05-04-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबांची प्रेमाने आठवण करा तर तुम्ही निहाल व्हाल (भरपूर व्हाल). नजरेने निहाल होणे अर्थात विश्वाचा मालक बनणे”

प्रश्न:-
‘नज़र से निहाल कींदा स्वामी सतगुरू…’ याचा खरा अर्थ काय आहे?

उत्तर:-
आत्म्याला बाबांद्वारे जेव्हा तिसरा नेत्र मिळतो आणि त्या नेत्राद्वारे आत्मा बाबांना ओळखते तेव्हा निहाल (भरपूर) होते अर्थात सद्गती मिळते. बाबा म्हणतात - मुलांनो, देही-अभिमानी बनून तुम्ही माझ्याकडे दृष्टी लावा अर्थात माझी आठवण करा, बाकी सर्व संग तोडून माझ्या एकाशी संग जोडा तर निराधार अर्थात गरिबापासून भरपूर अर्थात धनवान बनाल.

ओम शांती।
गोड-गोड रुहानी मुले कोणाकडे येतात? रुहानी बाबांकडे. तुम्ही समजता की, आम्ही शिवबाबांकडे जातो. हे देखील जाणतो शिवबाबा सर्व आत्म्यांचे पिता आहेत. हा देखील मुलांना निश्चय पाहिजे की ते सुप्रीम टीचर देखील आहेत तर सुप्रीम गुरू सुद्धा आहेत. ‘सुप्रीम’ला परम म्हटले जाते. त्या एकाचीच आठवण करायची आहे. दृष्टीला दृष्टी भेट करतात. गायन आहे - ‘नज़र से निहाल कींदा स्वामी सतगुरू’. त्याचा अर्थ पाहिजे. दृष्टीने निहाल कोणाला केले? जरूर साऱ्या दुनियेसाठी म्हणणार कारण तेच सर्वांचे सद्गती दाता आहेत. सर्वांना या पतित दुनियेमधून घेऊन जाणार आहेत. आता दृष्टी कोणाची? हे स्थूल नेत्र काय? नाही, ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळतो. ज्याद्वारे आत्मा जाणते कि हे आम्हा सर्व आत्म्यांचे पिता आहेत. बाबा आत्म्यांना सल्ला देतात की, माझी आठवण करा. बाबा आत्म्यांना समजावून सांगतात. आत्मेच पतित तमोप्रधान बनले आहेत. आता हा तुमचा ८४ वा जन्म आहे, हे नाटक पूर्ण होते. नक्कीच पूर्ण देखील व्हायला पाहिजे. प्रत्येक कल्पात जुन्या दुनिये पासून नवीन दुनिया बनते. नवीन दुनिया मग पुन्हा जुनी बनते. नाव देखील वेगळे आहे. नव्या दुनियेचे नाव आहे - ‘सतयुग’. बाबांनी समजावून सांगितले आहे - आधी तुम्ही सतयुगामध्ये होता, मग पुनर्जन्म घेत ८४ जन्म व्यतीत केले. आता तुमची आत्मा तमोप्रधान बनली आहे. बाबांची आठवण कराल तर निहाल (भरपूर) व्हाल. बाबा सन्मुख सांगत आहेत - ‘माझी आठवण करा’; मी कोण? परमपिता परमात्मा. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, देही-अभिमानी बना, देह-अभिमानी बनू नका. आत्म-अभिमानी बनून तुम्ही माझ्यावर दृष्टी केंद्रित करा तर तुम्ही निहाल व्हाल. बाबांची आठवण करत रहा, यामध्ये काहीच त्रास नाही. आत्माच शिकते, पार्ट बजावते. आत्मा किती छोटी आहे. जेव्हा आपण आत्मे इथे येतो तेव्हा ८४ जन्मांचा पार्ट बजावतो. मग तोच पार्ट रिपीट करायचा आहे. ८४ जन्मांचा पार्ट बजावत असताना आत्मा पतित बनली आहे. आता आत्म्यामध्ये काहीच शक्ती राहिलेली नाहीये. आता आत्मा निहाल (भरपूर) नाहीये त्यामुळे निराधार अर्थात गरीब आहे. मग आता निहाल (भरपूर) कशी बनेल? हे शब्द भक्तीमार्गाचे आहेत, ज्याविषयी बाबा समजावून सांगतात. वेद, शास्त्र, चित्रे इत्यादींवर देखील समजावून सांगतात. तुम्ही ही चित्रे श्रीमतानुसार बनविली आहेत. आसुरी मतानुसार तर अनेक भरपूर चित्रे बनवली आहेत. त्यांचे काही जीवन-चरित्र नाहीये. इथे तर बाबा येऊन मुलांना शिकवतात. भगवानुवाच आहे तर त्याचे ज्ञान झाले. स्टुडंट जाणतात हा अमका टीचर आहे. इथे तुम्ही मुले जाणता की, बेहदचे बाबा एकदाच येऊन असा अप्रतिम अभ्यास शिकवतात. या शिक्षणामध्ये आणि त्या शिक्षणामध्ये रात्रं-दिवसाचा फरक आहे. ते शिक्षण शिकता-शिकता अंधकार होतो, या शिक्षणाने दिवस (प्रकाशामध्ये) येता. ते शिक्षण तर जन्म-जन्मांतर शिकत आले आहात. यामध्ये तर बाबा स्पष्टपणे सांगतात की, आत्मा जेव्हा पवित्र होईल तेव्हा धारणा होईल. असे म्हणतात - सिंहीणीचे दूध सोन्याच्या भांड्यातच टिकते. तुम्ही मुले समजता, आपण आता सोन्याचे भांडे बनत आहोत. असणार तर मनुष्यच, परंतु आत्म्याला संपूर्ण पवित्र बनायचे आहे. आत्मा २४ कॅरेट होती, आता ९ कॅरेट झाली आहे. आत्म्याची ज्योत जी जागृत झालेली होती ती आता विझली आहे. ज्योती जागृत असलेल्यांमध्ये आणि विझलेल्यांमध्ये खूप फरक आहे. ज्योत कशी जागृत झाली आणि पद कसे मिळाले - हे बाबाच समजावून सांगतात. बाबा म्हणतात - माझी आठवण करा. जे माझी चांगल्या प्रकारे आठवण करतील मी देखील त्यांची चांगल्या प्रकारे आठवण करेन. मुले हे देखील जाणतात नजरेने निहाल करणारे एक बाबाच स्वामी आहेत. यांची (ब्रह्मा बाबांची) आत्मा देखील निहाल होते. तुम्ही सर्व परवाने (पतंग) आहात, त्यांना शमा (ज्योत) म्हणतात. काही परवाने फक्त चक्कर मारायला येतात. कोणी चांगल्या प्रकारे ओळखतात तर मग ते जिवंतपणी मरून जातात. कोणी चक्कर मारून निघून जातात आणि मग कधी-कधी येतात, पुन्हा निघून जातात. या संगमाचेच सर्व गायन आहे. या वेळी जे काही घडते त्यांचीच हि शास्त्रे बनतात. बाबा एकदाच येऊन वारसा देऊन निघून जातात. बेहदचे बाबा नक्की बेहदचा वारसा देतील. गायन देखील आहे - २१ पिढ्या. सतयुगामध्ये वारसा कोण देतात? भगवान रचयिताच अर्ध्या कल्पासाठी रचनेला वारसा देतात. सर्वजण आठवण देखील त्यांचीच करतात. ते पिता आहेत तर शिक्षक देखील आहेत, स्वामी, सद्गुरू देखील आहेत. भले तुम्ही इतर कोणालाही स्वामी, सद्गुरू म्हणत असाल. परंतु सत् एक बाबाच आहेत. ट्रुथ नेहमी बाबांनाच म्हटले जाते. ते येऊन काय ट्रुथ करतात? त्याच जुन्या दुनियेला सचखंड बनवतात. सचखंडासाठी आम्ही पुरुषार्थ करत आहोत. जेव्हा सचखंड होता तेव्हा इतर सर्व खंड नव्हते. हे सर्व नंतर येतात. सचखंडाबद्दल कोणालाही माहितीच नाहीये. बाकी जे आता खंड आहेत त्याबद्दल तर सर्वांना माहिती आहे. आपापल्या धर्मस्थापकाला जाणतात. बाकी सूर्यवंशी, चंद्रवंशी आणि या संगमयुगी ब्राह्मण कुळाला कोणीही जाणत नाही. प्रजापिता ब्रह्माला मानतात, म्हणतात - ‘आम्ही ब्राह्मण ब्रह्माची संतान आहोत’; परंतु ते आहेत कुख-वंशावली, तुम्ही आहात मुख-वंशावली. ते आहेत अपवित्र, तुम्ही मुखवंशावली आहात पवित्र. तुम्ही मुख-वंशावली बनून मग घाणेरडी दुनिया रावण राज्यातून निघून जाता. तिथे (सतयुगमध्ये) रावण राज्य असत नाही. आता तुम्ही जाता नवीन दुनियेमध्ये. त्याला म्हणतात निर्विकारी दुनिया. दुनियाच नवीन आणि जुनी होते. कशी होते हे देखील तुम्हाला समजले आहे. हे तर दुसऱ्या कोणाच्याही बुद्धीमध्ये नाहीये. लाखों वर्षांच्या गोष्टीला कोणी समजू देखील शकणार नाही. ही तर थोड्या काळाची गोष्ट आहे. हे बाबा बसून मुलांना समजावून सांगतात.

बाबा म्हणतात - ‘मी येतोच तेव्हा जेव्हा खास भारतामध्ये धर्म ग्लानि होते. बाकी इतर ठिकाणी तर कोणाला पत्ताच नाहीये की निराकार परमात्मा काय चीज आहे. भलेमोठे लिंग बनवून ठेवले आहे. मुलांना समजावून सांगितले आहे - आत्म्याचा आकार कधी लहान-मोठा नसतो. जशी आत्मा अविनाशी आहे, तसे बाबा देखील अविनाशी आहेत. ते आहेत सुप्रीम आत्मा. सुप्रीम अर्थात ते सदैव पवित्र आणि निर्विकारी आहेत. तुम्ही आत्मे देखील निर्विकारी होता, दुनिया सुद्धा निर्विकारी होती. त्यांना म्हटलेच जाते संपूर्ण निर्विकारी, नवी दुनिया मग नक्कीच जुनी होते. कला कमी होत जातात. चंद्रवंशी राज्य होते तेव्हा दोन कला कमी होत्या नंतर मग दुनिया जुनी होत जाते. मागाहून आणखी दुसरे खंड येत जातात. त्याला म्हटले जाते बायप्लॉट, परंतु मग मिक्स होतात. ड्रामा प्लॅन अनुसार जे काही होते ते पुन्हा रिपीट होणार. जसे बुद्धांचा कोणी मोठा आला, किती जणांना बौद्ध धर्मामध्ये घेऊन गेला. त्यांना धर्म बदलायला लावला. हिंदूंनी आपला धर्म आपणच बदलला आहे कारण कर्मभ्रष्ट झाल्यामुळे धर्मभ्रष्ट सुद्धा झाले आहेत. वाम मार्गाला लागले आहेत. जगन्नाथच्या मंदिरातही भले गेले देखील असतील, परंतु कोणाचा काही तसा विचार चालत नाही. स्वतः विकारी आहेत त्यामुळे त्यांना सुद्धा विकारी दाखवले आहे. हे समजत नाहीत की देवता जेव्हा वाईट मार्गाला गेले तेव्हा असे बनले आहेत. त्यावेळचीच ही चित्रे आहेत. ‘देवता’ नाव तर खूप छान आहे. ‘हिंदू’ नाव तर हिंदुस्तानचे नाव आहे. मग स्वतःला हिंदू म्हटले आहे. केवढी मोठी चूक आहे, म्हणून बाबा म्हणतात - ‘यदा यदाहि धर्मस्य…’ बाबा भारतात येतात. असे तर म्हणत नाहीत - ‘मी हिंदुस्तानामध्ये येतो’. हा आहे भारत, हिंदुस्थान किंवा हिंदू धर्मच नाहिये. मुस्लिम लोकांनी हिंदुस्तान नाव ठेवले आहे. हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. चांगल्या प्रकारे समजून घेतले पाहिजे. हे देखील ज्ञान आहे. पुनर्जन्म घेता-घेता वाईट मार्गाला लागता-लागता भ्रष्टाचारी बनतात, मग त्यांच्या समोर जाऊन म्हणतात - ‘तुम्ही संपूर्ण निर्विकारी आहात. आम्ही विकारी पापी आहोत’. इतर कोणत्या खंडातील असे म्हणणार नाहीत की, आम्ही नीच आहोत किंवा आमच्यामध्ये कोणतेही गुण नाहीत. असे म्हणताना कधी ऐकले पण नसेल. शीख लोक सुद्धा ग्रंथा समोर बसतात परंतु असे कधीच म्हणत नाहीत की, ‘नानकजी, तुम्ही निर्विकारी, आम्ही विकारी’. नानक पंथवाले हातामध्ये कडे घालतात, ती आहे निर्विकारीपणाची खूण. परंतु विकारा शिवाय राहू शकत नाहीत. खोट्या खुणा ठेवल्या आहेत. जसे हिंदू लोक जानवे घालतात, ती पवित्रतेची खूण आहे. आजकाल तर धर्माला सुद्धा मानत नाहीत. यावेळी भक्ती मार्ग चालू आहे. याला म्हटले जाते भक्ती कल्ट (भक्ती पंथ). ज्ञान कल्ट सतयुगामध्ये आहे. सतयुगामध्ये देवता आहेत संपूर्ण निर्विकारी. कलियुगामध्ये संपूर्ण निर्विकारी कोणी असू शकत नाही. प्रवृत्ती मार्गवाल्यांची स्थापना तर बाबाच करतात. इतर सर्व गुरू आहेत निवृत्ती मार्गवाले, त्यांच्यापेक्षा यांचा प्रभाव जास्त झाला आहे. बाबा म्हणतात हे जे काही तुम्ही शिकले आहात, त्याद्वारे मी भेटत नाही. मी जेव्हा येतो तेव्हा सर्वांना नजरेने निहाल करतो. गायन देखील आहे - ‘नज़र से निहाल कींदा स्वामी सतगुरू…’ इथे तुम्ही कशासाठी आला आहात? निहाल होण्यासाठी. विश्वाचा मालक बनण्यासाठी. बाबांची आठवण करा तर निहाल (भरपूर) व्हाल. असे कधी कोणी म्हणणार नाही की, ‘असे केल्याने तुम्ही हे बनाल’. हे बाबाच म्हणतात - ‘तुम्हाला हे बनायचे आहे’. हे लक्ष्मी-नारायण कसे बनले? कोणालाच माहीत नाही. तुम्हा मुलांना बाबा सर्वकाही सांगतात, असे ८४ जन्म घेऊन पतित बनलात आता पुन्हा तुम्हाला असे बनविण्यासाठी आलो आहे.

बाबा आपला स्वतःचा परिचय सुद्धा देतात तर नजरेने निहाल सुद्धा करतात. हे कोणासाठी म्हणतात? एका सद्गुरुसाठी. ते गुरू तर पुष्कळ आहेत आणि माता, अबला आहेत भोळ्या-भाबड्या. तुम्ही सर्वजण भोलेनाथची संतान आहात. शंकरासाठी म्हणतात - नेत्र उघडला आणि विनाश झाला. हे देखील पाप झाले. बाबा कधीच अशा कामासाठी डायरेक्शन देत नाहीत. विनाश तर अन्य गोष्टींमुळे होणार ना. बाबा कधी अशी आज्ञा देत नाहीत. हे तर सर्व वैज्ञानिक बनवत राहतात, समजतात - आमच्याच कुळाचा नाश आम्हीच करतो. ते देखील बांधलेले आहेत. सोडू शकत नाहीत. नाव किती होते. चंद्रावर जातात परंतु फायदा काहीच नाही.

गोड-गोड मुलांनो, तुम्ही देखील बाबांकडे दृष्टी लावा किंवा हे आत्मा, आपल्या बाबांची आठवण करा तर निहाल व्हाल. बाबा म्हणतात - जे माझी आठवण करतात, माझ्यासाठी सेवा करतात, मी सुद्धा त्यांची आठवण करतो तर त्यांना शक्ती मिळते. तुम्ही इथे सर्वजण बसले आहात, परंतु जे निहाल होतील तेच राजा बनतील. गायन देखील आहे - ‘और संग तोड़ एक संग जोडूँ’. एक आहे निराकार. आत्मा देखील निराकार आहे. बाबा म्हणतात - ‘माझी आठवण करा’. तुम्ही स्वतःच म्हणता - ‘हे पतित-पावन…’. हे कोणाला म्हटले? ब्रह्माला, विष्णूला कि शंकराला? नाही. पतित-पावन तर एक आहेत, ते सदैव पावनच आहेत. त्यांना म्हटले जाते सर्वशक्तीमान. बाबाच सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान ऐकवतात, इतर सर्व शास्त्रांना जाणतात. ते संन्यासी शास्त्र इत्यादी वाचून टायटल (उपाधी) घेतात. बाबांना तर आधीच उपाधी मिळालेली आहे. त्यांना थोडेच वाचून शिकवायचे आहे? अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) शमेवर जिवंतपणी मरणारा परवाना बनायचे आहे, फक्त फेरी मारून जाणारा नाही. ईश्वरीय ज्ञानाला धारण करण्यासाठी बुद्धीला संपूर्ण पावन बनवायचे आहे.

२) बाकी सर्वांची संगत तोडून एका बाबांच्या संगतीत रहायचे आहे. एकाच्या आठवणी द्वारे स्वतःला निहाल (भरपूर) करायचे आहे.

वरदान:-
हृदयातील महसूसतेद्वारे दिलारामचे आशिर्वाद प्राप्त करणारे स्व-परिवर्तक भव

स्वतःचे परिवर्तन करण्यासाठी सच्च्या हृदयामध्ये दोन गोष्टींची महसूसता (जाणीव) पाहिजे. १) आपल्या कमतरतेची जाणीव २) जी परिस्थिती किंवा व्यक्ती निमित्त बनते त्यांची इच्छा आणि त्यांच्या मनातील भावनांची जाणीव. परिस्थिती रुपी पेपरचे कारण जाणून घेऊन स्वतःला पास करण्यासाठी श्रेष्ठ स्वरूपाची जाणीव पाहिजे की, स्वस्थिती श्रेष्ठ आहे, परिस्थिती हा पेपर आहे - ही जाणीव सहज परिवर्तन करवेल आणि खऱ्या अंतःकरणा पासून हि जाणीव झाली तर दिलाराम बाबांचा आशिर्वाद प्राप्त होईल.

बोधवाक्य:-
वारसदार तो आहे जो एव्हररेडी बनून प्रत्येक कार्यामध्ये जी हजूर हाजिर’ म्हणतो.