15-04-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - हे संगम उत्तम ते उत्तम बनण्याचे युग आहे, यातच तुम्हाला पतिता पासून पावन बनवून पावन दुनिया बनवायची आहे”

प्रश्न:-
अंतिम वेदनादायक दृश्य पाहण्याची ताकद कोणत्या आधारावर येईल?

उत्तर:-
शरीराचे भान नाहीसे करत जा. अंतिम दृश्य अतिशय भयंकर आहे. बाबा मुलांना मजबूत बनविण्यासाठी अशरीरी बनण्याचा इशारा देतात. जसे बाबा या शरीरापासून वेगळे होऊन तुम्हाला शिकवतात, तसे तुम्ही मुले देखील स्वतःला शरीरापासून वेगळे समजा, अशरीरी बनण्याचा अभ्यास करा. बुद्धीमध्ये राहिले पाहिजे की आता घरी जायचे आहे.

ओम शांती।
गोड-गोड रूहानी मुले शरीरासोबत आहेत. बाबा देखील आता शरीरासोबत आहेत. या घोड्यावर अथवा गाडीवर सवार आहेत आणि मुलांना काय शिकवत आहेत? जिवंतपणी मरणे कसे असते; बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही हे शिकवू शकणार नाही. बाबांचा परिचय सर्व मुलांना मिळाला आहे, ते ज्ञानसागर पतित-पावन आहेत. ज्ञानाद्वारेच तुम्ही पतिता पासून पावन बनता आणि पावन दुनिया देखील बनवायची आहे. या पतित दुनियेचा ड्रामा प्लॅन अनुसार विनाश होणार आहे. फक्त जे बाबांना ओळखतात आणि ब्राह्मण देखील बनतात, तेच परत पावन दुनियेमध्ये येऊन राज्य करतात. पवित्र बनण्यासाठी ब्राह्मण देखील जरूर बनायचे आहे. हे संगमयुग आहेच पुरुषोत्तम अर्थात उत्तम ते उत्तम पुरुष बनण्याचे युग. असे म्हणतील, उत्तम तर खूप साधू, संत, महात्मा, मंत्री, श्रीमंत, प्रेसिडेंट इत्यादी आहेत. परंतु नाही, ही तर कलियुगी भ्रष्टाचारी दुनिया जुनी दुनिया आहे, पतित दुनियेमध्ये पावन एक देखील नाही. आता तुम्ही संगमयुगी बनता. ते लोक पतित-पावनी पाण्याला समजतात. फक्त गंगा नाही, ज्या पण नद्या आहेत, जिथे कुठे पाणी बघतात, असे समजतात पाणी पावन करणारे आहे. हे बुद्धीमध्ये पक्के झाले आहे. कोणी कुठे, कोणी कुठे जातात. म्हणजे पाण्यामध्ये स्नान करण्यासाठी जातात. परंतु पाण्याने कोणी पावन होऊ शकत नाही. जर पाण्यामध्ये स्नान करण्याने पावन झाले असते मग तर या वेळी सारी सृष्टी पावन झाली असती. इतके सर्व पावन दुनियेमध्ये असले पाहिजेत. हा तर जुना रिवाज चालत आला आहे. सागरामध्ये देखील सर्व कचरा इत्यादी जाऊन पडतो, मग ते पावन कसे बनवेल? पावन तर बनायचे आहे आत्म्याला. यासाठी तर परम-पिता पाहिजे जे आत्म्यांना पावन बनवतील. तर तुम्हाला समजावून सांगायचे आहे - पावन असतातच सतयुगामध्ये, पतित असतात कलियुगामध्ये. आता तुम्ही संगमयुगावर आहात. पतिता पासून पावन होण्यासाठी पुरुषार्थ करत आहात. तुम्ही जाणता आपण शूद्र वर्णाचे होतो, आता ब्राह्मण वर्णाचे बनलो आहोत. शिवबाबा, प्रजापिता ब्रह्मा द्वारे बनवतात. आपण आहोत खरे-खरे मुख वंशावळी ब्राह्मण. ते आहेत कुख वंशावळी. प्रजापिता, तर सर्व प्रजा झाली ना. प्रजेचे पिता आहेत ब्रह्मा. ते तर ग्रेट ग्रेट ग्रँड फादर झाले. जरूर ते होते मग कुठे गेले? पुनर्जन्म तर घेतात ना. हे तर मुलांना सांगितले आहे, ब्रह्मा देखील पुनर्जन्म घेतात. ब्रह्मा आणि सरस्वती, माता आणि पिता. तेच परत महाराजा-महाराणी लक्ष्मी-नारायण बनतात, ज्यांना विष्णू म्हटले जाते. तेच पुन्हा ८४ जन्मानंतर येऊन ब्रह्मा-सरस्वती बनतात. हे रहस्य तर समजावून सांगितले आहे. म्हणतात देखील जगदंबा तर साऱ्या जगताची माता झाली. लौकिक माता तर प्रत्येकाची आपल्या-आपल्या घरात बसली आहे. परंतु जगत अंबेला कोणी जाणतही नाहीत. असेच अंधश्रद्धेने म्हणतात. कोणालाच जाणत नाहीत. ज्यांची पूजा करतात त्यांच्या ऑक्युपेशनला (कार्याला) जाणत नाहीत. आता तुम्ही मुले जाणता रचयिता आहेत उच्च ते उच्च. हे उलटे झाड आहे, याचे बीज रूप वरती आहे. बाबांना वरून खाली यावे लागते, तुम्हाला पावन बनविण्यासाठी. तुम्ही मुले जाणता बाबा आलेले आहेत आपल्याला या सृष्टीच्या आदि, मध्य, अंताचे ज्ञान देऊन मग त्या नवीन सृष्टीचे चक्रवर्ती राजा-राणी बनवितात. या चक्राच्या रहस्याला दुनियेमध्ये तुमच्या शिवाय आणखी कोणीही जाणत नाहीत. बाबा म्हणतात - पुन्हा ५००० वर्षानंतर येऊन तुम्हाला ऐकवणार. हा ड्रामा पूर्वनियोजित आहे. ड्रामाच्या क्रियेटर, डायरेक्टर, मुख्य ॲक्टर्स आणि ड्रामाच्या आदि-मध्य-अंताला जाणत नसतील तर त्यांना मूर्ख म्हणणार ना. बाबा म्हणतात ५००० वर्षांपूर्वी देखील मी तुम्हाला समजावून सांगितले होते. तुम्हाला स्वतःचा परिचय दिला होता. जसा आता देत आहे. तुम्हाला पवित्र देखील बनवले होते, जसे आता बनवत आहे. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. तेच सर्वशक्तिमान पतित-पावन आहेत. गायन देखील आहे - ‘अंतकाल जो फलाना सिमरे…’ वल वल अर्थात सारखे-सारखे त्याच योनीमध्ये जातील. आता या वेळेस तुम्ही जन्म तर घेता परंतु डुक्कर, कोंबडी, कुत्रा, मांजर बनत नाहीत.

आता बेहदचे बाबा आलेले आहेत. असे म्हणतात मी तुम्हा सर्व आत्म्यांचा पिता आहे. हे सर्वजण काम चितेवर बसून काळे झाले आहेत, यांना मग ज्ञान चितेवर चढवायचे आहे. तुम्ही आता ज्ञान चितेवर चढले आहात. ज्ञान चितेवर चढून परत विकारांमध्ये जाऊ शकत नाही. प्रतिज्ञा करता - ‘आम्ही पवित्र राहणार’. बाबा काही ती राखी बांधून घेत नाहीत. हा तर भक्ती मार्गाचा रिवाज चालत आलेला आहे. वास्तविक ही आहे या वेळची गोष्ट. तुम्ही समजता पवित्र बनल्याशिवाय पावन दुनियेचे मालिक कसे बनणार? तरी देखील पक्के करून घेण्यासाठी मुलांकडून प्रतिज्ञा करून घेतली जाते. कुणी रक्ताने लिहून देतात, कोणी कसे लिहितात. ‘बाबा, तुम्ही आले आहात, आम्ही तुमच्याकडून जरूर वारसा घेणार’. निराकार साकारमध्ये येतात ना. जसे बाबा परमधाम मधून उतरतात, तसे तुम्ही आत्मे देखील उतरता. वरून खाली येता पार्ट बजावण्यासाठी. हे तुम्ही समजता हा सुख आणि दुःखाचा खेळ आहे. अर्धा कल्प सुख, अर्धाकल्प दुःख आहे. बाबा समजावून सांगतात ३/४ पेक्षा देखील जास्त तुम्ही सुख भोगता. अर्ध्या कल्पा नंतर देखील तुम्ही श्रीमंत होता. किती मोठी मंदिरे इत्यादी बनवता. दु:ख तर नंतर येते, जेव्हा भक्ती एकदम तमोप्रधान बनते. बाबांनी समजावून सांगितले आहे तुम्ही सर्वात आधी अव्यभिचारी भक्त होता, फक्त एकाचीच भक्ती करत होता. जे बाबा तुम्हाला देवता बनवतात, सुखधाममध्ये घेऊन जातात, त्यांचीच तुम्ही पूजा करत होता आणि नंतर व्यभिचारी भक्ती सुरु होते. आधी एकाचीच पूजा आणि नंतर देवतांची पूजा करत होता. आता तर पंचमहाभूतांनी बनलेल्या शरीरांची पूजा करता. चैतन्यची देखील आणि जडची देखील पूजा करता. पाच तत्वांनी बनलेल्या शरीराला देवतांपेक्षा देखील उच्च समजता. देवतांना तर फक्त ब्राह्मण हात लावतात. तुमचे तर अनेकानेक गुरु लोक आहेत. हे बाबा बसून सांगतात. हे दादा (ब्रह्मा बाबा) देखील म्हणतात - ‘मी देखील सर्व काही केले आहे. विविध हठयोग इत्यादी, कान, नाक मोडणे इत्यादी सर्व काही केले. सरते शेवटी सर्वकाही सोडून द्यावे लागले. तो धंदा करणार की हा धंदा करणार? जांभया येत असत, वैताग यायचा. प्राणायाम इत्यादी शिकताना खूप त्रास होत असे. अर्धाकल्प भक्ती मार्गामध्ये होतो, आता माहिती झाली आहे. बाबा एकदम ॲक्युरेट सांगतात’. ते म्हणतात - भक्ती परंपरेने चालत येते. आता सतयुगामध्ये भक्ती कुठून आली. मनुष्य काहीच समजत नाहीत. मंद बुद्धीचे आहेत ना. सतयुगामध्ये तर असे म्हणणार नाही. बाबा म्हणतात मी प्रत्येक ५००० वर्षानंतर येतो. शरीर देखील त्यांचे घेतो जे स्वतःच्या जन्मांना जाणत नाहीत. हेच नंबर वन जे सुंदर होते, हेच आता श्याम बनले आहेत. आत्मा भिन्न-भिन्न शरीर धारण करते. तर बाबा म्हणतात ज्यांच्यामध्ये मी प्रवेश करतो, त्यांच्यामध्ये आता बसलो आहे. काय शिकविण्यासाठी? जिवंतपणी मरणे. या दुनियेमधून तर मरायचे आहे ना. आता तुम्हाला पवित्र होऊन मरायचे आहे. माझा पार्टच आहे पावन बनविण्याचा. तुम्ही भारतवासी बोलावता - ‘हे पतित पावन’. आणखी कोणी असे म्हणत नाहीत - हे मुक्तिदाता, दुःखाच्या दुनियेतून सोडविण्यासाठी या. सर्वजण मुक्तिधाममध्ये जाण्यासाठीच मेहनत करतात. तुम्ही मुले मग पुरुषार्थ करता - सुखधामसाठी. ते आहे प्रवृत्तीमार्ग वाल्यांसाठी. तुम्ही जाणता आपण प्रवृत्ती मार्गवाले पवित्र होतो. मग अपवित्र बनलो. प्रवृत्तीमार्ग वाल्यांचे काम निवृत्ती मार्ग वाले करू शकत नाहीत. यज्ञ, तप, दान इत्यादी सर्व प्रवृत्ती मार्गवाले करतात. तुम्ही आता अनुभव करता की आम्ही सर्वांना जाणतो. शिवबाबा आम्हा सर्वांना घरबसल्या शिकवत आहेत. बेहदचे बाबा बेहदचे सुख देणारे आहेत. तुम्ही त्यांना खूप काळानंतर भेटता तर प्रेमाश्रू येतात. ‘बाबा’ म्हटल्यानेच रोमांच उभे राहतात - ‘ओ हो! बाबा आले आहेत आम्हा मुलांच्या सेवेसाठी’. बाबा आपल्याला या शिक्षणाने गुल-गुल (फूल) बनवून घेऊन जातात. या घाणेरड्या छी-छी दुनियेमधून आम्हाला आपल्या सोबत घेऊन जाणार. भक्ती मार्गामध्ये तुमची आत्मा म्हणत होती - ‘बाबा, तुम्ही याल तर आम्ही तुमच्यावर समर्पित होणार’. आम्ही तुमचेच बनणार, दुसऱ्या कोणाचे नाही. नंबरवार तर आहेतच. सर्वांचा आपला-आपला पार्ट आहे. कोणी तर बाबांवर खूप प्रेम करतात, जे स्वर्गाचा वारसा देतात. सतयुगामध्ये रडण्याचे नाव देखील नसते. इथे तर किती रडतात. जर स्वर्गामध्ये गेला तर मग रडायचे कशासाठी अजूनच ढोल वाजविले पाहिजेत. तिथे तर ढोल वाजवतात. आनंदाने शरीर सोडतात. या रिवाजाची सुरुवात देखील इथूनच होते. इथे तुम्ही म्हणाल, आम्हाला आमच्या घरी जायचे आहे. तिथे तर समजता पुनर्जन्म घ्यायचा आहे. तर बाबा सर्व गोष्टी समजावून सांगतात. भुंग्याचे उदाहरण देखील तुमचेच आहे. तुम्ही ब्राह्मणी आहात, विष्टेतील किड्यांना तुम्ही भू-भू करता. तुम्हाला तर बाबा म्हणतात - ‘या शरीराला देखील सोडून द्यायचे आहे. जिवंतपणी मरायचे आहे’. बाबा म्हणतात - ‘स्वतःला आत्मा समजा, आता आपल्याला परत जायचे आहे’. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे. देहाला विसरा. बाबा तर खूप गोड आहेत. असे म्हणतात, मी तुम्हा मुलांना विश्वाचा मालक बनविण्यासाठी आलो आहे. आता शांतिधाम आणि सुखधामाची आठवण करा. अल्फ आणि बे (बाबा आणि बादशाही). हे आहे दुःखधाम. शांतीधाम आम्हा आत्म्यांचे घर आहे. आपण पार्ट बजावला, आता आपल्याला घरी जायचे आहे. तिथे हे छी-छी शरीर असत नाही. आता तर हे अगदीच जडजडीभूत शरीर झाले आहे. आता आपल्याला बाबा सन्मुख बसून शिकवतात, इशाऱ्याने. मी देखील आत्मा आहे, तुम्ही देखील आत्मा आहात. मी शरीरापासून वेगळा होऊन तुम्हाला देखील तेच शिकवतो. तुम्ही देखील स्वतःला शरीरापासून वेगळे समजा. आता घरी जायचे आहे. इथे तर आता रहायचेच नाहीये. हे देखील जाणता आता विनाश होणार आहे. भारतामध्ये रक्ताच्या नद्या वाहतील. मग भारतामध्येच दुधाच्या देखील नद्या वाहतील. इथे सर्व धर्माचे एकत्र आहेत. सर्व आपसामध्ये लढून मरतील. हे अखेरच्या वेळचे मरण आहे. पाकिस्तानमध्ये काय-काय होत होते. खूप भयंकर सीन होता. कोणी बघितले तर बेशुद्ध होईल. आता बाबा तुम्हाला खंबीर बनवतात. शरीराचे भान देखील काढून टाकतात.

बाबांनी बघितले, मुले आठवणीमध्ये राहत नाहीत, खूप कमजोर आहेत त्यामुळे सेवा देखील वाढत नाही. सारखे-सारखे लिहितात - ‘बाबा, आठवण विसरायला होते, लक्ष लागत नाही. बाबा म्हणतात - ‘योग’ शब्द सोडून द्या. विश्वाची बादशाही देणाऱ्या बाबांना तुम्ही विसरता! आधी भक्तीमध्ये बुद्धी कुठे दुसरीकडे भटकत होती तर स्वतःला चिमटा काढत होता. बाबा म्हणतात - तुम्ही आत्मा अविनाशी आहात. फक्त तुम्ही पावन आणि पतित बनता. बाकी आत्मा काही छोटी-मोठी होत नाही. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आपणच आपल्याशी गोष्टी करा - ‘ओ हो! बाबा आले आहेत आमच्या सेवेसाठी. ते आम्हाला घरबसल्या शिकवत आहेत! बेहदचे बाबा बेहदचे सुख देणारे आहेत, त्यांना आपण आता भेटलो आहोत’. असे प्रेमाने ‘बाबा’ म्हणा आणि खुशीमध्ये प्रेमाश्रू यावेत. रोमांच उभे राहावेत.

२) आता परत घरी जायचे आहे त्यामुळे सर्वांमधून मोह काढून जिवंतपणी मरायचे आहे. या देहाला देखील विसरायचे आहे. यापासून वेगळे होण्याचा अभ्यास करायचा आहे.

वरदान:-
झालेल्या गोष्टींना किंवा वृत्तींना समाप्त करून संपूर्ण सफलता प्राप्त करणारी स्वच्छ आत्मा भव

सेवेमध्ये स्वच्छ बुद्धी, स्वच्छ वृत्ती आणि स्वच्छ कर्म सफलतेचा सहज आधार आहे. कोणत्याही सेवेचे कार्य जेव्हा आरंभ करता तर प्रथम चेक करा की बुद्धीमध्ये कोणत्याही आत्म्याच्या होऊन गेलेल्या गोष्टींची स्मृती तर नाही आहे. त्याच वृत्तीने, दृष्टीने त्यांना बघणे, त्यांच्यासोबत बोलणे… याने संपूर्ण सफलता मिळू शकत नाही; म्हणून झालेल्या गोष्टींना किंवा वृत्तींना समाप्त करून स्वच्छ आत्मा बना तेव्हाच संपूर्ण सफलता प्राप्त होईल.

बोधवाक्य:-
जे स्व परिवर्तन करतात - विजयाची माळ त्यांच्याच गळ्यामध्ये पडते.