09-04-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - आता तुमची रग (आसक्ती) सर्व बाजूंनी नष्ट झाली पाहिजे कारण घरी जायचे आहे, कोणतेही असे विकर्म होऊ नये, ज्यामुळे ब्राह्मण कुळाचे नाव बदनाम होईल”

प्रश्न:-
बाबा कोणत्या मुलांना बघून अतिशय हर्षित होतात? कोणती मुले बाबांच्या डोळ्यांमध्ये सामावलेली आहेत?

उत्तर:-
जी मुले अनेकांना सुखदायी बनवितात, सर्व्हीसेबल (सेवायोग्य) आहेत, त्यांना पाहून बाबा देखील हर्षित होतात. ज्या मुलांच्या बुद्धीमध्ये फक्त हेच असते की, एका बाबांसोबतच बोलावे, बाबांसोबतच गोष्टी कराव्यात… अशी मुले बाबांच्या डोळ्यांमध्ये सामावलेली राहतात. बाबा म्हणतात - माझी सेवा करणारी मुले मला अतिप्रिय आहेत. अशा मुलांची मी आठवण करतो.

ओम शांती।
गोड-गोड रूहानी मुले हे जाणतात की आपण बाबांसमोर देखील बसलो आहोत, तेच बाबा मग टीचरच्या रूपामध्ये शिकवतात देखील. तेच बाबा, पतित-पावन सद्गती दाता देखील आहेत. सोबत घेऊन जाणारे देखील आहेत आणि रस्ता देखील खूप सोपा सांगतात. पतिता पासून पावन बनण्यासाठी कोणताही त्रास देत नाहीत. कुठेही जा हिंडता-फिरता, परदेशात जाता तर फक्त स्वतःला आत्मा समजा. ते तर समजताच. परंतु तरी देखील म्हणतात स्वतःला आत्मा निश्चय करा, देह-अभिमानाला सोडून आत्म-अभिमानी बना. मी आत्मा आहे, शरीर घेतले आहे पार्ट बजावण्यासाठी. एका शरीरात पार्ट बजावून मग दुसरे घेतो. कोणाचा पार्ट १०० वर्षांचा, कोणाचा ८० वर्षांचा, कोणाचा दोन वर्षांचा, कोणाचा सहा महिन्याचा. काहींचा तर जन्मत:च मृत्यू होतो. काहींचा जन्म घेण्यापूर्वीच गर्भामध्येच मृत्यू होतो. आता इथले पुनर्जन्म आणि सतयुगातील पुनर्जन्म यामध्ये रात्रं-दिवसाचा फरक आहे. इथे गर्भातून जन्म घेतात तर याला गर्भ जेल म्हटले जाते. सतयुगामध्ये गर्भ जेल असत नाही. तिथे विकर्म होतच नाहीत, रावण राज्यच नाही. बाबा सर्व गोष्टी समजावून सांगतात. बेहदचे बाबा बसून या शरीराद्वारे समजावून सांगतात. या शरीराची आत्मा (ब्रह्मा बाबांची आत्मा) देखील ऐकते. ऐकविणारे ज्ञानसागर बाबा आहेत, ज्यांना स्वतःचे शरीर नाहीये. त्यांना सदैव ‘शिव’च म्हटले जाते. जसे ते पुनर्जन्म रहित आहेत, तसेच नाव-रूप घेण्यापासून देखील मुक्त आहेत. त्यांना म्हटले जाते ‘सदा शिव’. कायमसाठी शिवच आहेत, शरीराचे कोणते नाव नसते. यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) प्रवेश करतात तरी देखील यांच्या शरीराचे नाव, त्यांना दिले जात नाही. तुमचा हा आहे बेहदचा संन्यास, ते हदचे संन्यासी असतात. त्यांची नावे देखील बदलतात. बाबांनी तुमची सुद्धा नावे किती चांगली-चांगली ठेवली आहेत. ड्रामा अनुसार ज्यांना नावे दिली ते गायब झाले. बाबांना वाटले कि माझे बनले आहेत तर जरूर कायम राहतील, सोडचिठ्ठी देणार नाहीत, परंतु सोडचिठ्ठी दिली, मग आता नाव ठेवल्याचा फायदाच काय! संन्यासी सुद्धा जेव्हा परत घरी निघून जातात तर मग त्यांचे जुने नावच चालते. घरी परत तर जातात ना. असे नाही की संन्यास करतात तर त्यांना मित्र-संबंधी इत्यादींची आठवण येत नाही. काहीजणांना तर सर्व मित्र-संबंधी इत्यादींची आठवण येत राहते. मोहामध्ये अडकून पडतात. मोहाची तार जोडलेली असते. कोणाचे तर पटकन कनेक्शन तुटते. तोडायचे तर आहेच. बाबांनी समजावून सांगितले आहे आता परत जायचे आहे. बाबा स्वतः बसून सांगतात, बाबा सकाळी देखील सांगत होते ना. ‘देख-देख मन में सुख होवत…’ का बरे? डोळ्यांमध्ये मुले सामावलेली आहेत. आत्मे नूर (प्रकाश) आहेतच. बाबा देखील मुलांना पाहून खुश होतात ना. काही मुले तर खूप चांगली असतात, सेंटर सांभाळतात, आणि कोणी ब्राह्मण बनून पुन्हा विकारामध्ये जातात, तर ते ऩाफरमानवरदार (आज्ञेचे उल्लंघन करणारे) असतात. तर हे बाबा देखील अशा सर्व्हीसेबल मुलांना पाहून हर्षित होतात. बेहदचे बाबा म्हणतात - हा तर कुल कलंकित निघाला. ब्राह्मण कुळाचे नाव बदनाम करतात. मुलांना समजावत राहतात, कोणाच्याही नावा-रूपामध्ये फसायचे नाही, त्यांना देखील सेमी (अर्धे) कुल कलंकित म्हणणार. सेमी पासून मग फायनल देखील होतात. स्वतः लिहितात - ‘बाबा, मी कोसळलो, मी तोंड काळे केले. मायेने दगा दिला’. मायेची वादळे खूप येतात. बाबा म्हणतात - काम कटारी चालवलीत तर हे देखील एकमेकांना दुःख दिलेत; त्यामुळे बाबा प्रतिज्ञा करून घेतात, आपले रक्त काढून त्याने देखील खूप मोठे पत्र लिहितात. परंतु आज ते इथे नाही आहेत. बाबा म्हणतात, ‘अहो माया! तू अतिशय कठोर आहेस. अशी काही मुले, जी रक्ताने देखील लिहून देतात, त्यांना देखील तू खाऊन टाकतेस!’ जसे बाबा समर्थ आहेत, तर माया देखील समर्थ आहे. अर्धाकल्प बाबांकडून समर्थिचा (शक्तीचा) वारसा मिळतो, अर्धाकल्प मग माया ती समर्थी नाहीशी करते. ही आहे भारताची गोष्ट. देवी-देवता धर्मवालेच पवित्र पासून अपवित्र बनतात. आता तुम्ही लक्ष्मी-नारायणाच्या मंदिरामध्ये गेलात तुम्हाला तर आश्चर्य वाटेल. या घराण्याचे तर आपण होतो, आता आपण शिकत आहोत. यांची आत्मा (ब्रह्मा बाबांची आत्मा) देखील बाबांकडून शिकत आहे. आधी तर तुम्ही जिथे-तिथे डोके टेकवत होता. आता ज्ञान आहे, प्रत्येकाच्या पूर्ण ८४ जन्मांच्या बायोग्राफीला (जीवन चरित्राला) तुम्ही जाणता. प्रत्येक जण आपला पार्ट बजावत आहे.

बाबा म्हणतात - ‘मुलांनो, सदैव हर्षित रहा’. इथले हर्षितपणाचे संस्कार मग सोबत घेऊन जाल. तुम्ही जाणता आपण काय बनतो? बेहदचे बाबा आम्हाला हा वारसा देत आहेत इतर कोणीही देऊ शकणार नाही. एकही मनुष्य असा नाही ज्याला ही माहिती आहे की हे लक्ष्मी-नारायण कुठे गेले? असे समजतात जिथून आले तिथे निघून गेले. आता बाबा म्हणतात - बुद्धीने निर्णय करा भक्तिमार्गात देखील तुम्ही वेद-शास्त्र शिकता, आता मी तुम्हाला ज्ञान ऐकवतो. तुम्ही निर्णय करा - भक्ती राईट आहे का मी (शिवबाबा) राईट आहे? बाबा, राम आहेत रायटीयस (सत्य), रावण आहे अनरायटीयस (असत्य). प्रत्येक गोष्टीमध्ये असत्य बोलतात. हे ज्ञानाच्या गोष्टींकरिता म्हटले जाते. तुम्ही समजता आधी आपण सर्व असत्य बोलत होतो. दान-पुण्य इत्यादी करत असताना देखील शिडी खालीच उतरतो. तुम्ही देता देखील आत्म्यांनाच. जे पाप आत्मा, पाप आत्म्यांना देतात तर मग पुण्य आत्मा कसे बनणार? तिथे आत्म्यांची देवाणघेवाण होतच नाही. इथे तर लाखो रुपयांचे कर्ज घेत राहतात. या रावण राज्यामध्ये पावला-पावलावर मनुष्यांना दुःख आहे. आता तुम्ही संगमावर आहात. तुमच्या तर पावला-पावलामध्ये पद्म आहेत. देवता पद्मपती कसे बनले? हे कोणालाच माहिती नाहीये. स्वर्ग तर जरूर होता. खाणाखुणा आहेत. बाकी त्यांना हे माहिती नसते की मागच्या जन्मामध्ये अशी कोणती कर्म केली आहेत, ज्यामुळे राज्य मिळाले आहे. ती तर आहेच नवीन सृष्टी, तर फालतू विचार असतच नाहीत. त्याला म्हटलेच जाते - ‘सुखधाम’. ५००० वर्षांची गोष्ट आहे. तुम्ही शिकता सुखासाठी, पावन बनण्यासाठी. अथाह युक्त्या निघतात. बाबा किती चांगल्या रीतीने समजावून सांगतात - शांतीधाम आत्म्यांचे राहण्याचे स्थान आहे, त्याला स्वीट होम म्हटले जाते. जसे परदेशातून येतात, तर समजतील आता आपण आपल्या स्वीट होमला जात आहोत. तुमचे स्वीट होम आहे - शांतीधाम. बाबा देखील शांतीचा सागर आहेत ना, ज्याचा पार्टच शेवटी असेल, तर किती काळ शांतीमध्ये रहात असतील. बाबांचा खूप थोडा पार्ट म्हणणार. या ड्रामामध्ये तुमचा आहे हिरो-हिरॉइनचा पार्ट. तुम्ही विश्वाचे मालक बनता. हा नशा इतर कोणामध्ये कधीच असू शकत नाही. आणखी कोणाच्या भाग्यामध्ये स्वर्गाचे सुखच नाही आहे. ते तर तुम्हा मुलांनाच मिळते. ज्या मुलांना बाबा बघत असतात ती म्हणतात - ‘बाबा तुमच्याशीच बोलणार, तुमच्याशीच गोष्टी करणार…’ बाबा देखील म्हणतात - ‘मी, तुम्हा मुलांना पाहून खूप हर्षित होतो. मी ५००० वर्षानंतर आलो आहे’. मुलांना दुखःधाम मधून सुखधाम मध्ये घेऊन जातात कारण काम चितेवर चढून-चढून जळून खाक झाली आहेत. आता त्यांना जाऊन कबरीतून काढायचे आहे. आत्मे तर सर्व हजर आहेत ना. त्यांना पावन बनवायचे आहे.

बाबा म्हणतात - मुलांनो, बुद्धीने एका सद्गुरुची आठवण करा बाकी सर्वांना विसरून जा. एका सोबतच संबंध ठेवायचा आहे. तुमचे म्हणणे देखील होते की, तुम्ही याल तर तुमच्या शिवाय आणखी कोणीही नाही. तुमच्याच मतानुसार चालणार. श्रेष्ठ बनणार. गातात देखील उच्च ते उच्च भगवान आहेत. त्यांचे मत देखील उच्च ते उच्च आहे. बाबा स्वतः म्हणतात - हे ज्ञान जे आता मी तुम्हाला देत आहे ते मग प्राय: लोप होणार आहे. भक्ती मार्गातील शास्त्रं तर परंपरेने चालत येतात. असे म्हणतात रावण देखील परंपरेने चालत येतो. तुम्ही विचारा रावणाला केव्हा पासून जाळता? कशासाठी जाळता? काहीच माहिती नाही. अर्थ न समजल्यामुळे किती शादमाना (मोठ्या थाटात उत्सव साजरा) करतात. बऱ्याच व्हिजिटर्स इत्यादींना बोलावतात. जसा काही रावणाला जाळण्याचा समारंभ करतात. तुम्ही समजू शकत नाही रावणाला केव्हापासून बनवत आले आहेत? दिवसेंदिवस मोठा बनवत राहतात; म्हणतात - ‘हे परंपरेने चालत आले आहे’. परंतु असे तर होऊ शकत नाही. शेवटी रावणाला कधी पर्यंत जाळत राहणार? तुम्ही तर जाणता थोडा वेळ बाकी आहे मग तर याचे राज्यच राहणार नाही. बाबा म्हणतात - हा रावण सर्वात मोठा शत्रू आहे, यावर विजय प्राप्त करायचा आहे. मनुष्यांच्या बुद्धीमध्ये खूप सार्या गोष्टी आहेत. तुम्ही जाणता या ड्रामामध्ये सेकंदा-सेकंदाला जे काही होत आले आहे, ते सर्व नोंदलेले आहे. तुम्ही तिथी, तारीख सर्व हिशोब काढू शकता - किती तास, किती वर्ष, किती महिने आपला पार्ट चालतो. हे सर्व ज्ञान बुद्धीमध्ये असले पाहिजे. बाबा आम्हाला हे समजावून सांगतात. बाबा म्हणतात - ‘मी पतित-पावन आहे. तुम्ही मला बोलावता की, येऊन पावन बनवा’. पावन दुनिया असतेच शांतीधाम आणि सुखधाम. आता तर सर्व पतित आहेत. नेहमी ‘बाबा-बाबा’ करत रहा. हे विसरायचे नाहीये, तर सदैव शिवबाबांची आठवण येईल. ते माझे बाबा आहेत. सर्वप्रथम आहेत, हे बेहदचे बाबा. ‘बाबा’, म्हणण्यानेच वारशाच्या आनंदामध्ये येतात. फक्त ‘भगवान’ किंवा ‘ईश्वर’ म्हणण्याने कधी असा विचार येणार नाही. सर्वांना सांगा - ‘बेहदचे बाबा समजावून सांगत आहेत ब्रह्मा द्वारा’. हा त्यांचा रथ आहे. त्यांच्याद्वारे म्हणतात - ‘मी तुम्हा मुलांना हे बनवितो’. या बॅजमध्ये सारे ज्ञान भरलेले आहे. शेवटाला तुम्हाला याचीच आठवण राहील - शांतीधाम, सुखधाम. दुःखधामला तर विसरत जाता. हे देखील जाणता नंतर नंबरवार सर्व आपल्या-आपल्या वेळेवर येणार. इस्लामी, बौद्धी, ख्रिश्चन इत्यादी किती पुष्कळ आहेत. अनेक भाषा आहेत. आधी होता एक धर्म मग त्यातून किती धर्म निघाले आहेत. किती लढाया इत्यादी झाल्या आहेत. लढाया तर सर्वजण करतात कारण निधनके (अनाथ) बनतात. आता बाबा म्हणतात - ‘मी तुम्हाला जे राज्य देतो ते तुमच्याकडून कधीही कोणी हिसकावून घेऊ शकत नाही’. बाबा स्वर्गाचा वारसा देतात, जो कोणी हिरावून घेऊ शकत नाही. यामध्ये अखंड, अटल, अडोल रहायचे आहे. मायेची वादळे तर जरूर येणार. पहिले तर जो समोर असेल तो सर्व अनुभव करेल ना. रोगराई इत्यादी सर्व कायमसाठी नष्ट होणार आहे, म्हणून कर्मांचा हिशोब, आजारपण इत्यादी जास्त आले तर त्यात घाबरायचे नाही. हे सर्व शेवटचे आहे, परत होणार नाही. आता सर्व उफाळून येईल. वृद्धांना देखील माया तरुण बनवेल. मनुष्य वानप्रस्थ घेतात तर तिथे स्त्रिया नसतात. संन्यासी देखील जंगलामध्ये निघून जातात. तिथे देखील स्त्रिया नसतात. कोणाकडेच बघत देखील नाहीत. भिक्षा घेतली, निघून गेले. आधी तर स्त्रीकडे अजिबात बघत देखील नव्हते. असे समजत होते जरूर बुद्धी जाईल. बहिण-भावाच्या संबंधांमध्ये देखील बुद्धी जाते म्हणून बाबा म्हणतात भावा-भावाला बघा. शरीराचे नाव देखील नको. हे खूप मोठे ध्येय आहे. एकदम शिखरावर जायचे आहे. ही राजधानी स्थापन होत आहे. यात खूप मेहनत आहे. असे म्हणतात - आम्ही तर लक्ष्मी-नारायण बनणार. बाबा म्हणतात - बना. श्रीमतावर चाला. मायेची वादळे तर येतील, कर्मेंद्रियांद्वारे काहीही करायचे नाही. दिवाळे इत्यादी तर निघतच राहते. असे नाही की ज्ञानामध्ये आले आणि दिवाळे निघाले. हे तर होतच राहते. बाबा म्हणतात - ‘मी तर आलोच आहे तुम्हाला पतिता पासून पावन बनविण्यासाठी. कधी खूप चांगली सेवा करतात, इतरांना समझावन्ती आणि मग देवाला मारन्ती… माया खूप जबरदस्त आहे. चांगले-चांगले कोसळतात (पतित बनतात). बाबा बसून समजावून सांगत आहेत - ‘माझी सेवा करणारी मुलेच मला प्रिय वाटतात. अनेकांना सुखदायी बनवतात, अशा मुलांची मी आठवण करत राहतो’. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) कोणाच्याही नावा-रूपामध्ये फसून कुलकलंकित बनायचे नाही. मायेच्या धोक्यामध्ये येऊन एकमेकांना दुःख द्यायचे नाही. बाबांकडून समर्थीचा (शक्तींचा) वारसा घ्यायचा आहे.

२) सदैव हर्षित राहण्याचे संस्कार इथेच भरायचे आहेत. आता पाप आत्म्यांसोबत कोणतीही देवाण-घेवाण करायची नाही. आजारपण इत्यादीला घाबरायचे नाही, सर्व हिशोब आत्ताच चुकते करायचे आहेत.

वरदान:-
विल पॉवरद्वारे सेकंदामध्ये व्यर्थला फुल स्टॉप लावणारे अशरीरी भव

सेकंदामध्ये अशरीरी बनण्याचे फाउंडेशन - ही बेहदची वैराग्यवृत्ती आहे. हे वैराग्य अशी योग्य धरणी आहे ज्यामध्ये जे काही घालाल त्याचे ताबडतोब फळ निघते. तर आता अशी विल पॉवर असावी जो संकल्प केला - ‘व्यर्थ समाप्त’, तर सेकंदामध्ये समाप्त होईल. जेव्हा पाहिजे, जिथे पाहिजे, ज्या स्थितीमध्ये पाहिजे सेकंदामध्ये सेट करा, सेवा खेचू नये. सेकंदामध्ये फुलस्टॉप लागावा तर सहजच अशरीरी बनाल.

बोधवाक्य:-
बाप समान बनायचे असेल तर बिगड़ीला बनविणारे (दुःखातून सुटका करणारे) बना.