20-04-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्हाला योग बलाद्वारे या खाऱ्या समुद्राला पार करून घरी जायचे आहे त्यामुळे जिथे जायचे आहे त्याची आठवण करा, याच खुशीमध्ये रहा की आपण आता फकीरा पासून अमीर बनतो’’

प्रश्न:-
दैवी गुणांच्या सब्जेक्टवर ज्या मुलांचे लक्ष आहे, त्यांचे लक्षण काय असेल?

उत्तर:-
त्यांच्या बुद्धीमध्ये कायम असते - जसे कर्म आम्ही करणार आम्हाला पाहून इतर करतील. ते कधी कोणाला त्रास देणार नाहीत. त्यांच्या मुखावाटे कधी उलटा-सुलटा शब्द निघणार नाही. मनसा-वाचा-कर्मणा कोणाला दुःख देणार नाहीत. बाप समान सुख देण्याचे लक्ष्य असेल तेव्हा म्हणणार दैवी गुणांच्या सब्जेक्ट वर लक्ष आहे.

ओम शांती।
गोड-गोड रुहानी मुलांप्रती रुहानी बाबा समजावून सांगत आहेत. आठवणीची यात्रा देखील शिकवत आहेत. आठवणीच्या यात्रेचा अर्थ देखील मुले समजत असतील. भक्ती मार्गामध्ये देखील सर्व देवतांची, शिवबाबांची आठवण करतात. परंतु हे माहीत नव्हते की आठवण केल्यानेच विकर्म विनाश होतील. मुले जाणतात, बाबा पतित-पावन आहेत, तेच आत्म्याला पावन बनविण्याची युक्ती सांगतात. आत्म्यालाच पावन बनायचे आहे, आत्माच पतित बनते. मुले जाणतात, बाबा भारतामध्येच येऊन आठवणीची यात्रा शिकवतात इतर कुठेही शिकवू शकत नाहीत. भौतिक यात्रा तर मुलांनी खूप केल्या आहेत, ही यात्रा केवळ एक बाबाच शिकवू शकतात. आता तुम्हा मुलांना बाबांनी समजावून सांगितले आहे मायेच्या कारणामुळे सर्वांच्या बुद्धीला अज्ञानीपणाचे कुलूप लागलेले आहे. आता बाबांद्वारे तुम्हाला माहित झाले आहे की आपण किती हुशार, धनवान आणि पवित्र होतो. आपण संपूर्ण विश्वाचे मालक होतो. आता आपण पुन्हा बनत आहोत. बाबा किती मोठी बेहदची बादशाही देतात. लौकिक पिता फार-फार तर लाख-करोड देतील. इथे तर गोड बेहदचे बाबा बेहदची बादशाही देण्यासाठी आले आहेत, म्हणून तुम्ही इथे शिकण्यासाठी आले आहात. कोणाकडे? बेहदच्या बाबांकडे. ‘बाबा’ शब्द ‘मम्मा’ पेक्षा देखील गोड आहे. भले मम्मा पालना करते परंतु बाबा तरी देखील बाबाच आहेत, ज्यांच्याकडून बेहदचा वारसा मिळतो. तुम्ही सदैव सुखी आणि सदा सुवासिनी बनत आहात. बाबा आपल्याला पुन्हा काय बनवतात! ही काही नवीन गोष्ट नाहीये. गायन देखील आहे - सकाळी श्रीमंत होता आणि रात्री गरीब होता. तुम्ही देखील सकाळचे (बेहदचा दिवस असतो तेव्हा) श्रीमंत असता आणि मग बेहद रात्रीमध्ये गरीब बनता. बाबा रोज-रोज आठवण करून देतात - मुलांनो, काल तर तुम्ही विश्वाचे मालक श्रीमंत होता, आज तुम्ही गरीब बनले आहात. आता पुन्हा सकाळ येते तेव्हा तुम्ही श्रीमंत बनता. किती सोपी गोष्ट आहे. तुम्हा मुलांना श्रीमंत बनण्याचा खूप आनंद झाला पाहिजे. ब्राह्मणांचा दिवस ब्राह्मणांची रात्र. आता दिवसामधे तुम्ही श्रीमंत बनत आहात आणि बनणार देखील जरूर. परंतु नंबरवार पुरुषार्था नुसार. बाबा म्हणतात - हा तोच खारा समुद्र आहे, ज्याला तुम्हीच योगबलाने पार करता. जिथे जायचे आहे त्याची आठवण राहिली पाहिजे. आता आपल्याला घरी जायचे आहे. बाबा स्वतः आले आहेत आम्हाला नेण्यासाठी. अतिशय प्रेमाने समजावून सांगतात - ‘गोड मुलांनो, तुम्हीच पावन होता, ८४ जन्म घेत-घेत पतित बनले आहात आता पुन्हा पावन बनायचे आहे. पावन बनण्याचा दुसरा कोणताही उपाय नाही’. तुम्ही जाणता, पतित-पावन येतात आणि तुम्ही त्यांच्या मतावर चालून पावन बनता. तुम्हा मुलांना खूप खुशी होते की आपण हे पद प्राप्त करणार. बाबा म्हणतात - तुम्ही २१ जन्मांसाठी कायमचे सुखी बनाल. बाबा सुख धामचा वारसा देतात आणि रावण दुःख धामचा वारसा देतो. तुम्ही मुले आता जाणता रावण तुमचा जुना शत्रू आहे, ज्याने तुम्हाला ५ विकार रुपी पिंजऱ्यामध्ये डांबून ठेवले आहे. बाबा येऊन बाहेर काढतात. जितके जे बाबांची आठवण करतात, तितका इतरांना देखील परिचय देतात. आठवण न करणारे देह-अभिमानामध्ये असतील. ते ना पित्याची आठवण करू शकत, ना पित्याचा परिचय देऊ शकत. आपण आत्मा भाऊ-भाऊ आहोत, घरून इथे आलो आहोत - भिन्न-भिन्न पार्ट बजावण्यासाठी. संपूर्ण पार्ट कसा बजावला जातो, हे देखील तुमच्या बुद्धीमध्ये आहे. ज्यांना पक्का निश्चय आहे, ते येऊन इथे रिफ्रेश होतात. इथे असे कोणते शिक्षण नाही आहे जे तुम्हाला टीचरच्या सोबतच रहावे लागेल. नाही, आपल्या घरी राहून देखील अभ्यास करू शकता. केवळ एक आठवडा व्यवस्थित समजून घ्या; मग ब्राह्मणी कोणाला एका महिन्यामध्ये, कोणाला सहा महिन्यांमध्ये, कोणाला बारा महिन्यानंतर घेऊन येते. बाबा म्हणतात - निश्चय झाला आणि हा धावला.

राखी देखील बांधायची आहे की, आम्ही विकारामध्ये जाणार नाही. आम्ही शिव बाबांसोबत प्रतिज्ञा करतो. शिवबाबाच म्हणतात - ‘मुलांनो, तुम्हाला निर्विकारी अवश्य बनायचे आहे’. जर विकारामध्ये गेलात तर जमा केलेली कमाई नष्ट होईल, १०० पटीने दंड होईल. ६३ जन्म तुम्ही गोता (धोका) खाल्ला आहे. आता म्हणतात पवित्र बना. माझी आठवण करा तर तुमची पापे भस्म होतील. आत्मा भाऊ-भाऊ आहे. कोणाच्या नावा-रूपामध्ये अडकायचे नाही. जर कोणी नियमितपणे शिकत नसेल तर घेऊन येण्याची घाई करता कामा नये. भले बाबा म्हणतात - एका दिवसामध्ये देखील तीर लागू शकतो परंतु काम देखील समजून-उमजून करायचे आहे. तुम्ही ब्राह्मण आहात सर्वात उत्तम. हे तुमचे खूप उच्च कुळ आहे. तिथे काही सत्संग इत्यादी असत नाही. सत्संग भक्तिमार्गामध्ये असतो. तुम्ही जाणता - ‘सत का संग तारे…’, सत्यचा संग मिळतोच तेव्हा, जेव्हा सतयुगाची स्थापना होणार असते. परंतु हे कोणाच्याच बुद्धीमध्ये येत नाही कारण बुद्धीला कुलूप लागलेले आहे. आता सतयुगामध्ये जायचे आहे. ‘सत्’चा संग मिळतोच मुळी पुरुषोत्तम संगमयुगावर. ते गुरु लोक काही संगमयुगी तर नाहीत. बाबा जेव्हा येतात तेव्हा ‘बेटा-बेटा’ म्हणतात. त्या गुरु लोकांना तुम्ही ‘बाबा’ थोडेच म्हणाल. बुद्धीला एकदम गोदरेजचे कुलूप लागले आहे. बाबा येऊन कुलूप उघडतात. बाबा पहा किती युक्त्या करतात जेणेकरून मनुष्य येऊन हिऱ्या प्रमाणे जीवन बनवेल. मासिक अंक, पुस्तके इत्यादी छापत राहतात. अनेकांचे कल्याण होईल तर अनेकांचे आशीर्वाद देखील मिळतील. प्रजा बनविण्याचा पुरुषार्थ केला पाहिजे. स्वतःला बंधनातून मुक्त केले पाहिजे. शरीर निर्वाह अर्थ सर्व्हिस तर जरूर करायची आहे. ईश्वरीय सेवा असते फक्त सकाळी आणि संध्याकाळची. त्यावेळी सर्वांना सवड असते, ज्यांच्या सोबत तुम्ही लौकिक सर्व्हिस करता, त्यांना देखील परिचय देत रहा की, तुम्हाला दोन पिता आहेत. लौकिक पिता सर्वांचे वेगळे आहेत. पारलौकिक पिता सर्वांचा एकच आहे. ते सुप्रीम आहेत. बाबा म्हणतात - माझा देखील पार्ट आहे. आता तुम्हा मुलांना माझा परिचय झाला आहे. आत्म्याला देखील तुम्ही जाणले आहे. आत्म्यासाठी म्हणतात - ‘भ्रकुटी के बीच चमकता है अजब सितारा…’ ते अकाल-तख्त देखील आहे. आत्म्याला कधीही काळ खात नाही. आत्मा फक्त अस्वच्छ आणि स्वच्छ बनते; आत्म्याचा तख्त शोभतो देखील भृकुटीच्या मध्यभागी. तिलक देखील इथेच लावतात. बाबा म्हणतात - तुम्ही आपल्याला आपणच राज-तिलक देण्यासाठी लायक बनवा. असे नाही की मी सर्वांना राज-तिलक देईन. तुम्ही स्वतःला द्या. बाबा जाणतात - कोण जास्त सेवा करतात. मासिकामध्ये देखील लेख खूप चांगले येतात. त्या सोबतच योगाची मेहनत देखील करायची आहे, ज्याद्वारे विकर्म विनाश होतील. दिवसेंदिवस तुम्ही चांगले राजयोगी बनाल. समजून येईल - जसे काही आता शरीर सुटत आहे, मी निघून जात आहे. सूक्ष्मवतन पर्यंत तर मुले जातात, मूलवतन देखील चांगल्या रीतीने जाणतात की आम्हा आत्म्यांचे घर आहे. मनुष्य शांतीधामासाठीच भक्ती करतात. सुखधाम विषयी तर त्यांना माहीत देखील नाहीये. स्वर्गामध्ये जाण्याचे शिक्षण बाबांशिवाय इतर कोणीही देऊ शकत नाही. हा आहे प्रवृत्ती मार्ग. दोघांना मुक्तिधाम मध्ये जायचे आहे. ती लोकं तर उलटा रस्ता सांगतात, जात मात्र कोणीच नाही. सर्वांना अंतामध्ये बाबा घेऊन जातील. ही त्यांची ड्युटी आहे. कोणी चांगल्या प्रकारे शिकून राज्य भाग्य घेतात. बाकी सर्व कसे शिकतील. ते जसे नंबरवार येतात, तसेच नंबरवार जातात. या गोष्टींमध्ये जास्त वेळ वाया घालवू नका.

जेव्हा तुम्ही म्हणता - ‘बाबांची आठवण करायला देखील वेळ मिळत नाही; तर मग यामध्ये कशासाठी वेळ वाया घालवता? हा तर निश्चय आहे की बेहदचे बाबा, टीचर गुरु देखील आहेत. मग दुसऱ्या कोणाची आठवण करण्याची गरज नाही. तुम्ही जाणता कल्पापूर्वी देखील श्रीमतावर चालून पावन बनलो होतो. वेळो-वेळी चक्र देखील फिरवत रहा. तुमचे नाव आहे - स्व-दर्शन चक्रधारी. (पाणपोई, रहाटाचे उदाहरण आहे) ज्ञान सागराद्वारे तुम्हाला भरण्यासाठी वेळ लागत नाही, रिकामे होण्यामध्ये वेळ लागतो. तुम्ही आहात गोड सिकिलधी मुले, कारण कल्पा नंतर येऊन भेटले आहात. हा पक्का निश्चय पाहिजे की, आम्ही ८४ जन्मा नंतर पुन्हा येऊन बाबांना भेटलो आहोत. बाबा म्हणतात - ‘ज्यांनी सर्वात पहिली भक्ती केली आहे तेच ज्ञान घेण्यासाठी लायक देखील सर्वात पहिले बनले आहेत कारण भक्तीचे फळ पाहिजे’. तर सदैव आपल्या फळाची (प्राप्तीची) अथवा वारशाची आठवण करत रहा. ‘फळ’ हा शब्द भक्ती मार्गातील आहे. ‘वारसा’ शब्द ठीक आहे. बेहद बाबांची आठवण केल्याने वारसा मिळतो दुसरा कोणताही उपाय नाही. भारताचा प्राचीन योग प्रसिद्ध आहे. ते समजतात की आपण भारताचा प्राचीन योग शिकतो. बाबा समजावून सांगतात की, ते ड्रामा अनुसार हठयोगी बनतात. ‘राजयोग’, आता तुम्ही शिकत आहात कारण आता संगमयुग आहे. त्यांचा धर्म वेगळा आहे. वास्तविक त्यांना गुरु करता कामा नये. परंतु हे देखील ड्रामा अनुसार तरीही करतील जरूर. तुम्हा मुलांना आता राइटियस (सत्यवादी) बनायचे आहे. रिलीजनमध्ये (धर्मामध्ये) ताकद आहे. तुम्हाला मी जे देवी-देवता बनवतो, हा धर्म खूप सुख देणारा आहे. माझी ताकद देखील त्यांना मिळते जे माझ्यासोबत योग लावतात. तर स्वतः बाबा जो धर्म स्थापन करतात, त्याच्यामध्ये खूप ताकद आहे. तुम्ही साऱ्या विश्वाचे मालक बनता. बाबा या धर्माची महिमा करतात की यामध्ये खूप माइट (ताकद) आहे. ऑलमाइटी बाबांद्वारे अनेकांना माइट (शक्ती) मिळते. वास्तविक माइट (शक्ती) तर सर्वांना मिळते परंतु नंबरवार. तुम्हाला जितकी माइट पाहिजे तितकी बाबांकडून घ्या; आणि मग दैवी गुणांचा सब्जेक्ट देखील पाहिजे. कोणालाही त्रास द्यायचा नाही, दुःख द्यायचे नाही. हे (ब्रह्मा बाबा) कधीही कोणाला उलट-सुलट शब्द बोलत नाहीत. जाणतात - ‘जसे कर्म मी करेन, मला पाहून इतरही करतील’. आसुरी गुणांमधून दैवी गुणांमध्ये यायचे आहे. पहायचे आहे कि मी कोणाला दुःख तर देत नाही ना? असा कोणीच नाही जो कोणाला दुःख देत नसेल, काही ना काही चुका होतात जरूर. ती अवस्था तर अंतामध्येच येईल, जे मनसा-वाचा-कर्मणा कोणाला दुःखच देणार नाहीत. यावेळी आपण पुरुषार्थी अवस्थेमध्ये आहोत. प्रत्येक गोष्ट नंबरवार पुरुषार्था नुसार होते. सर्वजण पुरुषार्थ सुखासाठीच करतात. परंतु बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही सुख देऊ शकत नाही. सोमनाथाच्या मंदिरामध्ये किती हिरे-माणके होती ते तर दिसून येते. ते सर्व कुठून आले, कसे श्रीमंत बनले. सारा दिवसभर याच अभ्यासाच्या चिंतनामध्ये राहिले पाहिजे. गृहस्थ व्यवहारामध्ये राहून कमलपुष्प समान पवित्र बनायचे आहे. तुम्ही हा पुरुषार्थ केला आहे तेव्हाच तर माळा बनली आहे. कल्प-कल्प बनत राहते. माळा कोणाची यादगार आहे - हे देखील तुम्ही जाणता. ते तर माळेचा जप करूनच खूप आनंदित होतात. भक्तीमध्ये काय होते आणि ज्ञानामध्ये काय होते - हे देखील तुम्हीच जाणता. तुम्ही कोणालाही समजावून सांगू शकता. पुरुषार्थ करता-करता सरते शेवटी अखेरचा रिझल्ट कल्पापूर्वी प्रमाणेच लागेल. प्रत्येकाने आपली तपासणी करत रहायची आहे. तुम्ही समजता आपल्याला हे बनायचे आहे. पुरुषार्थाची मार्जिन मिळाली आहे. नंबरवार पुरुषार्था नुसार बाबा देखील तुमचे स्वागत करतात. तुम्ही मुले जे स्वागत करता त्याहीपेक्षा जास्त बाबा तुमचे स्वागत करतात. बाबांचा धंदाच आहे - तुमचे स्वागत करणे. स्वागत अर्थात सद्गती. हे सर्वात उच्च स्वागत आहे. तुम्हा सर्वांचे स्वागत करण्यासाठी बाबा येतात. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) अनेकांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी कल्याणकारी बनायचे आहे. शरीर निर्वाह अर्थ कर्म करत असताना देखील स्वतःला बंधनातून मुक्त करून सकाळ-संध्याकाळ ईश्वरीय सेवा जरूर करायची आहे.

२) इतर गोष्टींमध्ये आपला वेळ वाया न घालवता बाबांची आठवण करून माइट (शक्ती) घ्यायची आहे. ‘सत्’च्या संगामध्येच रहायचे आहे. मनसा-वाचा-कर्मणा सर्वांना सुख देण्याचाच पुरुषार्थ करायचा आहे.

वरदान:-
पवित्रतेच्या वरदानाला मूळ संस्कार बनवून पवित्र जीवन बनविणारे मेहनत मुक्त भव

बऱ्याच मुलांना पवित्रतेसाठी खूप मेहनत करावी लागते, यावरून हे सिद्ध होते की, वरदाता - बाबांकडून जन्मजात वरदान घेतलेले नाही आहे. वरदानामध्ये कधी मेहनत नसते. प्रत्येक ब्राह्मण आत्म्याला जन्मत:च पहिले वरदान मिळाले आहे - “पवित्र भव, योगी भव’’. ज्याप्रमाणे जन्मजात संस्कार खूप पक्के असतात; तर पवित्रता ब्राह्मण जन्माचा आदि संस्कार, मूळ संस्कार आहे. याच स्मृती द्वारे पवित्र जीवन बनवा. मेहनती पासून मुक्त बना.

बोधवाक्य:-
ट्रस्टी तो आहे ज्याच्यामध्ये सेवेची शुद्ध भावना आहे.