11-02-24    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   24.02.98  ओम शान्ति   मधुबन


बाबांवर, सेवेवर आणि परिवारावर प्रेम कराल तर मेहनती पासून मुक्त व्हाल


आज चोहों बाजूंची मुले आपल्या बाबांची जयंती साजरी करण्यासाठी आली आहेत. भले मग ते समोर बसलेले आहेत, किंवा आकारी रूपामध्ये बाबांसमोर आहेत. बाबा सर्व मुलांना पहात आहेत - एका बाजूला भेटीचा आनंद आहे दुसर्या बाजूला सेवेचा उमंग उत्साह आहे की लवकरात लवकर बापदादांना प्रत्यक्ष करावे. बापदादा चोहों बाजूंच्या मुलांना पाहून अरब-खरबपटीने मुबारक देत आहेत. जशी मुले बाबांची जयंती साजरी करण्यासाठी काना-कोपर्यातून, दूर-दूरवरून आले आहेत, बापदादा देखील मुलांचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी आले आहेत. सर्वात दूरच्या देशाचे कोण? बाबा की तुम्ही? तुम्ही म्हणाल - आम्ही खूप दुरून आलो आहोत, परंतु बाबा म्हणतात - मी तुमच्या पेक्षाही दूरच्या देशातून आलो आहे. परंतु तुम्हाला वेळ लागतो, बाबांना वेळ लागत नाही. तुम्हा सर्वांना विमान किंवा रेल्वेने यावे लागते, बाबांना फक्त रथ घ्यावा लागतो. तर असे नाही की फक्त तुम्हीच बाबांचा जन्मदिन साजरा करण्यासाठी आले आहात परंतु बाबा देखील आदि साथी ब्राह्मण आत्मे, जन्माच्या साथी मुलांचा बर्थ डे साजरा करण्यासाठी आले आहेत कारण बाबा एकटे अवतरीत होत नाहीत परंतु ब्रह्मा आणि ब्राह्मण मुलांसोबत दिव्य जन्म घेतात अर्थात अवतरीत होतात. ब्राह्मणांशिवाय यज्ञाची रचना एकटे बाबा करू शकत नाहीत. तर यज्ञ रचला, ब्रह्मा द्वारे ब्राह्मण रचले तेव्हा तुम्हा सर्वांचा जन्म झाला. भले मग दोन वर्षाचे आहात, नाहीतर दोन महिन्याचे आहात परंतु तुम्हा सर्वांना देखील दिव्य ब्राह्मण जन्माची मुबारक आहे. हा दिव्य जन्म किती श्रेष्ठ आहे. बाबा देखील प्रत्येक दिव्य जन्मधारी ब्राह्मण आत्म्यांच्या भाग्याचा चमकणारा तारा पाहून हर्षित होत आहेत. आणि सदैव हेच गाणे गात राहतात - वाह हीरे तुल्य जीवनवाले ब्राह्मण बच्चे वाह. वाह-वाह आहात ना? बाबांनी मुलांना वाह-वाह बनविले. बाबांचा देखील हा अलौकिक जन्म न्यारा आहे तर तुम्हा मुलांचा देखील न्यारा आणि प्यारा आहे. हे एकच बाबा आहेत ज्यांचा असा जन्म अथवा जयंती आहे, जो आणखी कोणाचाही असा जन्मदिवस ना झाला आहे आणि ना होणार आहे. एक तर निराकार आणि मग दिव्य जन्म; इतर सर्व आत्म्यांचा जन्म आपल्या-आपल्या साकार शरीरामध्ये होतो परंतु निराकार बाबांचा जन्म परकाया प्रवेशाने होतो. साऱ्या कल्पामध्ये असा या विधीने कोणाचा जन्म झाला आहे का? एक बाबांचाच असा न्यारा जन्मदिवस असतो ज्याला शिवजयंतीच्या रूपामध्ये भक्त देखील साजरा करत आले आहेत म्हणून या दिव्य जन्माचे महत्व तुम्ही जाणता, भक्त तर जाणत नाहीत परंतु जे ऐकले आहे त्याप्रमाणे उच्च ते उच्च समजून साजरे करतात. तुम्ही मुले केवळ साजरा करत नाही परंतु साजरे करण्यासोबतच स्वत:ला बाप समान बनवता देखील. अलौकिक दिव्य जन्माच्या महत्वाला जाणता. आणखी कोणाचाही पित्यासोबत मुलाचा, एकत्र जन्म होत नाही परंतु शिव जयंती म्हणजे बाबांच्या दिव्य जन्मासोबत मुलांचा देखील जन्म होतो, म्हणून डायमंड जुबली साजरी केली ना. तर बाबांसोबत मुलांचा देखील दिव्य जन्म आहे. फक्त याच जयंतीला हीरे तुल्य जयंती म्हणता परंतु हीरे तुल्य जयंती साजरी करत स्वत: देखील हीरे तुल्य जीवनामध्ये येता. या रहस्याला सर्व मुले चांगल्या रीतीने जाणता देखील आणि इतरांना देखील ऐकवत राहता. बापदादा समाचार ऐकत राहतात, बघतात देखील की मुले बाबांच्या दिव्य जन्माचे महत्व किती उमंग-उत्साहाने साजरे करत असतात. बापदादा चोहों बाजूंच्या सेवाधारी मुलांना हिम्मतीच्या रिटर्नमध्ये मदत देत राहतात. मुलांची हिम्मत आणि बाबांची मदत आहे.

आजकाल बापदादांपाशी सर्व मुलांचा एकच स्नेहाचा संकल्प वारंवार येतो की, आता लवकरात लवकर बाप समान बनायचेच आहे. बाबा देखील म्हणतात - गोड मुलांनो बनायचेच आहे. प्रत्येकाला हा दृढ निश्चय आहे पुन्हा आणखी अंडरलाइन करा की, आम्ही नाही बनणार तर अजून कोण बनणार! आम्हीच होतो, आम्हीच आहोत आणि आम्हीच प्रत्येक कल्पामध्ये बनत राहणार. हा पक्का निश्चय आहे ना?

डबल विदेशी देखील शिव जयंती साजरी करण्यासाठी आले आहात का? छान आहे, डबल विदेशी, हात वर करा. बापदादा पहात आहेत की डबल विदेशींना सर्वात जास्त हाच उमंग-उत्साह आहे की विश्वातील कोणताही काना-कोपरा राहता कामा नये. भारताला तर सेवेसाठी खूप वेळ मिळाला आहे आणि भारताने देखील गावा-गावात संदेश दिला आहे. परंतु डबल विदेशींना सेवेसाठी भारतापेक्षाही कमी वेळ मिळाला आहे. तरीही उमंग-उत्साह असल्याकारणाने बापदादांसमोर सेवेचा चांगला पुरावा घेऊन आले आहात आणि आणत रहाल. भारतामध्ये जो वर्तमान समयी विविध प्रभागाच्या (विंगच्या) सेवेचा आरंभ झाला आहे, त्या कारणाने देखील सर्व क्षेत्रातील लोकांना संदेश मिळणे सोपे झाले आहे कारण प्रत्येक क्षेत्रातील आपल्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ इच्छितो; तर हा प्रभागानुसार वर्गीकरणाचा शोध चांगला आहे. यामुळे भारताच्या सेवेमध्ये देखील विशेष आत्म्यांचे येणे चांगली शोभा आणते. चांगले वाटते ना! विविध क्षेत्राची सेवा चांगली वाटते का? विदेशवाले देखील आपले चांगले-चांगले ग्रुप घेऊन येतात , रिट्रीट करतात, पद्धत चांगली वापरली आहे. जसे भारतामध्ये प्रभागानुसार सेवेचा चान्स मिळाला आहे, तशीच यांची (विदेशवाल्यांची) देखील ही विधी खूप छान आहे. बापदादांना दोन्हीकडील सेवा पसंत आहे, चांगले आहे. जगदीश मुलाने शोध चांगला लावला आहे आणि विदेशामध्ये हे रिट्रीट, डायलॉग कोणी सुरू केले? (सर्वांनी मिळून केले) भारतामध्ये देखील सर्वांनी मिळून केले आहे तरी देखील निमित्त बनले आहेत. छान आहे, प्रत्येकाला आपल्या हमजीन्सच्या (बरोबरीच्या) संघटनमध्ये चांगले वाटते. तर दोन्ही बाजूच्या सेवेमध्ये अनेक आत्म्यांना समीप आणण्याचा चान्स मिळतो. रिझल्ट चांगला मिळतो ना? रिट्रीटचा रिझल्ट चांगला होता का? आणि विंगचा रिझल्ट देखील चांगला आहे. देश-विदेशवाले कोणता ना कोणता नवीन इन्वेन्शन (शोध) लावत राहतात आणि लावत राहणार. मग भारतात असो किंवा विदेशामध्ये असो सेवेचा उमंग छान आहे. बापदादा पाहतात जे मनापासून निस्वार्थपणे सेवेमध्ये पुढे जात राहतात, त्यांच्या खात्यामध्ये पुण्याचे खाते खूप चांगले जमा होत जाते. बर्याच मुलांचे, एक आहे - आपल्या पुरुषार्थाच्या प्रारब्धाचे खाते, दुसरे आहे - संतुष्ट राहून संतुष्ट केल्याने आशीर्वादांचे खाते आणि तिसरे आहे - यथार्थ योगयुक्त, युक्तियुक्त सेवेच्या रिटर्नमध्ये पुण्याचे खाते जमा होते. बापदादा प्रत्येकाची ही तीनही खाती चेक करत असतात. जर कोणाचे तिन्ही खात्यामध्ये जमा होत असेल तर त्याचे लक्षण आहे - ते सदैव स्वत:ला देखील सहज पुरुषार्थी म्हणून अनुभव करतात आणि दुसर्यांना देखील त्या आत्म्याकडून सहज पुरुषार्थाची आपोआप प्रेरणा मिळते. ते सहज पुरुषार्थाचे प्रतीक आहेत. मेहनत करावी लागत नाही, बाबांवर, सेवेवर, आणि सर्व परिवारावर प्रेम आहे तर हे तिन्ही प्रकारचे प्रेम मेहनती पासून मुक्त करते.

बापदादा सर्व मुलांकडून हीच श्रेष्ठ आशा बाळगतात की, सर्व मुलांनी सदैव सहज पुरुषार्थी असावे. ६३ जन्म भक्तीमध्ये, परिस्थितींमध्ये भटकत खूप मेहनत केली आहे, आता मेहनती पासून मुक्त होण्याचा हा एकच जन्म आहे. जर बराच वेळ मेहनत करत राहिलात तर मग संगमयुगाचे हे वरदान प्रेमाने सहज पुरुषार्थी हे कधी घेणार? युग संपले, वरदान देखील संपणार. तर सदैव या वरदानाला लवकरात लवकर घ्या. कोणतेही मोठ्यात मोठे कार्य असो, कोणतीही मोठ्यात मोठी समस्या असो परंतु प्रत्येक कार्य, प्रत्येक समस्येतून असे पार व्हाल जसे तुम्ही लोक म्हणता लोण्यातून केस काढून टाकला. बऱ्याच मुलांचा बापदादा थोडा-थोडा खेळ पाहून, हर्षित देखील होतात आणि मुलांना पाहून दया देखील येते. जेव्हा कोणती समस्या किंवा कोणते मोठे कार्य देखील समोर येते तर कधी-कधी मुलांच्या चेहेर्यावर थोडीशी समस्येची किंवा कार्याची आठी दिसून येते. थोडासा चेहरा बदलून जातो. आणि जर कोणी विचारले कि, काय झाले? तर म्हणतात - कामच खूप आहे ना! विघ्न-विनाशकासमोर जर विघ्नच आले नाही तर विघ्न-विनाशक टायटल कसे गायले जाणार? चेहेर्यावर जरा देखील थकवा किंवा थोडासा मूड बदलल्याचे चिन्ह देखील दिसता कामा नये. का? तुमची जड चित्रं ज्यांची अर्धाकल्प पुजा केली जाईल त्यामध्ये कधी थोडासा थकवा किंवा मूड बदलल्याचे चिन्ह दिसून येते का? जर तुमची जड चित्रे सदैव हसतमुख असतात तर ती कोणाची चित्रं आहेत? तुमचीच आहेत ना? तर चैतन्यचीच यादगार (स्मृति रूप) चित्रे आहेत; त्यामुळे थोडा देखील थकवा किंवा ज्याला चिडचिडेपणा म्हणता, तो येता कामा नये. सदैव हसतमुख चेहरा बापदादांना देखील आणि सर्वांनाच आवडतो. जर कोणी चिडचिड करत असेल तर त्याच्या समोर तुम्ही जाल का? विचार कराल - आता सांगू की नको सांगू. तर तुमच्या जड चित्रांकडे तर भक्त खूप उमंगाने येतात आणि चैतन्यमध्ये कोणी भारी होत असेल तर चांगले वाटेल का? आता बापदादा सर्व मुलांच्या चेहेर्यावर सदैव फरिश्ता रूप, वरदानी रूप, दाता रूप, रहम दिल, अथक, सहज योगी किंवा सहज पुरुषार्थीचे रूप पाहू इच्छितात. असे म्हणू नका कि, गोष्टच अशी होती ना. कशीही गोष्ट असू दे परंतु रूप नेहमी हसतमुख, शीतल, गंभीर आणि रमणिक दोन्हींच्या बॅलन्सवाले असावे. कोणीही अचानक आला आणि तुम्ही कोणत्यातरी समस्येमुळे किंवा कार्यामुळे सहज पुरुषार्थी रूपामध्ये नसाल तर तो काय पाहिल? तुमचे मग तेच चित्र घेऊन जाईल. कोणत्याही वेळी, कोणीही कोणालाही भले एक महिन्याचा असो, दोन महिन्याचा असो, अचानक जरी तुमच्या चेहेर्याचा फोटो काढला तर असाच फोटो असावा जो मघाशी सांगितला. दाता बना. घेणारे नाही, दाता. कोणी काहीही देवो, चांगले देवो किंवा वाईट देखील देऊ देत परंतु तुम्ही मोठ्यात मोठ्या बाबांची मुले मोठ्या मनाचे आहात; जर वाईट जरी दिले तरीही मोठ्या मनाने वाईटाला आपल्यामध्ये न स्विकारता दाता बनून तुम्ही त्याला सहयोग द्या, स्नेह द्या, शक्ती द्या. कोणता ना कोणता गुण आपल्या स्थितीद्वारे गिफ्ट म्हणून द्या. इतक्या मोठ्या मनाच्या मोठ्यात मोठ्या बाबांची मुले आहात. रहम करा. मनामध्ये त्या आत्म्याप्रती आणखी जास्त स्नेह इमर्ज करा. ज्या स्नेहाच्या शक्तीने तो स्वत:च परिवर्तित होईल. असे मोठ्या मनाचे आहात की छोट्या मनाचे? सामावण्याची शक्ती आहे? सामावून घ्या. सागरामध्ये किती कचरा टाकतात, परंतु कचरा टाकणार्याला, त्या कचर्याच्या बदल्यात कचरा देत नाही. तुम्ही तर ज्ञानाचे सागर, शक्तीच्या सागराची मुले आहात, मास्टर आहात.

तर ऐकलेत बापदादा काय पाहू इच्छितात? मेजॉरिटी मुलांनी लक्ष्य ठेवले आहे की या वर्षामध्ये परिवर्तन करायचेच आहे. करु, विचार करतो, असे नाही, करायचेच आहे. करायचेच आहे की तिथे जाऊन विचार करणार? जे समजतात करायचेच आहे त्यांनी एका हाताची टाळी वाजवा. (सर्वांनी हात हलवला) खूप छान. फक्त हा हात वर करू नका, मनाने दृढ संकल्पाचा हात वर करा. हा हात तर वर करणे सोपे आहे. मनापासूनचा दृढ संकल्पाचा हात सदैव सफलता स्वरूप बनवितो. जो विचार केला ते होणारच आहे. विचार तर पॉझिटिव्ह कराल ना! निगेटिव्ह विचार तर करायचा नाहीये. निगेटिव्ह विचार करण्याचा रस्ता कायमसाठी बंद. बंद करता येतो का उघडतो? जसे आता वादळ आले ना तर दरवाजे आपोआप उघडले, असे तर होत नाही ना? तुम्ही समजता बंद करून आलो आहोत, परंतु वादळ उघडेल, असा अर्धवट लावू नका. अच्छा.

डबल विदेशींचा उत्सव चांगला झाला ना! (१० वर्षांपेक्षा अधिक काळापासून ज्ञानामध्ये चालणार्या जवळ-जवळ ४०० डबल विदेशी भाऊ-बहीणींचा सन्मान-समारोह साजरा केला गेला) छान वाटले ना? ज्यांनी साजरा केला आणि छान वाटले त्यांनी हात वर करा. पांडव देखील आहेत. याचे महत्व काय आहे? साजरे करण्याचे महत्व काय आहे? साजरे करणे अर्थात बनणे. सदैव असे ताजधारी, स्व पुरुषार्थ आणि सेवेची जबाबदारी का म्हणावे, मजा असेच म्हणू, सेवेची मजा साजरी करण्याचा ताज सदैव घातलेला रहावा. आणि गोल्डन ओढणी सर्वांनी घातली ना! तर गोल्डन ओढणी का घातली गेली? सदैव गोल्डन एजड स्थिती, सिल्व्हर नाही, गोल्डन. आणि मग दोन-दोन हार देखील घातले होते. तर दोन हार कोणते घालणार? एक तर सदैव बाबांच्या गळ्यातील हार. कायम, कधीही गळ्यातून काढू नका, गळ्यामध्येच गुंफून रहावा आणि दूसरा सदैव सेवेद्वारे इतरांना देखील बाबांच्या गळ्यातील हार बनविणे, हा डबल हार आहे. तर साजरे करणार्यांना देखील खूप छान वाटले आणि पाहणार्यांना देखील वाटले. तर हा उत्सव साजरा करण्याचे आणि सदैव उत्सवाचे रहस्य सांगितले. आणि सर्वांसोबत हे साजरे करणे अर्थात आणखी उमंग-उत्साह वाढविणे. सर्वांचे अनुभव बापदादांनी तर पाहिले. चांगले अनुभव होते. खुशी आणि नशा सर्वांच्या चेहेर्यावर दिसत होता. बस, आपले असेच शक्तीशाली, हसतमुख रमणिक आणि गंभीर स्वरूप सदैव इमर्ज ठेवा; कारण आजकाल वेळेच्या परिस्थिती प्रमाणे जास्त ऐकणारे, समजून घेणारे कमी आहेत, बघून अनुभव करणारे जास्त आहेत. बाबांचा परिचय ऐकविण्याऐवजी तुमच्या चेहर्यामध्ये दिसला पाहिजे. तर छान केलेत. बापदादा देखील पाहून हर्षित होत आहेत. हे वर्ष किंवा या सीझनला विशेष उत्सवाचा सीझन म्हणून साजरे केले. प्रत्येक वेळ एकसारखी नसते.

(ड्रिल) सर्वांमध्ये रुलिंग पॉवर आहे? कर्मेंद्रियांवर जेव्हा पाहिजे तेव्हा रूल (शासन) करू शकता? स्व-राज्य अधिकारी बनले आहात? जे स्व-राज्य अधिकारी आहेत तेच विश्व राज्य अधिकारी बनणार. पाहिजे तेव्हा, कसेही वातावरण असो परंतु जर मन-बुद्धीला ऑर्डर द्याल स्टॉप, तर होऊ शकते का वेळ लागेल? हा अभ्यास प्रत्येकाला संपूर्ण दिवसभरामध्ये अधून-मधून करणे आवश्यक आहे. आणि प्रयत्न करा ज्यावेळी मन-बुद्धी खूप व्यस्त आहे, अशा वेळी देखील जर एका सेकंदामध्ये स्टॉप करू इच्छिता तर होऊ शकते का? तर विचार केला स्टॉप आणि स्टॉप होण्यासाठी ३ मिनिटे, ५ मिनिटे लागतील? हा अभ्यास शेवटी खूप उपयोगी पडणार आहे. याच आधारावर पास विद ऑनर बनू शकाल. अच्छा.

सदैव हृदयातील उमंग-उत्साहाचा उत्सव साजरे करणारे स्नेही आत्मे, सदैव हीरे तुल्य जीवनाचा अनुभव करणारे, अनुभवाची ऑथॉरिटीवाले विशेष आत्मे, सदैव आपल्या चेहेर्याद्वारे बाबांचा परिचय देणारे बाबांना प्रत्यक्ष करणारे सेवाधारी आत्मे, सदैव गंभीर आणि रमणिक दोन्हीचा एकत्र बॅलन्स ठेवणाऱ्या सर्वांच्या ब्लेसिंगचे अधिकारी आत्मे, अशा चोहों बाजूंच्या देश-विदेशातील मुलांना शिवरात्रीची मुबारक, मुबारक आहे. त्याच सोबत दिलाराम बापदादांची अंतःकरणापासून आणि उत्कट प्रेमाने प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

वरदान:-
आपल्या राज्य अधिकारी किंवा पूज्य स्वरुपाच्या स्मृती द्वारे दाता बनून देणारे सर्व खजिन्यांनी संपन्न भव

सदैव याच स्मृतीमध्ये रहा की, मी पूज्य आत्मा इतरांना देणारी दाता आहे, घेणारी नाही, देवता आहे. जसे बाबांनी तुम्हा सर्वांना सहज दिले तसे तुम्ही देखील मास्टर दाता बनून देत चला, मागू नका. आपल्या राज्य अधिकारी किंवा पूज्य स्वरुपाच्या स्मृतीमध्ये रहा. आज पर्यंत तुमच्या जड चित्रांसमोर जाऊन मागणी करतात, म्हणतात - आम्हाला वाचवा. तर तुम्ही वाचविणारे आहात, वाचवा-वाचवा असे म्हणणारे नाही. परंतु दाता बनण्यासाठी आठवणीद्वारे, सेवेद्वारे शुभ भावना, शुभ कामनेद्वारे सर्व खजिन्यांनी संपन्न बना.

सुविचार:-
वर्तन आणि चेहेर्यावरील प्रसन्नता हीच रुहानी पर्सनॅलिटीची निशाणी आहे.