30-04-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - आपला हिशोब (पोतामेल) तपासून बघा की पूर्ण दिवसभरामध्ये बाबांची किती वेळ आठवण केली, काही चूक तर केली नाही ना? कारण तुम्ही प्रत्येक जण व्यापारी आहात”

प्रश्न:-
अशी कोणती एक मेहनत, अंतर्मुखी बनून करत राहिल्यास अपार आनंद होईल?

उत्तर:-
जन्म-जन्मांतर जे काही केले आहे, जे समोर येत राहते, त्या सर्वांमधून बुद्धीयोग काढून सतोप्रधान बनण्यासाठी बाबांची आठवण करण्याची मेहनत करत रहा. चोहो बाजूंकडून बुद्धी काढून, अंतर्मुखी बनून बाबांची आठवण करा. सेवेचा पुरावा द्याल तर अपार आनंद होईल.

ओम शांती।
बाबा बसून मुलांना समजावून सांगत आहेत, हे तर मुले जाणतात की, आत्मिक बाबा (रुहानी बाबा) आत्मिक मुलांना बसून समजावून सांगत आहेत. आत्मिक बाबा झाले बेहदचे बाबा. आत्मिक मुले देखील झाली बेहदची मुले. बाबांना तर सर्व मुलांची सद्गती करायची आहे. कोणाद्वारे? या मुलांद्वारे विश्वाची सद्गती करायची आहे. विश्वातील सर्वच मुले काही इथे येऊन शिकत नाहीत. नावच आहे ईश्वरीय विश्व-विद्यालय. मुक्ती तर सर्वांची होतेच. मुक्ती म्हणा, जीवनमुक्ती म्हणा. मुक्तीमध्ये जाऊन मग तरी देखील सर्वांना जीवन-मुक्तीमध्ये यायचेच आहे. तर असे म्हणू - सर्व जीवन-मुक्तीमध्ये येतात व्हाया मुक्तिधाम. एकाच्या पाठोपाठ पार्ट बजावण्यासाठी यायचेच आहे. तोपर्यंत मुक्तिधाम मध्ये थांबावे लागते. मुलांना आता रचयिता आणि रचना यांच्या विषयी माहित झाले आहे. हि सर्व रचना अनादि आहे. रचयिता तर एक बाबाच आहेत. हे जे काही सर्व आत्मे आहेत, सर्व बेहदच्या बाबांची मुले आहेत. जेव्हा मुलांना माहिती होते तेव्हा तेच येऊन योग शिकतात. हा भारतासाठीच योग आहे. बाबा येतात देखील भारतामध्येच. भारतवासीयांनाच आठवणीची यात्रा शिकवून पावन बनवतात आणि ज्ञान सुद्धा देतात की, हे सर्व सृष्टीचे चक्र कसे फिरते, हे देखील मुलेच जाणतात. रुद्रमाळा देखील आहे जिचे गायन आणि पूजन केले जाते, स्मरण केले जाते. भक्त-माळा सुद्धा आहे. श्रेष्ठ ते श्रेष्ठ भक्तांची माळा आहे. भक्तमाळे नंतर असली पाहिजे ज्ञान-माळा. भक्ती आणि ज्ञान आहे ना. ‘भक्तमाळा’ देखील आहे तर ‘रुद्रमाळा’ सुद्धा आहे. नंतर मग ‘रूंडमाळा’ म्हटली जाते कारण उच्च ते उच्च मनुष्य आहे - विष्णू, ज्यांना सूक्ष्म वतनमध्ये दाखवतात. प्रजापिता ब्रह्मा तर हे आहेत, यांची देखील माळा आहे. अखेरीस जेव्हा ही माळा बनेल तेव्हाच ती रुद्रमाळा आणि विष्णूची वैजयंतीमाळा बनेल. सर्वश्रेष्ठ आहेत शिवबाबा मग उच्च ते उच्च आहे विष्णूचे राज्य. भक्तीमध्ये शोभेसाठी किती चित्रे (मुर्त्या) बनवल्या आहेत. परंतु ज्ञान काहीच नाहीये. तुम्ही जी चित्रे बनवता त्यांची ओळख द्यायची आहे जेणेकरून मनुष्यांना समजेल. नाहीतर शिव आणि शंकराला एकत्र करतात.

बाबांनी समजावून सांगितले आहे सूक्ष्म वतनमध्ये देखील सर्व साक्षात्काराच्या गोष्टी आहेत. तिथे हाडा-मासाची शरीरे असत नाहीत. फक्त साक्षात्कार होतात. संपूर्ण ब्रह्मा देखील आहेत, परंतु ते आहेत संपूर्ण, अव्यक्त. आत्ता जे व्यक्त ब्रह्मा आहेत त्यांना अव्यक्त बनायचे आहे. व्यक्तच अव्यक्त होतात, ज्याला फरिश्ता देखील म्हणतात. त्यांचे सूक्ष्म वतनमध्ये चित्र ठेवले आहे. सूक्ष्म वतनमध्ये जातात, तर म्हणतात बाबांनी शूबीरस पाजला. आता तिथे झाडे वगैरे काही असत नाहीत. वैकुंठामध्ये आहेत, परंतु असे नाही की वैकुंठातून आणून पाजत असतील. या सर्व सूक्ष्मवतन मधील साक्षात्काराच्या गोष्टी आहेत. आता तुम्ही मुले जाणता की परत घरी जायचे आहे आणि आत्म-अभिमानी बनायचे आहे. मी आत्मा अविनाशी आहे, हे शरीर विनाशी आहे. आत्म्याचे ज्ञान देखील तुम्हा मुलांना आहे. ते (दुनियावाले) तर आत्मा काय आहे, हे सुद्धा जाणत नाहीत. त्या लोकांना हे देखील माहीत नाही आहे की, त्यांच्यामध्ये कसा ८४ जन्मांचा पार्ट भरलेला आहे. हे ज्ञान फक्त बाबाच देतात. स्वतःबद्दलचे देखील ज्ञान देतात. तमोप्रधाना पासून सतोप्रधान बनवतात. बस, हाच पुरुषार्थ करत रहा - ‘मी आत्मा आहे, आता परमात्म्याशी योग लावायचा आहे’. सर्वशक्तिमान पतित-पावन एका बाबांनाच म्हणतात. संन्यासी म्हणतात - ‘पतित-पावन या’. कोणी तर ‘ब्रह्म’ला सुद्धा पतित-पावन म्हणतात. आता तुम्हा मुलांना भक्ती विषयीचे सुद्धा ज्ञान मिळते की, भक्ती किती काळ चालते, ज्ञान किती काळ चालते? हे सर्व बाबा बसून समजावून सांगत आहेत. आधी काहीच जाणत नव्हतो. मनुष्य असूनही तुच्छ-बुद्धी बनले आहेत. सतयुगामध्ये एकदम स्वच्छ बुद्धी होते. किती त्यांच्यात दैवी गुण होते. तुम्हा मुलांना दैवी गुण देखील जरूर धारण करायचे आहेत. म्हणतात ना - ‘हे तर जसे देवता आहेत’. भले साधू, संत, महात्मा यांना लोक मानतात परंतु ते काही दैवी-बुद्धीवाले तर नाहीत. रजोगुणी बुद्धी होतात. राजा, राणी, प्रजा आहेत ना. राजधानी कधी आणि कशी स्थापन होते - हे दुनिया जाणत नाही. इथे तुम्ही सर्व नवीन गोष्टी ऐकता. तर माळेचे सुद्धा रहस्य समजावून सांगितले आहे. सर्वश्रेष्ठ आहेत बाबा, रुद्र; त्यांची माळा वरती आहे, ते आहेत निराकार मग साकार लक्ष्मी-नारायण त्यांची देखील माळा आहे. ब्राह्मणांची माळा आत्ता बनत नाही. शेवटाला जाऊन तुम्हा ब्राह्मणांची माळा सुद्धा बनते. या गोष्टींबद्दल जास्त प्रश्नोत्तरे करण्याची गरज नाही. मूळ गोष्ट आहे - स्वतःला आत्मा समजून परमपिता परमात्म्याची आठवण करा. हा निश्चय पक्का पाहिजे. मूळ गोष्ट आहे पतितांना पावन बनविणे. सारी दुनियाच पतित आहे पुन्हा पावन बनायचे आहे. मूल वतनमध्ये सुद्धा सर्व पावन आहेत तर सुख धाममध्ये सुद्धा सर्व पावन आहेत. तुम्ही पावन बनून पावन दुनियेमध्ये जाता. जणू आता पावन दुनिया स्थापन होत आहे. हे सर्व ड्रामामध्ये नोंदलेले आहे.

बाबा म्हणतात - पूर्ण दिवसाचा पोतामेल (हिशोब) बघा - कोणती चूक तर झाली नाही? व्यापारी लोक मुरादी (पुंजी) सांभाळतात, ही देखील कमाई आहे. तुम्ही प्रत्येक जण व्यापारी आहात. बाबांसोबत व्यापार करता. स्वतःची तपासणी करायची आहे - माझ्यामध्ये किती दैवीगुण आहेत? बाबांची किती आठवण करतो? मी किती अशरीरी बनतो? आपण अशरीरी आलो होतो पुन्हा अशरीरी बनून जायचे आहे. अजूनही सर्वजण येतच राहतात. एकालाही मधूनच तर काही जायचे नाहीये. जायचे तर सर्वांना एकत्रच आहे. भले सृष्टी मोकळी राहत नाही, गायन आहे - ‘राम गयो, रावण गयो…’ परंतु राहतात दोघेही. रावण संप्रदाय गेल्यावर पुन्हा परत येत नाही. बाकी हे वाचतात. हा देखील पुढे जाऊन साक्षात्कार होणार आहे. हे जाणून घ्यायचे आहे की नवीन दुनियेची स्थापना कशी होत आहे, शेवटी काय होणार आहे? मग फक्त आपलाच धर्म राहील. सतयुगामध्ये तुम्ही राज्य कराल. कलियुग संपेल, मग सतयुग येणार आहे. आता रावण संप्रदाय आणि राम संप्रदाय दोघेही आहेत. संगमयुगावरच हे सर्व होते. आता तुम्ही हे सर्व काही जाणता. बाबा म्हणतात - बाकी जी काही रहस्ये आहेत, ती नंतर हळू-हळू समजावून सांगत राहीन. जे रेकॉर्डमधे नोंदलेले आहे, ते उघड होत जाईल. तुम्हाला समजत जाईल. आगाऊ काहीही सांगणार नाही. हा देखील ड्रामामध्ये जसा एक प्लॅन (योजना) आहे, रेकॉर्ड (पार्ट) उघडत जाते. बाबा बोलत जातात. तुमच्या बुद्धीमध्ये या सर्व गोष्टींबद्दलची समज वाढत जाते. जस-जशी टेप चालत राहील तस-तशी बाबांची मुरली चालत राहील. ड्रामाची सर्व रहस्ये भरून राहिली आहेत. असे नाही की, रेकॉर्डवरून (तबकडीवरून) सुई उचलून मधेच ठेवू शकतो आणि तो रिपीट होईल. नाही, ते सुद्धा मग पुन्हा तेच रिपीट होणार. काही नवीन गोष्ट नाही. बाबांकडे जी नवी गोष्ट असेल ती रिपीट होणार. तुम्ही ऐकत आणि ऐकवत जाल. बाकी सर्व गुप्त आहे. हि राजधानी स्थापन होत आहे. पूर्ण माळा बनत आहे. तुम्ही वेगवेगळे जाऊन राज्यामध्ये जन्म घ्याल. राजा, राणी, प्रजा सर्व पाहिजेत. हे सर्व बुद्धीद्वारे समजून घ्यावे लागते. प्रॅक्टिकल मध्ये जे होईल ते बघत रहायचे आहे. जे इथून जातात, ते चांगल्या श्रीमंताच्या घरी जाऊन जन्म घेतात. आता देखील तुमचे तिथे खूप आदरातिथ्य होते. या वेळीसुद्धा रत्नजडित वस्तू सर्वांकडे असतात. परंतु त्याच्यामध्ये इतकी ताकद नाहीये. शक्ती तुमच्यामध्ये आहे. तुम्ही जिथे जाल तिथे शो कराल (तुमची शक्ती प्रकट होईल). तुम्ही तर श्रेष्ठ बनता त्यामुळे तुम्ही जाऊन तिथे दैवी चरित्र दाखवाल. आसुरी मुले जन्मत:च रडत राहतील. घाणेरडे (विकारी) सुद्धा होतात. तुमची तर अतिशय सु-व्यवस्थितरित्या पालना होईल. घाण (विकार) इत्यादीची तर गोष्टच नाही. आजकालची मुले तर घाणेरडी (विकारी) बनतात. सतयुगामध्ये तर अशी गोष्ट घडू शकत नाही. कारण स्वर्ग आहे ना. तिथे दुर्गंधी येत नाही, ज्यामुळे म्हणावे लागेल अगरबत्ती पेटवा. तिथे बगीच्यामध्ये अतिशय सुगंधीत फुले असतील. इथल्या फुलांना इतका सुगंध नसतो. तिथे तर प्रत्येक गोष्टीत १०० टक्के सुगंध असतो. इथे तर १ टक्का सुद्धा नाही. तिथे तर फुले देखील उत्कृष्ट असतील. इथे भले कोणी कितीही श्रीमंत असला तरी देखील इतका नाही. तिथे तर विविध प्रकारच्या गोष्टी असतील. भांडी इत्यादी सर्व सोन्याची असतील. जसे इथले दगड, तिथे मग सोनेच सोने. वाळूमध्ये देखील सोने असते. विचार करा - किती सोने असेल! ज्यापासून घरे इत्यादी बनतील. तिथे असे हवामान असेल - ना थंडी, ना उन्हाळा. तिथे उन्हाळ्याचा त्रास नाही ज्यामुळे पंखे लावावे लागतील. त्याचे नावच आहे स्वर्ग. तिथे अपार सुख असते. तुमच्या सारखे पद्मा-पदम भाग्यशाली कोणी बनतच नाही. लक्ष्मी-नारायणाची किती महिमा गातात. तर मग त्यांना जे असे बनवतात, त्यांची किती महिमा केली पाहिजे. पहिली असते अव्यभिचारी भक्ती, मग देवतांची भक्ती सुरू होते. त्याला देखील भूत पूजा म्हणणार. शरीर तर ते असत नाही. ५ तत्त्वांची पूजा होते. शिवबाबांसाठी तर असे म्हणणार नाही. त्यांची पूजा करण्यासाठी कोणत्या धातू अथवा सोने इत्यादीचे शिवलींग बनवतात. आत्म्याला थोडेच सोने म्हणणार? आत्मा कशापासून बनलेली आहे? शिवबाबांचे चित्र (मूर्ती) कशापासून बनवले आहे हे लगेच सांगतील. परंतु आत्मा-परमात्मा कोणत्या वस्तू पासून बनलेला आहे, हे कोणीही सांगू शकणार नाही. सतयुगामध्ये ५ तत्त्वे देखील शुद्ध असतात. इथे आहेत अशुद्ध. तर पुरुषार्थी मुले अशा प्रकारे विचार करत राहतील. बाबा म्हणतात - या सर्व गोष्टींना सुद्धा सोडून द्या. जे होणार आहे ते होईल. पहिले बाबांची आठवण करा. चारी बाजूंनी बुद्धी काढून मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर विकर्म विनाश होतील. जे काही ऐकता ते सर्व सोडून एक गोष्ट पक्की करा की, आम्हाला सतोप्रधान बनायचे आहे. मग सतयुगामध्ये जे कल्प-कल्प झाले असेल, तेच होईल. त्यामध्ये कोणताही बदल होऊ शकत नाही. मूळ गोष्ट आहे, बाबांची आठवण करा. ही आहे मेहनत. ती पूर्णपणे करा. वादळे तर खूप येतात. जन्म-जन्मांतर जे काही केले आहे ते सर्वकाही समोर येते. तर सगळीकडून बुद्धी काढून अंतर्मुखी होऊन, माझी आठवण करण्याचा पुरुषार्थ करा. तुम्हा मुलांना स्मृती तर आली आहे, ती देखील नंबरवार पुरुषार्था अनुसार. सेवेवरून देखील समजून येते. सेवा करणाऱ्यांना सेवेचा आनंद होत असतो. जे चांगली सेवा करतात, त्यांच्या सेवेचा पुरावा देखील मिळतो. पंडे बनून येतात. कोण महारथी, घोडेस्वार, प्यादी आहेत, ते लगेच समजून येते. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) बाकी सर्व गोष्टी सोडून, बुद्धीला सगळीकडून काढून सतोप्रधान बनण्यासाठी अशरीरी बनण्याचा अभ्यास करायचा आहे. दैवी गुण धारण करायचे आहेत.

२) बुद्धीमध्ये चांगले-चांगले विचार आणायचे आहेत की, माझ्या राज्यामध्ये (स्वर्गात) काय-काय असेल, त्याच्यावर विचार करून स्वतःला त्याप्रमाणे लायक, चारित्र्यवान बनवायचे आहे. इथून बुद्धी काढून टाकायची आहे.

वरदान:-
सेवेद्वारे मेवा प्राप्त करणारे सर्व हदच्या इच्छां पासून दूर सदा संपन्न आणि समान भव

सेवेचा अर्थ आहे मेवा देणारी. जर कोणती सेवा असंतुष्ट बनवत असेल तर ती सेवा, सेवा नाहीये. अशी सेवा भले सोडून द्या परंतु संतुष्टता सोडू नका. जसे शरीराने तृप्त असलेले सदैव संतुष्ट असतात त्याचप्रमाणे जे मनाने तृप्त असणारे देखील संतुष्ट असतील. संतुष्टता हे तृप्तीचे लक्षण आहे. तृप्त आत्म्याला कोणतीही हदची इच्छा, मान, शान, सुविधा, साधनांची भूक असणार नाही. ते हदच्या सर्व इच्छां पासून दूर, सदैव संपन्न आणि समान असतील.

बोधवाक्य:-
सच्च्या दिलापासून निःस्वार्थ सेवेमध्ये पुढे जाणे अर्थात पुण्याचे खाते जमा करणे.