13-04-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबा २१ जन्मांसाठी तुमचे असे मनोरंजन करतात जे तुम्हाला मनोरंजन करण्यासाठी यात्रा-मेळावा इत्यादी ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही’’

प्रश्न:-
जी मुले आता बाबांचे मदतगार बनतात त्यांच्याकरिता कोणती गॅरेंटी आहे?

उत्तर:-
श्रीमतावर राजधानी स्थापन करण्यामध्ये मदतगार बनणाऱ्या मुलांसाठी गॅरेंटी आहे की, त्यांना कधीही काळ खाऊ शकत नाही. सतयुगी राजधानीमध्ये कधी अकाली मृत्यू होऊ शकत नाही. मदतगार मुलांना बाबांद्वारे असे प्राईज मिळते जे २१ पिढी पर्यंत अमर बनतात.

ओम शांती।
पूर्व नियोजित सृष्टी चक्रानुसार कल्पापूर्वी प्रमाणे शिव भगवानुवाच. आता स्वतःचा परिचय तर मुलांना मिळाला आहे. पित्याचा देखील परिचय मिळाला आहे. बेहदच्या पित्याला तर जाणले आणि बेहदच्या सृष्टीच्या आदि-मध्य-अंताला देखील जाणले. नंबरवार पुरुषार्थानुसार कोणी चांगल्या रीतीने जाणतात, जे मग समजावून देखील सांगू शकतात. कोणी अर्धवट, कोणी थोडेसे. जसे युद्धामध्ये देखील कोणी कमांडर चीफ, कोणी कॅप्टन, कोणी काय बनतात. राजाईच्या माळेमध्ये देखील कोणी श्रीमंत प्रजा, कोणी गरीब प्रजा, नंबरवार आहेत. मुले जाणतात - खरोखर, आम्ही स्वतः श्रीमतावर सृष्टीवर श्रेष्ठ राजधानी स्थापन करत आहोत. जितकी जे मेहनत करतात तितके बाबांकडून प्राईज मिळते. आजकाल शांतीसाठी मत देणाऱ्यांना देखील प्राईज मिळते. तर तुम्हा मुलांना देखील प्राईज मिळते. ते त्यांना मिळू शकत नाही. त्यांना प्रत्येक गोष्ट अल्प काळासाठी मिळते. तुम्ही बाबांच्या श्रीमतावर आपली राजधानी स्थापन करत आहात. ते देखील २१ जन्म, २१ पिढीसाठी गॅरेंटी आहे. तिथे बालपणीच अथवा तारुण्यामध्ये काळ खात नाही. हे देखील जाणता, ना ध्यानी, ना मनी होते आम्ही अशा स्थानावर येऊन बसलो आहोत, जिथे आमचे यादगार (स्मृति रूप) देखील उभे आहे. जिथे ५ हजार वर्षांपूर्वी देखील सेवा केली होती. देलवाडा मंदिर, अचलघर, गुरुशिखर आहे. सद्गुरु देखील उच्च ते उच्च तुम्हाला मिळाला आहे, ज्याचे यादगार बनविले आहे. अचल घराचे रहस्य देखील तुम्हाला समजले आहे. ती झाली घराची महिमा. तुम्ही उच्च ते उच्च पद प्राप्त करता आपल्या पुरुषार्थानुसार. हे तुमचे जड यादगार वंडरफुल आहे. तिथेच तुम्ही चैतन्यमध्ये येऊन बसले आहात. हा सर्व आहे रूहानी व्यवहार जो कल्पापूर्वी चालला होता. त्यांचे पूर्ण यादगार इथे आहे, एक नंबरचे यादगार आहे. ज्याप्रमाणे कोणी मोठी परीक्षा पास होतात तर त्यांना आतून खुशी वाटते, एक प्रकारचे तेज येते. फर्निचर, वेशभूषा किती चांगली ठेवतात. तुम्ही तर विश्वाचे मालक बनता. तुमच्या सोबत कोणीही तुलना करू शकत नाही. हे देखील स्कूल आहे. शिकविणाऱ्याला देखील तुम्ही जाणले आहे. भगवानुवाच भक्तिमार्गामध्ये ज्यांची आठवण करतात, पूजा करतात, काहीच समजत नाहीत. बाबाच सन्मुख येऊन सर्व रहस्ये समजावून सांगतात कारण हि सर्व यादगार तुमच्या शेवटच्या अवस्थेची आहेत. आता रिझल्ट लागलेला नाही. जेव्हा तुमची अवस्था संपूर्ण बनते, त्याचे मग भक्तिमार्गामध्ये यादगार बनते. ज्याप्रमाणे रक्षाबंधनाचे यादगार आहे. जेव्हा पूर्ण पक्की राखी बांधून आपण आपले राज्य भाग्य घेतो, तेव्हा मग यादगार साजरे करत नाही. यावेळी तुम्हाला सर्व मंत्रांचा अर्थ समजावून सांगितला आहे. ‘ओम्’चा अर्थ समजावून सांगितला आहे. ‘ओम्’चा अर्थ काही एवढा मोठा नाहीये. ‘ओम्’चा अर्थ आहे - ‘अहम् आत्मा, मम् शरीर (माझे शरीर)’. अज्ञान काळामध्ये देखील तुम्ही देह-अभिमानामध्ये राहता त्यामुळे स्वतःला शरीर समजता. भक्तिमार्ग दिवसेंदिवस अधोगतीलाच जात राहतो. तमोप्रधान बनत जातो. प्रत्येक गोष्ट पहिली सतोप्रधान असते. भक्ती देखील पहिली सतोप्रधान होती. जेव्हा एका सत् शिवबाबांची आठवण करत होते. होते देखील खूप थोडे. दिवसेंदिवस वृद्धी खूप होणार आहे. विदेशामध्ये जेव्हा जास्त मुलांना जन्म देतात तर त्यांना इनाम मिळते. बाबा म्हणतात - ‘काम महाशत्रू आहे. सृष्टीची खूप वृद्धी झाली आहे, आता पवित्र बना’.

तुम्हा मुलांनी सृष्टीच्या आदि-मध्य-अंताला आता बाबांद्वारे जाणले आहे. सतयुगामध्ये भक्तीचे नामोनिशाण सुद्धा नाही. आता तर किती गाजावाजा आहे, यात्रा-मेळावे खूप भरतात, जेणेकरून लोक जाऊन मनोरंजन करू शकतील. तुमचे मनोरंजन तर बाबा येऊन करतात २१ जन्मांसाठी. जे तुमची सदैव करमणूक होत राहते. तुम्हाला कधी यात्रा इत्यादी ठिकाणी जाण्याचा विचार देखील येणार नाही. मनुष्य कुठेही जातात ते सुखासाठी जातात. तुम्हाला कुठे डोंगरांवर जाण्याची गरज नाही. इथे पहा मनुष्य कसे मृत्युमुखी पडतात. मनुष्य तर सतयुग आणि कलियुग, स्वर्ग आणि नरकाला देखील जाणत नाहीत. तुम्हा मुलांना तर पूर्ण ज्ञान मिळाले आहे. बाबा असे कधीच म्हणत नाहीत की, तुम्हाला माझ्या सोबत रहायचे आहे. तुम्हाला घरदार देखील सांभाळायचे आहे. मुले दूर तेव्हा होतात जेव्हा काही खिट-पिट होते. तरीही तुम्ही बाबांसोबत राहू शकत नाही. सर्वच सतोप्रधान बनू शकत नाहीत. कोणी सतो, कोणी रजो, कोणी तमो अवस्थेमध्ये देखील आहेत. सर्व एकत्र राहू शकत नाहीत. ही राजधानी बनत आहे. जे जितकी म्हणून बाबांची आठवण करतील, त्यानुसार राजधानीमध्ये पद प्राप्त करतील. मुख्य गोष्ट आहेच बाबांना आठवण करण्याची. बाबा स्वतः बसून ड्रिल शिकवतात. हा आहे डेड सायलेन्स. तुम्ही इथे जे काही पाहता, त्याला पहायचे नाहीये. देहा सहित सर्वांचा त्याग करायचा आहे. तुम्ही काय पाहता? एक तर आपल्या घराला आणि अभ्यासानुसार जे पद प्राप्त करता त्याला; त्या सतयुगी राजाईला देखील तुम्हीच जाणता. जेव्हा सतयुग आहे तेव्हा त्रेता नाही, त्रेता आहे तेव्हा द्वापर नाही, द्वापर आहे तेव्हा कलियुग नाही. आता कलियुग देखील आहे, संगमयुग देखील आहे. भले तुम्ही बसले आहात जुन्या दुनियेमध्ये परंतु बुद्धीने समजता आपण संगमयुगी आहोत. संगमयुग कशाला म्हटले जाते - हे देखील तुम्हीच जाणता. पुरुषोत्तम वर्ष, पुरुषोत्तम महिना, पुरुषोत्तम दिवस देखील या पुरुषोत्तम संगमावरच असतो. पुरुषोत्तम बनण्याची वेळ देखील या पुरुषोत्तम युगामध्येच आहे. हे खूप छोटे लीप युग आहे. तुम्ही मुले बाजोली खेळता, ज्याद्वारे तुम्ही स्वर्गामध्ये जाता. बाबांनी पाहिले आहे की, कसे साधू लोक किंवा कोणी-कोणी बाजोली खेळत-खेळत (कोलांट्या उड्या मारत-मारत) यात्रेला जातात. बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. आता या ज्ञानामध्ये कोणत्या अडचणीची गोष्टच नाही. या आहेत योगबलाच्या गोष्टी. आठवणीची यात्रा तुम्हा मुलांना कठीण वाटते का? नाव तर खूप सोपे ठेवले आहे. कुठे ऐकून घाबरून जाऊ नयेत. म्हणतात - ‘बाबा, आम्ही योगामध्ये राहू शकत नाही’. बाबा मग हलके करतात. ही आहे बाबांची आठवण. आठवण तर सर्व वस्तूंची केली जाते. बाबा म्हणतात - स्वतःला आत्मा समजा. तुम्ही मुले आहात ना. हे तुमचे बाबा देखील आहेत, माशुक सुद्धा आहेत. सर्व आशिक त्यांची आठवण करतात; एक ‘बाबा’ शब्दच पुरेसा आहे. भक्तिमार्गामध्ये तुम्ही मित्र-संबंधींची आठवण करता, तरी देखील ‘हे प्रभू, हे ईश्वर’ जरूर म्हणता. फक्त एवढेच कि माहीत नाहीये की ती काय चीज आहे. आत्म्यांचे पिता तर परमात्मा आहेत. या शरीराचे पिता तर देहधारी आहेत. आत्म्याचे पिता अशरीरी आहेत. ते कधी पुनर्जन्मामध्ये येत नाहीत. बाकी सर्वजण पुनर्जन्मामध्ये येतात, म्हणून बाबांचीच आठवण करतात. जरूर कधी सुख दिले आहे. त्यांना म्हटले जाते दुःख हर्ता, सुख कर्ता, परंतु त्यांच्या नाव, रुप, देश, काळाला जाणत नाहीत. जितके मनुष्य तितक्या गोष्टी. अनेक मते झाली आहेत.

बाबा किती प्रेमाने शिकवतात. ते आहेत ईश्वर, शांती देणारे. त्यांच्याकडून किती सुख मिळते. एकच गीता ऐकवून पतितांना पावन बनवतात. प्रवृत्ती मार्ग देखील पाहिजे ना. लोकांनी तर कल्पाचा कालावधी लाखों वर्षे आहे असे म्हटले आहे, मग तर अगणित मनुष्य झाले असते. केवढी मोठी चूक केली आहे. हे नॉलेज तुम्हाला आता मिळते मग प्राय: लोप होते. चित्र तर आहेत, ज्यांची पूजा होते. परंतु स्वतःला देवता धर्माचे समजत नाहीत. जे ज्यांची पूजा करतात, ते त्याच धर्माचे आहेत ना. हे समजू शकत नाहीत की आपण आदि-सनातन देवी-देवता धर्माचे आहोत. त्यांचीच वंशावळी आहोत. हे बाबाच समजावून सांगतात. बाबा म्हणतात - तुम्ही पावन होता, आणि मग तमोप्रधान बनले आहात, आता पावन सतोप्रधान बनायचे आहे. गंगा स्नान केल्याने बनणार काय? पतित-पावन तर बाबा आहेत. ते जेव्हा येऊन रस्ता सांगतील तेव्हाच तर पावन बनाल. बोलावत राहतात परंतु जाणत काहीच नाहीत. आत्मा बोलावते कर्मेंद्रियांद्वारे की, ‘हे पतित-पावन बाबा, येऊन आम्हाला पावन बनवा’. सर्व पतित आहेत. काम चितेवर जळत राहतात. हा खेळच असा बनलेला आहे. मग बाबा येऊन सर्वांना पावन बनवितात. हे बाबा संगमावरच समजावून सांगतात. सतयुगामध्ये असतो एक धर्म, बाकी सर्व परत निघून जातात. तुम्हाला ड्रामा समजला आहे, जो बाकी कोणीही जाणत नाहीत. या रचनेचा आदि-मध्य-अंत काय आहे, कालावधी किती आहे, हे तुम्हीच जाणता. ते सर्व आहेत शूद्र, तुम्ही आहात ब्राह्मण. तुम्ही देखील जाणता नंबरवार पुरुषार्थानुसार. कोणी चूक करतात तर त्यांच्या रजिस्टरवरून दिसून येते की अभ्यास कमी केला आहे. एखाद्याच्या वर्तनाचे रजिस्टर असते. इथे देखील रजिस्टर असले पाहिजे. ही आहे आठवणीची यात्रा, ज्या विषयी कोणालाच माहिती नाहीये. सर्वात मुख्य विषय आहे आठवणीची यात्रा. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे. आत्मा मुखाद्वारे म्हणते - ‘मी एक शरीर सोडून दुसरे घेते’. या सर्व गोष्टी हे ब्रह्मा बाबा सांगत नाहीयेत, तर ज्ञान सागर परमपिता परमात्मा या रथामध्ये बसून ऐकवत आहेत. म्हटले जाते गोमुख. मंदिर देखील इथे बनलेले आहे, जिथे तुम्ही बसले आहात. ज्याप्रमाणे तुमची शिडी आहे, तशी तिथे देखील शिडी आहे. तुम्हाला चढताना थकायला होत नाही.

तुम्ही इथे आले आहात बाबांकडून शिकून रिफ्रेश होण्यासाठी. तिथे गोरखधंदा खूप असतो. शांतीने ऐकू देखील शकणार नाही. संकल्प चालत राहिल - कोणी आपल्याला पाहू नये, लवकर घरी जावे. किती काळजी वाटत असते. इथे कसलीच चिंता नाही, जसे हॉस्टेल मध्ये राहतात. इथे ईश्वरीय परिवार आहे. शांतीधाममध्ये भाऊ-भाऊ राहतात. इथे आहेत भाऊ-बहिणी कारण इथे पार्ट बजावायचा असेल तर भाऊ-बहिणी पाहिजेत. सतयुगामध्ये देखील तुम्ही आपसामध्ये भाऊ-बहिणी होता. त्याला म्हटले जाते अद्वैत राजधानी. तिथे भांडण-तंटा काहीच नसते. तुम्हा मुलांना पूर्ण नॉलेज मिळाले आहे की आपण ८४ जन्म घेतो. ज्याने जास्त भक्ती केली आहे, त्याचा हिशोब देखील बाबांनी सांगितला आहे. तुम्हीच शिवाची अव्यभिचारी भक्ती करायला सुरुवात करता. मग वृद्धी होत जाते. ती सर्व आहे भक्ती. ज्ञान तर एकच आहे. तुम्ही जाणता आपल्याला शिवबाबा शिकवतात. हे ब्रह्मा तर काहीच जाणत नव्हते. जे ग्रेट-ग्रेट ग्रँड फादर होते ते यावेळी हे बनले आहेत नंतर मग मालक बनतात, तत् त्वम्. एकटेच तर मालक बनणार नाहीत ना. तुम्ही देखील पुरुषार्थ करता. हे आहे बेहदचे स्कूल. याच्या पुष्कळ शाखा असतील. गल्ली-गल्ली घरा-घरामध्ये होतील. म्हणतात - आम्ही आमच्या घरामध्ये चित्रे ठेवली आहेत, मित्र-संबंधी इत्यादी येतात तेव्हा त्यांना समजावून सांगतो. जी या झाडाची पाने असतील ती येतील. त्यांच्या कल्याणासाठी तुम्ही करता. चित्रांवर समजावून सांगणे सोपे होईल. शास्त्रं तर पुष्कळ वाचली आहेत, आता सर्व विसरायचे आहे. बाबा आहेत शिकविणारे, तेच खरे ज्ञान ऐकवितात. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) डेड-सायलेन्सचे ड्रिल करण्यासाठी इथे जे काही या डोळ्यांनी दिसते, त्याला पहायचे नाही. देहा सहित बुद्धीने सर्वांचा त्याग करून आपले घर आणि राजाईच्या स्मृतीमध्ये रहायचे आहे.

२) आपल्या वर्तनाचे रजिस्टर ठेवायचे आहे. अभ्यासामध्ये कोणताही निष्काळजीपणा करायचा नाही. या पुरुषोत्तम संगमयुगावर पुरुषोत्तम बनायचे आहे आणि बनवायचे आहे.

वरदान:-
सदैव सर्व प्राप्तींनी भरपूर राहणारे हर्षितमुख, हर्षितचित्त भव

जेव्हापण कोणत्या देवी किंवा देवताची मूर्ती बनवितात तेव्हा त्यामध्ये चेहरा नेहमी हर्षित दाखवतात. तर तुमचे यावेळचे हर्षितमुख राहण्याचे यादगार चित्रांमध्ये देखील दाखवतात. हर्षितमुख अर्थात सदैव सर्व प्राप्तींनी भरपूर. जो भरपूर असतो तोच हर्षित राहू शकतो. जर कोणतीही अप्राप्ती असेल तर हर्षित राहणार नाही. कोणी कितीही हर्षित राहण्याचा प्रयत्न करेल, बाहेरून हसतीलही परंतु मनापासून नाही. तुम्ही तर मनापासून हसता कारण सर्वप्राप्तींनी भरपूर हर्षितचित्त आहात.

बोधवाक्य:-
पास विद ऑनर बनायचे असेल तर प्रत्येक खजिन्याचे जमेचे खाते भरपूर असावे.