04-05-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबा जे काही सांगतात, ते तुमच्या हृदयावर बिंबले पाहिजे, इथे तुम्ही आला आहात सूर्यवंशी घराण्यामध्ये उच्च पद प्राप्त करण्यासाठी, तर धारणासुद्धा करायची आहे”

प्रश्न:-
सदैव रिफ्रेश (ताजेतवाने) राहण्याचे साधन कोणते आहे?

उत्तर:-
जसे उन्हाळ्यामध्ये पंखे चालू होतात तर ताजेतवाने करतात, तसे सदैव स्वदर्शन चक्र फिरवत रहा तर ताजेतवाने रहाल. मुले विचारतात - स्वदर्शनचक्रधारी बनण्यासाठी किती वेळ लागतो? बाबा म्हणतात - ‘मुलांनो, एक सेकंद’. तुम्हा मुलांना स्वदर्शनचक्रधारी जरूर बनायचे आहे कारण याद्वारेच तुम्ही चक्रवर्ती राजा बनाल. स्वदर्शनचक्र फिरविणारे सूर्यवंशी बनतात.

ओम शांती।
पंखे सुद्धा फिरतात सर्वांना ताजेतवाने करतात. तुम्ही सुद्धा स्वदर्शनचक्रधारी बनून बसता तर खूप ताजेतवाने होता. स्वदर्शन चक्रधारीचा अर्थ सुद्धा कोणी जाणत नाहीत, तर त्यांना समजावून सांगितले पाहिजे. जर समजले नाही तर चक्रवर्ती राजा बनणार नाही. स्वदर्शन चक्रधारीला निश्चय असेल की, आम्ही चक्रवर्ती राजा बनण्यासाठी स्वदर्शन चक्रधारी बनलो आहोत. श्रीकृष्णाला देखील चक्र दाखवतात. कंबाइंड लक्ष्मी-नारायणाला देखील चक्र दाखवतात आणि एकट्याला सुद्धा चक्र देतात. स्वदर्शनचक्राला देखील समजून घ्यायचे आहे, तेव्हाच चक्रवर्ती राजा बनाल. गोष्ट तर खूप सोपी आहे. मुले विचारतात - ‘बाबा, स्वदर्शनचक्रधारी बनण्यासाठी किती वेळ लागेल?’ बाबा म्हणतात - ‘मुलांनो, एक सेकंद’. आणि मग तुम्ही बनता विष्णूवंशी देवतांना विष्णूवंशीच म्हणणार. विष्णूवंशी बनण्यासाठी पहिले तर शिववंशी बनावे लागेल त्यानंतर मग बाबा बसून सूर्यवंशी बनवतात. शब्द तर खूप सोपा आहे. आपण नवीन विश्वामध्ये सूर्यवंशी बनतो. आपण नवीन दुनियेचे मालक चक्रवर्ती बनतो. स्वदर्शन चक्रधारी सो विष्णूवंशी बनण्यासाठी एक सेकंद लागतो. बनविणारे आहेत शिवबाबा. शिवबाबा विष्णूवंशी बनवतात, दुसरे कोणीही बनवू शकत नाही. हे तर मुले जाणतात विष्णूवंशी असतात सतयुगामध्ये, इथे नाही. हे आहे विष्णूवंशी बनण्याचे युग. तुम्ही इथे येताच मुळी विष्णूवंशामध्ये येण्यासाठी, ज्याला सूर्यवंशी म्हणता. ज्ञान सूर्यवंशी शब्द खूप चांगला आहे. विष्णू, सतयुगाचा मालक होता. त्यामध्ये लक्ष्मी-नारायण दोघेही आहेत. इथे मुले आली आहेत, लक्ष्मी-नारायण किंवा विष्णूवंशी बनण्यासाठी. यामध्ये आनंदही खूप होतो. नवीन दुनिया, नव्या विश्वामध्ये, गोल्डन एज विश्वामध्ये विष्णूवंशी बनायचे आहे. यापेक्षा उच्च पद कोणतेही नाही, यासाठी तर खूप आनंद झाला पाहिजे.

प्रदर्शनीमध्ये तुम्ही समजावून सांगता. तुमचे एम ऑब्जेक्टच हे आहे. तुम्ही बोला, हे खूप मोठे विद्यापीठ आहे. याला म्हटले जाते - रूहानी स्पिरिच्युअल युनिव्हर्सिटी. ध्येय, उद्दिष्ट या चित्रामध्ये आहे. मुलांनी हे लक्षात ठेवले पाहिजे. कसे लिहावे, जेणेकरून मुलांना समजावून सांगण्यासाठी एक सेकंद लागेल. तुम्हीच समजावून सांगू शकता. त्यातही लिहिलेले आहे आम्ही विष्णूवंशी देवी-देवता होतो जरूर अर्थात देवी-देवता कुळाचे होतो. स्वर्गाचे मालक होतो. बाबा समजावून सांगत आहेत - ‘गोड-गोड मुलांनो, भारतामध्ये तुम्ही आजपासून ५ हजार वर्षांपूर्वी सूर्यवंशी देवी-देवता होता’. आता मुलांच्या लक्षात आले आहे. शिवबाबा मुलांना म्हणतात - ‘हे मुलांनो, तुम्ही सतयुगामध्ये सूर्यवंशी होतात. शिवबाबा आले होते सूर्यवंशी घराणे स्थापन करण्यासाठी. बरोबर भारत स्वर्ग होता. हेच पूज्य होते, पुजारी कोणीही नव्हते. पूजेची कोणतीही सामग्री नव्हती. या शास्त्रांमध्येच पूजेचे रीती-रिवाज इत्यादी लिहिलेले आहेत. हि आहे सामग्री. तर बेहदचे पिता शिवबाबा बसून समजावून सांगत आहेत. ते आहेत ज्ञानाचे सागर, मनुष्य सृष्टीचे बीजरूप. त्यांना वृक्षपती किंवा बृहस्पती सुद्धा म्हणतात. बृहस्पतीची दशा अति उच्च असते. वृक्षपती तुम्हाला समजावून सांगत आहेत - तुम्ही पूज्य देवी-देवता होता आणि मग पुन्हा पुजारी बनला आहात. जे देवता निर्विकारी होते ते मग कुठे गेले? नक्की पुनर्जन्म घेत-घेत खाली उतरतील. तर एक-एक शब्द हृदयावर किंवा कागदावर लिहून ठेवला पाहिजे. हे कोण समजावून सांगत आहेत? शिव-बाबा. तेच स्वर्ग रचतात. शिवबाबाच मुलांना स्वर्गाचा वारसा देतात. बाबांशिवाय दुसरे कोणीही देऊ शकत नाही. लौकिक पिता तर आहे देहधारी. तुम्ही स्वतःला आत्मा समजून पारलौकिक पित्याची आठवण करता - ‘बाबा’, तर मग बाबा देखील रिस्पॉन्स देतात - ‘ओ माझ्या बाळा’. तर बेहदचे पिता झाले ना. मुलांनो, तुम्ही सूर्यवंशी देवी-देवता पूज्य होता नंतर मग तुम्ही पुजारी बनलात. हे आहे रावणाचे राज्य. दरवर्षी रावणाला जाळतात, तरी देखील मरतही नाही. १२ महिन्या नंतर पुन्हा रावणाला जाळतील. जणू सिद्ध करून दाखवतात कि आम्ही रावण संप्रदायाचे आहोत. रावण अर्थात ५ विकारांचे राज्य अजून कायम आहे. सतयुगामध्ये सर्व श्रेष्ठाचारी होते, आता कलियुग जुनी भ्रष्टाचारी दुनिया आहे, हे चक्र फिरत राहते. आता तुम्ही प्रजापिता ब्रह्मावंशी संगमयुगावर बसले आहात. तुमच्या बुद्धीमध्ये आहे की, आम्ही ब्राह्मण आहोत. आता शूद्र कुळातले नाही आहोत. यावेळी आहेच आसुरी राज्य. बाबांना म्हणतात - ‘हे दुःखहर्ता, सुखकर्ता’. आता सुख कुठे आहे? सतयुगामध्ये. दुःख कुठे आहे? दुःख तर कलियुगामध्ये आहे. दुःख हर्ता, सुख कर्ता आहेतच शिवबाबा. ते वारसा देतातच सुखाचा. सतयुगाला सुखधाम म्हटले जाते, तिथे दुःखाचे नाव देखील नाही. तुमचे आयुर्मान देखील मोठे असते, रडण्याची गरजच नाही. वेळेवर जुने शरीर सोडून दुसरे घेतात. समजतात आता शरीर वृद्ध झाले आहे. आधी मूल सतोगुणी असते त्यामुळे मुलांना ब्रह्मज्ञानीपेक्षा देखील श्रेष्ठ समजतात. कारण ते संन्यासी तरी देखील विकारी घरातून संन्यासी बनतात, तर त्यांना सर्व विकाराविषयी माहिती आहे. लहान मुलांना हे माहीतच नसते. या वेळी साऱ्या दुनियेमध्ये रावण राज्य, भ्रष्टाचारी राज्य आहे. श्रेष्ठाचारी देवी-देवतांचे राज्य सतयुगामध्ये होते, आता नाहीये. मग इतिहासाची पुनरावृत्ती होईल. श्रेष्ठाचारी कोण बनवणार? इथे तर एकही श्रेष्ठाचारी नाहीये. यासाठी तल्लख बुद्धी पाहिजे. हे आहेच पारस-बुद्धी बनण्याचे युग. बाबा येऊन पत्थर-बुद्धी पासून पारस-बुद्धी बनवतात.

म्हटले जाते - ‘संग तारे कुसंग बोरे’. सत् बाबांव्यतिरिक्त दुनियेमध्ये बाकी सर्व आहेच कुसंग (वाईट संगत). बाबा म्हणतात - ‘मी संपूर्ण निर्विकारी बनवून जातो’. मग संपूर्ण विकारी कोण बनवतो? म्हणतात - आम्हाला काय माहिती! अरे, निर्विकारी कोण बनवतात? नक्की बाबाच बनवतील. विकारी कोण बनवतात? हे कोणालाच माहीत नाहीये. बाबा बसून समजावून सांगतात, मनुष्य तर काहीही जाणत नाहीत. रावण राज्य आहे ना. कोणाच्या पित्याचा मृत्यू झाला आणि जर त्याला विचारले कुठे गेले? तर म्हणेल स्वर्गवासी झाले. अच्छा, तर याचा अर्थ नरकात होते ना. तर तुम्ही सुद्धा नरकवासी झालात ना. समजावून सांगण्यासाठी किती सोपी गोष्ट आहे. स्वतःला कोणीही नरकवासी समजत नाहीत. नरकाला वेश्यालय, स्वर्गाला शिवालय म्हटले जाते. आजपासून ५ हजार वर्षांपूर्वी या देवी-देवतांचे राज्य होते. तुम्ही विश्वाचे मालक महाराजा-महाराणी होता, मग पुनर्जन्म घ्यावे लागतात. सर्वात जास्त पुनर्जन्म तुम्ही घेतले आहेत. यांच्यासाठीच गायन आहे - ‘आत्मायें परमात्मा अलग रहे बहुकाल’. तुम्हाला आठवते तुम्ही पहिल्यांदा आदि सनातन देवी-देवता धर्मवालेच आलात नंतर मग ८४ जन्म घेऊन पतित बनले आहात, आता पुन्हा पावन बनायचे आहे. बोलावतात ना - ‘पतित-पावन या’, म्हणजेच जणू सर्टीफिकेट देतात की एकच सुप्रीम सद्गुरु येऊन पावन बनवतात. स्वतः सांगतात - यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांच्या तनामध्ये) बसून मी तुम्हाला पावन बनवतो. बाकी ८४ लाख योनी इत्यादी काही नाही आहेत. ८४ जन्म आहेत. या लक्ष्मी-नारायणाची प्रजा सतयुगामध्ये होती, आता नाहिये, कुठे गेली? त्यांना देखील ८४ जन्म घ्यावे लागतील. जे सर्वात पहिले येतात तेच पूर्ण ८४ जन्म घेतात. तर मग पहिले त्यांना गेले पाहिजे. देवी-देवतांच्या विश्वाचा इतिहास-भूगोल रिपीट होतो. सूर्यवंशी-चंद्रवंशी राज्य पुन्हा रिपीट झाले पाहिजे. बाबा तुम्हाला लायक बनवत आहेत. तुम्ही म्हणता आम्ही आलो आहोत या पाठशाळेमध्ये किंवा विश्वविद्यालयामध्ये, जिथे आम्ही नरा पासून नारायण बनतो. आमचे एम ऑब्जेक्ट हे आहे. जे चांगल्या प्रकारे पुरुषार्थ करतील तेच उत्तीर्ण होतील. जे पुरुषार्थ करत नाहीत ते प्रजेमध्ये जातील त्यापैकी कोणी मग खूप श्रीमंत बनतात, कोणी कमी श्रीमंत बनतात. हि राजधानी तयार होत आहे. तुम्ही जाणता आपण श्रीमतावर श्रेष्ठ बनत आहोत. श्री श्री शिवबाबांच्या मतावर श्री लक्ष्मी-नारायण किंवा देवी-देवता बनतात. श्री अर्थात श्रेष्ठ. आता कोणालाही ‘श्री’ म्हणू शकत नाही. परंतु इथे (या दुनियेमध्ये) तर जो येतो त्याला श्री म्हणतात. श्री अमका.... आता श्रेष्ठ तर देवी-देवतांव्यतिरिक्त कोणीही बनू शकत नाही. भारत श्रेष्ठ ते श्रेष्ठ होता. रावण राज्यामध्ये भारताची महिमाच नाहीशी करून टाकली आहे. भारताची महिमा देखील भरपूर आहे तर निंदा देखील खूप आहे. भारत अतिशय श्रीमंत होता, आता अगदीच गरीब बनला आहे. देवतां समोर जाऊन त्यांची महिमा गातात - ‘हम निर्गुण हारे में कोई गुण नाही’. देवतांना म्हणतात, परंतु ते दयाळू थोडेच होते. दयाळू तर एकालाच म्हटले जाते जे मनुष्या पासून देवता बनवतात. आता ते तुमचे बाबा देखील आहेत, टीचर देखील आहेत, सद्गुरु देखील आहेत. गॅरेंटी देतात की, माझी आठवण केल्याने तुमची जन्म-जन्मांतरीची पापे भस्म होतील आणि सोबत घेऊन जाईन. मग तुम्हाला नवीन दुनियेमध्ये जायचे आहे. हे ५ हजार वर्षांचे चक्र आहे. नवी दुनिया होती ती पुन्हा जरूर बनणार. दुनिया पतित होणार मग बाबा येऊन पावन बनवतील. बाबा म्हणतात - ‘पतित, रावण बनवतो; पावन, मी बनवतो’. बाकी हि तर जशी बाहुल्यांची पूजा करत राहतात. त्यांना हे माहीतच नाही आहे की, रावणाला १० डोकी का दाखवतात? विष्णूला ४ भूजा दाखवतात. परंतु असा कोणी मनुष्य थोडाच कधी असतो? जर ४ भूजावाला मनुष्य असेल तर त्याच्या पासून जन्मलेले मूल सुद्धा तसेच झाले पाहिजे. इथे तर सर्वांना २ भूजा आहेत. काहीही समजत नाहीत. भक्तीमार्गातील शास्त्रे तोंडपाठ करतात, त्यांचे देखील किती शिष्य बनतात. कमाल आहे! हे बाबा तर ज्ञानाचे ऑथॉरिटी (अधिकारी) आहेत. कोणताही मनुष्य ज्ञानाचा ऑथॉरिटी असू शकत नाही. ज्ञानाचा सागर तुम्ही मला म्हणता - ‘ऑलमाइटी ऑथॉरिटी…’ ही बाबांची महिमा आहे. तुम्ही बाबांची आठवण करता तर बाबांकडून शक्ती घेता, ज्याद्वारे विश्वाचे मालक बनता. तुम्ही समजता आपल्यामध्ये खूप शक्ती होती, आपण निर्विकारी होतो, साऱ्या विश्वावर एकटे राज्य करत होतो, तर ‘ऑलमाइटी (सर्वशक्तीमान) म्हणणार ना. हे लक्ष्मी-नारायण साऱ्या विश्वाचे मालक होते. ही शक्ती त्यांना कुठून मिळाली? बाबांकडून. उच्च ते उच्च भगवान आहेत ना. किती सहजतेने समजावून सांगतात. या ८४ च्या चक्राला समजून घेणे तर सोपे आहे ना. ज्यामुळे तुम्हाला बादशाही मिळते. पतिताला विश्वाची बादशाही मिळू शकत नाही. पतित तर त्यांच्या समोर नतमस्तक होतात. समजतात आम्ही भक्त आहोत. पावन असणाऱ्या समोर डोके टेकतात. भक्ती मार्गसुद्धा अर्धाकल्प चालतो. आता तुम्हाला परमेश्वर भेटला आहे. भगवानुवाच - मी तुम्हाला राजयोग शिकवतो, भक्तीचे फळ देण्यासाठी आलो आहे. गातात देखील - भगवान कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येतील. बाबा म्हणतात - मी काही बैलगाडी इत्यादी मधून थोडाच येईन. जो उच्च ते उच्च होता मग ८४ जन्म पूर्ण केले आहेत, त्यांच्या तनामध्येच येतो. उत्तम पुरुष असतात सतयुगामध्ये. कलियुगामध्ये आहेत कनिष्ठ, तमोप्रधान. आता तुम्ही तमोप्रधाना पासून सतोप्रधान बनता. बाबा येऊन तमोप्रधाना पासून सतोप्रधान बनवतात. हा खेळ आहे. याला जर समजून घेतले नाहीत तर स्वर्गामध्ये कधीही येणार नाही. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) एका बाबांच्या संगतीमध्ये राहून स्वतःला पारसबुद्धी बनवायचे आहे. संपूर्ण निर्विकारी बनायचे आहे. वाईट संगती पासून दूर रहायचे आहे.

२) सदैव याच आनंदामध्ये रहायचे आहे की आम्ही स्वदर्शनचक्रधारी सो नव्या दुनियेचे मालक चक्रवर्ती बनत आहोत. शिवबाबा आले आहेत आम्हाला ‘ज्ञान सूर्यवंशी’ बनविण्यासाठी. आमचे लक्ष्यच हे आहे.

वरदान:-
विघ्नांना मनोरंजनाचा खेळ समजून पार करणारे निर्विघ्न, विजयी भव

विघ्न येणे हि चांगली गोष्ट आहे परंतु विघ्नाने तुम्हाला पराभूत करू नये. विघ्न येतातच खंबीर बनविण्यासाठी, त्यामुळे विघ्नांना घाबरण्यापेक्षा त्यांना मनोरंजनाचा खेळ समजून पार करा, तेव्हाच म्हणणार - ‘निर्विघ्न विजयी’. जर सर्वशक्तीमान बाबांची सोबत आहे तर घाबरण्याचे काहीच कारण नाही. फक्त बाबांची आठवण आणि सेवेमध्ये बिझी रहा तर माया किंवा विघ्न दूर जातील.

बोधवाक्य:-
सुखाच्या खात्याला वाढविण्यासाठी मर्यादा पूर्वक हृदयापासून सर्वांना सुख द्या.