07-04-24    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   01.03.99  ओम शान्ति   मधुबन


“संपूर्ण पवित्र बनून संस्कार मिलन साजरे करा - हीच खरी होळी आहे”


आज बापदादा चोहो बाजूंच्या आपल्या होलिएस्ट आणि हायेस्ट मुलांना पाहत आहेत. विश्वामध्ये सर्वात हायेस्ट उच्च ते उच्च श्रेष्ठ आत्मे तुम्हा मुलांशिवाय आणखी कोणी आहे? कारण तुम्ही सर्व उच्च ते उच्च बाबांची मुले आहात. संपूर्ण कल्पामध्ये फेरी मारून पहा तर खरे, सर्वात उच्च पदवाले आणखी कोणी दृष्टीस पडतात का? राज्य अधिकारी स्वरूपामध्ये देखील तुमच्यापेक्षा उच्च राज्य अधिकारी कोणी बनले आहेत? त्यानंतर पूजन आणि गायनामध्ये पहा जितकी विधिपूर्वक पूजा तुम्हा आत्म्यांची होते त्यापेक्षा जास्त आणखी कोणाची होते का? ड्रामाचे वंडरफूल रहस्य किती श्रेष्ठ आहे जे तुम्ही स्वतः चैतन्य स्वरूपामध्ये, यावेळी आपल्या पूज्य स्वरूपाला ज्ञानाच्या आधारे जाणता देखील आणि पाहता देखील. एका बाजूला तुम्ही चैतन्य आत्मे आहात आणि दुसऱ्या बाजूला तुमची जड चित्रे पूज्य रूपामध्ये आहेत. आपल्या पूज्य स्वरूपाला पाहत आहात ना? जड रूपामध्ये देखील आहात आणि चैतन्य रूपामध्ये देखील आहात. तर वंडरफुल खेळ आहे ना! आणि राज्याच्या हिशोबाने देखील संपूर्ण कल्पामध्ये निर्विघ्न, अखंड-अटल राज्य एक तुम्हा आत्म्यांचेच चालते. राजे तर बरेच बनतात परंतु तुम्ही विश्वराजन किंवा विश्वराजनची रॉयल फॅमिली सर्वात श्रेष्ठ आहे. तर राज्यामध्ये देखील हायेस्ट, पूज्य रूपामध्ये देखील हायेस्ट आणि आता संगमावर परमात्म वारशाचे अधिकारी, परमात्म मिलनाचे अधिकारी, परमात्म प्रेमाचे अधिकारी, परमात्म परिवाराचे आत्मे आणखी कोणी बनतात का? तुम्हीच बनले आहात ना? बनले आहात का बनत आहात? बनले देखील आहात आणि आता तर वारसा घेऊन, संपन्न बनून बाबांसोबतच आपल्या घरी देखील जाणार आहात. संगमाचे सुख, संगमयुगाची प्राप्ती, संगमयुगाचा काळ आनंददायी वाटतो ना! खूप सुंदर वाटतो. राज्य करण्याच्या वेळेपेक्षा देखील संगमाचा काळ अधिक सुंदर वाटतो ना? सुंदर आहे का लवकर परत जावे असे वाटते? मग विचारता कशासाठी कि, ‘बाबा, विनाश कधी होणार?’ विचार करता ना - माहित नाही विनाश कधी होणार? काय होणार? आम्ही कुठे असणार? बापदादा म्हणतात - ‘जिथेही असाल - आठवणीमध्ये असणार, बाबांसोबत असणार.’ साकारमध्ये किंवा आकारमध्ये सोबत असाल तर काहीही होणार नाही. साकारमध्ये एक कहाणी सांगितली आहे ना. मांजरीची पिल्ले भट्टीमध्ये असून देखील सुरक्षित राहिली ना! का जळून गेली? सगळी सुरक्षित राहिली. तर तुम्ही परमात्म्याची मुले जी सोबत असतील ती सुरक्षित राहतील. जर इतर कुठे बुद्धी असेल तर काही ना काही शेक बसणार, काही ना काही परिणाम होईल. सोबत कंबाइंड असाल, एक सेकंद देखील एकटे नसाल तर सेफ रहाल. कधी-कधी कामामध्ये किंवा सेवेमध्ये एकटे अनुभव करता का? काय करू एकटा आहे, खूप काम आहे! मग थकून सुद्धा जाता. तर बाबांना सोबती का बनवत नाही! दोन भुजावाल्यांना सोबती बनवता, हजार भुजा असणाऱ्याला सोबती का बनवत नाही. जास्त सहयोग कोण देणार? हजार भुजावाला कि दोन भुजावाला?

संगमयुगावर ब्रह्माकुमार किंवा ब्रह्माकुमारी एकटे असू शकत नाहीत. फक्त जेव्हा सेवेमध्ये, कर्मयोगामध्ये खूप बिझी होता ना तेव्हा सोबत असणाऱ्याला देखील विसरून जाता आणि मग थकून जाता. मग म्हणता थकून गेलो, आता काय करू! थकू नका, जर बापदादा तुम्हाला सदैव सोबत करण्यासाठी आले आहेत; परमधाम सोडून का आले आहेत? झोपता-उठता, कर्म करताना, सेवा करताना, सोबत देण्यासाठीच तर आले आहेत. ब्रह्मा बाबा देखील तुम्हा सर्वांना सहयोग देण्यासाठी अव्यक्त बनले. व्यक्त रूपा पेक्षा अव्यक्त रूपामध्ये सहयोग देण्याची गती खूप तीव्र आहे, म्हणून ब्रह्मा बाबांनी देखील आपले वतन चेंज केले. तर शिवबाबा आणि ब्रह्माबाबा दोघेही प्रत्येक वेळी तुम्हा सर्वांना सहयोग देण्यासाठी सदैव हजर आहेत. तुम्ही विचार केला - ‘बाबा’ आणि सहयोग अनुभव कराल. जर फक्त सेवा, सेवा आणि सेवा तेवढेच लक्षात राहिले, बाबांना बाजूला बसवून बघण्यासाठी वेगळे करता, तर बाबा देखील साक्षी होऊन पाहतात, बघू कुठे पर्यंत एकटे करतात. पुन्हा येणार तर इथेच आहेत. तर सोबत सोडू नका. आपला अधिकार आणि प्रेमाच्या सूक्ष्म दोरीने बांधून ठेवा. सैल सोडून देता. स्नेहाला सैल करता, अधिकाराला थोडेसे स्मृतीतून बाजूला करता. तर असे करू नका. जर सर्वशक्तीवान सोबतीची ऑफर करत आहे तर अशी ऑफर संपूर्ण कल्पामध्ये मिळेल का? नाही मिळणार ना? तर बापदादा सुद्धा साक्षी होऊन पाहतात, ठीक आहे, पाहू कुठे पर्यंत एकटे करतात ते!

तर संगमयुगाच्या सुखाला आणि सुहेजला (हेतूला) इमर्ज ठेवा. बुद्धी बिझी राहते ना तर बिझी असल्याकारणाने स्मृती मर्ज होते. तुम्ही विचार करा संपूर्ण दिवसामध्ये कोणालाही विचारा कि, बाबांची आठवण राहते की बाबांची आठवण विसरायला होते? तर काय म्हणतील? नाही. हे तर बरोबर आहे कि आठवण राहते परंतु इमर्ज रूपामध्ये राहते का मर्ज राहते? स्थिती काय असते? इमर्ज रूपाची स्थिती आणि मर्ज रूपाची स्थिती यामध्ये काय फरक आहे? इमर्ज रूपामध्ये आठवण का ठेवत नाही? इमर्ज रूपाचा नशा शक्ती, सहयोग, सफलता खूप मोठी आहे. आठवण तर विसरू शकत नाही कारण एका जन्माचे नाते नाहीये, भले शिवबाबा सतयुगामध्ये सोबत असणार नाहीत परंतु नाते तर हेच राहणार ना! विसरू शकत नाही, हे राइट आहे. हां, कोणी विघ्नाच्या अधीन होतात तर विसरून देखील जायला होते परंतु तसे जेव्हा नॅचरल रूपामध्ये राहता तेव्हा विसरायला होत नाही परंतु मर्ज राहते; म्हणून बापदादा म्हणतात - वारंवार चेक करा कि, सोबतीचा अनुभव मर्ज रूपामध्ये आहे का इमर्ज रूपामध्ये? प्रेम तर आहेच. प्रेम तुटू शकते का? नाही तुटू शकत ना? तर प्रेम जर तुटू शकत नाही तर मग प्रेमाचा फायदा तरी घ्या. फायदा घेण्याची पद्धत शिका.

बापदादा पाहतात, प्रेमानेच बाबांचे बनविले आहे. प्रेमच मधुबन निवासी बनविते. भले आपल्या स्थानावर कसेही राहतात, कितीपण मेहनत करतात परंतु तरी देखील मधुबनमध्ये पोहोचतात. बापदादा जाणतात, पाहतात, बऱ्याच मुलांना कलियुगी परिस्थिती असल्याकारणाने तिकीट काढणे देखील कठीण आहे परंतु प्रेम पोहोचवतेच. असे आहे ना? प्रेमामध्ये पोहोचतात परंतु परिस्थिती तर दिवसेंदिवस वाढतच जाते. ‘सच्ची दिल पर साहेब राजी’ तर होतोच. परंतु स्थूल सहयोग देखील कुठे ना कुठे कसाही मिळून जातो. मग डबल फॉरेनर्स असोत, किंवा भारतवासी असोत, सर्वाना हे बाबांचे प्रेम परिस्थितीची भिंत पार करून देते. असे आहे ना? आपापल्या सेंटरवर पहाल तर अशी सुद्धा मुले आहेत जी इथून जातात, विचार करतात माहित नाही पुढच्या वर्षी यायला मिळेल कि नाही परंतु तरीही पोहोचतात. हे आहे प्रेमाचे प्रमाण. अच्छा.

आज होळी साजरी केलीत? तुम्ही होळी साजरी केली आहे का? बापदादा तर होळी साजरी करणाऱ्या होलीहंसाना पाहत आहेत. सर्व मुलांचे एकच टायटल आहे - होलिएस्ट. द्वापर पासून कोणत्याही धर्मात्मा किंवा महात्म्याने सर्वांना होलिएस्ट बनवलेले नाही. स्वतः बनतात परंतु आपल्या फॉलोअर्सना, साथीदारांना होलिएस्ट, पवित्र बनवत नाहीत आणि इथे पवित्रता तर ब्राह्मण जीवनाचा मुख्य आधार आहे. ज्ञान देखील काय आहे? तुमचे स्लोगन देखील आहे - “पवित्र बनो-योगी बनो।” स्लोगन आहे ना? पवित्रताच महानता आहे. पवित्रताच योगी जीवनाचा आधार आहे. कधी-कधी मुले अनुभव करतात कि जर चालता-चालता मनामध्ये देखील अपवित्रता म्हणजेच वेस्ट किंवा निगेटिव्ह, परचिंतनवाले संकल्प येत असतील तर कितीही पॉवरफुल योग करू इच्छिता, परंतु करू शकत नाही; कारण जरा देखील अंशमात्र संकल्पामध्ये देखील कोणत्याही प्रकारची अपवित्रता असेल तर जिथे अपवित्रतेचा अंश आहे तिथे पवित्र बाबांची आठवण - जे आहेत, जसे आहेत, तशी आठवण येऊ शकत नाही. जसे दिवस आणि रात्र एकाचवेळी नसतात, म्हणून बापदादा वर्तमान समयी पवित्रतेवर वारंवार लक्ष वेधून घेत आहेत. काही काळा पूर्वी बापदादा फक्त कर्मामधील अपवित्रतेसाठी इशारा देत होते परंतु आता समय संपूर्णतेच्या समीप येऊन ठेपला आहे म्हणून मन्सामध्ये देखील अपवित्रतेचा अंश दगा देऊ शकतो. तर मनसा, वाचा, कर्मणा, संबंध-संपर्क सर्वांमध्ये पवित्रता अति आवश्यक आहे. मनसाला (संकल्पांना) सामान्य समजू नका कारण मनसा (संकल्प) बाहेरून दिसून येत नाहीत परंतु मनसा दगा खूप देते. ब्राह्मण जीवनाचा जो आंतरिक वारसा - ‘सदैव सुख स्वरूप, शांत स्वरूप, मनाची संतुष्टता’ आहे त्याचा अनुभव करण्यासाठी मनसाची पवित्रता हवी. बाहेरच्या साधनांद्वारे किंवा सेवेद्वारे आपणच आपल्याला खुश करणे - हे देखील स्वतःला दगा देणे आहे.

बापदादा पाहतात कधी-कधी मुले स्वतःला याच आधारे चांगले समजून, आनंदी समजून आपणच आपल्याला दगा देतात, देत देखील आहेत. दगा देतात आणि देत देखील आहेत. हे देखील एक गूढ रहस्य आहे. होते काय, बाबा दाता आहेत, आम्ही दात्याची मुले आहोत, त्यामुळे सेवा युक्तियुक्त देखील नसते, मिक्स असते; थोडीशी आठवण आणि थोडी बाह्य साधनांवर किंवा खुशीच्या आधारावर असते, अंतःकरणापासून स्नेहाच्या आधारावर नसते परंतु बुद्धीच्या आधारावर सेवा करतात; तर सेवेचे प्रत्यक्ष फळ त्यांना मिळते देखील; कारण बाबा दाता आहेत आणि ते त्यामध्येच खुश राहतात कि, व्वा, आम्हाला तर फळ मिळाले, आमची सेवा चांगली आहे. परंतु ती मनाची संतुष्टता सदाकाळ राहत नाही आणि आत्मा योगयुक्त पॉवरफुल आठवणीचा अनुभव करू शकत नाही, त्यापासून वंचित राहते. बाकी अजिबात काहीच मिळत नाही, असे नाही. काही ना काही मिळते परंतु जमा होत नाही. कमावले, खाल्ले आणि संपले, म्हणून हे देखील अटेंशन ठेवा. सेवा खूप चांगली करत आहोत, फळ देखील चांगले मिळाले, तर खाल्ले आणि संपले. जमा काय झाले? चांगली सेवा केली, चांगला रिझल्ट निघाला, परंतु ते सेवेचे फळ मिळाले, जमा होत नाही, म्हणून जमा करण्याची विधी आहे - मनसा-वाचा-कर्मणा पवित्रता. फाऊंडेशन पवित्रता आहे. सेवेमध्ये देखील फाऊंडेशन पवित्रता आहे. स्वच्छ असावे, साफ असावे. इतर कोणताही भाव मिक्स नसावा. भाव देखील पवित्र, भावनेमध्ये देखील पवित्रता. होळीचा अर्थच आहे - ‘पवित्रता’. अपवित्रतेला जाळून टाकणे, म्हणूनच अगोदर जाळतात नंतर साजरे करतात आणि नंतर पवित्र बनून संस्कार मिलन साजरे करतात. तर होळीचा अर्थच आहे - जाळणे, साजरे करणे. बाहेरचे लोक गळाभेट करतात परंतु इथे संस्कार मिलन, हेच मंगल मिलन (सदिच्छा भेट) आहे. तर अशी होळी साजरी ` डान्स केला? गुलाब जल शिंपडलेत? ते देखील चांगले आहे भरपूर साजरे करा. बापदादा खुश होतात गुलाबजल भले शिंपडा, डान्स भले करा परंतु सदैव डान्स करा. फक्त ५-१० मिनिटांचा डान्स नाही. एकमेकांमध्ये गुणांचे व्हायब्रेशन पसरवा - हे आहे गुलाबजल शिंपडणे. आणि जाळण्या विषयी तर तुम्ही जाणताच, काय जाळायचे आहे! अजून पर्यंत सुद्धा जाळत राहता. प्रत्येकवर्षी हात वर करून जाता, बस दृढ संकल्प झाला. बापदादा खुश होतात, हिम्मत तर ठेवतात. तर हिम्मतीसाठी बापदादा मुबारक देखील देतात. हिम्मत ठेवणे देखील पहिले पाऊल उचलणे आहे. परंतु बापदादांची शुभ आशा काय आहे? समयाची डेट पाहू नका. २ हजार मध्ये होणार, २००१ मध्ये होणार, २००५ मध्ये होणार, हा विचार करू नका. चला एवररेडी नाही जरी बनलात, चला याला देखील बापदादा सोडून देतात; परंतु विचार करा खूप काळाचे संस्कार तर पाहिजेत ना! तुम्ही लोकच ऐकवता कि खूप काळाचा पुरुषार्थ, खूप काळासाठी राज्य अधिकारी बनवितो. जर वेळ आल्यावर दृढ संकल्प केला, तर तो खूप काळ झाला कि अल्प काळ झाला? कशामध्ये मोजला जाईल? अल्प काळामध्ये होणार ना! तर अविनाशी बाबांकडून कोणता वारसा घेतलात? अल्प काळाचा. हे चांगले वाटते? नाही वाटत ना! तर खूप काळाचा अभ्यास पाहिजे, किती काळ बाकी आहे हा विचार करू नका, जेवढा खूप काळाचा अभ्यास असेल, तेवढा शेवटी देखील धोखा खाणार नाही. खूप काळाचा अभ्यास नसेल तर आताचे खूप काळाचे सुख, खूप काळाच्या श्रेष्ठ स्थितीच्या अनुभवापासून देखील वंचित होतात, तर त्यासाठी काय करायचे आहे? खूप काळासाठी करायचे आहे? जर कोणाचीही बुद्धी डेटची वाट पाहत असेल तर अशी वाट पाहू नका, तयारी करा. खूप काळाची तयारी करा. डेटला देखील तुम्हाला आणायचे आहे. वेळ तर आताही एवररेडी आहे, उद्या देखील होऊ शकते परंतु वेळ तुमच्यासाठी थांबला आहे. तुम्ही संपन्न बना तेव्हा वेळेचा पडदा अवश्य हटणारच आहे. तुमच्या रोकण्यामुळे थांबला आहे. राज्य अधिकारी तर तयार आहेत ना? सिंहासन तर रिकामे रहायला नको ना! एकटा विश्वराजन सिंहासनावर बसणार काय! याने काय शोभा येणार? रॉयल फॅमिली हवी, प्रजा हवी, सर्व हवेत. फक्त विश्वराजन सिंहासनावर बसेल आणि बघत राहिल कि कुठे गेली माझी रॉयल फॅमिली, म्हणून बापदादांची एकच शुभ आशा आहे कि सर्व मुले, भले नवीन आहेत, नाहीतर जुने आहेत, जे कोणी स्वतःला ब्रह्माकुमारी किंवा ब्रह्माकुमार म्हणवतात, मग ते मधुबन निवासी असो, विदेशचे निवासी असो, भारताचे निवासी असो - प्रत्येकाने खूप काळाचा अभ्यास करून खूप काळाचा अधिकारी बनावे. कधीतरी वाला नाही. पसंत आहे? एका हाताची टाळी वाजवा. मागे बसलेले हुशार आहेत, लक्ष देऊन ऐकत आहेत. बापदादा मागे बसलेल्यांना आपल्या समोर पाहत आहेत. पुढे बसलेले तर आहेतच पुढे. (मेडिटेशन हॉलमध्ये बसून मुरली ऐकत आहेत) खाली बसलेले बापदादांच्या मस्तकावरील मुकुट होऊन बसले आहेत. ते देखील टाळी वाजवत आहेत. खाली बसलेल्यांना त्यागाचे भाग्य तर मिळणारच आहे. तुम्हाला सन्मुख बसण्याचे भाग्य आहे आणि त्यांच्या त्यागाचे भाग्य जमा होत आहे. अच्छा बापदादांची एक आशा ऐकलीत! पसंत आहे ना! आता पुढच्या वर्षी काय पाहणार? असेच पुन्हा हात वर करणार! हात भले वर करा, दोन-दोन वर करा परंतु मनाचा हात देखील वर करा. दृढ संकल्पाचा हात सदा काळासाठी वर करा.

बापदादा प्रत्येक मुलाच्या मस्तकावर संपूर्ण पवित्रतेचा चमकणारा मणी पाहू इच्छितात. डोळ्यांमध्ये पवित्रतेची झलक, दोन डोळ्यांमध्ये पवित्रतेचे तारे, आत्मिकतेने चमकताना पाहू इच्छितात. बोलण्यामध्ये मधुरता, विशेषता, अनमोल बोल ऐकू इच्छितात. कर्मामध्ये संतुष्टता, निर्माणता सदैव बघू इच्छितात. भावनेमध्ये - सदैव शुभ भावना आणि भावामध्ये सदैव आत्मिक भाव, भावा-भावाचा भाव. सदैव तुमच्या मस्तकामधून लाईटचा, फरिश्तेपणाचा मुकुट दिसला पाहिजे. दिसला पाहिजे याचा अर्थ अनुभव होऊ दे. अशी सजलेली मूर्ती पाहू इच्छितात. आणि अशी मूर्तीच श्रेष्ठ पूज्य बनेल. ते (दुनियावाले) तर तुमची जड चित्र बनवतील परंतु बाबा चैतन्य चित्र पाहू इच्छितात. अच्छा!

चोहो बाजूंच्या सदैव बापदादांसोबत राहणाऱ्या, जवळचे सदाचे सोबती, सदैव खूप काळाच्या पुरुषार्थाद्वारे खूप काळाचा संगमयुगी अधिकार आणि भविष्य राज्य अधिकार प्राप्त करणाऱ्या अति सेन्सिबल (समजूतदार) आत्म्यांना, सदैव स्वतःला शक्तींनी, गुणांनी सजवून ठेवणाऱ्या, बाबांच्या आशेचे दीपक असणाऱ्या आत्म्यांना, सदैव स्वतःला होलिएस्ट आणि हाईएस्ट स्थितीमध्ये स्थित ठेवणाऱ्या बाप समान अति स्नेही आत्म्यांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. सर्व विदेश अथवा देशामध्ये दूर बसलेले असूनदेखील सन्मुख अनुभव करणाऱ्यांना बापदादांची खूप-खूप-खूप प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

वरदान:-
समयाला शिक्षक बनवण्याऐवजी बाबांना शिक्षक बनविणारे मास्टर रचयिता भव

बऱ्याच मुलांना सेवेचा उमंग आहे परंतु वैराग्य वृत्तीवर लक्ष नाहीये, यामध्ये निष्काळजीपणा आहे. ‘चालतेच... होतेच... होऊन जाईल… वेळ आल्यावर ठीक होईल…’ असा विचार करणे म्हणजे समयाला आपला शिक्षक बनविणे आहे. मुले बाबांना देखील दिलासा देतात - ‘काळजी करू नका, वेळेवर ठीक होऊन जाईल, करू, पुढे जाऊ.’ परंतु तुम्ही मास्टर रचयिता आहात, समय तुमची रचना आहे. रचना मास्टर रचयित्याची शिक्षक बनावी हे शोभा देत नाही.

सुविचार:-
बाबांच्या पालनेचे रिटर्न आहे - स्वतःला आणि सर्वांना परिवर्तन करण्यामध्ये सहयोगी बनणे.