16-04-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्हाला सतोप्रधान बनायचे असेल तर बाबांची प्रेमाने आठवण करा, पारसनाथ शिवबाबा तुम्हाला पारसपुरीचे मालक बनविण्यासाठी आले आहेत”

प्रश्न:-
तुम्ही मुले कोणत्या एका गोष्टीची धारणा केल्याने महिमा योग्य बनणार?

उत्तर:-
अतिशय निर्माण-चित्त बना. कोणत्याही गोष्टीचा अहंकार असता कामा नये. खूप गोड बनायचे आहे. अहंकार आला तर वैरी बनतात. उच्च किंवा नीच, पवित्रतेच्या आधारावर बनतात. जेव्हा पवित्र आहेत तर मान आहे, अपवित्र आहेत तर सर्वांच्या पायावर डोके टेकतात.

ओम शांती।
आत्मिक बाबा बसून मुलांना समजावून सांगत आहेत. बाबा देखील समजतात कि, मी या मुलांना समजावून सांगत आहे. हे देखील मुलांना समजावून सांगितले गेले आहे कि भक्ती मार्गामध्ये वेगवेगळ्या नावांनी अनेकानेक चित्रे बनवतात. जसे की नेपाळमध्ये पारसनाथला मानतात. त्यांचे खूप मोठे मंदिर आहे. परंतु तसे काहीच नाहीये. ४ दरवाजे आहेत, ४ मुर्त्या आहेत. चौथ्यामध्ये श्रीकृष्णाला ठेवले आहे; आता कदाचित काही बदल केले असतील. आता पारसनाथ तर जरूर शिवबाबांनाच म्हणणार. मनुष्यांना पारस बुद्धी देखील तेच बनवतात. तर सर्वप्रथम त्यांना हे समजावून सांगायचे आहे - ‘उच्च ते उच्च आहेत भगवान, नंतर आहे संपूर्ण दुनिया’. सूक्ष्मवतनची तर सृष्टीच नाहीये. नंतर असतात लक्ष्मी-नारायण किंवा विष्णू. वास्तविक विष्णूचे मंदिर हे देखील चुकीचे आहे. विष्णू चतुर्भुज, चार हात असणारा कोणी मनुष्य तर असत नाही. बाबा समजावून सांगतात की, हे लक्ष्मी-नारायण आहेत, ज्यांना एकत्र विष्णूच्या रूपामध्ये दाखविले आहे. लक्ष्मी-नारायण हे दोघेही वेगवेगळे आहेत. सूक्ष्मवतनमध्ये विष्णूला ४ भुजा दिल्या आहेत अर्थात दोघांना मिळून चतुर्भुज केले आहे, बाकी असे कोणी असत नाही. मंदिरामध्ये जे चतुर्भुज दाखवतात - ते आहेत सूक्ष्मवतनचे. चतुर्भुजला शंख, चक्र, गदा, पद्म इत्यादी देतात. परंतु असे काहीच नाहीये. चक्र देखील तुम्हा मुलांना आहे. नेपाळमध्ये क्षीरसागरामध्ये विष्णूचे मोठे चित्र दाखवतात. पूजेच्या दिवशी थोडे दूध घालतात. बाबा प्रत्येक गोष्ट चांगल्या रीतीने समजावून सांगत आहेत. असा विष्णूचा अर्थ कुणीही समजावून सांगू शकणार नाही. जाणतच नाहीत. हे तर भगवान स्वतः समजावून सांगतात. ‘भगवान’ म्हटले जाते शिवबाबांना. आहेत तर एकच परंतु भक्तीमार्ग वाल्यांनी अनेक नावे ठेवली आहेत. तुम्ही आता अनेक नावे घेणार नाही. भक्ती मार्गामध्ये खूप त्रास सहन करतात. तुम्ही देखील सहन केले आहे. आता जर तुम्ही मंदिर इत्यादी पहाल तर त्यावर समजावून सांगाल कि उच्च ते उच्च आहेत भगवान, सुप्रीम सोल, निराकार परमपिता परमात्मा. आत्मा शरीराद्वारे म्हणते - ‘ओ परमपिता’. त्यांची मग महिमा देखील आहे - ज्ञानाचा सागर, सुखाचा सागर. भक्ती मार्गामध्ये एकाची अनेक चित्रे आहेत. ज्ञानमार्गामध्ये तर ज्ञानाचे सागर एकच आहेत. तेच पतित-पावन, सर्वांचे सद्गती दाता आहेत. तुमच्या बुद्धीमध्ये संपूर्ण चक्र आहे. उच्च ते उच्च परमात्मा आहेत, त्यांच्यासाठीच गायन आहे सिमर-सिमर सुख पाओ अर्थात एका बाबांचीच आठवण करा किंवा स्मरण करत राहाल तर शरीराचे सर्व कलह-क्लेश निघून जातील, आणि मग जीवनमुक्ती पद प्राप्त करा. हि जीवन-मुक्ती आहे ना. बाबांकडून हा सुखाचा वारसा मिळतो. एकटे हे (ब्रह्मा बाबा) तर प्राप्त करणार नाहीत. जरूर राजधानी असणार ना. जणू बाबा राजधानी स्थापन करत आहेत. सतयुगामध्ये राजा, राणी, प्रजा सर्व असतात. तुम्ही ज्ञान प्राप्त करत आहात, तर मग जाऊन मोठ्या कुळामध्ये जन्म घेणार. खूप सुख मिळते. जेव्हा ती स्थापना पूर्ण होते तेव्हा छी-छी (पतित) आत्मे शिक्षा भोगून परत निघून जातात. आपापल्या सेक्शनमध्ये जाऊन थांबतील. इतके सर्व आत्मे येणार मग वृद्धी होत राहणार. हे बुद्धीमध्ये राहिले पाहिजे कि वरून कसे येतात. असे तर नाही दोन पानांऐवजी (आत्म्यां ऐवजी) १० पाने एकत्र आले पाहिजेत. नाही, नियमाप्रमाणे पाने निघतात (आत्मे येऊन देह धारण करतात). हे खूप मोठे झाड आहे. दाखवतात एका दिवसामध्ये लाखोंनी वृद्धी होते. पहिले तर हे समजावून सांगायचे आहे कि, उच्च ते उच्च आहेत भगवान, पतित-पावन, दुःख हर्ता सुख कर्ता देखील तेच आहेत. जे पण पार्टधारी दुःखी होतात, त्या सर्वांना येऊन सुख देतात. दुःख देणारा आहे - रावण. लोकांना हे माहीतच नाहीये कि बाबा आलेले आहेत जेणे करून येऊन समजून घेतील. बरेचजण तर समजून घेता-घेता मग थांबतात (बाहेर निघून जातात). जसे अंघोळ करता-करता पाय घसरतो तर पाणी आत घुसते. बाबा (ब्रह्मा बाबा) तर अनुभवी आहेत ना. हा तर विषय सागर (विकारी दुनिया) आहे. बाबा तुम्हाला क्षीर सागराकडे (निर्विकारी दुनियेमध्ये) घेऊन जातात. परंतु माया रुपी मगर चांगल्या-चांगल्या महारथींना देखील गिळून टाकते. जिवंतपणी बाबांच्या मांडीवरून उतरून रावणाच्या मांडीवर जाऊन बसतात म्हणजेच मरतात (पतित बनतात). तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे उच्च ते उच्च बाबा मग रचना रचतात. इतिहास-भूगोल काही सूक्ष्म वतनचा तर नाहीये. भले तुम्ही सूक्ष्मवतनमध्ये जाता, साक्षात्कार करता. तिथे चतुर्भुजला पाहता. चित्रांमध्ये आहे ना. तर ते बुद्धीमध्ये बसले आहे त्यामुळे साक्षात्कार जरूर होणार. परंतु अशी कोणती गोष्ट नाहीये. ही भक्ती मार्गाची चित्रे आहेत. अजून पर्यंत भक्तीमार्ग चालू आहे. भक्तीमार्ग पूर्ण होईल तेव्हा मग हि चित्रे राहणार नाहीत. स्वर्गामध्ये या सर्व गोष्टी विसरल्या जाणार. आता बुद्धीमध्ये आहे कि हे लक्ष्मी-नारायण चतुर्भुजची दोन रूपे आहेत. लक्ष्मी-नारायणाची पूजा म्हणजेच चतुर्भुजची पूजा. लक्ष्मी-नारायणाचे मंदिर किंवा चतुर्भुजचे मंदिर, गोष्ट एकच आहे. या दोन्हीचे ज्ञान इतर कोणालाच नाहीये. तुम्ही जाणता या लक्ष्मी-नारायणाचे राज्य आहे. विष्णूचे राज्य तर म्हणणार नाही. हे पालना देखील करतात. संपूर्ण विश्वाचे मालक आहेत तर विश्वाची पालना करतात.

शिव भगवानुवाच - मी तुम्हाला राजयोग शिकवतो. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा तर या योग अग्नीद्वारे विकर्म विनाश होतील. डिटेलमध्ये समजावून सांगावे लागेल. बोला, हि देखील गीता आहे. गीतेमध्ये फक्त श्रीकृष्णाचे नाव घातले आहे. हे तर चुकीचे आहे, सर्वांची निंदा केली आहे म्हणूनच भारत तमोप्रधान बनला आहे. आता आहे कलियुगी दुनियेचा अंत, याला म्हटले जाते तमोप्रधान आयरन एज. जे सतोप्रधान होते, त्यांनीच ८४ जन्म घेतले आहेत. जन्म-मरणामध्ये तर जरूर यायचे आहे. जेव्हा पूर्ण ८४ जन्म घेतात तेव्हा बाबांना (ब्रह्मा बाबांना) पुन्हा पहिल्या नंबरमध्ये यावे लागते . एकाचीच गोष्ट नाहीये. यांची तर संपूर्ण राजधानी होती ना, पुन्हा जरूर असायला हवी. बाबा सर्वांसाठी म्हणतात स्वतःला आत्मा समजा, बाबांची आठवण करा तर योग अग्नीने पापे भस्म होतील. काम विकाराच्या चितेवर बसून सर्वजण सावळे (पतित) झाले आहेत. आता सावळ्या पासून गोरे कसे बनणार? ते तर बाबाच शिकवतात. श्रीकृष्णाची आत्मा जरूर भिन्न-भिन्न नाव-रूप घेऊन येत असणार. जे लक्ष्मी-नारायण होते, त्यांनाच ८४ जन्मानंतर पुन्हा तसे बनायचे आहे. तर त्यांच्या अनेक जन्मांच्या अंतामध्ये बाबा येऊन प्रवेश करतात. मग ते सतोप्रधान विश्वाचे मालक बनतात. तुमच्यामध्ये पारसनाथाला पूजतात, शिवालाही पूजतात. जरूर त्यांना शिवानेच असे पारसनाथ बनवले असणार. टीचर तर पाहिजे ना. ते आहेत ज्ञानाचे सागर. आता सतोप्रधान पारसनाथ बनायचे आहे, तर बाबांची अतिशय प्रेमाने आठवण करा. तेच सर्वांचे दुःख दूर करणारे आहेत. बाबा तर सुख देणारे आहेत. हे आहे काट्याचे जंगल. बाबा आले आहेत फुलांचा बगिचा बनविण्यासाठी. बाबा आपला परिचय देतात - ‘मी या साधारण वृद्ध तनामध्ये प्रवेश करतो, जे आपल्या जन्मांना जाणत नाहीत’. भगवानुवाच - मी तुम्हाला राजयोग शिकवतो. तर हि ईश्वरीय युनिव्हर्सिटी झाली. एम ऑब्जेक्ट आहेच राजा-राणी बनण्याचे तर जरूर प्रजा देखील बनणार. मनुष्य योग-योग असे खूप म्हणतात. निवृत्तीमार्गवाले तर अनेक हठयोग करतात. ते राजयोग शिकवू शकणार नाहीत. बाबांचा आहे एकाच प्रकारचा योग. फक्त म्हणतात - ‘स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण करा’. ८४ जन्म पूर्ण झाले, आता परत घरी जायचे आहे. आता पावन बनायचे आहे. एका बाबांची आठवण करा, बाकी सर्वकाही सोडा. भक्ती मार्गामध्ये तुम्ही गात होता कि, ‘तुम्ही याल तेव्हा आम्ही एकाशी संबंध जोडणार’. तर जरूर त्यांच्याकडून वारसा मिळाला होता ना. अर्धा कल्प आहे स्वर्ग, नंतर आहे नरक. रावण राज्य सुरु होते. अशारीतीने समजावून सांगायचे आहे. स्वतःला देह समजू नका. आत्मा अविनाशी आहे. आत्म्यामध्येच संपूर्ण पार्ट नोंदलेला आहे, जो तुम्ही बजावता. आता शिवबाबांची आठवण कराल तर बेडा पार होऊन जाईल. संन्यासी पवित्र बनतात तर त्यांचा किती मान असतो. सर्वजण त्यांच्या समोर नतमस्तक होतात. पवित्रतेच्या गोष्टीवरच उच्च आणि नीच बनतात. देवता आहेत एकदम उच्च. संन्यासी मग एक जन्म पवित्र बनतात, नंतर दुसरा जन्म तर विकारातूनच घेतात. देवता असतातच सतयुगामध्ये. आता तुम्ही शिकता आणि मग शिकवता देखील. काहीजण तर शिकतात परंतु दुसऱ्यांना समजावून सांगू शकत नाहीत कारण धारणा होत नाही. बाबा म्हणणार - तुझ्या नशिबातच नाहीये तर बाबा काय करणार. बाबा जर सर्वांना आशीर्वाद (कृपा) देत बसतील तर सगळेच स्कॉलरशिप घेतील. ते तर भक्ती मार्गामध्ये कृपा करतात. संन्यासी सुद्धा असे करतात. त्यांच्याकडे जाऊन म्हणतील - ‘मला मुलगा होऊ दे, आशीर्वाद द्या’. ठीक आहे, तुम्हाला मुलगा होईल. मुलगी झाली तर म्हणतील - नशीब. मुलगा झाला तर वाह-वाह करून पाया पडत राहतील. अच्छा, आणि मग जर त्याचा मृत्यू झाला तर रडून-उर बडवून, गुरूला शिव्या देऊ लागतात. गुरु म्हणतील - ‘ही भावी होती’. मग म्हणतील, ‘अगोदर का सांगितले नाही’. जेव्हा कोणी मेलेला जिवंत होतो तर ही देखील भावी आहे असेच म्हणणार. हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. आत्मा कुठे लपून जाते. डॉक्टरांना देखील असे वाटते हा मेलेला आहे आणि पुन्हा जिवंत होतो. चितेवर ठेवलेले देखील उठून बसतात. जेव्हा एखादा कोणी कोणाला मानायला लागला तर अनेक त्यांच्या मागे लागतात.

तुम्हा मुलांना तर खूप निर्माणचित्त होऊन चालायचे आहे. जरा देखील अहंकार नसावा. आजकाल कोणाला थोडा जरी अहंकार दाखवला तर वैर वाढते. खूप गोड होऊन चालायचे आहे. नेपाळमध्ये देखील आवाज निघेल. अजून तुम्हा मुलांची महिमा होण्याची वेळ आलेली नाही. नाहीतर त्यांचे आखाडे (मठ-आश्रम) बंद पडतील. बड्या असामी जागृत होऊन सभेमध्ये बसून ऐकवतील, तर त्यांच्या मागे पुष्कळजण येतील. कोणताही एम.पी. बसून तुमची महिमा करेल कि भारताचा राजयोग या ब्रह्माकुमार-कुमारींशिवाय कोणीही शिकवू शकत नाही; अशी कोणतीही व्यक्ती अद्याप समोर आलेली नाहीये. मुलांना खूप हुशार, चमत्कारी बनायचे आहे. अमुक एक भाषण कसे करतात, थोडे शिकले पाहिजे. सेवा करण्याची युक्ती बाबा शिकवतात. बाबांनी जी मुरली चालवली, ॲक्युरेट कल्प-कल्प अशीच चालवली असणार. ड्रामामध्ये नोंद आहे. प्रश्न उत्पन्न होऊ शकत नाही - असे का? ड्रामा अनुसार जे समजावून सांगायचे होते ते सांगितले. समजावून सांगत राहतो. बाकी लोकं तर अनेक प्रश्न विचारतील. बोला, पहिले मनमनाभव व्हा. बाबांना जाणल्याने तुम्ही सर्व काही जाणाल. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) सेवा करण्याची युक्ती शिकून खूप-खूप हुशार आणि चमत्कारी बनायचे आहे. धारणा करून नंतर दुसऱ्यांची करवून घ्यायची आहे. अभ्यासाने आपले नशीब आपणच घडवायचे आहे.

२) कोणत्याही गोष्टीमध्ये जरा देखील अहंकार दाखवायचा नाही, अतिशय गोड आणि निर्माणचित्त बनायचे आहे. मायारूपी मगरी पासून स्वतःचा सांभाळ करायचा आहे.

वरदान:-
झालेल्या गोष्टींना श्रेष्ठ विधीने समाप्त करून यादगार स्वरूप बनविणारे पास विद ऑनर भव

‘पास्ट इज पास्ट’ तर होणारच आहे. वेळ आणि दृश्य सर्व पास होणार (निघून जाणार) परंतु पास विद ऑनर बनून प्रत्येक संकल्प किंवा वेळेला पास करा (पार करा) अर्थात झालेल्या गोष्टीला अशा श्रेष्ठ विधीने समाप्त करा, जे होऊन गेले आहे त्याची आठवण करताच हृदयातून ‘वाह, वाह’चे बोल निघावेत. इतर आत्मे तुमच्या झालेल्या गोष्टीतून धडा घेऊ देत. तुमची होऊन गेलेली गोष्ट, यादगार स्वरूप बनावी तर तुमचे कीर्तन अर्थात कीर्ती गात राहतील.

बोधवाक्य:-
स्व कल्याणाचा श्रेष्ठ प्लॅन बनवा तेव्हा विश्व सेवेमध्ये सकाश मिळेल.