12-02-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो - तुमच्यातील मोहाचे धागे आता तुटून गेले पाहिजेत कारण हि सारी दुनिया नष्ट होणार आहे, या जुन्या दुनियेतील कोणत्याही बाबतीत आसक्ति नसावी

प्रश्न:-
ज्या मुलांमध्ये रुहानी मस्ती (आत्मिक खुशी) चढलेली असते, त्यांचे टायटल (उपाधी) काय असेल? खुशी, कोणत्या मुलांना चढते?

उत्तर:-
रुहानी मस्तीमध्ये राहणाऱ्या मुलांना म्हटले जाते - मस्त कलंदर (निश्चिंत राजा); तेच कलंगीधर (मुकुटधारी) बनतात. त्यांना राजेशाहीचा शुद्ध नशा चढलेला असतो. बुद्धीमध्ये असते - आता मी भिकाऱ्या पासून श्रीमंत बनत आहे. शुद्ध नशा त्यांना चढतो जे रुद्र माळेमध्ये गुंफले जाणार आहेत. शुद्ध नशा त्या मुलांना असतो ज्यांना निश्चय आहे की आपल्याला आता घरी जायचे आहे आणि मग नवीन दुनियेमध्ये यायचे आहे.

ओम शांती।
रुहानी बाबा रुहानी मुलांशी रुहरिहान करत आहेत. याला म्हटले जाते रुहानी ज्ञान (आत्मिक ज्ञान) आत्म्यांसाठी. आत्मा आहे ज्ञानाचा सागर. मनुष्य कधी ज्ञानाचा सागर असू शकत नाही. मनुष्य आहेत भक्तीचे सागर. आहेत तर सर्व मनुष्य. जे ब्राह्मण बनतात ते ज्ञानाच्या सागराकडून ज्ञान घेऊन मास्टर सागर बनतात. मग देवतांमध्ये ना भक्ती असते, ना ज्ञान असते. देवता हे ज्ञान जाणत नाहीत. ज्ञानाचा सागर एक परमपिता परमात्माच आहेत त्यामुळे त्यांना हिऱ्यासमान म्हणणार. तेच येऊन कवडी पासून हिरा, पत्थरबुद्धी पासून पारसबुद्धी बनवतात. मनुष्यांना काहीही माहीत नाही. देवताच मग पुन्हा मनुष्य बनतात. देवता बनतात श्रीमतामुळे. अर्धा कल्प तिथे कोणाच्याही मताची आवश्यकता नाही. इथे तर पुष्कळ गुरूंची मते घेत राहतात. आता बाबांनी समजावून सांगितले आहे - सद्गुरूचे श्रीमत मिळते. खालसा लोक (शिख पंथीय) म्हणतात - सतगुरु अकाल. त्याचा देखील अर्थ जाणत नाही. बोलावतात देखील - सतगुरु अकालमूर्त अर्थात सद्गती करणारा अकालमूर्त. अकालमूर्त, परमपिता परमात्म्यालाच म्हटले जाते. सद्गुरु आणि गुरू यामध्ये रात्रं-दिवसाचा फरक आहे. तर ते ब्रह्माचा दिवस आणि ब्रह्माची रात्र म्हणतात. ब्रह्माचा दिवस, ब्रह्माची रात्र, तर मग नक्कीच असे म्हणणार कि, ब्रह्मा पुनर्जन्म घेतात. ब्रह्मा सो हे देवता विष्णू बनतात. तुम्ही शिवबाबांची महिमा करता. त्यांचा जन्म हिऱ्यासमान आहे.

आता तुम्ही मुले संसारात राहून पावन बनता. तुम्हाला पवित्र बनून मग हे ज्ञान धारण करायचे आहे. कुमारींना तर कोणतेही बंधन नाहीये. त्यांना फक्त आई-वडील किंवा भावा-बहीणीची आठवण राहील. मग सासरी गेल्यावर दोन कुटुंबे होतात. आता बाबा तुम्हाला म्हणतात - अशरीरी बना. आता तुम्हां सर्वांना परत जायचे आहे. तुम्हाला पवित्र बनण्याची युक्ती देखील सांगतो. पतित-पावन मीच आहे. मी खात्री देतो, तुम्ही माझी आठवण कराल तर या योग-अग्नीने तुमची जन्म-जन्मांतरीची पापे भस्म होऊन जातील. जसे जुने सोने आगीत टाकल्यावर त्यातील खाद (अशुद्धता) निघून जाते, शुद्ध सोने मागे राहते. हा देखील योग-अग्नी आहे. या संगमावरच बाबा हा राजयोग शिकवतात, म्हणून त्यांची खूप महिमा आहे. राजयोग, जो भगवंताने शिकवला होता तो सर्वजण शिकू इच्छितात. परदेशातून देखील संन्यासी लोक बऱ्याच जणांना घेऊन येतात. ते समजतात यांनी संन्यास घेतला आहे. आता संन्यासी तर तुम्ही देखील आहात. परंतु बेहदच्या संन्यासाला कोणीही जाणत नाहीत. बेहदचा संन्यास तर एक बाबाच शिकवतात. तुम्ही जाणता ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे. या दुनियेतील कोणत्याही चीज-वस्तूमध्ये आपल्याला रुची वाटत नाही. अमक्याने शरीर सोडले, जाऊन दुसरे घेतले पार्ट बजावण्यासाठी, मग आपण कशाला रडायचे! मोहाचा धागा तुटून जातो. आता आमचा संबंध जोडला गेला आहे नवीन दुनियेशी. अशी मुलेच पक्के मस्त कलंगीधर (निश्चिंत मुकुटधारी राजा) असतात. तुमच्यामध्ये राजाईपणाचा शुद्ध नशा आहे. बाबांमध्ये (ब्रह्माबाबांमध्ये) देखील शुद्ध नशा आहे ना - मी जाऊन हा मुकुटधारी बनणार, भिकाऱ्या पासून श्रीमंत बनणार. आत शुद्ध नशा चढलेला आहे, म्हणूनच त्यांना मस्त कलंदर म्हणतात. यांचा तर साक्षात्कार देखील होतो. तर जसा यांना नशा चढलेला आहे, तुम्हाला देखील चढला पाहिजे. तुम्हीदेखील रुद्रमाळेमध्ये गुंफले जाणार आहात. ज्यांना पक्का निश्चय होतो त्यांना नशा चढेल. आम्हा आत्म्यांना आता घरी जायचे आहे. मग पुन्हा नवीन दुनियेमध्ये येणार. या निश्चयाने जे यांना देखील (ब्रह्मा बाबांना देखील) बघतात तर त्यांना बालक (बाळकृष्ण) दिसू लागतो. किती सुंदर आहे. श्रीकृष्ण तर इथे नाहीये. त्यांच्यासाठी किती हैराण होतात. झोका बनवतात, त्यांना दूध पाजतात. ते आहे जड चित्र, हे तर खरे आहेत ना. यांनादेखील (ब्रह्मा बाबांनादेखील) हा निश्चय आहे की, मी बाळ बनणार आहे. तुम्ही मुलीदेखील दिव्य दृष्टीने छोट्या बाळाला बघता. या डोळ्यांनी तर पाहू शकणार नाही. आत्म्याला जेव्हा दिव्य दृष्टी मिळते तेव्हा शरीराचे भान राहत नाही. त्यावेळी स्वतःला महाराणी आणि त्यांना मुलगा समजतील. हा साक्षात्कार देखील या वेळी बऱ्याच जणांना होतो. सफेद वस्त्रधाऱ्याचादेखील साक्षात्कार खूप जणांना होतो. तर मग त्यांना सांगितले जाते - तुम्ही यांच्याकडे (ब्रह्माकुमारी सेंटरवर) जा, ज्ञान घ्या, तर असे राजकुमार बनाल. तर ही जादू झाली ना. सौदा देखील खूप चांगला करतात. कवडी घेऊन हीरे-मोती देतात. तुम्ही हिऱ्यासमान बनता. तुम्हाला शिवबाबा हिऱ्यासमान बनवितात, म्हणून बलिहारी (समर्पण) त्यांचे आहे. परंतु न समजल्यामुळे मनुष्य जादू-जादू असे म्हणतात. जे आश्चर्यवत् भागन्ती होतात ते जाऊन उल्टे-सुल्टे सांगतात. असे बरेच ट्रेटर (द्रोही) बनतात. असे ट्रेटर बनणारे उच्च पद प्राप्त करू शकणार नाहीत. त्यांना म्हटले जाते - गुरू का निन्दक ठौर न पाये. इथे तर सत्य बाबा आहेत ना. हे देखील आता तुम्हाला समजते आहे. मनुष्य तर म्हणतात - ते युगे-युगे (प्रत्येक युगामध्ये) येतात. ठीक आहे, जर चार युगे आहेत तर मग २४ अवतार कसे म्हणू शकता? मग म्हणतात - दगडा-धोंड्यात कणा-कणात परमात्मा आहे, तर सर्वच परमात्मा झाले. बाबा म्हणतात - मी कवडी पासून हिरा बनविणारा आहे, मला मग दगडा-धोंड्यात चिणून टाकले आहे. सर्वव्यापी आहे तर जणू सर्वांमध्ये आहे; मग तर काही किंमतच राहिली नाही. माझ्यावर कसा अपकार करतात. बाबा म्हणतात - हे देखील ड्रामामध्ये लिहिलेले आहे. जेव्हा असे बनतात तेव्हा मग बाबा येऊन उपकार करतात अर्थात मनुष्याला देवता बनवतात.

जगाच्या इतिहास-भूगोलाची पुन्हा पुनरावृत्ती होणार आहे. सतयुगामध्ये पुन्हा हेच लक्ष्मी-नारायण येतील. तिथे फक्त भारतच असतो. सुरुवातीला खूप थोडे देवता असणार नंतर मग वृद्धी होत-होत ५००० वर्षांमधे किती झाले आहेत. आता हे ज्ञान कोणाच्याही बुद्धीमध्ये नाहीये. उरली आहे भक्ती. देवतांच्या मुर्त्यांची महिमा गातात. हे समजत नाहीत की, ते चैतन्यमध्ये होते, मग गेले कुठे? मुर्त्यांची पूजा करतात परंतु ते आहेत कुठे? त्यांना देखील तमोप्रधान बनून मग पुन्हा सतोप्रधान बनायचे आहे. हे कोणाच्याही डोक्यात येत नाही. अशा तमोप्रधान बुद्धीला मग सतोप्रधान बनविणे बाबांचेच काम आहे. हे लक्ष्मी-नारायण पूर्वी होऊन गेले आहेत, त्यामुळे त्यांची महिमा आहे. उच्च ते उच्च एक भगवंतच आहेत. बाकी सर्व तर पुनर्जन्म घेत राहतात. उच्च ते उच्च बाबाच सर्वांना मुक्ती-जीवनमुक्ती देतात. ते आले नसते तर अजूनच वर्थ नॉट ए पेनी (कवडी तुल्य) तमोप्रधान बनलो असतो. जेव्हा हे (लक्ष्मी-नारायण) राज्य करत होता तेव्हा वर्थ पाउंड (अमूल्य) होतो. तिथे कसली पूजा इत्यादी करत नव्हतो. पूज्य देवी-देवताच पुजारी बनले, वाम मार्गाला लागून विकारी बनले. हे कोणालाच माहीत नाही आहे की, हे संपूर्ण निर्विकारी होते. तुम्हा ब्राह्मणांमध्ये देखील या गोष्टी नंबरवार समजतात. स्वतःलाच पूर्ण समजलेले नसेल तर इतरांना काय समजावून सांगणार. नाव आहे ब्रह्माकुमार-कुमारी, आणि समजावून सांगता येत नसेल तर नुकसान करतात त्यामुळे सांगितले पाहिजे कि, आम्ही मोठ्या बहिणीला बोलावतो, त्या तुम्हाला समजावून सांगतील. भारतच हिऱ्यासमान होता, आता कवडीसमान आहे. भिकारी भारताला सर्वश्रेष्ठ (मुकुटधारी) कोण बनविणार? लक्ष्मी-नारायण आता कुठे आहेत, हिशोब सांगा? सांगू शकणार नाहीत. ते आहेत भक्तीचे सागर. तोच (भक्तीचाच) नशा चढलेला आहे. तुम्ही आहात ज्ञानसागर. ते तर शास्त्रांनाच ज्ञान समजतात. बाबा म्हणतात - शास्त्रांमध्ये आहेत भक्तीचे रिती-रिवाज. जितकी तुमच्यामध्ये ज्ञानाची ताकद भरत जाईल तितके तुम्ही चुंबक बनाल. आणि मग सर्वांना आकर्षण वाटेल. आता नाहीये. तरीदेखील यथायोग्य, यथाशक्ति जितकी बाबांची आठवण करतात. असे नाही, सतत बाबांची आठवण करतात. मग तर हे शरीर देखील राहणार नाही. आता तर खूप लोकांना संदेश द्यायचा आहे, पैगंबर बनायचे आहे. तुम्ही मुलेच पैगंबर बनता, दुसरे कोणी बनत नाही. क्राईस्ट इत्यादी येऊन धर्म स्थापन करतात, त्यांना पैगंबर म्हटले जाणार नाही. फक्त ख्रिश्चन धर्म स्थापन केला, अजून तर काही केले नाही. तो (क्राईस्ट) कोणाच्यातरी शरीरामध्ये आला नंतर मग त्याच्या मागोमाग बाकीचे येतात. इथे तर हि राजधानी स्थापन होत आहे. पुढे जाऊन तुम्हा सर्वांना साक्षात्कार होईल - आपण काय-काय बनणार, मी ही-ही विकर्मे केली. साक्षात्कार होण्यासाठी वेळ लागत नाही. काशी कलवट खात होते. ताठ उभे राहून विहिरीमध्ये झोकून देत होते. आता तर शासनाने बंद केले आहे. ते समजतात - आम्हाला मुक्ती मिळेल. बाबा म्हणतात मुक्ती तर कोणाला मिळू शकत नाही. थोड्या वेळामध्ये जणू सर्व जन्मांची शिक्षा मिळते. मग नव्याने हिशोब सुरू होतो. परत तर कोणी जाऊ शकत नाही. जाऊन राहणार कुठे? आत्म्यांचा वंश वृक्षच बिघडून जाईल. नंबर प्रमाणे येतील आणि जातील. मुलांना साक्षात्कार होतो तेव्हा ही चित्रे इत्यादी बनवतात. ८४ जन्मांच्या पूर्ण सृष्टीचक्राच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान तुम्हाला मिळाले आहे. मग तुमच्यामध्ये देखील नंबरवार आहेत. कोणी जास्त मार्कांनी पास होतात, कोणी कमी मार्कांनी. १०० मार्क्स तर कोणाचेच नसतात. १०० आहेतच एका बाबांचे. तसे तर कोणी बनू शकत नाही. थोडा थोडा फरक पडतो. एकसारखे देखील बनू शकत नाहीत. किती खंडीने मनुष्य आहेत सर्वांची फीचर्स (वैशिष्ट्ये) आपली-आपली आहेत. सर्व आत्मे किती छोट्या बिंदूप्रमाणे आहेत आणि मनुष्य आकाराने किती मोठे आहेत परंतु एकाची फिचर्स दुसऱ्याशी मेळ खाऊ शकत नाहीत. जितके आत्मे आहेत तितकेच नंतर देखील असतील तेव्हाच तर तिथे घरामध्ये राहतील. हा देखील ड्रामा बनलेला आहे. यामध्ये काहीही बदल होऊ शकत नाही. एकदा जे शूटिंग झाले तेच पुन्हा बघाल. तुम्ही म्हणाल ५ हजार वर्षांपूर्वीदेखील आपण असेच भेटलो होतो. एक सेकंद देखील कमी-अधिक होऊ शकत नाही. ड्रामा आहे ना. ज्याच्या बुद्धीमध्ये रचता आणि रचनाचे ज्ञान आहे त्यांना म्हटले जाते स्वदर्शन चक्रधारी. बाबांकडूनच हे ज्ञान मिळते. मनुष्य, मनुष्याला हे ज्ञान देऊ शकत नाही. भक्ती शिकवतात - मनुष्य, ज्ञान शिकवतात - बाबा. ज्ञान सागर तर एक बाबाच आहेत. तुम्ही मग ज्ञान नद्या बनता. ज्ञान सागर आणि ज्ञान नद्यांमुळेच मुक्ती-जीवनमुक्ती मिळते. त्या तर आहेत पाण्याच्या नद्या. पाणी तर सदैव आहेच. ज्ञान मिळतेच मुळी संगमावर. पाण्याच्या नद्या तर भारतात वाहतच असतात, बाकी इतकी सारी शहरे तर नष्ट होतात. खंडच राहत नाहीत. पाऊस तर पडत असेल. पाणी, पाण्याला जाऊन मिळते. हाच भारत असेल.

आता तुम्हाला सर्व ज्ञान मिळाले आहे. हे आहे ज्ञान, बाकी सर्व आहे भक्ती. हिऱ्यासमान एक शिवबाबाच आहेत, ज्यांची जयंती साजरी केली जाते. विचारले पाहिजे शिवबाबांनी काय केले? ते तर येऊन पतितांना पावन बनवतात. आदि-मध्य-अंताचे ज्ञान देतात. तेव्हा गायले जाते - ज्ञानसूर्य प्रगटा ज्ञानामुळे दिवस आणि भक्तीमुळे रात्र होते. आता तुम्ही जाणता आम्ही ८४ जन्म पूर्ण केले आहेत. आता बाबांची आठवण केल्याने पावन बनणार. मग शरीर देखील पावन मिळेल. तुम्ही सर्व नंबरवार पावन बनता. किती सोपी गोष्ट आहे. मुख्य गोष्ट आहे आठवणीची. असे बरेच आहेत ज्यांना, स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करणे देखील जमत नाही. तरी देखील संतान बनले आहेत तर स्वर्गामध्ये तर नक्की येतील. या वेळेच्या पुरुषार्थानुसारच राज्य स्थापन होते. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-

१) कायम याच नशेमध्ये रहायचे आहे की आम्ही मास्टर ज्ञान सागर आहोत, आपल्यामध्ये ज्ञानाची शक्ती भरून चुंबक बनायचे आहे, रूहानी पैगंबर बनायचे आहे.

२) असे कोणतेही कर्म करायचे नाही ज्यामुळे सद्गुरू बाबांच्या नावाची बदनामी होईल. काहीही होऊ दे परंतु कधीही रडायचे नाही.

वरदान:-
सत्यतेच्या फाउंडेशनद्वारे वर्तणूक आणि चेहऱ्याद्वारा दिव्यतेची अनुभूति करविणारे सत्यवादी भव

दुनियेमध्ये अनेक आत्मे स्वतःला सत्यवादी म्हणतात अथवा समजतात परंतु संपूर्ण सत्यता पवित्रतेवर आधारित असते. पवित्रता नसेल तर सदैव सत्यता राहू शकत नाही. सत्यतेचे फाउंडेशन पवित्रता आहे आणि सत्यतेचा प्रत्यक्षात पुरावा आहे चेहऱ्यावर आणि व्यवहारामध्ये दिव्यता असेल. पवित्रतेच्या आधारावर सत्यतेचे स्वरूप स्वतः आणि सहज असते. जेव्हा आत्मा आणि शरीर दोन्ही पावन होतील तेव्हा म्हणणार संपूर्ण सत्यवादी अर्थात दिव्यता संपन्न देवता.

बोधवाक्य:-
बेहदच्या सेवेमध्ये व्यस्त रहा तर बेहदचे वैराग्य आपोआप येईल.