14-04-24    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   15.03.99  ओम शान्ति   मधुबन


कर्मातीत अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी कंट्रोलिंग पॉवरला वाढवा, स्वराज्य अधिकारी बना


आज बापदादा चोहो बाजूंच्या आपल्या राज दुलारे परमात्म प्रिय मुलांना बघत आहेत. हा परमात्म दुलार अथवा परमात्म प्रेम खूप थोड्या मुलांना प्राप्त होतो. अशा भाग्याचे अधिकारी फार थोडे बनतात. अशा भाग्यवान मुलांना बघून बापदादा सुद्धा हर्षित होतात. राज दुलारे अर्थात राजाची मुले. तर स्वतःला राजा समजता का? नावच आहे राजयोगी. तर राजयोगी अर्थात राजेशाही मुले. वर्तमान समयी सुद्धा राजे आहात आणि भविष्यामध्ये देखील राजे आहात. आपल्या डबल राज्य पदाचा अनुभव करता ना? आपणच आपल्याला बघा कि, मी राजा आहे? स्वराज्य अधिकारी आहे? प्रत्येक राज्य-कारभारी तुमच्या ऑर्डर प्रमाणे कार्य करत आहेत? राजाची विशेषता काय असते, ते तर जाणता ना? रुलिंग पॉवर आणि कंट्रोलिंग पॉवर दोन्ही पॉवर तुमच्याकडे आहेत? आपणच आपल्याला विचारा कि राज्य कारभारी सदैव कंट्रोलमध्ये चालत आहेत?

बापदादा आज मुलांची कंट्रोलिंग पॉवर, रुलिंग पॉवर चेक करत होते, तर सांगा बरे काय बघितले असेल? प्रत्येकजण जाणत तर आहेत. बापदादांनी पाहिले की अजूनही अखंड राज्य अधिकार सर्वांचा नाही आहे. ‘अखंड’, मधे-मधे खंडित होतो. असे का? सदैव स्वराज्याच्या बदल्यात राज्य सुद्धा खंडित करतो. परराज्याची निशाणी आहे - हि कर्मेंद्रिये पराधीन होतात. मायेच्या राज्याचा प्रभाव अर्थात पर-अधीन बनणे. वर्तमान समयी माइनॉरिटी (फार थोडे) तर ठीक आहेत परंतु मेजॉरिटी (बहुसंख्य) वर्तमान समयाच्या मायेच्या विशेष प्रभावामध्ये येतात. जे आदि-अनादी संस्कार आहेत त्याच्या मधे-मधे मध्याचे अर्थात द्वापर पासून आत्ता शेवटपर्यंतच्या संस्कारांच्या प्रभावामध्ये येतात. स्वतःचे संस्कारच स्वराज्याला खंडित करतात. त्यामध्ये देखील विशेष संस्कार व्यर्थ विचार करणे, व्यर्थ वेळ घालवणे आणि व्यर्थ बोला-चालीमध्ये येणे, मग ते ऐकणे असो नाहीतर ऐकविणे असो. एका बाजूला व्यर्थचे संस्कार, दुसऱ्या बाजूला निष्काळजीपणाचे संस्कार भिन्न-भिन्न रॉयल रूपामध्ये स्वराज्याला खंडित करतात. बरीच मुले असे म्हणतात कि, वेळ जवळ येत आहे, परंतु जे संस्कार सुरुवातीला इमर्ज नव्हते, ते आता कुठे-कुठे इमर्ज होत आहेत. वातावरणामध्ये आणखी संस्कार इमर्ज होत आहेत, याचे कारण काय? हे मायेचे वार करण्याचे एक साधन आहे. माया याद्वारेच आपले बनवून परमात्म मार्गापासून दिल शिकस्त बनवते (निराश करते). विचार करतात कि अजून पर्यंत असेच आहोत तर माहित नाही समानतेची सफलता मिळेल कि नाही मिळणार! कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये जिथे कमजोरी असेल, त्याच कमजोरीच्या रूपामध्ये माया दिलशिकस्त (निराशा उत्पन्न) करण्याचा प्रयत्न करते. खूप चांगल्या प्रकारे चालता-चालता कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये माया संस्कारावर हमला करून, जुन्या संस्कारांना इमर्ज करण्याचे रूप ठेवून दिलशिकस्त करण्याचा प्रयत्न करते. शेवटी सर्व संस्कार समाप्त होणार आहेत म्हणून कधी-कधी राहिलेले संस्कार इमर्ज होतात. परंतु बापदादा तुम्हा सर्व भाग्यवान मुलांना इशारा देत आहेत - घाबरू नका, मायेच्या चालीला ओळखा. आळस आणि व्यर्थ - यामध्ये निगेटिव्ह देखील येते - या दोन्ही गोष्टींवर विशेष अटेन्शन ठेवा. समजून जा कि हा वर्तमान समय, मायेचे वार करण्याचे साधन आहे.

बाबांच्या सोबतीचा अनुभव, कंबाइंडपणाचा (कायम एकत्र असल्याचा) अनुभव इमर्ज करा. असे नाही कि, ‘बाबा आहेतच माझे, सोबत आहेतच’. सोबत असल्याचा प्रॅक्टिकल अनुभव इमर्ज असावा. तर हा मायेचा वार, वार नाही होणार, माया हार खाईल. हि मायेची हार आहे, वार नाही. फक्त घाबरू नका, हे काय झाले, असे का झाले! हिम्मत ठेवा, बाबांच्या सोबतीला स्मृतीमध्ये ठेवा. चेक करा कि बाबा सोबत आहेत? सोबतीचा अनुभव मर्ज रूपामध्ये तर नाही? नॉलेज आहे कि बाबा सोबत आहेत, नॉलेजच्या सोबतच बाबांची पॉवर काय आहे? ऑलमाइटी ऑथॉरिटी आहेत तर सर्व शक्तींची पॉवर इमर्ज रूपामध्ये अनुभव करा. याला म्हटले जाते बाबांच्या सोबतीचा अनुभव होणे. निष्काळजी होऊ नका - बाबांशिवाय मला आणखी आहेच कोण, बाबाच तर आहेत. जर फक्त बाबाच आहेत तर ती पॉवर आहे? जसे दुनियावाल्यांना म्हणता - जर परमात्मा व्यापक आहे तर परमात्म्याचे गुण अनुभव व्हायला हवेत, दिसायला हवेत. तर बापदादा सुद्धा तुम्हाला विचारत आहेत कि, जर बाबा सोबत आहेत, कंबाइंड आहेत तर ती पॉवर प्रत्येक कर्मामध्ये अनुभव होते? दुसऱ्यांना देखील अनुभव होते? काय समजता? डबल फॉरेनर्स काय समजता? पॉवर आहे? सदैव आहे? पहिल्या प्रश्नामध्ये तर सर्वजण, ‘हो’ म्हणतात. नंतर जेव्हा दुसरा प्रश्न येतो, ‘सदैव आहे?’ तर मग विचारात पडतात. म्हणजे अखंड तर नाही झाले ना! तुम्ही चॅलेंज काय करता? अखंड राज्य स्थापन करत आहात कि खंडित राज्य स्थापन करत आहात? काय करत आहात? अखंड आहे ना! टीचर्स बोला, अखंड आहे? तर आता चेक करा - अखंड स्वराज्य आहे? राज्य अर्थात निरंतर प्रारब्ध घ्यायचे आहे कि मधे-मधे कट झाले तरी काही हरकत नाही? असे चालेल? घेण्यामध्ये तर निरंतर पाहिजे आणि पुरुषार्थामध्ये कधी-कधी चालते, असे आहे का? फॉरेनर्सना सांगितले होते ना की आपल्या जीवनातील डिक्शनरी मधून ‘समटाइम’ आणि ‘समथिंग’ (‘कधीतरी’ आणि ‘काहीतरी’) शब्द काढून टाका. आता ‘समटाइम’ शब्द नाहीसा झाला? जयंती, काय म्हणणार. रिजल्ट देणार ना. तर ‘समटाइम’ नाहीसा झाला आहे? जे समजतात, ‘समटाइम’ शब्द कायमसाठी समाप्त झाला, त्यांनी हात वर करा. समाप्त झाला की समाप्त होणार? मोठा हात वर करा. वतनच्या टी.व्ही. मध्ये तर तुमचे हात आले, इथल्या टी.व्ही. मध्ये सर्वांचेच हात येत नाहीत. हा कलियुगी टी.व्ही. आहे ना, तिथे जादूचा टी.व्ही. आहे म्हणून येतो. खूप छान तरी देखील खूप जणांनी हात वर केला आहे, त्यांना सदाकाळासाठी मुबारक आहे. अच्छा.

आता भारतवासी ज्यांचे प्रॅक्टिकल सदा काळासाठी स्वराज्य आहे, सर्व कर्मेंद्रिय लॉ आणि ऑर्डरमध्ये आहेत, त्यांनी हात वर करा. पक्का हात वर करा, कच्चा नाही. सदैव आठवणीत ठेवा कि सभेमध्ये हात वर केला आहे. नंतर बापदादांना गोष्टी तर खूप गोड-गोड सांगतात. म्हणतात - ‘बाबा, तुम्ही तर जाणता ना, कधी-कधी माया येते ना!’ तर आपण हात वर केला होता याची लाज ठेवा. चांगले आहे. तरी देखील हिम्मत ठेवली आहे तर हिम्मत हारू नका. हिमतीवर बापदादांची मदत आहेच आहे.

आज बापदादांनी बघितले कि वर्तमान समयानुसार स्वतःवर, प्रत्येक कर्मेंद्रियांवर अर्थात स्वतःची स्वयंप्रति जी कंट्रोलिंग पॉवर असायला पाहिजे ती कमी आहे, ती अजून जास्त पाहिजे. बापदादा मुलांची रुहरिहान ऐकून हसत होते, मुले म्हणतात कि ‘पॉवरफुल आठवणीचे चार तास होत नाहीत. बापदादांनी ८ तासांचे ४ तास केले आणि मुले म्हणतात कि २ तास ठीक आहेत. तर आता सांगा हि कंट्रोलिंग पॉवर झाली? आणि आत्तापासून जर हा अभ्यास नाही केला तर वेळेवर पास विद ऑनर, राज्य अधिकारी कसे बनू शकणार! बनायचे तर आहे ना? मुले हसत आहेत. आज बापदादांनी मुलांच्या गोष्टी खूप ऐकल्या आहेत. बापदादांना हसवतात देखील, म्हणतात ‘ट्रॅफिक कंट्रोल ३ मिनिट होत नाही, शरीरावर कंट्रोल होतो, उभे राहतो’; नाव आहे ‘मनाचा कंट्रोल’ परंतु मनावर कंट्रोल कधी होतो, कधी होतही नाही. कारण काय आहे? कंट्रोलिंग पॉवरची कमी. याला आता आणखी वाढवायचे आहे. ऑर्डर करा, जसे हाताला वर करायचे असेल तर वर करता. फ्रॅक्चर नसेल तर वर करता ना! अगदी तसेच मन, हि सूक्ष्म शक्ती कंट्रोलमध्ये येणार आहे. आणायचीच आहे. ऑर्डर करा - स्टॉप, तर स्टॉप व्हावी. सेवेचा विचार केला आणि सेवेमध्ये लागले. परमधाममध्ये चल, तर परमधाममध्ये निघून जावे. सूक्ष्मवतन मध्ये चल, सेकंदामध्ये जायला हवे. जो विचार कराल तो ऑर्डर प्रमाणे व्हावा. आता या शक्तीला वाढवा. छोट्या-छोट्या संस्कारांमध्ये, युद्धामध्ये वेळ घालवू नका, आज या संस्काराला पळवून लावले, उद्या त्याला पळवून लावले. कंट्रोलिंग पॉवर धारण करा तर वेगवेगळ्या संस्कारांसाठी वेळ घालवावा लागणार नाही. ना विचार करायचा आहे, ना करायचे आहे, ना बोलायचे आहे. स्टॉप. तर स्टॉप व्हावे. हि आहे कर्मातीत अवस्थेपर्यंत पोहोचण्याची विधी. तर कर्मातीत बनायचे आहे ना? बापदादा सुद्धा म्हणतात तुम्हालाच बनायचे आहे. आणखी कोणीही येणार नाही, तुम्हीच आहात. तुम्हालाच सोबत घेऊन जाणार परंतु कर्मातीत असणाऱ्याला घेऊन जातील ना. सोबत येणार कि मागे-मागे येणार? (सोबत येणार) हे तर खूप छान बोललात. सोबत येणार, हिशोब चुकता करणार? यामध्ये, ‘होय’, म्हटले नाही. कर्मातीत बनून सोबत येणार ना. सोबत येणे अर्थात सोबती बनून चालणे. जोडी तर चांगली पाहिजे कि मोठी आणि छोटी? समान पाहिजे ना. तर कर्मातीत बनायचेच आहे. तर काय करणार? आता आपले राज्य चांगल्या प्रकारे सांभाळा. रोज आपला दरबार लावा. राज्य अधिकारी आहात ना! तर आपला दरबार लावा, कर्मचाऱ्यांना (आपल्या कर्मेंद्रियांना) हाल-हवाल विचारा. चेक करा, ऑर्डर मध्ये आहेत? ब्रह्मा बाबांनी सुद्धा रोज दरबार लावला आहे. उदाहरण आहे ना. यांना सांगा, दाखवा. ब्रह्माबाबांनी सुद्धा मेहनत केली, रोज दरबार लावला तेव्हा कर्मातीत बनले. तर आता किती वेळ पाहिजे? कि एव्हररेडी आहात? या अवस्थेने सेवा देखील फास्ट होईल. का? एकाच वेळी मन्सा शक्तिशाली, वाचा शक्तिशाली, संबंध-संपर्कामध्ये वर्तन आणि चेहरा शक्तिशाली. एकाच वेळी तीनही सेवा खूप फास्ट रिजल्ट मिळेल. असे समजू नका कि या साधनेमुळे सेवा कमी होईल, नाही. सफलता सहज अनुभव होईल. बाकी सर्व जे पण सेवेच्या निमित्त आहेत जर संघटित रूपामध्ये अशी स्टेज बनवतील तर मेहनत कमी आणि सफलता जास्त होईल. तर कंट्रोलिंग पॉवरला वाढविणे यावर विशेष अटेन्शन द्या. संकल्प, वेळ, संस्कार सर्वांवर कंट्रोल असू दे. बापदादांनी बऱ्याच वेळा सांगितले आहे, तुम्ही सर्व राजे आहात. जेव्हा पाहिजे जसे पाहिजे, जिथे पाहिजे, जेवढा वेळ पाहिजे तशी मन-बुद्धी, लॉ आणि ऑर्डरमध्ये असावी. तुम्ही म्हणाल करायचे नाही, आणि तरी देखील होत आहे, करत आहोत तर हे काही लॉ आणि ऑर्डर प्रमाणे नाही झाले. तर स्वराज्य अधिकारी, तुम्ही आपल्या राज्याला सदैव प्रत्यक्ष स्वरूपामध्ये आणा. आणायचे आहे ना? आणत देखील आहेत परंतु बापदादांनी सांगितले ना ‘सदैव’ शब्द ॲड करा. बापदादा आता शेवटचे येतील, अजून एक टर्न आहे. एका टर्नमध्ये रिझल्ट विचारतील. १५ दिवस असतात ना. तर १५ दिवसामध्ये काही तरी करून दाखवाल कि नाही? टीचर्स बोला, १५ दिवसामध्ये रिजल्ट होईल?

अच्छा, मधुबनवाले १५ दिवसामध्ये रिझल्ट दाखवतील. आता सांगा हो कि नाही! आता हात वर करा. (सर्वांनी हात वर केला) आपल्या हाताची लाज राखा. जे समजतात प्रयत्न करणार, असा प्रयत्न करणाऱ्यांनी हात वर करा. ज्ञान सरोवर, शांतीवनवाले उभे रहा. (बापदादांनी मधुबन, ज्ञान सरोवर, शांतीवनच्या मुख्य भाऊ-बहिणींना समोर बोलावले)

बापदादांनी तर तुम्हा सर्वांचा साक्षात्कार घडविण्यासाठी बोलावले आहे. तुम्हा लोकांना पाहून सर्वजण खुश होतात. आता बापदादांना काय हवे आहे, ते सांगत आहेत. मग ते पांडव भवन असो, किंवा शांतीवन असो, ज्ञान सरोवर, नाहीतर हॉस्पिटल असो चार धाम तर आहेत. पाचवे छोटे आहे. चारही ठिकाणांकडून बापदादांची एक आशा आहे - बापदादा तीन महिन्याकरिता या चारधाम मध्ये अखंड, निर्विघ्न, अटल स्वराज्यधारी, राजांचा रिझल्ट पाहू इच्छितात. तीन महिने इथून-तिथून कोणत्याही इतर गोष्टी ऐकायला येऊ नयेत. सर्व स्वराज्य अधिकारी नंबर वन; असा तीन महिन्यांचा रिझल्ट मिळू शकेल का? (निर्वैर भाईजींना) - पांडवांच्या बाजूने तुम्ही आहात. होऊ शकते का? दादी तर आहेत परंतु सोबत हे जे समोर बसले आहेत, ते सर्व आहेत. तर होऊ शकते? (दादी म्हणत आहेत होऊ शकते) जे पांडव भवनवाले बसले आहेत त्यांनी हात वर करा, होऊ शकते. अच्छा, समजा कोणी कमजोर आहे, त्याचे काही झाले तर मग तुम्ही काय कराल? तुम्ही समजता की सोबत असणाऱ्यांना देखील सहयोग देत रिझल्ट काढणार, एवढी हिम्मत ठेवता? होऊ शकते का फक्त स्वतःपुरती हिम्मत आहे? दुसऱ्यांच्या गोष्टींना देखील सामावून घेऊ शकता? त्याची चूक सामावून घेऊ शकता? वातावरणामध्ये पसरवू नका, सामावून घ्या, एवढे करू शकता? मोठ्याने बोला, ‘होय’. मुबारक आहे. ३ महिन्यानंतर रिपोर्ट बघणार. कोणत्याही स्थानावरून कोणताही रिपोर्ट येता कामा नये. एकमेकांना व्हायब्रेशन देऊन सामावून टाका आणि प्रेमाने व्हायब्रेशन द्या. भांडण होऊ नये.

असाच डबल विदेशी सुद्धा रिझल्ट देणार ना. सर्वांना बनायचे आहे ना. डबल विदेशी जे समजतात आपल्या सेंटरवर, साथीदारांसोबत ३ महिन्यांचा रिझल्ट काढून दाखवणार, त्यांनी हात वर करा. जे समजतात, ‘प्रयत्न करु, सांगू शकत नाही’, असे कोणी असतील तर त्यांनी हात वर करा. मन स्वच्छ आहे, स्वच्छ मन असणाऱ्यांना मदत मिळते. अच्छा. (नंतर बापदादांनी सर्व झोनच्या भाऊ-बहिणींना हात वर करायला सांगितले तसेच आपल्या जागेवर उभे केले.) पहिले महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटकच्या भाऊ-बहिणींना उभे केले आश्वासन द्यायला लावले. नंतर यु.पी. वाल्यांना सेवेची मुबारक दिली. अच्छा!

चोहो बाजूंच्या सर्व स्वराज्य अधिकारी आत्म्यांना, सदैव अखंड राज्याच्या पात्र आत्म्यांना, सदैव बाप समान कर्मातीत स्थितीमध्ये पोहोचणाऱ्या, बाबांना फॉलो करणाऱ्या तीव्र पुरुषार्थी आत्म्यांना, सदैव एक-मेकांना शुभ भावना, शुभकामनेचा सहयोग देणाऱ्या शुभचिंतक मुलांना प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

वरदान:-
विघ्नकारी (विघ्न आणणाऱ्या) आत्म्याला शिक्षक समजून त्याच्याकडून धडा शिकणारे अनुभवी-मूर्त भव

जे आत्मे विघ्न आणण्याच्या निमित्त बनतात त्यांना विघ्नकारी आत्मा म्हणून पाहू नका, त्यांना सदैव धडा शिकविणारी, पुढे घेऊन जाणारी निमित्त आत्मा समजा. अनुभवी बनविणारी शिक्षक आत्मा समजा. जर म्हणता कि, ‘निंदा करणारे मित्र आहेत’, तर विघ्नांना पास करुन अनुभवी बनविणारे शिक्षक झाले, म्हणून विघ्नकारी आत्म्याला त्या दृष्टीने पाहण्याऐवजी सदा काळासाठी विघ्नांमधून पार करविण्यासाठी निमित्त, अचल बनविण्यासाठी निमित्त समजा, यामुळे आणखी अनुभवांची ऑथॉरिटी वाढत जाईल.

सुविचार:-
कम्प्लेंटची फाईल बंद करून फाइन आणि रिफाइन बना.