04-04-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“ गोड मुलांनो - गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना पारलौकिक पित्याकडून पूर्ण वारसा घ्यायचा आहे, तर आपले सर्व काही एक्सचेंज करा, हा खूप मोठा व्यापार आहे’’

प्रश्न:-
ड्रामा विषयीचे ज्ञान कोणत्या गोष्टीमध्ये तुम्हा मुलांना खूप मदत करते?

उत्तर:-
जेव्हा शरीराचा कोणता आजार येतो तर ड्रामा विषयीचे ज्ञान खूप मदत करते कारण तुम्ही जाणता हा ड्रामा हुबेहूब रिपीट होतो. यामध्ये रडण्या-ओरडण्याची काही गरज नाही. कर्मांचा हिशोब चुकता होणार आहे. २१ जन्मांच्या सुखाच्या तुलनेमध्ये हे दुःख तर काहीच भासत नाही. ज्ञान पूर्ण नसेल तर वेदनेने विव्हळतात.

ओम शांती।
भगवानुवाच. भगवान त्यांना म्हटले जाते ज्यांना आपले स्वतःचे शरीर नाहीये. असे नाही की भगवंताचे नाव, रूप, देश, काळ नाहीये. नाही, भगवंताला शरीर नाहीये. बाकी सर्व आत्म्यांना आपले-आपले शरीर आहे. आता बाबा म्हणतात - ‘गोड-गोड रूहानी मुलांनो, स्वतःला आत्मा समजून बसा’. तसेही आत्माच ऐकते, पार्ट बजावते, शरीराद्वारे कर्म करते. संस्कार आत्माच घेऊन जाते. चांगल्या-वाईट कर्मांचे फळ देखील आत्माच भोगते, शरीरा सोबत. शरीरा शिवाय तर कोणी भोग भोगू शकत नाही; म्हणून बाबा म्हणतात स्वतःला आत्मा समजून बसा. बाबा मला ऐकवत आहेत. मी आत्मा ऐकत आहे या शरीरा द्वारे. भगवानुवाच - मनमनाभव. देहा सहीत देहाच्या सर्व धर्मांचा त्याग करून स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. हे एकच पिता सांगतात, जे गीतेचे भगवान आहेत. भगवान म्हणजेच जन्म-मरण रहीत. बाबा समजावून सांगत आहेत - माझा जन्म अलौकिक आहे. इतर कोणीही असा जन्म घेत नाहीत, ज्याप्रमाणे मी यांच्यामध्ये प्रवेश करतो. हि तर चांगल्या रीतीने आठवण केली पाहिजे. असे नाही, सर्वकाही भगवान करतात, पूज्य-पुजारी, दगड-धोंड्यामध्ये परमात्मा आहेत. २४ अवतार, कच्छ-मच्छ अवतार, परशुराम अवतार दाखवतात. आता लक्षात येत आहे की, कसे काय भगवान बसून परशुराम अवतार घेतील आणि कुऱ्हाड घेऊन हिंसा करतील! हे चुकीचे आहे. ज्याप्रमाणे परमात्म्याला सर्वव्यापी म्हटले आहे, तसे कल्पाचे आयुष्य लाखों वर्षे आहे असे लिहिले आहे, याला म्हटले जाते घोर अंधार अर्थात ज्ञान नाही आहे. ज्ञानाने होतो प्रकाश. आता अज्ञानाचा घोर अंधार आहे. तुम्ही मुले आता घोर-प्रकाशामध्ये आहात. तुम्ही सर्वांना चांगल्या प्रकारे जाणता. जे जाणत नाहीत ते पूजा इत्यादी करत राहतात. तुम्ही सर्वांना जाणले आहे म्हणून तुम्हाला पूजा करण्याची गरज नाही. तुम्ही आता पुजारीपणा पासून मुक्त झालात. पूज्य देवी-देवता बनण्यासाठी तुम्ही पुरुषार्थ करत आहात. तुम्हीच पूज्य देवी-देवता होता मग पुजारी मनुष्य बनले आहात. मनुष्यामध्ये आहेत आसुरी गुण म्हणूनच गायन आहे - मनुष्याला देवता बनवले. ‘मनुष्य को देवता किये करत न लागी वार…’ एका सेकंदामध्ये देवता बनवतात. बाबांना ओळखले आणि ‘शिवबाबा’ म्हणायला सुरुवात केली. ‘बाबा’ म्हटल्याने मनामध्ये येते की आपण विश्वाचे, स्वर्गाचे मालक बनतो. हे आहेत बेहदचे पिता. आता तुम्ही अचानक येऊन पारलौकिक पित्याचे बनले आहात. बाबा मग म्हणतात - गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना आता पारलौकिक पित्याकडून वारसा घ्या. लौकिक वारसा तर तुम्ही घेत आले आहात, आता लौकिक वारशाला पारलौकिक वारशासोबत एक्सचेंज करा. किती चांगला व्यापार आहे! लौकिक वारसा काय असणार? हा आहे बेहदचा वारसा, तो देखील गरीब लगेच घेतात. गरिबांना ॲडॉप्ट करतात. बाबा देखील गरीब निवाज आहेत ना. गायन आहे - मी गरीब निवाज आहे. भारत सर्वात गरीब आहे. मी येतो देखील भारतामध्ये, येऊन यांना श्रीमंत बनवितो. भारताची महिमा खूप जबरदस्त आहे. हे सर्वात मोठे तीर्थ आहे. परंतु कल्पाची आयु मोठी केल्याने एकदम विसरून गेले आहेत. समजतात भारत खूप धनवान होता, आता गरीब बनला आहे. पूर्वी धान्य इत्यादी सर्व इथून विदेशामध्ये जात होते. आता समजतात भारत खूप गरीब आहे म्हणून मदत देतात. असे करतात देखील - जेव्हा कोणती मोठी व्यक्ती अपयशी होते तेव्हा आपापसात निर्णय घेऊन त्याना मदत करतात. हा भारत आहे सर्वात प्राचीन. भारतच हेवन होता. सर्वात पहिला आदि सनातन देवी-देवता धर्म होता. फक्त कालावधी जास्त केला आहे त्यामुळे गोंधळतात. भारताला मदत देखील किती देतात. बाबांना देखील भारतामध्येच यायचे आहे.

तुम्ही मुले जाणता - आपण बाबांकडून वारसा घेत आहोत. लौकिक पित्याचा वारसा एक्सचेंज करतो पारलौकिक द्वारे. ज्याप्रमाणे यांनी (ब्रह्मा बाबांनी) केले. पाहिले, पारलौकिक पित्याद्वारे तर ताज-तख्त मिळत आहे - कुठे ती बादशाही, कुठे हे नीच जीवन. म्हटले देखील जाते - फॉलो फादर. उपाशी पोटी मरण्याची तर गोष्टच नाही. बाबा म्हणतात, ट्रस्टी होऊन संभाळा. बाबा येऊन सोपा मार्ग सांगतात. मुलांनी खूप दुःख पाहिले आहे तेव्हाच तर बाबांना बोलावतात - ‘हे परमपिता परमात्मा, दया करा’. सुखामध्ये कोणीही पित्याची आठवण करत नाहीत, दुःखामध्ये सर्वजण आठवण करतात. आता बाबा सांगत आहेत की, आठवण कशी करायची. तुम्हाला तर आठवण करायला देखील येत नाही. मीच येऊन तुम्हाला सांगतो. मुलांनो, स्वतःला आत्मा समजा आणि पारलौकिक पित्याची आठवण करा तर तुमची पापे नष्ट होतील. ‘सिमर-सिमर सुख पाओ, कलह क्लेश मिटे तन के’. जी काही शरीराची दुःख आहेत ती सर्व नष्ट होतील. तुमची आत्मा आणि शरीर दोन्ही पवित्र बनतील. तुम्ही असे कंचन होता. मग पुनर्जन्म घेता-घेता आत्म्यावर गंज चढते, मग शरीर देखील जुने मिळते. ज्याप्रमाणे सोन्यामध्ये मिश्रधातू टाकला जातो. पवित्र सोन्याचा दागिना देखील पवित्र असेल. त्यामध्ये चमक असते. भेसळवाला दागिना काळा होईल. बाबा म्हणतात - तुमच्यामध्ये देखील गंज पडला आहे, त्याला आता काढायचे आहे. कसा निघणार? बाबांसोबत योग लावा. शिकविणाऱ्या सोबत योग लावावा लागतो ना. हे तर पिता, टीचर, गुरु सर्वकाही आहेत. त्यांची आठवण कराल तर तुमची विकर्मे विनाश होतील आणि ते तुम्हाला शिकवतात देखील. पतित-पावन सर्वशक्तिमान तुम्ही मलाच म्हणता. कल्प-कल्प बाबा असेच समजावून सांगतात. गोड-गोड सिकिलध्या मुलांनो, ५ हजार वर्षांनंतर येऊन तुम्ही भेटले आहात म्हणून तुम्हाला ‘सिकिलधे’ म्हटले जाते. आता या देहाचा अहंकार सोडून आत्म-अभिमानी बना. आत्म्याचे देखील ज्ञान दिले, जे बाबांशिवाय दुसरे कोणीही देऊ शकत नाही. असा कोणीही मनुष्य नाही, ज्याला आत्म्याचे ज्ञान असेल. संन्यासी उदासी गुरु गोसावी कोणीही जाणत नाहीत. आता ती ताकद राहिलेली नाही. सर्वांची ताकद कमी झालेली आहे. संपूर्ण झाड जड-जडीभूत अवस्थेला प्राप्त झाले आहे. आता पुन्हा नवीन स्थापना होते. बाबा येऊन व्हरायटी झाडाचे रहस्य समजावून सांगतात. म्हणतात - पहिले तुम्ही राम राज्यामध्ये होता, मग जेव्हा तुम्ही वाम मार्गामध्ये जाता तर रावण राज्य सुरू होते आणि मग इतर वेगवेगळे धर्म येतात. भक्तीमार्ग सुरू होतो. पूर्वी तुम्ही जाणत नव्हता. कोणालाही जाऊन विचारा - तुम्ही रचयिता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणता का? तर कोणीही सांगणार नाही. बाबा भक्तांना म्हणतात - आता तुम्हीच ठरवा. बोर्डावर देखील लिहा - ॲक्टर असून ड्रामाच्या डायरेक्टर, क्रिएटर, प्रिन्सिपल ॲक्टरला जाणत नाही तर अशा ॲक्टरला काय म्हणाल? आपण आत्मा इथे वेगवेगळी शरीरे घेऊन पार्ट बजावण्यासाठी येतो तर जरूर हे नाटक आहे ना.

गीता आहे - माता आणि पिता आहेत - शिव. बाकी सर्व आहे रचना. गीता नवीन दुनियेला क्रिएट करते. हे देखील कोणाला माहित नाही की नवीन दुनियेला कसे क्रिएट करतात. नवीन दुनियेमध्ये सर्वात पहिले तर तुम्हीच आहात. आता हि आहे पुरुषोत्तम संगमयुगी दुनिया. ही जुनी दुनिया देखील नाही तर नवीन सुद्धा नाही आहे. हा आहेच संगम. ब्राह्मणांची शिखा आहे. विराट रूपामध्ये देखील ना शिवबाबांना दाखविले आहे, ना ब्राह्मण शिखेला दाखविले आहे. तुम्ही तर वरती शिखा देखील दाखविली आहे. तुम्ही ब्राह्मण बसलेले आहात. देवतांच्या मागे आहेत क्षत्रिय. द्वापरमध्ये पोटाचे पुजारी, मग शूद्र बनतात. ही बाजोली आहे. तुम्ही केवळ बाजोलीची (कोलांटी उडीच्या खेळाची) आठवण करा. हीच तुमच्यासाठी ८४ जन्मांची यात्रा आहे. सेकंदात सर्व आठवणीत येते. आपण असे चक्र फिरतो. हे राईट चित्र आहे, ते चुकीचे आहे. बाबांशिवाय राईट चित्र इतर कोणीही बनवू शकणार नाही. यांच्याद्वारे (ब्रह्मा बाबांद्वारे) बाबा समजावून सांगतात. तुम्ही अशा प्रकारे बाजोली खेळता. तुमची यात्रा सेकंदात होते. काहीच अडचण नाही. रुहानी मुले समजतात, आम्हाला बाबा शिकवत आहेत. हा सत्संग आहे सत्य बाबांसोबत. तो आहे खोटा संग. सचखंड बाबाच स्थापन करतात. मनुष्यामध्ये ती ताकद नाही. भगवंतच करू शकतात. भगवंतालाच ज्ञानाचा सागर म्हटले जाते. मनुष्य हे देखील जाणत नाहीत की ही परमात्म्याची महिमा आहे. ते शांतीचे सागर तुम्हाला शांती देत आहेत. पहाटेला देखील तुम्ही ड्रिल (अभ्यास) करता. शरीरा पासून वेगळे होऊन बाबांच्या आठवणीमध्ये राहता. इथे तुम्ही आले आहात जिवंतपणी मरण्यासाठी. बाबांवर अर्पण होता. ही तर जुनी दुनिया, जुने शरीर आहे, याचा जसा तिरस्कार वाटतो, असे वाटते याला सोडून जावे. कशाचीही आठवण येऊ नये. सर्वकाही विसरून जायचे आहे. तुम्ही म्हणता देखील सर्वकाही भगवंताने दिले आहे, तर आता त्यांना द्या. भगवान मग तुम्हाला म्हणतात - तुम्ही ट्रस्टी बना. भगवान ट्रस्टी बनणार नाहीत. ट्रस्टी तुम्ही बनता. तर मग तुम्ही पाप करणार नाही. पूर्वी पाप आत्म्यांची पाप आत्म्यांसोबत देवाण-घेवाण होत आली आहे. आता संगमयुगावर तुमची पाप आत्म्यांशी देवाण-घेवाण नाहीये. पाप आत्म्यांना दान केलेत तर डोक्यावर पाप चढेल. करता ईश्वर अर्थ आणि देता पाप आत्म्यांना. बाबा काही घेतात थोडेच. बाबा म्हणतात - जाऊन सेंटर उघडा त्याने अनेकांचे कल्याण होईल.

बाबा समजावून सांगत आहेत - जे काही होते हुबेहुब ड्रामा अनुसार रिपीट होतच राहते. मग यामध्ये रडण्या-ओरडण्याची, दुःख करण्याची गोष्टच नाही. कर्मांचा हिशोब चुकता होणे तर चांगलेच आहे. वैद्य लोक म्हणतात - पूर्ण आजार उफाळून येईल. बाबा देखील म्हणतात, राहिलेला हिशोब चुकता करायचा आहे. एक तर योगाने नाहीतर मग सजा खाऊन चुकता करावा लागेल. सजा तर खूप कठोर आहेत. त्यापेक्षा आजारपण इत्यादीने चुकता झाला तर खूप चांगले. ते दुःख २१ जन्मांच्या सुखाच्या तुलनेमध्ये तितकेसे भासत नाही कारण सुख खूप आहे. ज्ञान पूर्ण नसेल तर आजारपणा मध्ये विव्हळत राहतात. आजारी पडतात तर भगवंताची खूप आठवण करतात. ते देखील चांगले आहे. एकाचीच आठवण करायची आहे, हे देखील समजावून सांगत राहतात. ते लोक गुरूंची आठवण करतात, अनेक गुरु आहेत. एका सद्गुरुला तर तुम्हीच जाणता. ते ऑलमाइटी ऑथॉरिटी आहेत. बाबा म्हणतात - मी या वेद-ग्रंथांना जाणतो. ही भक्तीची सामग्री आहे. यांच्या द्वारे कोणीही मला प्राप्त करत नाहीत. बाबा येतातच पाप आत्म्यांच्या दुनियेमध्ये. इथे पुण्य आत्मा कुठून आली. ज्याने पूर्ण ८४ जन्म घेतले आहेत, त्यांच्याच शरीरामध्ये येतो. सर्वात पहिले हे (ब्रह्मा बाबा) ऐकतात. बाबा म्हणतात - इथे तुमची आठवणीची यात्रा चांगली होते. इथे भले वादळे देखील येतील परंतु बाबा समजावून सांगत राहतात की, स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. कल्पापूर्वी देखील तुम्ही असेच ज्ञान ऐकले होते. दिवसें-दिवस तुम्ही ऐकत राहता. राजधानी स्थापन होत राहते. जुन्या दुनियेचा विनाश देखील होणारच आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) पहाटे उठून शरीरा पासून न्यारे होण्याचा अभ्यास करायचा आहे. जुनी दुनिया, जुने शरीर कशाचीही आठवण येऊ नये. सर्व काही विसरून जायचे आहे.

२) संगमयुगावर पाप आत्म्यांसोबत देवाण-घेवाण करायची नाही. कर्मांचा हिशोब आनंदाने चुकता करायचा आहे. आक्रोश करायचा नाही. सर्वकाही बाबांवर अर्पण करून मग ट्रस्टी बनून सांभाळायचे आहे.

वरदान:-
महसूसता (सद्सदविवेक बुद्धीच्या) शक्तीद्वारे स्व-परिवर्तन करणारे तीव्र पुरुषार्थी भव

कोणत्याही परिवर्तनाचा सहज आधार महसूसतेची शक्ती आहे. जोपर्यंत महसूसतेची शक्ती येत नाही तोपर्यंत जाणिव होत नाही आणि जोपर्यंत जाणिव होत नाही तोपर्यंत ब्राह्मण जीवनाच्या विशेषतेचे फाउंडेशन मजबूत नाही. उमंग-उत्साहावाली चाल नाही. जेव्हा महसूसतेची शक्ती प्रत्येक गोष्टीमध्ये अनुभवी बनविते तेव्हा तीव्र पुरुषार्थी बनता. महसूसतेची शक्ती कायमसाठी सहजच परिवर्तन घडवून आणते.

बोधवाक्य:-
स्नेहाच्या स्वरूपाला साकारमध्ये इमर्ज करून ब्रह्मा बाप समान बना.