07-02-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो - आत्म-अभिमान, विश्वाचा मालक बनवितो, देह-अभिमान कंगाल बनवितो, म्हणून आत्म-अभिमानी भव

प्रश्न:-
असा कोणता अभ्यास अशरीरी बनण्यासाठी खूप मदत करतो?

उत्तर:-
स्वत:ला नेहेमी ॲक्टर समजा, जसा ॲक्टर पार्ट पूर्ण होताच वस्त्र बदलतो, तसा तुम्हा मुलांना देखील असा अभ्यास करायचा आहे, कर्म पूर्ण होताच जुने वस्त्र (शरीर) सोडून अशरीरी व्हा. आत्मा भाऊ-भाऊ आहे, हा अभ्यास करत रहा. हेच पावन बनण्याचे सोपे साधन आहे. शरीराला बघितल्याने क्रिमिनल विचार (विकारी विचार) चालतात म्हणून अशरीरी भव.

ओम शांती।
बाबा बसून मुलांना समजावून सांगत आहेत कारण खूप बेसमज बनले आहेत. ५००० वर्षांपूर्वी देखील तुम्हाला समजावून सांगितले होते आणि दैवी कर्म देखील शिकविली होती. तुम्ही देवी-देवता धर्मामध्ये आला होता पुन्हा ड्रामाप्लॅन अनुसार पुनर्जन्म घेता-घेता, कला कमी होत-होत इथे आता प्रत्यक्षात कला एकदम शून्य झाली आहे; कारण, हे आहेच तमोप्रधान रावण राज्य. हे रावण राज्य सुद्धा अगोदर सतोप्रधान होते. मग सतो, रजो, तमो बनले. आता तर अगदीच तमोप्रधान आहे. आता याचा शेवट आहे. रावण राज्याला म्हटले जाते आसुरी राज्य. रावणाला जाळण्याची फॅशन भारतामध्ये आहे. राम राज्य आणि रावण राज्य हे देखील भारतवासीच म्हणतात. राम राज्य असतेच सतयुगामध्ये. रावण राज्य आहे कलियुगामध्ये. या चांगल्या समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत. बाबांना आश्चर्य वाटते कि चांगली-चांगली मुले देखील पूर्ण रीतीने न समजल्या-कारणाने आपल्याच नशिबाला लकीर लावतात. रावणाचे अवगुण चिकटतात. दैवी गुणांचे स्वत: देखील वर्णन करतात. बाबांनी समजावून सांगितले आहे - तुम्ही तेच देवता होता. तुम्हीच ८४ जन्म भोगले आहेत. तुम्हाला फरक सांगितला आहे - तुम्ही तमोप्रधान का बनला आहात. हे आहे रावण राज्य. रावण आहे सर्वात मोठा शत्रू, ज्याने भारताला इतके कंगाल, तमोप्रधान बनवले आहे. राम राज्यामध्ये इतकी माणसे नसतात. तिथे तर एकच धर्म असतो. इथे तर सर्वांमध्ये भूतांची (विकारांची) प्रवेशता आहे. क्रोध, लोभ, मोहाचे भूत आहे ना. मी अविनाशी आहे, हे शरीर विनाशी आहे - हे विसरून जाता. आत्म-अभिमानी बनतच नाहीत. देह-अभिमानी खूप आहेत. देह-अभिमान आणि आत्म-अभिमान यामध्ये रात्रं-दिवसाचा फरक आहे. आत्म-अभिमानी देवी-देवता साऱ्या विश्वाचे मालक बनतात. देह-अभिमान आल्याने कंगाल बनतात. भारत सोन्याची चिडिया होता, असे म्हणतात देखील परंतु समजत नाहीत. शिवबाबा येतात दैवी बुद्धी बनविण्यासाठी. बाबा म्हणतात - गोड-गोड मुलांनो, तुम्हाला विश्वाचा मालक बनवतो, हे लक्ष्मी-नारायण विश्वाचे मालक होते. असे कधी ऐकले आहे का की यांना राजाई कोणी दिली? त्यांनी असे कोणते कर्म केले ज्यामुळे इतके उच्च पद प्राप्त केले? कर्मांची गोष्ट आहे ना. मनुष्य आसुरी कर्म करतो तर ते कर्म विकर्म बनते. सतयुगामध्ये कर्म, अकर्म होते. तिथे कर्मांचे खाते असत नाही. बाबा समजावून सांगतात परंतु समजत नसल्याकारणाने खूप विघ्न आणतात. शिव आणि शंकर एकच आहेत असे म्हणतात. अरे, शिव निराकार एकटे दाखवले जातात, शंकरा सोबत पार्वती दाखवतात, दोघांचेही कार्य पूर्णतः वेगवेगळे आहे. मिनिस्टर आणि प्रेसिडेंट यांना एक कसे म्हणणार. दोघांचे पद एकदम वेगळे आहे, तर मग शिव आणि शंकर यांना एक कसे म्हणू शकतात. आपण हे जाणतो, ज्यांना राम संप्रदायामध्ये यायचे नाही आहे त्यांना समजणार देखील नाही. आसुरी संप्रदायवाले शिव्या देतील, विघ्ने उत्पन्न करतील कारण त्यांच्यामध्ये ५ विकार आहेत ना. देवता आहेत संपूर्ण निर्विकारी. त्यांचे किती उच्च पद आहे. आता तुम्हाला समजते आहे, आपण किती विकारी होतो. विकारातून जन्म घेतात. संन्याशांना देखील विकारातून जन्म घ्यायचा आहे, मग पुन्हा संन्यास करतात. सतयुगामध्ये या गोष्टी असत नाहीत. संन्यासी तर सतयुगाला समजत देखील नाहीत. म्हणतात सतयुग आहेच मुळी. जसे म्हणतात - श्रीकृष्ण हाजिरा हजूर (वर्तमान समयी उपस्थित) आहे, राधा देखील हाजिरा हजूर आहे. अनेक मत-मतांतरे आहेत , अनेक धर्म आहेत. अर्धाकल्प दैवी मत चालते जे तुम्हाला आता मिळत आहे. तुम्हीच ब्रह्मामुखवंशावळी नंतर मग विष्णुवंशी आणि चंद्रवंशी बनता. ती दोन्ही डिनायस्टी (घराणी) आहेत आणि एक ब्राह्मण कुळ म्हणणार, याला डिनायस्टी म्हणणार नाही. यांची (ब्राह्मणांची) राजाई नसते. हे देखील तुम्हीच समजता. तुमच्यामध्ये देखील काहीजणच समजतात. काही तर सुधारतच नाहीत, कोणते न कोणते भूत आहे. लोभाचे भूत, क्रोधाचे भूत आहे ना. सतयुगामध्ये कोणतेही भूत नाही. सतयुगामध्ये असतात देवता, ज्या खूप सुखी असतात. भूतच दुःख देतात, काम विकाराचे भूत आदि-मध्य-अंत दु:ख देते. यासाठी खूप मेहनत करायची आहे, काही मावशीचे घर नाहीये. बाबा म्हणतात - भाऊ-बहीण समजा तर क्रिमिनल दृष्टी जाणार नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये हिम्मत हवी. काहीजण म्हणतात लग्न करणार नाही तर निघ घराबाहेर. तर हिम्मत पाहिजे. आत्मपरीक्षण सुद्धा केले जाते.

तुम्ही मुले खूप पद्मापद्म भाग्यशाली बनत आहात. हे सर्व-काही नष्ट होणार आहे. सर्व-काही मातीत मिसळून जाणार आहे. काहीजण तर चांगली हिम्मत ठेवून चालू लागतात. काही तर हिम्मत ठेवून नंतर मग फेल होतात. बाबा प्रत्येक गोष्टीमध्ये समजावून सांगत राहतात. परंतु करत नाहीत तर समजले जाते पूर्ण योग नाही आहे. भारताचा प्राचीन राजयोग तर प्रसिद्ध आहे. या योगानेच तुम्ही विश्वाचे मालक बनता. शिक्षण आहे सोर्स ऑफ इन्कम. अभ्यासानेच तुम्ही नंबरवार उच्च पद प्राप्त करता. भाऊ-बहिणीच्या संबंधामध्ये देखील बुद्धी चंचल होते म्हणून बाबा यापेक्षाही उच्च घेऊन जातात की, स्वत:ला आत्मा समजा, दुसर्यांना देखील आत्मा भाऊ-भाऊ समजा. आपण सर्व भाऊ-भाऊ आहोत तर दुसरी दृष्टी जाणार नाही. शरीराला बघितल्याने क्रिमिनल विचार (विकारी विचार) येतात. बाबा म्हणतात - मुलांनो, अशरीरी भव, देही-अभिमानी भव. स्वत:ला आत्मा समजा. आत्मा अविनाशी आहे. शरीराने पार्ट बजावला, आणि मग शरीरापासून वेगळे झाले पाहिजे. ते ॲक्टर्स पार्ट संपवून कपडे बदलतात. तुम्हाला देखील आता जुना कपडा उतरवून (जुने शरीर सोडून) नवीन कपडा घालायचा आहे (नवीन शरीर घ्यायचे आहे). यासमयी आत्मा देखील तमोप्रधान आहे तर शरीर देखील तमोप्रधान आहे. तमोप्रधान आत्मा मुक्तीमध्ये जाऊ शकत नाही. पवित्र होईल तेव्हाच जाईल. अपवित्र आत्मा परत जाऊ शकत नाही. हे खोटे बोलतात अमका ब्रह्ममध्ये लीन झाला. एकही जाऊ शकत नाही. तिथे जसा सिजरा (वंश वृक्ष) बनलेला आहे, तसाच राहतो. हे तुम्ही ब्राह्मण मुलेच जाणता. गीतेमध्ये ब्राह्मणांच्या नावाचा कुठेही उल्लेख नाही आहे. हे (शिवबाबा) तर म्हणतात कि मी, प्रजापिता ब्रह्माच्या शरीरामध्ये प्रवेश करतो, तर जरूर ॲडॉप्शन पाहिजे. ते ब्राह्मण आहेत विकारी, तुम्ही आहात निर्विकारी. निर्विकारी बनण्यासाठी पुष्कळ यातना सहन कराव्या लागतात. हे (साकारी) नाव-रूप पाहिल्याने बर्याच जणांना विकल्प येतात. भाऊ-बहीणीच्या संबंधामध्ये सुद्धा खालच्या थराला जातात. लिहितात - बाबा, मी कोसळलो (विकारात गेलो), तोंड काळे केले. बाबा म्हणतात - व्वा! मी म्हटले, भाऊ-बहीण होऊन रहा आणि तू हे खराब काम केलेस! त्याची मग अतिशय कठोर शिक्षा मिळते. तसेही जर कोणी कोणाला खराब केले तर त्याला जेलमध्ये टाकले जाते. भारत किती पवित्र होता जो मी स्थापन केला होता. त्याचे नावच आहे - शिवालय. हे ज्ञान देखील कोणामध्ये नाही आहे. बाकी शास्त्र इत्यादि जे काही आहे ते सर्व भक्ती मार्गातील कर्मकांड आहे. सतयुगामध्ये सर्व सद्गतीमध्ये आहेत, म्हणून तिथे कोणीही पुरुषार्थ करत नाहीत. इथे सर्व गति-सद्गतीसाठी पुरुषार्थ करतात कारण दुर्गतीमध्ये आहेत. गंगा स्नान करायला जातात तर गंगेचे पाणी सद्गती देणार काय? ते पावन बनवणार काय? काहीही जाणत नाहीत. तुमच्यामध्ये सुद्धा नंबरवार आहेत. काहींना तर स्वत:लाच समजत नाही तर दुसर्यांना काय समजावून सांगणार, म्हणून बाबा पाठवत नाहीत. गात राहतात - बाबा तुम्ही जेव्हा याल तेव्हा तुमच्या श्रीमतावर चालून देवता बनणार. देवता राहतात सतयुग आणि त्रेतामध्ये. इथे तर सर्वात जास्त काम विकारामध्ये अडकलेले आहेत. काम विकाराशिवाय राहू शकत नाहीत. हा विकार जसा माता-पित्याचा वारसा आहे. इथे तुम्हाला मिळतो रामाचा वारसा. पवित्रतेचा वारसा मिळतो. तिथे विकाराची काही गोष्टच नसते.

भक्त लोक म्हणतात - श्रीकृष्ण, भगवान आहे. तुम्ही त्यांना ८४ जन्मांमध्ये दाखवता. अरे, भगवान तर निराकार आहेत. त्यांचे नाव शिव आहे. बाबा किती चांगल्या रीतीने समजावून सांगतात. दया देखील वाटते. दयाळू आहेत ना. ही किती चांगली हुशार मुले आहेत. भपका सुद्धा चांगला आहे. ज्यांच्यामध्ये ज्ञान आणि योगाची ताकद आहे ते आकर्षित करतात. शिकलेल्यांना चांगला सन्मान मिळतो. अडाणी असणार्यांना सन्मान मिळत नाही. हे तर जाणता यावेळी सर्व आसुरी संप्रदाय आहे. काहीही समजत नाहीत. शिव आणि शंकर यांच्यामधील फरक एकदम क्लिअर आहे. ते (शिव) आहेत मूलवतनमध्ये, ते (शंकर) आहेत सूक्ष्मवतनमध्ये, दोघेही एकसारखे कसे असतील? ही तर तमोप्रधान दुनिया आहे. रावण शत्रू आहे आसुरी संप्रदायाचा, जो आप समान बनवितो. आता बाबा तुम्हाला आप समान दैवी संप्रदायी बनवतात. तिथे रावण असत नाही. अर्धा कल्प त्याला जाळतात. रामराज्य असते सतयुगामध्ये. गांधीजींना रामराज्य हवे होते परंतु ते रामराज्य कसे स्थापन करू शकणार? ते काही आत्म-अभिमानी बनण्याची शिकवण देत नव्हते. बाबाच संगमयुगावर म्हणतात - आत्म-अभिमानी बना. हे आहे उत्तम बनण्याचे युग. बाबा किती प्रेमाने समजावून सांगत राहतात. क्षणोक्षणी किती प्रेमाने बाबांची आठवण केली पाहिजे - बाबा तुमची तर कमाल आहे. आम्ही किती पत्थरबुद्धी होतो, तुम्ही आम्हाला किती श्रेष्ठ बनवता! तुमच्या मताशिवाय आम्ही इतर कोणाच्याही मतावर चालणार नाही. शेवटी सर्वजण म्हणतील - खरोखर ब्रह्माकुमार-कुमारी तर दैवी मतावर चालत आहेत. किती चांगल्या-चांगल्या गोष्टी ऐकवतात. आदि-मध्य-अंताचा परिचय देतात. कॅरॅक्टरला (चारित्र्याला) सुधारतात. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-

१) दृष्टीला शुद्ध पवित्र बनविण्यासाठी कोणाच्याही नावा-रूपाला न पाहता अशरीरी बनण्याचा अभ्यास करायचा आहे. स्वत:ला आत्मा समजून, आत्मा भावाशी बोलायचे आहे.

२) सर्वांकडून सन्मान प्राप्त करण्यासाठी ज्ञान-योगाची ताकद धारण करायची आहे. दैवी गुणांनी संपन्न बनायचे आहे. कॅरॅक्टरला (चारित्र्याला) सुधारण्याची सेवा करायची आहे.

वरदान:-
आजार कॉन्शस होण्याऐवजी आनंदाने हिशोब चुकता करणारे सोलकॉन्शस भव

शरीरे तर सर्वांची जुनीच आहेत. प्रत्येकाला काही ना काही छोटा-मोठा आजार आहे. परंतु तनाचा प्रभाव जर मनावर आला तर डबल आजारी होऊन आजार कॉन्शस व्हाल म्हणून मनामध्ये कधीही आजाराचा संकल्प येता कामा नये, तेव्हा म्हणणार सोल कॉन्शस. आजाराला कधीही घाबरू नका. थोडेसे औषध रूपी फळ खाऊन त्याला निरोप द्या. आनंदाने हिशोब चुकता करा.

बोधवाक्य:-
प्रत्येक गुण, प्रत्येक शक्तीचा अनुभव करणे अर्थात अनुभवी मूर्त बनणे.