11-04-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - हे पूर्व नियोजित नाटक आहे, या नाटकातून एकही आत्मा सुटू शकत नाही, मोक्ष कोणालाही मिळू शकत नाही”

प्रश्न:-
उच्च ते उच्च पतित-पावन बाप भोलानाथ कसे आहेत?

उत्तर:-
तुम्ही मुले त्यांना मुठभर तांदूळ देऊन महाल घेता, म्हणूनच बाबांना भोलानाथ म्हटले जाते. तुम्ही म्हणता शिवबाबा आमचा मुलगा आहे, तो मुलगा असा आहे जो कधीही काही घेत नाही, नेहमीच देतो. भक्तीमध्ये असे म्हणतात - ‘जो जसे कर्म करतो तसे फळ मिळवतो’. परंतु भक्तीमध्ये तर अल्पकाळाचे मिळते. ज्ञानामध्ये समजून करतात म्हणून सदाकाळाचे मिळते.

ओम शांती।
रुहानी मुलांसोबत रुहानी बाबा रुहरिहान करत आहेत किंवा असे म्हणणार रूहानी मुलांना राजयोग शिकवत आहेत. तुम्ही आला आहात बेहदच्या बाबांकडून राजयोग शिकण्यासाठी त्यामुळे बुद्धी बाबांकडे गेली पाहिजे. हे आहे परमात्मा ज्ञान आत्म्यांप्रति. भगवानुवाच शाळीग्रामांप्रति. आत्म्यांनाच ऐकायचे आहे म्हणून आत्म-अभिमानी बनायचे आहे. आधी तुम्ही देह-अभिमानी होता. या पुरुषोत्तम संगमयुगावरच बाबा येऊन तुम्हा मुलांना आत्म-अभिमानी बनवितात. आत्म-अभिमानी आणि देह-अभिमानी यामधील फरक तुम्हाला समजला आहे. बाबांनीच समजावून सांगितले आहे - ‘आत्माच शरीराद्वारे पार्ट बजावते. आत्मा शिकते, शरीर नाही’. परंतु देह-अभिमान असल्या कारणाने असे समजतात, अमका शिकवितो. तुम्हा मुलांना जे शिकविणारे आहेत ते आहेत निराकार. त्यांचे नाव आहे - ‘शिव’. शिवबाबांना स्वतःचे शरीर नसते. बाकी सर्वजण म्हणतील - माझे शरीर. हे कोणी म्हटले? आत्म्याने म्हटले - हे माझे शरीर आहे. बाकी ते सर्व आहे भौतिक शिक्षण. त्यात अनेक प्रकारचे विषय असतात. बी. ए. इत्यादी किती नावे आहेत. या ज्ञानामध्ये एकच नाव आहे, शिक्षण देखील एकच शिकवतात. एकच बाबा येऊन शिकवितात, तर बाबांचीच आठवण करावी लागेल. आपल्याला बेहदचे बाबा शिकवतात, त्यांचे काय नाव आहे? त्यांचे नाव आहे - ‘शिव’. असे नाही की नावा-रूपापासून न्यारे आहेत. मनुष्यांचे नाव शरीरावरून पडते. म्हणतील - अमक्याचे हे शरीर आहे. तसे शिवबाबांचे नाव नाही आहे. मनुष्यांची नावे शरीराला दिली जातात, एकच निराकार बाबा आहेत ज्यांचे नाव आहे - ‘शिव’. जेव्हा शिकविण्यासाठी येतात तेव्हा देखील नाव शिवच आहे. हे शरीर तर त्यांचे नाहीये. भगवान एकच असतात, १०-१२ नाहीत. ते आहेतच एक आणि मनुष्य त्यांना २४ अवतार आहेत असे म्हणतात. बाबा म्हणतात - मला खूप भटकवले आहे. परमात्म्याला दगड-धोंड्यात सर्वांमध्ये आहे असे म्हटले आहे. जसे भक्ती मार्गामध्ये स्वतः भटकले आहेत तसेच मला देखील भटकवले आहे. ड्रामा अनुसार त्यांची बोलण्याची शैली किती शीतल आहे. समजावून सांगत आहेत - ‘माझ्यावर सर्वांनी किती अपकार केले आहेत, माझी किती निंदा केली आहे’. मनुष्य म्हणतात - ‘आम्ही निष्काम सेवा करतो’; बाबा म्हणतात - ‘माझ्याशिवाय कोणीही निष्काम सेवा करू शकत नाही’. जे काही करतात त्याचे फळ जरूर मिळते. आता तुम्हाला फळ मिळत आहे. गायन आहे की भक्तीचे फळ भगवान देणार कारण भगवान आहेत ज्ञानाचे सागर. भक्तीमध्ये अर्धा कल्प तुम्ही कर्मकांड करत आले आहात. आता हे ज्ञान आहे शिक्षण. शिक्षण एकदाच मिळते आणि एका बाबांकडूनच मिळते. बाबा पुरुषोत्तम संगम युगावर एकदाच येऊन तुम्हाला पुरुषोत्तम बनवून जातात. हे आहे ज्ञान आणि ती आहे भक्ती. अर्धाकल्प तुम्ही भक्ती करत होता, आता जे भक्ती करत नाहीत, त्यांना असा संशय येतो की माहित नाही, भक्ती केली नाही म्हणूनच अमका मरण पावला, आजारी पडला. परंतु असे काही नाही आहे.

बाबा म्हणतात - ‘मुलांनो, तुम्ही बोलावत आले आहात की, तुम्ही येऊन पतितांना पावन बनवून सर्वांची सद्गती करा’. तर आता मी आलो आहे. भक्ती वेगळी आहे, ज्ञान वेगळे आहे. भक्तीमुळे अर्धा कल्प होते - रात्र, ज्ञानामुळे अर्ध्या कल्पासाठी होतो - दिवस. राम राज्य आणि रावण राज्य दोन्ही बेहद आहेत. दोघांचा कालावधी सारखा आहे. यावेळी भोगी असल्या कारणामुळे दुनियेची जास्त वृद्धी होते, आयुर्मानही कमी होते. जास्त वृद्धी होऊ नये यासाठी मग कुटूंब नियोजन करतात. तुम्ही मुले जाणता इतक्या मोठ्या दुनियेची संख्या कमी करणे तर बाबांचेच काम आहे. बाबा येतातच कमी करण्यासाठी. बोलावतात देखील, बाबा, येऊन अधर्माचा विनाश करा अर्थात सृष्टीवरील संख्या कमी करा. दुनिया तर जाणत नाही की बाबा किती संख्या कमी करतात. फार थोडे मनुष्य राहतात. बाकी सर्व आत्मे आपल्या घरी निघून जातात आणि नंबरवार पार्ट बजावण्यासाठी येतात. नाटकामध्ये जितक्या उशिरा पार्ट असतो, तितके ते घरामधून देखील उशिराने येतात. आपला धंदा इत्यादी पूर्ण करून नंतर येतात. नाटकवाले देखील आपला धंदा करतात, आणि मग वेळेवर पार्ट बजावण्यासाठी नाटकामध्ये येतात. तुमचे देखील असेच आहे, शेवटी ज्यांचा पार्ट आहे ते शेवटी येतात. जे अगदी पहिले सुरुवातीचे पार्टधारी आहेत ते सतयुग आदि मध्ये येतात. शेवटी येणारे बघाल तर अजून येतच राहतात. शाखा-उपशाखा शेवटपर्यंत येतच राहतात.

या वेळी (मुरलीच्या वेळी) तुम्हा मुलांना ज्ञानाच्या गोष्टी समजावल्या जातात आणि पहाटे आठवणीमध्ये बसता, ते आहे ड्रिल. आत्म्याला आपल्या पित्याची आठवण करायची आहे. ‘योग’ अक्षर सोडून द्या. यामध्येच गोंधळून जातात. म्हणतात, आमचा योग लागत नाही. बाबा म्हणतात - ‘अरे, तुम्ही बाबांची आठवण करू शकत नाही! ही चांगली गोष्ट आहे काय!’ आठवण केली नाहीत तर पावन कसे बनणार? बाबा आहेतच पतित-पावन. बाबा येऊन ड्रामाच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य समजावून सांगतात. हा व्हरायटी धर्म आणि व्हरायटी मनुष्यांचा वृक्ष आहे. संपूर्ण सृष्टीमध्ये जे पण मनुष्य मात्र आहेत सर्व पार्टधारी आहेत. किती खंडीभर मनुष्य आहेत, हिशोब काढतात - एका वर्षामध्ये इतके करोड जन्माला येतील. मग इतकी जागाच कुठे आहे. तेव्हा बाबा म्हणतात - मी येतो संख्या मर्यादित करण्यासाठी. जेव्हा सर्व आत्मे वरून येतात, तेव्हा आपले घर (परमधाम) रिकामे होते. बाकी जे काही राहिलेले आहेत ते देखील येतात. झाड कधी सुकत नाही, चालतच राहते. सरतेशेवटी जेव्हा तिथे कोणीच बाकी राहत नाही, तेव्हा मग सर्वजण जाणार. नवीन दुनियेमध्ये किती थोडे होते, आता किती खंडीभर आहेत. शरीर तर सर्वांचे बदलत जाते. तो जन्म देखील तेच घेणार जे कल्प-कल्प घेतात. हा वर्ल्ड ड्रामा कसा चालतो, हे बाबांशिवाय कोणीही समजावून सांगू शकणार नाही. मुलांमध्ये देखील नंबरवार पुरुषार्था अनुसार समजतात. बेहदचे नाटक किती मोठे आहे. किती समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत. बेहदचे बाबा तर ज्ञानाचा सागर आहेत. बाकी तर सर्व लिमिटेड आहेत. वेद-शास्त्र इत्यादी काही बनवितात, जास्त तर काही बनणार नाही. तुम्ही जर सुरुवातीपासून लिहाल तर किती मोठीच्या-मोठी गीता बनेल. सर्व काही छापत गेले तर घरापेक्षा देखील मोठी गीता बनेल म्हणून महिमा केली आहे - ‘सागर को स्याही बना दो…’ आणि मग असे देखील म्हणतात की, पक्षांनी सागराला हप केले. तुम्ही पक्षी आहात, साऱ्या ज्ञान सागराला हप करत आहात. तुम्ही आता ब्राह्मण बनले आहात. तुम्हाला आता ज्ञान मिळाले आहे. ज्ञानाद्वारे तुम्हाला सर्वकाही माहित झाले आहे. कल्प-कल्प तुम्ही इथे शिक्षण घेता, त्यामध्ये काहीही कमी-जास्त होणार नाही. जितका जो पुरुषार्थ करतात, तितके त्यांचे प्रारब्ध बनते. प्रत्येकजण समजू शकतो आपण किती पुरुषार्थ करून, कोणते पद मिळविण्याच्या लायक बनत आहोत. शाळेमध्ये देखील नंबरवार परीक्षा पास होतात. सूर्यवंशी-चंद्रवंशी दोन्ही बनतात. जे नापास होतात ते चंद्रवंशी बनतात. कोणीच जाणत नाही की रामाला धनुष्य कशासाठी दिले आहे? मारामारीचा इतिहास बनवला आहे. यावेळी आहेच मारामारी. तुम्ही जाणता जो जसे कर्म करतो त्याला तसे फळ मिळते. जसे कोणी हॉस्पिटल बनवतात तर दुसऱ्या जन्मामध्ये ते दीर्घायुषी आणि निरोगी असतील. कोणी धर्मशाळा, शाळा बनवतात तर त्यांना अर्ध्या कल्पाचे सुख मिळते. इथे मुले जेव्हा येतात तेव्हा बाबा विचारतात तुम्हाला किती मुले आहेत? तर म्हणतात ३ लौकिक आणि एक शिवबाबा कारण ते वारसा देतात देखील आणि घेतात देखील. हिशोब आहे. त्यांना घ्यायचे काहीच नाहीये, ते तर दाता आहेत. मुठभर तांदूळ देऊन तुम्ही महाल घेता, म्हणून भोलानाथ आहेत. पतित-पावन ज्ञानसागर आहेत. आता बाबा म्हणतात - ‘भक्तीची हि जी शास्त्रं आहेत त्याचे सार मी समजावून सांगतो’. भक्तीचे फळ असते अर्ध्या कल्पासाठी. संन्यासी म्हणतात - ‘हे सुख कागविष्ठा समान आहे’; म्हणून घरदार सोडून जंगलामध्ये निघून जातात. म्हणतात - ‘आम्हाला स्वर्गाचे सुख नको आहे, ज्यामुळे परत नरकामध्ये यावे लागेल. आम्हाला मोक्ष पाहिजे’. परंतु हे लक्षात ठेवा की हे बेहदचे नाटक आहे. या नाटकातून एकही आत्मा सुटू शकत नाही, पूर्वनियोजित आहे. तेव्हाच तर गातात - ‘बनी बनाई बन रही…’ परंतु भक्ति मार्गामध्ये चिंता करावी लागते. जे काही होऊन गेले आहे ते पुन्हा होणार. ८४ चे चक्र तुम्ही फिरता. हे कधीच बंद होत नाही, पूर्वनियोजित आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या पुरुषार्थाला झिडकारू कसे शकता? तुमच्या म्हणण्याने तुम्ही यातून बाहेर निघू शकत नाही. मोक्ष मिळविणे, ज्योती ज्योत सामावणे, ब्रह्ममध्ये लीन होणे - हे सर्व एकच आहे. अनेक मते आहेत, अनेक धर्म आहेत. आणि मग म्हणतात ‘तुम्हारी गत-मत तुम ही जानो’. तुमच्या श्रीमताने सद्गती मिळते. हे तर तुम्हीच जाणता, तुम्ही जेव्हा याल तेव्हा आम्हाला देखील कळेल आणि आम्ही देखील पावन बनू. शिक्षण शिकणार आणि आमची सद्गती होणार. जेव्हा सद्गती होते त्यानंतर मग कोणी बोलावतसुद्धा नाही. यावेळेस सर्वांवर दुःखाचे डोंगर कोसळणार आहेत. रक्तरंजित खेळ दाखवतात आणि गोवर्धन पर्वत देखील दाखवतात. करंगळीने पहाड उचलला. तुम्ही याचा अर्थ जाणता. तुम्ही थोडीशी मुले या दुःखाच्या पहाडाला दूर करता. दुःख देखील सहन करता.

तुम्हाला सर्वांना वशीकरण मंत्र द्यायचा आहे. असे म्हणतात - ‘तुलसीदास चन्दन घिसें…’ राजाईचा तिलक तुम्हाला मिळतो, आपापल्या मेहनती नुसार. तुम्ही राजाईसाठी शिकत आहात. राजयोग ज्यामुळे राजाई मिळते तो शिकविणारे एक बाबाच आहेत. आता तुम्ही घरामध्ये बसले आहात, हा दरबार नाहीये. दरबार त्याला म्हटले जाते जिथे राजे-महाराजे भेटतात. ही पाठशाळा आहे. समजावून सांगितले जाते - ब्राह्मणी कोणत्याही विकारी व्यक्तीला इथे घेऊन येऊ शकत नाही. ते पतित वायुमंडळाला खराब करतात, म्हणून परवानगी देत नाहीत. जेव्हा पवित्र बनतील, तेव्हा परवानगी दिली जावी. आता कोणाकोणाला परवानगी द्यावी लागते. जर इथून जाऊन पतित बनले तर धारणा होणार नाही. हे तर जसे स्वतःला शापित करणे झाले. विकार आहेच रावणाचे मत. रामाचे मत सोडून रावणाच्या मताने विकारी बनून जसे पाषाण बनतात. गरुड पुराणामध्ये अशा खूप रोमांचक गोष्टी लिहिलेल्या आहेत. बाबा म्हणतात मनुष्य, मनुष्यच बनतो, जनावर इत्यादी बनत नाही. शिक्षणामध्ये काही अंधश्रद्धेच्या गोष्टी असत नाहीत. तुमचे हे शिक्षण आहे. स्टुडंट्स शिकून पास होऊन कमावतात. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) सर्वांना वशीकरण मंत्र द्यायचा आहे. मेहनतीने अभ्यास करून राजाईचा तिलक घ्यायचा आहे. या दुःखाच्या डोंगराला दूर करण्यासाठी आपले एक बोट द्यायचे आहे.

२) संगमयुगावर पुरुषोत्तम बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. बाबांना आठवण करण्याची ड्रिल करायची आहे. बाकी ‘योग-योग’ असे म्हणून गोंधळून जायचे नाही.

वरदान:-
सेवेमध्ये विघ्नांना उन्नतीची शिडी समजून पुढे जाणारे निर्विघ्न, सच्चे सेवाधारी भव

सेवा, ब्राह्मण जीवनाला सदैव निर्विघ्न बनविण्याचे साधन देखील आहे आणि सेवेमध्येच विघ्नांचे पेपर देखील जास्त येतात. निर्विघ्न सेवाधारीला खरा सेवाधारी म्हटले जाते. विघ्न येणे हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. येणारच आहेत आणि येतच राहतील कारण हि विघ्न किंवा पेपर अनुभवी बनवितात. याला विघ्न न समजता, अनुभवाची उन्नती होत आहे - या भावाने बघाल तर उन्नतीची शिडी अनुभव होईल आणि पुढे जात रहाल.

बोधवाक्य:-
विघ्न रूप नाही, विघ्न-विनाशक बना.