12-04-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबांचे प्रेम तर सर्व मुलांवर आहे परंतु जे बाबांचा सल्ला त्वरित स्वीकारतात, त्यांच्या विषयी कशिश (ओढ) वाटते. गुणवान मुले प्रेमाला आकर्षित करतात”

प्रश्न:-
बाबांनी कोणते कॉन्ट्रॅक्ट (ठेका) घेतले आहे?

उत्तर:-
सर्वांना गुल-गुल (फुल) बनवून परत घेऊन जाण्याचे कॉन्ट्रॅक्ट (ठेका) एका बाबांचेच आहे. बाबांसारखा कॉन्ट्रॅक्टर (ठेकेदार) दुनियेमध्ये आणखी कोणीही नाही. तेच सर्वांची सद्गती करण्यासाठी येतात. बाबा सेवेशिवाय राहू शकत नाहीत. तर मुलांना देखील सेवेचा पुरावा द्यायचा आहे. ऐकून न ऐकल्यासारखे करायचे नाही.

ओम शांती।
रुहानी बाबा रुहानी मुलांना समजावून सांगत आहेत - ‘मुलांनो, स्वतःला आत्मा समजून बसा.’ हे एक बाबाच समजावून सांगतात आणखी कोणी मनुष्य कोणाला असे समजावून सांगू शकणार नाही. ‘स्वतःला आत्मा समजा’ - हे ५००० वर्षांनंतर बाबाच येऊन शिकवतात. हे देखील तुम्ही मुलेच जाणता. कोणालाच हे माहिती नाही आहे कि हे पुरुषोत्तम संगमयुग आहे. तुम्हा मुलांना याची आठवण राहिली पाहिजे कि आपण पुरुषोत्तम संगमयुगावर आहोत, हे देखील मनमनाभवच आहे. बाबा म्हणतात - माझी आठवण करा कारण आता परत जायचे आहे. ८४ जन्म आता पूर्ण झाले आहेत, आता सतोप्रधान बनून परत जायचे आहे. कोणी तर अजिबात आठवणच करत नाहीत. बाबा तर प्रत्येकाच्या पुरुषार्थाला चांगल्या रीतीने जाणतात. त्यात देखील खास इथे आहेत अथवा बाहेर आहेत. बाबा जाणतात भले इथे बसून निरीक्षण करत असतो परंतु जी सर्व्हिसेबल (सेवायोग्य) गोड मुले आहेत, त्यांची आठवण करतो. बघतो देखील त्यांनाच, हे कोणत्या प्रकारचे फूल आहे, यांच्यामध्ये कोणकोणते गुण आहेत? काही तर असे देखील आहेत ज्यांच्यामध्ये काहीच गुण नाहीत. आता अशांना बघून बाबा काय करणार? बाबा तर चुंबक प्युअर आत्मा आहे, तर जरूर आकर्षित करतील. परंतु बाबा आतून जाणतात, बाबा (ब्रह्मा बाबा) आपला सर्व पोतामेल (हिशोब) सांगतात तर मुलांनी देखील सांगितले पाहिजे. बाबा सांगतात - ‘मी तुम्हाला विश्वाचा मालक बनविण्यासाठी आलो आहे’. मग जो जसा पुरुषार्थ करेल. जे कोणी पुरुषार्थ करतात, त्याची देखील माहिती असली पाहिजे. बाबा लिहितात - प्रत्येकाचा व्यवसाय लिहून पाठवा किंवा त्यांच्याकडून लिहून पाठवा. ज्या चुणचुणीत हुशार ब्राह्मणी असतात, त्या सर्वकाही लिहून पाठवतात - कोणता व्यवसाय करतात, उत्पन्न किती आहे? बाबा स्वतःचे सर्व काही सांगतात आणि सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान सांगतात. सर्वांच्या अवस्थेला जाणतात. तऱ्हेतऱ्हेची व्हरायटी फुले आहेत ना. (बाबा एक-एक फूल दाखवून म्हणतात) बघा, कसे रॉयल फूल आहे. आता इतका सुंदर सुगंध आहे, मग जेव्हा पूर्ण उमलेल तेव्हा फर्स्टक्लास शोभिवंत होईल. तुम्ही देखील या लक्ष्मी-नारायणासारखे लायक बनाल. तर बाबा बघत असतात, असे नाही कि सर्वांनाच सर्चलाईट देतात. जे जसे आहेत तसे आकर्षित करतात, ज्यांच्यामध्ये काहीच गुण नाहीत ते काय आकर्षित करणार. असेच तिथे पाई-पैशाचे पद मिळवतील. बाबा प्रत्येकाच्या गुणांना बघतात आणि प्रेम देखील करतात. प्रेमाने डोळे पाणावतात. हे सेवाधारी किती सेवा करतात! यांना सेवेशिवाय चैन पडत नाही. कोणी तर सेवा करणे जाणतच नाहीत. योगामध्ये बसत नाहीत. ज्ञानाची धारणा नाही. बाबा समजतात - हे काय पद मिळवणार. कोणीही लपून राहू शकत नाही. जी मुले चांगली बुद्धिवान आहेत, सेंटर सांभाळतात, त्यांनी प्रत्येकाचा पोतामेल पाठविला पाहिजे, तर बाबांना समजेल कि कितपत पुरुषार्थी आहेत. बाबा तर ज्ञानाचे सागर आहेत. मुलांना ज्ञान देतात. कोण किती ज्ञान लक्षात घेतात, गुणवान बनतात - हे लगेच समजून येते. बाबांचे प्रेम सर्वांवर आहे. यावर एक गाणे बनलेले आहे - ‘तेरे कांटों से भी प्यार, तेरे फूलों से भी प्यार’ नंबरवार तर आहेतच. तर बाबांवरील प्रेम किती दृढ असले पाहिजे. बाबा जे म्हणतील ते लगेच करून दाखवावे तर बाबा देखील समजतील की बाबांवर प्रेम आहे. त्यांना आकर्षण होईल. बाबांमध्ये असे आकर्षण आहे जे एकदम चिकटूनच रहावे. परंतु जोपर्यंत गंज उतरलेली नसेल तर कशिश (ओढ) देखील वाटणार नाही. एका-एकाला बघत असतो.

बाबांना सेवाभावी मुले हवी आहेत. बाबा तर सेवेसाठीच येतात. पतितांना पावन बनवितात. हे तुम्हीच जाणता, दुनियावाले जाणत नाहीत कारण आता तुम्ही फार थोडे आहात. जोपर्यंत योग असणार नाही तोपर्यंत ती ओढ वाटणार नाही. ते खूप कमी मेहनत करतात. कोणत्या ना कोणत्या गोष्टी मध्ये अडकून पडतात. हा तो सत्संग नाहीये, जिथे जे काही ऐकतील त्याला सत-सत करत राहतील. सर्व शास्त्रमई शिरोमणी आहे एक गीता. गीतेमध्येच राजयोग आहे. विश्वाचे मालक तर बाबाच आहेत. मुलांना नेहमी सांगत असतो की गीतेद्वारेच प्रभाव निघेल. परंतु तेवढी ताकद सुद्धा असली पाहिजे ना. योगबलाचे जौहर (शक्ती) चांगली पाहिजे, ज्यामध्ये अजून खूप कमकुवत आहेत. अजून थोडा वेळ आहे. असे म्हणतात - ‘मिठरा घुर त घुराय…’ माझ्यावर प्रेम करा तर मी देखील करेन. हे आहे आत्म्याचे प्रेम. एका बाबांच्याच आठवणीत रहा, या आठवणीनेच विकर्म विनाश होतील. कुणी तर अजिबातच आठवण करत नाहीत. बाबा समजावून सांगतात - इथे भक्तीची गोष्ट नाहीये. हा (ब्रह्मा बाबा) बाबांचा रथ आहे, यांच्याद्वारे शिवबाबा शिकवतात. शिवबाबा असे कधी म्हणत नाहीत कि, माझे पाय धुऊन पाणी प्या. बाबा तर हात सुद्धा लावू देत नाहीत. हे तर शिक्षण आहे. हात लावल्याने काय होणार. बाबा तर आहेत सर्वांची सद्गती करणारे. कोटींमध्ये कोणालाच ही गोष्ट समजते. जे कल्पापूर्वीचे असतील, त्यांनाच समजेल. भोलानाथ बाबा येऊन भोळ्या-भोळ्या मातांना ज्ञान देऊन तयार करतात. बाबा एकदम चढवून टाकतात - मुक्ती आणि जीवनमुक्तीमध्ये. बाबा फक्त एवढेच सांगतात - विकारांना सोडा. यावरूनच हंगामा होतो. बाबा समजावून सांगत आहेत - स्वतःमध्ये बघा आपल्यामध्ये काय-काय अवगुण आहेत? व्यापारी लोक रोज आपल्या नफ्या-तोट्याचा पोतामेल (हिशोब) काढतात. तुम्ही देखील हिशोब ठेवा कि, अति प्रेमळ बाबा, जे आपल्याला विश्वाचा मालक बनवितात, त्यांची मी किती वेळ आठवण करतो? जेव्हा बघतील कि कमी वेळ आठवण केली तर आपणच लाज वाटेल कि हे काय, अशा बाबांची मी आठवण केली नाही! आपले बाबा सर्वात वंडरफुल आहेत. साऱ्या सृष्टीमध्ये स्वर्ग देखील सर्वात वंडरफुल आहे. ते तर स्वर्गाचा कालावधी लाखो वर्षांचा आहे असे म्हणतात आणि तुम्ही म्हणाल ५ हजार वर्ष. किती रात्रं-दिवसाचा फरक आहे. जे खूप जुने भक्त आहेत त्यांच्यावर बाबा कुर्बान होतात. अति भक्ती केली आहे ना. बाबा (ब्रह्मा) या जन्मामध्ये देखील गीता वाचत होते आणि नारायणाचे चित्र सुद्धा सोबत ठेवत होते. लक्ष्मीला दासीपणातून मुक्त केले तर किती आनंद झाला. जसे आपण हे शरीर सोडून सतयुगामध्ये जाऊन दुसरे शरीर घेणार. बाबांना देखील आनंद वाटतो की मी जाऊन प्रिन्स गोरा बनणार. पुरुषार्थ देखील करून घेत राहतात, फुकटात कसे बनणार! तुम्ही देखील चांगल्या रीतीने बाबांची आठवण कराल तर स्वर्गाचा वारसा प्राप्त कराल. काहीजण तर शिकतही नाहीत आणि ना दैवी गुण देखील धारण करत. आपला पोतामेल (हिशोबच) ठेवत नाहीत. नेहमी पोतामेल तेच ठेवतील जे उच्च बनणारे असतील. नाही तर फक्त शो करतील. १५-२० दिवसानंतर लिहीणे सोडून देतात. इथे तर परीक्षा इत्यादी सर्वकाही गुप्त आहे. प्रत्येकाच्या क्वालिफिकेशनला (योग्यतेला) बाबा जाणतात. बाबांचे म्हणणे लगेच मानले तर म्हणतील आज्ञाधारक, फ़रमानबरदार आहेत. बाबा म्हणतात मुलांना अजून खूप काम करायचे आहे. किती चांगली-चांगली मुले देखील सोडचिठ्ठी देऊन निघून जातात. हे (शिवबाबा) कधीही कोणाला सोडचिठ्ठी किंवा डायवोर्स देणार नाहीत. हे तर ड्रामा अनुसार आलेलेच आहेत मोठे कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी. म्हणतात - ‘मी सर्वात मोठा कॉन्ट्रॅक्टर (ठेकेदार) आहे. सर्वांना गुल-गुल (फूल) बनवून परत घेवून जाणार’. तुम्ही मुले जाणता पतितांना पावन बनविणारे कॉन्ट्रॅक्टर एकच आहेत. ते तुमच्या समोर बसले आहेत. कोणाला खूप निश्चय आहे, कोणाला अजिबातच नाहीये. आज इथे आहेत, उद्या निघून जातील, वर्तनच असे आहे. मन आतमध्ये जरूर खात राहील - मी बाबांजवळ राहून, बाबांचे बनून हे काय करत आहे. काहीच सेवा करत नाहीत तर मिळणार तरी काय. पोळ्या करणे, भाजी बनविणे हे तर आधी देखील करत होता. कोणती नवीन गोष्ट केलीत? सेवेचा पुरावा द्यायचा आहे. इतक्या जणांना रस्ता सांगितला.

हा ड्रामा खूप वंडरफुल बनलेला आहे. जे काही होते ते तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये बघत आहात. शास्त्रांमध्ये तर श्रीकृष्णाच्या चरित्र (लीला) लिहिलेल्या आहेत, परंतु चरित्र आहे एका बाबांचे. तेच सर्वांची सद्गती करतात. यांच्यासारखे चारित्र आणखी कोणाचे असू शकत नाही. कोणतेही चरित्र चांगले तर असले पाहिजे. बाकी पळवणे, काहीपण करणे - हे काही चरित्र नाहीये. सर्वांची सद्गती करणारे एक बाबाच आहेत. ते कल्प-कल्प येऊन स्वर्गाची स्थापना करतात. लाखो वर्षांची कोणती गोष्ट नाही.

तर मुलांनी वाईट सवयी सोडल्या पाहिजेत. नाही तर कोणते पद मिळेल? माशूक देखील गुण बघून आशिक होतील ना. आशिक त्यांच्यावर होतील जे त्यांची सेवा करत असतील. जे सेवा करत नाहीत तर ते काय कामाचे? या गोष्टी नीट समजून घ्यायच्या आहेत. बाबा समजावून सांगत आहेत - तुम्ही महाभाग्यशाली आहात, तुमच्यासारखा भाग्यशाली कोणीच नाही. भले स्वर्गामध्ये तुम्ही जाल, परंतु प्रारब्ध उच्च बनवले पाहिजे. कल्प-कल्पांतराची गोष्ट आहे. पद कमी होते. जे मिळाले ते चांगले यातच खुश व्हायचे नाही. पुरुषार्थ खूप चांगला करायचा आहे. सेवेचा पुरावा पाहिजे - किती जणांना आप समान बनवले आहे? तुमची प्रजा कुठे आहे? बाबा-टीचर सर्वांकडून पुरुषार्थ करवून घेतात. परंतु कोणाच्या नशिबात सुद्धा असले पाहिजे ना. सर्वात मोठा आशीर्वाद तर हा आहे, जे बाबा आपले शांतीधाम सोडून पतित दुनिया आणि पतित शरीरामध्ये येतात. नाही तर तुम्हाला रचता आणि रचनेचे नॉलेज कोण देणार? हे देखील कोणाच्या बुद्धीमध्ये येत नाही कि सतयुगामध्ये राम राज्य आणि कलियुगामध्ये रावण राज्य आहे. राम राज्यामध्ये एकच राज्य होते, रावण राज्यामध्ये अनेक राज्ये आहेत म्हणून तुम्ही विचारता कि, नरक वासी आहात कि स्वर्ग वासी आहात? परंतु मनुष्य हे समजत नाहीत कि आपण कुठे आहोत? हे आहे काट्यांचे जंगल, तो आहे फुलांचा बगीचा. तर आता फॉलो फादर, मदर आणि अनन्य मुलांना फॉलो करायचे आहे, तेव्हाच श्रेष्ठ बनणार. बाबा समजावून तर खूप सांगतात. परंतु कोणी समजणाराच समजेल. कोणी तर ऐकून चांगल्या रीतीने विचार सागर मंथन करतात. कोणी तर ऐकून न ऐकल्यासारखे करतात. जिकडे-तिकडे लिहिलेले आहे - ‘शिवबाबा याद है?’ तर वारशाची सुद्धा जरूर आठवण येईल. दैवी गुण असतील तर देवता बनणार. जर क्रोध असेल, आसुरी अवगुण असतील तर उच्च पद प्राप्त करू शकणार नाही. तिथे कोणतीही भुते (विकार) असत नाहीत. रावणच नाही तर रावणाची भुते कुठून येतील. देह-अभिमान, काम, क्रोध… हि आहेत मोठी भुते. यांना काढण्याचा एकच उपाय आहे - बाबांची आठवण. बाबांच्या आठवणीनेच सर्व भूते पळून जातील. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

रात्री क्लास:-
बऱ्याच मुलांची इच्छा असते की आपणही इतरांना आप समान बनविण्याची सेवा करावी. आपली प्रजा बनवावी. जसे आपले इतर भाऊ सेवा करतात तशी आपण देखील करावी. माता जास्त आहेत. कलश देखील मातांकडे देण्यात आला आहे. बाकी हा तर आहे प्रवृत्ती मार्ग. दोन्ही पाहिजेत ना. बाबा विचारतात, किती मुले आहेत? बघतात की बरोबर उत्तर देत आहेत का नाही. म्हणतील ५ तर माझी स्वतःची आहेत आणि एक आहेत शिवबाबा. बरेचजण तर म्हणायचे म्हणून म्हणतात. कोणी खरोखरच बनवतात. जे शिवबाबांना वारसदार बनवतात ते विजयी माळेमध्ये ओवले जातील. जे खरे-खुरे वारसदार बनवितात ते स्वतः देखील वारसदार बनतात. ‘सच्ची दिल पर साहब राजी…’ बाकीचे तर फक्त म्हणायचे म्हणून म्हणतात. या समयी पारलौकिक बाबाच आहेत जे सर्वांना वारसा देतात म्हणून आठवण देखील त्यांचीच करायची आहे ज्यामुळे २१ जन्मांचा वारसा मिळतो. बुद्धीमध्ये ज्ञान आहे कि हे तर सर्वकाही राहणारे नाहीये. बाबा प्रत्येकाच्या अवस्थेला बघतात खरोखरच वारसदार बनवले आहे का वारसदार बनविण्याचा विचार करत आहेत. वारसदार बनवण्याचा अर्थ समजतो आहे? असे बरेच आहेत जे समजत असताना देखील बनवू शकत नाहीत कारण मायेच्या अधीन आहेत. यावेळी एक तर ईश्वराच्या वश आहेत नाहीतर मायेच्या वश आहेत. ईश्वराच्या वश जे असतील ते वारसदार बनवतील. माळ ८ ची देखील असते, १०८ ची सुद्धा असते. ८ तर जरूर कमाल करत असतील. खरोखरच वारसदार बनवत असतील. भले वारसदार सुद्धा बनवतात वारसा तर घेतातच. तरीदेखील असा श्रेष्ठ वारसदार बनविणाऱ्यांची कर्म देखील तशीच श्रेष्ठ असतील. कोणते विकर्म होऊ नये. जे काही विकार आहेत सर्व विकर्म आहेत ना. बाबांना सोडून दुसऱ्या कोणाची आठवण करणे - हे देखील विकर्म आहे. बाबा म्हणजे बाबा. बाबा मुखाद्वारे म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. डायरेक्शन मिळाले ना. तर लगेच आठवण करु लागणे - यासाठी खूप मेहनत करावी लागते. एका बाबांचीच आठवण कराल तर माया इतका त्रास देणार नाही. बाकी माया देखील खूप जबरदस्त आहे. लक्षात येते की माया खूप विकर्म करायला लावते. मोठ-मोठ्या महारथींना देखील खाली पाडून चीत करते. दिवसेंदिवस सेंटर्सची वृद्धी होत जाईल. गीता पाठशाळा अथवा म्युझियम उघडत जाणार. सारी दुनिया बाबांचे देखील मानेल आणि ब्रह्माचे देखील मानेल. ब्रह्मालाच ‘प्रजापिता’ म्हटले जाते. आत्म्यांना तर प्रजा म्हणणार नाही. मनुष्य सृष्टी कोण रचतात? प्रजापिता ब्रह्माचे नाव येते तर ते आहेत साकार, ते (शिवबाबा) झाले निराकार. ते तर अनादि आहेत. ते (ब्रह्मा बाबा) देखील अनादि म्हणणार. दोघांचेही नाव सर्वोच्च आहे. ते रुहानी बाबा, हे प्रजापिता. दोघेही बसून तुम्हाला शिकवतात. किती हायेस्ट झाले! मुलांना किती नशा चढला पाहिजे! किती आनंद झाला पाहिजे! परंतु माया त्या आनंदामध्ये अथवा नशेमध्ये राहू देत नाही. स्टुडंट जर असे विचार सागर मंथन करत राहतील तर सेवा देखील करू शकतील. आनंदात देखील राहू शकतील, परंतु बहुतेक अजून वेळ लागेल. जेव्हा कर्मातीत अवस्था होईल तेव्हा आनंद देखील टिकू शकेल. अच्छा!

आत्मिक मुलांप्रती बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि शुभ रात्री.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) रोज रात्री आपला पोतामेल (हिशोब) ठेवायचा आहे कि, मी अति गोड बाबांची संपूर्ण दिवसभरामध्ये किती वेळ आठवण केली? स्वतःचा शो करण्यासाठी पोतामेल ठेवायचा नाही, गुप्त पुरुषार्थ करायचा आहे.

२) बाबा जे ऐकवतात, त्यावर विचार सागर मंथन करायचे आहे, सेवेचा पुरावा द्यायचा आहे. ऐकून न ऐकल्यासारखे करायचे नाही. आतमध्ये कोणतेही आसुरी अवगुण असतील तर त्यांना चेक करून काढून टाकायचे आहे.

वरदान:-
वैराग्य वृत्तीद्वारे या असार संसारातून लगाव मुक्त राहणारे सच्चे राजऋषि भव

राजऋषी अर्थात राज्य असताना देखील बेहदचे वैरागी, देह आणि देहाच्या जुन्या दुनियेमध्ये जरा सुद्धा लगाव नाही कारण जाणतो कि हि जुनी दुनिया आहेच असार संसार, यामध्ये कोणतेही सार नाही. असार संसारामध्ये ब्राह्मणांचा श्रेष्ठ संसार मिळाला म्हणून त्या संसारातून बेहदचे वैराग्य अर्थात कोणताही लगाव नाही. जेव्हा कोणातही लगाव किंवा झुकाव नसेल तेव्हा म्हणणार राजऋषि अथवा तपस्वी.

बोधवाक्य:-
युक्तियुक्त बोल ते आहेत जे मधुर आणि शुभ भावना संपन्न आहेत.