01-01-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही बाबांपाशी आला आहात रिफ्रेश होण्याकरिता, बाबा आणि वारशाची आठवण करा तर सदैव रिफ्रेश राहाल”

प्रश्न:-
हुशार मुलांचे मुख्य लक्षण कोणते असेल?

उत्तर:-
जे हुशार आहेत त्यांना अपार आनंद होईल. जर आनंद नसेल तर बुद्धू आहेत. हुशार अर्थात पारस-बुद्धी बनणारे. ते इतरांना देखील पारस-बुद्धी बनवतील. रुहानी सेवेमध्ये बिझी राहतील. बाबांचा परिचय दिल्याशिवाय राहू शकणार नाहीत.

ओम शांती।
बाबा बसून समजावून सांगत आहेत, हे दादा देखील समजतात कारण बाबा बसून दादांद्वारे (ब्रह्मा बाबांद्वारे) समजावून सांगत आहेत. तुम्ही जसे समजता तसे दादा देखील समजतात. दादांना भगवान म्हटले जात नाही. हे आहे भगवानुवाच. बाबा कोणती मुख्य गोष्ट समजावून सांगत आहेत की, देही-अभिमानी बना. असे का म्हणत आहेत? कारण स्वतःला आत्मा समजल्याने आपण पतित-पावन परमपिता परमात्मा यांच्याद्वारे पावन बनणार आहोत. हे बुद्धीमध्ये ज्ञान आहे. सर्वांना समजावून सांगायचे आहे, याचना देखील करतात की, ‘आम्ही पतित आहोत’. नवीन दुनिया जरूर पावनच असेल. नवीन दुनिया बनविणारे, स्थापन करणारे बाबा आहेत. त्यांनाच पतित-पावन बाबा म्हणून बोलावतात. पतित-पावन, त्यासोबत त्यांना बाबा म्हणतात. बाबांना आत्मे बोलावतात. शरीर बोलावणार नाही. आम्हा आत्म्यांचे पिता पारलौकिक आहेत, तेच पतित-पावन आहेत. हे तर चांगल्या रीतीने लक्षात राहिले पाहिजे. ही नवीन दुनिया आहे की जुनी दुनिया आहे, हे समजू तर शकतात ना. असे देखील बुद्धू आहेत, जे समजतात की, आपल्याकडे अपार सुख आहे. आम्ही तर जणू स्वर्गामध्ये बसलो आहोत. परंतु हे देखील समजायला हवे की कलियुगाला कधी स्वर्ग म्हणू शकत नाही. नावच आहे कलियुग, जुनी पतित दुनिया. फरक आहे ना. लोकांच्या बुद्धीमध्ये हे देखील राहात नाही. एकदमच जडजडीभूत अवस्था आहे. जेव्हा मुले शिकत नाहीत तेव्हा म्हणतात ना की, तू तर पत्थर-बुद्धी आहेस. बाबा सुद्धा लिहितात तुमच्या गावाचे रहिवासी तर एकदम पत्थर-बुद्धी आहेत. समजत नाहीत कारण दुसऱ्यांना समजावून सांगत नाहीत. स्वतः पारस-बुद्धी बनता तर इतरांना देखील बनवले पाहिजे. पुरुषार्थ केला पाहिजे. यामध्ये लाज इत्यादी वाटण्याचा तर प्रश्नच नाही. परंतु लोकांच्या बुद्धीमध्ये अर्धाकल्प उलटे शब्द बसले आहेत तर ते विसरले जात नाहीत. कसे विसरायला लावायचे? विसरायला लावण्याची ताकद सुद्धा एका बाबांपाशीच तर आहे. हे ज्ञान तर बाबांशिवाय इतर कोणीही देऊ शकत नाही. जणू सगळे अज्ञानी झाले. त्यांचे ज्ञान मग कुठून येणार! जोपर्यंत ज्ञान सागर बाबा येऊन ऐकवणार नाहीत. तमोप्रधान म्हणजेच अज्ञानी दुनिया. सतोप्रधान अर्थात दैवी दुनिया. फरक तर आहे ना. देवी-देवताच पुनर्जन्म घेतात. काळ देखील पुढे सरकत राहतो. बुद्धी देखील कमजोर होत जाते. बुद्धीचा योग लावल्याने जी शक्ती मिळते ती मग नष्ट होते.

आता तुम्हाला बाबा समजावून सांगत आहेत तर तुम्ही किती रिफ्रेश होता. तुम्ही यापूर्वी रिफ्रेश होता आणि आरामात होता. बाबा देखील लिहितात ना - मुलांनो, येऊन रिफ्रेश देखील व्हा आणि विश्रांती देखील घ्या. रिफ्रेश झाल्यानंतर तुम्ही सतयुगामध्ये विश्रामपुरी मध्ये जाता. तिथे तुम्हाला खूप आराम मिळतो. तिथे सुख-शांती-संपत्ती इत्यादी सर्वकाही तुम्हाला मिळते. तर बाबांकडे येतात रिफ्रेश होण्यासाठी, विश्रांती घेण्यासाठी. रिफ्रेश देखील शिवबाबा करतात. विश्रांती देखील बाबांपाशी घेता. विश्रांती अर्थात शांत. थकून विश्रांती घेतात ना! कोणी कुठे, कोणी कुठे जातात विश्रांती घेण्यासाठी. त्यामध्ये तर रिफ्रेशमेंटची गोष्टच नाही. इथे तुम्हाला बाबा रोज समजावून सांगत आहेत तर तुम्ही इथे येऊन रिफ्रेश होता. आठवण केल्याने तुम्ही तमोप्रधानापासून सतोप्रधान बनता. सतोप्रधान बनण्यासाठीच तुम्ही इथे येता. त्यासाठी कोणता पुरुषार्थ आहे? गोड-गोड मुलांनो, बाबांची आठवण करा. बाबांनी सर्व माहिती तर दिली आहे की, हे सृष्टी चक्र कसे फिरते, तुम्हाला विश्रांती कशी मिळते. इतर कोणीही या गोष्टी जाणत नाहीत तर त्यांना देखील समजावून सांगायला हवे, जेणेकरून ते देखील तुमच्या सारखे रिफ्रेश होतील. आपले कर्तव्यच हे आहे, सर्वाना संदेश देणे. अविनाशी रिफ्रेश व्हायचे आहे. अविनाशी विश्रांती मिळवायची आहे. सर्वांना हा संदेश द्या. हीच आठवण करून द्यायची आहे की बाबांची आणि वारशाची आठवण करा. आहे तर खूप सोपी गोष्ट. बेहदचे बाबा स्वर्ग रचतात. स्वर्गाचाच वारसा देतात. आता तुम्ही आहात संगमयुगावर. मायेच्या शापाला आणि बाबांच्या वारशाला तुम्ही जाणता. जेव्हा माया रावणाचा शाप मिळतो तर पवित्रता सुद्धा नष्ट, सुख-शांती देखील नष्ट, आणि धन सुद्धा नष्ट होते. कसे हळू-हळू नष्ट होते - ते देखील बाबांनी समजावून सांगितले आहे. किती जन्म लागतात, दुःख-धाम मध्ये काही विश्रांती थोडीच असते. सुख-धाम मध्ये विश्रांतीच विश्रांती आहे. मनुष्यांना भक्ती किती थकवते. जन्म-जन्मांतर भक्ती थकवते. गरीब बनवते. हे सुद्धा आता तुम्हाला बाबा समजावून सांगतात. नवीन जे येतात तर किती समजावून सांगितले जाते. प्रत्येक गोष्टीवर मनुष्य खूप विचार करतात. समजतात कुठे जादू होऊ नये. अरे तुम्ही म्हणता जादूगार. तर मी देखील म्हणतो - मी जादूगार आहे. परंतु ही जादू काही ती नाही आहे जी मेंढया-बकऱ्या इत्यादी बनवेल. तुम्ही काही पशू तर नाही आहात ना. हे बुद्धीद्वारे समजते. गायन देखील आहे - ‘सूरमण्डल के साज से…’ यावेळी माणसे जणू मेंढी प्रमाणे आहेत. या गोष्टी इथल्यासाठी आहेत. सतयुगामध्ये गायले जात नाही, यावेळचेच गायन आहे. चंडिकेचा किती मोठा मेळावा भरतो. विचारा, ‘ती कोण होती?’ म्हणतील - ‘देवी’. पण असे नाव तर तिथे असत नाही. सतयुगामध्ये तर सदैव शुभ नाव असते. श्री रामचंद्र, श्रीकृष्ण… श्री म्हटले जाते श्रेष्ठ असणाऱ्याला. सतयुगी संप्रदायला श्रेष्ठ म्हटले जाते. कलियुगी विकारी संप्रदायला श्रेष्ठ कसे म्हणणार. श्री अर्थात श्रेष्ठ. आताचे मनुष्य काही श्रेष्ठ तर नाही आहेत. गायन देखील आहे - मनुष्य से देवता… मग देवतापासून मनुष्य बनतात कारण ५ विकारांमध्ये जातात. रावण राज्यामध्ये सर्व मनुष्यच मनुष्य आहेत. तिथे आहेत देवी-देवता. त्याला डीटी वर्ल्ड (दैवी दुनिया), याला ह्युमन वर्ल्ड (मानवी दुनिया) म्हटले जाते. दैवी दुनियेला दिवस म्हटले जाते. मानवी दुनियेला रात्र म्हटले जाते. दिवस प्रकाशाला म्हटले जाते. रात्र अज्ञान अंधाराला म्हटले जाते. या विरोधाभासाला तुम्हीच जाणता आहात. तुम्ही समजता आम्ही अगोदर काहीच जाणत नव्हतो. आता सर्व गोष्टी बुद्धीमध्ये आहेत. ऋषी-मुनींना विचारतात की रचता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणता का तर ते देखील नेती-नेती करत गेले. आम्ही जाणत नाही. आता तुम्ही समजता की आपण देखील अगोदर नास्तिक होतो. बेहदच्या बाबांना जाणत नव्हतो. ते आहेत खरे अविनाशी बाबा, आत्म्यांचे पिता. तुम्ही मुले जाणता की आम्ही त्या बेहदच्या बाबांचे बनलो आहोत, ज्यांना कधी जाळले जात नाही. इथे तर सर्व जण जळतात, रावणाला देखील जाळतात. शरीर आहे ना. तरी देखील आत्म्याला तर कधी कोणी जाळू शकत नाही. तर बाबा मुलांना हे गुप्त ज्ञान ऐकवतात, जे बाबांकडेच आहे. हे आत्म्यामध्ये गुप्त ज्ञान आहे. आत्मा देखील गुप्त आहे. आत्मा या मुखाद्वारे बोलते म्हणून बाबा म्हणतात - मुलांनो, देह-अभिमानी बनू नका. आत्म-अभिमानी बना. नाही तर जसे उलटे बनता. स्वतःला आत्मा असल्याचे विसरून जाता. ड्रामाच्या रहस्याला देखील चांगल्या रीतीने समजून घ्यायचे आहे. ड्रामामध्ये जे नोंदलेले आहे ते हुबेहूब रिपीट होते. हे कोणालाच ठाऊक नाही आहे. ड्रामा अनुसार सेकंद बाय सेकंद कसे चालत राहते, हे देखील नॉलेज बुद्धीमध्ये आहे. आकाशाचा अंत कोणीही मिळवू शकत नाही. धरतीचा अंत मिळवू शकतात. आकाश सूक्ष्म आहे, धरती तर स्थूल आहे. बऱ्याच गोष्टींचा अंत मिळवू शकत नाही. जेव्हा की म्हणतात देखील आकाशच आकाश आहे, पाताळच पाताळ आहे. शास्त्रांमध्ये ऐकले आहे ना, तर वरती (ग्रहांवर) देखील जाऊन बघतात. तिथे देखील दुनिया वसवण्याचा प्रयत्न करतात. दुनिया वसवली तर खूप आहे ना. भारतामध्ये फक्त एकच देवी-देवता धर्म होता इतर कोणताही खंड इत्यादी नव्हता त्या नंतर मग किती वसवले आहे. तुम्ही विचार करा. भारताच्या देखील किती छोट्याशा तुकड्यावर देवी-देवता असतात. यमुनेचा काठ असतो. दिल्ली परिस्तान होती, याला कब्रस्तान म्हटले जाते, जिथे अकाली मृत्यु होत रहातात. अमर-लोकला परिस्तान म्हटले जाते. तिथे खूप नॅचरल ब्युटी (नैसर्गिक सौंदर्य) असते. खरेतर भारताला परिस्तान म्हणत होते. हे लक्ष्मी-नारायण परिस्तानचे मालक होते ना. किती शोभिवंत आहेत. सतोप्रधान आहेत ना. नॅचरल ब्युटी होती. आत्मा देखील तेजाने चमकत असते. मुलांना दाखवले होते कृष्णाचा जन्म कसा होतो. पूर्ण खोलीतच जसा चमत्कार होतो. तर बाबा मुलांना बसून समजावून सांगत आहेत. आता तुम्ही परिस्तानमध्ये जाण्यासाठी पुरुषार्थ करत आहात. नंबरवार तर जरूर पाहीजेत. सर्व जण एक सारखे असू शकत नाहीत. विचार केला जातो, इतकी छोटीशी आत्मा केवढा मोठा पार्ट बजावते. शरीरातून आत्मा निघून जाते तर शरीराचे काय हाल होतात. साऱ्या दुनियेचे ॲक्टर्स तोच पार्ट बजावतात जो अनादि बनलेला आहे. ही सृष्टी देखील अनादि आहे. त्यामध्ये प्रत्येकाचा पार्ट देखील अनादि आहे. त्याला तुम्ही वंडरफुल तेव्हा म्हणता जेव्हा जाणता की, हे सृष्टी रुपी झाड आहे. बाबा किती चांगल्या रीतीने समजावून सांगतात. ड्रामामध्ये तरीही ज्याच्यासाठी जितका वेळ आहे तितका समजण्यासाठी वेळ घेतात. बुद्धीमध्ये अंतर आहे ना. आत्मा मन-बुद्धी सहित आहे ना तर किती फरक असतो. मुलांना माहिती होते की आपल्याला स्कॉलरशिप घ्यायची आहे. तर मनामध्ये आनंद होतो ना. इथे देखील आत येताच एम ऑब्जेक्ट समोर दिसून येते तर जरूर आनंद होईल ना! आता तुम्ही जाणता की हे बनण्यासाठी इथे शिकायला आलो आहोत. नाही तर कधी कोणी येऊ शकणार नाही. हे आहे एम ऑब्जेक्ट. असे कोणते स्कुल कुठेच नसेल जिथे तुम्ही दुसऱ्या जन्माचे एम ऑब्जेक्ट पाहू शकाल. तुम्ही बघत आहात हे स्वर्गाचे मालक आहेत, आम्हीच हे बनणारे आहोत. आपण आता संगमयुगावर आहोत. ना त्या राज्याचे आहोत, ना या राज्याचे आहोत. आपण मध्यावर आहोत, जात आहोत. नावाडी (बाबा) सुद्धा आहेत निराकार. होडी (आत्मा) सुद्धा आहे निराकार. होडीला खेचून परमधाममध्ये घेऊन जातात. इनकारपोरियल बाबा इनकारपोरियल मुलांना (निराकारी बाबा निराकारी मुलांना) घेऊन जातात. बाबाच मुलांना सोबत घेऊन जातील ना. हे चक्र पूर्ण होत आहे मग पुन्हा हुबेहूब रिपीट करायचे आहे. एक शरीर सोडून दुसरे घेणार. छोटे बाळ बनून नंतर मोठे होणार. जसे आंब्याच्या कोयीला जर जमिनीमध्ये पुरले तर त्याला मग किती आंबे येतील. ते आहे हदचे झाड. हे मनुष्य सृष्टी रुपी झाड आहे, याला व्हरायटी झाड म्हटले जाते. सतयुगापासून कलियुगापर्यंत सर्व जण पार्ट बजावतच राहतात. अविनाशी आत्मा ८४ जन्मांच्या फेऱ्यामध्ये पार्ट बजावते. लक्ष्मी-नारायण होते जे आत्ता नाही आहेत. चक्र फिरून आता पुन्हा हे बनत आहेत. म्हणतील अगोदर हे लक्ष्मी-नारायण होते आणि आता हा त्यांचा आहे शेवटचा जन्म - ब्रह्मा-सरस्वती. आता सर्वांना परत जरूर जायचे आहे. स्वर्गामध्ये तर इतकी लोकसंख्या नव्हती. ना इस्लामी, ना बौद्धि… देवी-देवतांशिवाय इतर कोणत्याही धर्माचे ॲक्टर्स नव्हते. ही समज कोणालाच नाही. हुशार असणाऱ्याला टायटल (उपाधी) मिळाले पाहिजे ना. जितका जो शिकतो नंबरवार पुरुषार्था नुसार पद प्राप्त करतो. तर तुम्हा मुलांना इथे आल्याबरोबरच एम ऑब्जेक्ट पाहून आनंद झाला पाहीजे. आनंदाला तर पारावार उरत नाही. पाठशाळा अथवा स्कुल असावे तर असे. आहे किती गुप्त, परंतु अप्रतिम पाठशाळा आहे. जेवढे श्रेष्ठ शिक्षण, तेवढे मोठे कॉलेज. तिथे सगळ्या सोयी-सुविधा मिळतात. आत्म्याला शिकायचे आहे भले मग तो सोन्याच्या सिंहासनावर बसो, अथवा लाकडाच्या सिंहासनावर बसो. मुलांना किती आनंद झाला पाहिजे कारण शिव भगवानुवाच आहे ना. पहिल्या नंबरवर आहे हा विश्वाचा प्रिन्स. मुलांना आता माहिती झाले आहे. प्रत्येक कल्प बाबाच येऊन आपला परिचय देतात. मी यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) प्रवेश करून तुम्हा मुलांना शिकवत आहे. देवतांकडे हे ज्ञान थोडेच आहे. ज्ञानाने देवता बनले आहेत नंतर मग शिक्षणाची गरजच नाही, यासाठी खूप विशालबुद्धी पाहिजे समजून घेण्यासाठी. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) या पतित दुनियेचा बुद्धीने संन्यास करून जुना देह आणि देहाच्या नात्यांना विसरून आपली बुद्धी बाबांकडे आणि स्वर्गाकडे लावायची आहे.

२) अविनाशी विश्रांतीचा अनुभव करण्यासाठी बाबा आणि वारशाच्या स्मृतीमध्ये राहायचे आहे. सर्वांना बाबांचा संदेश देऊन रिफ्रेश करायचे आहे. रुहानी सेवा करण्यासाठी लाज वाटू नये.

वरदान:-
संघटनमध्ये एकमत आणि एकरस स्थिती द्वारे सफलता प्राप्त करणारे खरे स्नेही भव

संघटनमध्ये एकाने सांगितले आणि दुसऱ्याने मानले - हा आहे खऱ्या स्नेहाचा प्रतिसाद. अशा स्नेही मुलांचे उदाहरण पाहून इतरही संपर्कामध्ये येण्याची हिंमत ठेवतात. संघटन देखील सेवेचे साधन बनते. जिथे माया पाहते की यांची युनिटी (एकता) चांगली आहे, घेराव आहे तर तिथे येण्याची हिंमत करत नाही. एकमत आणि एकरस स्थितीचे संस्कारच सतयुगामध्ये एका राज्याची स्थापना करतात.

बोधवाक्य:-
कर्म आणि योगाचा बॅलन्स ठेवणारेच सफल योगी आहेत.

संगमयुगी सर्व तीव्र पुरुषार्थी भाऊ-बहिणींना नवीन युगासोबतच नवीन वर्षाच्या खूप-खूप शुभेच्छा. नवीन वर्षाचा हा पहिला जानेवारी महिना गोड साकार बाबांच्या स्मृतींचा महिना आहे, आपण सर्व बाबांची मुले अव्यक्त वतनच्या सूक्ष्म लीलेचा अनुभव करण्यासाठी तसेच स्वतःला ब्रह्माबाप समान संपन्न आणि संपूर्ण बनविण्यासाठी पूर्ण महिनाभर आपली बंधन-मुक्त, जीवनमुक्त स्थिती बनविण्यासाठी मनाचे आणि मुखाचे मौन ठेवा. बुद्धीच्या बळाद्वारे अव्यक्ती वतनला फेरफटका मारा, हेच लक्ष्य ठेवून या महिन्याचे अव्यक्ती इशारे पाठवत आहोत:-

अव्यक्त इशारे:- या अव्यक्ती महिन्यामध्ये बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा. बापदादा इच्छितात की, माझा प्रत्येक मुलगा मुक्ती-जीवनमुक्तीच्या वारशाचा अधिकारी बनावा. आताच्या अभ्यासाची सतयुगामध्ये नॅचरल लाईफ (नैसर्गिक जीवन) असेल परंतु वारशाचा अधिकार आता संगमावर आहे त्यामुळे अजूनही जर कोणते बंधन खेचत असेल तर त्याच्या कारणाचा विचार करा आणि निवारण करा.