27-04-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही आला आहात बाबांकडून हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस (आरोग्य, धन-संपदा आणि आनंदाचा) वारसा घेण्यासाठी, ईश्वरीय मतावर चालल्यानेच बाबांचा वारसा मिळतो”

प्रश्न:-
बाबांनी सर्व मुलांना विकल्प-जीत बनण्यासाठी (वाईट संकल्पांवर विजय मिळविण्यासाठी) कोणती युक्ती सांगितली आहे?

उत्तर:-
विकल्प-जीत बनण्यासाठी स्वतःला आत्मा समजून भावा-भावाच्या दृष्टीने बघा. शरीराला पाहिल्याने विकल्प येतात, त्यामुळे भृकुटीमध्ये आत्मा भावाला बघा. पावन बनायचे असेल तर ही दृष्टी पक्की ठेवा. निरंतर पतित-पावन बाबांची आठवण करा. आठवणीनेच कट (गंज) निघत जाईल, खुशीचा पारा चढेल आणि विकल्पांवर विजय प्राप्त कराल.

ओम शांती।
शिव भगवानुवाच आपल्या शाळीग्रामांप्रति. ‘शिव भगवान् उवाच’ आहे तर जरूर शरीर असेल तेव्हाच तर ‘उवाच’ (बोलणे) होईल. बोलण्यासाठी मुख जरूर हवे. तर ऐकणाऱ्यांना देखील कान जरूर पाहिजेत. आत्म्याला कान, मुख हवे. आता तुम्हा मुलांना ईश्वरीय मत मिळत आहे, ज्याला ‘राम-मत’ म्हटले जाते. दुसरे मग आहेत रावण मतावर. ईश्वरीय मत आणि आसुरी मत. ईश्वरीय मत अर्धा कल्प चालते. बाबा ईश्वरीय मत देऊन तुम्हाला देवता बनवतात मग सतयुग-त्रेतामध्ये तेच मत चालते. तिथे जन्म देखील फार थोडे आहेत कारण योगी लोक आहेत. आणि द्वापर-कलियुगामध्ये आहे रावण मत, इथे जन्म देखील खूप आहेत, कारण भोगी लोक आहेत, त्यामुळे आयुष्य देखील कमी असते. अनेक संप्रदाय होतात आणि खूप दुःखी होतात. राम-मतवाले मग रावण मताशी सहमत होतात. मग साऱ्या दुनियेचे रावण-मत होते. बाबा परत येऊन सर्वांना राम-मत देतात. सतयुगामध्ये आहे - राम-मत, ईश्वरीय-मत. त्याला म्हटले जाते स्वर्ग. ईश्वरीय मत मिळाल्याने अर्ध्या कल्पासाठी स्वर्गाची स्थापना होते. जेव्हा ईश्वरीय मत पूर्ण होते तेव्हा मग रावण राज्य येते, त्याला म्हटले जाते आसुरी मत. आता स्वतःला विचारा - आम्ही आसुरी मताने काय करत होतो? आणि या ईश्वरीय मताने काय करत आहोत? आधी जसेकाही नरकवासी होतो मग स्वर्गवासी बनतो - शिवालयामध्ये. सतयुग-त्रेताला शिवालय म्हटले जाते. ज्या नावाने स्थापना होते तर जरूर त्यांचे नाव देखील देणार. तर ते आहे शिवालय, जिथे देवता राहतात. रचियता बापच तुम्हाला या गोष्टी समजावून सांगत आहेत. काय रचतात, ते देखील तुम्हा मुलांना समजते. सर्व रचना यावेळी त्यांना बोलावत आहे - हे’ पतित-पावन किंवा हे लिब्रेटर, रावणाच्या राज्यातून सोडविणारे अथवा दुःखातून सोडविणारे’. आता तुम्हाला सुखाविषयी समजले आहे तेव्हाच तर याला दुःख समजता. नाहीतर बरेचजण याला दुःख थोडेच समजतात. जसे बाबा नॉलेजफुल आहेत, मनुष्य सृष्टीचे बीजरूप आहेत, तुम्ही देखील नॉलेजफुल बनता. बिजामध्ये झाडाचे नॉलेज असते ना. परंतु ते आहे जड. जर चैतन्य असते तर त्याने सांगितले असते. तुम्ही चैतन्य झाडाचे आहात त्यामुळे झाडाला देखील जाणता. बाबांना म्हटले जाते मनुष्य सृष्टीचे बीजरूप, सत् चित आनंद स्वरूप. या झाडाची उत्पत्ती आणि पालना कशी होते, हे कोणीही जाणत नाहीत. असे नाही कि नवीन झाड उत्पन्न होते. हे देखील बाबांनी समजावून सांगितले आहे जुने झाडवाले मनुष्य बोलावतात की, येऊन रावणापासून लिब्रेट करा (मुक्त करा); कारण यावेळी रावण राज्य आहे. मनुष्य तर ना रचयित्याला जाणत, आणि ना रचनेला जाणत. स्वतः बाबा सांगत आहेत मी एकदाच हेवन (स्वर्ग) बनवतो. हेवन नंतर मग हेल बनतो. रावणाच्या येण्याने मग वाममार्गामध्ये निघून जातात. सतयुगामध्ये हेल्थ, वेल्थ, हॅपिनेस सर्व असते. तुम्ही इथे आले आहात बाबांकडून हेल्थ, वेल्थ, हॅपिनेसचा वारसा घेण्यासाठी; कारण स्वर्गामध्ये कधी दुःख नसते. तुमच्या मनामध्ये आहे की आम्ही कल्प-कल्प पुरुषोत्तम संगम युगामध्ये पुरुषार्थ करतो. नावच किती सुंदर आहे. इतर कोणत्या युगाला पुरुषोत्तम थोडेच म्हणणार. बाकी सर्व युगांमध्ये तर शिडी खालीच उतरत जातात (पतन होत जाते). बाबांना बोलावतात देखील, समर्पण देखील करतात. परंतु, बाबा कधी येणार हे माहीत नसते. आवाज तर देतात - ‘ओ गॉड फादर लिब्रेट करा, गाईड बना’. लिब्रेटर बनतात तर जरूर यावे लागेल आणि मग गाईड बनून घेऊन जावे लागेल. बाबा मुलांना खूप दिवसानंतर बघतात तर खूप खुश होतात. ते (दुनियेतील) आहेत हदचे पिता. हे आहेत बेहदचे पिता. बाबा क्रियेटर आहेत. रचून मग त्यांची पालना देखील करतात. पुनर्जन्म तर घ्यावा लागतो. कोणाला दहा, कोणाला बारा मुले होतात, परंतु ते सर्व आहे हदचे सुख, जे कागविष्ठे समान आहे. तमोप्रधान बनतात. तमोप्रधानतेमध्ये सुख फार थोडे आहे. तुम्ही सतोप्रधान बनता तर भरपूर सुख असते. सतोप्रधान बनण्याची युक्ती बाबा येऊन सांगतात. बाबांना ऑलमाइटी ऑथॉरिटी म्हटले जाते. मनुष्य समजतात, गॉड ऑलमाइटी ऑथॉरिटी (ईश्वर सर्वशक्तिमान) आहेत, तर ते जे हवे ते करू शकतात. मेलेल्याला जिवंत करू शकतात. एकदा कोणीतरी लिहिले होते - ‘जर तुम्ही भगवान आहात तर माशीला जिवंत करून दाखवा’. असे असंख्य प्रश्न विचारतात.

तुम्हाला बाबा शक्ती देतात, ज्याद्वारे तुम्ही रावणावर विजय मिळवता. बंदर (माकडा) पासून मंदिर लायक बनता. त्यांनी मग काय-काय बनवले आहे. वास्तविक तुम्ही सर्व सीता भक्तिणी आहात. तुम्हा सर्वांना रावणापासून सोडवले आहे. रावणाकडून तुम्हाला कधीही सुख मिळू शकत नाही. यावेळी सर्व ‘रावणा’च्या जेलमध्ये आहेत. ‘रामा’च्या जेलमध्ये म्हणणार नाही. राम येतातच रावणाच्या जेलमधून सोडविण्यासाठी. दहा डोकी असलेला रावण बनवतात आणि त्याला २० भुजा दाखवल्या आहेत. बाबांनी समजावून सांगितले आहे की ५ विकार पुरुषामध्ये आणि ५ विकार स्त्रीमध्ये आहेत. त्याला म्हटले जाते रावण राज्य अथवा ५ विकार रुपी मायेचे राज्य. असे म्हणणार नाही की, ‘यांच्याकडे खूप माया आहे (पैसा आहे), मायेचा नशा चढला आहे’; नाही. धनाला माया म्हणणार नाही. धनाला संपत्ती म्हटले जाते. तुम्हा मुलांना संपत्ती इत्यादी भरपूर मिळते. तुम्हाला काहीही मागण्याची आवश्यकता नाही कारण हे तर शिक्षण आहे. शिक्षणामध्ये मागायचे असते का! टीचर जे शिकवतील ते स्टुडंट शिकतील. जितके जे शिकतील, तितके मिळवतील. मागण्याची काही गरज नाही. यामध्ये पवित्रता देखील पाहिजे. एका शब्दाची देखील व्हॅल्यू बघा किती आहे. पद्मा-पदम. बाबांना ओळखा, आठवण करा. बाबांनी ओळख दिली आहे - जशी आत्मा बिंदू आहे, तसा मी देखील आत्मा बिंदू आहे. ते तर एव्हर पवित्र आहेत. शांती, ज्ञान, पवित्रतेचे सागर आहेत. एकाचीच महिमा आहे. सर्वांची पोझिशन आपली-आपली असते. नाटक देखील बनवले आहे - ‘कणा-कणामध्ये भगवान’, ज्यांनी हे नाटक पाहिले असेल ते जाणत असतील. जी महावीर मुले आहेत त्यांना तर बाबा म्हणतात - ‘भले तुम्ही कुठेही जा, फक्त साक्षी होऊन बघितले पाहिजे’.

आता तुम्ही मुले रामराज्य स्थापन करून रावण राज्याला नेस्तनाबूत करता. ही आहे बेहदची गोष्ट. त्या गोष्टी हदच्या बनवल्या आहेत. तुम्ही आहात ‘शिवशक्ती सेना’. शिव ऑलमाइटी आहेत ना. शिवाकडून शक्ती घेणारी शिवाची सेना तुम्ही आहात. त्यांनी देखील मग ‘शिव-सेना’ नाव ठेवले आहे. आता तुमचे नाव काय ठेवायचे. तुमचे तर नाव ठेवले आहे - प्रजापिता ब्रह्माकुमार-कुमारी. शिवाची संतान तर सगळेच आहेत. साऱ्या दुनियेतील आत्मे त्यांची संतान आहेत. शिवाकडून तुम्हाला शक्ती मिळते. शिवबाबा तुम्हाला ज्ञान शिकवतात, ज्यांच्या कडून तुम्हाला इतकी शक्ती मिळते आणि तुम्ही अर्धा कल्प साऱ्या विश्वावर राज्य करता. तुमची ही आहे योगबळाची शक्ती आणि त्यांची आहे बाहूबळाची. भारताचा प्राचीन राजयोग गायलेला आहे. इच्छा देखील ठेवतात भारताचा प्राचीन योग शिकावा, ज्याद्वारे स्वर्गाची स्थापना झाली होती. म्हणतात देखील - क्राईस्टच्या अगोदर इतकी वर्षे स्वर्ग होता. तो कसा बनला? योगाद्वारे. तुम्ही आहात प्रवृत्ती मार्गवाले संन्यासी. ते (दुनियेतील संन्यासी) तर घरदार सोडून जंगलामध्ये निघून जातात. ड्रामा अनुसार प्रत्येकाला पार्ट मिळालेला आहे. इतक्या छोट्याशा बिंदूमध्ये किती सारा पार्ट भरलेला आहे, याला कुदरत (प्रकृतीचा चमत्कारच) म्हणणार. बाबा तर एवर शक्तिमान गोल्डन एजड आहेत (सदैव सर्वशक्तिमान, सुवर्णयुगी आहेत), आता तुम्ही त्यांच्याकडून शक्ती घेता. हा देखील ड्रामा बनलेला आहे. असे नाही की हजार सूर्यांपेक्षा देखील तेजोमय आहे. तो तर ज्याचा जसा भाव बसतो, तर त्या भावनेने बघतात. डोळे लाल-लाल होतात. म्हणतात - ‘बस करा, आम्ही सहन करू शकत नाही’. बाबा म्हणतात - ते सारे भक्तिमार्गाचे संस्कार आहेत. हे तर नॉलेज आहे, यात शिकायचे आहे. बाबा टीचर देखील आहेत, शिकवत आहेत. आम्हाला म्हणत आहेत - ‘तुम्हाला तमोप्रधाना पासून सतोप्रधान बनायचे आहे’. बाबांनी समजावून सांगितले आहे - ‘हियर नो ईविल…’ लोकांना तर माहित देखील नाही आहे की हे कोणी म्हटले आहे; सुरुवातीला माकडाचे चित्र बनवत होते. आता माणसाचे बनवत राहतात. बाबांनी देखील नलिनी कन्येला घेऊन हे चित्र बनविले होते. मनुष्यांना भक्तीचा किती नशा आहे. भक्तीचे राज्य आहे ना. आता होते ज्ञानाचे राज्य. फरक पडतो. मुले जाणतात, खरोखर ज्ञानामुळे खूप सुख मिळते. मग भक्तीमुळे शिडी खाली उतरतात (पतन होते). आपण आधी सतयुगामध्ये जातो मग उवे प्रमाणे हळूहळू खाली उतरतो. १२५० वर्षांमध्ये दोन कला कमी होतात. चंद्राचे उदाहरण आहे. चंद्राला ग्रहण लागते. कला कमी होऊ लागतात आणि मग हळूहळू कला वाढत जातात तर १६ कला होतात. ती आहे अल्पकाळाची गोष्ट. ही तर आहे बेहदची गोष्ट. यावेळी सर्वांवर राहूचे ग्रहण आहे. उच्च ते उच्च आहे बृहस्पतीची दशा. सर्वात खालची आहे राहूची दशा. एकदम दिवाळे काढते. बृहस्पतीच्या दशेमुळे आपण वर चढतो (पावन बनतो). ते (दुनियावाले) बेहदच्या बाबांना जाणत नाहीत. आता राहूची दशा तर सर्वांवर सारखीच आहे. हे तुम्ही जाणता, इतर कोणीही जाणत नाहीत. राहूची दशाच इनसॉल्व्हंट (पतित) बनवते. बृहस्पतीच्या दशेने सॉल्व्हंट (पावन) बनतात. भारत किती पावन होता. एक भारतच होता. सतयुगामध्ये रामराज्य, पवित्र राज्य आहे, ज्याची महिमा होते. अपवित्र राज्यवाले गातात - ‘मैं निर्गुण हारे में कोई गुण नाहीं…’ अशा संस्था देखील काढल्या आहेत - निर्गुण संस्था. अरे ही तर सारी दुनिया निर्गुण संस्था आहे, एकाची गोष्ट थोडीच आहे! मुलाला नेहमी ‘महात्मा’ म्हटले जाते. तुम्ही मग म्हणता - ‘कोणतेही गुण नाहीत’. ही तर सारी दुनिया आहे, ज्यामध्ये कोणतेही गुण नसल्या कारणाने राहूची दशा बसली आहे. आता बाबा म्हणतात - ‘दे दान तो छूटे ग्रहण …’ आता जायचे तर सर्वांनाच आहे ना. देहा सहित देहाच्या सर्व धर्मांना सोडा. स्वतःला आत्मा निश्चय करा. तुम्हाला आता परत जायचे आहे. पवित्र नसल्या कारणाने परत कोणीही जाऊ शकत नाही. आता बाबा पवित्र होण्याची युक्ती सांगतात. बेहदच्या बाबांची आठवण करा. बरेचजण म्हणतात - ‘बाबा आम्ही विसरतो’. बाबा म्हणतात - ‘गोड मुलांनो, पतित-पावन बाबांना तुम्ही विसरलात तर तुम्ही पावन कसे बरे बनाल? थोडा विचार करा की, आपण हे काय बोलत आहोत? जनावरे देखील कधीही असे म्हणणार नाहीत की, आम्ही पित्याला विसरतो आणि तुम्ही हे काय म्हणत आहात!’ मी तुमचा बेहदचा पिता आहे, तुम्ही आला आहात बेहदचा वारसा घेण्यासाठी. निराकार पिता, साकारमध्ये येतील तेव्हाच तर शिकवतील. आता बाबांनी यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) प्रवेश केला आहे. हे आहेत बाप-दादा. दोघांचीही आत्मा या भृकुटीच्या मध्यभागी आहे. तुम्ही म्हणता बाप-दादा, तर जरूर दोन आत्मे असतील. शिवबाबा आणि ब्रह्माची आत्मा. तुम्ही सर्व बनले आहात - प्रजापिता ब्रह्माकुमार-कुमारी. तुम्हाला नॉलेज मिळाले आहे त्यामुळे तुम्ही जाणता की, आपण भाऊ-भाऊ आहोत. मग प्रजापिता ब्रह्माद्वारे आपण भाऊ-बहीणी बनतो. ही आठवण पक्की पाहिजे. परंतु बाबा बघतात की भाऊ-बहिणीमध्ये देखील नावा-रूपाचे आकर्षण होते. बऱ्याच जणांना विकल्प येतात. चांगले शरीर पाहून विकल्प येतात (वाईट संकल्प येतात). आता बाबा म्हणतात - स्वतःला आत्मा समजून भावा-भावाच्या दृष्टीने बघा. सर्व आत्मे भाऊ-भाऊ आहेत. भाऊ-भाऊ आहोत तर जरूर पिता पाहिजे. सर्वांचा पिता एक आहे. सर्वजण बाबांची आठवण करतात. आता बाबा म्हणतात - सतोप्रधान बनायचे असेल तर मामेकम् (मज एकाची) आठवण करा. जितकी आठवण कराल तितकी कट (गंज) निघत जाईल, खुशीचा पारा चढेल आणि बाबांविषयी ओढ वाढत जाईल. नंबरवार पुरुषार्थानुसार. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) अभ्यासावर पूर्ण लक्ष देऊन स्वतःला श्रीमंत बनवायचे आहे. काहीही मागायचे नाही आहे. एका बाबांची आठवण आणि पवित्रतेच्या धारणेने पद्मा-पद्मपती बनायचे आहे.

२) राहूच्या ग्रहणामधून मुक्त होण्यासाठी विकारांचे दान द्यायचे आहे. ‘हियर नो ईविल…’ ज्या गोष्टींमुळे शिडी खाली उतरलो, निर्गुणी बनलो, त्या सर्व गोष्टींना बुद्धीद्वारे विसरायचे आहे.

वरदान:-
‘पहले आप’ या मंत्राद्वारे सर्वांचा आदर प्राप्त करणारे निर्माण सो महान भव

हाच महामंत्र कायम आठवणीत असावा की, ‘निर्माण असलेलेच सर्वात महान आहेत’. ‘पहले आप’ करणे हा सर्वांकडून स्वमान (आदर) प्राप्त करण्याचा आधार आहे. महान बनण्याचा हा मंत्र वरदान रूपामध्ये कायम सोबत ठेवा. वरदानांद्वारेच पालना घेत, उडत लक्ष्यापर्यंत पोहोचा. मेहनत तेव्हा करता जेव्हा वरदानांना कार्यामध्ये आणत नाही. जर वरदानांनी पालना घ्याल, वरदानांना कार्यामध्ये लावत रहाल तर मेहनत समाप्त होईल. सदैव सफलतेचा आणि संतुष्टतेचा अनुभव करत रहाल.

बोधवाक्य:-
चेहऱ्याद्वारे सेवा करण्यासाठी आपले हसरे रमणिक आणि गंभीर स्वरूप इमर्ज करा.