18-04-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबा आहेत दाता, तुम्हा मुलांना बाबांकडे काहीही मागण्याची आवश्यकता नाही, एक म्हण आहे - मागण्यापेक्षा मेलेले बरे”

प्रश्न:-
कोणती स्मृती सदैव राहिली तर कोणत्याही गोष्टीची चिंता किंवा चिंतन राहणार नाही?

उत्तर:-
जो भूतकाळ होऊन गेला - चांगला किंवा वाईट, ड्रामामध्ये होता. संपूर्ण चक्र पूर्ण होऊन आता पुन्हा रिपीट होणार. जसा जो पुरुषार्थ करतात, तसे पद प्राप्त करतात. या गोष्टीची स्मृती राहिली तर कोणत्याही गोष्टीची चिंता अथवा चिंतन राहणार नाही. बाबांचे डायरेक्शन आहे - मुलांनो, होऊन गेलेल्या गोष्टीचा विचार करू नका. उलटी-सुलटी कोणतीही गोष्ट ऐकू नका आणि ऐकवू सुद्धा नका. जी गोष्ट होऊन गेली त्याचा ना विचार करायचा आहे आणि ना रिपीट करायची आहे.

ओम शांती।
रूहानी मुलांप्रती रूहानी बाबा बसून समजावून सांगत आहेत. रूहानी बाबांना दाता म्हटले जाते. ते आपणहूनच सर्व काही मुलांना देतात. ते येतातच मुळी विश्वाचा मालक बनविण्यासाठी. कसे बनायचे आहे, ते सर्वकाही मुलांना समजावून सांगतात, डायरेक्शन देत राहतात. दाता आहेत ना. ते सर्व आपणहून देत राहतात. मागण्यापेक्षा मरण चांगले. कोणतीही वस्तू मागायची नसते. बरीच मुले शक्ती, आशीर्वाद, कृपा मागत राहतात. भक्ती मार्गामध्ये मागून-मागून डोके टेकवून पूर्ण शिडी खाली उतरत आला आहात (पतनच झाले आहे). आता मागण्याची काहीच आवश्यकता नाही. बाबा म्हणतात - डायरेक्शन प्रमाणे चाला. एक तर सांगतात झालेल्या गोष्टींचा कधी विचार करत बसू नका. ड्रामामध्ये जे काही झाले त्याचा भूतकाळ झाला. त्याचा विचार करू नका. रिपीट करू नका. बाबा तर फक्त दोनच शब्द सांगतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. बाबा डायरेक्शन अथवा श्रीमत देतात. त्यावर चालणे मुलांचे काम आहे. हे आहे सर्वात श्रेष्ठ डायरेक्शन. कोणी कितीही प्रश्नोत्तरे करतील, परंतु बाबा तर दोनच शब्द समजावून सांगतील. मी आहे पतित-पावन. तुम्ही माझी आठवण करत रहा तर तुमची पापे भस्म होतील. बस्स, आठवण करण्यासाठी कोणते डायरेक्शन दिले जाते काय! बाबांची आठवण करायची आहे, काही रडायचे किंवा ओरडायचे नाहीये. फक्त बेहदच्या बाबांची आतल्याआत आठवण करायची आहे. दुसरे डायरेक्शन कोणते देतात? ८४ च्या चक्राची आठवण करा कारण तुम्हाला देवता बनायचे आहे, देवतांची महिमा तर तुम्ही अर्धा कल्प केली आहे.

(लहान मुलाच्या रडण्याचा आवाज झाला) आता हे डायरेक्शन सर्व सेंटर्स वाल्यांना दिले जात आहे की, मुलांना कोणीही आणू नये. त्यांची काहीतरी व्यवस्था करायची आहे. बाबांकडून ज्यांना वारसा घ्यायचा असेल ते आपणहून आपल्या मुलांची व्यवस्था करतील. ही रूहानी बाबांची युनिव्हर्सिटी आहे, इथे लहान मुलांची आवश्यकता नाही. ब्राह्मणीचे (टीचरचे) काम आहे - ते जेव्हा सर्व्हीसेबल (सेवा योग्य) लायक बनतील तेव्हा त्यांना रिफ्रेश करण्यासाठी घेऊन यायचे आहे. कोणतीही मोठी व्यक्ती असो अथवा छोटी असो, ही युनिव्हर्सिटी आहे. इथे मुलांना जे घेऊन येतात ते हे समजत नाहीत की ही युनिव्हर्सिटी आहे. मुख्य गोष्ट आहे - ही युनिव्हर्सिटी आहे. यामध्ये शिकणारे खूप चांगले हुशार पाहिजेत. कच्चे असणारे देखील गडबड करत राहतील कारण बाबांच्या आठवणीमध्ये नसणार तर बुद्धी इकडे-तिकडे भटकत राहील. नुकसान करतील. आठवणीमध्ये राहू शकणार नाहीत. मुलाबाळांना आणाल तर त्यामध्ये मुलांचेच नुकसान आहे. काहीजण तर जाणतच नाहीत की ही गॉड फादरली युनिव्हर्सिटी आहे, इथे मनुष्यापासून देवता बनायचे असते. बाबा म्हणतात - भले गृहस्थ व्यवहारामध्ये मुलाबाळांसोबत रहा, इथे फक्त एक आठवडाच काय ३-४ दिवस देखील पुरेसे आहेत. नॉलेज तर खूप सोपे आहे. बाबांना ओळखायचे आहे. बेहदच्या बाबांना ओळखल्याने बेहदचा वारसा मिळणार. कोणता वारसा? बेहदची बादशाही. असे समजू नका कि प्रदर्शनी अथवा म्युझियममध्ये सेवा होत नाही. पुष्कळ अगणित प्रजा बनते. ब्राह्मण कुळ, सूर्यवंशी आणि चंद्रवंशी - तिन्ही इथे स्थापन होत आहेत. तर ही खूप मोठी युनिव्हर्सिटी आहे. बेहदचे बाबा शिकवतात. तुमचा मेंदूच प्रगल्भ झाला पाहिजे. परंतु बाबा आहेत साधारण तनामध्ये. शिकवतात देखील साधारण रितीने, म्हणून लोकांना आवडत नाही. गॉडफादरली युनिव्हर्सिटी आणि अशी असेल! बाबा म्हणतात - ‘मी आहे गरीब निवाज. गरिबांनाच शिकवतो’. श्रीमंतांची शिकण्याची ताकद नाही. त्यांच्या बुद्धीमध्ये तर गाड्या-बंगले हेच असते. गरीबच श्रीमंत बनतात, श्रीमंत गरीब बनतील - हा नियम आहे. दान कधी श्रीमंतांना दिले जाते काय? हे देखील अविनाशी ज्ञान रत्नांचे दान आहे. श्रीमंत दान घेऊ शकणार नाहीत. बुद्धीमध्ये बसणारच नाही. ते आपल्या हदच्या रचनेमध्ये, धन-दौलतीमध्येच अडकलेले असतात. त्यांच्यासाठी तर जसे काही इथेच स्वर्ग आहे. असे म्हणतात - आम्हाला दुसऱ्या स्वर्गाची गरज नाही. कोणा मोठ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तरी देखील म्हणतील स्वर्गामध्ये गेला. आपणच म्हणतात की तो स्वर्गात गेला. तर जरूर हा आता नरक झाला ना. परंतु इतके पत्थरबुद्धी आहेत जे समजतही नाहीत कि नरक काय आहे? ही तर तुमची किती मोठी युनिव्हर्सिटी आहे. बाबा म्हणतात ज्यांच्या बुद्धीला कुलूप लागले आहे, त्यांनाच येऊन शिकवतो. बाबा जेव्हा येतील तेव्हा कुलूप उघडतील. तुमच्या बुद्धीचे कुलूप कसे उघडायचे - यासाठी बाबा स्वतः डायरेक्शन्स देतात? बाबांकडे काहीही मागायचे नाही, यासाठी निश्चय पाहिजे. किती मोस्ट बिलवेड बाबा आहेत, ज्यांना भक्तीमध्ये आठवण करत होतो. ज्यांची आठवण केली जाते ते जरूर कधीतरी येतील सुद्धा ना. आठवण करतातच पुन्हा रिपीट होण्यासाठी. बाबा येऊन मुलांनाच समजावून सांगतात. मुलांनी मग बाहेरच्यांना समजावून सांगायचे आहे की बाबा कसे आलेले आहेत. ते काय सांगत आहेत? म्हणतात - मुलांनो, तुम्ही सर्व पतित आहात, मीच येऊन पावन बनवतो. तुम्ही आत्मा ज्या पतित बनल्या आहात, आता फक्त मज पतित-पावन बाबांची आठवण करा, मज सुप्रीम आत्म्याची आठवण करा. यामध्ये काहीही मागण्याची आवश्यकता नाही. तुम्ही भक्तिमार्गामध्ये अर्धाकल्प मागितलेच मागितले आहे, मिळाले काहीच नाही. आता मागणे बंद करा. मी स्वतःहून तुम्हाला देत राहतो. बाबांचे बनल्यामुळे वारसा तर मिळतो. जी मुले तरुण असतात, ती लगेच बाबांना ओळखतात. बाबांचा वारसा आहेच मुळी स्वर्गाची बादशाही - २१ पिढी. हे तर तुम्ही जाणता - जेव्हा नरकवासी असतात तेव्हा ईश्वर अर्थ दान-पुण्य केल्याने अल्पकाळासाठी सुख मिळते. मनुष्य धर्माऊ म्हणून देखील बाजूला काढतात. जास्त करून व्यापारी लोक काढतात. तर जे व्यापारी असतील ते असे म्हणतील – ‘आम्ही बाबांसोबत व्यापार करण्यासाठी आलो आहोत’. मुले बाबांसोबत व्यापार करतात ना. दुनियेमध्ये पित्याची प्रॉपर्टी घेऊन मग त्याने श्राद्ध इत्यादी खाऊ घालतात, दान-पुण्य करतात. धर्मशाळा, मंदिर इत्यादी बांधले तर त्याला पित्याचे नाव देतील कारण ज्यांच्याकडून प्रॉपर्टी मिळाली आहे त्यांच्यासाठी तर जरूर केले पाहिजे ना. हा देखील सौदा झाला. या सर्व आहेत भौतिक गोष्टी. आता बाबा म्हणतात झालेल्या गोष्टींचा विचार करू नका. कोणतीही उलटी-सुलटी गोष्ट ऐकू नका. उलटे-सुलटे कोणी प्रश्न विचारले तर असे बोला – ‘या गोष्टींमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही पहिली बाबांची आठवण करा’. भारताचा प्राचीन राजयोग नामीग्रामी आहे. जितके आठवण कराल, दैवी गुण धारण कराल, तितके उच्च पद प्राप्त कराल. ही आहे युनिव्हर्सिटी. एम-ऑब्जेक्ट स्पष्ट आहे. पुरुषार्थ करून असे बनायचे आहे. दैवी गुण धारण करायचे आहेत. कोणालाही, कोणत्याही प्रकारचे दुःख द्यायचे नाही. दुःख हर्ता, सुख कर्ता बाबांची मुले आहात ना. ते तर सेवेवरून समजणारच. बरेच नवीन-नवीन देखील येतात. २५-३० वर्षवाल्यांपेक्षा १०-१२ दिवसवाले तीव्र गतीने पुढे जातात. तुम्हा मुलांना मग आप समान बनवायचे आहे. जोपर्यंत ब्राह्मण बनत नाही तोपर्यंत देवता कसे बनणार. ग्रेट-ग्रेट ग्रँड फादर तर ब्रह्मा आहेत ना. जे होऊन जातात त्यांचे गायन करत राहतात, मग ते पुन्हा नक्की येणार. जे काही सण इत्यादी प्रसिद्ध आहेत, ते सर्व होऊन गेले आहेत, परत होतील. यावेळेस सर्व सण साजरे होत आहेत - रक्षाबंधन इत्यादी… सर्वांचे रहस्य बाबा समजावून सांगत असतात. तुम्ही बाबांची संतान आहात तर पावन देखील जरूर बनायचे आहे. पतित-पावन बाबांना बोलावता तर बाबा रस्ता सांगतात. कल्प-कल्प ज्यांनी वारसा घेतला आहे, ते ॲक्युरेट चालत राहतात. तुम्ही देखील साक्षी होऊन बघता. बाबा देखील साक्षी होऊन बघतात - हे कितपत उच्च पद मिळवू शकतात? यांचे चारित्र्य कसे आहे? टीचरला तर सर्वकाही माहिती असते ना - किती जणांना आप समान बनवतात, किती वेळ आठवणीमध्ये राहतात? सर्वप्रथम तर बुद्धीमध्ये याची आठवण ठेवली पाहिजे की ही गॉडफादरली युनिव्हर्सिटी आहे. युनिव्हर्सिटी आहेच नॉलेज करीता. ती आहे हदची युनिव्हर्सिटी. ही आहे बेहदची. दुर्गती पासून सद्गती, हेल पासून हेवन बनविणारे एक बाबाच आहेत. बाबांची दृष्टी तर सर्व आत्म्यांकडे जाते. सर्वांचे कल्याण करायचे आहे. परत घेऊन जायचे आहे. केवळ तुम्हालाच नाही परंतु साऱ्या दुनियेतील आत्म्यांची आठवण करत असतील. त्यामध्ये मग शिकवतात मात्र मुलांनाच. हे देखील समजता की जसे नंबरवार जे आले आहेत ते परत जाणार देखील तसेच. सर्व आत्मे नंबरवार येतात. तुम्ही देखील नंबरवार कसे जाणार - ते सर्व समजावून सांगितले जाते. कल्पापूर्वी जे झाले आहे तेच होईल. तुम्ही पुन्हा नवीन दुनियेमध्ये कसे येणार, हे देखील तुम्हाला समजावून सांगितले जाते. नंबरवार जे नवीन दुनियेमध्ये येतात, त्यांनाच समजावून सांगितले जाते.

तुम्ही मुले बाबांना जाणल्याने, आपल्या धर्माला आणि सर्व धर्मांच्या पूर्ण झाडाला जाणता. यामध्ये काहीही मागण्याची आवश्यकता नाही, आशीर्वाद सुद्धा नाही. असे लिहितात – ‘बाबा, दया करा, कृपा करा’. बाबा तर काहीच करणार नाहीत. बाबा तर आले आहेत रस्ता दाखविण्यासाठी. ड्रामामध्ये माझा पार्टच आहे सर्वांना पावन बनविण्याचा. तसाच पार्ट बजावतो, जसा कल्प-कल्प बजावला आहे. जो काही भूतकाळ होऊन गेला, चांगला किंवा वाईट, ड्रामामध्ये होता. कोणत्याही गोष्टीचे चिंतन करायचे नाही. आपण पुढे जातच राहतो. हा बेहदचा ड्रामा आहे ना. सारे चक्र पूर्ण होऊन पुन्हा रिपीट होणार. जो जसा पुरुषार्थ करतात, तसेच पद प्राप्त करतात. मागण्याची गरजच नाही. भक्तिमार्गामध्ये तुम्ही खूप मागितले आहे. सगळे पैसे संपवून टाकले आहेत. हे सर्व ड्रामामध्ये पूर्वनियोजित आहे. ते फक्त समजावून सांगतात. अर्धाकल्प भक्ती करण्यामध्ये, शास्त्र वाचण्यामध्ये किती खर्च होतो. आता तर तुम्हाला काहीच खर्च करण्याची आवश्यकता नाही. बाबा तर दाता आहेत ना. दात्याला आवश्यकता नाही. ते तर आलेच आहेत देण्यासाठी. असे समजू नका की आम्ही शिवबाबांना दिले. अरे, शिवबाबांकडून तर भरपूर मिळते. तुम्ही इथे घेण्यासाठी आले आहात ना. टीचरकडे स्टुडंट्स घेण्यासाठी येतात. त्या लौकिक पिता, टीचर, गुरूंमुळे तर तुमचा तोटाच झाला आहे. आता मुलांना श्रीमतावर चालायचे आहे तेव्हाच उच्च पद मिळवू शकाल. शिवबाबा आहेत डबल श्री श्री, तुम्ही बनता सिंगल श्री. श्री लक्ष्मी, श्री नारायण म्हटले जाते. श्री लक्ष्मी, श्री नारायण दोघेजण झाले. विष्णूला ‘श्री श्री’ म्हणणार कारण दोघे एकत्र आहेत. तरी देखील दोघांना बनवतात कोण? जे एकच ‘श्री श्री’ आहेत. बाकी कोणीही ‘श्री श्री’ तर असत नाही. आजकाल तर श्री लक्ष्मीनारायण, श्री रामसीता अशी देखील नावे ठेवतात. तर मुलांना हे सर्व धारण करून खुशीमध्ये रहायचे आहे.

आजकाल स्पिरिचुअल कॉन्फरन्सेस (अध्यात्मिक परिषदा) देखील होत राहतात. परंतु ‘स्पिरिचुअल’ याचा अर्थच समजत नाहीत. रुहानी नॉलेज तर एका व्यतिरिक्त इतर कोणीही देऊ शकणार नाही. बाबा सर्व आत्म्यांचे पिता आहेत. त्यांना ‘स्पिरिचुअल’ म्हणतात. फिलॉसॉफीला देखील स्पिरिच्युअल म्हणतात. हे तर समजता - हे जंगल आहे, सर्व एकमेकांना दुःख देत राहतात. तुम्ही जाणता अहिंसा परमो देवी-देवता धर्माचे गायन आहे. तिथे काही मारझोड होत नाही. क्रोध करणे देखील हिंसा आहे मग थोडीशी हिंसा म्हणा, काहीही म्हणा. इथे तर एकदम अहिंसक बनायचे आहे. कोणतीही मनसा, वाचा, कर्मणा खराब गोष्ट होता कामा नये. कोणी पोलीस इत्यादीमध्ये काम करत असतील तर त्यांच्याकडून सुद्धा युक्तीने काम निपटायचे आहे. शक्य होईल तितके प्रेमाने काम निपटायचे आहे. बाबांचा स्वतःचा अनुभव आहे, प्रेमाने आपले काम करून घेत होते, यासाठी खूप चांगली युक्ती पाहिजे. खूप प्रेमाने कोणालाही समजावून सांगायचे आहे - कशी एकाची शंभर पटीने शिक्षा होते. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आपण दुःख हर्ता, सुख कर्ता बाबांची मुले आहोत, त्यामुळे कोणालाही दुःख द्यायचे नाही. एम ऑब्जेक्टला समोर ठेवून दैवी गुण धारण करायचे आहेत. आप समान बनविण्याची सेवा करायची आहे.

२) ड्रामाच्या प्रत्येक पार्टला जाणत असून देखील कोणत्याही होऊन गेलेल्या गोष्टीचे चिंतन करायचे नाही. मनसा, वाचा, कर्मणा कोणतेही वाईट कृत्य होणार नाही याकडे लक्ष देऊन आपल्याला डबल अहिंसक बनायचे आहे.

वरदान:-
एका बाबांनाच कंपेनियन बनविणारे किंवा त्याच्याच कंपनीमध्ये राहणारे संपूर्ण पवित्र आत्मा भव

संपूर्ण पवित्र आत्मा ती आहे जिच्या संकल्प आणि स्वप्नामध्ये देखील ब्रह्मचर्याची धारणा असेल, जो प्रत्येक पावलावर ब्रह्मा बाबांच्या आचरणावर चालणारा असेल. पवित्रतेचा अर्थ आहे - सदैव बाबांना कंपेनियन बनविणे आणि बाबांच्या कंपनीमध्ये राहणे. संघटनची कंपनी, परिवाराच्या स्नेहाची मर्यादा वेगळी गोष्ट आहे, परंतु बाबांमुळेच या संघटनच्या स्नेहाची कंपनी आहे, बाबाच नसते तर परिवार कुठून आला असता. बाबा बीज आहेत, बीजाला कधीही विसरायचे नाही.

बोधवाक्य:-
कोणाच्याही प्रभावाने प्रभावित होणारे बनू नका, ज्ञानाचा प्रभाव पाडणारे बना.