01-01-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही ज्ञानाची वर्षा करून हिरवळ निर्माण करणारे आहात, तुम्हाला धारणा करायची आहे आणि करवून घ्यायची आहे”

प्रश्न:-
जे ढग वर्षाव करत नाहीत, त्यांना कोणते नाव देणार?

उत्तर:-
ते आहेत सुस्त ढग. चुस्त ते जे वर्षाव करतात. जर धारणा असेल तर वर्षाव केल्याशिवाय राहू शकणार नाहीत. जे धारणा करून दुसऱ्यांना करवत नाहीत त्यांचे पोट पाठीला लागते, ते गरीब आहेत. प्रजेमध्ये जातात.

प्रश्न:-
आठवणीच्या यात्रेमध्ये मुख्य मेहनत कोणती आहे?

उत्तर:-
स्वतःला आत्मा समजून बाबांना बिंदू रुपामध्ये आठवण करणे, बाबा जे आहेत, जसे आहेत त्याच स्वरूपामध्ये यथार्थ आठवण करणे, यातच मेहनत आहे.

गीत:-
जो पिया के साथ है…

ओम शांती।
जसे सागराच्या वर ढग आहेत तर ढगांचा पिता झाला सागर. जे ढग सागरासोबत आहेत त्यांच्यासाठीच वर्षा आहे. ते आकाशातील ढग देखील पाणी भरून घेऊन मग वर्षाव करतात. तुम्ही देखील सागरा जवळ येता भरण्यासाठी. सागराची मुले ढग तर आहातच, जे गोड पाणी खेचून घेता. आता ढग सुद्धा अनेक प्रकारचे असतात. कोणी खूप जोराने वर्षाव करतात, पुरासारखी स्थिती करतात, कोणी कमी वर्षाव करतात. तुमच्यामध्ये देखील असे नंबरवार आहेत जे खूप जोराने वर्षाव करतात, त्यांचे नाव देखील गायले जाते. जसे खूप पाऊस पडतो तेव्हा लोकं आनंदीत होतात. हे देखील असेच आहे. जे चांगला वर्षाव करतात, त्यांची महिमा होते, जे वर्षाव करत नाहीत त्यांचे मन जसे सुस्त (आळशी) होते, पोट भरणार नाही. पूर्णत: धारणा न झाल्यामुळे पोट जाऊन पाठीला लागते. दुष्काळ होतो तेव्हा मनुष्यांचे पोट पाठीला लागते. इथे देखील धारणा करून मग धारणा करवून घेत नाहीत तर पोट जाऊन पाठीला लागेल. खूप वर्षाव करणारे जाऊन राजा-राणी बनतील आणि ते गरीब. गरिबांचे पोट पाठीला लागलेले असते. तर मुलांनी खूप चांगली धारणा केली पाहिजे. यामध्ये देखील आत्मा आणि परमात्म्याचे ज्ञान किती सोपे आहे. तुम्ही आता समजता आपल्यामध्ये आत्मा आणि परमात्मा दोघांचेही ज्ञान नव्हते. तर पोट पाठीला लागले ना. मुख्य तर आहेच आत्मा आणि परमात्म्याची गोष्ट. मनुष्य, आत्म्यालाच जाणत नाहीत तर मग परमात्म्याला कसे बरे जाणू शकतील. किती मोठे विद्वान, पंडित इत्यादी आहेत, कोणीही आत्म्याला जाणत नाहीत. आता तुम्हाला माहिती झाले आहे की आत्मा अविनाशी आहे, तिच्यामध्ये ८४ जन्मांचा अविनाशी पार्ट नोंदलेला आहे, जो चालतच राहतो. आत्मा अविनाशी तर पार्ट सुद्धा अविनाशी आहे. आत्मा कशी ऑलराऊंड पार्ट बजावते - हे कोणालाच माहिती नाही आहे. ते तर आत्मा सो परमात्मा म्हणतात. तुम्हा मुलांना आदि पासून अंतापर्यंतचे पूर्ण ज्ञान आहे. ते तर ड्रामाची आयुच लाखो वर्षे आहे असे म्हणतात. आता तुम्हाला सर्व ज्ञान मिळाले आहे. तुम्ही जाणता या बाबांनी रचलेल्या ज्ञान यज्ञामध्ये ही सारी दुनिया स्वाहा होणार आहे; म्हणून बाबा म्हणतात - ‘देहा सहित जे काही आहे ते सर्व विसरा, स्वतःला आत्मा समजा’. बाबांची आणि शांतीधाम, स्वीट होमची आठवण करा. हे तर आहेच दुःख धाम. तुमच्यामध्ये देखील नंबरवार पुरुषार्थानुसार समजावून सांगू शकतात. आता तुम्ही ज्ञानाने तर भरपूर आहात. बाकी सर्व मेहनत आहे आठवणीमध्ये. जन्म-जन्मांतरीचा देह-अभिमान नष्ट करून देही-अभिमानी बनणे, यामध्ये खूप मेहनत आहे. बोलणे खूप सोपे आहे परंतु स्वतःला आत्मा समजणे आणि बाबांना देखील बिंदू रुपामध्ये आठवण करणे, यामध्ये मेहनत आहे. बाबा म्हणतात - ‘मी जो आहे, जसा आहे, तसे कोणी क्वचितच आठवण करू शकतात’. जसा पिता तशी मुले असतात ना. स्वतःला जाणले तर पित्याला देखील जाणतील. तुम्ही जाणता शिकविणारे तर एक बाबाच आहेत, शिकणारे खूप आहेत. बाबा राजधानी कशी स्थापन करतात, ते तुम्ही मुलेच जाणता. बाकी ही शास्त्रे इत्यादी सर्व आहेत भक्तिमार्गाची सामग्री. इतरांना समजावून सांगण्यासाठी हे सांगावे लागते. बाकी यामध्ये न आवडण्याचा तर प्रश्नच नाही. शास्त्रांमध्ये देखील ब्रह्माचा दिवस आणि रात्र म्हणतात परंतु समजत नाहीत. रात्र आणि दिवस अर्धा-अर्धा असतो. शिडीच्या चित्रावर किती सोप्या रीतीने समजावून सांगितले जाते.

मनुष्य समजतात की, भगवान तर मोठे समर्थ आहेत ते जे पाहिजे ते करू शकतात. परंतु बाबा म्हणतात - ‘मी देखील ड्रामाच्या बंधनामध्ये बांधलेला आहे’. भारतावर तर किती संकटे येत राहतात मग मी सारखा-सारखा येतो का? माझ्या पार्टला मर्यादा आहे. जेव्हा सर्वत्र दुःख होते तेव्हा मी माझ्या वेळेवर येतो. एका सेकंदाचा देखील फरक पडत नाही. ड्रामामध्ये प्रत्येकाचा पार्ट ॲक्युरेट नोंदलेला आहे. हे आहे सर्वश्रेष्ठ सर्वोच्च बाबांचे रीइनकारनेशन (अवतरण). मग कमी ताकद असणारे नंबरवार सर्व येतात. तुम्हा मुलांना आता बाबांकडून नॉलेज मिळाले आहे ज्यामुळे तुम्ही विश्वाचे मालक बनता. तुमच्यामध्ये फुल फोर्सने ताकद येते. पुरुषार्थ करून तुम्ही तमोप्रधानापासून सतोप्रधान बनता. बाकीच्यांचा तर पार्टच नाही आहे. मुख्य आहे ड्रामा, ज्याचे नॉलेज तुम्हाला आता मिळते. बाकी तर सर्व आहे मटेरियल (भौतिक) कारण ते सर्व या डोळ्यांनी दिसून येते. वंडर ऑफ दी वर्ल्ड तर बाबा आहेत, जे मग रचतात देखील स्वर्ग, ज्याला हेवन, पॅराडाईज म्हटले जाते. त्यांची किती महिमा आहे, बाबा आणि बाबांच्या रचनेची खूप महिमा आहे. उच्च ते उच्च आहेत भगवान. उच्च ते उच्च स्वर्गाची स्थापना बाबा कसे करतात, हे कोणीही काहीही जाणत नाहीत. तुम्ही गोड-गोड मुले देखील नंबरवार पुरुषार्थानुसार जाणता आणि त्यानुसारच पद मिळवता, ज्यांनी जो पुरुषार्थ केला ते ड्रामा अनुसारच करतात. पुरुषार्था शिवाय तर काहीच मिळू शकत नाही. कर्म केल्याशिवाय एक सेकंद देखील राहू शकत नाहीत. ते हठयोगी श्वासावर नियंत्रण इत्यादी करतात, जणूकाही जड (अचेतन) बनतात, सुप्तावस्थेमध्ये पडून राहतात, वर माती जमा होते, मातीवर पाणी पडल्यामुळे गवत उगवते. परंतु याने काहीच फायदा नाही. किती दिवस असे बसून राहणार? कर्म तर जरूर करायचेच आहे. कर्म संन्यासी कोणी बनू शकत नाही. होय, फक्त भोजन इत्यादी बनवत नाहीत म्हणून त्यांना कर्म संन्यासी म्हणतात. हा देखील त्यांचा ड्रामामध्ये पार्ट आहे. हे निवृत्ती मार्गवाले सुद्धा नसते तर भारताची काय हालत झाली असती? भारत एक नंबरचा पवित्र होता. बाबा सर्वप्रथम पवित्रतेची स्थापना करतात, जी मग अर्धा कल्प चालते. खरोखर सतयुगामध्ये एक धर्म, एक राज्य होते. मग डीटी राज्य (देवताई राज्य) आता पुन्हा स्थापन होत आहे. अशी चांगली-चांगली स्लोगन बनवून लोकांना जागृत केले पाहिजे. पुन्हा एकदा दैवी राज्य-भाग्य येऊन घ्या. आता तुम्ही किती चांगल्या रीतीने समजता. श्रीकृष्णाला श्याम-सुंदर का म्हणतात - हे देखील आता तुम्ही जाणता. आजकाल तर अशा प्रकारची नावे खूपच ठेवतात. श्रीकृष्णा सोबत कॉम्पिटिशन करतात. तुम्ही मुले जाणता पतित राजे कसे पावन राजांच्या समोर जाऊन माथा टेकवतात परंतु त्यांना जाणतात थोडेच. तुम्ही मुले जाणता जे पूज्य होते तेच पुन्हा पुजारी बनतात. आता तुमच्या बुद्धीमध्ये संपूर्ण चक्र आहे. याची देखील आठवण राहिली तरी अवस्था खूप चांगली राहील. परंतु माया आठवण करू देत नाही, विसरायला लावते. कायम हर्षितमुख अवस्था राहिली तर मग तुम्हाला देवता म्हटले जाईल. लक्ष्मी-नारायणाचे चित्र पाहून किती आनंदीत होतात. राधा-कृष्ण अथवा राम इत्यादींना पाहून इतके आनंदीत होत नाहीत कारण श्रीकृष्णासाठी शास्त्रांमध्ये गोंधळवून टाकणाऱ्या गोष्टी लिहिल्या आहेत. हे बाबा (ब्रह्मा बाबा) बनतात देखील श्री नारायण ना. बाबा (ब्रह्मा बाबा) तर या लक्ष्मी-नारायणाच्या चित्राला पाहून आनंदीत होतात. मुलांनी देखील असे समजले पाहिजे की, बाकी अजून किती वेळ या जुन्या शरीरामध्ये राहणार मग जाऊन प्रिन्स बनणार. हे एम ऑब्जेक्ट आहे ना. हे देखील फक्त तुम्ही जाणता. खुशीमध्ये किती गदगद झाले पाहिजे. जितका अभ्यास कराल तितके उच्च पद प्राप्त कराल, अभ्यासच केला नाहीत तर काय पद मिळणार? कुठे विश्वाचे महाराजा-महाराणी, कुठे श्रीमंत, प्रजेमध्ये नोकर-चाकर. सब्जेक्ट तर एकच आहे. फक्त मनमनाभव, मध्याजी भव, अल्फ आणि बे, आठवण आणि ज्ञान. यांना (ब्रह्मा बाबांना) किती आनंद झाला - अल्फ को अल्लाह मिला, बाकी सर्व देऊन टाकले. किती मोठी लॉटरी मिळाली. बाकी काय पाहिजे! तर का नाही मुलांनी आनंदात राहिले पाहिजे; म्हणून बाबा म्हणतात असे ट्रान्सलाईटचे चित्र सर्वांसाठी बनवा जे बघून मुले खुश होत राहतील. शिवबाबा ब्रह्मा द्वारे आम्हाला हा वारसा देत आहेत. मनुष्य तर काहीच जाणत नाहीत. अगदीच तुच्छ-बुद्धी आहेत. आता तुम्ही तुच्छ-बुद्धीपासून स्वच्छ-बुद्धी बनत आहात. सर्व काही जाणले आहे, आणखी काही वाचण्याची आवश्यकता नाही. या शिक्षणाने तुम्हाला विश्वाची बादशाही मिळते, म्हणून बाबांना नॉलेजफुल म्हटले जाते. मनुष्य मग असे समजतात की, बाबा प्रत्येकाच्या अंतर्मनाला जाणतात, परंतु बाबा तर नॉलेज देतात. टीचर समजू शकतात की, अमका अभ्यास करतो, बाकी सर्व दिवस हे थोडेच बसून बघणार की यांच्या बुद्धीमध्ये काय चालते. हे तर वंडरफुल नॉलेज आहे. बाबांना ज्ञानाचा सागर, सुख-शांतीचा सागर म्हटले जाते. तुम्ही देखील आता मास्टर ज्ञानसागर बनता. नंतर या उपाधी निघून जातील. मग सर्वगुणसंपन्न, १६ कला संपूर्ण बनाल. हे आहे मनुष्याचे उच्च पद. यावेळी हे आहे ईश्वरीय पद. किती समजून घेण्यासारख्या आणि समजावून सांगण्यासारख्या गोष्टी आहेत. लक्ष्मी-नारायणाचे चित्र पाहून अतिशय आनंद झाला पाहिजे. आपण आता विश्वाचे मालक बनणार. नॉलेजमुळेच सर्व गुण येतात. स्वतःचे एम ऑब्जेक्ट बघितल्याने रिफ्रेशमेंट (ताजेपणा) येतो, म्हणून बाबा म्हणतात हे लक्ष्मी-नारायणाचे चित्र तर प्रत्येकाकडे असले पाहिजे. हे चित्र मनामध्ये प्रेम वाढवते. मनामध्ये येते - बस्स, हा मृत्यूलोकमध्ये शेवटचा जन्म आहे. मग आम्ही अमरलोक मध्ये जाऊन हे बनणार, ततत्वम्. असे नाही की, आत्मा सो परमात्मा. नाही, हे सारे ज्ञान बुद्धीमध्ये पक्के झाले आहे. जेव्हा कधी कोणाला समजावून सांगता, बोला - ‘आम्ही कधीही कोणाकडे भीक मागत नाही. प्रजापिता ब्रह्माची मुले तर भरपूर आहेत’. आम्ही आमच्याच तन-मन-धनाने सेवा करतो. ब्राह्मण आपल्याच कमाईने यज्ञाला चालवत आहेत. शुद्रांचे (विकारी लोकांचे) पैसे सेवेमध्ये लावू शकत नाही. पुष्कळ मुले आहेत ते जाणतात जितके आपण तन-मन-धनाने सेवा करू, सरेंडर (समर्पित) होऊ तितके पद प्राप्त करू. जाणता - बाबांनी बीज लावले आहे तर हे लक्ष्मी-नारायण बनतात. पैसे काही इथे कामाला येणार नाहीत, तर का नाही या कार्यामध्ये लावावेत. तर मग सरेंडर होणारे भुकेने मरतात काय? खूप काळजी घेतली जाते. बाबांचीच किती काळजी घेतली जाते. हा तर शिवबाबांचा रथ आहे ना. साऱ्या विश्वाला स्वर्ग बनविणारे आहेत. हे हसीन मुसाफिर (अतिसुंदर यात्री) आहेत.

परमपिता परमात्मा तर येऊन सर्वांना अतिसुंदर बनवितात, तुम्ही काळ्या पासून गोरे अतिसुंदर बनता ना. किती सुंदर साजन आहे, येऊन सर्वांना गोरे बनवतात. त्याच्यावर तर कुर्बान झाले पाहिजे. आठवण करत राहिली पाहिजे. जसे आत्म्याला बघू शकत नाही, जाणू शकतो, तसे परमात्म्याला देखील जाणू शकतो. दिसायला तर आत्मा आणि परमात्मा दोन्ही एकसमान बिंदू आहेत. बाकी तर सर्व नॉलेज आहे. या नीट समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. मुलांच्या बुद्धीमध्ये हा पॉईंट राहिला पाहिजे. बुद्धीमध्ये नंबरवार पुरुषार्था अनुसार धारणा होते. डॉक्टरांना सुद्धा औषधांची नावे लक्षात राहतात ना. असे नाही की त्यावेळेस बसून पुस्तक पाहतील. डॉक्टर लोकांचे देखील काही पॉईंट्स असतात, बॅरिस्टर लोकांचे देखील काही पॉईंट्स असतात. तुमच्याकडे देखील पॉईंट्स आहेत, टॉपिक आहेत, ज्यावर समजावून सांगता. कोणता पॉईंट कोणाचा फायदा करतो, कोणाला कोणत्या पॉईंटने तीर लागतो. पॉईंट्स तर ढीगभर आहेत. जे चांगल्या रीतीने धारण करतील ते चांगल्या प्रकारे सेवा करू शकतील. अर्ध्या कल्पापासून महारोगी पेशंट आहेत. आत्मा पतित बनली आहे, त्यांच्यासाठी एक अविनाशी सर्जन औषध देतात. ते सदैव सर्जनच असतात, कधी आजारी पडत नाहीत. बाकीचे तर सर्व आजारी पडतात. अविनाशी सर्जन एकदाच येऊन मनमनाभवचे इंजेक्शन लावतात. किती सोपे आहे, फोटोला कायमचे पॉकेटमध्ये ठेवा. बाबा (ब्रह्मा बाबा) नारायणाचे भक्त होते तर त्यांनी लक्ष्मीचे चित्र काढून एकट्या नारायणाचे चित्र ठेवले. आता समजते आहे की, ज्याची मी पूजा करत होतो, तो आता बनत आहे. लक्ष्मीचा निरोप घेतला तर हे नक्की आहे की, मी लक्ष्मी बनणार नाही. लक्ष्मीने बसून पाय चेपावे, हे चांगले वाटत नव्हते. त्यांना पाहून पुरुष मंडळी पत्नीकडून पाय चेपून घेतात. तिथे (सतयुगामध्ये) लक्ष्मी असे पाय थोडेच चेपेल. हा रिती रिवाज तिथे असतच नाही. हा रिवाज रावण राज्याचा आहे. या चित्रामध्ये संपूर्ण नॉलेज आहे. वर त्रिमूर्ती देखील आहे, पूर्ण दिवस या नॉलेजचे चिंतन करून अतिशय आश्चर्य वाटते. भारत आता स्वर्ग बनत आहे. किती चांगले स्पष्टीकरण आहे; माहित नाही, लोकांच्या बुद्धीमध्ये का जात नाही? मोठ्या प्रमाणात आग लागेल, दुनियेला आग लागणार आहे. रावण राज्य तर जरूर नष्ट झाले पाहिजे. यज्ञामध्ये देखील पवित्र ब्राह्मण पाहिजेत. साऱ्या विश्वामध्ये पवित्रता आणणारा हा खूप मोठा यज्ञ आहे. ते ब्राह्मण देखील स्वतःला भले ब्रह्माची संतान म्हणतात, परंतु ते तर कुख वंशावळी आहेत. ब्रह्माची संतान तर पवित्र मुख वंशावळी होती ना. तर यांना हे समजावून सांगितले पाहिजे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
२) जसे बाबांनी तन-मन-धन सेवेमध्ये लावले, सरेंडर झाले तसे बाप समान आपले सर्व काही ईश्वरीय सेवेमध्ये सफल करायचे आहे. सदैव रिफ्रेश राहण्यासाठी एम ऑब्जेक्टचे चित्र सोबत ठेवायचे आहे.

वरदान:-
एकरस स्थितीद्वारे सदैव एका बाबांना फॉलो करणारे प्रसन्नचित्त भव तुम्हा मुलांसाठी ब्रह्मा बाबांचे जीवन म्हणजे ॲक्युरेट कॉम्प्युटर आहे. जसे आजकाल प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कॉम्प्युटरद्वारे विचारतात. तसे मनामध्ये जेव्हा कधी कोणता प्रश्न उत्पन्न होतो तेव्हा काय, का, कसे च्या ऐवजी ब्रह्मा बाबांच्या जीवनरुपी कॉम्प्युटरमध्ये बघा. ‘काय’ आणि ‘कसे’चा प्रश्न ‘असे’मध्ये बदलून जाईल. प्रश्नचित्त ऐवजी प्रसन्नचित बनाल. प्रसन्नचित अर्थात एकरस स्थितीमध्ये एका बाबांना फॉलो करणारे.

बोधवाक्य:-
आत्मिक शक्तीच्या आधारावर सदैव निरोगी असल्याचा अनुभव करा.

विशेष सूचना:- सर्व ब्रह्मावत्स १ जानेवारीपासून ३१ जानेवारी २०२५ पर्यंत विशेष अंतर्मुखतेच्या गुहेमध्ये बसून योग तपस्या करत असताना संपूर्ण विश्वाला आपल्या शक्तिशाली मनसाद्वारे विशेष सकाश देण्याची सेवा करा. याच लक्षाने या महिन्याच्या पत्रपुष्पमध्ये जे अव्यक्त इशारे पाठविले आहेत, ते पूर्ण जानेवारी महिन्यामध्ये मुरलीच्या खाली देखील लिहीत आहोत. तुम्ही सर्वजण या पॉईंट्सवर विशेष मनन चिंतन करत मनसा सेवेचे अनुभवी बना.

आपल्या शक्तिशाली मनसाद्वारे सकाश देण्याची सेवा करा:- तुम्ही शांतिदूत मुले, कुठेही असताना, चालता-फिरता सदैव स्वतःला शांतीदूत समजून चला. जे स्वतः शांत स्वरूप, शक्तिशाली स्वरूपामध्ये स्थित असतील ते इतरांनाही शांती आणि शक्तीची सकाश देत राहतील.