10-02-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो - आत्म अभिमानी बनण्याचा अभ्यास करा तर दैवी गुण येत जातील, क्रिमिनल (विकारी) विचार नाहीसे होतील, अपार खुशी राहील

प्रश्न:-
आपल्या वर्तनाला सुधारण्यासाठी किंवा अपार खुशीमध्ये राहण्यासाठी कोणती गोष्ट नेहमी स्मृतीमध्ये ठेवायची आहे?

उत्तर:-
नेहमी स्मृती रहावी की आम्ही दैवी स्वराज्य स्थापन करत आहोत, आम्ही मृत्यूलोकला सोडून अमरलोकमध्ये जात आहोत - यामुळे खूप खुशी राहील, वर्तन देखील सुधारत जाईल कारण अमरलोक नवीन दुनियेमध्ये जाण्यासाठी दैवी गुण जरूर पाहिजेत. स्वराज्यासाठी अनेकांचे कल्याण देखील करावे लागेल, सर्वांना रस्ता सांगावा लागेल.

ओम शांती।
मुलांनी स्वतःला इथले समजता कामा नये. तुम्हाला माहित झाले आहे आपले जे राज्य होते ज्याला रामराज्य अथवा सूर्यवंशी राज्य म्हणतात त्यामध्ये किती सुख-शांती होती. आता आपण पुन्हा देवता बनत आहोत. पूर्वी देखील बनलो होतो. आपणच सर्वगुण संपन्न दैवी गुणवाले होतो. आम्ही आपल्या राज्यामध्ये होतो. आता रावण राज्यामध्ये आहोत. आपण आपल्या राज्यामध्ये खूप सुखी होतो. तर आतमध्ये खूप खुशी आणि निश्चय असला पाहिजे कारण तुम्ही पुन्हा आपल्या राजधानीमध्ये जात आहात. रावणाने तुमचे राज्य हिरावून घेतले आहे. तुम्ही जाणता - आमचे स्वतःचे सूर्यवंशी राज्य होते. आम्ही रामराज्याचे होतो, आम्हीच दैवी गुणवाले होतो, आम्हीच खूप सुखी होतो मग रावणाने आमचे राज्य-भाग्य हिरावून घेतले. आता बाबा येऊन, आपले आणि परक्याचे रहस्य समजावून सांगत आहेत. अर्धा कल्प आपण राम राज्यामध्ये होतो मग अर्धाकल्प आम्ही रावण राज्यामध्ये राहिलो. मुलांना प्रत्येक गोष्टीचा निश्चय असेल तर खुशीमध्ये राहतील आणि वर्तन देखील सुधारेल. आता परक्या राज्यामध्ये आपण खूप दुःखी आहोत. हिंदू भारतवासी समजतात, आम्ही परक्या राज्यामध्ये (इंग्रजांच्या राज्यामध्ये) दुःखी होतो आता आपल्या राज्यामध्ये सुखी आहोत. परंतु हे आहे अल्पकालीन काग विष्ठा समान सुख. तुम्ही मुले आता कायमसाठी सुखाच्या दुनियेमध्ये जात आहात. तर तुम्हा मुलांना आतून खूप खुशी वाटली पाहिजे. ज्ञानामध्ये नाहीत, तर मग जसे काही ठिक्कर पत्थर बुद्धी आहेत. तुम्ही मुले जाणता, आम्ही अवश्य आमचे राज्य घेणार, यामध्ये त्रासाची कोणती गोष्ट नाही. राज्य घेतले होते मग अर्धाकल्प राज्य केले आणि मग रावणाने आमची कला-काया (विशेषता आणि शरीरच) नष्ट केले. कोणत्या चांगल्या मुलाचे जेव्हा वर्तन बिघडते तेव्हा म्हटले जाते - तुझी कला काया नष्ट झाली आहे काय? या आहेत बेहदच्या गोष्टी. समजले पाहिजे मायेने आमची कला काया नष्ट केली आहे. आम्ही कोसळतच आलो आहोत (अधोगतीच होत आली आहे). आता बेहदचे बाबा दैवी गुण शिकवत आहेत. तर खुशीचा पारा चढला पाहिजे. टीचर शिकवतात तेव्हा स्टुडंटला आनंद होतो. हे आहे बेहदचे नॉलेज. स्वतःला पहायचे आहे - माझ्यामध्ये कोणता आसुरी गुण तर नाही आहे? संपूर्ण बनलो नाही तर सजा भोगावी लागेल. परंतु आपण सजा भोगावीच कशासाठी? त्यामुळे बाबांची, ज्यांच्याकडून हे राज्य मिळते त्यांची आठवण करायची आहे. आपल्यामध्ये जे दैवी गुण होते ते आता धारण करायचे आहेत. तिथे यथा राजा-राणी तथा प्रजा सर्वांमध्ये दैवीगुण होते. दैवीगुणांना तर समजता ना. जर कोणी समजत नसतील तर ते आपल्यामध्ये आणतील तरी कसे? गातात देखील सर्व गुण संपन्न तर पुरुषार्थ करून असे बनायचे आहे. बनण्यासाठी मेहनत लागते. क्रिमिनल आय (विकारी दृष्टी) होते. बाबा म्हणतात स्वतःला आत्मा समजा तर क्रिमिनल विचार (विकारी विचार) नाहीसे होतील. युक्त्या तर बाबा खूप सांगतात, ज्यांच्यामध्ये दैवी गुण आहेत त्यांना देवता म्हटले जाते, ज्यांच्यामध्ये नाहीत त्यांना मनुष्य म्हटले जाते. आहेत तर दोन्ही मनुष्य. परंतु देवतांना पूजतात कशासाठी? कारण त्यांच्यामध्ये दैवी गुण आहेत आणि त्यांची (मनुष्यांची) कर्तव्य माकडा प्रमाणे आहेत. किती आपसामध्ये भांडण-तंटे इत्यादी करतात. सतयुगामध्ये अशा गोष्टी असत नाहीत. इथे तर होतात. आपली चूक होते तर जरूर सहन करावे लागते. आत्म-अभिमानी नाही आहेत त्यामुळे सहन करावे लागते. तुम्ही जितके आत्म-अभिमानी बनत जाल तितके दैवी गुण देखील धारण होतील. आपली तपासणी करायची आहे - माझ्यामध्ये दैवी गुण आहेत? बाबा सुखदाता आहेत तर मुलांचे काम आहे सर्वांना सुख देणे. आपल्या मनाला विचारायचे आहे की, मी कोणाला दुःख तर देत नाही ना? परंतु कोणा-कोणाची सवय असते जे दुःख दिल्याशिवाय राहू शकत नाहीत. अजिबात सुधारत नाहीत जसा काही जेल बर्ड. ते जेलमध्येच स्वतःला सुखी समजतात. बाबा म्हणतात तिथे तर जेल इत्यादी नसतेच, पाप होतच नाही जे जेलमध्ये जावे लागेल. इथे जेलमध्ये सजा भोगावी लागते. आता तुम्ही समजता - आपण जेव्हा आपल्या राज्यामध्ये होतो तेव्हा खूप श्रीमंत होतो, जे ब्राह्मण कुळाचे असतील ते असेच समजतील की, आम्ही आमचे राज्य स्थापन करत आहोत. ते एकच आमचे राज्य होते, ज्याला देवतांचे राज्य म्हटले जाते. आत्म्याला जेव्हा ज्ञान मिळते तेव्हा आनंद होतो. जरूर जीव आत्मा म्हणावे लागेल. आपण जीव आत्मे जेव्हा देवी-देवता धर्माचे होतो तेव्हा संपूर्ण विश्वावर आपले राज्य होते. हे नॉलेज आहे तुमच्यासाठी. भारतवासी थोडेच असे समजतात की, आपले राज्य होते, आपण देखील सतोप्रधान होतो. हे सर्व ज्ञान तुम्हालाच समजते. तर आपणच देवता होतो आणि आपल्यालाच आता बनायचे आहे. भले विघ्न देखील पडतात परंतु तुमची दिवसें-दिवस उन्नती होत जाईल. तुमचे नाव प्रसिद्ध होत जाईल. सर्वजण समजतील ही चांगली संस्था आहे, चांगले कार्य करत आहेत. रस्ता देखील खूप सोपा सांगतात. म्हणतात - तुम्हीच सतोप्रधान होता, देवता होता, आपल्या राजधानीमध्ये होता. आता तमोप्रधान बनले आहात बाकी दुसरे तर कोणी स्वतःला रावण राज्यामध्ये समजत नाहीत.

तुम्ही जाणता आपण किती स्वच्छ होतो, आता तुच्छ बनलो आहोत. पुनर्जन्म घेत-घेत पारस बुद्धी पासून पत्थर बुद्धी बनलो आहोत. आता आपण आपले राज्य स्थापन करत आहोत तर तुम्हाला उत्साह आला पाहिजे, पुरुषार्थाला लागले पाहिजे. जे कल्पापूर्वी लागले असतील तेच आता देखील लागतील जरूर. नंबरवार पुरुषार्थानुसार आपण आपले दैवी राज्य स्थापन करत आहोत. हे देखील तुम्ही वेळोवेळी विसरून जाता. नाहीतर आतून खूप आनंद वाटला पाहिजे. एकमेकांना हिच आठवण करून द्या की, मनमनाभव. बाबांची आठवण करा, ज्यांच्याद्वारेच आता राजाई घेत आहोत. ही काही नवीन गोष्ट नाहीये. कल्प-कल्प आम्हाला बाबा श्रीमत देतात, ज्याद्वारे आपण दैवी गुण धारण करतो. नाही तर सजा खाऊन मग खालचे पद घ्याल. ही खूप जबरदस्त लॉटरी आहे. आता पुरुषार्थ करून उच्च पद प्राप्त कराल तर कल्प-कल्पांतर प्राप्त करत रहाल. बाबा किती सोपे करून समजावून सांगतात. प्रदर्शनीमध्ये देखील हेच समजावून सांगत रहा की, तुम्ही भारतवासीच देवतांच्या राजधानीमध्ये होता मग पुनर्जन्म घेत-घेत शिडी खाली उतरत-उतरत असे बनले आहात. किती सोपे करून समजावून सांगतात. सुप्रीम पिता, सुप्रीम टीचर, सुप्रीम गुरू आहेत ना. तुम्ही किती पुष्कळ स्टुडंट आहात, दौडी लावता (वेगाने पुढे जात राहता). बाबा देखील लिस्ट मागत राहतात कि किती निर्विकारी पवित्र बनले आहेत?

मुलांना समजावून सांगितले गेले आहे की, भृकुटीच्या मध्यभागी आत्मा चमकते. बाबा म्हणतात - मी देखील इथे येऊन बसतो. माझा पार्ट बजावतो. माझा पार्टच आहे पतितांना पावन बनविण्याचा. ज्ञानाचा सागर आहे. मुले जन्मतात, कोणी तर खूप चांगले असतात, कोणी खराब देखील निघतात. मग आश्चर्यवत् सुनन्ती, कथन्ती, भागन्ती होतात. अरे माया, तू किती प्रबळ आहेस. तरी देखील बाबा म्हणतात - भागन्ती होऊन देखील जातील तरी कुठे? हेच एक पिता तारणारे आहेत. एकच पिता आहेत सद्गती दाता, बाकी या ज्ञानाला कोणी तर अजिबातच जाणत नाहीत. ज्यांनी कल्पापूर्वी मानले आहे, तेच मानतील. यामध्ये आपल्या वर्तनाला खूप सुधारावे लागते, सेवा करावी लागते. अनेकांचे कल्याण करायचे आहे. अनेकांना जाऊन रस्ता सांगायचा आहे. अतिशय मधुरतेने समजावून सांगायचे आहे की, तुम्ही भारतवासीच विश्वाचे मालक होता. आता पुन्हा तुम्ही अशा प्रकारे आपले राज्य घेऊ शकता. हे तर तुम्ही समजता बाबा जे समजावून सांगतात, तसे कोणीही समजावून सांगू शकणार नाहीत; तरी देखील चालता-चालता माये कडून हार खातात. बाबा स्वतः म्हणतात - विकारांवर विजय प्राप्त केल्याने तुम्ही जगतजीत बनाल. हे देवता जगतजीत बनले आहेत. जरूर त्यांनी असे कर्म केले आहेत. बाबांनी कर्मांची गती देखील सांगितली आहे. रावण राज्यामध्ये कर्म, विकर्मच होतात, राम राज्यामध्ये कर्म, अकर्म होतात. मूळ गोष्ट आहे काम विकारावर विजय प्राप्त करून जगतजीत बनण्याची. बाबांची आठवण करा, आता परत घरी जायचे आहे. आम्हाला १०० टक्के खात्री आहे की आम्ही आपले राज्य घेऊनच सोडणार. परंतु राज्य इथे करणार नाही. इथे राज्य घेतो. राज्य करणार अमरलोकमधे. आता मृत्यूलोक आणि अमरलोकच्या मध्यभागी आहोत, हे सुद्धा विसरून जातो; म्हणून बाबा वेळो-वेळी आठवण करून देतात. आता हा पक्का निश्चय आहे की आपण आपल्या राजधानीमध्ये जाणार. ही जुनी राजधानी जरूर नष्ट होणार आहे. आता नवीन दुनियेमध्ये जाण्यासाठी दैवीगुण जरूर धारण करायचे आहेत. आपल्याशीच गोष्टी करायच्या आहेत. स्वतःला आत्मा समजायचे आहे कारण आत्ताच आपल्याला परत जायचे आहे. तर स्वतःला आत्मा देखील आत्ताच समजायचे आहे नंतर मग कधी परत थोडेच जायचे आहे जे हे ज्ञान मिळेल. तिथे ५ विकारच नसतील ज्यासाठी आपल्याला योग लावावा लागेल. योग तर यावेळी लावायचा असतो पावन बनण्यासाठी. तिथे तर सर्वजण सुधारलेले आहेत. मग हळू-हळू कला कमी होत जातात. हे तर खूप सहज आहे, क्रोध देखील कोणाला दुःख देतो ना. मुख्य आहे देह-अभिमान. तिथे तर देह-अभिमान असतच नाही. आत्म-अभिमानी असल्याने क्रिमिनल आय (विकारी दृष्टी) राहत नाही. सिविल आय (पवित्र दृष्टी) बनते. रावण राज्यामध्ये क्रिमिनल आय बनतात. तुम्ही जाणता आपण आपल्या राज्यामध्ये खूप सुखी होतो. कोणता काम विकार नाही, काही क्रोध नाही, यावर सुरुवातीला एक गाणे देखील बनलेले आहे. तिथे हे विकार असत नाहीत. आपली अनेक वेळा अशी हार आणि जीत झाली आहे. सतयुगा पासून कलियुगा पर्यंत जे काही झाले ते पुन्हा रिपीट होणार आहे. बाबा अथवा टीचरकडे जे नॉलेज आहे ते तुम्हाला ऐकवत राहतात. हे रुहानी टीचर देखील वंडरफुल आहेत. सर्वांमध्ये सर्वोच्च भगवान, सर्वोच्च टीचर सुद्धा आहेत आणि आम्हाला देखील सर्वोच्च देवता बनवतात. तुम्ही स्वतः बघत आहात - बाबा कसे दैवी राजधानी स्थापन करत आहेत. तुम्ही स्वयं देवता बनत आहात. आता तर सर्वजण स्वतःला हिंदू म्हणत राहतात. त्यांना देखील समजावून सांगितले जाते की, खरे तर आदि-सनातन देवी-देवता हा धर्म आहे, इतर सर्वांचा धर्म चालत राहतो, हा एकच देवी-देवता धर्म आहे, जो प्राय:लोप झाला आहे. हा तर खूप पवित्र धर्म आहे. यासारखा पवित्र धर्म कोणता असत नाही. आता पवित्र नसल्या कारणाने कोणीही स्वतःला देवता म्हणू शकत नाहीत. तुम्ही समजावून सांगू शकता की, आम्ही आदि-सनातन देवी-देवता धर्माचे होतो तेव्हाच तर देवतांची पूजा करतो. क्राइस्टला पुजणारे ख्रिश्चन झाले, बुद्धाला पुजणारे बौद्धी झाले, देवतांना पुजणारे देवता झाले. तर मग स्वतःला हिंदू का म्हणवून घेता? युक्तीने समजावून सांगायचे आहे. फक्त म्हणतील - हिंदू धर्म परंतु हिंदू काही धर्म नाहीये म्हटले तर मात्र भडकतील. तुम्ही बोला - हिंदू आदि-सनातन धर्माचे होतो, तेव्हा कुठे समजतील की आदि-सनातन धर्म काही हिंदू नाहीये. आदि-सनातन शब्द ठीक आहे. देवता पवित्र होते, हे अपवित्र आहेत म्हणून स्वतःला देवता म्हणू शकत नाहीत. कल्प-कल्प असे होते, यांच्या राज्यामध्ये किती श्रीमंत होतो. आता तर कंगाल बनलो आहोत. ते पद्मा-पदमपती होते. बाबा युक्त्या खूप चांगल्या देतात. विचारले जाते - तुम्ही सतयुगामध्ये राहणारे आहात की कलियुगामध्ये? कलियुगातील आहात तर जरूर नरकवासी आहात. सतयुगामध्ये राहणारे तर स्वर्गवासी देवता असतील. असा प्रश्न विचाराल तर समजतील की, प्रश्न विचारणारा जरूर स्वतः ट्रान्सफर करून देवता बनवू शकत असेल. बाकी इतर कोणी प्रश्न विचारू शकत नाही. तो भक्तीमार्गच वेगळा आहे. भक्तीचे फळ काय आहे? ते आहे ज्ञान. सतयुग-त्रेतामध्ये भक्ती असत नाही. ज्ञानाने अर्धाकल्प दिवस, भक्तीने अर्धाकल्प रात्र. मानणारे असतील तर मानतील. न मानणारे तर ज्ञानाला देखील मानणार नाहीत, आणि भक्तीला देखील मानणार नाहीत. फक्त पैसा कमावणेच जाणतात.

तुम्ही मुले तर योगबलाने आता राजाई स्थापन करत आहात श्रीमतावर. मग अर्ध्या कल्पा नंतर राज्य गमावता देखील. हे चक्र फिरतच राहते. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-

१) अनेकांचे कल्याण करण्यासाठी आपली वाणी अतिशय मधुर बनवायची आहे. मधुर वाणीने सेवा करायची आहे. सहनशील बनायचे आहे.

२) कर्मांच्या गुह्य गतीला जाणून विकारांवर विजय प्राप्त करायचा आहे. जगतजीत देवता बनायचे आहे. आत्म-अभिमानी बनून क्रिमिनल दृष्टीला सिविल (विकारी दृष्टीला पावन) बनवायचे आहे.

वरदान:-
श्रेष्ठ कर्मांद्वारे दिव्य गुण रुपी प्रभू प्रसाद वाटणारे फरिश्ता सो देवता भव

वर्तमान समयी भले अज्ञानी आत्मे आहेत, नाहीतर ब्राह्मण आत्मे आहेत, दोघांनाही गुणदानाची आवश्यकता आहे. तर आता या विधीला स्वतःमध्ये किंवा ब्राह्मण परिवारामध्ये तीव्र बनवा. हे दिव्य गुण सर्वात श्रेष्ठ प्रभू प्रसाद आहे. या प्रसादाला भरपूर वाटा; जसे स्नेहाची निशाणी एकमेकांना टोली खाऊ घालतात तसे दिव्य गुणांची टोली खाऊ घाला तर या विधीद्वारे फरिश्ता सो देवता बनण्याचे लक्ष्य सहजच सर्वांमध्ये प्रत्यक्ष स्वरूपामध्ये दिसू लागेल.

बोधवाक्य:-
योग रुपी कवचाला घालून रहा तर माया रूपी दुश्मन वार करू शकणार नाही.