26-04-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - शरीर निर्वाह अर्थ कर्म करत असताना बेहदची उन्नती करा, जितक्या चांगल्या रीतीने बेहदचा अभ्यास शिकाल, तितकी उन्नती होईल”

प्रश्न:-
तुम्ही मुले जे बेहदचे शिक्षण शिकत आहात, त्यामध्ये सर्वात जास्त अवघड विषय कोणता आहे?

उत्तर:-
या शिक्षणामध्ये सर्वात मोठा विषय आहे भावा-भावाची दृष्टी पक्की करणे. बाबांनी जो ज्ञानाचा तिसरा नेत्र दिला आहे त्या नेत्राने आत्मा भावा-भावाला पहा. डोळ्यांनी जरा सुद्धा दगा देऊ नये. कोणत्याही देहधारीच्या नावा-रूपामध्ये बुद्धी जाऊ नये. बुद्धीमध्ये जरा देखील विकारी घाणेरडे संकल्प चालू नयेत. हीच आहे मेहनत. या विषयामध्ये पास होणारेच विश्वाचे मालक बनतील. हितगुज

ओम शांती।
बेहदचे बाबा बसून बेहदच्या मुलांना समजावून सांगत आहेत. प्रत्येक गोष्ट एक असते हदची, दुसरी असते बेहदची. इतका वेळ तुम्ही हदमध्ये होता, आता बेहदमध्ये आहात. तुमचे शिक्षण देखील बेहदचे आहे. बेहदच्या बादशाहीसाठी शिक्षण आहे, याच्यापेक्षा मोठे शिक्षण अजून कोणते असत नाही. कोण शिकवतात? बेहदचे बाबा, भगवान. शरीर निर्वाह अर्थ देखील सर्वकाही करायचे आहे. आणि आपल्या उन्नतीसाठी देखील काही करावे लागते. बरेच लोक नोकरी करत असताना देखील उन्नतीसाठी शिकत राहतात. तिथे आहे हदची उन्नती, इथे बेहदच्या बाबांजवळ आहे बेहदची उन्नती. बाबा म्हणतात - हदची आणि बेहदची दोन्ही प्रकारची उन्नती करा. बुद्धीद्वारे समजता की, आपल्याला आता बेहदची खरी कमाई करायची आहे. इथे तर सर्व काही मातीत मिसळून जाणार आहे. जितके-जितके तुम्ही बेहदच्या कमाईमध्ये प्रगती करत जाल तितक्या हदच्या कमाईच्या गोष्टी विसरत जाणार. सर्व समजून जातील, आता विनाश होणार आहे. विनाश जवळ आला कि ईश्वराला सुद्धा शोधत राहतील. जर विनाश होणार असेल तर जरूर स्थापना करणारा देखील असेल. दुनिया तर काहीच जाणत नाही. तुम्ही प्रजापिता ब्रह्माकुमार-कुमारी देखील नंबरवार पुरुषार्था अनुसार हे शिक्षण शिकत आहात. हॉस्टेलमध्ये ते स्टुडंट राहतात जे शिकत असतात. परंतु हे हॉस्टेल तर निराळे आहे. या हॉस्टेलमध्ये तर कितीतरी असेच राहत आहेत, जे सुरुवातीला निघून आले ते इथेच राहिले. असेच आले. व्हरायटी आले. असे नाही की, सगळे चांगलेच आले. छोट्या-छोट्या मुलांना देखील तुम्ही घेऊन आलात. तुम्ही मुलांना देखील सांभाळत होतात. मग त्यातून कितीतरी निघून गेले. बागेतील फुले सुद्धा बघा, पक्षी सुद्धा बघा कसे टिकलू-टिकलू (हितगुज) करत असतात. ही मनुष्य सृष्टी देखील यावेळी अशी विचित्र आहे. आपल्यामध्ये कोणतीही सभ्यता नव्हती. सभ्यता असणाऱ्यांची महिमा गात होतो. असे म्हणत होतो - ‘हम निर्गुण हारे में कोई गुण नाहीं…’ भले कितीही मोठ्या व्यक्ती आल्या तरी त्यांना जाणीव होते की, आपण रचयिता पिता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणत नाही. मग ते काय कामाचे. तुम्ही देखील काहीच कामाचे नव्हता. आता तुम्ही समजता बाबांची कमाल आहे. बाबा विश्वाचा मालक बनवितात. जी राजाई आपल्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही, जरा देखील कोणते विघ्न आणू शकत नाही. कोणा पासून आपण काय बनतो! तर अशा बाबांच्या श्रीमतावर जरूर चालले पाहिजे. भले दुनियेमध्ये किती अपराध, दंगे इत्यादी होतात. ही काही नवीन गोष्ट नाहीये. ५००० वर्षांपूर्वी देखील झाले होते. शास्त्रांमध्ये देखील आहे. मुलांना सांगितले आहे, हि जी भक्तिमार्गाची शास्त्रे आहेत, ती पुन्हा भक्तिमार्गामध्ये वाचणार. यावेळी तुम्ही ज्ञानाद्वारे सुखधाममध्ये जाता. त्यासाठी पूर्ण पुरुषार्थ केला पाहिजे. जितका आता पुरुषार्थ करणार, तितकाच कल्प-कल्प होणार. आपण स्वतःमध्ये तपासून पहायचे आहे - आपण कितपत उच्च पद प्राप्त करू शकतो. हे तर प्रत्येक स्टुडंट समजू शकतो की, आपण जितका चांगला अभ्यास करणार तितके उच्च जाणार; हे माझ्यापेक्षा हुशार आहेत, मी देखील हुशार बनणार. व्यापाऱ्यांमध्ये सुद्धा असेच असते - मला यांच्यापेक्षा वर जायचे आहे म्हणजेच हुशार बनले पाहिजे. अल्पकाळाच्या सुखासाठी मेहनत करतात. बाबा म्हणतात - ‘गोड-गोड मुलांनो, मी तुमचा किती मोठा पिता आहे’. साकारी पिता देखील आहे तर निराकारी देखील आहे. दोघे एकत्र आहेत. दोघेजण मिळून म्हणतात - ‘गोड मुलांनो, आता तुम्हाला बेहदचे शिक्षण समजले आहे. अजून दुसरे तर कोणी जाणत नाहीत. पहिली गोष्ट तर आपल्याला शिकविणारा कोण? भगवान काय शिकवतात? राजयोग. तुम्ही राजऋषी आहात. ते आहेत हठयोगी. ते देखील ऋषी आहेत, परंतु हदचे. ते म्हणतात आम्ही घरदार सोडले आहे. हे काही चांगले काम केले आहे काय? तुम्ही घरदार तेव्हा सोडता, जेव्हा तुम्हाला विकारासाठी त्रास दिला जातो. त्यांना कोणता त्रास झाला? तुम्हाला मार पडला म्हणून तर तुम्ही निघून आल्या आहात. प्रत्येकीला विचारा, कुमारींनी, स्त्रियांनी किती मार खाल्ला आहे, म्हणूनच निघून आलात. सुरुवातीला कितीतरी आले. इथे ज्ञान-अमृत मिळत होते तर संमती पत्र घेऊन आल्या की, ‘आम्ही ज्ञान-अमृत पिण्यासाठी ओम् राधेकडे जात आहोत’. विकारासाठीच भांडणे, माऱ्यामाऱ्या सुरुवातीपासून चालत आल्या आहेत. बंद तेव्हा होईल जेव्हा आसुरी दुनियेचा विनाश होईल. मग अर्ध्या कल्पासाठी बंद होईल.

आता तुम्ही मुले बेहदच्या बाबांकडून प्रारब्ध घेत आहात. बेहदचे बाबा सर्वांना बेहदचे प्रारब्ध देतात. हदचे पिता हदचे प्रारब्ध देतात. तो देखील फक्त मुलांनाच वारसा मिळतो. इथे बाबा म्हणतात - तुम्ही मुलगी असाल किंवा मुलगा, दोघेही वारशाचे अधिकारी आहात. त्या लौकिक पित्याजवळ भेदभाव असतो, फक्त मुलांना वारसदार बनवतात. पत्नीला हाफ पार्टनर म्हणतात. परंतु त्यांना देखील हिस्सा देत नाहीत. मुलेच सांभाळ करतात. पित्याचा मुलांमध्ये मोह असतो. हे पिता तर कायद्यानुसार सर्व मुलांना (आत्म्यांना) वारसा देतात. इथे मुलगा अथवा मुलगी मधील भेदभाव माहीतच नाही आहे. तुम्ही बेहदच्या बाबांकडून केवढा सुखाचा वारसा घेता. तरी देखील नीट अभ्यास करत नाही. शिक्षणाला सोडून देता. मुली लिहितात - ‘बाबा, अमक्याने रक्ताने लिहून दिले आहे. परंतु आता येत नाहीत’. रक्ताने देखील लिहितात - ‘बाबा, तुम्ही प्रेम करा नाहीतर सोडून द्या, आम्ही तुम्हाला कधीच सोडणार नाही’. परंतु पालना घेऊन देखील निघून जातात. बाबांनी समजावून सांगितले आहे - हा सर्व ड्रामा आहे. कोणी आश्चर्यवत् भागन्ती होतील. इथे बसले आहात तर निश्चय आहे, अशा बेहदच्या बाबांना आपण कसे सोडायचे बरे! हे तर शिक्षण देखील आहे. बाबा गॅरंटी सुद्धा करतात की, ‘मी सोबत घेऊन जाणार’. सतयुग आदि मध्ये इतके सारे मनुष्य नव्हते. आता संगमावर सर्वच मनुष्य आहेत, सतयुगामध्ये खूप थोडे असतील. इतके सर्व धर्मवाले कोणीही राहणार नाहीत. त्याची सर्व तयारी होत आहे. हे शरीर सोडून शांतिधाम मध्ये निघून जातील. हिशोब चुकता करून पार्ट बजावण्यासाठी जिथून आले आहेत, तिथे निघून जातील. ते (दुनियेतील) तर असते दोन तासाचे नाटक, हे आहे बेहदचे नाटक. तुम्ही जाणता आपण त्या घरचे रहिवासी आहोत आणि आहोत देखील एका पित्याची मुले. राहण्याचे स्थान आहे निर्वाणधाम, वाणी पासून परे. तिथे आवाज असत नाही. मनुष्य समजतात की, ऋषी-मुनी ब्रह्ममध्ये लीन होतात. बाबा म्हणतात - आत्मा अविनाशी आहे, तिचा कधीही विनाश होऊ शकत नाही. किती सारे जीव आत्मे आहेत. अविनाशी आत्मा जीवद्वारा पार्ट बजावते. सर्व आत्मे ड्रामातील ॲक्टर्स आहेत. राहण्याचे स्थान ते घर ब्रह्मांड आहे. आत्मा अंड्या सारखी दिसते. तिथे ब्रह्मांडामध्ये तिचे राहण्याचे स्थान आहे. प्रत्येक गोष्टीला चांगल्या रीतीने समजून घ्यायचे आहे. आता जर समजत नसेल तर पुढे जाऊन आपोआपच समजेल, परंतु जर नियमित ऐकत राहिलात तर. ऐकायचे सोडून दिलेत तर काहीही समजू शकणार नाही. तुम्ही मुले जाणता, ही जुनी दुनिया नष्ट होऊन नवीन दुनिया स्थापन होत आहे. बाबा म्हणतात - ‘काल तुम्ही विश्वाचे मालक होता, आता पुन्हा तुम्ही विश्वाचे मालक बनण्यासाठी आले आहात’. गाणे देखील आहे ना - ‘बाबा हमको ऐसा मालिक बनाते हैं जो कोई हमसे छीन न सके…’ आकाश, जमीन इत्यादीवर आपला कब्जा (अधिकार) असतो. या दुनियेमध्ये बघा काय-काय आहे. सर्व सोबती स्वार्थी आहेत. तिथे तर असे असणार नाही. जसे लौकिक पिता मुलांना म्हणतात - ‘ही धन-दौलत सर्व काही तुम्हाला देऊन जात आहे, याला व्यवस्थित सांभाळा’. बेहदचे बाबा देखील म्हणतात - तुम्हाला धनदौलत सर्वकाही देत आहे. तुम्ही मला बोलावले आहे, पावन दुनियेमध्ये घेऊन चला, तर जरूर पावन बनवून विश्वाचा मालक बनवणार. बाबा किती युक्तीने समजावून सांगतात. याचे नावच आहे - ‘सहज ज्ञान आणि योग’. सेकंदाची गोष्ट आहे. सेकंदामध्ये मुक्ती-जीवनमुक्ती. आता तुम्ही किती दुरदर्शी बुद्धीचे बनले आहात. याचेच चिंतन होत राहावे की आपण बेहदच्या बाबांद्वारे शिकत आहोत. आम्ही आमच्यासाठी राज्य स्थापन करत आहोत, तर मग त्यामध्ये आपण उच्च पद का नाही मिळवायचे बरे! कमी का मिळवायचे! राजधानी स्थापन होत आहे. त्यात देखील दर्जे असतील ना. पुष्कळ दास-दासी असतील. ते देखील खूप सुख मिळवतात, सोबत महालांमध्ये राहतील, मुले इत्यादींना सांभाळत असतील, किती सुखी असतील. फक्त नाव आहे - दास-दासी. जे राजा-राणी खातात, तेच दास-दासी देखील खातील. प्रजेला तर मिळत नाही, दास-दासींचा देखील खूप मान असतो, परंतु त्यात देखील नंबरवार आहेत. तुम्ही मुले साऱ्या विश्वाचे मालक बनता. दास-दासी तर इथल्या राजांकडे देखील असतात. राजकुमारांची जेव्हा सभा भरते, आपसामध्ये भेटतात तर फुलांचा शृंगार केलेले, मुकुट इत्यादी सहित असतात. मग त्यांच्यामध्ये देखील नंबरवार असतात, अतिशय देखणी सभा असते. त्यामध्ये राण्या बसत नाहीत. त्या पडद्याआड असतात. या सर्व गोष्टी बाबा समजावून सांगत आहेत. त्यांना तुम्ही प्राण-दाता देखील म्हणता, जीवन देणारे, सारखे-सारखे शरीर सोडण्यापासून वाचविणारे आहेत. तिथे मृत्यूचे भय असत नाही. इथे (जुन्या दुनियेमध्ये) मात्र मृत्यूचे किती भय वाटत असते. थोडे काही झाले तरी लगेच डॉक्टरांना बोलावतील की कुठे त्याचा मृत्यू होऊ नये. तिथे (स्वर्गामध्ये) घाबरण्याची गरज नाही. तुम्ही काळावर विजय प्राप्त करता तर किती नशा असला पाहिजे. शिकवणाऱ्याची आठवण करा तर ती देखील आठवणीची यात्रा झाली. पिता-टीचर-सद्गुरुची आठवण करा तरी देखील ठीक आहे, जितके श्रीमतावर चालाल, मनसा-वाचा-कर्मणा पावन बनायचे आहे. बुद्धीमध्ये विकारी संकल्प सुद्धा येऊ नये. हे तेव्हा होईल जेव्हा भाऊ-भाऊ समजणार. बहीण-भाऊ समजल्याने देखील छी-छी होतात. सर्वात जास्त दगा देणारे हे डोळे आहेत म्हणून बाबांनी तिसरा नेत्र दिला आहे, तर स्वतःला आत्मा समजून भावा-भावाला बघा. याला म्हटले जाते ज्ञानाचा तिसरा नेत्र. बहीण-भावाची दृष्टी देखील फेल होते (काम करेनाशी होते) तर दुसरी युक्ती काढतात - स्वतःला भाऊ-भाऊ समजा. खूप मेहनत आहे. विविध विषय असतात ना. कोणता विषय खूप अवघड असतो. हे शिक्षण आहे, यामध्ये देखील जास्त कठीण विषय आहे - तुम्ही कोणाच्याही नावारूपामध्ये फसू शकत नाही. खूप मोठी परीक्षा आहे. विश्वाचा मालक बनायचे आहे. मुख्य गोष्ट बाबा सांगत आहेत - भाऊ-भाऊ समजा. तर मुलांना इतका पुरुषार्थ केला पाहिजे. परंतु चालता-चालता कितीतरी ट्रेटर सुद्धा बनतात. इथे देखील असे होते. चांगल्या-चांगल्या मुलांना माया आपली बनविते. म्हणूनच बाबा म्हणतात - माझ्यापासून दुरावतात, डायव्होर्स सुद्धा देतात. दुरावतात - मुले आणि पिता, आणि डायव्होर्स होतो - पती-पत्नीचा. बाबा म्हणतात - मला दोन्ही मिळते. चांगल्या-चांगल्या मुली देखील डायव्होर्स देऊन जाऊन रावणाच्या बनतात. वंडरफुल खेळ आहे ना. माया काय करत नाही! बाबा म्हणतात, माया खूप बलवान आहे. गायन आहे - ‘हत्तीला मगरीने गिळंकृत केले’. खूप मोठी चूक करून बसतात. बाबांची बे-अब्रू करतात तर माया कच्चे खाऊन टाकते. माया अशी आहे जी कोणा-कोणाला तर एकदम पकडते. अच्छा!

तुम्हा मुलांना, किती सांगू आणि किती नको. मुख्य गोष्ट आहे अल्फ (बाबा). मुसलमान देखील म्हणतात - पहाटे उठून अल्फची (परमात्म्याची) आठवण करा. ही वेळ झोपण्याची नाहीये. या उपायानेच विकर्म विनाश होतात, दुसरा कोणताही उपाय नाही. बाबा तुम्हा मुलांसोबत किती इमानदार आहेत. तुम्हाला कधीही सोडणार नाहीत. आलेच आहेत सुधारून सोबत घेऊन जाण्यासाठी. आठवणीच्या यात्रेनेच तुम्ही सतोप्रधान होणार. त्या बाजूचे जमा होत जाईल. बाबा म्हणतात - ‘आपले खाते-पुस्तक ठेवा कि, किती आठवण करतो, किती सेवा करतो’. व्यापारी लोक जेव्हा तोटा बघतात तर सावध राहतात. तोटा होऊ द्यायचा नाही. कल्प-कल्पांतरासाठी तोटा होतो. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) मनसा-वाचा-कर्मणा पावन बनायचे आहे, बुद्धीमध्ये विकारी संकल्प देखील येऊ नयेत, यासाठी, मी आत्मा भाऊ-भाऊ आहे, हा अभ्यास करायचा आहे. कोणाच्याही नावा-रूपामध्ये फसायचे नाही.

२) जसे बाबा इमानदार आहेत, मुलांना सुधारून सोबत घेऊन जातात, असे इमानदार रहायचे आहे. कधीही सोडून जायचे नाही किंवा डायव्होर्स द्यायचा नाही.

वरदान:-
सदा हलके बनून बाबांच्या डोळ्यांमध्ये सामावून जाणारे सहजयोगी भव

संगम युगावर जी खुशीची खाण मिळते ती आणखी कोणत्याही युगामध्ये मिळू शकत नाही. यावेळी पिता आणि मुलांचे मिलन आहे, वारसा आहे, वरदान आहे. वारसा अथवा वरदान दोन्हीमध्ये मेहनत नसते त्यामुळे तुमचे टायटलच आहे - ‘सहजयोगी’. बापदादा मुलांची मेहनत पाहू शकत नाहीत, म्हणतात - ‘मुलांनो, तुमचे सर्व ओझे बाबांना देऊन तुम्ही हलके व्हा’. इतके हलके बना जे बाबा आपल्या डोळ्यांच्या पापण्यांवर बसवून सोबत घेऊन जातील. बाबांवरील स्नेहाची निशाणी आहे - सदा हलके बनून बाबांच्या डोळ्यांमध्ये सामावून जाणे.

बोधवाक्य:-
निगेटिव्ह विचार करण्याचा मार्ग बंद करा तेव्हाच सफलता स्वरूप बनाल.