22-04-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - सर्वांचे सद्गती दाता एक बाबा आहेत, बाबांसारखी निष्काम सेवा इतर कोणीही करू शकत नाही”

प्रश्न:-
न्यू वर्ल्ड (नवीन दुनिया) स्थापन करण्यासाठी बाबांना कोणती मेहनत करावी लागते?

उत्तर:-
बाबांना, एकदम अजामिल सारख्या पापींना पुन्हा लक्ष्मी-नारायणा समान पूज्य देवता बनविण्याची मेहनत करावी लागते. बाबा तुम्हा मुलांना देवता बनविण्याची मेहनत करतात. बाकी सर्व आत्मे परत शांतीधाममध्ये जातात. प्रत्येकाला आपला हिशोब चुकता करून, लायक बनून परत घरी जायचे आहे.

गीत:-
इस पाप की दुनिया से…

ओम शांती।
गोड-गोड रूहानी मुलांनी गाणे ऐकले. मुले जाणतात ही आहे पापी दुनिया. नवीन दुनिया असते - पुण्याची दुनिया. तिथे कोणतेही पाप नाही. ते आहे राम राज्य, हे आहे रावण राज्य. या रावण राज्यामध्ये सर्व पतित दुःखी आहेत, तेव्हाच तर बोलावतात - ‘हे पतित-पावन येऊन आम्हाला पावन बनवा’. सगळ्या धर्माचे बोलावतात - ‘ओ गॉड फादर, येऊन आम्हाला लिबरेट करा (मुक्त करा), गाईड बना’. जणूकाही बाबा जेव्हा येतात तर संपूर्ण सृष्टीमध्ये जे कोणते धर्म आहेत त्या सर्वांना घेऊन जातात. यावेळी सर्वजण रावण राज्यामध्ये आहेत. सर्व धर्मवाल्यांना परत शांतीधाम मध्ये घेऊन जातात. विनाश तर सर्वांचा होणारच आहे. बाबा इथे येऊन मुलांना सुखधामच्या लायक बनवतात. सर्वांचे कल्याण करतात, म्हणून एकालाच ‘सर्वांचा सद्गती दाता, सर्वांचे कल्याण करणारा’ असे म्हटले जाते. बाबा म्हणतात - आता तुम्हाला परत जायचे आहे. सर्व धर्मवाल्यांना शांतीधाम, निर्वाणधामला जायचे आहे, जिथे सर्व आत्मे शांती मध्ये राहतात. बेहदचे बाबा जे रचयिता आहेत, तेच येऊन सर्वांना मुक्ती आणि जीवन मुक्ती देतात. तर महिमा देखील त्या एका गॉडफादरची केली पाहिजे. जे येऊन सर्वांची सेवा करतात, त्यांचीच आठवण केली पाहिजे. बाबा स्वतः समजावून सांगतात - ‘मी दूर देश, परमधामचा राहणारा आहे’. सर्वात आधी जो आदि सनातन देवी-देवता धर्म होता, तो आता अस्तित्वात नाही आहे म्हणून मला बोलावतात. मी येऊन सर्व मुलांना परत घेऊन जातो. आता हिंदू हा काही धर्म नाही आहे. मुळात आहे देवी-देवता धर्म. परंतु पवित्र नसल्या कारणाने स्वतःला ‘देवता’ न म्हणता ‘हिंदू’ म्हटले आहे. हिंदू धर्माची स्थापन करणारा तर कोणीच नाहीये. गीताच ‘सर्व शास्त्र शिरोमणी’ आहे. ती भगवंताने गायली आहे. त्या एका भगवंतालाच म्हटले जाते - गॉडफादर. श्रीकृष्ण अथवा लक्ष्मी-नारायणाला गॉडफादर किंवा पतित-पावन म्हणणार नाही. ते तर राजा-राणी आहेत. त्यांना असे कोणी बनवले? बाबांनी. बाबा प्रथम नवीन दुनिया रचतात, ज्याचे ते मालक बनतात. कसे बनले, हे कोणी मनुष्य मात्र जाणत नाहीत. मोठे-मोठे लखपती मंदिर इत्यादी बांधतात. त्यांना विचारले पाहिजे - यांनी हे विश्वाचे राज्य कसे मिळवले? कसे मालक बनले? परंतु कधीही कोणी सांगू शकणार नाही. असे कोणते कर्म केले ज्याचे इतके फळ मिळाले? आता बाबा समजावून सांगतात - तुम्ही आपल्या धर्माला विसरले आहात. आदि सनातन देवी-देवता धर्माला न जाणल्या कारणाने सर्वजण दुसऱ्या-दुसऱ्या धर्मांमध्ये कन्व्हर्ट झाले आहेत. ते मग आपल्या-आपल्या धर्मामध्ये परत जाणार. जे आदि सनातन देवी-देवता धर्माचे आहेत, ते परत आपल्या धर्मामध्ये येतील. ख्रिश्चन धर्माचा असेल तो मग ख्रिश्चन धर्मामध्ये येईल. हे आदि सनातन देवी-देवता धर्माचे सॅम्पलिंग (कलम) लागत आहे. जो-जो ज्या धर्माचा आहे, त्यांना आपापल्या धर्मामध्ये यावे लागेल. हे झाड आहे, याच्या तीन ट्यूब्स (फांद्या) आहेत आणि मग त्यापासून वृद्धी होत जाते. हे नॉलेज इतर कोणीही देऊ शकणार नाही. आता बाबा म्हणतात - तुम्ही आपल्या धर्मामध्ये या. कोणी म्हणतात - ‘मी संन्यास धर्मामध्ये जातो, संन्यासी रामकृष्ण परमहंस यांचा मी फॉलोअर आहे’. आता ते आहेत निवृत्ती मार्गवाले, तुम्ही आहात प्रवृत्ती मार्गवाले. गृहस्थ मार्गवाले निवृत्ती मार्गवाल्यांचे फॉलोअर्स कसे बरे होऊ शकतात! तुम्ही आधी प्रवृत्ती मार्गामध्ये पवित्र होता. मग रावणा द्वारे तुम्ही अपवित्र बनले आहात. या गोष्टी बाबा समजावून सांगतात. तुम्ही आहात गृहस्थ आश्रमवाले, भक्ती देखील तुम्हाला करायची आहे. बाबा येऊन भक्तीचे फळ - सद्गती देतात. म्हटले जाते - रिलीजन इज माइट (धर्म एक शक्ती आहे). बाबा धर्म स्थापन करतात. तुम्ही साऱ्या विश्वाचे मालक बनता. बाबांकडून तुम्हाला किती माइट मिळते (शक्ती मिळते). एक सर्व शक्तिमान बाबाच येऊन सर्वांची सद्गती करतात, इतर कोणीही सद्गती देऊ शकत नाही, ना स्वतः प्राप्त करू शकत. इथेच वृद्धी होत जाते. परत कोणीही जाऊ शकत नाही. बाबा म्हणतात - ‘मी सर्व धर्मांचा सेवक आहे, सर्वांना येऊन सद्गती देतो’. सद्गती म्हटले जाते - सतयुगाला. मुक्ती आहे - शांतिधाममध्ये. तर सर्वात मोठे कोण झाले? बाबा म्हणतात - ‘हे आत्म्यांनो, तुम्ही सर्व भाऊ-भाऊ आहात, सर्वांना बाबांकडून वारसा मिळतो. येऊन सर्वांना आपल्या-आपल्या सेक्शनमध्ये पाठविण्यालायक बनवितो’. जर लायक बनले नाहीत तर शिक्षा भोगाव्या लागतात. हिशोब चुकता करून मग परत जातात. ते आहे - शांतीधाम आणि ते आहे - सुखधाम.

बाबा म्हणतात - मी येऊन न्यू वर्ल्ड स्थापन करतो, यासाठी मेहनत करावी लागते. एकदम अजामील सारख्या पापी असणाऱ्यांना येऊन असे देवी-देवता बनवतो. जेव्हापासून तुम्ही वाममार्गामध्ये गेला आहात तर शिडी खालीच उतरत आलेले आहात. ही ८४ जन्मांची शिडी आहे खाली उतरण्याची. सतोप्रधाना पासून सतो, रजो, तमो… आता हे आहे संगम. बाबा म्हणतात - मी येतोच एकदा. मी काही इब्राहिम, बुद्धाच्या तनामध्ये येत नाही. मी पुरुषोत्तम संगम युगावरच येतो. आता सांगितले जाते - फॉलो फादर. बाबा म्हणतात - ‘तुम्हा सर्व आत्म्यांना मलाच फॉलो करायचे आहे’. मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर तुमची पापे योग अग्नीमध्ये भस्म होतील. याला म्हटले जाते योग अग्नी. तुम्ही आहात सच्चे-सच्चे ब्राह्मण. तुम्ही काम चितेवरून उतरून ज्ञान चितेवर बसता. हे एक बाबाच समजावून सांगतात. क्राईस्ट, बुद्ध इत्यादी सर्व एकाचीच आठवण करतात. परंतु त्यांना कोणी यथार्थ रित्या जाणत नाही. आता तुम्ही आस्तिक बनले आहात. रचता आणि रचनेला तुम्ही बाबांद्वारे जाणले आहे. ऋषी-मुनी सर्व नेती-नेती म्हणत होते, म्हणजे आम्ही जाणत नाही. स्वर्ग आहे सचखंड, दुःखाचे नाव सुद्धा नाही. इथे किती दुःख आहे. वयोमान देखील खूप कमी आहे. देवतांचे वयोमान किती जास्त आहे. ते आहेत पवित्र योगी. इथे आहेत अपवित्र भोगी. शिडी उतरत-उतरत वयोमान कमी होत जाते. अकाली मृत्यू देखील होत राहतात. बाबा तुम्हाला असे बनवतात जेणेकरून तुम्ही २१ जन्म कधीही रोगी बनणार नाही. तर अशा बाबांकडून वारसा घेतला पाहिजे. आत्म्याला किती हुशार बनले पाहिजे. बाबा असा वारसा देतात ज्यामुळे तिथे कोणतेही दुःख नसते. तुमचे रडणे-ओरडणे बंद होते. सर्व पार्टधारी आहेत. आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेते. हा देखील ड्रामा. बाबा कर्म, अकर्म, विकर्माची गती सुद्धा समजावून सांगतात. ब्रह्माचा दिवस आणि रात्र याचे गायन आहे. ब्रह्माचा दिवस-रात्र सो ब्राह्मणांचा. आता तुमचा दिवस होणार आहे. महाशिवरात्री म्हणतात. आता भक्तीची रात्र पूर्ण होऊन ज्ञानाचा उदय होतो. आता आहे संगम. तुम्ही आता पुन्हा स्वर्गवासी बनत आहात. अंधाऱ्या रात्रीमध्ये तुम्ही धक्के देखील खाल्लेत, डोके देखील घासलेत, पैसे सुद्धा संपवलेत. आता बाबा म्हणतात - ‘मी आलो आहे तुम्हाला शांतीधाम आणि सुखधाममध्ये घेऊन जाण्यासाठी. तुम्ही सुखधामचे रहिवासी होता. ८४ जन्मानंतर दुःखधाममध्ये येऊन पडला आहात. आणि मग पुकारता - ‘बाबा, या जुन्या दुनियेमध्ये या’. ही तुमची दुनिया नाही आहे. तुम्ही आता योगबलाने स्वतःची दुनिया स्थापन करत आहात. तुम्हाला आता डबल अहिंसक बनायचे आहे. ना काम कटारी चालवायची आहे, ना भांडण-तंटा करायचा आहे. बाबा म्हणतात - मी दर पाच हजार वर्षानंतर येतो. हे कल्प ५००० वर्षांचे आहे, ना की लाखो वर्षांचे. जर लाखो वर्षांचे असले असते मग तर इथे लोकसंख्या खूप जास्ती झाली असती. थापा मारत राहतात. म्हणून बाप म्हणतात - ‘मी कल्प-कल्प येतो, माझा देखील ड्रामामध्ये पार्ट आहे. पार्ट शिवाय मी काहीही करू शकत नाही. मी देखील ड्रामाच्या बंधनामध्ये आहे’. बरोबर वेळेवर येतो, ‘मनमनाभव’. परंतु याचा अर्थ कोणीच जाणत नाही. बाबा म्हणतात - ‘देहाच्या सर्व संबंधांना सोडून मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर सर्व पावन बनतील. मुले बाबांची आठवण करण्यासाठी मेहनत करत राहतात.

हे आहे ईश्वरीय विश्वविद्यालय. असे विद्यालय आणखी कोणते असू शकत नाही. इथे ईश्वर बाबा येऊन साऱ्या विश्वाला बदलून टाकतात. नरकापासून स्वर्ग बनवतात, ज्यावर तुम्ही राज्य करता. आता बाबा म्हणतात - ‘माझी आठवण करा तर तुम्ही तमोप्रधाना पासून सतोप्रधान बनाल. हा (ब्रह्मा बाबा) आहे बाबांचा भाग्यशाली रथ, ज्यामध्ये बाबा येऊन प्रवेश करतात. शिवजयंती विषयी कोणीही जाणत नाही. ते तर म्हणतात, परमात्मा नावा-रुपापासून न्यारा आहे. अरे, नावा-रुपापासून न्यारी कोणती वस्तू असतच नाही. जसे म्हणतात, ‘हे आकाश आहे’, तर ‘आकाश’ हे नाव झाले ना. भले पोलार आहे (पोकळी आहे), परंतु तरी देखील नाव आहे. तर बाबांचे देखील नाव आहे - ‘कल्याणकारी’. मग भक्ती मार्गामध्ये बरीच नावे ठेवतात. ‘बाबुरीनाथ’ असे सुद्धा म्हणतात. ते येऊन काम कटारी पासून सोडवून पावन बनवितात. निवृत्ती मार्गवाले ब्रह्मालाच परमात्मा मानतात, त्यांचीच आठवण करतात. त्यांना ‘ब्रह्म योगी’, ‘तत्त्व योगी’ म्हटले जाते. परंतु ते झाले राहण्याचे स्थान, ज्याला ब्रह्मांड म्हटले जाते. ते मग ‘ब्रह्म’लाच भगवान समजतात. समजतात की आम्ही त्यामध्ये लीन होणार. जणू आत्म्याला विनाशी बनवतात. बाबा म्हणतात - मीच येऊन सर्वांची सद्गती करतो म्हणून एका शिवबाबांची जयंती हिरे तुल्य आहे बाकी सर्व जयंत्या कवडी तुल्य आहेत. शिवबाबाच सर्वांची सद्गती करतात. तर ते आहेत हिऱ्यासारखे. तेच तुम्हाला गोल्डन एजमध्ये घेऊन जातात. हे नॉलेज तुम्हाला बाबाच येऊन शिकवतात, ज्यामुळे तुम्ही देवी-देवता बनता. मग हे नॉलेज प्राय: लोप होते. या लक्ष्मी-नारायणामध्ये रचता आणि रचनेचे नॉलेज नाही आहे.

मुलांनी गाणे ऐकले - म्हणतात - अशा ठिकाणी घेऊन चला, जिथे शांती आणि आराम असेल. ते आहे शांतीधाम आणि नंतर सुखधाम. तिथे अकाली मृत्यू होत नाही. तर बाबा आले आहेत मुलांना सुख आणि आरामदायी दुनियेमध्ये घेऊन जाण्यासाठी. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

रात्री क्लास
आता तुमची सूर्यवंशी, चंद्रवंशी दोन्ही घराणी बनतात. जितके तुम्ही जाणता आणि पवित्र बनता तितके दुसरे कोणीही जाणू शकणार नाहीत आणि पवित्र देखील बनू शकत नाहीत. बाकी जर ऐकतील कि बाबा आलेले आहेत तर बाबांची आठवण करायला लागतील. ते देखील तुम्ही पुढे चालून हे सुद्धा बघाल - लाखो, करोडोंनी समजत जातील. वायुमंडळच असे होईल. अखेरच्या युद्धामध्ये सर्वजण होपलेस होतील. सर्वांना टच होईल (जाणीव होईल). तुमचा सुद्धा आवाज होईल. स्वर्गाची स्थापना होत आहे. बाकी सर्वांचे मरण तयार आहे. परंतु ती वेळ अशी असेल जेव्हा पश्चाताप करण्याची वेळ राहणार नाही. पुढे चालून खूप जणांना समजेल, जे असतील. असे देखील नाही - हे सर्वजण त्यावेळी असतील. कोणी मरून देखील जातील. असतील तेच जे कल्प-कल्प असतात. त्यावेळी एका बाबांच्या आठवणीमध्ये असतील. आवाज देखील कमी होईल. मग स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करू लागतील. तुम्ही सर्व साक्षी होऊन बघाल. अतिशय वेदनादायक घटना घडत राहतील. सर्वांना माहिती होईल की आता विनाश होणार आहे. दुनिया चेंज होणार आहे. विवेक-बुद्धी म्हणते विनाश तेव्हा होईल जेव्हा बॉम्ब्स पडतील. आता आपसामध्ये म्हणत राहतात - अट घाला, वचन द्या आम्ही बॉम्ब्स टाकणार नाही. परंतु या सर्व गोष्टी बनल्या आहेत विनाशासाठी.

तुम्हा मुलांना खूप खुशी देखील असली पाहिजे. तुम्ही जाणता नवीन दुनिया बनत आहे. तुम्ही समजता बाबाच नवीन दुनिया स्थापन करतील. तिथे दुःखाचे नाव सुद्धा नसेल. त्याचे नावच आहे - पॅराडाईज (स्वर्ग). जसा तुम्हाला निश्चय आहे तसा पुढे चालून बऱ्याचजणांना होईल. होते काय की, ज्यांना अनुभव घ्यायचा आहे, त्यांना पुढे जाऊन अनेक अनुभव येतील. बरेचजण अखेरच्या समयी आठवणीच्या यात्रेमध्ये देखील राहतील. आता तर वेळ शिल्लक आहे, पुरुषार्थ पूर्ण केला नाही तर पद कमी होईल. पुरुषार्थ केल्याने पद देखील चांगले मिळेल. त्यावेळी तुमची अवस्था देखील खूप चांगली असेल. साक्षात्कार देखील होतील. कल्प-कल्प जसा विनाश झाला आहे, तसा होईल. ज्यांना निश्चय असेल, चक्राचे ज्ञान असेल ते आनंदात राहतील. अच्छा - रुहानी मुलांना शुभ रात्री.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) डबल अहिंसक बनून योगबलाने या नरकाला स्वर्ग बनवायचे आहे. तमोप्रधाना पासून सतोप्रधान बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे.

२) एका बाबांनाच पूर्णपणे फॉलो करायचे आहे. खरा-खरा ब्राह्मण बनून योग-अग्नीने विकर्मांना दग्ध करायचे आहे. सर्वांना काम चितेवरून उतरवून ज्ञान चितेवर बसवायचे आहे.

वरदान:-
नि : स्वार्थ आणि निर्विकल्प स्थितीद्वारे सेवा करणारे सफलता मूर्त भव

सेवेमध्ये सफलतेचा आधार तुमची नि:स्वार्थ आणि निर्विकल्प स्थिती आहे. या स्थिती मध्ये राहणारे सेवा करत असताना स्वयं देखील संतुष्ट आणि हर्षित राहतात आणि त्यांच्यावर दुसरे देखील संतुष्ट असतात. सेवेमध्ये संघटन असते आणि संघटनामध्ये भिन्न-भिन्न गोष्टी, भिन्न-भिन्न विचार असतात. परंतु अनेकतेमध्ये गोंधळून जायचे नाही. असा विचार करू नका कि कोणाचे ऐकावे, कोणाचे ऐकू नये. नि:स्वार्थ आणि निर्विकल्प भावाने निर्णय घ्या तर कुणालाही व्यर्थ संकल्प येणार नाही आणि सफलता मूर्त बनाल.

बोधवाक्य:-
आता सकाश द्वारे बुद्धीला परिवर्तन करण्याची सेवा आरंभ करा.