01-03-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - ‘प्रीत’ आणि ‘विपरीत’ ही प्रवृत्ति मार्गातील अक्षरे आहेत, आता तुमची प्रीत एका बाबांवर जडली आहे, तुम्ही मुले निरंतर बाबांच्या आठवणीमध्ये राहता”

प्रश्न:-
आठवणीच्या यात्रेला दुसरे कोणते नाव द्याल?

उत्तर:-
आठवणीची यात्रा प्रेमाची यात्रा आहे. विपरीत-बुद्धी असलेल्या व्यक्तीला नावा-रूपामध्ये फसण्याची दुर्गंधी येते, त्याची बुद्धी तमोप्रधान होते. ज्यांची प्रीत एका बाबांवरच आहे ते ज्ञानाचे दान करत राहतील. त्यांची कोणत्याही देहधारीवर प्रीत जडू शकत नाही.

गीत:-
यह वक्त जा रहा है…

ओम शांती।
बाबा मुलांना समजावून सांगत आहेत. आता याला आठवणीची यात्रा देखील म्हणता येईल तसेच प्रेमाची यात्रा देखील म्हणता येईल. मनुष्य तर त्या (लौकिक) यात्रांना जातात. ही जी रचना आहे (देवी-देवता आहेत) त्यांच्या यात्रेला जातात, विविध रचना आहे ना. रचयित्याला तर कोणीही जाणत नाही. आता तुम्ही रचयिता बाबांना जाणता, त्या बाबांची आठवण करण्यामध्ये तुम्ही कधीही थांबायचे नाही आहे. तुम्हाला यात्रा मिळाली आहे आठवणीची. याला आठवणीची यात्रा किंवा प्रेमाची यात्रा म्हटले जाते. ज्यांचे जास्त प्रेम असेल ते यात्रा देखील चांगली करतील. जितक्या प्रेमाने यात्रेवर रहाल, पवित्र देखील बनत जाल. शिवभगवानुवाच आहे ना. विनाश काले विपरीत-बुद्धि आणि विनाश काले प्रीत-बुद्धी. तुम्ही मुले जाणता आता विनाशाचा काळ आहे. हा तोच गीता एपिसोड सुरू आहे. बाबांनी श्रीकृष्णाची गीता आणि त्रिमूर्ती शिवची गीता यांच्यामधील कॉन्ट्रास्ट (विरोधाभास) देखील सांगितला आहे! आता गीतेचा भगवान कोण? परमपिता शिवभगवानुवाच. फक्त ‘शिव’ एवढाच शब्द लिहायचा नाही कारण ‘शिव’ हे नाव देखील अनेक लोकांचे आहे त्यामुळे सुरुवातीला ‘परमपिता परमात्मा’ लिहिल्याने ते सर्वोच्च झाले. ‘परमपिता’ तर कोणी स्वतःला म्हणू शकत नाही. संन्यासी लोक ‘शिवोहम्’ म्हणतात, ते तर बाबांची आठवण सुद्धा करू शकत नाहीत. बाबांना जाणतच नाहीत. बाबांवर प्रीतच नाहीये. ‘प्रीत’ आणि ‘विपरीत’ हे शब्द प्रवृत्ती मार्गासाठी आहेत. काही मुलांची पित्याशी प्रीत-बुद्धी असते, कोणाची विपरीत-बुद्धी देखील असते. तुमच्यामध्ये देखील असे आहे. बाबांवर प्रीत त्यांची आहे, जे बाबांच्या सेवेमध्ये तत्पर आहेत. बाबांव्यतिरिक्त इतर कोणावरही प्रीत जडू शकत नाही. शिवबाबांनाच म्हणतात - बाबा आम्ही तर तुमचेच मदतगार आहोत. यामध्ये ब्रह्माची तर गोष्टच नाही. शिवबाबांवर ज्या आत्म्यांची प्रीत असेल ते जरूर मदतगार असतील, ते शिवबाबांसोबत सेवा करत राहतील. प्रीत नसेल तर जणू विपरीत होतात, विपरीत-बुद्धि विनशन्ती. ज्यांची बाबांवर प्रीत असेल तर ते मदतगार देखील बनतील. जितकी प्रीत तितके सेवेमध्ये मदतगार बनतील. आठवणच करत नाहीत तर जणू प्रीतच नाहीये. मग देहधारींवर प्रीत जडते. व्यक्ती, व्यक्तीला आपली आठवण म्हणून वस्तू देखील देतात ना. तर त्या व्यक्तीची जरूर आठवण होते.

आता तुम्हा मुलांना बाबा अविनाशी ज्ञान रत्नांची सौगात देत आहेत, ज्याद्वारे तुम्ही राजाई प्राप्त करता. अविनाशी ज्ञान रत्नांचे दान करता तर जरूर प्रीत-बुद्धी आहे. जाणता बाबा सर्वांचे कल्याण करण्याकरिता आलेले आहेत तर आपल्याला देखील मदतगार बनायचे आहे. असे प्रीत-बुद्धी विजयन्ती होतात. जे आठवणच करत नाहीत ते प्रीत-बुद्धी नाहीत. बाबांवर प्रीत असेल, आठवण कराल तर विकर्म विनाश होतील आणि इतरांना देखील कल्याणाचा रस्ता सांगाल. तुम्हा ब्राह्मण मुलांमध्ये देखील प्रीत आणि विपरीतवर सर्व अवलंबून आहे. बाबांची जास्त आठवण करतात तर जसेकाही प्रीत आहे. बाबा म्हणतात - ‘माझी निरंतर आठवण करा, माझे मदतगार बना’. रचनेला एका रचयिता बाबांचीच आठवण राहिली पाहिजे. कोणत्याही रचनेची (देहधारीची) आठवण करायची नाही. दुनियेमध्ये तर रचयित्याला कोणीही जाणत नाहीत, ना आठवण करत. संन्यासी लोक देखील ‘ब्रह्म’ची आठवण करतात परंतु ती देखील रचना झाली ना. रचयिता तर सर्वांचा एकच आहे ना. बाकीच्या ज्या काही गोष्टी या डोळ्यांद्वारे पाहू शकता त्या तर सर्व आहेत रचना. ज्यांना तुम्ही पाहू शकत नाही ते आहेत रचयिता बाबा. ब्रह्मा, विष्णू, शंकर यांची देखील चित्रे आहेत. ती देखील रचना आहे. बाबांनी जी चित्रे बनविण्यासाठी सांगितली आहेत त्यामध्ये वरच्या बाजूला लिहायचे आहे - ‘परमपिता परमात्मा त्रिमूर्ती शिव भगवानुवाच’. भले कोणी स्वतःला ‘भगवान’ म्हणेल परंतु ‘परमपिता’ म्हणू शकत नाही. तुमचा बुद्धियोग आहे शिवबाबांसोबत ना की शरीरासोबत. बाबांनी समजावून सांगितले आहे - स्वतःला अशरीरी आत्मा समजून मज पित्याची आठवण करा. ‘प्रीत’ आणि ‘विपरीत’ हे सारे अवलंबून आहे सेवेवर. चांगली प्रीत असेल तर बाबांची सेवा देखील चांगली कराल, आणि तेव्हाच तुम्हाला विजयन्ती म्हटले जाईल. प्रीत नसेल तर सेवा देखील होणार नाही. मग पद देखील कमी. कमी दर्जाच्या पदाला म्हटले जाते - उच्च पदापासून विनशन्ती. तसाही विनाश तर सर्वांचा होतोच, परंतु ही खास प्रीत आणि विपरीतची गोष्ट आहे. रचयिता बाबा तर एकच आहेत, त्यांनाच ‘शिव परमात्माए नमः’ म्हणतात. ‘शिवजयंती’ देखील साजरी करतात. ‘शंकर जयंती’ कधीच ऐकलेले नाही. प्रजापिता ब्रह्माचे नाव देखील प्रसिद्ध आहे, विष्णूची जयंती साजरी करत नाहीत, श्रीकृष्णाची साजरी करतात. हे देखील कोणाला माहित नाही - श्रीकृष्ण आणि विष्णूमध्ये काय फरक आहे? मनुष्यांची आहे विनाशकाले विपरीत-बुद्धी. तर तुमच्यामध्ये देखील प्रीत आणि विपरीत बुद्धी आहेत ना. बाबा म्हणतात - तुमचा हा रूहानी धंदा तर खूप चांगला आहे. पहाटे आणि सायंकाळी या सेवेमध्ये व्यस्त रहा. सायंकाळची वेळ ६ पासून ७ वाजेपर्यंत चांगली म्हणतात. सत्संग इत्यादी देखील सायंकाळी आणि पहाटे करतात. रात्रीचे तर वायुमंडळ खराब होते. रात्रीची आत्मा स्वतः शांतीमध्ये निघून जाते, ज्याला निद्रा म्हणतात. मग पहाटे जागी होते. म्हणतात देखील - ‘राम सिमर प्रभात मोरे मन’. आता बाबा मुलांना समजावून सांगत आहेत - ‘मज पित्याची आठवण करा’. शिवबाबा जेव्हा शरीरामध्ये प्रवेश करतील तेव्हाच तर म्हणतील की, ‘माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील’. तुम्ही मुले जाणता की, आपण बाबांची किती आठवण करतो आणि किती रूहानी सेवा करतो. सर्वांना हाच परिचय द्यायचा आहे - ‘स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा तर तुम्ही तमोप्रधानापासून सतोप्रधान बनाल. भेसळ निघून जाईल’. प्रीत बुद्धीमध्ये देखील परसेंटेज आहेत. बाबांवर प्रीत नाहीये तर जरूर स्वतःच्या देहामध्ये प्रीत आहे किंवा मित्र-नातेवाईक इत्यादींमध्ये प्रीत आहे. बाबांवर प्रीत असेल तर सेवा करू लागतील. बाबांवरच प्रीत नसेल तर सेवा देखील करणार नाहीत. कोणालाही फक्त अल्फ आणि बे (बाबा आणि बादशाहीचे) रहस्य समजावून सांगणे तर खूपच सोपे आहे. ‘हे ईश्वरा, हे परमात्मा’, असे म्हणून आठवण करतात परंतु त्यांना अजिबात जाणत नाहीत. बाबांनी समजावून सांगितले आहे प्रत्येक चित्रामध्ये वरच्या बाजूला ‘परमपिता त्रिमूर्ती शिव भगवानुवाच’ जरूर लिहायचे आहे म्हणजे मग कोणी काहीही बोलू शकणार नाही. आता तुम्ही मुले तर आपले सॅपलिंग (कलम) लावत आहात. सर्वांना रस्ता सांगा म्हणजे मग येऊन बाबांकडून वारसा घेतील. बाबांना जाणतच नाहीत त्यामुळे प्रीत-बुद्धी नाहीत. पाप वाढत-वाढत एकदम तमोप्रधान बनले आहेत. बाबांवर प्रीत त्यांची असेल जे खूप आठवण करतील आणि त्यांचीच गोल्डन एज बुद्धी असेल. जर इतर गोष्टींकडे बुद्धी भटकत असेल तर तमोप्रधानच राहतील. भले समोर बसले आहेत तरी देखील प्रीत-बुद्धी म्हणता येणार नाही कारण आठवणच करत नाहीत. प्रीत-बुद्धीची निशाणी आहे - आठवण. ते धारणाही करतील आणि इतरांवर देखील दया करत राहतील की, बाबांची आठवण करा तर तुम्ही पावन बनाल. हे कोणालाही समजावून सांगणे तर खूप सोपे आहे. बाबा स्वर्गाच्या बादशाहीचा वारसा मुलांनाच देतात. जरूर शिवबाबा आले होते तेव्हाच तर शिवजयंती देखील साजरी करतात ना. कृष्ण, राम इत्यादी सर्व होऊन गेले आहेत तेव्हाच तर साजरे करत आले आहेत ना. शिवबाबांची देखील आठवण करतात कारण ते येऊन मुलांना विश्वाची बादशाही देतात, नवीन कोणी या गोष्टींना समजू शकणार नाही. भगवान कसे येऊन वारसा देतात, एकदमच पत्थर-बुद्धी आहेत. आठवण करण्याचीच बुद्धी नाही आहे. बाबा स्वतः म्हणतात - ‘तुम्ही अर्ध्या कल्पापासूनचे आशिक आहात. मी आता आलो आहे. भक्तिमार्गामध्ये तुम्ही किती त्रास सहन करता. परंतु भगवान तर काही कोणाला भेटलाच नाही. आता तुम्ही मुले समजता - बाबा भारतामध्येच आले होते आणि मुक्ती-जीवनमुक्तीचा रस्ता सांगितला होता. श्रीकृष्ण काही हा रस्ता सांगत नाहीत. भगवंतावर प्रेम कसे करावे ते तर भारतवासींनाच बाबा येऊन शिकवतात. येतात देखील भारतामध्येच. शिवजयंती साजरी करतात. तुम्ही मुले जाणता उच्च ते उच्च आहेतच भगवान, त्यांचे नाव आहे शिव म्हणून तुम्ही लिहिता - ‘शिव जयंतीच हिरे तुल्य आहे, बाकी सर्वांची जयंती आहे कवडी तुल्य. असे लिहिल्याने चिडतात त्यामुळे प्रत्येक चित्रामध्ये जर ‘शिव भगवानुवाच -’ असे लिहिलेले असेल तर तुम्ही सुरक्षित रहाल. काही मुले व्यवस्थित न समजल्यामुळे नाराज होतात. मायेची ग्रहचारी पहिला वार बुद्धीवरच करते. बाबांपासूनच बुद्धियोग तोडून टाकते, ज्यामुळे एकदम वरून खाली कोसळतात (पतन होते). बुद्धियोग देहधारींमध्ये अडकून पडतो तर मग बाबांसोबत विपरीत झाले ना. तुम्हाला प्रीत ठेवायची आहे एका विचित्र विदेही बाबांसोबत. देहधारीसोबत प्रीत ठेवणे हानिकारक आहे. बुद्धी वरून तुटते तर एकदम खाली कोसळतात. भले हा अनादि पूर्व-नियोजित ड्रामा आहे तरी देखील समजावून सांगतील तर खरे ना. विपरीत बुद्धी मधून तर जशी नावा-रूपामध्ये अडकण्याची दुर्गंधी येते. नाहीतर सेवेसाठी तत्पर राहिले पाहिजे. बाबांनी काल देखील चांगल्या रीतीने समजावून सांगितले होते - मुख्य गोष्टच आहे गीतेचे भगवान कोण? यामध्येच तुमचा विजय होणार आहे. तुम्ही विचारता की गीतेचे भगवान शिव की श्रीकृष्ण? सुख देणारे कोण आहेत? सुख देणारे तर शिव आहेत तर त्यांना व्होट दिले पाहिजे. त्यांचीच महिमा आहे. आता व्होट द्या गीतेचा भगवान कोण? ‘शिव’ना व्होट देणाऱ्यांना म्हणणार प्रीत-बुद्धी. हे तर खूप जबरदस्त इलेक्शन आहे. या सर्व युक्त्या त्यांच्या बुद्धीमध्ये येतील जे संपूर्ण दिवस विचार-सागर मंथन करत असतील.

बरीच मुले चालता-चालता नाराज होतात. आता-आता पाहिले तर प्रीत आहे, आता-आता पाहिले तर प्रीत तुटते, नाराज होतात. जर कोणत्या गोष्टीवरून नाराज झाले तर मग कधी आठवण सुद्धा करणार नाहीत. पत्र सुद्धा लिहीणार नाहीत, अर्थात प्रीत नाहीये. तर बाबा देखील ६-८ महिने पत्र लिहीणार नाहीत. बाबा काळांचाही काळ आहेत ना! सोबत धर्मराज देखील आहे. बाबांची आठवण करण्यासाठी वेळ नाही तर तुम्ही काय पद प्राप्त कराल. पद भ्रष्ट होईल. सुरुवातीला बाबांनी अतिशय युक्तीने पदे सांगितली होती. आता ते इथे आहेत थोडेच. आता तर पुन्हा माळा बनणार आहे. सेवाभावी असणाऱ्यांची तर बाबा देखील महिमा करत राहतील. जे स्वतः बादशहा बनतात तर ते म्हणतील - ‘आपले हमजीन्स (बरोबरीचे) देखील बनावेत. यांनी देखील आपल्याप्रमाणे राज्य करावे’. राजाला अन्नदाता, माता-पिता म्हणतात. आता माता तर आहे जगत-अंबा, तिच्याद्वारे तुम्हाला भरभरून सुख मिळते. तुम्हाला पुरुषार्थ करून उच्च पद प्राप्त करायचे आहे. दिवसें-दिवस तुम्हा मुलांना समजत जाईल कोण-कोण काय बनेल? सेवा कराल तर बाबा देखील त्यांची आठवण करतील. सेवाच करत नाहीत तर बाबा का बरे आठवण करतील! बाबा आठवण त्या मुलांची करतील जे प्रीत-बुद्धी असतील. अच्छा!

बाबांनी हे देखील समजावून सांगितले आहे - कोणी दिलेली वस्तू जर वापराल तर जरूर त्याचीच आठवण येईल. बाबांच्या भंडाऱ्यातून घ्याल तर शिवबाबांचीच आठवण येईल. बाबा (ब्रह्मा बाबा) स्वतः अनुभव सांगतात. आठवण नक्की येते त्यामुळे कोणीही दिलेली वस्तू ठेवता कामा नये.

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) एका विदेही विचित्र बाबांसोबत मनाची खरी प्रीत ठेवायची आहे. नेहमी लक्षात रहावे - मायेची ग्रहचारी कधी बुद्धीवर वार करू नये.

२) कधीही बाबांवर नाराज व्हायचे नाही. सेवाभावी बनून आपले भविष्य उच्च बनवायचे आहे. कोणीही दिलेली वस्तू स्वतः जवळ ठेवायची नाही.

वरदान:-
शुद्धीच्या विधीद्वारे किल्ल्याला मजबूत करणारे सदा विजयी आणि निर्विघ्न भव

या किल्ल्यामध्ये प्रत्येक आत्मा नेहमी विजयी आणि निर्विघ्न बनावी यासाठी विशिष्ट कालावधीमध्ये सर्वत्र एकाच वेळी योगाचे प्रोग्राम ठेवा. म्हणजे मग कोणीही या तारेला कापू शकणार नाही कारण जितकी सेवा वाढवत जाल तितकी माया आपले बनविण्याचा प्रयत्न देखील करेल त्यामुळे जसे कोणतेही कार्य सुरू करताना शुद्धीकरणाची विधी करता, तसे संघटित रूपामध्ये तुम्हा सर्व श्रेष्ठ आत्म्यांचा एकच शुद्ध संकल्प असावा - ‘विजयी’; ही आहे शुद्धीची विधी - ज्यामुळे किल्ला मजबूत होईल.

बोधवाक्य:-
युक्तियुक्त अथवा यथार्थ सेवेचे प्रत्यक्ष फळ आहे खुशी.

अव्यक्त इशारे - सत्यता आणि सभ्यतारुपी कल्चरला (संस्कृतीला) धारण करा:-

ब्राह्मण जीवनामध्ये पहिल्या नंबरची संस्कृती आहे “सत्यता आणि सभ्यता”. तर प्रत्येकाच्या चेहऱ्याद्वारे आणि वर्तनाद्वारे हे ब्राह्मण कल्चर प्रत्यक्ष व्हावे. प्रत्येक ब्राह्मण हसतमुखाने प्रत्येकाच्या संपर्कामध्ये यावा. कोणी कसाही असो तुम्ही तुमचे हे कल्चर कधीही सोडू नका; तर सहजच परमात्म प्रत्यक्षतेच्या निमित्त बनाल.