10-04-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबांकडे तुम्ही रिफ्रेश होण्यासाठी येता, इथे तुम्हाला दुनियावी व्हायब्रेशन पासून दूर ‘सत’चा खरा संग मिळतो”

प्रश्न:-
बाबा मुलांच्या उन्नतीसाठी नेहमी कोणता एक सल्ला देतात?

उत्तर:-
गोड मुलांनो, कधीही आपसामध्ये संसारी झरमुई, झगमुईच्या (व्यर्थ) गोष्टी करू नका. कोणी ऐकवत असेल तर ऐकून न ऐकल्यासारखे करा. चांगली मुले आपली सेवेची ड्युटी पूर्ण करून बाबांच्या आठवणीमध्ये तल्लीन राहतात. परंतु बरीच मुले फालतू व्यर्थ गोष्टी खूप आनंदाने ऐकतात आणि ऐकवतात, यामध्ये खूप वेळ वाया जातो आणि मग उन्नती होत नाही.

ओम शांती।
डबल ओम् शांती म्हटले तरी देखील राईट आहे. मुलांना अर्थ तर समजावून सांगितला आहे. मी आहेच आत्मा शांत स्वरूप. जेव्हा माझा धर्मच शांत आहे तर मग जंगल इत्यादी ठिकाणी भटकण्याने मला शांती मिळू शकत नाही. बाबा म्हणतात, मी देखील शांत स्वरूप आहे. हे तर खूप सोपे आहे परंतु मायेशी लढाई असल्यामुळे थोडी अडचण होते. सर्व मुले हे जाणतात की बेहदच्या बाबांव्यतिरिक्त हे ज्ञान इतर कोणीही देऊ शकत नाही. ज्ञानसागर एक बाबाच आहेत. देहधारींना ज्ञानाचा सागर कधीही म्हटले जाऊ शकत नाही. रचयिताच रचनेच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान देतात. ते तुम्हा मुलांना मिळत आहे. बरीच चांगली अनन्य मुले देखील विसरतात कारण बाबांची आठवण पाऱ्यासारखी आहे. शाळेमध्ये तर जरूर नंबरवार असतील ना. मार्क्स नेहमी शाळेमध्ये असतानाचे मोजले जातात. सतयुगामध्ये कधी मार्क्स मोजले जात नाहीत. ही शाळा आहे, हे समजून घेण्यासाठी देखील खूप विशाल बुद्धी पाहिजे. अर्धाकल्प असते भक्ती, मग भक्तीनंतर ज्ञानसागर येतात ज्ञान देण्यासाठी. भक्तीमार्गवाले कधी ज्ञान देऊ शकणार नाहीत कारण सर्व देहधारी आहेत. असे म्हणणार नाही - शिवबाबा भक्ती करतात. ते कोणाची भक्ती करतील! एकच बाबा आहेत, ज्यांना देह नाहीये. ते कोणाची भक्ती करत नाहीत. बाकी जे देहधारी आहेत, ते सर्व भक्ती करतात कारण ती रचना आहे ना. रचयिता आहेत एक बाबा. बाकी या डोळ्यांनी जे काही दिसते, चित्र इत्यादी, ती सर्व आहे रचना. या गोष्टी सारख्या-सारख्या विसरल्या जातात.

बाबा समजावून सांगतात - तुम्हाला बेहदचा वारसा बाबांशिवाय तर मिळू शकत नाही. वैकुंठाची बादशाही तर तुम्हाला मिळते. ५००० वर्षांपूर्वी भारतामध्ये यांचे राज्य होते. २५०० वर्ष सूर्यवंशी-चंद्रवंशींची राजधानी चालली. तुम्ही मुले जाणता ही तर कालची गोष्ट आहे. हे बाबांशिवाय कोणीही सांगू शकत नाही. पतित-पावन ते बाबाच आहेत. समजून सांगण्यासाठी देखील खूप मेहनत करावी लागते. बाबा स्वतः म्हणतात कोटींमध्ये कोणी समजतील. हे चक्र देखील समजावून सांगितले गेले आहे. हे नॉलेज सर्व दुनियेसाठी आहे. शिडी देखील खूप चांगली आहे, तरी देखील कोणी गुरगुर करतात (चिडचिड करतात). बाबांनी सांगितले आहे लग्नासाठी हॉल बनवतात, त्यांना देखील समजावून सांगून दृष्टी द्या. पुढे चालून सर्वजण या गोष्टी पसंत करतील. तुम्हा मुलांनी हे समजावून सांगायचे आहे. बाबा तर कोणाकडे जाणार नाहीत. भगवानुवाच - जे पुजारी आहेत त्यांना कधी पूज्य म्हणू शकत नाही. कलियुगामध्ये एकही कोणी पवित्र असू शकत नाही. पूज्य देवी-देवता धर्माची स्थापना देखील सर्वात उच्च ते उच्च जे पूज्य आहेत तेच करतात. अर्धाकल्प आहेत पूज्य आणि अर्धाकल्प पुजारी असतात. या बाबांनी (ब्रह्मा बाबांनी) खूप गुरु केले, आता समजले आहे गुरु करणे तर भक्ती मार्ग होता. आता सद्गुरु मिळाले आहेत, जे पूज्य बनवतात. फक्त एकालाच नाही, सर्वांना बनवतात. सर्वांचे आत्मे पूज्य सतोप्रधान बनतात. आता तर तमोप्रधान, पुजारी आहेत. हे पॉईंट्स समजून घ्यायचे आहेत. बाबा म्हणतात कलियुगामध्ये एक देखील पवित्र, पूज्य असू शकत नाही. सर्वजण विकारातून जन्म घेतात. रावण राज्य आहे. हे लक्ष्मी-नारायण देखील पुनर्जन्म घेतात परंतु ते आहेत पूज्य कारण तिथे रावणच नसतो. असे शब्द बोलतात परंतु रामराज्य केव्हा आणि रावण राज्य केव्हा असते, हे काहीच माहिती नाहीये. यावेळेस बघा किती सभा आहेत. अमकी सभा, तमकी सभा. कुठून काही मिळाले तर एकाला सोडून दुसऱ्याकडे निघून जातात. तुम्ही या वेळेस पारस बुद्धी बनत आहात. मग त्यामध्ये देखील कोणी २० टक्के बनले आहेत, कुणी ५० टक्के बनले आहेत. बाबांनी समजावून सांगितले आहे ही राजधानी स्थापन होत आहे. आता वरून देखील राहिलेले आत्मे येत आहेत. सर्कसमध्ये कोणी चांगले ॲक्टर्स सुद्धा असतात तर कोणी साधारण देखील असतात. ही आहे बेहदची गोष्ट. मुलांना किती चांगल्या रीतीने समजावून सांगितले जाते. इथे तुम्ही मुले येता रिफ्रेश होण्यासाठी, काही हवा खाण्यासाठी येत नाही. कोणी पत्थर बुद्धी असणाऱ्याला घेऊन येतात, तर ते दुनियावी व्हायब्रेशनमध्ये राहतात. आता तुम्ही मुले बाबांच्या श्रीमतावर मायेवर विजय प्राप्त करता. माया सारखी-सारखी तुमच्या बुद्धीला पळवून लावते. इथे तर बाबा आकर्षित करतात. बाबा कधीही कोणती उलटी गोष्ट सांगणार नाहीत. बाबा तर सत्य आहेत ना. तुम्ही इथे ‘सत’च्या संगामध्ये बसले आहात. बाकी सर्वजण ‘असत्य’च्या संगामध्ये आहेत. त्याला सत्संग म्हणणे देखील खूप मोठी चूक आहे. तुम्ही जाणता ‘सत’ एक बाबाच आहेत. मनुष्य सत परमात्म्याची पूजा करतात परंतु हे माहिती नाही की आपण कोणाची पूजा करत आहोत. तर त्याला म्हणणार अंधश्रद्धा. आगा खानचे बघा किती फॉलोअर्स आहेत. ते जेव्हा कुठे जातात तेव्हा त्यांना खूप भेट वस्तू मिळतात. हिऱ्यांमध्ये वजन करतात. नाहीतर हिऱ्यांनी कधी वजन केले जाऊ शकत नाही. सतयुगामध्ये हिरे-माणके तर तुमच्यासाठी जसे की दगड आहेत जे घरांवर लागतात. इथे कोणीही असा नाही, ज्याला हिऱ्यांचे दान मिळेल. मनुष्यांजवळ खूप पैसे आहेत म्हणून दान करतात. परंतु ते दान पाप आत्म्यांना केल्यामुळे देणाऱ्यावर देखील पाप चढते. अजामील सारखे पाप-आत्मे बनतात. हे भगवान बसून समजावून सांगतात, कोणी मनुष्य नाही; म्हणून बाबांनी सांगितले होते तुमची जी चित्रे आहेत त्यावर नेहमी लिहिलेले असावे - ‘भगवानुवाच’. नेहमी लिहा - ‘त्रिमूर्ती शिव भगवानुवाच’. फक्त ‘भगवान’ म्हटल्याने देखील मनुष्य गोंधळून जातील. भगवान तर आहेत निराकार, म्हणून ‘त्रिमूर्ती’ जरूर लिहायचे आहे. त्यामध्ये फक्त शिवबाबा नाहीत तर ब्रह्मा, विष्णू, शंकर तिघांचीही नावे आहेत. ब्रह्मा देवताय नमः, आणि मग त्यांना गुरु देखील म्हणतात. शिव-शंकर एक आहेत असे म्हणतात. आता शंकर कसे ज्ञान देतील. अमर कथा देखील आहे. तुम्ही सर्व पार्वती आहात. बाबा तुम्हा सर्व मुलांना आत्मा समजून ज्ञान देतात. भक्तीचे फळ भगवंतच देतात. ते एक ‘शिवबाबा’च आहेत, ईश्वर, भगवान इत्यादी देखील नाही. ‘शिवबाबा’ शब्द खूप गोड आहे. बाबा स्वतः म्हणतात - गोड मुलांनो, तर बाबा झाले ना.

बाबा समजावून सांगत आहेत - आत्म्यांमध्येच संस्कार भरले जातात. आत्मा निर्लेप नाहीये. निर्लेप असती तर पतित का बनली असती! जरूर लेप-छेप लागतो तेव्हाच तर पतित बनते. म्हणतात देखील भ्रष्टाचारी आहे. देवता आहेत श्रेष्ठाचारी. त्यांची महिमा गातात - ‘तुम्ही सर्व गुणसंपन्न आहात, आम्ही नीच पापी आहोत’; म्हणून स्वतःला देवता म्हणू शकत नाहीत. आता बाबा बसून मनुष्यांना देवता बनवतात. गुरुनानकांच्या ग्रंथामध्ये देखील महिमा आहे. शीख लोक म्हणतात - ‘सत् श्री अकाल’. जे अकाल मूर्त आहेत, तेच खरे सद्गुरु आहेत. तर त्या एकालाच मानले पाहिजे. म्हणतात एक, करतात मग दुसरेच. काहीच अर्थ जाणत नाहीत. आता बाबा जे सद्गुरु आहेत, अकाल आहेत, ते स्वतः बसून समजावून सांगतात. तुमच्यामध्ये देखील नंबरवार आहेत. सन्मुख बसले आहेत तरी देखील काहीच समजत नाहीत. बरेच असे आहेत, इथून गेले आणि खल्लास. बाबा मनाई करतात - मुलांनो, कधीही संसारी झरमुई-झगमुईच्या गोष्टी (व्यर्थ गोष्टी) ऐकू नका. काहीजण तर खूप अति आनंदाने अशा गोष्टी ऐकतात आणि ऐकवतात. बाबांची महावाक्ये विसरून जातात. वास्तवात जी चांगली मुले आहेत, ती आपल्या सेवेची ड्युटी बजावून मग आपल्याच मस्तीमध्ये राहतात. बाबांनी समजावून सांगितले आहे ‘श्रीकृष्ण’ आणि ‘ख्रिश्चन’ याचा खूप चांगला संबंध आहे. श्रीकृष्णाची राजाई असते ना. लक्ष्मी-नारायण हे नाव नंतर पडते. वैकुंठ म्हटल्याने लगेच श्रीकृष्णाची आठवण येईल. लक्ष्मी-नारायण सुद्धा आठवणार नाहीत कारण छोटा मुलगा श्रीकृष्ण आहे. लहान मूल पवित्र असते. तुम्ही हा देखील साक्षात्कार केला आहे - मुले कशी जन्म घेतात, नर्स उभी असते, पटकन उचलले, सांभाळले. लहानपण, तारुण्य, वृद्ध वेग-वेगळा पार्ट बजावला जातो, जे झाले तो ड्रामा. त्यात काहीच संकल्प चालत नाहीत. हा तर ड्रामा पूर्वनियोजित आहे ना. आपला देखील पार्ट बजावला जात आहे ड्रामा प्लॅन अनुसार. मायेची देखील प्रवेशता होते आणि बाबांची देखील प्रवेशता होते. कोणी बाबांच्या मतावर चालतात, कोणी रावणाच्या मतावर. रावण काय चीज आहे? कधी पाहिले आहे काय? फक्त चित्र बघता. शिवबाबांचे तर मग हे रूप आहे. रावणाचे कोणते रूप आहे? ५ विकार रुपी भुते जेव्हा येऊन प्रवेश करतात तेव्हा रावण म्हटले जाते. हि आहे भुतांची दुनिया, असुरांची दुनिया. तुम्ही जाणता आपली आत्मा आता सुधरत चालली आहे. इथे तर शरीर देखील आसुरी आहेत. आत्मा सुधरता-सुधरता पावन होईल. मग हे खल (शरीर) सोडून देणार. मग तुम्हाला सतोप्रधान शरीर मिळेल. कांचन काया मिळेल. ते तेव्हा, जेव्हा आत्मा देखील कांचन होईल. सोने कांचन असेल तर दागिना देखील कांचन बनेल. सोन्यामध्ये खाद (भेसळ) देखील घालतात. आता तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आदि-मध्य-अंताचे नॉलेज फिरत राहते. मनुष्य काहीच जाणत नाहीत. असे म्हणतात ऋषी-मुनी सर्व नेती-नेती करत निघून गेले. आपण असे म्हणतो या लक्ष्मी-नारायणाला विचाराल तर हे देखील नेती-नेती करतील. परंतु यांना विचारले सुद्धा जाऊ शकत नाही. कोण विचारणार? विचारले जाते गुरु लोकांना. तुम्ही त्यांना हे प्रश्न विचारू शकता. तुम्ही समजावून सांगण्यासाठी किती डोकेफोड करता. गळा खराब होतो. बाबा तर मुलांनाच ऐकविणार ना, ज्यांना समजले आहे. बाकी इतरांसोबत फालतूमध्ये थोडेच माथा मारणार. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) सेवेची ड्युटी पूर्ण करून मग आपल्याच मस्तीमध्ये रहायचे आहे. व्यर्थ गोष्टी ऐकायच्या नाहीत आणि ऐकवायच्या देखील नाहीत. एका बाबांचीच महावाक्ये स्मृतीमध्ये ठेवायची आहेत. ती विसरायची नाहीत.

२) सदैव आनंदामध्ये राहण्यासाठी रचता आणि रचनेचे नॉलेज बुद्धीमध्ये फिरत रहावे अर्थात त्याचेच चिंतन होत रहावे. कोणत्याही गोष्टीमध्ये संकल्प चालू नयेत, त्यासाठी ड्रामाला चांगल्या रीतीने समजून घेऊन पार्ट बजावायचा आहे.

वरदान:-
‘मी’पणाला ‘बाबा’ मध्ये सामावून टाकणारे निरंतर योगी, सहजयोगी भव

ज्या मुलांचे बाबांवर श्वासागणिक प्रेम आहे, प्रत्येक श्वासामध्ये बाबा-बाबा आहे त्यांना योगाची मेहनत करावी लागत नाही. आठवणीचा पुरावा आहे - कधी मुखातून ‘मी’ शब्द निघू शकत नाही; ‘बाबा-बाबा’च निघेल. ‘मी’पणा बाबांमध्ये सामावून जावा. ‘बाबा बॅकबोन आहेत, बाबांनी करविले, बाबा सदैव सोबत आहेत, तुम्हीच सोबत रहा, खाणे, चालणे, फिरणे…’ हे इमर्ज रूपामध्ये स्मृती राहील तेव्हा म्हणणार सहजयोगी.

बोधवाक्य:-
‘मी-मी’ करणे अर्थात मायारुपी मांजराचे आवाहन करणे, ‘बाबा-बाबा’ म्हणा, तर माया पळून जाईल.