29-04-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - हा सच्चा-सच्चा सतचा संग आहे वरती जाण्यासाठी (उन्नतीसाठी), तुम्ही आता सत्य बाबांच्या संगामध्ये आले आहात त्यामुळे असत्याच्या संगामध्ये पुन्हा कधीही जाऊ नका”

प्रश्न:-
तुम्हा मुलांची बुद्धी कोणत्या आधारावर सदैव बेहदमध्ये स्थिर राहू शकते?

उत्तर:-
बुद्धीमध्ये स्वदर्शन चक्र फिरत रहावे, जे काही ड्रामामध्ये चालू आहे ते, सर्व नोंदलेले आहे. सेकंदाचा सुद्धा फरक पडू शकत नाही. वर्ल्डची हिस्ट्री-जिओग्राफी (दुनियेच्या इतिहास-भूगोलाची) पुनरावृत्ती होणार आहे. जेव्हा ही गोष्ट बुद्धीमध्ये व्यवस्थित पक्की होईल तेव्हा बेहदच्या स्थितीमध्ये टिकू शकाल. बेहदमध्ये टिकण्यासाठी हे लक्षात असावे की, आता विनाश होणार आहे, आपल्याला परत घरी जायचे आहे, पावन बनूनच आपण घरी जाणार.

ओम शांती।
गोड-गोड आत्मिक मुलांप्रती आत्मिक बाबा बसून समजावून सांगत आहेत. समजावून त्यांना सांगतात जे बेसमज (अज्ञानी) आहेत. शाळेमध्ये टीचर शिकवतात कारण मुले अजाण आहेत. मुलांना शिकवले की मग समजू लागते. तुम्ही मुले सुद्धा शिकवल्यावर समजून जाता. आम्हाला शिकविणारे कोण आहेत! हे तर कधीही विसरू नका. शिकविणारे टीचर आहेत - सुप्रीम बाबा. तर त्यांच्या मतावर चालायचे आहे. श्रेष्ठ बनायचे आहे. श्रेष्ठ ते श्रेष्ठ असतात सूर्यवंशी. भले चंद्रवंशी सुद्धा श्रेष्ठ आहेत. परंतु हे (सूर्यवंशी) आहेत - ‘श्रेष्ठ ते श्रेष्ठ’. तुम्ही इथे आला आहात श्रेष्ठ ते श्रेष्ठ बनण्यासाठी. तुम्ही मुले जाणता, आम्हाला असे बनायचे आहे. अशी शाळा ५००० वर्षांनीच उघडते. हा खराखुरा ‘सत्’चा संग आहे हे समजून तुम्ही इथे बसले आहात. सत्य आहेत उच्च ते उच्च, त्यांचा तुम्हाला संग मिळाला आहे. ते (शिवबाबा) बसून सतयुगातील श्रेष्ठ ते श्रेष्ठ देवता बनवितात अर्थात फूल बनवितात. तुम्ही काट्यापासून फूल बनत जाता. कोणी लगेच बनतात, तर कोणाला वेळ लागतो. मुले जाणतात - हे आहे संगमयुग. हे देखील फक्त मुलेच जाणतात, निश्चय आहे की हे पुरुषोत्तम बनण्याचे युग आहे. पुरुषोत्तम सुद्धा कोणते? उच्च ते उच्च आदि सनातन देवी-देवता धर्माचे जे महाराजा-महाराणी आहेत, ते बनण्यासाठी तुम्ही इथे आले आहात. तुम्ही समजता आपण आलो आहोत बेहदच्या बाबांकडून बेहदचे सतयुगी सुख घेण्यासाठी. हदच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व नष्ट होतात. हदचे पिता, हदचे भाऊ, काका, चाचा, मामा, हदची पै-पैशाची जायदाद इत्यादी ज्यामध्ये खूप मोह असतो, ते सर्व नष्ट होणार आहे. बाबा समजावून सांगत आहेत - ही सर्व जायदाद हदची आहे. आता तुम्हाला बेहदमध्ये जायचे आहे. बेहदची जायदाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही इथे आले आहात. बाकी सर्व आहेत हदच्या गोष्टी. शरीर सुद्धा हदचे (नश्वर) आहे. आजारी पडते, तर खल्लास होते. अकाली मृत्यू ओढवतो. आजकाल तर पहा काय-काय बनवत असतात! विज्ञानाने सुद्धा कमाल केली आहे. मायेचा भपका किती आहे. शास्त्रज्ञ खूप हिम्मत दाखवत आहेत. ज्यांच्याकडे पुष्कळ गाड्या-बंगले इत्यादी आहेत ते तर समजतात आता आमच्यासाठी हेच सतयुग आहे. परंतु हे समजत नाहीत की, सतयुगामध्ये एकच धर्म असतो. ती नवीन दुनिया असते. बाबा म्हणतात - अगदीच बुद्धू आहेत. तुम्ही किती समजदार (हुशार) बनता. वरती चढता मग पुन्हा शिडी खाली उतरता (उन्नती आणि मग अधोगती होते). सतयुगामध्ये तुम्ही हुशार होता मग ८४ जन्म घेत-घेत मग बुद्धू बनता. मग बाबा येऊन समजूतदार (ज्ञानी) बनवतात, ज्याला पारसबुद्धी म्हणतात. तुम्ही जाणता आपण पारसबुद्धी, अतिशय बुद्धिमान होतो. गाणे देखील आहे ना - ‘बाबा तुम्ही जो वारसा देता, संपूर्ण जमीन, आकाशाचे आम्ही मालक बनतो. कोणीही आमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही’. कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही. बाबा अमाप देतात. यापेक्षा कोणी जास्त झोळी भरू शकत नाही. तर असे बाबा मिळाले आहेत, ज्यांची अर्धाकल्प आठवण केली. दुःखामध्ये आठवण करतात ना. जेव्हा सुख मिळते त्यानंतर मग आठवण करण्याची आवश्यकता राहत नाही. दुःखामध्ये सर्वजण आठवण करतात - ‘हाय राम…’ असे अनेक प्रकारचे शब्द बोलतात. सतयुगामध्ये असे कुठलेही शब्द असत नाहीत. तुम्ही मुले इथे बाबांच्या सन्मुख आले आहात शिकण्यासाठी. बाबांची डायरेक्ट व्हर्जन्स (महावाक्ये) ऐकता. बाबा, इनडायरेक्ट ज्ञान देत नाहीत. ज्ञान डायरेक्टच मिळते. बाबांना यावे लागते. म्हणतात - ‘गोड-गोड मुलांकडे आलो आहे.’ मला बोलावता ‘ओ बापदादा’. बाबा सुद्धा प्रतिसाद देतात ‘ओ माझ्या मुलांनो,’ आता माझी चांगल्या प्रकारे आठवण करा, विसरू नका. मायेची विघ्न तर अनेक येतील. तुम्हाला अभ्यासा पासून दूर करतील, तुम्हाला देह-अभिमानामध्ये आणतील, म्हणून सावध रहा. हा सच्चा-सच्चा सत्संग आहे, उन्नती करण्याचा. ते (दुनियेतील) सर्व सत्संग इत्यादी आहेत अधोगती करणारे. सत्याचा संग एकदाच होतो, असत्याचा संग जन्म-जन्मानंतर अनेकदा होत असतो. बाबा मुलांना म्हणतात - ‘हा तुमचा अंतिम जन्म आहे’. आता तिथे जायचे आहे, जिथे कोणत्याही वस्तूची अप्राप्ती नसते. ज्या करीता तुम्ही पुरुषार्थ करत आहात. हे जे काही बाबा सांगत आहेत ते तुम्ही आता ऐकता, तिथे (सतयुगामध्ये) हे काहीही कळणार नाही. आता तुम्ही कुठे जात आहात? आपल्या सुखधाममध्ये. सुखधाम तुमचेच होते. तुम्ही सुखधाममध्ये होता, आता दु:ख धाममध्ये आहात. बाबांनी अतिशय सोपा मार्ग सांगितला आहे, त्याचीच आठवण करा. आमचे घर आहे शांतीधाम, तिथून आपण स्वर्गामध्ये येणार. तुमच्या व्यतिरिक्त दुसरे कोणीही स्वर्गामध्ये येत सुद्धा नाही. तर तुम्हीच आठवण करणार. आपण सर्वप्रथम सुखामध्ये जातो नंतर दुःखामध्ये. कलियुगामध्ये सुखधाम नसतेच. सुख मिळतच नाही म्हणूनच तर संन्यासी सुद्धा म्हणतात - ‘सुख काग विष्ठा समान आहे’.

आता मुलांना समज आहे की, बाबा आलेले आहेत, आम्हाला घरी घेऊन जाण्यासाठी. आम्हा पतितांना पावन बनवून घेऊन जातील. पावन बनणार आठवणीच्या यात्रेने. त्या (दुनियेतील) यात्रेला जाणाऱ्यांना खूप चढ-उतारांना सामोरे जावे लागते. कोणी तर आजारी पडतात तर अर्ध्यावरून मागे परत येतात. हे देखील असेच आहे. ही आहे रूहानी यात्रा, अंत मती सो गति होणार आहे. आम्ही आमच्या शांतीधाममध्ये जात आहोत. खूप सोपे आहे. परंतु माया खूप विसरायला लावते. तुमचे युद्ध माये सोबत आहे. बाबा अतिशय सोपे करून समजावून सांगत आहेत - ‘आम्ही आता शांतीधाम मध्ये जातो. बाबांचीच आठवण करतो. दैवी गुण धारण करतो. पवित्र बनतो’. अशा ३-४ गोष्टी मुख्य आहेत ज्या बुद्धीमध्ये ठेवायच्या आहेत; विनाश तर होणारच आहे. ५००० वर्षांपूर्वी सुद्धा आपण गेलो होतो. मग सर्वात प्रथम आम्हीच येणार. गायन देखील आहे ना - ‘राम गयो, रावण गयो’. सर्वांना जायचे आहे शांती धाममध्ये. तुम्ही जे शिकत आहात - त्या अभ्यासानुसार पद प्राप्त करता. तुमचे ध्येय समोर उभे आहे. कोणी म्हणेल, मला साक्षात्कार व्हावा. हे चित्र (लक्ष्मी-नारायणाचे) साक्षात्कार नाही तर मग काय आहे! यांच्याशिवाय अजून कोणाचा साक्षात्कार व्हायला हवा आहे? बेहदच्या बाबांचा? परंतु बाकी कुठलेही साक्षात्कार तर काहीच कामाचे नाहीत. बाबांच्या साक्षात्काराची इच्छा आहे. बाबांपेक्षा गोड दुसरी कुठलीही गोष्ट नाही. बाबा म्हणतात - गोड मुलांनो, आधी आपला साक्षात्कार केला आहे का? आत्मा म्हणते की, बाबांचा साक्षात्कार व्हावा. तर आपला साक्षात्कार केला आहे? हे तर तुम्ही मुलांनीच जाणले आहे. आता समज मिळाली आहे - आपण आत्मा आहोत, आमचे घर शांतीधाम आहे. तिथून आपण आत्मे पार्ट बजावण्यासाठी येतो. ड्रामा प्लॅन अनुसार सर्वप्रथम सतयुगाच्या आदि (सुरुवातीला) आम्हीच येतो. आदि आणि अंताच्या मधील हे आहे पुरुषोत्तम संगमयुग. यामध्ये फक्त ब्राह्मणच असतात दुसरे कोणीही नाही. कलियुगामध्ये तर अनेकानेक धर्म, कुळ इत्यादी आहेत. सतयुगामध्ये एकच घराणे असणार. हे तर सोपे आहे ना. या समयी तुम्ही संगमयुगी ईश्वरीय परिवाराचे आहात. तुम्ही आता ना सतयुगी आहात, ना कलियुगी आहात. हे देखील जाणता की, कल्प-कल्प बाबा येऊन असे शिक्षण शिकवतात. इथे तुम्ही बसले आहात तर हेच स्मृतीमध्ये आले पाहिजे - शांतीधाम, सुखधाम आणि हे आहे दुख:धाम. या दुःखधाम पासून वैराग्य अथवा संन्यास तुमचा बुद्धीद्वारे आहे. ते (दुनियेतील लोक) काही बुद्धीने संन्यास करत नाहीत. ते तर घरदार सोडून देऊन संन्यास घेतात. तुम्हाला तर बाबा असे कधीच सांगत नाही की घरदार सोडा. एवढे मात्र नक्की आहे की भारताची सेवा करायची आहे किंवा आपली सेवा करायची आहे. सेवा तर घरी राहून सुद्धा करू शकता. शिकण्यासाठी जरूर सेंटरला यायचे आहे. मग हुशार होऊन दुसऱ्यांना सुद्धा आप समान बनवायचे आहे. वेळ तर खूप थोडा आहे. गायन देखील आहे ना - ‘बहुत गई थोड़ी रही’. दुनियेमध्ये मनुष्य तर एकदमच घोर अंधारात आहेत, समजतात अजून ४० हजार वर्षे बाकी आहेत. तुम्हाला बाबा समजावून सांगत आहेत - ‘मुलांनो, आता थोडा वेळ बाकी आहे’. तुम्हाला बेहदमध्ये स्थिर व्हायचे आहे. साऱ्या दुनियेमध्ये जे काही चालू आहे ते सर्व नोंदलेले आहे. उवे प्रमाणे (संथ गतीने) ड्रामा सुरु आहे. दुनियेच्या इतिहास-भूगोलाची पुनरावृत्ती होणारच आहे. तेच येऊन शिकतील जे सतयुगामध्ये जाणारे असतील. अनेक वेळा तुम्ही शिकला आहात. तुम्ही आपला स्वर्ग स्थापन करता श्रीमतावर. हे देखील जाणता, उच्च ते उच्च भगवान येतात देखील भारतामध्येच. कल्पापूर्वी सुद्धा आले होते. तुम्ही म्हणाल - ‘कल्प-कल्प असे बाबा येतात’. बाबा म्हणतात - ‘मी कल्प-कल्प अशी स्थापना करणार’. विनाश सुद्धा तुम्हीच पाहता. तुमच्या बुद्धीमध्ये सर्व काही पक्के होते. स्थापना, विनाश आणि पालनेचे कर्तव्य कसे पार पाडले जाते, हे तुम्हीच जाणता. मग हे इतरांना समजावून सांगायचे आहे; आधी जाणत नव्हता. बाबांना जाणल्यामुळे बाबांद्वारे तुम्ही सर्व काही जाणता. दुनियेचा इतिहास-भूगोल यथार्थ रित्या तुम्हीच समजता. मनुष्य कसे तमोप्रधानापासून सतोप्रधान बनतात - हे बाबा येऊन तुम्हाला समजावून सांगत आहेत. तुम्हाला मग इतरांना समजावून सांगायचे आहे.

तुम्ही मुले आता पारस बुद्धी बनत आहात. सतयुगामध्ये असतातच पारस बुद्धी. हे आहे पुरुषोत्तम संगम युग. याला गीतेचा अध्याय सुद्धा म्हटले जाते, ज्याद्वारे तुम्ही पत्थर बुद्धी पासून पारस बुद्धी बनता. गीता ऐकवणारे तर स्वयं भगवान आहेत. मनुष्य ऐकवत नाही. तुम्ही आत्मे ऐकता आणि मग इतरांना ऐकवता. याला म्हटले जाते रूहानी (आत्मिक) ज्ञान, जे रुहानी भावांना ऐकवता. तुमची वृद्धी होत राहते. तुम्ही जाणता बाबा येऊन सूर्यवंशी, चंद्रवंशी राजघराणे स्थापन करतात. कोणा द्वारा? ब्रह्मा-मुखवंशावळी ब्राह्मण कुलभूषण यांच्या द्वारे. बाबा श्रीमत देतात. ही समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. मनात पक्के करायचे आहे, हे तर खूप सोपे आहे. हे आहे दुःखधाम. आता आपल्याला घरी परत जायचे आहे. कलियुगा नंतर आहे सतयुग. गोष्ट तर खूप छोटी आणि सोपी आहे. भले तुम्ही शिकलेले नसाल तरी देखील काही हरकत नाही. जे वाचू शकतात त्यांच्याकडून मग ऐकायला हवे. शिवबाबा आहेत सर्व आत्म्यांचे पिता. आता त्यांच्याकडून वारसा घ्यायचा आहे. बाबांवर निश्चय ठेवाल तर स्वर्गाचा वारसा मिळेल. आतल्या-आत सुद्धा अजपाजप चालत रहावा. शिवबाबांकडून बेहदचे सुख, स्वर्गाचा वारसा मिळत आहे त्यामुळे शिवबाबांची आठवण अवश्य करायची आहे. सर्वांचा हक्क आहे बेहदच्या पित्याकडून वारसा घेण्याचा. जसा हदमध्ये (लौकिकमध्ये) जन्मसिद्ध हक्क मिळतो तसाच मग हा आहे बेहदचा हक्क. शिवबाबांकडून तुम्हाला संपूर्ण विश्वाचे राज्य मिळते. छोट्या-छोट्या मुलांना देखील हे समजावून सांगितले पाहिजे. बाबांकडून जन्मसिद्ध अधिकार घेण्याचा हक्क प्रत्येक आत्म्याला आहे. कल्प-कल्प घेतात देखील जरूर. तुम्ही वारसा घेता जीवनमुक्तीचा. ज्यांना मुक्तीचा वारसा मिळतो ते देखील जीवनमुक्तीमध्ये जरूर येतात. पहिला जन्म तर सुखामध्येच असतो. तुमचा हा आहे ८४ वा जन्म. हे सर्व ज्ञान तुमच्या बुद्धीमध्ये राहिले पाहिजे. बेहदचे बाबा आम्हाला शिकवत आहेत - हे विसरू नका. देहधारी कधीही ज्ञान देऊ शकत नाहीत. त्यांच्याकडे रुहानी ज्ञान असत नाही. तुम्हाला समजावून सांगण्यात येते - भाऊ-भाऊ समजा. जे कोणी मनुष्य मात्र आहेत त्या कोणालाही हे शिक्षण मिळत नाही. भले गीता सुद्धा ऐकवतात की, ‘भगवानुवाच - काम महाशत्रू आहे, यावर विजय प्राप्त केल्याने तुम्ही जगतजीत बनाल’, परंतु समजत काहीच नाहीत. आता भगवान तर आहेत ट्रुथ (सत्य). देवता सुद्धा भगवंताकडूनच सत्य शिकले आहेत. श्रीकृष्णाने देखील हे पद कसे प्राप्त केले? लक्ष्मी-नारायण कसे बनले? असे कोणते कर्म केले? कोणी सांगू शकेल? आता तुम्हीच जाणता निराकार बाबांनी (शिवबाबांनी) ब्रह्मा बाबांद्वारा त्यांना असे कर्म शिकवले. ही सृष्टी आहे ना. आता तुम्ही आहात प्रजापिता ब्रह्माकुमार-कुमारी. तुमच्याकडे ज्ञान आहे रूहानी बाबांचे. तुम्ही समजता आम्ही भगवंताला जाणले (ओळखले) आहे. उच्च ते उच्च ते निराकार आहेत. त्यांचे साकार रूपच नाहीये. बाकी जे काही पाहता ते साकार आहे. मंदिरांमध्ये सुद्धा शिवलिंग पाहता अर्थात त्यांना शरीर नाही आहे. असे नाही की ते नावा-रूपा पासून वेगळे आहेत. हां, बाकी सर्व देहधारींना नाव दिले जाते, जन्मपत्रिका असते. शिवबाबा तर आहेत निराकार. त्यांची जन्मपत्रिका नाही आहे. श्रीकृष्णाची जन्मपत्रिका आहे नंबर वन. शिवजयंती सुद्धा साजरी करतात. शिवबाबा आहेत - निराकार कल्याणकारी. बाबा येतात तर जरूर वारसा देणार. त्यांचे नाव ‘शिव’ आहे. तेच पिता, टिचर, सद्गुरु तिन्ही एकच आहेत. किती चांगल्या प्रकारे शिकवतात. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) या दुःखधामचा बुद्धीने संन्यास करून शांतीधाम आणि सुखधामला स्मृतीमध्ये ठेवायचे आहे. भारताची आणि आपली खरी-खरी सेवा करायची आहे. सर्वांना रुहानी नॉलेज (आत्मिक ज्ञान) ऐकवायचे आहे.

२) आपला सतयुगी जन्मसिद्ध अधिकार घेण्यासाठी एका बाबांवर संपूर्ण निश्चय ठेवायचा आहे. आतल्याआत अजपाजप करत रहायचा आहे. दररोज अभ्यास करायचा आहे.

वरदान:-
सर्व संबंधांच्या अनुभूती सोबतच प्राप्तींच्या खुशीचा अनुभव करणारे तृप्त आत्मा भव

जे सच्चे आशिक आहेत ते प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक कर्मामध्ये सदैव प्राप्तीच्या खुशीमध्ये राहतात. बरीच मुले अनुभव करतात की, ‘हो, ते माझे बाबा आहेत, साजन आहेत, मुलगा आहे…’ परंतु प्राप्ती जितकी पाहिजे तितकी होत नाही. तर मग अनुभूती सोबतच सर्व संबंधांद्वारा प्राप्तीची जाणीव व्हावी. असे प्राप्ती आणि अनुभूती करणारे सदैव तृप्त राहतात. त्यांना कुठल्याही गोष्टीची अप्राप्ती आहे असे वाटत नाही. जिथे प्राप्ती आहे तिथे तृप्ती जरूर आहे.

बोधवाक्य:-
निमित्त बना तर सेवेच्या सफलतेमध्ये तुम्हाला वाटा मिळेल.