17-04-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - हे वंडरफुल शिक्षण बेहदचे बाबा शिकवतात, बाबा आणि त्यांच्या या शिक्षणा विषयी कोणतीही शंका येता कामा नये, सर्वप्रथम हा निश्चय पाहिजे की आपल्याला शिकविणारे कोण’’

प्रश्न:-
तुम्हा मुलांना निरंतर आठवणीच्या यात्रेमध्ये राहण्याचे श्रीमत का मिळाले आहे?

उत्तर:-
कारण माया दुश्मन आता देखील तुमच्या मागे आहे, ज्याने तुमची अधोगती केली. आता तो तुमची पाठ सोडणार नाही त्यामुळे कोणतीही चूक करायची नाही. भले तुम्ही संगमयुगावर आहात परंतु अर्धा कल्प त्याचे होऊन राहिले आहात म्हणून लवकर सोडणार नाही. आठवण विसरायला झाली आणि मायेने विकर्म करायला लावले; त्यामुळे सावध रहायचे आहे. आसुरी मतावर चालायचे नाही.

ओम शांती।
आता मुले देखील आहेत, बाबा देखील आहेत. बाबा अनेक मुलांना म्हणतात ‘हे बेटा’ सर्व मुले मग म्हणतील ‘ओ बाबा’. मुले आहेत पुष्कळ. तुम्ही समजता हे ज्ञान आम्हा आत्म्यांसाठीच आहे. एका पित्याची किती खूप सारी मुले आहेत. मुले जाणतात, बाबा शिकविण्यासाठी आले आहेत. ते सर्वात पहिले बाबा आहेत, मग टीचर आहेत, आणि नंतर गुरु आहेत. आता बाबा तर बाबाच आहेत. मग पावन बनविण्यासाठी आठवणीची यात्रा शिकवतात. आणि हे देखील मुले समजतात की, हे शिक्षण वंडरफुल आहे. ड्रामाच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य बाबांशिवाय इतर कोणीही सांगू शकणार नाही, म्हणून त्यांना बेहदचे बाबा म्हटले जाते. मुलांना एवढा निश्चय तर नक्कीच असतो, यामध्ये संशय उत्पन्न होऊ शकत नाही. इतके बेहदचे शिक्षण, बेहदच्या बाबांशिवाय तर कोणी शिकवू शकणार नाही. बोलावतात देखील की ‘बाबा या, आम्हाला पावन दुनियेमध्ये घेऊन चला’. कारण ही पतित दुनिया आहे. पावन दुनियेमध्ये बाबाच घेऊन जातात. तिथे (सतयुगामध्ये) असे थोडेच म्हणतील, ‘बाबा या, पावन दुनियेमध्ये घेऊन चला’. मुले जाणतात आम्हा आत्म्यांचे ते पिता आहेत. तर देहाचे भान तुटते. आत्मा म्हणते ते आमचे बाबा आहेत. आता हा तर निश्चय असला पाहिजे कि, खरोखर बाबांशिवाय कोणी इतके ज्ञान देऊ शकत नाही. पहिली तर हि निश्चय बुद्धी पाहिजे. निश्चय देखील आत्म्याला बुद्धीमध्ये होतो. आत्म्याला हे ज्ञान मिळते - हे आमचे बाबा आहेत. हा अतिशय पक्का निश्चय मुलांना असला पाहिजे. मुखाद्वारे काहीच बोलायचे नाहीये. मी आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेते. आत्म्यामध्येच सर्व संस्कार आहेत.

आता तुम्ही जाणता - बाबा आले आहेत, आपल्याला असेकाही शिकवतात, कर्म शिकवतात कि आम्ही आता या दुनियेमध्ये कधी येणार नाही. ते मनुष्य तर समजतात या दुनियेमध्ये यायचे आहे. तुम्ही मात्र असे समजत नाही. तुम्ही ही अमर कथा ऐकून अमरपुरीमध्ये जाता. अमरपुरी अर्थात जिथे सदैव अमर असतात. सतयुग-त्रेता आहे अमरपुरी. मुलांना किती आनंद झाला पाहिजे. हे शिक्षण बाबांशिवाय इतर कोणीही शिकवू शकत नाही. बाबा आम्हाला शिकवतात; इतर जे टीचर्स आहेत ते सामान्य मनुष्य आहेत. इथे तुम्ही ज्यांना पतित-पावन, दुःख हर्ता, सुख कर्ता म्हणता, ते बाबा आता सन्मुख शिकवत आहेत, सन्मुख असल्याशिवाय राजयोगाचे शिक्षण कसे शिकवणार? बाबा म्हणतात - ‘तुम्हा गोड मुलांना शिकविण्यासाठी इथे येतो. शिकविण्यासाठी यांच्यामध्ये प्रवेश करतो’. खरोखर, भगवानुवाच देखील आहे, तर जरूर त्यांना शरीर पाहिजे. ना केवळ मुख परंतु संपूर्ण शरीर पाहिजे. ते स्वतः म्हणतात - ‘गोड-गोड रूहानी मुलांनो, मी कल्प-कल्प पुरुषोत्तम संगमयुगे साधारण तनामध्ये येतो’. खूप गरीब देखील नाही, तर खूप श्रीमंत देखील नाही, साधारण आहेत. तुम्हा मुलांना हा तर निश्चय असला पाहिजे कि ते आमचे बाबा आहेत, आम्ही आत्मा आहोत. आम्हा आत्म्यांचे बाबा आहेत. संपूर्ण दुनियेतील जे पण मनुष्यमात्रांचे आत्मे आहेत त्या सर्वांचे ते पिता आहेत म्हणून त्यांना बेहदचे बाबा म्हटले जाते. शिवजयंती साजरी करतात, त्या विषयी देखील कोणाला माहिती नाहीये. कोणालाही विचारा शिवजयंती केव्हा पासून साजरी केली जात आहे? तर म्हणतील - परंपरेने. ते देखील केव्हा पासून? कोणती तारीख तर पाहिजे ना. ड्रामा तर अनादि आहे. परंतु ड्रामामध्ये जी ॲक्टिव्हिटी (प्रत्यक्ष कृती) होते, त्याची तिथी-तारीख तर पाहिजे ना. ती तर कोणीच जाणत नाहीत. आमचे शिवबाबा येतात, त्या प्रेमाने जयंती साजरी करत नाहीत. नेहरू जयंती त्या प्रेमाने साजरी करतील. अश्रू देखील येतील. शिव जयंती विषयी कोणालाही माहिती नाहीये. आता तुम्ही मुले अनुभवी आहात. अनेक मनुष्य आहेत, ज्यांना काहीच माहिती नाहीये. किती यात्रा भरतात. तिथे जे जातात ते सांगू शकतात की खरे सत्य काय आहे. ज्याप्रमाणे बाबांनी (ब्रह्मा बाबांनी) अमरनाथचे देखील उदाहरण सांगितले होते, तिथे जाऊन पाहिले कि खरोखर काय होते. बाकीचे तर जे इतरांकडून ऐकतात, ते सांगतात. कोणी म्हटले बर्फाचे लिंग असते, तर म्हणतील सत. आता तुम्हा मुलांना अनुभव मिळाला आहे - राइट काय आहे, रॉंग काय आहे. आतापर्यंत जे काही ऐकत-वाचत आलो आहोत ते सर्व होते असत्य. गायन देखील आहे ना - झूठी काया… हा आहे झूठ खंड, तो आहे सच खंड. सतयुग, त्रेता, द्वापर पास्ट झाले, आता कलियुग सुरू आहे. हे देखील खूप थोडे जाणतात. तुमच्या बुद्धीमध्ये सर्व विचार असतात. बाबांकडे संपूर्ण नॉलेज आहे, त्यांना म्हणतात ज्ञानाचे सागर. त्यांच्या जवळ जे ज्ञान आहे ते या शरीराद्वारे देऊन आम्हाला आप समान बनवत आहेत. ज्याप्रमाणे टीचर देखील आप समान बनवतात. तर बेहदचे बाबा देखील प्रयत्न करून आप समान बनवितात. लौकिक पिता आपसमान बनवत नाहीत. तुम्ही आता आले आहात बेहदच्या पित्या जवळ. ते जाणतात, मला मुलांना आप समान बनवायचे आहे. ज्याप्रमाणे टीचर आप समान बनवतील, परंतु नंबरवार असतील. हे पिता देखील असे म्हणतात, नंबरवार बनणार. मी जे शिकवतो ते आहे अविनाशी शिक्षण. जे जितके शिकतील ते व्यर्थ जाणार नाही. पुढे चालून स्वतः म्हणतील - ‘मी ४ वर्षांपूर्वी, ८ वर्षांपूर्वी कोणाकडून तरी ज्ञान ऐकले होते, आता पुन्हा आलो आहे’. मग कोणी चिकटून राहतात. शमा तर आहे मग त्यावर काही परवाने तर एकदम फिदा होतात. कोणी फेरी मारून निघून जातात. सुरुवातीला शमेवर खूप परवाने आशिक झाले. ड्रामा प्लॅन अनुसार भट्टी बनणार होती. कल्प-कल्प असे होत आले आहे. जे काही पास्ट झाले, कल्पापूर्वी देखील असे झाले होते. पुढे तरी देखील तेच होणार. बाकी हा पक्का निश्चय ठेवा की आपण आत्मा आहोत. बाबा आम्हाला शिकवतात. या निश्चयामध्ये पक्के रहा, विसरू नका. असा कोणता मनुष्य नसेल जो पित्याला पिता समजणार नाही. भले सोडचिठ्ठी देईल तरी देखील समजेल की मी पित्याला सोडचिठ्ठी दिली. हे तर बेहदचे बाबा आहेत, त्यांना तर आम्ही कधीही सोडणार नाही. अंतापर्यंत सोबत राहणार. हे बाबा तर सर्वांची सद्गती करणारे आहेत. ५ हजार वर्षानंतर येतात. हे देखील समजतात, सतयुगामध्ये खूप थोडे मनुष्य असतात. बाकी सर्व शांतीधाम मध्ये राहतात. हे नॉलेज देखील बाबाच ऐकवतात, इतर कोणीही ऐकवू शकणार नाही. कोणाच्या बुद्धीमध्ये येऊ देखील शकणार नाही. तुम्हा आत्म्यांचे ते पिता आहेत. ते चैतन्य बीज रूप आहेत. कोणते नॉलेज देतील? सृष्टी रुपी झाडाचे. रचता जरूर रचनेचे नॉलेज देईल. तुम्हाला माहीत होते का की सतयुग केव्हा होते, मग कुठे गेले!

आता तुम्ही समोर बसले आहात, बाबा बोलत आहेत. तुम्ही पक्का निश्चय करता - हे आम्हा सर्व आत्म्यांचे पिता आहेत, आपल्याला शिकवत आहेत. हे काही जिस्मानी टीचर नाहीत. या शरीरामध्ये शिकविणारे ते निराकार शिवबाबा विराजमान आहेत. ते निराकार असताना देखील ज्ञानाचे सागर आहेत. मनुष्य तर म्हणतात त्यांचा कोणता आकार नाही. महिमा देखील गातात - ज्ञानाचा सागर, सुखाचा सागर… परंतु समजत नाहीत. ड्रामा अनुसार खूप दूर गेले आहेत. बाबा खूप जवळ घेऊन येतात. ही तर ५ हजार वर्षांची गोष्ट आहे. तुम्हाला समजते आहे कि दर ५ हजार वर्षानंतर आम्हाला शिकविण्यासाठी येतात. हे ज्ञान इतर कोणाकडूनही मिळू शकणार नाही. हे नॉलेज आहेच नवीन दुनियेसाठी. कोणी मनुष्य देऊ शकणार नाही कारण तमोप्रधान आहेत. ते कोणाला सतोप्रधान बनवू शकत नाहीत. ते तर तमोप्रधान बनतच जातात.

तुम्ही आता जाणता - बाबा आम्हाला यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) प्रवेश करून सांगत आहेत आणि मग बाबा म्हणतात - ‘मुलांनो, चूक करू नका. दुश्मन आता देखील तुमच्या मागे आहे, ज्याने तुमची अधोगती केली आहे. तो आता तुमचा पिच्छा सोडणार नाही. भले तुम्ही संगमयुगावर आहात परंतु अर्धा कल्प तुम्ही त्याचे होऊन राहिले आहात तर तो लवकर सोडणार नाही. सावध राहिला नाहीत, आठवण केली नाही तर मग आणखीनच विकर्म करायला लावेल. मग काही ना काही थप्पड बसत राहील. आता तर पहा मनुष्याने आपणच आपल्याला थप्पड मारले आहे. काय-काय म्हणतात! शिव-शंकर एकच आहेत असे म्हणतात. त्यांचे ॲक्युपेशन काय आहे, त्यांचे काय आहे? किती फरक आहे. शिव तर आहेत उच्च ते उच्च भगवान. शंकर आहे देवता. मग शिव-शंकर एकच कसे म्हणतात! दोघांचा पार्टच वेग-वेगळा आहे. इथे देखील अनेकांची अशी काही नावे आहेत - जसे राधेकृष्ण, लक्ष्मीनारायण, शिवशंकर… दोन्ही नावे स्वतःला ठेवली आहेत. तर मुले समजतात या वेळपर्यंत जे बाबांनी समजावून सांगितले आहे ते मग पुन्हा रिपीट होणार. बाकी थोडे दिवस आहेत. बाबा थोडेच बसून राहणार. मुले नंबरवार शिकून पूर्ण कर्मातीत बनतील. ड्रामा अनुसार माळा देखील बनेल. कोणती माळा? सर्व आत्म्यांची माळा बनेल, तेव्हा मग परत जातील. नंबरवन माळा तर तुमची आहे. शिवबाबांची माळा तर खूप मोठी आहे. तिथून (परमधाम मधून) नंबरवार येतील पार्ट बजावण्यासाठी. तुम्ही सर्व बाबा-बाबा म्हणता. सर्व एका माळेचे मणी आहात. सर्वांनाच विष्णूच्या माळेचे मणी म्हणणार नाही. हे बाबा बसून शिकवत आहेत. सूर्यवंशी बनायचेच आहे. सूर्यवंशी-चंद्रवंशी जे होऊन गेले ते पुन्हा बनतील. ते पद मिळतेच शिक्षणाद्वारे. बाबांच्या या शिक्षणा शिवाय हे पद मिळू शकत नाही. चित्रे देखील आहेत, परंतु कोणीही अशी ॲक्टिव्हिटी (असे कार्य) करत नाहीत की जेणेकरून आपण असे बनू शकू. कथा देखील सत्यनारायणाची ऐकतात. गरुड पुराणामध्ये सर्व अशाच गोष्टी आहेत ज्या लोकांना ऐकवल्या जातात. बाबा म्हणतात - ‘ही विषय वैतरणी नदी रौरव नरक आहे’. खास करून भारताला म्हणणार. बृहस्पतीची दशा देखील भारतावरच बसलेली आहे. वृक्ष-पती, शिकवतात देखील भारतवासियांनाच. बेहदचे बाबा बसून बेहदच्या गोष्टी समजावून सांगतात. दशा बसते. राहूची देखील दशा आहे म्हणूनच म्हणतात ‘दे दान तो छूटे ग्रहण…’ बाबा देखील म्हणतात - या कलियुग अंतामध्ये सर्वांवर राहूची दशा बसली आहे. आता मी ‘वृक्ष-पती’ आलो आहे भारतावर बृहस्पतीची दशा बसविण्यासाठी. सतयुगामध्ये भारतावर बृहस्पतीची दशा होती. आता आहे राहूची दशा. हि बेहदची गोष्ट आहे. हे कोणत्या शास्त्र इत्यादींमध्ये नाहीये. हे मासिक अंक इत्यादी देखील त्यांनाच समजतील ज्यांना आधी काही ना काही समजले असेल. मासिक वाचल्याने ते मग आणखी समजून घेण्यासाठी धावत येतील. बाकीच्यांना तर काहीही समजणार नाही. जे थोडे शिकून मग सोडून देतात त्यांच्यामध्ये तर मग थोडेसे जरी ज्ञानघृत टाकले तरीही ते जागे होतात. ज्ञानाला ‘घृत’ देखील म्हटले जाते. विझलेल्या दिव्यामध्ये बाबा येऊन ज्ञान-घृत टाकत आहेत. म्हणतात - ‘मुलांनो, मायेची वादळे येतील, दिव्याला विझवतील’. शमेवर परवाने कोणी जळून मरतात तर कोणी मग फेरी मारून निघून जातात. तीच गोष्ट आता प्रॅक्टिकलमध्ये सुरू आहे. सर्व परवाने नंबरवार आहेत. अगदी सुरुवातीला एकदम घर-दार सोडून आले, परवाने बनले. जशी काही एकदम लॉटरी मिळाली. जे काही पास्ट झाले तुम्ही पुन्हा तसेच करणार. भले काही निघून गेले, परंतु असे समजू नका की ते स्वर्गात येणार नाहीत; परवाने बनले आशिक झाले मग मायेने पराजित केले, तर मग पद देखील कमी दर्जाचे प्राप्त करतील. नंबरवार तर असतातच. हे तर इतर सत्संगामध्ये कोणाच्याही बुद्धीमध्ये नसेल. तुमच्या बुद्धीमध्ये आहे. बाबांद्वारे नवीन दुनियेसाठी आपण सर्व नंबरवार आपल्या पुरुषार्थानुसार शिकत आहोत. आम्ही बेहदच्या बाबांच्या सन्मुख बसलो आहोत. हे देखील जाणता ती आत्मा दिसून येत नाही. ती तर अव्यक्त गोष्ट आहे. त्याला दिव्यदृष्टी द्वारेच पाहिले जाते. आपण आत्मा देखील छोटा बिंदू आहोत. परंतु देह-अभिमान सोडून स्वतःला आत्मा समजणे - हे आहे सर्वोच्च शिक्षण. त्या (दुनियेतील) शिक्षणामध्ये देखील जे विषय डिफिकल्ट असतात त्यामध्ये फेल होतात. हा विषय तर खूप सोपा आहे, परंतु बऱ्याच जणांना डिफिकल्ट वाटतो.

आता तुम्ही समजता शिवबाबा, समोर बसले आहेत. तुम्ही देखील निराकार आत्मे आहात परंतु शरीरासोबत आहात. या सर्व गोष्टी बेहदचे बाबाच ऐकवतात, इतर कोणीही ऐकवू शकणार नाही. मग काय कराल? त्यांना थँक्स द्याल. नाही. बाबा म्हणतात - हा अनादि ड्रामा बनलेला आहे. मी काही नवीन गोष्ट करत नाही. ड्रामा अनुसार तुम्हाला शिकवतो. थँक्स तर भक्ती मार्गामध्ये देतात. टीचर म्हणतील - विद्यार्थी चांगला अभ्यास करतील तर आमचे नाव प्रसिद्ध होईल. स्टुडंटला थँक्स दिले जाते. जे चांगल्या रीतीने शिकतात आणि शिकवतात, त्यांना थँक्स दिले जाते. स्टुडंट मग टीचरला थँक्स देतात. बाबा म्हणतात - ‘गोड मुलांनो, जिवंत रहा. अशी-अशी सेवा करत रहा. तुम्ही कल्पापूर्वी देखील केली होती. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) नेहमी हा नशा आणि निश्चय रहावा की आपल्याला शिकविणारे कोणी देहधारी टीचर नाही आहेत. स्वयं ज्ञान सागर निराकार बाबा शिक्षक बनून आपल्याला शिकवत आहेत. या शिक्षणानेच आपल्याला सतोप्रधान बनायचे आहे.

२) आत्मारुपी दीपकामध्ये रोज ज्ञानाचे घृत टाकायचे आहे. ज्ञानघृताने नेहमी असे प्रज्वलित रहायचे आहे जेणेकरून मायेचे कोणतेही वादळ हलवू शकणार नाही. पूर्ण परवाना बनून शमेवर फिदा व्हायचे आहे.

वरदान:-
सदैव एका बाबांच्या स्नेहामध्ये सामावलेली सहयोगी सो सहजयोगी आत्मा भव

ज्या मुलांचा बाबांवर अतिस्नेह आहे, ती स्नेही आत्मा नेहमी बाबांच्या श्रेष्ठ कार्यामध्ये सहयोगी असेल आणि जे जितके सहयोगी तितके सहज योगी बनतात. बाबांच्या स्नेहामध्ये सामावलेली सहयोगी आत्मा कधी मायेची सहयोगी होऊ शकत नाही. त्यांच्या प्रत्येक संकल्पामध्ये बाबा आणि सेवा असते त्यामुळे निद्रा देखील करतील तरी त्यामध्ये खूप आराम मिळेल, शांती आणि शक्ती मिळेल. निद्रा, निद्रा नसेल ज्याप्रमाणे कमाई करून आनंदामध्ये झोपले आहेत, इतके परिवर्तन होते.

बोधवाक्य:-
प्रेमाचे अश्रू हृदयाच्या डब्बीमध्ये मोती बनतात.