबत काही मिरची, कोथिंबीर इत्यादी देत होते) ती सुद्धा देत नाहीत. तुम्ही जाणता - कसे राज्य घेतले आणि कसे गमावले? आता पुन्हा घेत आहात. हे ज्ञान खूप वंडरफुल आहे. काहींच्या बुद्धीमध्ये मोठ्या मुश्किलीने राहते. राजाई घ्यायची असेल तर पूर्णपणे श्रीमतावर चालायचे आहे. स्वतःचे मत कामी येणार नाही. जिवंतपणी वानप्रस्थमध्ये जायचे असेल तर सर्व काही यांना (शिवबाबांना) द्यावे लागेल. वारसदार बनवावा लागेल. भक्तिमार्गामध्ये देखील वारसदार बनवतात. दान करतात परंतु अल्पकाळासाठी. इथे तर यांना वारसदार बनवावे लागेल - जन्म-जन्मांतरासाठी. गायन देखील आहे - फालो फादर. जे फॉलो करतात तेच उच्च पद प्राप्त करतात. बेहदच्या बाबांचे बनल्यानेच बेहदचा वारसा प्राप्त कराल. शिवबाबा तर आहेत दाता. हा भंडारा त्यांचा आहे. भगवान अर्थ जे दान करतात, तर दुसऱ्या जन्मामध्ये अल्पकाळासाठी सुख मिळते. ते झाले इनडायरेक्ट. हे आहे डायरेक्ट. शिवबाबा २१ जन्मांसाठी देतात. काहींच्या बुद्धीमध्ये तर येते की, आम्ही शिवबाबांना देतो. हा जसा इन्सल्ट आहे. देता घेण्यासाठी. हा बाबांचा भंडारा आहे. काल कंटक दूर होऊन जातात. मुले शिकतात अमर लोकसाठी. हे आहे काट्यांचे जंगल. बाबा फुलांच्या बगीच्यामध्ये घेऊन जातात. तर मुलांना खूप आनंद झाला पाहिजे. दैवी गुण देखील धारण करायचे आहेत. बाबा किती प्रेमाने मुलांना गुल-गुल (फुल) बनवतात. बाबा अतिशय प्रेमाने समजावून सांगतात. आपले कल्याण करू इच्छिता तर दैवीगुण देखील धारण करा आणि कोणाचेही अवगुण पाहू नका. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) बेहदच्या बाबांकडून सर्च लाईट घेण्यासाठी त्यांचे मदतगार बनायचे आहे. मुख्य बॅटरी सोबत आपले कनेक्शन जोडून ठेवायचे आहे. कोणत्याही गोष्टींमध्ये वेळ वाया घालवायचा नाही.

२) सच्ची कमाई करण्यासाठी किंवा भारताची खरी सेवा करण्यासाठी एका बाबांच्या आठवणीमध्ये रहायचे आहे कारण आठवणीने वातावरण शुद्ध होते. आत्मा सतोप्रधान बनते. अपार खुशीचा अनुभव होतो. कर्मेंद्रियांवर पूर्ण कंट्रोल राहतो.

वरदान:-
स्व-परिवर्तनाद्वारे विश्व परिवर्तनाच्या कार्यामध्ये मनासारखी सफलता प्राप्त करणारे सिद्धी स्वरूप भव

प्रत्येकजण स्व-परिवर्तनाद्वारे विश्व परिवर्तन करण्याची सेवा करत आहेत. सर्वांच्या मनामध्ये हाच उमंग-उत्साह आहे कि या विश्वाला परिवर्तन करायचेच आहे आणि निश्चय देखील आहे कि परिवर्तन होणारच आहे. जिथे हिम्मत आहे तिथे उमंग-उत्साह आहे. स्व-परिवर्तनानेच विश्व परिवर्तनाच्या कार्यामध्ये मनासारखी सफलता प्राप्त होते. परंतु ही सफलता तेव्हाच मिळते जेव्हा वृत्ती, व्हायब्रेशन आणि वाणी तिन्ही एकाच वेळी शक्तीशाली असतील.

बोधवाक्य:-
जेव्हा शब्दांमध्ये स्नेह आणि संयम असेल तेव्हा वाणीची एनर्जी जमा होते.