06-04-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - श्रीमतानुसार चांगली सेवा करणाऱ्यांनाच राजाईचे बक्षीस मिळते, तुम्ही मुले आता बाबांची मदतगार बनले आहात त्यामुळे तुम्हाला खूप मोठे बक्षीस मिळते”

प्रश्न:-
बाबांचा ज्ञान डान्स कोणत्या मुलांसमोर खूप चांगला होतो?

उत्तर:-
ज्यांना ज्ञानाची आवड आहे, ज्यांना योगाचा नशा आहे, त्यांच्यासमोर बाबांचा ज्ञान डान्स खूप चांगला होतो. नंबरवार स्टूडंट आहेत. परंतु हे वंडरफुल स्कूल आहे. काहींमध्ये तर जरासुद्धा ज्ञान नाही आहे, फक्त भावना बसली आहे, त्या भावनेच्या आधारावर सुद्धा वारशाचे अधिकारी बनतात.

ओम शांती।
रूहानी मुलांना रुहानी बाबा समजावून सांगत आहेत, याला म्हटले जाते रूहानी ज्ञान अथवा स्पिरिच्युअल नॉलेज (अध्यात्मिक ज्ञान). अध्यात्मिक ज्ञान फक्त एका बाबांमध्येच असते इतर कोणत्याही मनुष्य मात्राकडे हे रुहानी नॉलेज असत नाही. रुहानी नॉलेज देणारे एकच आहेत, ज्यांना ज्ञानाचा सागर म्हटले जाते. प्रत्येक व्यक्तीमध्ये आपल्या स्वतःच्या गुण-विशेषता असतात ना. बॅरिस्टर, बॅरिस्टर आहे. डॉक्टर, डॉक्टर आहे. प्रत्येकाची ड्युटी, पार्ट वेगवेगळा आहे. प्रत्येक आत्म्याला आपला-आपला पार्ट मिळालेला आहे आणि तो अविनाशी पार्ट आहे. आत्मा किती छोटी आहे. वंडर आहे ना. गातात देखील - ‘चमकता है भ्रकुटी के बीच…’ हे देखील गायले जाते की, निराकार आत्म्याचे हे शरीर तख्त आहे. आहे अतिशय छोटासा बिंदू. आणि सर्व आत्मे ॲक्टर्स आहेत. एका जन्माचे फिचर्स दुसऱ्या जन्माशी मेळ खाऊ शकत नाही, एका जन्माचा पार्ट दुसऱ्या जन्माशी मेळ खाऊ शकत नाही. कोणालाच माहित नाही आहे की, आपण मागच्या जन्मात कोण होतो आणि भविष्य जन्मामध्ये कोण असणार. हे बाबाच संगमावर येऊन समजावून सांगतात. पहाटे तुम्ही मुले आठवणीच्या यात्रेमध्ये बसता तेव्हा आत्म्याची विझलेली ज्योत प्रज्वलित होत राहते कारण आत्म्यावर खूप गंज चढला आहे. बाबा सोनाराचे देखील काम करतात. पतित आत्मे, ज्यांच्यामध्ये खाद (विकार रूपी कचरा) पडतो, त्यांना पवित्र बनवतात. कचरा तर पडतोच ना. चांदी, तांबे, लोह इत्यादी नावे सुद्धा अशी आहेत. गोल्डन एज, सिल्व्हर एज… सतोप्रधान, सतो, रजो, तमो… या गोष्टी इतर कोणताही मनुष्य किंवा गुरू हे समजावून सांगणार नाहीत. एक सद्गुरुच समजावून सांगतील. सद्गुरूचे अकाल तख्त म्हणतात ना. त्या सद्गुरुला देखील तख्त पाहिजे ना. जसे तुम्हा आत्म्यांना आपले-आपले तख्त आहे, त्यांना देखील तख्त घ्यावे लागते. बाबा म्हणतात - मी कोणते तख्त घेतो हे दुनियेतील कोणालाच माहिती नाही. ते तर नेती-नेती म्हणत आले आहेत; आम्ही जाणत नाही. तुम्ही मुले देखील समजता कि अगोदर आपण काहीच जाणत नव्हतो. जे काहीच समजत नाही त्यांना अज्ञानी म्हटले जाते. भारतवासी समजतात आपण खूप हुशार होतो. विश्वाचे राज्य-भाग्य आमचे होते. आता ते बेसमज झाले आहेत. बाबा म्हणतात - तुम्ही शास्त्र इत्यादी भले वाचलेली आहेत, आता ते सर्व विसरून जा. फक्त एका बाबांची आठवण करा. गृहस्थ व्यवहारातही भले रहा. संन्याशांचे अनुयायी सुद्धा आपल्या-आपल्या घरात राहतात. काही जे सच्चे अनुयायी असतात ते त्यांच्या सोबत राहतात. बाकी कोणी कुठे, कोणी कुठे राहतात. ही गोष्ट बाबा बसून समजावून सांगतात. याला म्हटले जाते ज्ञानाचा डान्स. योग तर आहे शांतीवाला. ज्ञानाचा होतो डान्स. योगामध्ये एकदम शांत रहायचे असते. डेड सायलेन्स (निरव शांतता) म्हणतात ना. तीन मिनिटे डेड सायलेन्स. परंतु त्याचा देखील अर्थ कुणाला माहित नाही. संन्यासी शांतीसाठी जंगलात जातात परंतु तिथे थोडीच शांती मिळू शकणार. एक कहाणी देखील आहे - ‘रानी का हार गले मे…’ हे उदाहरण आहे शांती करीता. बाबा या वेळी ज्या गोष्टी समजावून सांगतात ते दृष्टांत रूपाने मग भक्तिमार्गामध्ये चालत येतात. बाबा या वेळी जुन्या दुनियेला बदलून नवीन बनवतात. तमोप्रधाना पासून सतोप्राधान बनवतात. हे तर तुम्ही समजू शकता. बाकी ही दुनियाच तमोप्रधान पतित आहे कारण सर्व विकारातून जन्म घेतात. देवता काही विकारातून जन्म घेत नाहीत. त्याला म्हटले जाते संपूर्ण निर्विकारी दुनिया. व्हाईसलेस वर्ल्ड असे म्हणतात देखील परंतु त्याचा अर्थ समजत नाहीत. तुम्ही पूज्य पासून पुजारी बनले आहात. बाबांसाठी कधी असे म्हटले जात नाही. बाबा कधी पुजारी बनत नाहीत. मनुष्य तर कणा-कणामध्ये परमात्मा आहे असे म्हणतात. म्हणून बाबा म्हणतात - ‘भारतामध्ये जेव्हा-जेव्हा धर्म ग्लानी होते…’. ती लोकं तर फक्त असाच श्लोक वाचतात, अर्थ मात्र काहीच जाणत नाहीत. ते समजतात फक्त शरीरच पतित बनते, आत्मा बनत नाही.

बाबा म्हणतात - पहिली आत्मा पतित बनली आहे तेव्हाच शरीर सुद्धा पतित बनले आहे. सोन्यामध्येच भेसळ होते तेव्हा मग दागिना देखील तसाच बनतो. परंतु हे सर्व आहे भक्तिमार्गामध्ये. बाबा समजावून सांगत आहेत - प्रत्येकामध्ये आत्मा विराजमान आहे, म्हटले देखील जाते - ‘जीव आत्मा’. ‘जीव परमात्मा’ म्हटले जात नाही. ‘महान-आत्मा’ म्हटले जाते, ‘महान परमात्मा’ म्हटले जात नाही. आत्माच भिन्न-भिन्न शरीर घेऊन पार्ट बजावते. तर योग आहे एकदम सायलेन्स. हा मग आहे ज्ञान डान्स. बाबांचा ज्ञान डान्स देखील त्यांच्या समोर होईल ज्यांना आवड असेल. बाबा जाणतात की, कोणामध्ये किती ज्ञान आहे, किती त्यांच्यामध्ये योगाचा देखील नशा आहे. टीचर तर जाणत असतील ना. बाबा देखील जाणतात की, कोण-कोण चांगली गुणी मुले आहेत. सर्वत्र चांगल्या-चांगल्या मुलांनाच बोलावले जाते. मुलांमध्ये सुद्धा नंबरवार आहेत. प्रजा देखील नंबरवार पुरुषार्था अनुसार बनते. हे स्कूल अथवा पाठशाळा आहे ना. पाठशाळेमध्ये नेहमी क्रमवारीने बसतात. समजू शकते अमका हुशार आहे, हा मध्यम आहे. इथे तर हा बेहदचा क्लास आहे, इथे कुणाला नंबरवार बसवू शकत नाही. बाबा जाणतात - आपल्या समोर हे जे बसले आहेत त्यांच्यामध्ये अजिबात ज्ञान नाही आहे. केवळ भावना आहे. बाकी ना काही ज्ञान आहे, ना आठवण आहे. एवढा निश्चय मात्र आहे की, हे बाबा आहेत, यांच्याकडून आपल्याला वारसा घ्यायचा आहे. वारसा तर सर्वांना मिळणार आहे. परंतु राजाईमध्ये तर नंबरवार पदे आहेत. जे खूप चांगली सेवा करतात त्यांना खूप चांगले प्राईज मिळते. इथे (या दुनियेमध्ये) सर्वांना बक्षीस देत असतात, जे सल्ला देतात, डोकेफोड करतात, त्यांना बक्षिस मिळते. आता तुम्ही जाणता की, विश्वामध्ये खरी शांती कशी होणार? बाबांनी सांगितले आहे कि, ‘त्यांना विचारा तर खरे, की विश्वामध्ये शांती कधी होती? कधी ऐकली किंवा पाहिली आहे का? कोणत्या प्रकारची शांती मागता? कधी होती?’ तुम्ही प्रश्न विचारू शकता कारण तुम्ही जाणता - जो प्रश्न विचारेल आणि स्वतःच जाणत नसेल तर त्याला काय म्हणणार? तुम्ही वृत्तपत्रांद्वारे विचारू शकता की कोणत्या प्रकारची शांती मागत आहात? शांतीधाम तर आहे, जिथे आपण सर्व आत्मे राहतो. बाबा म्हणतात - एक म्हणजे शांतिधामची आठवण करा आणि दुसरे सुखधामची आठवण करा. सृष्टीच्या चक्राचे पूर्ण ज्ञान नसल्याने किती अफवा इत्यादी पसरविल्या आहेत.

तुम्ही मुले जाणता की आपण डबल सिरताज (डबल मुकुटधारी) बनतो. आपण देवता होतो, आता पुन्हा मनुष्य बनलो आहोत. देवतांना ‘देवता’ म्हटले जाते, ‘मनुष्य’ नाही कारण ते दैवी गुणवाले आहेत. ज्यांच्यामध्ये अवगुण आहेत ते म्हणतात - ‘मुझ निर्गुण हारे में कोई गुण नाही’. शास्त्रांमध्ये ज्या गोष्टी ऐकल्या आहेत त्या फक्त गात राहतात - ‘अच्युतम् केशवम्…’ जसे पोपटाला शिकवले जाते. म्हणतात - ‘बाबा, येऊन आम्हा सर्वांना पावन बनवा’. ब्रह्मलोकला खरे तर दुनिया म्हणता येणार नाही. तिथे तुम्ही आत्मे राहता. वास्तविक पार्ट बजावण्याची दुनिया, ही आहे. ते आहे शांतिधाम. बाबा समजावून सांगत आहेत की, मी बसून तुम्हा मुलांना माझा परिचय देतो. मी येतोच त्यांच्या तनामध्ये जे आपल्या जन्मांना जाणत नाहीत. ते (ब्रह्मा बाबा) देखील आत्ताच ऐकतात. मी यांच्यामध्ये प्रवेश करतो. जुनी पतित दुनिया, रावणाची दुनिया आहे. जो पहिल्या नंबरचा पवित्र होता तोच पुन्हा लास्ट नंबरचा पतित बनला आहे. त्यांनाच माझा रथ बनवतो. फर्स्ट तोच लास्टला आला आहे. पुन्हा फर्स्टमध्ये जायचे आहे. चित्रामध्ये सुद्धा समजावून सांगितले आहे - ब्रह्माद्वारा मी आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना करतो. असे तर म्हणत नाहीत की, मी देवी-देवता धर्मामध्ये येतो. ज्या शरीरामध्ये येऊन बसतात तेच मग जाऊन नारायण बनतात. विष्णु काही वेगळा नाहीये. लक्ष्मी-नारायण अथवा राधे-कृष्णाची जोडी म्हणा. विष्णू कोण आहे - हे देखील कोणीही जाणत नाहीत. बाबा म्हणतात, ‘मी तुम्हाला वेद-शास्त्र, सर्व चित्रे इत्यादींचे रहस्य समजावून सांगतो’. मी ज्यांच्यामध्ये प्रवेश करतो ते पुन्हा हे (नारायण) बनतात. प्रवृत्ती मार्ग आहे ना. हे ब्रह्मा, सरस्वती पुन्हा ते (लक्ष्मी-नारायण) बनतात. यांच्यामध्ये (ब्रह्मामध्ये) प्रवेश करून ब्राह्मणांना ज्ञान देतो. तर हे ब्रह्मा सुद्धा ऐकतात. सर्वात पहिले ते ऐकतात. ही आहे मोठी नदी ब्रह्मपुत्रा. मेळा देखील सागर आणि ब्रह्मपुत्रा नदीकाठी लागतो. मोठा मेळावा भरतो, जिथे सागर आणि नदीचा संगम होतो. मी यांच्यामध्ये प्रवेश करतो. हे (ब्रह्मा) मग ते (नारायण) बनतात. यांना तसे (ब्रह्मा सो विष्णु) बनण्यासाठी एक सेकंद लागतो. साक्षात्कार होतो आणि तात्काळ निश्चय होतो - मी हा बनणार आहे. विश्वाचा मालक बनणार आहे. हे गदाईचे (गाढवाचे ओझे वाहणारे) काम कशासाठी करायचे? सर्व सोडून दिले. तुम्हाला देखील पहिले समजले - बाबा आले आहेत, हि दुनिया नष्ट होणार आहे तर ताबडतोब पळालात. बाबांनी पळवून आणले नाही. होय, भट्टी बनणार होती. असे म्हणतात - कृष्णाने पळवून नेले. अच्छा, कृष्णाने पळवून नेले तर पट्टराणी बनवले ना. या ज्ञानाने विश्वाचे महाराज-महाराणी बनता. हे तर चांगलेच आहे. यामध्ये अपशब्द बोलण्याची गरज नाही. आणि पुन्हा म्हणतात - कलंक जेव्हा लागतो तेव्हा कलंगिधर बनतात. कलंक लागतात शिवबाबांवर. किती निंदा करतात. म्हणतात - ‘हम आत्मा सो परमआत्मा, परमात्मा सो हम आत्मा’. आता बाबा समजावून सांगतात - असे काही नाहीये. आपण आत्मे आता सो ब्राह्मण आहोत. ब्राह्मण आहे सर्वात श्रेष्ठ कुळ. याला डिनायस्टी (घराणे) म्हणणार नाही. डिनायस्टी अर्थात् ज्यामध्ये राजाई असते. हे तुमचे कुळ आहे. आहे खूप सोपे, आपण ब्राह्मण सो देवता बनणार आहोत त्यासाठी दैवी गुण धारण करायचे आहेत. सिगारेट, बिडी इत्यादींचा देवतांना भोग लावला जातो का? श्रीनाथद्वारामध्ये भरपूर तुपाची पंचपक्वान्ने बनवतात. भोग इतका लावतात की मग दुकानच लागते. मग यात्रेकरू जाऊन घेतात. लोकांची खूप श्रद्धा असते. सतयुगामध्ये तर अशा गोष्टी असत नाहीत. अशा माशा इत्यादी असणार नाहीत, ज्या कोणत्या वस्तूला खराब करतील. असे आजार इत्यादी तिथे असत नाहीत. श्रीमंत माणसांकडे स्वच्छता देखील खूप असते. तिथे (सतयुगमध्ये) तर अशा गोष्टीच होत नाहीत. रोग इत्यादी असत नाहीत. हे सर्व रोग द्वापर पासून सुरु होतात. बाबा येऊन तुम्हाला एव्हर हेल्दी (सदैव निरोगी) बनवतात. तुम्ही पुरुषार्थ करता बाबांची आठवण करण्याचा, ज्याद्वारे तुम्ही एव्हर हेल्दी बनता. आयुर्मान देखील जास्त असते. कालची गोष्ट आहे. १५० वर्ष आयुर्मान होते ना. आता तर सरासरी वय ४०-४५ वर्षांचे आहे कारण ते योगी होते, हे भोगी आहेत.

तुम्ही राजयोगी आहात, राजऋषि आहात त्यामुळे तुम्ही पवित्र आहात. परंतु हे आहे पुरुषोत्तम संगमयुग. महिना किंवा वर्ष नाही. बाबा म्हणतात - ‘मी कल्प-कल्प पुरुषोत्तम संगम युगे-युगे येतो’. बाबा दररोज समजावून सांगत राहतात. तरी देखील पुन्हा सांगतात - ‘एक गोष्ट कधीही विसरायची नाही - पावन बनायचे असेल तर माझी आठवण करा.’ स्वतःला आत्मा समजा. देहाच्या सर्व धर्मांचा त्याग करा. आता तुम्हाला परत जायचे आहे. मी आलो आहे तुमच्या आत्म्याला साफ करण्यासाठी, ज्याने मग शरीर देखील पवित्र मिळेल. इथे तर विकारातून जन्म होतो. आत्मा जेव्हा संपूर्ण पवित्र बनते तेव्हा तुम्ही जुन्या जुत्तीला (जुन्या शरीराला) सोडता. पुन्हा नवीन मिळणार. तुमचे गायन आहे - वंदे मातरम्. तुम्ही धरतीला पवित्र बनविता. तुम्ही माता स्वर्गाचे दार उघडता. परंतु हे कोणीही जाणत नाही. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आत्मारुपी ज्योती प्रज्वलीत करण्यासाठी पहाटे आठवणीच्या यात्रेमध्ये बसायचे आहे. आठवणीनेच गंज निघेल. आत्म्यामध्ये जी गंज पडली आहे ती आठवणीने काढून खरे सोने बनायचे आहे.

२) बाबांकडून उच्च पदाचे बक्षीस घेण्यासाठी भावने सोबत ज्ञानवान आणि गुणवान सुद्धा बनायचे आहे. सेवा करून दाखवायची आहे.

वरदान:-
वर्तन आणि चेहऱ्याद्वारे पवित्रतेच्या शृंगाराची झलक दाखविणारे शृंगार मूर्त भव

पवित्रता हा ब्राह्मण जीवनाचा शृंगार आहे. सदैव पवित्रतेच्या शृंगाराची अनुभूती चेहऱ्याद्वारे आणि वर्तनाद्वारे इतरांना व्हावी. दृष्टीमध्ये, मुखामध्ये, हातामध्ये, पायामध्ये कायम पवित्रतेचा शृंगार प्रत्यक्ष दिसावा. प्रत्येकाने वर्णन केले पाहिजे की, यांच्या फीचर्स वरून पवित्रता दिसून येते. डोळ्यांमध्ये पवित्रतेची झलक आहे, चेहऱ्यावर पवित्रतेचे हास्य आहे. इतर कोणतीही गोष्ट त्यांना दिसून येत नाही - यालाच म्हणतात - पवित्रतेच्या शृंगाराने शृंगारलेली मूर्ती.

बोधवाक्य:-
व्यर्थ संबंध-संपर्क देखील तुमच्या खात्याला रिकामे करतो त्यामुळे व्यर्थला समाप्त करा.