08-02-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो - सदैव स्मृतीमध्ये असू द्या की आपण ब्राह्मण चोटी (अति उच्च) आहोत, पुरुषोत्तम बनत आहोत तर हर्षित रहाल, आपणच आपल्याशी गोष्टी करायला शिका तर अपार खुशी राहील

प्रश्न:-
बाबांकडे कोण शरण (आश्रय) घेऊ शकतात? बाबा कोणाला आश्रय देतात?

उत्तर:-
बाबांकडे आश्रय तेच घेऊ शकतात जे पूर्णत: नष्टोमोहा असतील. ज्यांचा बुद्धियोग सर्व बाजूंनी तुटलेला असेल. मित्र-संबंधी इत्यादींकडे बुद्धीची ओढ नसेल. बुद्धीमध्ये रहावे - मेरा तो एक बाबा दूसरा न कोई. अशी मुलेच सेवा करू शकतात. बाबा देखील अशा मुलांनाच आश्रय देतात.

ओम शांती।
हे आहेत रुहानी पिता, टीचर आणि गुरु. हे तर मुलांना चांगल्या रीतीने समजले आहे, दुनिया या गोष्टींना जाणत नाही. भले संन्यासी म्हणतात - शिवोहम्. तरी देखील असे म्हणणार नाहीत की, मी पिता, टीचर, गुरु आहे. ते फक्त म्हणतात - शिवोहम् तत् त्वम्. परमात्मा सर्वव्यापी आहे तर प्रत्येकजण पिता, टीचर, गुरु झाले, परंतु असे तर कोणी समजत देखील नाहीत. मनुष्य स्वतःला भगवान, परमात्मा म्हणवून घेतात हे तर पूर्णतः चुकीचे आहे. मुलांना जे बाबा समजावून सांगतात ते तर बुद्धीमध्ये धारण होते ना. त्या (लौकिक) शिक्षणामध्ये किती विषय असतात, असे नाही की सर्व विषय विद्यार्थ्यांच्या लक्षात राहतात. इथे बाबा जे शिकवतात ते एका सेकंदामध्ये मुलांच्या लक्षात येते. तुम्ही रचयिता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान ऐकवता. तुम्हीच त्रिकालदर्शी किंवा स्वदर्शन चक्रधारी बनता. त्या भौतिक शिक्षणामध्ये विषय एकदम वेगळे आहेत. तुम्ही सिद्ध करून समजावून सांगता, सर्वांचे सद्गती दाता ते एक बाबाच आहेत. सर्व आत्मे परमात्म्याची आठवण करतात. म्हणतात - ओ गॉड फादर. तर जरूर बाबांकडून वारसा मिळत असणार. तो वारसा गमावल्यावर मग दुःखी होतात. हा सुख-दुःखाचा खेळ आहे. या समयी सर्व पतित, दुःखी आहेत. पवित्र बनल्याने सुख जरूर मिळते. सुखाच्या दुनियेची स्थापना बाबा करतात. मुलांनी हे बुद्धीमध्ये ठेवायचे आहे की आम्हाला बाबा समजावून सांगत आहेत, नॉलेजफूल एक बाबाच आहेत. सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान बाबाच देतात. इतर सर्व धर्म जे स्थापन झाले आहेत ते आपल्या ठरलेल्या वेळेवर येतील. या गोष्टी दुसऱ्या कोणाच्याही बुद्धीमध्ये नाहीत. तुम्हा मुलांसाठी बाबांनी हे शिक्षण एकदम सोपे करून दिले आहे. फक्त थोड्या विस्ताराने समजावून सांगतात. मज पित्याची आठवण करा तर तुम्ही तमोप्रधाना पासून सतोप्रधान बनाल. योगाची महिमा पुष्कळ आहे. भारताच्या प्राचीन योगाचे गायन आहे. परंतु योगामुळे काय फायदा झाला होता, हे कोणालाही माहित नाही. हा गीतेचा तोच योग आहे जो निराकार भगवान शिकवतात. बाकी जे काही शिकवतात ते मनुष्य आहेत, देवतांकडे तर योगाची गोष्टच नाही. हे हठयोग इत्यादी सर्व मनुष्य शिकवतात. देवता ना स्वतः शिकत आणि ना कधी कुणाला शिकवत. दैवी दुनियेमध्ये योगाची गोष्टच नाही. योगाने सर्व पावन बनतात. ते जरूर इथेच बनणार. बाबा येतातच संगमावर नवीन दुनिया बनविण्यासाठी. आता तुम्ही जुन्या दुनियेमधून नवीन दुनियेमध्ये बदलून जात आहात. हे कोणालाही समजावून सांगणे देखील आश्चर्यकारक आहे. आपण ब्राह्मण चोटी (अति उच्च) आहोत, सतयुग आणि कलियुगाच्या मधोमध आहेत - ब्राह्मण चोटी (अति उच्च). यालाच संगमयुग म्हटले जाते, ज्यामध्ये तुम्ही पुरुषोत्तम बनत आहात. हे मुलांच्या बुद्धीमध्ये रहावे की, आपण पुरुषोत्तम बनत आहोत तर सदैव आनंदी रहाल. जितकी सेवा कराल तितके जास्त आनंदी रहाल. कमाई करायची आहे आणि इतरांकडून देखील करवून घ्यायची आहे. जितकी प्रदर्शनीमध्ये सेवा कराल तर ऐकणाऱ्याला देखील आनंद मिळेल. आपले आणि दुसऱ्यांचे कल्याण होईल. छोट्या सेवा केंद्रावर देखील मुख्य ५-६ चित्रे जरूर पाहिजेत. त्यावर समजावून सांगणे सोपे आहे. पूर्ण दिवस सेवाच सेवा. मित्र-संबंधींमध्ये कोणत्याही प्रकारची ओढ असता कामा नये. जे या डोळ्यांनी बघत आहात ते सर्व नष्ट होणार आहे. बाकी जे दिव्य दृष्टीने पाहता त्याची स्थापना होत आहे. अशा प्रकारे स्वतःशीच गोष्टी करा तर तुम्ही पक्के व्हाल. बेहदच्या बाबांना भेटल्याचा आनंद झाला पाहिजे. जेव्हा कुणी राजाकडे जन्म घेतो तर किती नशेमध्ये असतो. तुम्ही मुले स्वर्गाचे मालक बनत आहात. प्रत्येकजण स्वतःसाठी मेहनत करत आहे. बाबा फक्त एवढेच सांगतात - तुम्ही काम-चितेवर बसून काळे झाले आहात. आता ज्ञान-चितेवर बसा तर गोरे बनाल. बुद्धीमध्ये हेच चिंतन चालू रहावे, भले ऑफिसमध्ये काम करत रहा, आठवण करत रहा. असे नाही की फुरसत नाही. जेवढी फुरसत मिळेल तेवढी रुहानी कमाई करा. किती मोठी कमाई आहे. हेल्थ, वेल्थ (आरोग्य आणि संपत्ती) दोन्ही एकत्र मिळतात. अर्जुन आणि भिल्लाची एक कहाणी आहे. तसे गृहस्थ व्यवहारामध्ये राहून ज्ञान-योगामध्ये आत राहणाऱ्यांपेक्षा देखील तीव्र गतीने पुढे जाऊ शकता. सर्व काही आठवणीवर अवलंबून आहे. सर्वच इथे बसले तर सेवा कशी करणार. रिफ्रेश होऊन सेवेमध्ये व्यस्त व्हायचे आहे. सेवेचा विचार केला पाहिजे. बाबा तर प्रदर्शनीमध्ये जाऊ शकणार नाहीत कारण बापदादा दोघे एकत्र आहेत. बाबांची आत्मा आणि यांची (ब्रह्माबाबांची) आत्मा एकत्र आहेत. हे एक वंडरफुल युगल आहे. या युगलला तुम्हा मुलांव्यतिरिक्त इतर कोणीही जाणू शकणार नाहीत. स्वतःला युगल देखील समजतात आणि मग म्हणतात मी एकच बाबांचा सिकीलधा (खूप वर्षानंतर भेटलेला) मुलगा आहे. या लक्ष्मी-नारायणाच्या चित्राला पाहून खूप आनंद होतो. आमचा दुसरा जन्म हा आहे, आम्ही राजगादीवर जरूर बसणार. तुम्ही देखील राजयोग शिकत आहात, ध्येय आणि उद्दिष्ट समोर उभे आहे. यांना (ब्रह्माबाबांना) तर खुशी आहे की मी बाबांचा सिकीलधा मुलगा आहे. तरीसुद्धा निरंतर आठवण राहत नाही. दुसरीकडेच विचार निघून जातात. ड्रामाचा हा कायदा नाही की आठवण एकदम टिकून राहील आणि दुसरा कुठलाही विचार येणार नाही. मायेची वादळे आठवण करू देत नाहीत. मी जाणतो, हे माझ्यासाठी (ब्रह्माबाबांसाठी) खूप सोपे आहे, कारण बाबांची प्रवेशता आहे. बाबांचा नंबर वन सिकीलधा मुलगा आहे. पहिला क्रमांकाचा राजकुमार बनणार तरीसुद्धा आठवण विसरायला होते. अनेक प्रकारचे विचार येतात. हि आहे माया. जेव्हा या बाबांना (ब्रह्मा बाबांना) अनुभव होईल तेव्हाच तर तुम्हा मुलांना समजावून सांगू शकतील. हे विचार तेव्हा बंद होतील जेव्हा कर्मातीत अवस्था होईल. आत्म संपूर्ण बनेल मग तर हे शरीर राहणार नाही. शिवबाबा तर सदैव पावनच पावन आहेत. पतित दुनिया आणि पतित शरीरामध्ये येऊन पावन बनविण्याचा पार्ट देखील यांचाच आहे. ड्रामामध्ये बांधील आहेत. तुम्ही पावन बनाल तेव्हा मग नवीन शरीर पाहिजे. शिवबाबांना स्वतःचे शरीर तर नाहीये. या (ब्रह्मा बाबांच्या) तनामध्ये या आत्म्याचे महत्व आहे. त्यांचे आहेच काय! ते तर मुरली चालवून निघून जातात. ते स्वतंत्र आहेत. कधी कुठे तर कधी कुठे जातील. मुलांना सुद्धा जाणवते की हे शिवबाबा मुरली चालवत आहेत. तुम्ही मुले समजता आपण बाबांना मदत करण्यासाठी या ईश्वरीय सेवेवर उपस्थित आहोत. बाबा म्हणतात - मी देखील आपले स्वीट होम सोडून आलो आहे. परम-धाम अर्थात परे ते परे धाम मूलवतन. बाकी सारा खेळ सृष्टीवर चालतो. तुम्ही जाणता हा एक आश्चर्यकारक खेळ आहे. बाकी दुनिया एकच आहे.

ती लोकं (दुनियावाले) चंद्रावर जाण्यासाठी प्रयत्न करतात, हे तर सायन्सचे बळ आहे. सायलेन्सच्या शक्तीने आम्ही जेव्हा सायन्सवर विजय प्राप्त करतो तेव्हा सायन्स देखील सुखदायी बनते. इथे सायन्स सुख सुद्धा देते तर दुःख सुद्धा देते. तिथे (सतयुगामध्ये) तर सुखच सुख आहे. दुःखाचे नामोनिशाण सुद्धा नाही. संपूर्ण दिवसभर अशा गोष्टी बुद्धीमध्ये फिरत राहिल्या पाहिजेत. बाबांना किती काळजी असते. बंधनवाल्या माता विषासाठी (विकारासाठी) किती मार खातात. काही तर मोहवश होऊन मग अडकून पडतात. निश्चयबुद्धीवाले झटक्यात सांगतील - आम्हाला अमृत प्यायचे आहे; यासाठी नष्टोमोहा असणे जरुरी आहे. जुन्या दुनियेचा विट आला पाहिजे. तेच सर्विसेबल (सेवा योग्य) हृदयात स्थान मिळवू शकतात. त्यांना आश्रय देऊ शकतात. कन्या पतीचा आश्रय घेते, मग विषा शिवाय (विकारा शिवाय) राहू देत नाहीत. तर मग बाबांचा आश्रय घ्यावा लागतो. परंतु एकदम नष्टोमोहा असले पाहिजे. पतींचाही पती मिळाला आहे आता मी त्यांच्यासोबत आपल्या बुद्धी योगाने सगाई करते. बस, मेरा तो एक दूसरा न कोई. जसे कन्येचे पतीवर प्रेम जडते, हे तर आहे आत्म्याचे प्रेम परमात्म्यावर. त्यांच्या पासून दुःख मिळते, यांच्यापासून सुख मिळते. हा आहे संगम, याला कोणीही जाणत नाहीत. तुम्हाला किती आनंद झाला पाहिजे. आम्हाला खिवैया अथवा बागवान मिळाला आहे, जो आम्हाला फुलांच्या बगीच्यामध्ये घेऊन जातो. या समयी सर्व मनुष्य काट्याप्रमाणे बनले आहेत. सर्वात मोठा काटा आहे काम विकाराचा. आधी तुम्ही निर्विकारी फुल होता, हळूहळू कला कमी झाल्या, आता तर मोठे काटे बनले आहात. बाबांना बबुलनाथ देखील म्हणतात. तुम्ही जाणता खरे नाव शिव आहे. बबुलनाथ नाव ठेवतात कारण काट्यांना फुल बनवितात. भक्ती मार्गामध्ये खूप नावे ठेवतात. वास्तविक नाव एकच शिव आहे. रुद्र ज्ञान यज्ञ किंवा शिव ज्ञान यज्ञ गोष्ट एकच आहे. रुद्र यज्ञामधून विनाश ज्वाला प्रकटली आणि श्रीकृष्णपुरी किंवा आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना झाली. तुम्ही या यज्ञाद्वारे मनुष्यापासून देवता बनता. चित्र देखील वंडरफुल बनवतात. विष्णूच्या नाभीतून ब्रह्मा आले. या सर्व गोष्टी तुम्ही जाणता की ब्रह्मा-सरस्वतीच लक्ष्मी-नारायण बनतात. हा निश्चय आहे. लक्ष्मी-नारायणच ८४ जन्मा नंतर ब्रह्मा-सरस्वती बनतात. मनुष्य तर या गोष्टी ऐकून संभ्रमित होत असतील. आनंद देखील होत असणार. परंतु माया काही कमी नाहीये. काम महाशत्रू आहे. माया नावा-रूपामध्ये अडकवून खाली पाडते. बाबांची आठवण करू देत नाही. मग तो आनंद कमी होत जातो. यामध्ये खुश व्हायचे नाहीये की मी बऱ्याच जणांना समजावून सांगतो, पहिले तर हे पहायचे आहे की मी बाबांची किती आठवण करतो. रात्री बाबांची आठवण करून झोपतो की विसरून जातो. काही मुले तर नेमाने पक्के आहेत.

तुम्ही मुले खूप भाग्यवान आहात. बाबांवर तर पुष्कळ जबाबदारी आहे. परंतु तरीही रथाला रियायत (सवलत) मिळते. ज्ञान आणि योग देखील आहे, त्याशिवाय लक्ष्मी-नारायण पद कसे प्राप्त करू शकणार. आनंद तर असतोच, मी एकटा बाबांचा मुलगा आहे आणि मग माझी खूप सारी मुले आहेत, हा अभिमान देखील आहे तर माया विघ्न देखील टाकत असते. मुलांना देखील मायेची विघ्नं येत असणार. कर्मातीत अवस्था पुढे जाऊन येणार आहे. हे बापदादा दोघेही एकत्र आहेत. म्हणतात - गोड-गोड मुलांनो बाबा तर प्रेमाचा सागर आहेत. यांचे आत्मे एकत्र आहेत. हे सुद्धा (ब्रह्माबाबा देखील) प्रेम करतात. समजतात - जसे कर्म मी करणार, मला पाहून दुसरे देखील करतील. अतिशय गोड होऊन रहायचे आहे. मुले खूप हुशार पाहिजेत. या लक्ष्मी-नारायणामध्ये पहा किती सुज्ञपणा आहे. सुज्ञपणानेच विश्वाचे राज्य घेतले आहे. प्रदर्शनीमधून प्रजा तर खूप बनते. भारत खूप मोठा आहे, तेवढी सेवा करायची आहे. दुसरे म्हणजे आठवणीमध्ये राहून विकर्म विनाश करायची आहेत. ही आहे खूप चिंतेची बाब. आपण तमोप्रधाना पासून सतोप्रधान कसे बनावे? यामध्ये मेहनत आहे. सेवेचे खूप चान्स आहेत. ट्रेनमध्ये बॅचवर सेवा करू शकता - हे बाबा, हा वारसा. खरोखर पाच हजार वर्षांपूर्वी भारत स्वर्ग होता. लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. तर जरूर पुन्हा यांचे राज्य आले पाहिजे. आम्ही बाबांच्या आठवणीने पावन दुनियेचे मालक बनत आहोत. ट्रेनमध्ये खूप सेवा होऊ शकते. एका डब्यात सेवा करून मग दुसऱ्या डब्यात गेले पाहिजे. अशी सेवा करणाराच बाबांच्या हृदयामध्ये स्थान मिळवू शकेल. तुम्ही बोला - आम्ही तुम्हाला खुशखबरी ऐकवत आहोत. तुम्ही पूज्य देवता होता मग ८४ जन्म घेऊन पुजारी बनलात. आता पुन्हा पूज्य बना. शिडीचे चित्र चांगले आहे, यावरून सतो, रजो, तमो स्टेजेस सिद्ध करायच्या आहेत. शाळेमध्ये वर्षा अखेरीस अभ्यासातील अंतर भरून काढण्याचा छंद असतो. आता इथे देखील समजावून सांगितले जाते ज्यांनी वेळ वाया घालवला आहे, त्यांनी पुरुषार्थामधील अंतर भरून काढून सेवेला लागले पाहिजे. सेवेची संधी खूप आहे. सेवायोग्य मुली भरपूर तयार झाल्या पाहिजेत, ज्यांना बाबा कुठेही पाठवू शकतील. मंदिरांमध्ये चांगली सेवा होईल. देवता धर्मवाले लगेच समजतील. गंगास्नाना विषयी देखील तुम्ही समजावून सांगू शकता, तर हृदयाला स्पर्श करेल. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) सदैव आनंदी राहण्यासाठी रुहानी सेवा करायची आहे, सच्ची कमाई करायची आहे आणि करुन घ्यायची आहे. आपले आणि दुसऱ्यांचे कल्याण करायचे आहे. ट्रेनमध्ये बॅचवर सेवा करायची आहे.

२) जुन्या दुनियेमधून आपले मन काढून टाकायचे आहे. नष्टोमोहा बनायचे आहे, एका बाबांवरच खरे प्रेम करायचे आहे.

वरदान:-
संगम युगाच्या महत्त्वाला जाणून नेहमी विषेश अटेन्शन ठेवणारे हिरो पार्टधारी भव

प्रत्येक कर्म करत असताना सदैव हेच वरदान आठवणीत रहावे की, मी हिरो पार्टधारी आहे, त्यामुळे प्रत्येक कर्म विषेश होईल, प्रत्येक सेकंद, प्रत्येक क्षण, प्रत्येक संकल्प श्रेष्ठ होईल. असे म्हणू शकत नाही की हे साधारण कर्म तर फक्त पाचच मिनिटे झाले. संगम युगाची पाच मिनिटे देखील खूप महत्वपूर्ण आहेत. पाच मिनिटे पाच वर्षांपेक्षा देखील जास्त आहेत; म्हणून प्रत्येक क्षणाला इतके अटेन्शन असावे. कायमचे राज्यभाग्य प्राप्त करायचे असेल तर कायमचे अटेन्शन देखील असावे.

बोधवाक्य:-
ज्यांच्या संकल्पामध्ये दृढतेची शक्ती आहे, त्यांच्यासाठी प्रत्येक कार्य संभव आहे.