09-02-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो - शिवजयंतीला तुम्ही खूप धूमधडाक्यात निराकार बाबांचे जीवन-चरित्र सर्वांना ऐकवा, ही शिवजयंतीच हीरे तुल्य आहे

प्रश्न:-
तुम्हा ब्राह्मणांची खरी दिवाळी केव्हा आहे आणि कशी होते?

उत्तर:-
वास्तविक शिवजयंतीच तुमच्यासाठी खरी-खरी दिवाळी आहे कारण शिवबाबा येऊन तुम्हा आत्मारूपी दिव्यांना जागृत करतात. प्रत्येकाच्या घरचा दिवा पेटतो अर्थात आत्म्याची ज्योत जागृत होते. ते स्थूल दिवे पेटवतात परंतु तुमचा खरा दिवा शिवबाबांच्या येण्यामुळे जागृत होतो म्हणून तुम्ही धूमधडाक्यात शिवजयंती साजरी करा.

ओम शांती।
गोड-गोड रुहानी मुले शिवजयंती साजरी करतात आणि भारतामध्ये तर शिवजयंती साजरी करतातच. जयंती एकाची साजरी केली जाते. त्यांना मग सर्वव्यापी म्हणतात. आता सर्वव्यापीची जयंती तर होऊ शकत नाही. जयंती केव्हा साजरी केली जाते? जेव्हा गर्भातून बाहेर येतात. शिवजयंती तर जरूर साजरी करतात. आर्यसमाजी सुद्धा साजरी करतात. आता तुम्ही साजरी कराल (२०२४ मध्ये) ८८ वी जयंती, म्हणजे जयंतीला ८८ वर्षे झाली. जन्मदिवस तर सर्वांच्या लक्षात रहातो, अमक्या दिवशी हा गर्भातून बाहेर आला. आता शिवबाबांची तुम्ही ८८ वी जयंती साजरी कराल. ते तर आहेत निराकार, त्यांची जयंती कशी असू शकते? इतक्या मोठ-मोठ्या व्यक्तींना निमंत्रणपत्र पाठवले जाते, कुणीएकाने तरी विचारले पाहिजे ना कि, तुम्ही जयंती कशी साजरी करता? त्यांनी जन्म कधी आणि कसा घेतला? मग त्यांच्या शरीराचे नाव काय ठेवले? परंतु असे पत्थरबुद्धी आहेत जे कधी विचारत सुद्धा नाहीत. तुम्ही त्यांना सांगू शकता - ते आहेत निराकार, त्यांचे नांव आहे शिव. तुम्ही शाळिग्राम मुले आहात. तुम्ही जाणता या शरीरामध्ये शाळिग्राम आहे. नाव शरीराला दिले जाते. ते आहेत परम आत्मा शिव. आता तुम्ही किती धुमधडाक्यात कार्यक्रम ठेवता. दिवसेंदिवस तुम्ही धुमधडाक्यात समजावून सांगत असता की, जेव्हा शिवबाबांची ब्रह्माच्या तनामध्ये प्रवेशता होते, तीच त्यांची जयंती म्हटली जाते. त्यांची तिथी-तारीख कोणती असत नाही. म्हणतात - मी साधारण तनामध्ये प्रवेश करतो. परंतु केव्हा, कोणत्या क्षणी ते सांगत नाहीत. तिथी-तारीख, दिवस इत्यादी सांगितले तर म्हणतील की अमुक तारीख. जन्मपत्रिका इत्यादी तर यांची असत नाही. वास्तविक सर्वात श्रेष्ठ जन्मपत्रिका तर यांची आहे. कर्तव्य देखील यांचे सर्वात श्रेष्ठ आहे. असे म्हणतात - परमेश्वरा तुझी महिमा अपरंपार आहे. तर नक्की काही करत असतील. महिमा तर खूप जणांची गायली जाते. नेहरू, गांधीजी इत्यादी सर्वांची महिमा गातात. यांची (शिव बाबांची) महिमा कोणी सांगू शकणार नाही. तुम्ही समजावून सांगता - ते ज्ञानाचे सागर, शांतीचे सागर आहेत. ते तर एक आहेत ना. मग त्यांना सर्वव्यापी कसे म्हणू शकता? परंतु काहीही समजत नाहीत; आणि तुम्ही साजरी करता त्यामुळे कोणी विचारण्याचे धाडससुद्धा करत नाहीत. नाहीतर विचारले पाहिजे - शिवजयंती साजरी केली जाते, महिमा गायली जाते तर नक्की कोणी होऊन गेले आहेत. भक्त लोक खूप आहेत. जर सरकारला मान्य नसेल तर भक्तांची, साधूंची, गुरूंची तिकिटे सुद्धा बनवू नका. जसे सरकार, तशी रयत (प्रजा). आता तुम्हा मुलांना बाबांच्या बायोग्राफी विषयी (जीवन-चरित्रा विषयी) देखील चांगल्या प्रकारे माहित झाले आहे. तुम्हाला जेवढा अभिमान असतो, तेवढा बाकी कोणाला असू शकत नाही. तुम्हीच म्हणता - शिवजयंती हीरे तुल्य आहे, बाकी सर्व जयंत्या कवडी तुल्य (तुच्छ) आहेत. बाबाच येऊन कवडी पासून हीरे तुल्य बनवतात. श्रीकृष्णदेखील बाबांमुळेच इतका श्रेष्ठ बनला म्हणून त्याचा जन्म हीरे तुल्य म्हटला जातो. आधी कवडी तुल्य असणार मग हीरे तुल्य बाबांनी बनवला आहे. या गोष्टी मनुष्य जाणत नाहीत. त्याला (श्रीकृष्णाला) असा विश्वाचा राजकुमार कोणी बनवला? तर हे देखील समजावून सांगितले पाहिजे - श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करतात. मुलगा तर मातेच्या गर्भातूनच बाहेर आला. त्याला टोपलीतून घेऊन गेले. आता श्रीकृष्ण तर विश्वाचा राजकुमार होता मग त्याला भिती कशाची? तिथे कंस वगैरे कुठून आला? या सर्व गोष्टी शास्त्रांमध्ये लिहून ठेवल्या आहेत. आता तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे समजावून सांगितले पाहिजे. समजावून सांगण्याच्या युक्त्या खूप चांगल्या पाहिजेत. सर्वच काही एकसारखे शिकवू शकत नाहीत. तर्कशुद्ध पद्धतीने समजावून सांगितले न गेल्याने मग अजूनच डिससर्व्हिस होते.

आता शिवजयंती साजरी केली जाते तर जरूर शिवचीच महिमा करणार. गांधी जयंतीला गांधीजींचीच महिमा करणार. इतर काहीच सुचणार नाही. आता तुम्ही शिवजयंती साजरी करता तर नक्की त्यांची महिमा, त्यांची बायोग्राफी अथवा जीवन-चरित्र देखील असेल. तुम्ही त्या दिवशी त्यांचेच जीवन-चरित्र बसून ऐकवा. जसे बाबा म्हणतात - कोणी मनुष्य विचारतही नाही की शिवजयंती कशी सुरू झाली? त्याचे काहीही वर्णन नाहीये. त्यांची महिमा तर अपरंपार गायली जाते. शिवबाबांना भोलानाथ म्हणत खूप महिमा करतात. ते तर भोला भंडारी आहेत आणि ती लोकं (दुनियावाले) शिव-शंकर म्हणतात. शंकराला भोलानाथ समजतात. वास्तविक भोलानाथ तर शंकर काही वाटत नाही. त्याच्यासाठी तर म्हणतात नेत्र उघडला आणि विनाश झाला, धोत्रा खातात त्यांना मग भोला-नाथ कसे म्हणू शकणार. महिमा तर एकाचीच असते. तुम्हाला शिवच्या मंदिरा मध्ये जाऊन समजावून सांगितले पाहिजे. तिथे भरपूर लोक येतात तर शिवचे जीवन-चरित्र ऐकवायचे आहे. म्हणतात - भोला भंडारी शिवबाबा. आता शिव आणि शंकर यांच्यामधील फरक देखील तुम्हीच सांगितला आहे. शिवची पूजा होते शिवच्या मंदिरामध्ये. तर तिथे जाऊन तुम्हाला शिवची जीवन-कहाणी सांगायची आहे. जीवन-कहाणी शब्द ऐकून कोणाचे डोकेच फिरेल की, शिवची जीवन-कहाणी कशी सांगणार? तर मनुष्य अद्भुत गोष्ट समजून खूप येतील. सांगा, निमंत्रणा प्रमाणे जे येतील त्यांना आम्ही निराकार परमपिता परमात्म्याची जीवन-कहाणी सांगू. गांधी इत्यादींचे देखील बायोग्राफी (जीवन-चरित्र) ऐकतात ना. आता तुम्ही शिवची महिमा कराल तर मनुष्यांच्या बुद्धीतून सर्वव्यापीची गोष्ट निघून जाईल. एकाची महिमा मग दुसऱ्याशी मेळ खाऊ शकत नाही. हा जो मंडप बनवतात किंवा प्रदर्शन भरवतात, ते काही शिवाचे मंदिर तर नाहीये. तुम्ही जाणता खरेखुरे शिवचे मंदिर वास्तविक हे आहे, जिथे रचता स्वतः बसून रचता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य समजावून सांगतात. तुम्ही लिहू शकता - रचयित्याची जीवन कहाणी आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य किंवा इतिहास सांगू. हिंदी-इंग्रजीमध्ये लिहा. मोठ-मोठ्या लोकांकडे जाल तर ते आश्चर्यचकित होतील की हे कोण आहेत जे परमपिता परमात्म्याचे जीवन-चरित्र सांगतात. तुम्ही फक्त रचनेबद्दल सांगाल तर समजतील की, प्रलय झाला आणि मग नवीन रचना रचली. परंतु नाही, तुम्हाला तर समजावून सांगायचे आहे - बाबा येऊन पतितांना पावन बनवतात, तर मनुष्य आश्चर्यचकित होतील. शिवच्या मंदिरात देखील भरपूर येतील. हॉल किंवा मंडप मोठा असला पाहिजे. भले तुम्ही प्रभात फेरी काढता, त्यातदेखील हे लक्ष्मी-नारायणाचे राज्य कोणी स्थापन केले, हे त्यांना समजावून सांगायचे आहे. निराकार शिवबाबा जे सर्व आत्म्यांचे पिता आहेत तेच येऊन राजयोग शिकवतात. अशा प्रकारे विचार सागर मंथन केले पाहिजे की, शिवच्या मंदिरात जाऊन कशा प्रकारे सेवा केली पाहिजे. शिवच्या मंदिरामध्ये सकाळी पूजा करतात, घंटा वगैरे सकाळी वाजतात. शिवबाबा देखील पहाटेच्या वेळी येतात. अर्ध्या रात्री म्हणणार नाही. त्या वेळी तुम्ही ज्ञान सुद्धा ऐकवू शकणार नाही कारण मनुष्य झोपलेले असतात. तरीही रात्रीचा मनुष्यांना मोकळा वेळ असतो. दिवा-बत्ती इत्यादी सुद्धा लागतात. उजेड सुद्धा चांगला केला पाहिजे. शिवबाबा येऊन तुम्हा आत्म्यांना जागे करतात. खरी दीवाळी तर ही आहे, प्रत्येकाच्या घरातील दिवा पेटतो अर्थात आत्म्याची ज्योत जागी होते. ते तर घरामध्ये स्थूल दिवा पेटवतात. परंतु दीपावलीचा खरा अर्थ हा आहे. कोणा-कोणाचा दिवा तर अजिबातच जागा होत नाही. तुम्ही जाणता आपला दिवा कसा जागृत होतो? कोणी मेल्यावर दिवा पेटवतात की अंधार होऊ नये. परंतु पहिले आत्म्याचा दिवा तर जागृत झाला पाहिजे तेव्हा अंधार होणार नाही. नाहीतर मनुष्य घोर अंधारामध्ये आहेत. आत्मा तर सेकंदात एक शरीर सोडून दुसरे घेते. यामध्ये अंधार इत्यादीची काही गोष्टच नाही. हा भक्तीमार्गातील रिवाज आहे. तूप संपल्यामुळे दिवा विझतो. अंधाराचा अर्थ सुद्धा काहीच समजत नाहीत. पितरांना खायला घालण्याचा देखील अर्थ समजत नाहीत. पूर्वी आत्म्यांना बोलावत असत, काही विचारत असत. आता इतके काही करत नाहीत. इथेसुद्धा येतात. कधीकधी काही बोलतात. विचारा - तु सुखी आहेस? तर म्हणेल - होय आहे. ते तर इथून जे जातील ते नक्कीच चांगल्या घरातच जन्म घेतील. जन्म जरूर अज्ञानीच्या घरी घेतील. ज्ञानीच्या घरामध्ये तर जन्म घेऊ शकणार नाहीत कारण ज्ञानी ब्राह्मण तर विकारामध्ये जाऊ शकत नाही. तो तर पवित्र आहे. बाकी हो, चांगल्या सुखी घरामध्ये जाऊन जन्म घेतील. विवेक देखील म्हणतो - जशी अवस्था, तसा जन्म. मग तिथे आपला करिष्मा दाखवतात. भले शरीर छोटे आहे त्यामुळे बोलू शकत नाहीत. थोडे मोठे झाल्यावर ज्ञानाचा प्रभाव जरूर दाखवतात. जसे काहीजण शास्त्रांचे संस्कार घेऊन जातात तर लहानपणा पासूनच त्यामध्ये गुंतून जातात, इथून देखील ज्ञान घेऊन जातात तर निश्चितच महिमा होईल.

तुम्ही शिवजयंती साजरी करता. परंतु ती लोक काही अर्थ समजू शकत नाहीत. विचारले पाहिजे - जर ते सर्वव्यापी आहेत तर जयंती कशी साजरी करणार? आता तुम्ही मुले शिकत आहात. तुम्ही जाणता ते पिता देखील आहेत, शिक्षक देखील आहेत, सद्गुरू देखील आहेत. बाबांनी सांगितले आहे शिख लोकसुद्धा म्हणतात - सत् श्री अकाल आहेत. आता खरे पाहता अकालमूर्त तर सर्व आत्मे आहेत परंतु एक शरीर सोडून दुसरे घेतात म्हणून जन्म-मरण म्हटले जाते. आत्मा तर तीच आहे. आत्मा ८४ जन्म घेते. कल्प जेव्हा पूर्ण होते तेव्हा स्वतः येऊन सांगतात की, मी कोण आहे? मी कसा यांच्यामध्ये प्रवेश करतो? ज्यामुळे तुम्ही आपणहून समजून जाता. आधी समजत नव्हता. हो, परमात्म्याची प्रवेशता आहे परंतु कशी, केव्हा झाली, या पैकी काही समजत थोडेच होते? दिवसेंदिवस तुमच्या बुद्धीमध्ये या गोष्टी येत राहतात. नव्या-नव्या गोष्टी तुम्ही ऐकत रहाता. पूर्वी थोडेच दोन पित्यांचे रहस्य समजावून सांगत होता? सुरुवातीला तर जणू छोटी बाळे होती. आतासुद्धा बरेचजण म्हणतात - बाबा, मी तुमचे दोन दिवसांचे बाळ आहे. इतक्या दिवसांचे बाळ आहे. समजता की जे काही घडते ते कल्पा पूर्वीप्रमाणेच होते. यामध्ये खूप ज्ञान आहे. समजण्यासाठी देखील वेळ लागतो. जन्म घेऊन मग मरून सुद्धा जातात. दोन महिने, ८ महिन्यांचे होऊन मरून सुद्धा जातात. तुमच्याकडे येतात म्हणतात - हे बरोबर आहे. ते आमचे पिता आहेत, आम्ही त्यांची संतान आहोत. हो-हो म्हणतात. मुले लिहितात देखील - खूप प्रभावित होतात. मग बाहेर गेला आणि खलास, मेला. परत येतच नाहीत तर काय होणार? एक तर शेवटास येऊन रिफ्रेश होईल नाहीतर प्रजेमध्ये येईल... या सर्व गोष्टी समजावून सांगायच्या आहेत. आपण शिवजयंती कशी साजरी करतो? शिवबाबा कशी सद्गती देतात? शिवबाबा स्वर्गाची सौगात घेऊन येतात. स्वतः म्हणतात - मी तुम्हाला राजयोग शिकवितो. विश्वाचा मालक बनवतो. बाबा तर आहेतच स्वर्गाचे रचयिता तर जरूर स्वर्गाचाच मालक बनवतील. आम्ही त्यांचे जीवन-चरित्र सांगतो. कशी स्वर्गाची स्थापना करतात, कसा राजयोग शिकवतात, ते येऊन शिका. जसे बाबा समजावून सांगतात, तसे मुले समजावून सांगू शकत नाहीत काय? यासाठी खूप चांगला समजावून सांगणारा पाहिजे. शिवच्या मंदिरामध्ये खूप छान साजरी करतात, तिथे जाऊन समजावून सांगितले पाहिजे. लक्ष्मी-नारायणाच्या मंदिरामध्ये जर शिवची जीवन कहाणी ऐकवाल तर कोणालाही आवडणार नाही. लक्षात येणार नाही. मग त्यांच्या बुद्धीमध्ये चांगल्या प्रकारे बसवावे लागेल. लक्ष्मी-नारायणाच्या मंदिरामध्ये खूप येतात. त्यांना लक्ष्मी-नारायण, राधे-कृष्णाचे रहस्य समजावून सांगू शकता. त्यांची वेगवेगळी मंदिरे असता कामा नये. श्रीकृष्ण जयंतीला तुम्ही श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये जाऊन समजावून सांगाल - कृष्णच गोरा, कृष्ण सावळा असे का म्हटले जाते? म्हणतात खेड्यातला मुलगा. खेड्यात तर गायी-बकऱ्या चरवत असतील ना. बाबांना (ब्रह्मा बाबांना) जाणीव होते कि, मी देखील खेड्यातला होतो. ना टोपी, ना चप्पल. आता आठवते आहे मी काय होतो मग बाबांनी प्रवेश केला आहे. तर हे बाबांचे लक्ष्य सर्वांना मिळावे की, शिवबाबांची आठवण करा तेच सद्गती दाता आहेत. तुम्ही रामचंद्राची जीवन कहाणी सांगू शकता. केव्हापासून त्यांचे राज्य सुरू झाले, किती वर्ष होते. अशा प्रकारे विचार आले पाहिजेत. शिवच्या मंदिरामध्ये शिवची बायोग्राफी (जीवन-चरित्र) सांगावे लागेल. लक्ष्मी-नारायणाच्या मंदिरामध्ये लक्ष्मी-नारायणाची महिमा करावी लागेल. रामाच्या मंदिरामध्ये जाल तर रामाची जीवन कहाणी ऐकवाल. आता तुम्ही पुरुषार्थ करत आहात देवी-देवता धर्म स्थापन करण्याचा. हिन्दू धर्म तर कोणीही स्थापन केलेला नाहीये. परंतु हिंदू काही धर्म नाहीये - हे सरळ म्हटल्याने रागावतील. समजतील हे कोणी ख्रिश्चन आहेत. तुम्ही सांगा आम्ही आदि सनातन देवी-देवता धर्माचे आहोत ज्याला आजकाल हिंदू म्हटले आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) शिवजयंती धूमधडाक्यात साजरी करा. शिवबाबांच्या मंदिरामध्ये शिवाचे आणि लक्ष्मी-नारायणाच्या मंदिरामध्ये लक्ष्मी-नारायणाचे किंवा राधे-कृष्णाचे जीवन-चरित्र ऐकवा. सर्वांना तर्क शुद्धपणे स्पष्टीकरण द्या.

२) अज्ञानाच्या अंधारापासून वाचण्यासाठी आत्मा रूपी दिव्याला ज्ञानरूपी तुपाने सदैव प्रज्वलित ठेवायचे आहे. इतरांना देखील अज्ञान-अंधारातून बाहेर काढायचे आहे.

वरदान:-
सर्व खनिन्यांनी सम्पन्न बनून निरंतर सेवा करणारे अखूट, अखंड महादानी भव

बापदादांनी संगमयुगामध्ये सर्व मुलांना अटल-अखंड चे वरदान दिले आहे. जे या वरदानाला जीवनामध्ये धारण करून अखंड महादानी अर्थात निरंतर सहज सेवाधारी बनतात ते नंबरवन बनतात. द्वापर पासून भक्त आत्मे देखील दानी बनतात, परंतु अखूट (अक्षय्य) खजिन्यांचे दानी बनू शकत नाहीत. विनाशी खजिन्याचे अथवा वस्तूंचे दानी बनतात, परंतु तुम्ही दात्याची मुले जी सर्व खजिन्यांनी सम्पन्न आहात ती एक सेकंद देखील दान दिल्याशिवाय राहू शकत नाही.

बोधवाक्य:-
आतील सच्चाई सफाई तेव्हा प्रत्यक्ष होते जेव्हा स्वभावामध्ये साधेपणा असतो.