24-04-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही सकाळी श्रीमंत बनता, संध्याकाळी फकीर बनता. गरिबा पासून श्रीमंत, पतिता पासून पावन बनण्यासाठी दोन शब्द लक्षात ठेवा - मनमनाभव, मध्याजीभव”

प्रश्न:-
कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी कोणती युक्ती आहे?

उत्तर:-
१) आठवणीची यात्रा आणि ज्ञानाचे चिंतन, २) सर्व संबंध (नाती) एकाच सोबत असावेत, इतर कुठेही बुद्धी जाऊ नये, ३) जी सर्वशक्तीमान बॅटरी आहे, त्या बॅटरी सोबतच योग लागलेला (जोडलेला) असावा. पूर्णत: स्वतःवर लक्ष असावे, दैवी गुणांचे पंख लागलेले असावेत तेव्हा कर्मबंधनातून मुक्त होत जाल.

ओम शांती।
बाबांनी बसून समजावून सांगितले आहे - ही कहाणी आहे भारतासाठी. कोणती कहाणी आहे? सकाळी श्रीमंत आहे, संध्याकाळी गरीब आहे. यावरून एक कहाणी आहे. ‘सकाळी श्रीमंत होता…’ या गोष्टी जेव्हा तुम्ही श्रीमंत असता तेव्हा ऐकत नाही. गरीब आणि श्रीमंत या गोष्टी तुम्ही मुले संगमयुगावरच ऐकता. हे अंतःकरणामध्ये धारण करायचे आहे. खरोखर भक्ती गरीब बनवते, ज्ञान श्रीमंत बनवते. दिवस आणि रात्र सुद्धा बेहदचे आहेत. ‘गरीब’ आणि ‘श्रीमंत’ हि देखील बेहदची गोष्ट आहे आणि बनविणारे सुद्धा बेहदचे बाबा आहेत. सर्व पतित आत्म्यांना पावन बनविण्यासाठी एकच बॅटरी आहे. अशा युक्त्या लक्षात ठेवाल तर आनंदी रहाल. बाबा म्हणतात - मुलांनो, तुम्ही सकाळी श्रीमंत बनता आणि मग संध्याकाळी फकीर बनता. कसे बनता - ते देखील बाबा समजावून सांगत आहेत. मग पतिता पासून पावन, गरीबा पासून श्रीमंत बनण्याची युक्ती सुद्धा बाबाच सांगतात. मनमनाभव, मध्याजीभव - याच त्या दोन युक्त्या आहेत. मुले हे देखील जाणतात की, हे पुरुषोत्तम संगम युग आहे. तुम्ही जे पण इथे बसले आहात, गॅरेंटी आहे तुम्ही स्वर्गामधील श्रीमंत जरूर बनणार, नंबरवार पुरुषार्था अनुसार. शाळेमध्ये सुद्धा असेच असते. नंबरवार क्लास (वर्ग) ट्रान्सफर होतो. परीक्षा संपते मग नंबरवार जाऊन बसतात, ती आहे हदची गोष्ट, हि आहे बेहदची गोष्ट. नंबरवार रुद्रमाळेमध्ये जातात. माळा किंवा झाड. बीज तर झाडाचेच आहे. परमात्मा मग मनुष्य सृष्टीचे बीज आहे, मुले हे जाणतात की झाडाची वृद्धी कशी होते, जुने कसे होते. या आधी तुम्ही हे जाणत नव्हता, बाबांनी येऊन समजावून सांगितले आहे. आता हे आहे पुरुषोत्तम संगमयुग. आता तुम्हा मुलांना पुरुषार्थ करायचा आहे. दैवीगुणांचे पंख सुद्धा धारण करायचे आहेत. पूर्णतः आपल्यावर लक्ष ठेवायचे आहे. आठवणीच्या यात्रेनेच तुम्ही पावन बनणार आहात, दुसरा कोणताही उपाय नाही. बाबा जे सर्वशक्तिमान बॅटरी आहेत त्यांच्याशी पूर्ण योग लावायचा आहे. त्यांची बॅटरी कधी क्षीण होत नाही. ते सतो, रजो, तमोमध्ये येत नाहीत कारण त्यांची सदैव कर्मातीत अवस्था आहे. तुम्ही मुले कर्मबंधनामध्ये येता. बंधने किती कडक आहेत. या कर्मबंधनातून मुक्त होण्याचा एकच उपाय आहे - आठवणीची यात्रा. या शिवाय दुसरा कुठलाही उपाय नाही. जसे हे ज्ञान आहे, हे सुद्धा हड्डी नरम करते (विनम्र करते). तसे तर भक्ती सुद्धा विनम्र बनवते. म्हणतील कि, हा बिचारा भक्त माणूस आहे, याच्यामध्ये भामटेपणा इत्यादी काहीही नाही. परंतु भक्तांमध्ये भामटेपणा सुद्धा असतो. बाबा (ब्रह्मा बाबा) अनुभवी आहेत. आत्मा शरीराद्वारेच कामधंदा करते तर या जन्मातील सुद्धा सर्व काही आठवत असते. वयाच्या चार-पाच वर्षांपासूनची आपली जीवन कहाणी लक्षात राहिली पाहिजे. काहीजण तर दहा-वीस वर्षापूर्वीच्या गोष्टी सुद्धा विसरून जातात. जन्म-जन्मांतरा पासूनचे नाव-रूप काही लक्षात राहू शकत नाही. निदान एका जन्माबद्दल काहीतरी सांगू शकतात. फोटो इत्यादी ठेवतात. परंतु दुसऱ्या जन्मा विषयी तर काहीच कळू शकत नाही. प्रत्येक आत्मा वेग-वेगळ्या नाव, रूप, देश, काळामध्ये पार्ट बजावत असते. नाव, रूप सर्व काही बदलत राहते. हे तर बुद्धीमध्ये आहे कि आत्मा, कसे एक शरीर सोडून मग दुसरे घेते. जरूर ८४ जन्म, ८४ नाव, ८४ पिता झाले असतील. शेवटी मग नाते-संबंध तमोप्रधान होतो. या समयी जितके संबंध असतात, तितके कधीच नसतात. कलियुगी संबंधांना तर बंधनच समजले पाहिजे. किती मुले जन्मतात, मग ती लग्न करतात, मग पुन्हा ते मुलांना जन्म देतात. या समयी सर्वात जास्त बंधन आहेत - काका, चाचा, मामाचे… जितके जास्त संबंध तितकी जास्त बंधने. वर्तमानपत्रात आले होते - ‘पाच मुले एकत्र जन्मली, पाचही निरोगी आहेत’. हिशोब करा किती ढिगभर संबंध (नातेवाईक) बनत असतील. या समयी तुमचा संबंध सर्वात छोटा आहे. फक्त एका बाबांसोबतच सर्व संबंध आहेत. या एका व्यतिरिक्त दुसरा कोणासोबतही तुमचा बुद्धी योग नाही. सतयुगामध्ये मग यापेक्षा जास्त संबंध असतात. हिऱ्यासमान जन्म तुमचा आत्ता आहे. हाइयेस्ट (सर्वश्रेष्ठ) बाबा मुलांना ॲडॉप्ट करतात (दत्तक घेतात). जिवंतपणी वारसा घेण्यासाठी दत्तक जाणे, ते आताच होते. तुम्ही अशा बाबांच्या गोदीमध्ये आला आहात ज्यांच्याकडून तुम्हाला वारसा मिळतो. तुम्हा ब्राह्मणांपेक्षा उच्च अजून कोणीच नाही. सर्वांचा योग एका सोबतच (शिव बाबांसोबत) आहे. तुमचा आपापसात सुद्धा कुठलाही संबंध नाही. बहिण-भावाचा संबंध सुद्धा खाली नेतो. संबंध फक्त एका सोबतच असला पाहिजे. ही आहे नवीन गोष्ट. पवित्र होऊन परत जायचे आहे. अशा प्रकारे विचार सागर मंथन केल्याने तुम्ही चमकू लागाल. सतयुगी चमक आणि कलियुगी चमक यामध्ये रात्रं-दिवसाचा फरक आहे. भक्तिमार्गाच्या वेळी असतेच मुळी रावणाचे राज्य. शेवटाला विज्ञानाचा सुद्धा केवढा अहंकार आहे. जणू काही सतयुगाशी स्पर्धा करतात.

एका मुलीने सेवा समाचारामध्ये लिहिले होते की, ‘मी प्रश्न विचारला की तुम्ही स्वर्गामध्ये आहात की नरकामध्ये? तर चार-पाच जणांनी सांगितले - आम्ही स्वर्गामध्ये आहोत’. बुद्धीमध्ये रात्रं-दिवसाचा फरक पडतो. कोणी समजतात की आम्ही तर नरकामध्ये आहोत, मग त्यांना समजावून सांगावे लागते की स्वर्गवासी बनण्याची इच्छा आहे का? स्वर्ग कोण स्थापन करतो? या सर्व खूप गोड-गोड गोष्टी आहेत. तुम्ही नोट्स लिहून घेता, परंतु त्या नोट्स वहीमध्येच राहून जातात, ते पॉईंट्स वेळेवर आठवत नाहीत. आता पतिता पासून पावन बनविणारे परमपिता परमात्मा शिव आहेत. ते म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर पापे भस्म होतील. आठवणीमुळे काहीतरी प्राप्ती होईलच ना. आठवणीची प्रथा आता निघाली आहे. आठवणीनेच तुम्ही किती श्रेष्ठ स्वच्छ बनता. जितकी जो मेहनत करेल तितके उच्च पद प्राप्त करेल. बाबांना सुद्धा विचारू शकता. दुनियेमध्ये तर नातेसंबंध आणि मालमत्तेवरून किती भांडणेच भांडणे आहेत. इथे तर कुठलाही संबंध नाही. ‘एक बाबा, दुसरा न कोई’. बाबा आहेत बेहदचे मालक. गोष्ट तर खूप सोपी आहे. त्या बाजूला आहे स्वर्ग, या बाजूला आहे नरक. नरकवासी चांगले की स्वर्गवासी चांगले? जे हुशार असतील ते म्हणतील स्वर्गवासी चांगले. काहीजण तर म्हणतात नरकवासी आणि स्वर्गवासी, या गोष्टींशी आम्हाला काहीही देणे-घेणे नाही कारण बाबांना जाणतच नाहीत. कोणी मग बाबांच्या गोदी मधून बाहेर पडून मायेच्या गोदीमध्ये निघून जातात. आश्चर्यच आहे ना! बाबा सुद्धा वंडरफुल तर ज्ञान सुद्धा वंडरफुल, सर्वकाही वंडरफुल (अद्भुत). या आश्चर्यकारक गोष्टींना समजणारा देखील असा पाहिजे, ज्याची बुद्धी या आश्चर्यकारक गोष्टींवरच केंद्रित झालेली असेल. रावण हे काही वंडर (आश्चर्य) नाही आहे आणि ना काही त्याची रचना आश्चर्यजनक आहे. रात्रं-दिवसाचा फरक आहे. शास्त्रांमध्ये लिहिले आहे - काळ्या डोहामध्ये (पाच डोकी असलेल्या नागाच्या तलावामध्ये) गेला, सर्प डसला आणि काळा झाला. आता तुम्ही हे सर्व चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकता. श्रीकृष्णाच्या चित्राला घेऊन कोणी वाचेल तर एकदम ताजातवाना होईल. ८४ जन्मांची कहाणी आहे. जशी श्रीकृष्णाची तशीच तुमची सुद्धा. स्वर्गामध्ये तर तुम्ही येता ना. मग त्रेतामध्ये देखील येत राहता. वृद्धी होत राहते. असे नाही, त्रेतामध्ये जे राजा असतात ते त्रेतामध्येच येणार. शिकलेल्या समोर अशिक्षित असलेल्याला चाकरी करावी लागेल. हे ड्रामाचे रहस्य बाबाच जाणू शकतात. आता तुम्ही जाणता तुमचे मित्र-संबंधी इत्यादी सर्व नर्कवासी आहेत. आपण पुरुषोत्तम संगमयुगी आहोत. आता पुरुषोत्तम बनत आहोत. बाहेर राहण्यामध्ये आणि इथे येऊन सात दिवस राहण्यामध्ये खूप फरक पडतो. हंसाच्या संगती मधून निघून बगळ्यांच्या संगतीमध्ये जातात. बरेचजण बिघडवून टाकणारे सुद्धा आहेत. बरीच मुले मुरलीची पर्वासुद्धा करत नाहीत. बाबा समजावून सांगत आहेत - कोणतीही चूक करू नका. तुम्हाला एकदम सुवासिक फूल बनायचे आहे. फक्त एकच गोष्ट तुमच्यासाठी पुरेशी आहे - ती म्हणजे आठवणीची यात्रा. इथे तुम्हाला ब्राह्मणांचीच संगत आहे. कुठे उच्च ते उच्च आणि कुठे नीच. मुले लिहितात - ‘बाबा, बगळ्यांच्या थव्यामध्ये मी एकटा हंस काय करणार?’ बगळे काटे टोचतात (दुःख देतात). किती मेहनत करावी लागते. बाबांच्या श्रीमतावर चालल्याने पद सुद्धा उच्च मिळेल. नेहमी हंस बनून रहा. बगळ्याच्या संगती मध्ये बगळा बनू नका. गायन आहे - ‘आश्चर्यवत् सुनन्ती, कथन्ती, भागन्ती…’ थोडे जरी ज्ञान घेतले असेल तरी स्वर्गामध्ये येतील. परंतु रात्रं-दिवसा इतका फरक पडतो. खूप कठोर सजा भोगावी लागेल. बाबा म्हणतात - माझ्या मतावर न चालता, पतित बनलात तर १०० पटीने शिक्षा होईल. आणि मग पद सुद्धा कमी दर्जाचे मिळेल. हि राजाई स्थापन होत आहे. या गोष्टी विसरायला होतात. एवढे जरी लक्षात राहिले तरी उच्च पद प्राप्त करण्यासाठी पुरुषार्थ जरूर करतील. जर करत नसतील तर समजून येते कि, एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देतात. बाबांसोबत योग नाही आहे. इथे (मधुबन मध्ये) राहत असताना देखील बुद्धी योग मुलाबाळांकडे आहे. बाबा म्हणतात - सर्वकाही विसरून जायचे आहे - यालाच म्हटले जाते वैराग्य. यामध्ये सुद्धा परसेंटेज आहेत. कुठे ना कुठे विचार भरकटत जातात. एकमेकांवर प्रेम जडते तेव्हा सुद्धा बुद्धी लटकते.

बाबा दररोज समजावून सांगतात - या डोळ्यांनी जे काही बघत आहात, ते सर्व नष्ट होणार आहे. तुमचा बुद्धियोग नवीन दुनियेमध्ये रहावा आणि बेहदच्या संबंधीयांसोबत (ईश्वरीय परिवारा सोबत) बुद्धियोग ठेवायचा आहे. हे माशुक वंडरफुल आहेत. भक्तीमध्ये गात राहतात - ‘तुम्ही जेव्हा याल तेव्हा तुमच्याशिवाय आम्ही कोणाचीही आठवण करणार नाही’. आता मी आलो आहे, तर आता तुम्हाला सर्व बाजूंनी बुद्धियोग काढून टाकावा लागेल ना. हे सर्व काही मातीमध्ये मिसळून जाणार आहे. तुमचा जसा काही माती सोबत बुद्धियोग आहे. माझ्यासोबत बुद्धियोग असेल तर मालक बनाल. बाबा किती हुशार बनवतात. मनुष्य जाणत नाहीत की, भक्ति काय आहे आणि ज्ञान काय आहे? आता तुम्हाला ज्ञान मिळाले आहे तेव्हाच तर तुम्ही भक्तीला देखील समजता. आता तुम्हाला जाणीव होते की भक्तीमध्ये किती दुःख आहे. मनुष्य भक्ती करतात आणि स्वतःला खूप सुखी समजतात. परंतु तरी देखील म्हणतात भगवान येऊन फळ देणार. कोणाला आणि कसे फळ देणार - ते काहीच समजत नाहीत. आता तुम्ही जाणता - बाबा भक्तीचे फळ देण्यासाठी आले आहेत. विश्वाच्या राजधानीचे फळ ज्या बाबांकडून मिळते, ते बाबा जे डायरेक्शन देतात, त्या प्रमाणे चालावे लागेल. त्याला म्हटले जाते उच्च ते उच्च मत. मत तर सर्वांनाच मिळत आहे. पण मग कोणी चालू शकतात, तर कोणी नाही चालू शकत. बेहदची बादशाही स्थापन होणार आहे. तुम्हाला आता समजत आहे कि आपण कोण होतो, आणि आता आपली काय हालत आहे. माया एकदम नष्टच करते. ही तर जशी मृतवत दुनिया आहे. भक्तिमार्गामध्ये जे काही तुम्ही ऐकत होता ते सर्व सत् सत् म्हणून बोलत होता. परंतु तुम्ही जाणता की सत्य तर फक्त एक बाबाच ऐकवतात. अशा बाबांची आठवण केली पाहिजे. इथे (मधुबनमध्ये) कोणी बाहेरचा बसलेला असेल तर त्याला काहीही समजणार नाही. म्हणतील, माहित नाही काय ऐकवत आहेत. सारी दुनिया म्हणते परमात्मा सर्वव्यापी आहे आणि हे (बी. के.) म्हणतात ते आमचे बाबा आहेत. मानेने ‘नाही-नाही’ करत राहतील. तुमच्या आतून ‘हो-हो’ निघत राहील, म्हणूनच नवीन मनुष्याला इथे येण्यास परवानगी दिली जात नाही. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) सुगंधित फुल बनण्यासाठी संगतीची खूप काळजी घ्यायची आहे. हंसांसोबत संगत करायची आहे, हंस होऊन रहायचे आहे. मुरलीच्या बाबतीत कधीही बेपर्वा बनायचे नाही. निष्काळजीपणा करायचा नाही.

२) कर्म बंधनातून मुक्त होण्यासाठी संगमयुगावर आपले सर्व नातेसंबंध एका बाबांसोबतच ठेवायचे आहेत. आपसामध्ये कुठलाही संबंध ठेवायचा नाही. कोणत्याही हदच्या नात्यामध्ये प्रेम ठेवून बुद्धियोग लटकवून ठेवायचा नाही. एकाचीच आठवण करायची आहे.

वरदान:-
परमात्म प्रेमामध्ये लीन होणारे अथवा भेटीमध्ये मग्न होणारे सच्चे स्नेही भव

स्नेहाच्या निशाणीसाठी गायन आहे की, दोन असताना सुद्धा दोन न राहता एक होऊन जाणे, यालाच सामावून जाणे (एकरुप होणे) म्हटले जाते. भक्तांनी याच स्नेहाच्या स्थितीला ‘एकरूप होणे’ अथवा ‘लीन होणे’ असे म्हटले आहे. प्रेमामध्ये लीन होणे - ही एक अवस्था आहे परंतु या अवस्थे ऐवजी त्यांनी (भक्ति मध्ये), आत्म्याचे अस्तित्व कायमस्वरूपी समाप्त होणे असे मानले आहे. तुम्ही मुले जेव्हा बाबांच्या किंवा रूहानी माशुकच्या भेटीमध्ये मग्न होता तेव्हा समान बनता.

बोधवाक्य:-
अंतर्मुखी तो आहे जो व्यर्थ संकल्पांपासून मनाचे मौन धारण करतो.