23-04-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबा जी काही शिकवण देतात, त्याला आचरणामध्ये आणा, प्रतिज्ञा करून तुम्ही आपले वचन मोडायचे नाही, आज्ञेचे उल्लंघन करायचे नाही’’

प्रश्न:-
तुमच्या शिक्षणाचे सार काय आहे? तुम्हाला कोणता अभ्यास करणे जरुरी आहे?

उत्तर:-
तुमचे शिक्षण आहे वानप्रस्थमधे जाण्याचे. या शिक्षणाचे सार आहे - वाणी पासून परे (दूर) जाणे. बाबाच सर्वांना परत घेऊन जातात. तुम्हा मुलांना घरी जाण्यापूर्वी सतोप्रधान बनायचे आहे. यासाठी एकांतामध्ये जाऊन देही-अभिमानी होऊन राहण्याचा अभ्यास करा. अशरीरी बनण्याचा अभ्यासच आत्म्याला सतोप्रधान बनवेल.

ओम शांती।
स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण केल्याने तुम्ही तमोप्रधाना पासून सतोप्रधान बनाल आणि मग अशा विश्वाचे मालक बनाल. कल्प-कल्प तुम्ही असेच तमोप्रधाना पासून सतोप्रधान बनता आणि पुन्हा मग ८४ जन्मांमध्ये तमोप्रधान बनता. तर बाबा शिकवण देतात, स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. भक्तिमार्गामध्ये देखील तुम्ही आठवण करत होता, परंतु त्यावेळी जड-बुद्धीवाले ज्ञान होते. आता महीन-बुद्धीवाले ज्ञान आहे. प्रॅक्टिकलमध्ये बाबांची आठवण करायची आहे. हे देखील समजावून सांगायचे आहे - आत्मा देखील स्टार प्रमाणे आहे, बाबा देखील स्टार प्रमाणे आहेत. फक्त ते पुनर्जन्म घेत नाहीत, तुम्ही घेता म्हणून तुम्हाला तमोप्रधान बनावे लागते. तर सतोप्रधान बनण्यासाठी मेहनत करावी लागेल. माया वेळोवेळी विसरायला लावते. आता अभुल (निर्दोष) बनायचे आहे, चूक करायची नाही. जर चूक करत रहाल तर तुम्ही आणखी तमोप्रधान बनाल. डायरेक्शन मिळते - स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा, बॅटरीला चार्ज करा तर तुम्ही सतोप्रधान विश्वाचे मालक बनाल. टीचर तर सर्वांना शिकवतात. स्टुडंट मात्र नंबरवार पास होतात. मग नंबरवार कमाई करतात. तुम्ही देखील नंबरवार पास होता आणि मग नंबरवार पद प्राप्त करता. कुठे विश्वाचे मालक, कुठे प्रजा, दास-दासी. जे स्टुडंट्स चांगले, लायक, आज्ञाकारी, प्रामाणिक, आज्ञाधारक असतात ते नक्कीच शिक्षकाच्या मतावर चालतील. जितके रजिस्टर चांगले असेल तितके जास्त मार्क्स मिळतील; त्यामुळे बाबा देखील मुलांना वेळो-वेळी समजावून सांगत राहतात, चूका करू नका. असे समजू नका की, कल्पा पूर्वी देखील नापास झालो होतो. बऱ्याचजणांच्या मनामध्ये हे येत असेल की, आम्ही सेवा करत नाही तर जरूर नापास होणार. बाबा तर सावधानी देत राहतात, तुम्ही सतयुगी सतोप्रधाना पासून कलियुगी तमोप्रधान बनले आहात. मग जगाचा इतिहास-भूगोल रिपीट होणार. सतोप्रधान बनण्यासाठी बाबा खूप सोपा रस्ता सांगतात - माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील. तुम्ही चढता-चढता सतोप्रधान बनाल. चढाल हळू-हळू, त्यामुळे विसरून जाऊ नका. परंतु माया विसरायला लावते, नाफरमानबरदार (अवज्ञाकारी) बनवते. बाबा जे डायरेक्शन देतात, ते मानतात, प्रतिज्ञा करतात परंतु मग त्याप्रमाणे चालत नाहीत. तर बाबा म्हणतील, आज्ञेचे उल्लंघन करून आपले वचन तोडणारे आहात. बाबांसोबत प्रतिज्ञा करून मग आचरणामध्ये आणले जाते. बेहदचे बाबा जी शिकवण देतात तशी शिकवण इतर कोणीही देणार नाही. परिवर्तन देखील जरूर होणार आहे. चित्र किती चांगले आहे. ब्रह्मावंशी आहात नंतर विष्णुवंशी बनाल. हि आहे नवीन ईश्वरीय भाषा, ती देखील समजून घ्यावी लागेल. हे रूहानी ज्ञान कोणीही देत नाही. आता अशी कोणती तरी संस्था निघाली आहे ज्याला ‘रुहानी संस्था’ नाव दिले आहे. परंतु रूहानी संस्था तुमच्या शिवाय दुसरी कोणती असू शकत नाही. अनुकरण खूप केले जाते. ही आहे नवीन गोष्ट, तुम्ही अगदीच थोडे आहात इतर कोणीही या गोष्टी समजू शकणार नाही. संपूर्ण झाड आता उभे आहे. परंतु मूळ राहिलेले नाहीये, पुन्हा मूळ उभे होईल. बाकी शाखा-उपशाखा (बाकीचे धर्म) राहणार नाहीत, ते सर्व नष्ट होतील. बेहदचे बाबाच बेहदची शिकवण देतात. आता संपूर्ण दुनियेवर रावणाचे राज्य आहे. ही लंका आहे. ती लंका (श्रीलंका देश) तर समुद्राच्या पलीकडे आहे. बेहदची दुनिया देखील समुद्रावर आहे. चारी बाजूंनी पाणी आहे. त्या हदच्या गोष्टी, बाबा बेहदच्या गोष्टी समजावून सांगतात. एक बाबाच समजावून सांगणारे आहेत. हे शिक्षण आहे. तर शिक्षणाचा रिझल्ट लागून नोकरी मिळेपर्यंत शिक्षण घेत राहतात. त्यामध्येच बुद्धी गुंतून राहते. स्टुडंटचे काम आहे अभ्यासाकडे लक्ष देणे. उठता-बसता चालता-फिरता आठवण करायची आहे. स्टुडंटच्या बुद्धीमध्ये हा अभ्यास राहतो. परीक्षेच्या दिवसांमध्ये खूप मेहनत करतात की कुठे नापास होऊ नये. खास पहाटे बगिच्यामध्ये बसून अभ्यास करतात कारण घरातील आवाजाची व्हायब्रेशन्स खराब असतात.

बाबांनी समजावून सांगितले आहे की, देही-अभिमानी होण्याचा अभ्यास पक्का करा म्हणजे विसरणार नाही. एकांत असणारी ठिकाणे तर खूप आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये मुरली क्लास पूर्ण करून तुम्ही सर्व पहाडीवर जात होता. आता दिवसेंदिवस नॉलेज सखोल होत जाते. स्टुडंटला एम ऑब्जेक्ट आठवणीत राहते. हे आहे वानप्रस्थ अवस्थेमध्ये जाण्याचे शिक्षण. एका व्यतिरिक्त (शिव बाबांशिवाय) इतर कोणीही शिकवू शकणार नाही. साधू-संत इत्यादी सर्वजण भक्तीच शिकवतात. वाणी पासून परे जाण्याचा रस्ता एक बाबाच सांगतात. एक बाबाच सर्वांना परत घेऊन जातात. आता तुमची आहे बेहदची वानप्रस्थ अवस्था, ज्याला कोणीही जाणत नाही. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, तुम्ही सर्व वानप्रस्थी आहात’. साऱ्या दुनियेची वानप्रस्थ अवस्था आहे. कोणी शिको अथवा न शिको सर्वांना परत जावेच लागते. जे पण आत्मे मूलवतनमध्ये जातील, ते आपल्या-आपल्या सेक्शनमध्ये निघून जातील. आत्म्यांचे झाड देखील वंडरफुल बनलेले आहे. या साऱ्या ड्रामाचे चक्र एकदम ॲक्युरेट आहे. जरा देखील फरक नाही. ‘लीव्हर’ आणि ‘सिलेंडर’ कंपनीची घड्याळे आहेत ना. लीव्हर कंपनीचे घड्याळ एकदम ॲक्युरेट असते. यामध्ये देखील कोणाचा बुद्धियोग लीव्हर प्रमाणे असतो तर कोणाचा सिलेंडरच्या घड्याळा प्रमाणे असतो. कोणाचा तर अजिबातच लागत नाही. घड्याळ जसे काही चालतच नाही. तुम्हाला एकदम लीव्हर घड्याळ बनायचे आहे तर राजाईमध्ये जाल. सिलेंडरवाले प्रजेमध्ये जातील. पुरुषार्थ लीव्हर बनण्याचा (लिव्हर घड्याळाप्रमाणे ॲक्यूरेट बनण्याचा) करायचा आहे. राजाई पद प्राप्त करणाऱ्यांसाठीच कोटींमध्ये कोणी म्हटले जाते. तेच विजयी माळेमध्ये ओवले जातात. मुले समजतात - खरोखर मेहनत आहे. म्हणतात - ‘बाबा, वेळो-वेळी विसरायला होते’. बाबा समजावून सांगतात - ‘मुलांनो, जितके पैलवान बनाल तितकी माया देखील जिद्दीने लढणार’. मल्लयुद्ध असते ना. त्यामध्ये खूप सावधानी बाळगतात. पैलवानांना पैलवानच जाणतात. इथे देखील असेच आहे, महावीर मुले देखील आहेत. त्यामध्ये देखील नंबरवार आहेत. चांगल्या-चांगल्या महारथींना माया देखील चांगल्या प्रकारे वादळामध्ये घेऊन येते. बाबांनी समजावून सांगितले आहे - माया कितीही हैराण करेल, वादळे निर्माण करेल, तुम्ही सावध रहा. कोणत्याही बाबतीत हार खायची नाही. मनामध्ये भले वादळ उठेल परंतु कर्मेंद्रियांद्वारे करायचे नाही. वादळे येतातच कोसळून घालण्यासाठी. मायेचे युद्ध नसेल तर पैलवान तरी कसे म्हणता येईल. मायेच्या वादळांची पर्वा करता कामा नये. परंतु चालता-चालता कर्मेंद्रियांच्या अधीन होऊन लगेच कोसळतात (अधोगती होते). हे बाबा तर रोज समजावून सांगतात - कर्मेंद्रियांद्वारे विकर्म करायचे नाही. बेकायदेशीर काम करणे सोडले नाहीत तर पाई-पैशाचे पद प्राप्त कराल. आतून स्वतः देखील समजतात की, आपण नापास होणार. जायचे तर सर्वांनाच आहे. बाबा म्हणतात - माझी आठवण करता तर त्या आठवणीचा देखील विनाश होत नाही. थोडी जरी आठवण कराल तरी स्वर्गामध्ये जाल. थोडीशी आठवण केल्याने आणि भरपूर आठवण केल्याने कोण-कोणती पदे मिळतील, हे देखील तुम्ही समजू शकता. कोणीही लपून राहू शकत नाही. कोण काय-काय बनणार. स्वतः देखील समजू शकतात. आता मी जर हार्टफेल झालो (दिल शिकस्त झालो) तर कोणते पद प्राप्त करेन? बाबांना विचारू शकता. पुढे चालून आपणच समजत जातील. विनाश समोर उभा आहे, वादळ, पाऊस, प्राकृतिक आपदा काही विचारून येत नाहीत. रावण तर बसलेलाच आहे. हि खूप मोठी परीक्षा आहे. जे पास होतात ते उच्च पद प्राप्त करतात. राजा जरूर हुशार पाहिजे जो प्रजेला सांभाळू शकेल. आय. सी. एस. च्या परीक्षेमध्ये फार थोडेजण पास होतात. बाबा तुम्हाला शिकवून स्वर्गाचा मालक सतोप्रधान बनवतात. तुम्ही जाणता आपण सतोप्रधाना पासून मग तमोप्रधान बनलो, आता बाबांच्या आठवणी द्वारे सतोप्रधान बनायचे आहे. पतित-पावन बाबांची आठवण करायची आहे. बाबा म्हणतात - मनमनाभव. हा तोच गीतेचा एपिसोड आहे. डबल सिरताज (डबल मुकुटधारी) बनण्याचीच गीता आहे. बनवणार तर बाबाच ना. तुमच्या बुद्धीमध्ये संपूर्ण नॉलेज आहे. जे चांगले बुद्धिवान आहेत, त्यांची धारणा देखील चांगली होते. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

रात्री क्लास (५-१-१९६९)

मुले इथे क्लासमध्ये बसली आहेत आणि जाणतात कि आपले टीचर कोण आहेत. आता स्टुडंटला आपले टीचर कोण आहेत याची आठवण सतत असते. इथे मात्र विसरून जाता. टीचर जाणतात मुले मला वेळोवेळी विसरतात. असे रूहानी पिता तर कधी भेटले नाहीत. संगमयुगावरच भेटतात. सतयुग आणि कलियुगामध्ये तर देहधारी पिता मिळतात. याची आठवण करून देतात जेणे करून मुलांना पक्के व्हावे की हे संगमयुग आहे, ज्यामध्ये आपण मुले अशी पुरुषोत्तम बनणार आहोत. तर बाबांची आठवण केल्याने तिघांचीही आठवण आली पाहिजे. टीचरची आठवण कराल तरी देखील तिघांची आठवण, गुरुची आठवण कराल तरी देखील तिन्ही आठवले पाहिजेत. याची जरूर आठवण करावी लागते. मुख्य गोष्ट आहे पवित्र बनण्याची. पवित्रलाच सतोप्रधान म्हटले जाते. ते राहतातच मुळी सतयुगामध्ये. आता चक्र फिरून आले आहेत. संगमयुग आहे. कल्प-कल्प बाबा देखील येतात, शिकवतात. तुम्ही बाबांजवळ राहता ना. हे देखील जाणता हे खरे सद्गुरु आहेत. आणि खरोखर मुक्ती-जीवन मुक्तिधामचा रस्ता सांगतात. ड्रामा प्लॅन अनुसार आपण पुरुषार्थ करून बाबांना फॉलो करतो. इथे शिक्षण घेऊन मग फॉलो करतो (त्याचे पालन करतो). ज्याप्रमाणे हे (ब्रह्मा बाबा) शिकतात तसेच तुम्ही मुले देखील पुरुषार्थ करता. देवता बनायचे असेल तर शुद्ध कर्म करायची आहेत. कोणतीही अस्वच्छता राहू नये. आणि बाबांची आठवण करणे हि एक विशेष गोष्ट आहे. समजतात बाबांना विसरून जातो, अभ्यास सुद्धा विसरून जातो आणि आठवणीच्या यात्रेला देखील विसरून जातो. बाबांना विसरल्याने ज्ञान सुद्धा विसरायला होते. मी स्टुडंट आहे, हे देखील विसरायला होते. आठवण तर तिघांचीही आली पाहिजे. बाबांची आठवण कराल तर टीचर, सद्गुरु नक्कीच आठवतील. शिवबाबांची आठवण करता तर त्याच सोबत दैवी गुण सुद्धा जरूर पाहिजेत. बाबांच्या आठवणीमध्ये आहे चमत्कार. बाबा जितके चमत्कार मुलांना शिकवतात तितके इतर कोणीही शिकवू शकत नाही. आपण याच जन्मामध्ये तमोप्रधाना पासून सतोप्रधान बनतो. तमोप्रधान बनण्यासाठी पूर्ण कल्प लागते. आता या एकाच जन्मामध्ये सतोप्रधान बनायचे आहे, यामध्ये जे जितकी मेहनत करतील. संपूर्ण दुनिया तर मेहनत करत नाही. इतर धर्मवाले मेहनत करत नाहीत. मुलांनी साक्षात्कार केला आहे कि धर्म स्थापक कसे येतात, अमक्या-अमक्या ड्रेसमध्ये पार्ट बजावला आहे. ते तमोप्रधानतेमधे येतात. बुद्धी देखील म्हणते जसे आपण सतोप्रधान बनतो बाकीचे देखील सर्वजण तसे बनतील. पवित्रतेचे दान बाबांकडून घेतील. सर्व बोलावतात - ‘आम्हाला इथून लिबरेट करून घरी घेऊन चला. गाईड बना’. ते तर ड्रामा प्लॅन अनुसार सर्वांना घरी जायचेच आहे. अनेकदा घरी जातो. कोणी तर पूर्ण ५००० वर्षे घरामध्ये राहत नाहीत. कोणी तर पूर्ण ५००० वर्षे राहतात. अंतामध्ये येतील तर म्हणतील - ४९९९ वर्षे शांतिधाममध्ये राहिलो आहोत. आपण म्हणणार - ४९९९ वर्षे या सृष्टीवर राहिलो आहोत. हा तर मुलांना निश्चय आहे ८३-८४ जन्म घेतले आहेत. जे खूप हुशार असतील ते जरूर पहिले आले असतील. अच्छा.

गोड-गोड आत्मिक मुलांप्रति प्रेमपूर्वक आठवण आणि शुभ रात्री

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) सतोप्रधान बनण्यासाठी आठवणीच्या यात्रेद्वारे आपली बॅटरी चार्ज करायची आहे. अभूल (निर्दोष) बनायचे आहे. आपले रजिस्टर चांगले ठेवायचे आहे. कोणतीही चूक करायची नाही.

२) कोणतेही बेकायदेशीर कर्म करायचे नाही, मायेच्या तुफानांची पर्वा न करता, कर्मेंद्रियजीत बनायचे आहे. लीव्हर घड्याळा प्रमाणे ॲक्युरेट पुरुषार्थ करायचा आहे.

वरदान:-
सेवेद्वारे खुशी, शक्ती आणि सर्वांचे आशीर्वाद प्राप्त करणारी पुण्य आत्मा भव

सेवेचे प्रत्यक्ष फळ - खुशी आणि शक्ती मिळते. सेवा करत आत्म्यांना बाबांच्या वारशाचे अधिकारी बनविणे - हे पुण्याचे काम आहे. जो पुण्य करतो त्याला जरूर आशीर्वाद मिळतात. सर्व आत्म्यांच्या हृदयामध्ये जे खुशीचे संकल्प निर्माण होतात, ते शुभ संकल्प आशीर्वाद बनतात आणि भविष्य देखील जमा होते म्हणून नेहमी स्वतःला सेवाधारी समजून सेवेचे अविनाशी फळ खुशी आणि शक्ती नेहमी घेत रहा.

बोधवाक्य:-
मनसा आणि वाचेच्या शक्तीद्वारे विघ्नांचा पडदा दूर कराल तर आतमध्ये कल्याणाचे दृश्य दिसेल.