08-04-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - या डोळ्यांनी जे काही बघता - ते सर्व नष्ट होणार आहे, म्हणूनच यापासून बेहदचे वैराग्य, बाबा तुमच्यासाठी नवीन दुनिया बनवत आहेत”

प्रश्न:-
तुम्हा मुलांच्या सायलेन्समध्ये कोणते रहस्य सामावलेले आहे?

उत्तर:-
तुम्ही जेव्हा सायलेन्समध्ये बसता तेव्हा शांतीधामची आठवण करता. तुम्ही जाणता सायलेन्स अर्थात जिवंतपणी मरणे. इथे बाबा तुम्हाला सद्गुरूच्या रूपामध्ये सायलेन्समध्ये रहायला शिकवतात. तुम्ही सायलेन्समध्ये राहून आपल्या विकर्मांना भस्म करता. तुम्हाला ज्ञान आहे की आता घरी जायचे आहे. दुसऱ्या सत्संगांमध्ये शांतीमध्ये तर बसतात परंतु त्यांना शांतीधामचे ज्ञानच नाहीये.

ओम शांती।
गोड-गोड सिकीलध्या रुहानी मुलांप्रती शिवबाबा बोलत आहेत. गीतेमध्ये आहे - ‘श्रीकृष्ण म्हणाले’, परंतु आहे - ‘शिवबाबा म्हणाले’, श्रीकृष्णाला ‘बाबा’ म्हणू शकत नाही. भारतवासीयांना माहिती आहे की, पिता दोन असतात लौकिक आणि पारलौकिक. पारलौकिकला ‘परमपिता’ म्हटले जाते. लौकिक पित्याला परमपिता म्हणू शकत नाही. तुम्हाला हे कोणी लौकिक पिता सांगत नाही आहेत. पारलौकिक बाबा पारलौकिक मुलांना समजावून सांगत आहेत. सर्वप्रथम तुम्ही जाता शांतीधाममध्ये, ज्याला तुम्ही मुक्तीधाम, निर्वाणधाम किंवा वानप्रस्थ सुद्धा म्हणता. आता बाबा म्हणतात - ‘मुलांनो, आता जायचे आहे शांतीधाममध्ये’. त्यालाच फक्त म्हटले जाते टॉवर ऑफ सायलेन्स (शांतीचा मनोरा). इथे बसलेल्यांना सर्वात आधी शांतीमध्ये बसायचे आहे. कुठल्याही सत्संगामध्ये सर्वप्रथम शांतीमध्येच बसतात, परंतु त्यांना शांतीधाम विषयीचे ज्ञान नाही आहे. मुले जाणतात, आम्हा आत्म्यांना या जुन्या शरीराला सोडून घरी जायचे आहे. कोणत्याही वेळी शरीर सुटेल त्यामुळे आता बाबा जे शिकवत आहेत, ते चांगल्या रीतीने शिकायचे आहे. ते सुप्रीम टीचर सुद्धा आहेत. सद्गती दाता गुरु देखील आहेत, त्यांच्याशी योग लावायचा आहे. हे एकटेच तिन्ही सेवा करतात. इतर कोणीही असे एकटेच तिन्ही सेवा करू शकणार नाही. हे एक बाबाच शांती सुद्धा शिकवतात. जिवंतपणी मरण्यालाच सायलेन्स म्हटले जाते. तुम्ही जाणता आता आपल्याला शांतीधाम घरी जायचे आहे. जोपर्यंत आत्मा पवित्र बनत नाही, तोपर्यंत कोणीही घरी परत जाऊ शकत नाही. जायचे तर सर्वांनाच आहे म्हणूनच तर शेवटी पाप कर्मांची शिक्षा मिळते आणि पद सुद्धा भ्रष्ट होते. मानहानी आणि सजा सुद्धा खावी लागते कारण मायेकडून हरतात. बाबा येतातच मायेवर विजय मिळवून देण्यासाठी. परंतु निष्काळजीपणामुळे बाबांची आठवण करत नाहीत. इथे तर एका बाबांचीच आठवण करायची आहे. भक्तिमार्गामध्ये सुद्धा खूप भटकतात, ज्यांच्या समोर डोके टेकतात त्यांनाच जाणत नाहीत. बाबा येऊन भटकण्यापासून सोडवतात. समजावून सांगितले जाते - ज्ञान आहे दिवस, भक्ती आहे रात्र. रात्रीचेच धक्के खाल्ले जातात (त्रास सहन करावा लागतो). ज्ञानामुळे दिवस अर्थात सतयुग-त्रेता. भक्ती म्हणजे रात्र अर्थात द्वापर-कलीयुग. हा आहे संपूर्ण ड्रामाचा (सृष्टी चक्राचा) कालावधी. अर्धा कालावधी दिवस असतो, अर्धा कालावधी रात्र असते. प्रजापिता ब्रह्माकुमार-कुमारींचा दिवस आणि रात्र. ही बेहदची गोष्ट आहे. बेहदचे बाबा बेहदच्या संगमावर येतात, म्हणून म्हटले जाते - ‘शिवरात्री’. मनुष्य हे समजत नाहीत की शिवरात्री कशाला म्हटले जाते? तुमच्याव्यतिरिक्त एकही कोणी शिवरात्रीचे महत्त्व जाणत नाही कारण हा आहे मध्य. जेव्हा रात्र पूर्ण होऊन, दिवस सुरू होतो, याला म्हटले जाते पुरुषोत्तम संगमयुग. जुनी दुनिया आणि नवीन दुनियेचा मध्य. बाबा येतातच पुरुषोत्तम संगमयुगे-युगे. असे युगे-युगे नाही. सतयुग-त्रेताचा संगम त्याला देखील संगमयुग म्हणतात. बाबा म्हणतात - ही चूक आहे.

शिवबाबा म्हणतात - ‘माझी आठवण करा तर पापे भस्म होतील, यालाच ‘योग-अग्नी’ म्हटले जाते’. तुम्ही सर्व ब्राह्मण आहात. तुम्ही योग शिकवता पवित्र होण्यासाठी. ते ब्राह्मण लोक काम चितेवर चढवतात. त्या ब्राह्मणांमध्ये आणि तुम्हा ब्राह्मणांमध्ये रात्रं-दिवसाचा फरक आहे. ते आहेत कुख वंशावळी, तुम्ही आहात मुख वंशावळी. प्रत्येक गोष्ट चांगल्या रीतीने समजून घ्यायची आहे. असे तर कोणीपण येतात तर त्यांना समजावून सांगितले जाते की, ‘बेहदच्या बाबांची आठवण करा तर विकर्म विनाश होतील आणि बेहदच्या बाबांचा वारसा मिळेल’. मग जितके-जितके दैवी गुण धारण कराल आणि करवून घ्याल तितके उच्च पद प्राप्त कराल. बाबा येतातच पतितांना पावन बनविण्यासाठी. तर तुम्हाला सुद्धा ही सेवा करायची आहे. पतित तर सर्वच आहेत. गुरु लोक कोणालाही पावन बनवू शकत नाहीत. पतित-पावन नाव शिवबाबांचे आहे. ते येतात सुद्धा इथेच. जेव्हा ड्रामा प्लॅन अनुसार सर्वजण संपूर्ण पतित बनतात, तेव्हा बाबा येतात. सर्वात पहिले तर मुलांना अल्फ विषयी समजावून सांगतात. माझी आठवण करा. तुम्ही म्हणता ना ते पतित-पावन आहेत. रुहानी बाबांना म्हटले जाते पतित-पावन. फक्त म्हणतात - ‘हे भगवान किंवा हे बाबा’. परंतु त्यांचा परिचय कोणालाच नाहीये. आता तुम्हा संगम वासीयांना परिचय मिळाला आहे. ते आहेत नरक वासी. तुम्ही नरक वासी नाही आहात. हो, जर कोणी मायेकडून हार खातो तर एकदम कोसळतोच (अधःपतन होते). केलेली कमाई नाहीशी होऊन जाते. मुख्य गोष्ट आहे पतिता पासून पावन बनण्याची. ही आहेच विशश (विकारी) दुनिया. ती आहे निर्विकारी दुनिया, नवीन दुनिया, जिथे देवता राज्य करतात. आता तुम्हा मुलांना माहित झाले आहे. सर्वात पहिले आणि सर्वात जास्त देवताच जन्म घेतात. त्यामध्ये देखील आधीचे जे सूर्यवंशी आहेत ते आधी येतात, २१ पिढीचा वारसा मिळवतात. किती बेहदचा वारसा आहे - पवित्रता-सुख-शांतीचा. सतयुगाला संपूर्ण सुखधाम म्हटले जाते. त्रेता आहे सेमी कारण दोन कला कमी होतात. कला कमी झाल्यामुळे दिव्यत्वाचा प्रकाश कमी होतो. चंद्राच्या सुद्धा कला कमी झाल्या कि प्रकाश कमी होतो. शेवटी मग बारीक रेष मागे शिल्लक राहते. निल (पूर्ण नाहीसा) होत नाही. तुमचे देखील असेच आहे - निल (सर्व कला नष्ट) होत नाहीत. यालाच म्हटले जाते - पिठात मीठ.

बाबा आत्म्यांना बसून समजावून सांगत आहेत. हा आहे परमात्मा आणि आत्म्यांचा मेळा. हे बुद्धीने समजले जाते. परमात्मा केव्हा येतात? जेव्हा पुष्कळ सारे आत्मे किंवा पुष्कळ मनुष्य होतात तेव्हा परमात्मा मेळाव्यामध्ये येतात. आत्म्यांचा आणि परमात्म्याचा मेळावा कशासाठी भरतो? ते मेळावे तर मलीन (पतित) होण्यासाठी आहेत. या समयी तुम्ही बागवानाद्वारे (माळी द्वारे) काट्या पासून फूल बनत आहात. कसे बनता? आठवणीच्या बळाने. बाबांना म्हटले जाते सर्वशक्तिमान. जसे बाबा सर्वशक्तिमान आहेत तसे रावण देखील काही कमी शक्तिमान नाहीये. बाबा स्वतःच म्हणतात - माया खूप शक्तिशाली आहे, निर्दय आहे. मुले म्हणतात - ‘बाबा, आम्ही तुमची आठवण करतो, माया आमचे आठवण करणेच विसरायला लावते’. एकमेकांचे शत्रू झाले ना. बाबा येऊन मायेवर विजय मिळवून देतात, माया पुन्हा हरवून टाकते. देवता आणि असुरांचे युद्ध दाखवले आहे. परंतु असे काही कोणी नाहीये. युद्ध तर हे आहे. तुम्ही बाबांची आठवण केल्याने देवता बनता. माया आठवणीमध्ये विघ्न आणते, अभ्यासामध्ये विघ्न आणत नाही. आठवणीमध्येच विघ्न पडतात. क्षणोक्षणी माया विसरायला लावते. देह-अभिमानी बनल्यामुळे मायेची थप्पड बसते. जे ‘कामी’ असतात त्यांच्यासाठी खूप कठोर शब्द वापरले जातात. हे आहेच रावण राज्य. इथे देखील समजावून सांगितले जाते की, पावन बना तरी देखील बनत नाहीत. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, विकारामध्ये जाऊ नका, तोंड काळे करू नका. तरी देखील लिहितात - ‘बाबा, मायेने हरवले अर्थात तोंड काळे करून बसलो’. गोरा आणि सावळा आहेत ना. विकारी - काळे आणि निर्विकारी - गोरे असतात. श्याम-सुंदरचा अर्थ देखील तुम्हा मुलांशिवाय दुनियेमध्ये कोणीही जाणत नाही. श्रीकृष्णाला सुद्धा श्याम-सुंदर म्हणतात. बाबा त्यांच्याच नावाचा अर्थ समजावून सांगत आहेत की, श्रीकृष्ण स्वर्गाचा पहिल्या नंबरचा राजकुमार होता. सुंदरतेमध्ये (पवित्रतेमध्ये) नंबर वन हे (ब्रह्मा बाबा) पास होतात. मग पुन्हा जन्म घेता-घेता खाली उतरता-उतरता काळे बनतात. त्यामुळे नाव ठेवले आहे - श्याम-सुंदर. हा अर्थ देखील बाबा समजावून सांगतात. शिवबाबा तर आहेतच एव्हर सुंदर (सदा पावन). ते येऊन तुम्हा मुलांना सुंदर बनवितात. पतित - काळे आणि पावन - सुंदर असतात. नैसर्गिक सौंदर्य असते. आपण स्वर्गाचा मालक बनावे म्हणून तुम्ही मुले आले आहात. गायन देखील आहे - ‘शिव भगवानुवाच’, माता स्वर्गाचे दार उघडतात म्हणून वंदे मातरम् असे गायले जाते. वंदे मातरम् तर त्यातच पित्याची देखील महिमा आहे. बाबा मातांची महिमा खूप वाढवतात. आधी लक्ष्मी, नंतर नारायण. इथे (जुन्या दुनियेमध्ये) आधी मिस्टर, नंतर मिसेस. ड्रामाचे रहस्य असे बनलेले आहे. बाबा रचयिता सर्वप्रथम आपला परिचय देतात. एक आहेत हदचे लौकिक पिता, दुसरे आहेत बेहदचे पारलौकिक पिता. बेहदच्या पित्याची आठवण करतात कारण त्यांच्याकडून बेहदचा वारसा मिळतो. हदचा वारसा मिळाला तरी देखील बेहदच्या बाबांची आठवण करतात. म्हणतात - ‘बाबा, तुम्ही याल तर आम्ही इतर सर्व संग सोडून फक्त तुमच्याशीच जोडू’. हे कोणी म्हटले? आत्म्याने. आत्माच या कर्मेंद्रियांद्वारे पार्ट बजावते. प्रत्येक आत्मा जसे-जसे कर्म करते तसा-तसा जन्म घेते. श्रीमंत गरीब बनतात. कर्म आहे ना. हे लक्ष्मी-नारायण विश्वाचे मालक आहेत. यांनी काय केले, हे तर तुम्हीच जाणता आणि तुम्हीच समजावून सांगू शकता.

बाबा म्हणतात - या डोळ्यांनी तुम्ही जे काही पाहता, त्यापासून वैराग्य. हे तर सर्व नष्ट होणार आहे. जेव्हा नवीन घर बांधतात तेव्हा मग जुन्या घरा विषयी वैराग्य उत्पन्न होते. मुले म्हणतील - ‘बाबांनी नवीन घर बांधले आहे, आम्ही तिथे जाणार’. हे जुने घर तर मोडून जाणार. ही आहे बेहदची गोष्ट. मुले जाणतात बाबा आले आहेत स्वर्गाची स्थापना करण्यासाठी. ही जुनी घाणेरडी दुनिया आहे.

तुम्ही मुले आता त्रिमूर्ती शिवाच्या समोर बसले आहात. तुम्हीच विजय प्राप्त करता. वास्तविक तुमचे हे त्रिमूर्ती कोट ऑफ आर्मस (राजमुद्रा) आहे. तुम्हा ब्राह्मणांचे हे कुळ सर्वात उच्च आहे. शिखर आहे. ही राजाई स्थापन होत आहे. या कोर्ट ऑफ आर्मसला तुम्ही ब्राह्मणच जाणता. शिवबाबा आम्हाला देवी-देवता बनण्यासाठी, ब्रह्मा द्वारा शिकवत आहेत. विनाश तर होणारच आहे. दुनिया तमोप्रधान बनते तेव्हा नैसर्गिक आपत्ती सुद्धा मदत करतात. आपली बुद्धी वापरून वैज्ञानिक अनेक शोध लावत राहतात. मुसळ काही पोटातून निघालेले नाहीये. हा तर विज्ञानाने लावलेला शोध आहे, ज्याने साऱ्या कुळाला नष्ट करतात. मुलांना समजावून सांगितले आहे उच्च ते उच्च आहेत शिवबाबा. पुजा देखील करायची आहे एका शिवबाबांची आणि देवतांची. ब्राह्मणांची पूजा होऊ शकत नाही कारण तुमची आत्मा भले पवित्र आहे, परंतु शरीर तर पवित्र नाही, म्हणून पूजन लायक होऊ शकत नाही. महिमा लायक आहात. मग जेव्हा तुम्ही देवता बनता तेव्हा आत्मा सुद्धा पवित्र आणि शरीर सुद्धा नवीन पवित्र मिळते. या समयी तुम्ही महिमा करण्या लायक आहात. वंदे मातरम्, असे गायले जाते. मातांच्या सेनेने काय केले? मातांनीच श्रीमतावर ज्ञान दिले आहे. माता सर्वांना श्रीमतावर ज्ञान देतात. माता सर्वांना ज्ञान अमृत पाजतात. हे यथार्थपणे तुम्हालाच समजते. शास्त्रांमध्ये तर पुष्कळ कहाण्या लिहिलेल्या आहेत, त्या बसून ऐकवतात आणि तुम्ही सत्-सत् करत राहता. तुम्ही हे बसून ऐकवाल तरी देखील सत्-सत् म्हणतील. तुम्ही काही आता सत्-सत् म्हणणार नाही. मनुष्य तर असे पत्थर बुद्धी आहेत जे ‘सत्-सत्’ म्हणत राहतात. गायन देखील आहे - पत्थरबुद्धी आणि पारस बुद्धी. पारस बुद्धी अर्थात पारसनाथ. नेपाळमध्ये म्हणे पारसनाथचे चित्र आहे. पारसपुरीचे नाथ हे लक्ष्मी-नारायण आहेत. त्यांची डिनायस्टी (घराणे) आहे. आता मूळ गोष्ट आहे रचयिता आणि रचनेच्या रहस्याला जाणणे, ज्यांच्यासाठी ऋषी-मुनी देखील नेती-नेती करत आले आहेत. आता तुम्ही बाबांद्वारे सर्व काही जाणता अर्थात आस्तिक बनता. माया रावण नास्तिक बनवते. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) सदैव स्मृती रहावी की, आम्ही ब्रह्मा मुख वंशावळी ब्राह्मण आहोत, आमचे सर्वात उच्च कुळ आहे. आम्हाला पवित्र बनायचे आहे आणि बनवायचे आहे. पतित पावन बाबांचे मदतगार बनायचे आहे.

२) आठवणीमध्ये कधी निष्काळजीपणा करायचा नाही. देह-अभिमानामुळेच माया आठवणीमध्ये विघ्न आणते म्हणूनच सर्वात पहिले देह-अभिमानाला सोडायचे आहे. योग अग्नी द्वारे पापांना नष्ट करायचे आहे.

वरदान:-
साधनांच्या प्रवृत्तीमध्ये (गोतावळ्यामध्ये) राहून देखील कमलपुष्प समान न्यारे आणि प्यारे राहणारे बेहदचे वैरागी भव

साधने मिळाली आहेत तर त्यांचा खूप मनापासून वापर करा, ही साधने आहेतच आपल्यासाठी, परंतु आपली साधना मर्ज होऊ देऊ नका. संपूर्ण बॅलन्स असावा. साधने काही वाईट नाहीत, साधने तर तुमच्या कर्माचे, योगाचे फळ आहे. परंतु साधनांच्या प्रवृत्ती मध्ये राहत असताना कमलपुष्प समान न्यारे आणि बाबांचे प्रिय बना. वापर करत असूनही त्यांच्या प्रभावामध्ये येऊ नका. साधनांच्या मागे बेहदची वैराग्य वृत्ती मर्ज होऊ नये. सर्वप्रथम स्वतःमध्ये याला इमर्ज करा आणि मग विश्वामध्ये वायुमंडळ पसरवा.

बोधवाक्य:-
त्रस्त असणाऱ्याला आपल्या शानमध्ये (स्वमानामध्ये) स्थित करणे हीच सर्वात चांगली सेवा आहे.