03-05-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - या दुःख धामला जिवंतपणीच घटस्फोट द्या कारण तुम्हाला सुख धाममध्ये जायचे आहे”

प्रश्न:-
बाबा मुलांना कोणती एक छोटीशी मेहनत करायला सांगतात?

उत्तर:-
बाबा म्हणतात - मुलांनो, काम महाशत्रू आहे, यावर विजय प्राप्त करा. हीच तुम्हाला थोडीशी मेहनत करायला सांगतो. तुम्हाला संपूर्ण पावन बनायचे आहे. पतिता पासून पावन अर्थात पारस बनायचे आहे. पारस बनणारे दगड बनू शकत नाहीत. तुम्ही मुले आता गुल-गुल (फूल) बना तर बाबा तुम्हाला डोळ्यांच्या पापण्यांवर बसवून सोबत घेऊन जातील.

ओम शांती।
रुहानी बाबा रुहानी मुलांना समजावून सांगतात, हे तर मुले जरूर समजतात कि आपण ब्राह्मणच आहोत, जे देवता बनणार आहोत. हा पक्का निश्चय आहे ना. शिक्षक ज्यांना शिकवतात तर त्यांना जरूर आप समान बनवितात. हि तर निश्चयाची गोष्ट आहे. कल्प-कल्प बाबा येऊन समजावून सांगतात, आम्हा नरकवासियांना स्वर्गवासी बनवितात. सर्व दुनियेला बनविणारा कुणी तरी असेल ना. बाबा स्वर्गवासी बनवतात, रावण नरकवासी बनवतात. यावेळी आहे - रावण राज्य, सतयुगामध्ये आहे - रामराज्य. रामराज्याची स्थापना करणारा कोणी आहे तर जरूर रावण राज्याची स्थापना करणारा देखील कोणी असेल. राम, भगवंताला म्हटले जाते, भगवान नवीन दुनिया स्थापन करतात. ज्ञान तर आहे खूप सोपे, कोणती मोठी गोष्ट नाहीये. परंतु असे काही पत्थर-बुद्धी आहेत जे पारस-बुद्धी बनणेच असंभव समजतात. नरकवासी पासून स्वर्गवासी बनण्यासाठी खूप मेहनत करावी लागते कारण मायेचा प्रभाव आहे. किती मोठ-मोठ्या बिल्डिंगी ५० मजल्यांच्या, १०० मजल्यांच्या बनवतात. स्वर्गामध्ये काही इतके मजले असत नाहीत. आज-काल इथेच बनवत राहतात. तुम्हाला समजले आहे सतयुगामध्ये अशी घरे असत नाहीत, जशी इथे बनवतात. बाबा स्वतः समजावून सांगतात की, पूर्ण विश्वामध्ये इतके छोटे झाड असते, त्यामुळे तिथे मजले इत्यादी बांधण्याची आवश्यकताच नसते. खूप मोठ्या प्रमाणात जमीन पडून असते. इथे तर जमीनच नाहीये, त्यामुळे जमिनीच्या किंमती किती वाढल्या आहेत. तिथे तर जमिनीला भाव असतच नाही, ना म्युन्सीपालटीचा टॅक्स इत्यादी लागतो. ज्याला जेवढी जमीन पाहिजे घेऊ शकतात. तिथे तुम्हाला सर्व सुखे मिळतात, केवळ एका बाबांच्या या नॉलेजमुळे. मनुष्य १०० मजले इत्यादी जे बांधतात, त्याला देखील पैसे इत्यादी तर लागतात ना. तिथे पैसे इत्यादी लागतच नाहीत. अथाह धन असते. पैशाचे मूल्य नाही. भरपूर पैसे असतील तर काय करतील. सोने, हिरे, माणकांचे महाल इत्यादी बनवतात. आता तुम्हा मुलांना किती समज आली आहे. समज आणि बेसमज (ज्ञानी आणि अज्ञानीचीच) गोष्ट आहे. सतो बुद्धी आणि तमो बुद्धी. सतोप्रधान - स्वर्गाचे मालक; तमोगुणी बुद्धी - नरकाचे मालक. हा काही स्वर्ग नाहीये. हा आहे रौरव नरक. खूप दुःखी आहेत म्हणून भगवंताला पुकारतात आणि मग विसरून जातात. किती डोकेफोड करतात, कॉन्फरन्स इत्यादी करत राहतात की, एकता व्हावी. परंतु तुम्ही मुले समजता - हे आपसामध्ये एकत्र येऊ शकणार नाहीत. हे सारे झाड जडजडीभूत झाले आहे, नंतर नवीन बनते. तुम्ही जाणता कलियुगापासून सतयुग कसे बनते. हे नॉलेज तुम्हाला बाबा आताच समजावून सांगतात. सतयुगवासी तेच मग कलियुगवासी बनता आणि परत तुम्ही संगमवासी बनून परत सतयुगवासी बनता. कोणी म्हणतील - ‘इतके सर्व सतयुगामध्ये जातील का?’ नाही, जे खरी सत्यनारायणाची कथा ऐकतील तेच स्वर्गामध्ये जातील. बाकी सर्व शांतीधाममध्ये निघून जाणार. दुःखधाम तर असणारच नाही. तर या दुःखधामाला जिवंतपणीच घटस्फोट दिला पाहिजे. बाबा युक्ति तर सांगतात, कसे तुम्ही घटस्फोट देऊ शकता. या सर्व सृष्टीवर देवी-देवतांचे राज्य होते. आता पुन्हा बाबा आले आहेत स्थापना करण्यासाठी. आपण त्या बाबांकडून विश्वाचे राज्य घेत आहोत. ड्रामा प्लॅन अनुसार बदल जरूर होणार आहे. ही आहे जुनी दुनिया. याला सतयुग कसे म्हणणार? परंतु मनुष्य अजिबात समजत नाहीत की सतयुग म्हणजे काय? बाबांनी समजावून सांगितले आहे - ‘या नॉलेजच्या लायक तेच आहेत ज्यांनी खूप भक्ती केली आहे. त्यांनाच समजावून सांगितले पाहिजे’. बाकी जे या कुळाचे नसतील, त्यांना समजणार नाही. तर मग असाच वेळ वाया का म्हणून घालवायचा. आपल्या घराण्याचेच नसतील तर ते काहीही मानणार नाहीत. म्हणतात की, ‘आत्मा काय आहे, परमात्मा काय आहे - हे मला समजून घेण्याची सुद्धा इच्छा नाही’. तर अशा व्यक्तीसाठी मेहनत तरी का करावी. बाबांनी समजावून सांगितले आहे - वर लिहिले आहे - ‘भगवानुवाच’, मी येतोच कल्प-कल्प पुरुषोत्तम संगमयुगावर आणि साधारण मनुष्य तनामध्ये. जे आपल्या जन्मांना जाणत नाहीत, मी सांगतो. पूर्ण ५००० वर्षांचा पार्ट कुणाचा असतो, मी सांगतो. जो पहिल्या नंबरमध्ये आला आहे त्याचाच पार्ट असेल ना. श्रीकृष्णाची महिमा देखील गाता - ‘फर्स्ट प्रिन्स ऑफ सतयुग’. तोच मग ८४ जन्मानंतर कोण असणार? फर्स्ट बेगर. बेगर टू प्रिन्स. पुन्हा प्रिन्स टू बेगर. तुम्ही समजता प्रिन्स टू बेगर कसे बनतात. मग पुन्हा बाबा येऊन कवडी पासून हिऱ्या समान बनवतात. जे हिऱ्या समान असतात तेच परत कवडी समान बनतात. पुनर्जन्म तर घेतात ना. सर्वात जास्त जन्म कोण घेतात, हे तुम्हाला समजते. सर्वप्रथम तर श्रीकृष्णालाच मानतील. त्यांची राजधानी आहे. जास्त जन्म देखील त्यांचेच असतील. ही तर खूप सोपी गोष्ट आहे. परंतु मनुष्य या गोष्टींवर लक्ष देत नाहीत. बाबा समजावून सांगतात तर आश्चर्यचकित होतात. बाबा ॲक्युरेट सांगतात - फर्स्ट सो लास्ट. पहिला हिऱ्या समान, शेवटी कवडी समान. परत हिऱ्या समान बनायचे आहे, पावन बनायचे आहे, यात कसला त्रास आहे. पारलौकिक बाबा ऑर्डिनन्स (वटहुकूम) काढतात - काम महाशत्रू आहे. तुम्ही पतित कशामुळे बनले आहात? विकारामध्ये गेल्यामुळे; म्हणूनच बोलावतात देखील - ‘पतित-पावन या’. कारण बाबा तर सदैव पारस-बुद्धी आहेत, ते कधी पत्थर-बुद्धी बनत नाहीत; कनेक्शन (संबंधच) मुळी सर्वात पहिला जन्म घेणारा आणि यांच्यामध्ये होते. देवता तर पुष्कळ असतात परंतु मनुष्य काहीच समजत नाहीत.

ख्रिश्चन लोक तर म्हणतात क्राइस्टच्या ३००० वर्षांपूर्वी पॅराडाईज (स्वर्ग) होता. तसे देखील ते शेवटी आले आहेत ना तर त्यांच्यामध्ये ताकद आहे. त्यांच्याकडूनच सर्वजण शिकण्यासाठी जातात कारण त्यांची फ्रेश-बुद्धी आहे. वृद्धी देखील त्यांचीच होते. सतो, रजो, तमोमध्ये येतात ना. तुम्ही जाणता सर्व काही परकीयांकडूनच शिकतात. हे देखील तुम्ही जाणता - सतयुगामध्ये महाल इत्यादी बनविण्यासाठी अजिबात वेळ लागणार नाही. एकाच्या बुद्धीमध्ये आले की मग वृद्धी होत जाते. एक बनवून मग अजून भरपूर बनवत जातात. बुद्धीमध्ये येते ना. शास्त्रज्ञांची बुद्धी तुमच्याकडे आल्याने अजून उन्नत होते. वेगाने महाल बांधतील. इथे घर अथवा मंदिर बनविण्यासाठी बारा महिने लागतात, तिथे तर इंजिनियर इत्यादी सर्व हुशार असतात. ते आहेच गोल्डन एज. दगड इत्यादी तर असणारही नाहीत. आता तुम्ही बसले आहात, विचार करत असणार, आपण हे जुने शरीर सोडणार, मग घरी जाणार, तिथून परत सतयुगामध्ये योगबलाने जन्म घेणार. मुलांना खुशी का होत नाही! चिंतन का चालत नाही! जी मोस्ट सर्व्हीसेबल मुले आहेत त्यांचे जरूर चिंतन चालत असणार. जसे बॅरिस्टरी पास करतात तर बुद्धीमध्ये चालते ना - ‘आम्ही हे करणार, ते करणार’. तुम्ही देखील समजता आपण हे शरीर सोडून जाऊन हे बनणार. आठवणीनेच तुमचे वय वाढत जाईल. आता तर बेहद बाबांची मुले आहात, हा खूप उच्च दर्जा आहे. तुम्ही ईश्वरीय परिवाराचे आहात. त्यांचा आपसामध्ये इतर दुसरा कोणताही संबंध नाही. भाऊ-बहिणीपेक्षा देखील उच्च दर्जा केला आहे. भाऊ-भाऊ समजा, याची खूप प्रॅक्टिस करायची आहे. भावाचा निवास कुठे आहे? या तख्तावर अकाल आत्मा राहते. हे तख्त सर्व आत्म्यांचे सडले आहे. सर्वात जास्त तुमचे तख्त सडले आहे. आत्मा या तख्तावर विराजमान असते. भृकुटीच्या मध्यभागी काय आहे? ही बुद्धीद्वारे समजून घेण्याची गोष्ट आहे. आत्मा अति सूक्ष्म आहे, स्टार प्रमाणे आहे. बाबा देखील म्हणतात - मी सुद्धा बिंदू आहे. मी काही तुमच्या पेक्षा मोठा थोडाच आहे. तुम्ही जाणता आपण शिवबाबांची संतान आहोत. आता बाबांकडून वारसा घ्यायचा आहे त्यामुळे स्वतःला भाऊ-भाऊ आत्मा समजा. बाबा तुम्हाला सन्मुख शिकवत आहेत. पुढे चालून आणखीनच आकर्षण वाढत जाईल. हि विघ्ने देखील ड्रामा अनुसार येतच राहतात.

आता बाबा म्हणतात - तुम्हाला पतित व्हायचे नाहीये, हा ऑर्डिनन्स (वटहुकूम) आहे. आता तर आणखीनच तमोप्रधान बनले आहेत. विकारा शिवाय राहू शकत नाहीत. जसे गव्हर्मेंट म्हणते, दारू पिऊ नका, तरीही दारू शिवाय राहू शकत नाहीत. मग त्यांनाच दारू पाजून डायरेक्शन देतात की, ‘अमक्या ठिकाणी बॉम्ब सहित उडी मारा’. किती नुकसान होते. तुम्ही इथे बसल्या-बसल्या विश्वाचे मालक बनता. ते मग तिथे बसल्या-बसल्या बॉम्ब्स सोडतात - सर्व विश्वाच्या विनाशासाठी. कशी चटा-भेटी (संघर्ष) आहे. तुम्ही इथे बसल्या-बसल्या बाबांची आठवण करता आणि विश्वाचे मालक बनता. कसेही करून बाबांची आठवण जरूर करायची आहे. यामध्ये हठयोग करणे किंवा आसन इत्यादी घालून बसण्याची देखील गरज नाही. बाबा कोणताही त्रास देत नाहीत. कसेही बसा फक्त तुम्ही माझी आठवण करा की, आम्ही मोस्ट बिलवेड (सर्वात प्रिय) मुले आहोत. तुम्हाला बादशाही अशा पद्धतीने मिळते जसे काही लोण्यातून केस बाजूला करावा. गातात देखील सेकंदामध्ये जीवनमुक्ती. कुठेही बसा, हिंडा-फिरा, परंतु बाबांची आठवण करा. पवित्र झाल्याशिवाय जाणार कसे? नाहीतर शिक्षा भोगावी लागेल. जेव्हा धर्मराजाकडे जाल तेव्हा सर्वांचा हिशोब चुकता होईल. जितके पवित्र बनणार तितके उच्च पद प्राप्त कराल. अपवित्र राहिलात तर सुकी चपाती खाल. जितकी बाबांची आठवण कराल तितकी पापे नष्ट होतील. यामध्ये खर्च इत्यादीची कोणती गोष्ट नाही. भले घरी बसून रहा, परंतु बाबांकडून मंत्र देखील घ्या. हा आहे मायेला वश करण्याचा मंत्र - ‘मनमनाभव’. हा मंत्र मिळाला कि मग भले घरी जा. मुखावाटे काहीही बोलू नका. अल्फ आणि बे, बादशाहीची आठवण करा. तुम्ही समजता की, बाबांची आठवण केल्याने आपण सतोप्रधान बनणार, पापे नष्ट होतील. बाबा (ब्रह्मा बाबा) स्वतःचा अनुभव देखील सांगतात - ‘भोजन करायला बसतो, ठीक आहे, मी बाबांची आठवण करून खातो, आणि मग लगेच विसरून जातो’. कारण गायले जाते - ‘जिनके मत्थे मामला…’. किती विचार करावा लागतो - अमक्याची आत्मा खूप सेवा करते, तिची आठवण करायची आहे. सर्व्हीसेबल (सेवा योग्य) मुलांवर खूप प्रेम करतात. तुम्हाला देखील म्हणतात - ‘या शरीरामध्ये (ब्रह्मा बाबांच्या तनामध्ये) जी आत्मा विराजमान आहे, त्यांची आठवण करा’. इथे तुम्ही येताच मुळी शिवबाबांकडे. बाबा तिथून खाली आले आहेत. तुम्ही सर्वांना म्हणता देखील - भगवान आले आहेत. परंतु समजत नाहीत. युक्तीने सांगावे लागेल. हद आणि बेहदचे दोन पिता आहेत. आता बेहदचे बाबा राजाई देत आहेत. जुन्या दुनियेचा विनाश देखील समोर उभा आहे. एका धर्माची स्थापना, अनेक धर्मांचा विनाश होतो. बाबा म्हणतात - ‘मामेकम् (मज एकाची) आठवण करा, तर तुमची पापे भस्म होतील’. हा योग अग्नी आहे, ज्यामुळे तुम्ही तमोप्रधाना पासून सतोप्रधान बनणार. ही पद्धत बाबांनीच सांगितली आहे. तुम्ही मुले जाणता - बाबा सर्वांना गुल-गुल (फूल) बनवून, डोळ्यांच्या पापण्यांवर बसवून घेऊन जातात. कोणते डोळे? ज्ञानाचे. आत्म्यांना घेऊन जातात. समजता ना, जायचे तर जरूर आहे, तर मग त्या आधीच का नाही बाबांकडून वारसा तरी घ्यावा. कमाई देखील खूप जबरदस्त आहे. बाबांना विसरल्यामुळे मग तोटा देखील खूप आहे. पक्के व्यापारी बना. बाबांची आठवण करण्यानेच आत्मा पवित्र बनेल. मग एक शरीर सोडून, जाऊन दुसरे घेणार. तर बाबा म्हणतात - ‘गोड-गोड मुलांनो, देही-अभिमानी बना’. ही पक्की सवय लावून घ्यावी लागेल. स्वतःला आत्मा समजून बाबांकडून शिकत रहा तर बेडा (जीवन रुपी नाव) पार होईल, शिवालयामध्ये निघून जाणार. चंद्रकांत, वेदांत या मासिकांमध्ये देखील अशी एक कथा आहे की, ‘बोट (नाव) कशी जात असते, काहीजण मग मध्येच उतरतात, कोणत्यातरी गोष्टींमध्ये गुंतून पडतात. आणि तोपर्यंत बोट निघून जाते’. हि भक्तिमार्गाची शास्त्रे तरीही पुन्हा बनतील, तुम्ही वाचाल. आणि मग जेव्हा बाबा येतील तेव्हा हे सर्व सोडून द्याल. बाबा येतातच सर्वांना घेऊन जाण्यासाठी. भारताचे उत्थान आणि पतन कसे होते, किती स्पष्ट आहे. हे (ब्रह्मा बाबा) सावळे आणि गोरे बनतात. ब्रह्मा सो विष्णू, विष्णू सो ब्रह्मा. फक्त एकच तर बनत नाही ना. हे सर्व स्पष्टीकरण आहे. श्रीकृष्णा विषयी देखील स्पष्टीकरण आहे गोरा आणि सावळा. स्वर्गामध्ये जातात तर नरकाला लाथ मारतात. हे चित्रामध्ये स्पष्ट दाखविले आहे ना. राजाची चित्रे देखील तुमची बनवली होती. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) बाबांचा वटहुकूम पालन करण्यासाठी, आपण आत्मा भाऊ-भाऊ आहोत, भृकुटीच्या मध्यभागी आपला निवास आहे, आपण बेहदच्या बाबांची मुले आहोत, आपला हा ईश्वरीय परिवार आहे - या स्मृतीमध्ये रहायचे आहे. देही-अभिमानी बनण्याची सवय घालून घ्यायची आहे.

२) धर्मराजाच्या शिक्षेपासून सुटण्यासाठी आपले सर्व हिशोब चुकते करायचे आहेत. मायेला वश करण्याचा जो मंत्र मिळाला आहे, त्याची आठवण करत सतोप्रधान बनायचे आहे.

वरदान:-
बिंदू रुपामध्ये स्थित राहून इतरांना देखील ड्रामाच्या बिंदूची स्मृति करून देणारे विघ्न-विनाशक भव

जी मुले कोणत्याही गोष्टीमध्ये प्रश्नचिन्ह उत्पन्न करत नाहीत, सदैव बिंदू रुपामध्ये स्थित राहून प्रत्येक कार्यामध्ये इतरांना देखील ड्रामाच्या बिंदूची स्मृती करून देतात - त्यांनाच विघ्न-विनाशक म्हटले जाते. ते इतरांना देखील समर्थ बनवून सफलतेच्या ध्येया जवळ घेऊन येतात. ते हदच्या सफलतेची प्राप्ती पाहून खुश होत नाहीत परंतु बेहदचे सफलतामूर्त असतात. सदैव एकरस, एका श्रेष्ठ स्थितीमध्ये स्थित राहतात. ते आपल्या सफलतेच्या स्व-स्थितीने असफलतेला देखील परिवर्तित करतात.

बोधवाक्य:-
आशीर्वाद घ्या, आणि आशीर्वाद द्या तर खूप लवकर मायाजीत बनाल.