19-04-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबा आले आहेत संपूर्ण दुनियेतील हाहा:कार मिटवून, जयजयकार करण्यासाठी - जुन्या दुनियेमध्ये आहे हाहा:कार , नवीन दुनियेमध्ये आहे जयजयकार”

प्रश्न:-
कोणता ईश्वरीय नियम आहे ज्या आधारे गरीबच बाबांचा पूर्ण वारसा घेतात, श्रीमंत घेऊ शकत नाहीत?

उत्तर:-
ईश्वरीय नियम आहे - पूर्ण भिकारी बना, जे काहीही आहे त्याला विसरून जा. तर गरीब मुले सहजच विसरून जातात परंतु श्रीमंत जे स्वतःला स्वर्गामध्ये समजतात त्यांच्या डोक्यातून काहीही विसरले जात नाही; त्यामुळे ज्यांना धन-दौलत, मित्र-संबंधी आठवणीत राहतात ते खरे योगी बनूच शकत नाहीत. त्यांना स्वर्गामध्ये उच्च पद मिळू शकत नाही.

ओम शांती।
गोड-गोड निश्चयबुद्धी मुले तर चांगल्या रीतीने जाणतात, त्यांना पक्का निश्चय आहे कि, बाबा आले आहेत संपूर्ण दुनियेतील तंटा मिटविण्यासाठी. जी बुद्धिवान मुले आहेत, ती जाणतात या तनामध्ये बाबा आलेले आहेत, ज्यांचे नाव सुद्धा आहे शिवबाबा. कशासाठी आले आहेत? हाहा:काराला नाहीसे करून, जयजयकार करण्यासाठी. मृत्यु लोकामध्ये किती तंटे इत्यादी आहेत. सर्वांना हिशोब चुकता करून जायचे आहे. अमरलोकमध्ये भांडण-तंट्याचा प्रश्नच येत नाही. इथे किती गदारोळ (हाहा:कार) चालू आहे. किती कोर्ट, जज इत्यादी आहेत. मारामारी चालूच असते. विदेश इत्यादी ठिकाणी देखील बघा हाहा:कार माजलेला आहे. संपूर्ण दुनियेमध्ये हालअपेष्टा खूप आहेत. याला म्हटले जाते - जुनी तमोप्रधान दुनिया. कचराच कचरा आहे. जंगलच जंगल आहे. बेहदचे बाबा हे सर्व काही संपविण्यासाठी आलेले आहेत. आता मुलांना खूप बुद्धिवान बनायचे आहे. जर मुलांमध्ये सुद्धा भांडण-तंटे होत राहिले तर बाबांचे मदतगार कसे बनणार. बाबांना तर खूप मदतगार मुले पाहिजेत - हुशार, बुद्धिवान, जे कटकट करणारे नसतील. हे देखील मुले समजतात कि ही जुनी दुनिया आहे. अनेक धर्म आहेत. तमोप्रधान विशश वर्ल्ड (विकारी दुनिया) आहे. संपूर्ण दुनिया पतित आहे. पतित जुन्या दुनियेमध्ये तंटेचतंटे आहेत. या साऱ्याला संपवून, जयजयकार करण्यासाठी बाबा येतात. प्रत्येकजण जाणतो या दुनियेमध्ये किती दुःख आणि अशांती आहे, म्हणूनच त्यांना विश्वामध्ये शांती व्हावी असे वाटते. आता साऱ्या विश्वामध्ये शांती कोणी मनुष्य कसा बरे करू शकेल. बेहदच्या बाबांना दगड-धोंड्यात घातले आहे. हा देखील खेळ आहे. तर बाबा मुलांना समजावून सांगत आहेत, आता तयारीत रहा. बाबांचे मदतगार बना. बाबांकडून आपले राज्य-भाग्य घ्यायचे आहे. थोडे थोडके नाही, अथांग सुख आहे. बाबा म्हणतात - ‘गोड मुलांनो, ड्रामा अनुसार तुम्हाला बेहदचे बाबा पद्मापद्म भाग्यशाली बनविण्यासाठी आले आहेत’. भारतामध्ये हे लक्ष्मी-नारायण राज्य करत होते. भारत स्वर्ग होता. स्वर्गालाच म्हटले जाते वंडर ऑफ वर्ल्ड. त्रेताला देखील असे म्हणणार नाही. अशा स्वर्गामध्ये येण्याचा मुलांनी पुरुषार्थ केला पाहिजे. सर्वात पहिले यायचे आहे. मुलांची इच्छा देखील आहे आपण स्वर्गामध्ये यावे, लक्ष्मी अथवा नारायण बनावे. आता या जुन्या दुनियेमध्ये भयंकर हाहा:कार होणार आहे. रक्ताच्या नद्या वाहणार आहेत, रक्ताच्या नद्यांच्या नंतर असतात तुपाच्या नद्या. त्याला म्हणतात - ‘क्षीरसागर’. इथे देखील मोठे तलाव बनतात, मग एखादा दिवस ठरतो त्यावेळी येऊन त्यामध्ये दूध ओततात. आणि मग त्यामध्ये स्नान करतात. शिवलिंगावर सुद्धा दूध घालतात. सतयुगाची देखील एक महिमा आहे कि, तिथे दुधा-तुपाच्या नद्या आहेत. परंतु असा काही प्रकार नाहीये. प्रत्येक ५ हजार वर्षांनंतर तुम्ही विश्वाचे मालक बनता. यावेळी तुम्ही गुलाम आहात, नंतर तुम्ही बादशहा बनता. संपूर्ण प्रकृति तुमची गुलाम बनते. तिथे पाऊस कधी अवेळी पडत नाही, नद्यांना कधी पूर येत नाही. कोणताच उपद्रव होत नाही. इथे बघा किती उपद्रव आहे. तिथे पक्के वैष्णव राहतात. विकारी वैष्णव नाही. इथे कोणी शाकाहारी बनला तर त्याला वैष्णव म्हणतात. परंतु नाही, विकारांमुळे एकमेकांना खूप दुःख देतात. बाबा किती चांगल्या रितीने समजावून सांगत आहेत. हे देखील गायन आहे - ‘गांवड़े का छोरा…’ श्रीकृष्ण तर गावातला असू शकत नाही. तो तर वैकुंठाचा मालक आहे. नंतर ८४ जन्म घेतात.

हे सुद्धा तुम्ही आता जाणता कि आम्ही भक्तीमध्ये किती धक्के खाल्ले, पैसे बरबाद केले. बाबा विचारत आहेत - ‘तुम्हाला एवढे पैसे दिले, राज्य भाग्य दिले, सर्व गेले कुठे? तुम्हाला विश्वाचा मालक बनवले मग तुम्ही केले काय? बाबा तर ड्रामाला जाणतात. नवीन दुनिया तीच जुनी दुनिया, जुनी दुनिया तीच नवीन दुनिया बनते. हे चक्र आहे, जे काही पास्ट झाले तेच पुन्हा रिपीट होणार. बाबा म्हणतात - आता थोडा वेळ बाकी आहे, पुरुषार्थ करून भविष्यासाठी जमा करा, जुन्या दुनियेतील सर्वकाही मातीमध्ये मिसळून जाणार आहे. श्रीमंत या ज्ञानाला स्वीकारणार नाहीत. बाबा आहेत गरीब निवाज. तिथे (सतयुगमध्ये) गरीब श्रीमंत बनतात आणि श्रीमंत गरीब बनतात. आता तर पद्मपती बरेच आहेत. ते येतील परंतु गरीब बनतील. ते स्वतःला स्वर्गामध्ये आहोत असे समजतात, ते डोक्यातून जाऊ शकत नाही. इथे तर बाबा म्हणतात - सर्व काही विसरून जा. एकदम भिकारी बना. आजकाल तर किलोग्रॅम, किलोमीटर इत्यादी काय-काय निघाले आहे. जो राजाच्या गादीवर बसतो तो आपली भाषा सुरु करतो. विदेशाची नक्कल करतात. स्वतःला तर बुद्धीच नाहीये. तमोप्रधान आहेत. अमेरिका इत्यादीमध्ये विनाशकारी उपकरणांसाठी बघा किती धन लावतात. विमानातून बाँम्ब इत्यादी टाकतात, आग लागणार आहे. मुले जाणतात, बाबा येतातच विनाश आणि स्थापना करण्यासाठी. तुमच्यामध्ये देखील समजावून सांगणारे सर्व नंबरवार आहेत. सगळेच एकसमान निश्चय बुद्धी नाही आहेत. जसे बाबांनी केले, बाबांना फॉलो केले पाहिजे. जुन्या दुनियेमध्ये हे पै-पैसे काय करणार. आजकाल कागदाच्या नोटा निघाल्या आहेत. तिथे तर नाणी (मोहरे) असणार. जिथे सोन्याचे महाल बनतात तिथे नाण्यांची कसली किंमत असणार! जसे कि सर्व काही फुकट आहे, सतोप्रधान धरणी आहे ना. आता तर जुनी झाली आहे. ती आहे सतोप्रधान नवीन दुनिया. जमीन एकदम नवीन आहे. तुम्ही सूक्ष्म वतनमध्ये जाता तर शुबी रस इत्यादी पीता, परंतु तिथे काही झाडे इत्यादी तर नाहीत आणि ना मूलवतनमध्ये आहे. जेव्हा तुम्ही वैकुंठामध्ये जाता तेव्हा तिथे तुम्हाला सर्व काही मिळते. बुद्धीने विचार करा, सूक्ष्मवतनमध्ये झाडे असणार नाहीत. झाडे तर धरतीवर असतात, काही आकाशामध्ये नाहीत. भले नाव आहे ब्रह्म महतत्त्व परंतू आहे पोलार (पोकळी). जसे हे तारे आकाशामध्ये आहेत, तसे तुम्ही अति सूक्ष्म आत्मे ब्रह्म महतत्त्व मध्ये राहता. तारे दिसायला मोठे असतात. असे नाही कि ब्रह्म तत्वामध्ये काही भलेमोठे आत्मे असतील. हा बुद्धीने विचार करायचा आहे. विचार सागर मंथन करायचे आहे. तर आत्मे देखील वरती राहतात. छोटा बिंदू आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला धारण करायच्या आहेत, तेव्हा कोणाला धारण करवू शकाल. टीचर जरूर स्वतः जाणतात तेव्हाच तर इतरांना शिकवतात. नाही तर टीचर कसला. परंतू इथे टीचर्स सुद्धा नंबरवार आहेत. तुम्ही मुले वैकुंठाला देखील समजू शकता. असे नाही कि तुम्ही वैकुंठ पाहिलेले नाही. बऱ्याच मुलांना साक्षात्कार झाला आहे. तिथे स्वयंवर कसे होते, भाषा कोणती आहे, सर्व काही बघितले आहे. शेवटी तुम्हाला देखील साक्षात्कार होतील परंतू होणार त्यांनाच जे योगयुक्त असतील. बाकी ज्यांना आपले मित्र-संबंधी, धन-दौलत यांचीच आठवण येत राहीली तर ते काय बघणार. सच्चे योगीच शेवटपर्यंत राहतील, ज्यांना पाहून बाबा खुश होतील. फुलांचीच बाग बनते. बरेचजण तर १०-१५ वर्ष राहून देखील निघून जातात. त्यांना म्हणणार धोत्र्याचे फूल. खूप चांगल्या-चांगल्या मुली ज्या मम्मा-बाबांसाठी देखील डायरेक्शन (संदेश) घेऊन येत होत्या, ड्रिल करून घेत होत्या, त्या आज नाही आहेत. हे तर मुली सुद्धा जाणतात आणि बापदादा सुद्धा जाणतात की माया खूप कठोर आहे. हे आहे मायेबरोबर गुप्त युद्ध. गुप्त वादळ. बाबा म्हणतात - माया तुम्हाला खूप हैराण करेल. हा हार-जीतचा बनलेला ड्रामा आहे. तुमचे कोणत्या शस्त्रांद्वारे युद्ध नाहीये. हा तर भारताचा प्राचीन योग सुप्रसिद्ध आहे, ज्या योगबलाने तुम्ही हे बनता. बाहू बळाने कोणी विश्वाची बादशाही घेऊ शकणार नाही. खेळ देखील वंडरफुल आहे. एक गोष्ट आहे - ‘दोन बोक्यांचे भांडण झाले लोण्यासाठी…’. म्हटले देखील जाते सेकंदामध्ये विश्वाची बादशाही. मुलींना साक्षात्कार होतो. म्हणतात - श्रीकृष्णाच्या मुखामध्ये लोणी आहे. खरे पाहता श्रीकृष्णाच्या मुखामध्ये नवीन दुनिया बघतात. योगबलाने तुम्ही विश्वाचे बादशाही रूपी लोणी घेता. राजाईसाठी किती युद्ध होतात आणि कितीतरी लढायांमुळे नष्ट होतात. या जुन्या दुनियेचा हिशोब चुकता होणार आहे. या दुनियेतील कोणतीही वस्तू राहणार नाही. बाबांचे श्रीमत आहे - ‘मुलांनो, हियर नो ईविल, सी नो ईविल…’. त्यांनी मग माकडांचे एक चित्र बनवले आहे. आजकाल तर मनुष्याचे सुद्धा बनवतात. पूर्वी चीनमधून हस्तिदंताच्या वस्तू येत होत्या. बांगड्या सुद्धा काचेच्या घालत होते. इथे तर दागिने इत्यादी घालण्यासाठी नाक-कान इत्यादी टोचून घेतात, सतयुगामध्ये नाक-कान टोचण्याची गरज नाही. इथे तर माया अशी आहे जी सर्वांचे नाक-कान कापून टाकते. तुम्ही मुले आता स्वच्छ बनता. तिथे नॅचरल ब्युटी असते. कोणती सौंदर्य प्रसाधने लावण्याची आवश्यकता नाही. इथे तर शरीरच तमोप्रधान तत्वांनी बनते, म्हणून रोगराई इत्यादी होते. तिथे या गोष्टी असत नाहीत. आता तुमच्या आत्म्याला खूप खुशी होत आहे कि आम्हाला बेहदचे बाबा शिकवून नरापासून नारायण अथवा अमरपुरीचे मालक बनवतात; म्हणूनच गायन आहे की, ‘अतींद्रिय सुख विचारायचे असेल तर गोप-गोपींना विचारा’. भक्त लोक या गोष्टींना जाणत नाहीत. तुमच्यामध्ये देखील आनंदी राहणारी आणि या गोष्टींचे स्मरण करत राहणारी - अशी मुले फार थोडी आहेत. अबलांवर किती अत्याचार होतात. द्रौपदीचे जे गायन आहे, ते सर्व प्रॅक्टिकलमध्ये होत आहे. द्रौपदीने कशासाठी बोलावले? हे काही मनुष्य जाणत नाहीत. बाबांनी समजावून सांगितले आहे की, तुम्ही सर्व द्रौपदी आहात. असे नाही, फिमेल कायम फिमेलच बनते. दोन वेळा फिमेल बनू शकते, जास्ती नाही. माता बोलावतात - ‘बाबा वाचवा, आम्हाला दुःशासन विकारासाठी त्रास देत आहेत’. याला म्हटले जाते - वेश्यालय. स्वर्गाला म्हटले जाते - शिवालय. वेश्यालय आहे - रावणाची स्थापना, शिवालय आहे - शिवबाबांची स्थापना. आणि तुम्हाला नॉलेज देखील देतात. बाबांना नॉलेजफुल देखील म्हटले जाते. असे नाही की नॉलेजफुल म्हणजे सगळ्यांच्या मनातील जाणणारे. याने फायदाच काय! बाबा म्हणतात - हे सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे नॉलेज माझ्याशिवाय कोणीही देऊ शकणार नाही. मीच येऊन तुम्हाला शिकवतो. ज्ञान सागर एक बाबाच आहेत. तिथे आहे भक्तीचे प्रालब्ध. सतयुग-त्रेतामध्ये भक्ती असत नाही. शिक्षणामुळेच राजधानी स्थापन होत आहे. प्रेसिडेंट इत्यादींचे बघा किती वजीर (मंत्री) आहेत. सल्ला देण्यासाठी मंत्र्याची नियुक्ती केली जाते. सतयुगामध्ये मंत्री ठेवण्याची आवश्यकता नाही. आता बाबा तुम्हाला हुशार बनवतात. हे लक्ष्मी-नारायण बघा किती हुशार होते. बेहदची बादशाही बाबांकडून मिळते. शिव-जयंती बाबांची साजरी करतात. जरूर शिवबाबा भारतामध्ये येऊन विश्वाचे मालक बनवून गेले आहेत. लाखों वर्षांची गोष्ट नाहीये. कालचीच गोष्ट आहे. अच्छा, आणखी काय समजावू. बाबा म्हणतात मनमनाभव. वास्तविक हे शिक्षण इशारा देणारे आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) बाबांचे पूर्ण मदतगार बनण्यासाठी शहाणे, हुशार बनायचे आहे. मनामध्ये कोणताही संघर्ष नसावा.

२) स्थापना आणि विनाशाच्या कर्तव्याला बघताना पूर्ण निश्चयबुद्धी बनून बाबांना फालो करायचे आहे. जुन्या दुनियेच्या पाई-पैशांमधून बुद्धी काढून पूर्ण बेगर बनायचे आहे. मित्र-संबंधी, धन-दौलत इत्यादी सर्व काही विसरून जायचे आहे.

वरदान:-
संघटनमध्ये राहत असून, सर्वांचे स्नेही बनून बुद्धीचा सहारा मात्र एका बाबांना बनविणारे कर्मयोगी भव

काही-काही मुले संघटनमध्ये स्नेही बनण्याऐवजी दूर राहतात. घाबरतात कि कुठे अडकणार तर नाही, त्यापेक्षा तर दूर राहिलेले बरे. परंतू नाही, २१ जन्म परिवारामध्ये रहायचे आहे, जर घाबरून बाजूला झालात तर हा देखील कर्म-संन्यासीचा संस्कार झाला. कर्मयोगी बनायचे आहे, कर्म संन्यासी नाही. संघटनमध्ये रहा, सर्वांचे स्नेही बना परंतु बुद्धीचा सहारा मात्र एक बाबा असावेत, दुसरा कोणीही नाही. बुद्धीला कोणत्या आत्म्याची सोबत, गुण अथवा कोणती विशेषता आकर्षित करू नये तेव्हा म्हणणार - कर्मयोगी पवित्र आत्मा.

बोधवाक्य:-
बापदादांचा राईट हँड बना, लेफ्ट हँड नाही.