21-04-24    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   30.03.99  ओम शान्ति   मधुबन


तीव्र पुरुषार्थाच्या उत्कटतेला ज्वाला रूप बनवून बेहदच्या वैराग्याची लाट पसरवा


आज बापदादा प्रत्येक मुलाच्या मस्तकावर तीन रेषा पाहत आहेत. ज्यामध्ये एक रेषा आहे - परमात्म पालनेच्या भाग्याची रेषा. हे परमात्म पालनेचे भाग्य संपूर्ण कल्पामध्ये आता एकदाच मिळते, या संगमयुगा शिवाय ही परमात्म पालना कधीही प्राप्त होऊ शकत नाही. हि परमात्म पालना फार थोड्या मुलांना प्राप्त होते. दुसरी रेषा आहे - परमात्म शिक्षणाच्या भाग्याची रेषा. परमात्म शिक्षण, हे किती मोठे भाग्य आहे जे स्वयं परम आत्मा शिक्षक बनून शिकवत आहेत. तिसरी रेषा आहे - परमात्म प्राप्तींची रेषा. विचार करा किती प्राप्ती आहे. सर्वांच्या लक्षात आहे ना - प्राप्तींची लिस्ट किती मोठी आहे! तर प्रत्येकाच्या मस्तकावर या तीन रेषा चमकत आहेत. स्वतःला असे भाग्यवान आत्मे समजता का? पालना, शिक्षण आणि प्राप्ती. त्याच सोबत बापदादा मुलांच्या निश्चयाच्या आधारावर आत्मिक नशेला देखील पाहत आहेत. प्रत्येक परमात्म मुलगा किती आत्मिक नशेवाली आत्मा आहे! संपूर्ण विश्वामध्ये आणि संपूर्ण कल्पामध्ये सर्वात हायेस्ट देखील आहेत, महान देखील आहेत आणि होलिएस्ट देखील आहेत. तुमच्या सारखे पवित्र आत्मे तनाने देखील, मनाने देखील देव रूपामध्ये सर्व गुण संपन्न, संपूर्ण निर्विकारी इतर कोणीही बनत नाही. आणि मग हाइयेस्ट सुद्धा आहात, होलिएस्ट सुद्धा आहात त्याच सोबत रिचेस्ट सुद्धा आहात. बापदादा स्थापनेच्या वेळी देखील मुलांना स्मृती करून देत होते आणि अभिमानाने वर्तमानपत्रांमध्ये देखील दिले कि, “ओम मंडळी रिचेस्ट इन दी वर्ल्ड”. हि स्थापनेच्या वेळची तुम्हा सर्वांची महिमा आहे. एका दिवसामध्ये कितीही मोठ्यात-मोठा मल्टी-मल्टी मिलिनियर असला तरीही तुमच्या सारखा रिचेस्ट होऊ शकत नाही. इतके रिचेस्ट बनण्याचे साधन कोणते आहे? खूप छोटेसे साधन आहे. लोक रिचेस्ट बनण्यासाठी किती मेहनत करतात आणि तुम्ही किती सहज मालामाल बनता. जाणता ना साधन! फक्त छोटासा बिंदू लावायचा आहे, बस्स. बिंदू लावला, कमाई झाली. आत्मा देखील बिंदू, बाबा देखील बिंदू आणि ड्रामाचा फुलस्टॉप लावणे, तो देखील बिंदू आहे. तर बिंदू आत्म्याची आठवण केली, कमाई वाढली. तसे लौकिकमध्ये सुद्धा पहा, बिंदूनेच संख्या वाढते. एकाच्या पुढे बिंदू लावा तर काय होते? १० होतात, दोन बिंदू लावा, तीन बिंदू लावा, चार बिंदू लावा वाढत जाते. तर तुमचे साधन किती सोपे आहे! “मी आत्मा आहे” - हा स्मृतीचा बिंदू लावणे अर्थात खजिना जमा करणे. त्या नंतर “बाबा” बिंदू लावा आणि खजिना जमा. कर्मामध्ये, संबंध-संपर्कामध्ये ड्रामाचा फुलस्टॉप लावा, झालेल्या गोष्टींना फुलस्टॉप लावला आणि खजिना वाढतो. तर सांगा संपूर्ण दिवसभरामध्ये किती वेळा बिंदू लावता? आणि बिंदू लावणे किती सोपे आहे! अवघड आहे का? बिंदू निसटून जातो का?

बापदादांनी कमाईचे साधन फक्त हेच शिकवले आहे कि बिंदू लावत जा, तर सर्वांना बिंदू लावता येतो का? जर येत असेल तर एका हाताची टाळी वाजवा. पक्के आहे ना! का कधी बिंदू निसटून जातो, कधी लागतो? सर्वात सोपे आहे - बिंदू लावणे. समजा कोणी या स्थूल डोळ्यांनी आंधळा देखील असेल, तो देखील जर कागदावर पेन्सिल ठेवेल तर लगेच बिंदू उमटतो आणि तुम्ही तर त्रिनेत्री आहात, त्यामुळे या तीन बिंदूंना सदैव यूज करा. प्रश्नचिन्ह किती वाकडेतिकडे आहे, लिहून पहा, वाकडे आहे ना? आणि बिंदू किती सोपा आहे म्हणून बापदादा विविध प्रकारे मुलांना समान बनण्याची विधी सांगत राहतात. विधी आहेच - बिंदू. दुसरी कोणतीही विधी नाही. जर विदेही बनता तरी देखील विधी आहे - बिंदू बनणे. अशरीरी बनता, कर्मातीत बनता, सर्वांची विधी बिंदू आहे म्हणून बापदादांनी यापूर्वी देखील सांगितले आहे - अमृतवेलेला बापदादांसोबत भेटीचा आनंद घेऊन, रुहरिहान करून मग जेव्हा कार्यव्यवहारामध्ये येता तर पहिल्यांदा तीन बिंदूंचा तिलक मस्तकावर लावा, तो लाल गंधाचा टिळा लावायला सुरु करू नका परंतु स्मृतीचा तिलक लावा. आणि चेक करा - कोणत्याही कारणाने हा स्मृतीचा तिलक पुसला जाऊ नये. अविनाशी, अमिट तिलक आहे?

बापदादा मुलांचे प्रेम देखील पाहतात, किती प्रेमाने धावत-पळत भेटण्यासाठी पोहोचतात आणि आज मग हॉलमध्ये देखील भेटण्याचा आनंद लुटण्यासाठी किती मेहनतीने, किती प्रेमाने, झोप-तहान विसरून पहिल्या लाईनमध्ये जवळ बसण्याचा पुरुषार्थ करतात. बापदादा सर्वकाही बघत असतात, काय-काय करत असतात तो सर्व ड्रामा बघत असतात. बापदादा मुलांच्या प्रेमावर बलिहार देखील जातात आणि हे देखील मुलांना सांगतात जसे साकारमध्ये भेटण्यासाठी धावत-पळत येता, असेच बाप समान बनण्यासाठी देखील तीव्र पुरुषार्थ करा, यामध्ये विचार करता ना कि सर्वात समोर पुढे नंबर मिळावा. सर्वांना तर मिळत नाही, इथे साकारी दुनिया आहे ना! तर साकारी दुनियेचे नियम पाळावे लागतात. बापदादा त्यावेळी विचार करतात की सर्वांनीच अगदी पुढे असावे परंतु असे होऊ शकते का? होत देखील आहे, ते कसे? मागे बसणाऱ्यांना बापदादा सदैव डोळ्यांमध्ये सामावलेले आहेत असेच पाहतात. तर सर्वात जवळ आहेत डोळे. तर मागे बसलेले नाही आहात परंतु बापदादांच्या डोळ्यांमध्ये बसले आहात. नुरे रत्न आहात. पाठीमागच्या सर्वांनी ऐकले का? दूर नाही आहात, समीप आहात. शरीराने मागे बसले आहात परंतु आत्मा सर्वात समीप आहे. आणि बापदादा तर सर्वात जास्त मागे बसणाऱ्यांनाच पाहतात. पहा, जवळ बसलेल्यांना या स्थूल डोळ्यांनी बघण्याचा चांस आहे आणि मागे बसलेल्याना या डोळ्यांनी जवळून बघण्याचा चान्स नाही त्यामुळे बापदादा डोळ्यांमध्ये सामावून घेतात.

बापदादा हसत असतात, दोन वाजतात आणि लाइन सुरु होते. बापदादा समजतात कि मुले उभे राहून थकून देखील जातात परंतु बापदादा सर्व मुलांना प्रेमाचा मसाज करतात. पायांना मसाज होतो. बापदादांचा मसाज पाहिला आहे ना - एकदम न्यारा आणि प्यारा आहे. तर आज सर्वजण या सीझनचा लास्ट चान्स घेण्यासाठी चारही दिशांनी धावत-पळत पोहोचले आहेत. चांगले आहे. बाबांना भेटण्याचा उमंग-उत्साह सदैव पुढे घेऊन जातो. परंतु बापदादा तर मुलांना एक सेकंद देखील विसरत नाहीत. बाबा एक आहेत आणि मुले अनेक परंतु अनेक मुले असून देखील एक सेकंद सुद्धा विसरत नाहीत कारण सिकीलधे आहात (खूप-खूप वर्षांनी भेटला आहात). बघा कुठून-कुठून देश-विदेशच्या कानाकोपऱ्यातून बाबांनीच तुम्हाला शोधून काढले. तुम्ही बाबांना शोधू शकला का? भटकत राहिलात परंतु भेटू शकला नाहीत आणि बाबांनी विभिन्न देश, गावे, वाड्या जिथे-जिथे बाबांची मुले आहेत, तिथून शोधून काढले. आपले बनवले. हे गाणे गाता ना - ‘मैं बाबा का और बाबा मेरा’. ना जात पाहिली, ना देश पाहिला, ना रंग पाहिला, सर्वांच्या मस्तकावर एकच आत्मिक रंग पाहिला - ‘ज्योती बिंदू’. डबल फॉरेनर्स काय समजता? बाबांनी जात पाहिली? काळा आहे, गोरा आहे, सावळा आहे, सुंदर आहे? काहीही पाहिले नाही. ‘माझे आहेत’ - एवढेच पाहिले. तर सांगा बरे, बाबांचे प्रेम आहे का तुमचे प्रेम आहे? कोणाचे आहे? (दोघांचेही आहे) मुले देखील उत्तर देण्यामध्ये हुशार आहेत, म्हणतात - ‘बाबा, तुम्हीच म्हणता की प्रेमाला प्रेम आकर्षित करते, तर तुमचे प्रेम आहे परंतु माझे (शिवबाबांचे) आहे तेव्हाच तर आकर्षित करते. मुले देखील हुशार आहेत आणि बाबांना आनंद आहे कि इतकी हिम्मत, उमंग-उत्साह ठेवणारी मुले आहेत.

बापदादांकडे बऱ्याच मुलांचा १५ दिवसांच्या चार्टचा रिझल्ट आला आहे. एक गोष्ट तर बापदादांनी चोहो बाजूच्या रिझल्टमध्ये पाहिली की मेजॉरिटी मुलांचे अटेंशन राहिले आहे. पर्सेंटेज जितकी स्वतःला हवी तितकी नाहीये, परंतु अटेन्शन आहे आणि जी तीव्र पुरुषार्थी मुले आहेत ती मनातल्यामनात आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्याच्या ध्येयाने पुढे जात देखील आहेत. आणि पुढे जात-जात लक्ष्यापर्यंत पोहोचतीलच. मायनॉरिटी (थोडेजण) अजूनही कधी निष्काळजीपणामुळे आणि कधी आळसाच्या अधीन होऊन अटेन्शन देखील कमी देत आहेत. त्यांचे एक विशेष स्लोगन आहे - ‘होऊन जाऊ, होऊच…’, ‘होणार आहे’, नाही, ‘होऊ’. ‘होऊन जाऊ’ हा आहे निष्काळजीपणा. ‘होणारच आहे’, हा आहे तीव्र पुरुषार्थ. बापदादा आश्वासने खूप ऐकतात, वारंवार आश्वासने खूप चांगली करतात. मुले आश्वासने इतकी हिम्मत ठेवून देतात कि त्यावेळी बापदादांना देखील मुले दिलखुश मिठाई खाऊ घालतात. बाबा देखील खातात. परंतु आश्वासन अर्थात पुरुषार्थामध्ये जास्तीत जास्त फायदा. जर फायदा नसेल तर याचा अर्थ आश्वासन समर्थ नाही आहे. तर आश्वासन भले करा तरी सुद्धा दिलखुश मिठाई तर खाऊ घालता ना! त्याच सोबत तीव्र पुरुषार्थाच्या उत्कटतेला अग्नी रूपामध्ये आणा. ज्वालामुखी बना. काळानुसार जे काही मनाचे, संबंध-संपर्काचे हिशोब राहिलेले आहेत त्याला ज्वाला स्वरूपाने भस्म करा. लगन (उत्कट प्रेम) आहे, यामध्ये बापदादा देखील पास करतात परंतु आता उत्कटतेला अग्नी स्वरूपामध्ये आणा.

विश्वामध्ये एका बाजूला भ्रष्टाचार, अत्याचाराचा अग्नी असेल, दुसऱ्या बाजूला तुम्हा मुलांचा पॉवरफुल योग अर्थात उत्कटतेचा अग्नी, ज्वाला-रूपामध्ये आवश्यक आहे. हे ज्वाला-रूप या भ्रष्टाचाराच्या, अत्याचाराच्या, अग्नीला नाहीसे करेल आणि सर्व आत्म्यांना सहयोग देईल. तुमची लगन (उत्कटता) ज्वाला-रूपी पाहिजे म्हणजेच पॉवरफुल योग असावा, तर हा आठवणीचा अग्नी, त्या अग्नीला नाहीसा करेल आणि दुसऱ्या बाजूला आत्म्यांना परमात्म संदेशाची, शीतल स्वरूपाची अनुभूती करवेल. बेहदची वैराग्य वृत्ती प्रज्वलीत करेल. एका बाजूला भस्म करेल दुसऱ्या बाजूला शीतल देखील करेल. बेहदच्या वैराग्याची लाट पसरवेल. मुले म्हणतात - ‘माझा योग तर आहे, बाबांशिवाय आणखी कोणीही नाही’, हे तर खूपच चांगले आहे. परंतु वेळेनुसार आता ज्वाला-रूप बना. जे यादगार (स्मृतीरूपामध्ये) शक्तींचे शक्ती रूप, महाशक्ती रूप, सर्व शस्त्रधारी दाखविले आहे, आता ते महाशक्ती रूप प्रत्यक्ष करा. भले पांडव असोत, किंवा शक्ती असोत, सर्व सागरातून निघालेल्या ज्ञान नद्या आहात, सागर नाही, नदी आहात. ज्ञान गंगा आहात. तर ज्ञान गंगा आता आत्म्यांना आपल्या ज्ञानाच्या शीतलतेद्वारे पापांच्या आगीपासून मुक्त करा. हे आहे वर्तमान समयीचे ब्राह्मणांचे कर्तव्य.

सर्व मुले विचारतात कि, ‘या वर्षी कोणती सेवा करायची?’ तर बापदादा पहिली सेवा हीच सांगत आहेत कि, समयानुसार सर्व मुले वानप्रस्थ अवस्थेमध्ये आहेत. तर वानप्रस्थी आपला वेळ, साधन सर्वकाही मुलांना देऊन स्वतः वानप्रस्थ स्वीकारतात. तर तुम्ही सर्वांनी आपला वेळेचा खजिना, श्रेष्ठ संकल्पांचा खजिना आता इतरांप्रती लावा. स्वतःसाठी वेळ, संकल्प कमी वापरा. इतरांसाठी वापरल्याने स्वतः देखील त्या सेवेचे प्रत्यक्षफळ खाण्याच्या निमित्त बनाल. मनसा सेवा, वाचा सेवा आणि सर्वात जास्त - भले मग ब्राह्मण असो नाहीतर इतर जे कोणी संबंध-संपर्कामध्ये येतात त्यांना काही ना काही मास्टर दाता बनून देत जा. निःस्वार्थ बनून खुशी द्या, शांती द्या, आनंदाची अनुभूती करवा, प्रेमाची अनुभूती करवा. द्यायचे आहे आणि देणे म्हणजे आपोआपच घेणे आहे. जो पण ज्या वेळी, ज्या रूपामध्ये संबंध-संपर्कामध्ये येईल काही तरी घेऊन जाईल. तुम्हा मास्टर दात्याकडे येऊन रिकाम्या हाताने जाऊ नये. जसे ब्रह्मा बाबांना पाहिले - चालता-फिरता देखील जर कोणताही मुलगा समोर आला तर काही ना काही अनुभूती केल्याशिवाय रिकामा जात नव्हता. हे चेक करा - जो पण आला, भेटला तर त्याला काही दिले कि रिकामा गेला? खजिन्याने जे भरपूर असतात ते दिल्याशिवाय राहू शकत नाहीत. अखूट, अखंड दाता बना. ‘कोणी मागावे’, असे नाही. दाता कधी हे पाहत नाही कि हा मागेल तेव्हा मी देईन. अखूट महादानी, महादाता आपणहूनच देतो. तर पहिली सेवा या वर्षी - ‘महान दाता’ बनण्याची करा. तुम्ही, दात्याकडून मिळालेले देता. ब्राह्मण काही भिकारी नाहीत परंतु सहयोगी आहेत. तर आपसामध्ये ब्राह्मणांनी एकमेकांना ‘दान’ द्यायचे नाहीये, तर ‘सहयोग’ द्यायचा आहे. हि आहे एक नंबरची सेवा. आणि त्याच सोबत बापदादांनी विदेशच्या मुलांची खुशखबरी ऐकली; तर बापदादांनी पाहिले कि जे या सृष्टीवर आवाज पसरविण्याच्या निमित्त बनणाऱ्यांना बापदादांनी जे ‘माइक’ नाव दिले आहेत ते विदेशच्या मुलांनी आपसामध्ये हे कार्य केले आहे आणि जर प्लॅन बनला आहे तर प्रॅक्टिकल होणारच आहे. परंतु भारतामध्ये देखील जे १३ झोन आहेत, प्रत्येक झोन मधून कमीतकमी एक असा विशेष निमित्त सेवाधारी बनावा; ज्याला माइक म्हणा किंवा काहीही म्हणा, आवाज पसरविणारे कोणीतरी निमित्त बनवा; हे बापदादांनी कमीतकमी म्हटले आहे परंतु जर मोठ-मोठ्या देशामध्ये असे निमित्त बनणारे असतील तर फक्त झोनवालेच नाहीत परंतु मोठ्या देशातून देखील असे माईक तयार करून प्रोग्राम बनवायचे आहेत. बापदादांनी विदेशच्या मुलांना मनापासून शुभेच्छा दिल्या, आता मुखाने देखील देत आहेत कि, प्लॅन प्रॅक्टिकलमध्ये आणण्यापूर्वी बापदादांसमोर आणला. तसेही बापदादा जाणतात कि, भारतामध्ये अजूनच सोपे आहे परंतु अजून थोडी क्वालिटीवाली सेवा करून सहयोगी असणाऱ्यांना समीप आणा. सहयोगी भरपूर आहेत परंतु संघटनमध्ये त्यांना अजून समीप आणा.

त्याच सोबत ब्राह्मण आत्म्यांमध्ये आणखीनच समीप आणण्यासाठी, प्रत्येक बाजूला किंवा मधुबनमध्ये चोहो बाजूला ज्वाला स्वरूपाचे वायुमंडळ बनविण्यासाठी, ज्याला तुम्ही भट्टी म्हणता ते करा, किंवा आपसात संघटनमध्ये रुहरिहान (आत्मिक बातचीत) करून ज्वाला स्वरूपाचा अनुभव करवा आणि पुढे जाण्यासाठी चालना द्या. जेव्हा हि सेवा करायला लागाल तर ज्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ना - ज्यामध्ये वेळ जातो, मेहनत करावी लागते, दिलशिकस्त होतात (निराश होतात) ते सर्व असे वाटेल जसे ज्वालामुखी हाइयेस्ट स्टेज आणि त्याच्या समोर हे वेळ देणे, मेहनत करणे, हा जणू बाहुल्यांचा खेळ अनुभव होईल. आपोआप आणि सहजच सेफ (सुरक्षित) व्हाल. बापदादांनी सांगितले ना कि, बापदादांना सर्वात जास्त दया तेव्हा येते जेव्हा बघतात कि, मास्टर सर्वशक्तीवान मुले आणि छोट्या-छोट्या गोष्टींसाठी मेहनत करत राहतात. ज्वालामुखी रूपाचे प्रेम कमी आहे म्हणूनच मेहनत करावी लागते. तर आता मेहनत करण्यापासून मुक्त बना, निष्काळजी होऊ नका परंतु मेहनत करण्यापासून मुक्त व्हा. असा विचार करू नका की, मेहनत तर करायची नाहीये तर मग आरामात झोपून जाऊया. परंतु प्रेमाने मेहनत समाप्त करा. निष्काळजीपणाने नाही. समजले! काय करायचे आहे?

आता बापदादांना यायचे तर आहेच. विचारतात पुढे काय होणार? बापदादा येणार की नाही येणार? बापदादा ‘ना’ तर करत नाहीत, ‘हां जी, हां जी’ करतात. मुले म्हणतात - हजूर, बाबा म्हणतात - जी हाजिर. तर समजले, काय करायचे आहे, काय नाही करायचे ते, मेहनतीला प्रेमाने कट करा (संपवून टाका). आता मेहनत मुक्त वर्ष साजरे करा - प्रेमाने, आळसाने नाही. हे पक्के लक्षात ठेवा - आळस नको.

ठीक आहे, सर्व संकल्प पूर्ण झाले? काही राहिले आहेत काय? जनकला (जानकी दादींना) विचारत आहेत काही राहिले आहे? दादी तर हसत आहेत. खेळ पूर्ण झाला? हे ऑपरेशन देखील काय आहे? खेळामध्ये खेळ आहे. खेळ चांगला झाला ना!

(ड्रिल) सेकंदामध्ये बिंदू स्वरूप बनून मन-बुद्धीला एकाग्र करण्याचा अभ्यास वारंवार करा. स्टॉप म्हटले आणि सेकंदामध्ये व्यर्थ देह-भानापासून मन-बुद्धी एकाग्र व्हावी. अशी कंट्रोलिंग पॉवर संपूर्ण दिवसभरामध्ये यूज करून बघा. असे नाही, ऑर्डर कराल - कंट्रोलला आणि २ मिनिटानंतर कंट्रोल होईल, ५ मिनिटानंतर कंट्रोल होईल, म्हणूनच मधून-मधून कंट्रोलिंग पॉवरला यूज करून पाहत जा. सेकंदामध्ये होते, मिनिटामध्ये होते, जास्त मिनिटामध्ये होते, हे सर्व चेक करत रहा. आता सर्वांनी तीन महिन्याचा चार्ट आणखी पक्का करायचा आहे. सर्टिफिकेट घ्यायचे आहे. पहिले आपणच आपल्याला सर्टिफिकेट द्या नंतर मग बाप-दादा देतील. अच्छा!

चोहो बाजूंच्या परमात्म पालनेच्या अधिकारी आत्म्यांना, परमात्म शिक्षणाच्या अधिकारी श्रेष्ठ आत्म्यांना, परमात्म प्राप्तींनी संपन्न आत्म्यांना, सदैव बिंदूच्या विधीने तीव्र पुरुषार्थी आत्म्यांना, सदैव मेहनती पासून मुक्त राहणाऱ्या प्रेमामध्ये सामावून राहणाऱ्या मुलांना, ज्वाला स्वरूप विशेष आत्म्यांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

वरदान:-
शुद्ध आणि समर्थ संकल्पांच्या शक्तीने व्यर्थ व्हायब्रेशनला समाप्त करणारे सच्चे सेवाधारी भव

असे म्हटले जाते - संकल्प सुद्धा सृष्टी बनवतो. जेव्हा कमजोर आणि व्यर्थ संकल्प करता तर व्यर्थ वायुमंडळाची सृष्टी बनते. सच्चे सेवाधारी ते आहेत जे आपल्या शुद्ध शक्तीशाली संकल्पांद्वारे जुन्या व्हायब्रेशनला देखील समाप्त करतात. जसे वैज्ञानिक, शस्त्राला शस्त्राने नष्ट करतात, एका विमानाने दुसऱ्या विमानाला खाली पाडतात, तसे तुमच्या शुद्ध, समर्थ संकल्पांचे व्हायब्रेशन, व्यर्थ व्हायब्रेशनला समाप्त करू देत, आता अशी सेवा करा.

सुविचार:-
विघ्नरुपी सोन्याच्या सूक्ष्म धाग्यांपासून मुक्त बना, मुक्ती वर्ष साजरे करा.

सूचना:- आज महिन्याचा तिसरा रविवार आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे, सर्व ब्रह्मावत्स संघटीत रूपामध्ये सायंकाळी ६.३० ते ७.३० वाजेपर्यंत विशेष आपल्या पूज्य स्वरूपामध्ये स्थित होऊन, स्वतःला इष्ट देव, इष्ट देवी समजून आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करा, नजरेने निहाल करण्याची, दर्शनीय मूर्ती बनून सर्वांना दर्शन घडवत प्रसन्न करण्याची सेवा करा.