25-04-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - हे पुरुषोत्तम युगच गीता एपिसोड आहे, यामध्येच तुम्हाला पुरुषार्थ करून उत्तम पुरुष अर्थात देवता बनायचे आहे”

प्रश्न:-
कोणती एक गोष्ट सदैव लक्षात राहिली तर बेडा (जीवनरूपी नाव) पार होईल?

उत्तर:-
सदैव लक्षात रहावे कि, आम्हाला ईश्वरीय संगतीमध्ये रहायचे आहे तरी देखील बेडा पार होईल (जीवनरूपी नाव पार होऊन जाईल). जर संगदोषामध्ये आलात, संशय आला तर बेडा, विषय सागरामध्ये बुडून जाईल. बाबा जे समजावून सांगतात त्यामध्ये मुलांना जरासुद्धा संशय येता कामा नये. बाबा तुम्हा मुलांना आप समान पवित्र आणि नॉलेजफुल बनविण्यासाठी आले आहेत. बाबांच्या संगतीमध्येच रहायचे आहे.

ओम शांती।
भगवानुवाच - मुले जाणतात कि बाबा तोच राजयोग शिकवत आहेत जो ५ हजार वर्षांपूर्वी समजावून सांगितला होता. मुलांना माहिती आहे, दुनियेला तर माहिती नाही तर मग त्यांनी विचारले पाहिजे कि, ‘गीतेचा भगवान कधी आला?’ भगवान जे सांगत आहेत कि, मी राजयोग शिकवून तुम्हाला राजांचाही राजा बनवतो; तर तो गीता एपिसोड कधी झाला होता? ते विचारले पाहिजे. हि गोष्ट कोणीही जाणत नाहीत. तुम्ही आता प्रॅक्टिकलमध्ये ऐकत आहात. गीतेचा एपिसोड, झाला देखील तेव्हा पाहिजे जेव्हा कलियुगाचा शेवट आणि सतयुगाची आदि यांचा मध्यकाळ असतो. आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना करतात तर जरूर संगमावरच येणार. पुरुषोत्तम संगमयुग आहे जरूर. भले पुरुषोत्तम वर्षाचे गायन करतात परंतु बिचाऱ्यांना माहित नाही आहे. तुम्हा गोड-गोड मुलांना माहिती आहे, उत्तम पुरुष बनण्यासाठी अर्थात मनुष्याला उत्तम देवता बनविण्यासाठी बाबा येऊन शिकवतात. मनुष्यांमध्ये उत्तम पुरुष हे देवता (लक्ष्मी-नारायण) आहेत. मनुष्यांना देवता बनविले आहे या संगमयुगावर. देवता जरूर सतयुगामध्येच असतात. बाकी सर्व आहेत कलियुगामध्ये. तुम्ही मुले जाणता कि, आपण संगमयुगी ब्राह्मण आहोत. हे पक्के-पक्के लक्षात ठेवायचे आहे. तसेतर आपले कुळ कधी कोणाला विसरायला होत नाही. परंतु इथे माया विसरायला लावते. आपण ब्राह्मण कुळाचे आहोत नंतर देवता कुळाचे बनतो. जर हे लक्षात राहिले तर खूप खुशी राहील. तुम्ही शिकता राजयोग. तुम्ही समजावून सांगता - ‘भगवान आता पुन्हा गीतेचे ज्ञान ऐकवत आहेत आणि भारताचा प्राचीन योग सुद्धा शिकवत आहेत. आम्ही मनुष्यापासून देवता बनत आहोत’. बाबांनी सांगितले आहे - कामविकार महाशत्रू आहे, यावर विजय प्राप्त केल्याने तुम्ही जगतजीत बनता. पवित्रतेच्या गोष्टीवर किती वाद घालतात. मनुष्यांसाठी विकार तर जसा एक खजिना आहे. लौकिक पित्याकडून हा वारसा मिळालेला आहे. संतान बनतात तर पित्याकडून सर्वात पहिला हा वारसा मिळतो, ते मुलांचा विवाह करून त्यांचा सत्यानाश करतात. आणि बेहदचे बाबा म्हणतात की काम विकार महाशत्रु आहे, तर जरूर काम विकाराला जिंकल्यामुळेच जगतजीत बनणार. बाबा जरूर संगमावरच आलेले असणार. महाभारी महाभारत लढाई सुद्धा आहे. आम्ही सुद्धा इथे जरूर आहोत. असे देखील नाही की, सर्वच एका फटक्यात कामविकारावर विजय प्राप्त करतात. प्रत्येक गोष्टीसाठी वेळ लागतो. मुख्य गोष्ट मुले हीच लिहितात कि ‘बाबा, आम्ही विषय वैतरणी नदीमध्ये कोसळलो’, तर जरूर काही ऑर्डिनेंस (वटहुकूम) आहे. बाबांचे फर्मान आहे - काम विकाराला जिंकल्याने तुम्ही जगतजीत बनाल. असे नाही, जगतजीत बनून पुन्हा विकारामध्ये जात असतील. जगत-जीत हे लक्ष्मी-नारायण आहेत, यांना म्हटले जाते संपूर्ण निर्विकारी. देवतांना सर्वजण निर्विकारी म्हणतात, ज्याला तुम्ही राम राज्य म्हणता. ते आहे व्हाइसलेस वर्ल्ड (निर्विकारी दुनिया). हे आहे विशश वर्ल्ड (विकारी दुनिया), अपवित्र गृहस्थ आश्रम. बाबांनी समजावून सांगितले आहे तुम्ही पवित्र गृहस्थ आश्रमाचे होता. आता ८४ जन्म घेत-घेत अपवित्र बनले आहात. ८४ जन्मांचीच कहाणी आहे. नवीन दुनिया जरूर अशी व्हाइस-लेस असली पाहिजे. भगवान, जे पवित्रतेचे सागर आहेत, तेच स्थापना करतात नंतर मग रावणराज्य सुद्धा जरूर येणार आहे. नावच आहे राम राज्य आणि रावण राज्य. रावण राज्य म्हणजेच आसुरी राज्य. आता तुम्ही आसुरी राज्यामध्ये बसले आहात. हे लक्ष्मी-नारायण आहेत दैवी राज्याची निशाणी.

तुम्ही मुले प्रभात फेरी इत्यादी काढता. प्रभात, पहाटेला म्हटले जाते, परंतु त्यावेळी मनुष्य झोपलेले असतात म्हणून उशिराने प्रभात फेरी काढतात. प्रदर्शनी सुद्धा चांगली तेव्हा होईल जेव्हा तिथे सेंटर सुद्धा असेल. जिथे येऊन समजून घेतील कि काम विकार महाशत्रु आहे, यावर विजय प्राप्त केल्याने जगत जीत बनू. लक्ष्मी-नारायणाचे ट्रान्स लाईटचे चित्र जरूर सोबत असले पाहिजे. याला कधी विसरता कामा नये. एक हे चित्र आणि शिडीचे चित्र. जसे ट्रकमधून देवींची मिरवणूक काढतात तसे तुम्ही दोन-तीन ट्रक सजवून त्यामध्ये हि मुख्य चित्रे सजवून मिरवणूक काढता तेव्हा चांगले वाटते. दिवसेंदिवस चित्रांची सुद्धा वृद्धी होत जाते. तुमचे ज्ञान देखील वृद्धिंगत होत राहते. मुलांची सुद्धा वृद्धी होत जाते. त्यामध्ये गरीब श्रीमंत सर्व येतात. शिवबाबांचा भंडारा भरत राहतो. जे भंडारा भरतात, त्यांना तिथे रिटर्नमध्ये कित्येक पटीने मिळते. म्हणूनच बाबा म्हणतात - ‘गोड-गोड मुलांनो, तुम्ही आहात पद्मा-पद्मपति बनणारे ते देखील २१ जन्मांसाठी’. बाबा स्वतः म्हणतात - तुम्ही २१ पिढी जगताचे (ब्रह्मांडाचे) मालक बनणार. मी स्वतः डायरेक्ट आलो आहे. तुमच्यासाठी तळ हातावर स्वर्ग घेऊन आलो आहे. जसे बाळ जेव्हा जन्माला येते तर पित्याचा वारसा त्याच्या तळहातावर असतो. पिता म्हणेल - ‘हे घर-दार इत्यादी सर्व काही तुझे आहे’. बेहदचे बाबा देखील म्हणतात - ‘तुम्ही जे माझे बनता तर स्वर्गाची बादशाही तुमच्यासाठी आहे - २१ पिढी’, कारण तुम्ही काळावर विजय प्राप्त करता म्हणूनच बाबांना महाकाल म्हणतात. महाकाल कोणी मारणारा नाहीये. त्यांची तर महिमा केली जाते, असे समजतात भगवंताने यमदूत पाठवून बोलावून घेतले. अशी काही गोष्ट नाहीये. या सर्व आहेत भक्तिमार्गाच्या गोष्टी. बाबा म्हणतात - मी काळांचाही काळ आहे. पहाडी लोक महाकाळाला खूप मानतात. महाकाळाची मंदिरे देखील आहेत. असे झेंडे लावतात. तर बाबा बसून मुलांना समजावून सांगतात. हे देखील समजता कि गोष्ट बरोबर आहे. बाबांची आठवण केल्यानेच जन्म-जन्मांतरीची विकर्म भस्म होतात. तर त्याचा प्रचार केला पाहिजे. कुंभमेळे खूप भरतात. स्नान करण्याचे देखील खूप महत्व सांगितले आहे. आता तुम्हा मुलांना हे ज्ञान-अमृत ५ हजार वर्षांनंतर मिळते. खरे पाहता याचे नाव काही ‘अमृत’ नाहीये. हे तर शिक्षण आहे. हि सर्व आहेत भक्तिमार्गाची नावे. ‘अमृत’ नाव ऐकून चित्रांमध्ये पाणी दाखवले आहे. बाबा म्हणतात - ‘मी तुम्हाला राजयोग शिकवतो. अभ्यासानुसार उच्च पद मिळते. ते देखील मी शिकवतो’. भगवंताचे असे कोणते सजवलेले रूप तर नाही आहे. हे तर बाबा यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) येऊन शिकवतात. शिकवून आत्म्यांना आप समान बनवतात. हे लक्ष्मी-नारायण स्वतः असे थोडेच असतात जे आप समान बनवतील. आत्मा शिकते, त्यांना बाबा आप समान नॉलेजफुल बनवतात. असे नाही, भगवान-भगवती बनवतात. त्यांनी श्रीकृष्णाला दाखवले आहे. ते कसे शिकवणार? सतयुगामध्ये पतित थोडेच असतात. श्रीकृष्ण तर असतोच सतयुगामध्ये. त्यानंतर तुम्ही पुन्हा कधीही श्रीकृष्णाला बघणार नाही. ड्रामामध्ये प्रत्येकाच्या पुनर्जन्माचे चित्र एकदम वेगळे असते. कुदरती ड्रामा आहे. ‘बनी बनाई…’(पूर्वनियोजित आहे). बाबा देखील म्हणतात - ‘तुम्ही कल्प-कल्प हुबेहूब याच फीचर्समध्ये (रंग-रूपामध्ये), याच कपड्यामध्ये शिकत येणार’. हुबेहूब रिपीट होतो ना. आत्मा एक शरीर सोडून मग दुसरे तेच घेते, जे कल्पापूर्वी घेतले होते. ड्रामामध्ये काहीही बदल होऊ शकत नाही. त्या असतात हदच्या गोष्टी, या आहेत बेहदच्या गोष्टी, ज्या बेहदच्या बाबांशिवाय इतर कोणीही समजावून सांगू शकणार नाही. यामध्ये कोणताही संशय उत्पन्न होऊ शकत नाही. निश्चय बुद्धी बनून नंतर कोणी ना कोणी संशयामध्ये येतात. संगत लागते. ईश्वरीय संगतीमध्ये चालत राहिला तर पार व्हाल. संगत सोडलीत तर विषय सागरामध्ये बुडून जाल. एका बाजूला आहे क्षीरसागर, दुसऱ्या बाजूला आहे विषय सागर. ‘ज्ञान-अमृत’ असे देखील म्हणतात. बाबा आहेत ज्ञान सागर, त्यांची महिमा सुद्धा आहे. जी त्यांची महिमा आहे ती लक्ष्मी-नारायणाला लागू होऊ शकत नाही. बाबा आहेत पवित्रतेचे सागर. भले ते देवता सतयुग-त्रेतामध्ये पवित्र आहेत परंतु कायमचे तर राहत नाहीत. तरी देखील अर्ध्या कल्पानंतर कोसळतात (अध:पतन होते). बाबा म्हणतात - मी येऊन सर्वांची सद्गति करतो. सद्गती दाता मी एकच आहे. तुम्ही जेव्हा सद्गतीमध्ये जाता त्या नंतर या गोष्टीच राहत नाहीत. आता तुम्ही मुले सन्मुख बसले आहात. तुम्ही सुद्धा शिवबाबांकडून शिकून टीचर बनला आहात. मुख्य प्रिन्सिपल ते (शिवबाबा) आहेत. तुम्ही येता देखील त्यांच्याकडे. म्हणता - ‘मी शिवबाबांकडे आलो आहे’. अरे, ते तर निराकार आहेत. हां, ते येतात, यांच्या (ब्रह्मा बाबांच्या) तनामध्ये त्यामुळे म्हणतात, बाप-दादांकडे जातो. हे बाबा (ब्रह्मा बाबा) आहेत त्यांचा रथ, ज्यावर त्यांची सवारी आहे. त्यांना रथ, घोडा, अश्व सुद्धा म्हणतात. यावरून सुद्धा एक कथा आहे की, ‘दक्ष प्रजापिता यांनी यज्ञ रचला’. कहाणी लिहिली आहे. परंतु असे तर काही नाहीये.

शिवभगवानुवाच - मी तेव्हा येतो जेव्हा भारतामध्ये अति धर्म ग्लानी होते. गीतावादी भले म्हणतात - ‘यदा यदाहि…’ परंतु अर्थ समजत नाहीत. तुमचे हे खूप छोटे झाड आहे, याला वादळे सुद्धा लागतात. नवीन झाड आहे ना, आणि मग हे फाउंडेशन देखील आहे. एवढ्या अनेक धर्मांमधून एका आदि सनातन देवी-देवता धर्माचे सैपलिंग (कलम) लावतात, केवढी मेहनत आहे. बाकीच्यांना मेहनत करावी लागत नाही. ते वरून येत राहतात. इथे तर जे सतयुग-त्रेतामध्ये येणारे आहेत, त्यांचे आत्मे बसून शिकतात. जे पतित आहेत, त्यांना पावन देवता बनविण्यासाठी बाबा बसून शिकवतात. गीता तर हे (ब्रह्मा बाबा) देखील खूप वाचत होते. जशी आता आत्म्यांना आठवण करून दृष्टी दिली जाते ज्याने पापे भस्म होतील. भक्तीमार्गामध्ये मग गीते समोर जल ठेवून बसून वाचतात. समजतात पितरांचा उद्धार होईल म्हणून पितरांची आठवण करतात. भक्तीमध्ये गीतेचा खूप मान ठेवत होते. अरे, ब्रह्मा बाबा काही कमी भक्त होते काय! रामायण इत्यादी सर्व वाचत होते. खूप आनंद होत असे. ते सर्व पास्ट होऊन गेले.

आता बाबा म्हणतात - होऊन गेलेल्या गोष्टी आठवत बसू नका. बुद्धिमधून सर्व काढून टाका. बाबांनी (शिवबाबांनी) स्थापना, विनाश आणि राजधानीचा साक्षात्कार घडवला तर तो पक्का झाला. हे सर्व खल्लास होणार आहे - हे माहिती नव्हते. ब्रह्मा बाबांना वाटले - हे सर्व होणार. वेळ थोडाच लागणार. मी जाऊन अमका राजा बनणार. माहित नाही, बाबांना काय-काय वाटत होते. तुम्ही मुले जाणता की, बाबांची प्रवेशता कशी झाली. या गोष्टी मनुष्य जाणत नाहीत. ब्रह्मा, विष्णु, शंकर यांचे नाव तर घेतात परंतु या तिघांमधील कोणामध्ये भगवान प्रवेश करतात, अर्थ जाणत नाहीत. ते लोक विष्णूचे नाव घेतात. आता ते तर आहेत देवता. ते कसे शिकवणार. बाबा स्वतः सांगतात - मी यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) प्रवेश करतो, म्हणूनच दाखवले आहे - ब्रह्मा द्वारे स्थापना. ती पालना आणि तो विनाश. या गोष्टी चांगल्या समजून घेण्यासारख्या आहेत. भगवानुवाच - ‘मी तुम्हाला राजयोग शिकवतो’. तर ते भगवान कधी आले, जो राजयोग शिकवला आणि राजाई पद दिले! ते तर आता तुम्हीच समजता. ८४ जन्मांचे रहस्य सुद्धा समजावून सांगितले आहे. पूज्य आणि पुजारी विषयी देखील समजावून सांगितले आहे. विश्वामध्ये शांतीचे राज्य या लक्ष्मी-नारायणाचे होते ना, ज्याची सारी दुनिया अपेक्षा करते. जेव्हा लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते तर त्यावेळी सर्व शांतीधाममध्ये होते. आता आम्ही श्रीमतावर हे कार्य करत आहोत. अनेकदा केले आहे आणि करत राहणार. हे देखील जाणतात - कोटींमध्ये कोणी निघेल. देवी-देवता धर्मवाल्यांनाच टच होईल. भारताचीच गोष्ट आहे. जे या कुळाचे असतील ते येत आहेत आणि पुढेही येत राहतील. जसे तुम्ही आला आहात, तशी इतर प्रजा सुद्धा बनत राहील. जे चांगले शिकतात ते चांगले पद प्राप्त करतात. मुख्य आहे ज्ञान-योग. योगासाठी देखील ज्ञान पाहिजे. आणि मग पॉवर हाऊस सोबत योग पाहिजे. योगाने विकर्म विनाश होतील आणि हेल्दी-वेल्दी बनाल. पास विद ऑनर सुद्धा होणार. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) जी गोष्ट होऊन गेली, त्याचे चिंतन करायचे नाही. आत्तापर्यंत जे काही वाचले आहे ते विसरायचे आहे, एका बाबांकडूनच ऐकायचे आहे आणि नेहमी आपल्या ब्राह्मण कुळाला लक्षात ठेवायचे आहे.

२) पूर्ण निश्चयबुद्धी होऊन रहायचे आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये संशय उत्पन्न होऊ द्यायचा नाही. ईश्वरीय संग आणि शिक्षण कधीही सोडायचे नाही.

वरदान:-
रुहानी माशूकच्या आकर्षणामध्ये आकर्षित होऊन मेहनती पासून मुक्त होणारे रुहानी आशिक भव

माशूक आपल्या हरवलेल्या आशिकांना पाहून खुश होतात. आत्मिक आकर्षणामध्ये आकर्षित होऊन आपल्या खऱ्या माशुकला ओळखले, प्राप्त केले, योग्य ठिकाणी पोहोचले. जेव्हा असे आशिक आत्मे या प्रेमाच्या रेषेच्या आतमध्ये पोहोचतात तेव्हा अनेक प्रकारच्या मेहनती पासून मुक्त होतात कारण इथे ज्ञान सागराच्या स्नेहाचे तरंग, शक्तीचे तरंग... कायमसाठी रिफ्रेश करतात. हे मनोरंजनाचे विशेष स्थान, भेटण्याचे स्थान तुम्हा आशिकांसाठी माशुकने बनविले आहे.

बोधवाक्य:-
एकांतवासी बनण्याच्या सोबतच एक-नामी आणि इकॉनॉमीवाले बना.