13-02-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो - विदेही बनून बाबांची आठवण करा, स्वधर्मामध्ये टिका तेव्हा ताकद मिळेल, आनंदी आणि निरोगी रहाल, बॅटरी फुल होत जाईल

प्रश्न:-
ड्रामाच्या कोणत्या नोंदीला जाणल्या कारणाने तुम्ही मुले सदैव निश्चल राहता?

उत्तर:-
तुम्ही जाणता हे बॉम्ब्स इत्यादी जे बनले आहेत, ते पडणार आहेत जरूर. विनाश होईल तेव्हाच तर आपली नवीन दुनिया येईल. हि ड्रामाची अनादी नोंद आहे, मरायचे तर सर्वांनाच आहे. तुम्हाला ख़ुशी आहे कि आपण हे जुने शरीर सोडून राजाईमधे जन्म घेणार. तुम्ही ड्रामाला साक्षी होऊन बघता, यामध्ये हादरून जाण्याची गरज नाही, रडण्याची काही आवश्यकता नाही.

ओम शांती।
बाबा बसून मुलांना समजावून सांगत आहेत हा जो आदि सनातन देवी-देवता धर्म होता त्याला हिंदू धर्मामध्ये का आणले? कारण शोधले पाहिजे. पहिला तर आदि सनातन देवी-देवता धर्मच होता. मग जेव्हा विकारी झाले तेव्हा स्वतःला देवता म्हणू शकत नव्हते. तेव्हा मग स्वतःला आदि सनातन देवी-देवता म्हणण्या ऐवजी आदि सनातन हिंदू म्हटले आहे. आदि सनातन शब्द देखील ठेवला आहे आणि फक्त देवता शब्द बदलून हिंदू केला आहे. त्यावेळेस इस्लामी आले तर त्या बाहेरच्यांनी येऊन हिंदू धर्म नाव ठेवले. पहिले हिंदुस्थान हे नाव देखील नव्हते. तर आदि सनातन हिंदू देवता धर्मवालेच समजले पाहिजे. ते बहुतांशी धर्मात्माच असतात. सर्वच सनातनी नाही आहेत, जे नंतर आले आहेत त्यांना आदि सनातनी म्हणणार नाही. हिंदूंमध्ये देखील नंतर येणारे असतील. आदि सनातन हिंदूंना सांगितले पाहिजे कि तुमचा आदि सनातन देवता धर्म होता. तुम्हीच सतोप्रधान आदि सनातन होता आणि मग पुनर्जन्म घेत-घेत तमोप्रधान बनले आहात, आता पुन्हा आठवणीच्या यात्रेने सतोप्रधान बना. त्यांना हे औषध चांगले वाटेल. बाबा सर्जन आहेत ना. ज्यांना हे औषध चांगले वाटते त्यांना दिले पाहिजे. जे आदि सनातन देवी-देवता धर्माचे होते, त्यांना आठवण करून दिली पाहिजे. जशी तुम्हा मुलांना स्मृती आली आहे. बाबांनी समजावून सांगितले आहे - कसे तुम्ही सतोप्रधाना पासून तमोप्रधान बनले आहात? आता पुन्हा तमोप्रधाना पासून सतोप्रधान बनायचे आहे. तुम्ही मुले सतोप्रधान बनत आहात - आठवणीच्या यात्रेने. जे आदि सनातन हिंदू असतील तेच खरे देवी-देवता असतील आणि तेच देवतांना पुजणारे देखील असतील. त्यात देखील जे शिवचे किंवा लक्ष्मी-नारायण, राधा-कृष्ण, सीता-राम इत्यादी देवतांचे भक्त आहेत, ते देवता घराण्याचे आहेत. आता स्मृती आली आहे - जे सूर्यवंशी होते तेच चंद्रवंशी बनतात तर अशा भक्तांना शोधले पाहिजे. जे समजून घेण्यासाठी येतात त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतला पाहिजे. मुख्य सेंटरवर फॉर्म भरून घेण्यासाठी जरूर ठेवले पाहिजेत. जे कोणी येतील त्यांना लेसन तर सुरुवातीपासून देणार. पहिली मुख्य गोष्ट आहे कि, जे बाबांना जाणत नाहीत त्यांना समजावून सांगावे लागते. तुम्ही आपल्या श्रेष्ठ पित्याला जाणत नाहीत. तुम्ही खरे तर पारलौकिक पित्याचे आहात. इथे येऊन लौकिक पित्याचे बनले आहात. तुम्ही आपल्या पारलौकिक पित्याला विसरून जाता. बेहदचे बाबा आहेतच स्वर्गाचे रचयिता. तिथे हे अनेक धर्म असत नाहीत. तर फॉर्म जो भरतात त्याच्यावरच सर्व काही अवलंबून असले पाहिजे. काही मुले भले खूप चांगले समजावून सांगतात परंतु योग नाही आहे. अशरीरी बनून बाबांची आठवण करावी, ते नाही आहे. आठवणीमध्ये राहू शकत नाहीत. भले समजतात की आम्ही खूप चांगले समजावून सांगतो, म्युझियम इत्यादी देखील उघडतात परंतु आठवण खूप कमी आहे. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करत राहणे, यातच मेहनत आहे. बाबा वॉर्निंग देत आहेत - असे समजू नका की आम्ही तर खूप चांगल्या तऱ्हेने पटवून देऊ शकतो. परंतु यामध्ये फायदा काय? चला, स्वदर्शन चक्रधारी बनलात परंतु यामध्ये तर विदेही बनायचे आहे. कर्म करत असताना स्वतःला आत्मा समजायचे आहे. आत्मा या शरीराद्वारे कर्तव्य करते; ज्यांना याची आठवण देखील करता येत नाही, लक्षात देखील येत नाही, त्यांना म्हणणार बुद्धू. बाबांची आठवण करू शकत नाहीत! सेवा करण्याची ताकद नाही. आठवणी शिवाय आत्म्यामध्ये ताकद कुठून येणार? बॅटरी कशी भरणार? चालता-चालता थांबणार, ताकद राहणार नाही.

असे म्हटले जाते रिलिजन इज माइट (धर्मामध्ये ताकद आहे). आत्मा स्वधर्मामध्ये टिकेल, तेव्हा ताकद मिळेल. असे बरेच आहेत ज्यांना बाबांची आठवण करता येत नाही. चेहऱ्यावरूनच समजून येते. बाकी सर्व काही आठवेल, बाबांची आठवण राहणार नाही. योगानेच बळ मिळेल. आठवणीमुळेच तर अतिशय आनंद आणि आरोग्य मिळेल. आणि मग दुसऱ्या जन्मामध्ये देखील शरीर असे तेजस्वी मिळेल. आत्मा पवित्र तर शरीर देखील पवित्र मिळेल. असे म्हणतील हे २४ कॅरेट सोने आहे, म्हणून २४ कॅरेटचा दागिना आहे. यावेळी सर्वजण ९ कॅरेटचे बनले आहेत. सतोप्रधानला २४ कॅरेट म्हणणार, सतोला २२, या खूप समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. बाबा समजावून सांगत आहेत की सर्वात आधी तर फॉर्म भरून घ्यायचा आहे, तरच माहीत होईल कि कितपत रिस्पॉन्स देतात? किती धारणा केली आहे? मग हे देखील त्यामध्ये येते कि, आठवणीच्या यात्रेमध्ये राहतात का? तमोप्रधाना पासून सतोप्रधान आठवणीच्या यात्रेने बनायचे आहे. त्या आहेत भक्तीच्या शारीरिक यात्रा आणि हि आहे रुहानी यात्रा (आत्मिक यात्रा). आत्मा यात्रा करते. यामध्ये आत्मा आणि शरीर दोघेही यात्रा करतात. पतित-पावन बाबांची आठवण केल्यानेच आत्म्यामध्ये तेज निर्माण होते. एखाद्या जिज्ञासूला जलवा (शक्ती) वगैरे दाखवायची असेल तर बाबांची प्रवेशता देखील होते. माता-पिता दोघेही मदत करतात - कुठे नॉलेजची, कुठे योगची. बाबा तर सदैव विदेही आहेत. शरीराचे भानच नाहीये. तर बाबा दोन्ही प्रकारच्या ताकदीची मदत देऊ शकतात. योग नसेल तर ताकद मिळणार कुठून? समजून येते हा योगी आहे का ज्ञानी आहे. योगसाठी दिवसेंदिवस नवीन-नवीन गोष्टी देखील समजावून सांगितल्या जातात. आधी हे थोडेच समजावून सांगत होते. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. आता बाबा जबरदस्तीने उठवतात (ताकद भारतात), ज्यामुळे भाऊ-बहिणीचा संबंध देखील नष्ट होईल, फक्त भावा-भावाची दृष्टीच राहील. आपण आत्मे भाऊ-भाऊ आहोत. हि खूप उच्च दृष्टी आहे. अंतापर्यंत हा पुरुषार्थ चालणार आहे. जेव्हा सतोप्रधान बनाल तेव्हा हे शरीर सोडून द्याल त्यामुळे जितके शक्य असेल तितके पुरुषार्थाला वाढवायचे आहे. वृद्धांसाठी अजूनच सोपे आहे; आता आपल्याला जरूर परत जायचे आहे. तरुणांना कधी असे विचार येणार नाहीत. वृद्ध, वानप्रस्थीमध्ये राहतात. समजून येते, आता परत जायचे आहे. तर या सर्व ज्ञानाच्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. झाडाची वृद्धी देखील होत राहते. वृद्धी होत-होत पूर्ण झाड तयार होईल. काट्यांना बदलून फुलांचे नवीन छोटे झाड बनणार आहे. नवीन बनून परत जुने होणार आहे. आधी झाड छोटे असेल आणि मग वाढत जाईल. वृद्धी होत-होत शेवटी मग काटे बनतात. आधी फूल असतात. नावच आहे स्वर्ग. नंतर मग तो सुवास, ती ताकद राहत नाही. काट्यांमध्ये सुवास असत नाही. हलक्या फुलांना देखील सुवास असत नाही. बाबा बागवान देखील आहेत तर खिवय्या (नावाडी) देखील आहेत, सर्वांची नाव पार करतात. नाव कशी पार करतात? कुठे घेऊन जातात? - हे देखील जी हुशार मुले आहेत, तीच समजू शकतात. ज्यांना समजत नाही, ते पुरुषार्थ देखील करत नाहीत. नंबरवार तर असतात ना. काही काही विमाने तर आवाजापेक्षा देखील वेगाने जातात. आत्मा कशी पळते - हे देखील कोणाला माहित नाही. आत्मा तर रॉकेट पेक्षा देखील वेगाने जाते. आत्म्या सारखी वेगवान गोष्ट दुसरी कोणती असत नाही. त्या रॉकेट इत्यादीमध्ये अशी कोणतीतरी चीज टाकतात जी वेगाने उडवून घेऊन जातात. विनाशासाठी किती दारुगोळा इत्यादी तयार करतात. स्टीमर (आगबोटी), एरोप्लेनमध्ये देखील बॉम्ब्स घेऊन जातात. आजकाल पूर्ण तयारी ठेवतात. वर्तमानपात्रांमध्ये लिहितात - असे सांगू शकत नाही की, आम्ही बॉम्ब्सचा उपयोग करणार नाही. होऊ शकते कि आम्ही बॉम्ब्स टाकू देखील - असे म्हणत राहतात. हि सर्व तयारी होत आहे. विनाश तर जरूर होणार आहे. बॉम्ब्स पडणार नाहीत, विनाश होणार नाही - असे होऊ शकत नाही. तुमच्यासाठी नवीन दुनिया जरूर पाहिजे. याची ड्रामामध्ये नोंद आहे, म्हणून तुम्हाला खूप ख़ुशी झाली पाहिजे. मिरुआ मौत मलूका शिकार ड्रामा अनुसार सर्वांना मरायचेच आहे. तुम्हा मुलांना ड्रामाचे ज्ञान असल्याकारणाने तुम्ही डळमळीत होत नाही, साक्षी होऊन बघता. रडणे इत्यादीची गरजच नाही. वेळ आल्यावर शरीर तर सोडावेच लागते. तुमची आत्मा जाणते मी दुसरा जन्म राजाईमध्ये घेणार. मी राजकुमार बनणार. आत्म्याला माहित आहे तेव्हाच तर एक शरीर सोडून दुसरे घेते. सर्पामध्ये देखील आत्मा आहे ना. म्हणतील आम्ही एक कात टाकून दुसरी घेतो. कधीतरी ते देखील शरीर सोडतील, मग लहान पिल्ले बनतील. पिल्ले तर जन्माला येतात ना. पुनर्जन्म तर सर्वांनाच घ्यायचा आहे. असे हे सर्व विचार सागर मंथन करायचे असते.

सर्वात मुख्य गोष्ट आहे - बाबांची अतिशय प्रेमाने आठवण करायची आहे. जशी मुले आई-वडिलांना एकदम चिकटतात, तसे अतिशय प्रेमाने बुद्धि योगाद्वारे बाबांना एकदम चिकटून रहायचे आहे. स्वतःला बघायचे देखील आहे कि, मी किती धारणा करत आहे. (नारदाचे उदाहरण आहे) भक्त जोपर्यंत ज्ञान घेत नाहीत तोपर्यंत देवता बनू शकणार नाहीत. हि केवळ लक्ष्मीला वरण्याची गोष्ट नाहीये. हि तर समजून घेण्याची गोष्ट आहे. तुम्ही मुले समजता कि, जेव्हा आम्ही सतोप्रधान होतो तेव्हा विश्वावर राज्य करत होतो. आता पुन्हा सतोप्रधान बनण्यासाठी बाबांची आठवण करायची आहे. हि मेहनत तुम्ही कल्प-कल्प, यथा योग यथा शक्तीने करतच आले आहात. प्रत्येकजण समजू शकतो की, मी कोणाला कितपत समजावून सांगू शकतो? देह-अभिमानापासून मी कितपत मुक्त होत चाललो आहे? मी आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेते. मी आत्मा यांच्याकडून काम करवून घेते, ही माझी कर्मेंद्रिये आहेत. आपण सर्वजण पार्टधारी आहोत. या ड्रामामध्ये हे बेहदचे मोठे नाटक आहे. त्यामध्ये सर्व ॲक्टर्स नंबरवार आहेत. आपण समजू शकतो - यामध्ये कोण-कोण मुख्य ॲक्टर्स आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड ग्रेडमध्ये कोण-कोण आहेत? तुम्ही मुलांनी बाबांद्वारे ड्रामाच्या आदि-मध्य-अंताला जाणले आहे. रचयित्याद्वारे रचनेची नॉलेज मिळते. रचयिताच येऊन स्वतःचे आणि रचनेचे रहस्य समजावून सांगतात. हा (ब्रह्मा बाबा) त्यांचा रथ आहे, ज्यामध्ये प्रवेश करून आले आहेत. तेव्हाच तर म्हणणार - दोन आत्मे आहेत. हि देखील कॉमन गोष्ट आहे. पितराला खाऊ घालतात, तेव्हा आत्मा येते ना. पूर्वी खूप येत असत, त्यांना विचारत असत. आता तर तमोप्रधान झाले आहेत. काही-काही आता देखील सांगतात - मी आधीच्या जन्मामध्ये अमका होतो. फ्युचरविषयी (भविष्याविषयी) कोणीही सांगत नाहीत. मागच्या म्हणजे भूतकाळातील गोष्टी सांगतात. सर्वांवर तर कोणी विश्वास करत नाहीत.

बाबा म्हणतात - गोड मुलांनो, आता तुम्हाला शांतीमध्ये रहायचे आहे. तुम्ही जितके-जितके ज्ञान-योगामध्ये मजबूत व्हाल, तितके पक्के मजबूत होणार. आता तर खूप मुले दुबळी आहेत. भारतवासी देवी-देवता किती सॉलिड (मजबूत) होते. धनाने देखील संपन्न होते. आता तर रिकामे आहेत. ते सॉल्व्हंट (पवित्र), तुम्ही इनसॉल्व्हंट (अपवित्र). तुम्ही स्वतः देखील जाणता भारत काय होता, आता काय आहे. दुष्काळाने मरावेच लागेल. अन्न-पाणी काहीच मिळणार नाही. कुठे पूर येतील, तर कुठे पाण्याचा थेंबही असणार नाही. यावेळी दुःखाचे ढग आहेत, सतयुगामध्ये सुखाचे ढग आहेत. हा खेळ तुम्हा मुलांनाच समजला आहे इतर कोणालाही माहिती नाहीये. बॅचवर देखील समजावून सांगणे खूप चांगले आहे. तो लौकिक हदचा पिता, हे पारलौकिक बेहदचे पिता. हे पिता एकदाच संगमावर बेहदचा वारसा देतात. नवीन दुनिया बनते. हे आहे आइरन एज (कलियुग) मग गोल्डन एज (सतयुग) जरूर बनणार आहे. तुम्ही आता संगमावर आहात. दिल साफ मुराद हांसिल. रोज स्वतःला विचारा - कोणते खराब काम तर केले नाही ना? कोणाप्रति आतमध्ये विकारी विचार तर आले नाहीत ना? आपल्याच मस्तीमध्ये राहिलो का झरमुई-झगमुईमध्ये (व्यर्थ गोष्टींमध्ये) वेळ घालवला? बाबांचा आदेश आहे - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. जर आठवण करत नाहीत तर ऩाफरमानबरदार (अवज्ञा) करणारे बनता. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-

१) ज्ञान-योगाच्या मस्तीमध्ये रहायचे आहे, मन साफ ठेवायचे आहे. झरमुई-झगमुईमध्ये (व्यर्थ चिंतनामध्ये) आपला वेळ वाया घालवायचा नाही.

२) आपण आत्मा भाऊ-भाऊ आहोत, आता परत घरी जायचे आहे - हा अभ्यास पक्का करायचा आहे. विदेही बनून स्वधर्मामध्ये स्थित होऊन बाबांची आठवण करायची आहे.

वरदान:-
स्व-स्वरूपाला आणि बाबांच्या सत्य स्वरूपाला ओळखून सत्यतेची शक्ती धारण करणारे दिव्यता संपन्न भव

जी मुले आपल्या स्व-स्वरूपाला आणि बाबांच्या सत्य परिचयाला यथार्थपणे जाणून मग त्याच स्वरूपाच्या स्मृतीमध्ये राहतात तर त्यांच्यामध्ये सत्यतेची शक्ती येते. त्यांचे प्रत्येक संकल्प सदैव सत्यता आणि दिव्यता संपन्न असतात. संकल्प, बोल, कर्म आणि संबंध-संपर्क सर्वांमध्ये दिव्यतेची अनुभूती होते. सत्यतेला सिद्ध करण्याची आवश्यकता राहत नाही. जर सत्यतेची शक्ती असेल तर आनंदामध्ये नाचत राहणार.

बोधवाक्य:-
सकाश देण्याची सेवा करा, तर समस्या आपोआपच पळून जाईल.