01-03-26 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
09.03.2009 ओम शान्ति
मधुबन
“परमात्म संगाच्या
रंगाची आणि कंबाइंड स्वरूपाची यथार्थ होळी साजरी करा”
आज होलीएस्ट बाबा (परम
पवित्र बाबा) आपल्या होली (पवित्र) मुलांसोबत होळी साजरी करण्यासाठी आले आहेत. सर्व
मुले होली (पवित्र) मुले आहेत. तुम्ही सर्वजण होळी साजरी करण्यासाठी आला आहात.
विचार करा, तुम्हा होली आत्म्यांवर असा कोणता रंग लागला ज्यामुळे तुम्ही होली बनलात!
रंग तर अनेक आहेत परंतु तुमच्यावर कोणता रंग लागला? सर्वात श्रेष्ठ रंग कोणता आहे,
ज्यामुळे तुम्ही होली बनलात? सर्वात श्रेष्ठ ते श्रेष्ठ रंग आहे - परमात्म संगचा
रंग. तर परमात्म संगतीचा रंग लागल्यामुळे तुम्ही सहजच होली बनलात, कारण परमात्म संग
अविनाशी संगतीचा रंग आहे; बाकीचे रंग तर थोड्या वेळासाठी असतात परंतु परमात्म संगाचा
रंग लागल्यामुळे सहजच होली अर्थात पवित्र बनलात. आत्म्याचा रंग अपवित्रतेपासून
पवित्र बनला; कारण तुम्ही सर्वांनी परमात्म्याला आपला कम्पॅनियन (जोडीदार) बनवले आहे,
कंपनी (दोस्त) बनवले आहे म्हणूनच कंबाइंड (एकरूप) झाला आहात. हे कंबाइंड स्वरूप खूप
सुंदर वाटते ना! हे कंबाइंड रूप कधीही वेगळे होऊ शकत नाही. अनुभव आहे ना! सदैव
कंबाइंड राहता ना! एकटे नाही. माया एकटे पाडण्याचा प्रयत्न करते परंतु जे सदैव
कंबाइंड राहणारे आहेत ते कधीही वेगळे होऊ शकत नाहीत कारण माया वेगळे करून पुन्हा
जुन्या संस्कारांना इमर्ज करते आणि जुने संस्कार इमर्ज होतात तेव्हा मग शुद्ध
संस्कार मर्ज होतात. जुने संस्कार आहेत - निष्काळजीपणा आणि आळस, हे विविध रूपामध्ये
इमर्ज झाल्यामुळे कंबाइंड रूप विलग होते. तर प्रत्येकाने स्वतःला चेक करा की, सदैव
कंबाइंड राहतो की कधी एकटे सुद्धा होऊन राहतो? मायेच्या अनेक स्वरूपांना तुम्ही
ओळखले तर आहे ना! ती चतुराईने आपला रंग लावते. विलग होणे अर्थात मायेच्या रंगामध्ये
रंगणे. हा निष्काळजीपणा, आळस खूप वेगवेगळ्या रूपामध्ये येतो आणि मुले देखील त्याला
ओळखू शकत नाहीत कारण माया स्वतःकडे आकर्षित करते. हा निष्काळजीपणा आणि आळस जो
रावणाचा खजिना आहे, हा काही बाबांचा खजिना नाही आहे, रावणाच्या खजिन्याला मुले
देखील मोठ्या अभिमानाने म्हणतात की माझी इच्छा नाही आहे परंतु माझा संस्कार आहे.
माझा संस्कार म्हणू लागतात. तर काय हा परमात्म खजिना आहे की रावणाचा खजिना आहे?
त्याला माझा संस्कार म्हणणे विचार करा, योग्य आहे का? आपले बनवणे, हीच मायेची
चतुराई आहे. बाबांचा खजिना प्रिय आहे की हा रावणाचा खजिना प्रिय आहे? कॉमन रीतीने
मुले स्वतःची सुटका करून घेण्यासाठी म्हणतात की, माझा संस्कार आहे, माझी इच्छा
नाहीये; तर विचार करा हा माझा आहे का! बाबा म्हणतात की रावणाच्या खजिन्याला आपले
बनवल्यामुळे हळूहळू जे शुभ संस्कार आहेत ते नाहीसे होत जातात. परमात्म संगाचा रंग
फिका पडत जातो आणि मायेचा रंग इमर्ज होतो. तर चालता-चालता स्वतःलाच चेक करायचे आहे,
कोणता रंग चढलेला आहे? लोकं देखील होळीला काय करतात? आधी वाईट गोष्टींना जाळतात आणि
नंतर मग रंग लावतात, साजरी करतात. तर तुमच्यावर बापदादांनी संगाचा रंग तर लावलाच आहे
परंतु त्याच सोबत ज्ञानाचा रंग, शक्तींचा रंग, गुणांचा रंगही ते लावत राहतात.
तर तुम्हा सर्वांवर
हा रूहानी रंग चढलेला आहे ना! चढला आहे? हात वर करा. रूहानी रंग चढला आहे, रंग
उतरणार तर नाही ना! ज्याच्यावर रूहानी रंग चढला, अविनाशी रंग चढला, त्याच्यावर इतर
कोणताही रंग लागू शकत नाही. या रंगाने तुम्ही किती होली (पवित्र) बनला आहात? जे
संपूर्ण कल्पामध्ये तुमच्यासारखे होली, पवित्र इतर कोणीही बनू शकत नाही. तुमची
पवित्रता, प्रभूच्या संगाचा रंग, परमात्म्यासोबत कंबाइंड राहण्याचा अनुभव सर्वात
न्यारा आणि प्रिय आहे. इतर जे कोणी होली आहेत ते पवित्र बनतात परंतु त्यांचे शरीर
पवित्र बनत नाही, केवळ आत्मा पवित्र बनते; परंतु तुम्ही असे होली, पवित्र बनता
ज्यामुळे तुमचे शरीर आणि आत्मा दोन्ही पवित्र असतात आणि पवित्रतेला सुख, शांती,
प्रेम, आनंदाची जननी म्हटले जाते. जिथे पवित्रता आहे तिथे सुख-शांती सोबत असतेच असते,
कारण जिथे जननी असते तिथे मुले असतात कारण की बाबा येऊन तुम्हाला असे होली बनवतात
ज्यामुळे तुमच्या जड चित्रांची (मूर्तींची) किती विधीपूर्वक पूजा केली जाते.
कलियुगाच्या शेवटच्या जन्मातही तुम्ही तुमची चित्रे पाहता की किती विधीपूर्वक
त्यांची पूजा होते, ही पवित्रतेची विशेषता आहे; बाकी कितीही महान आत्मे, धर्मात्मे
पवित्र बनले आहेत परंतु कोणाचेही मंदिर बनत नाही. अशी विधीपूर्वक पूजा कोणाचीही होत
नाही आणि शेवटच्या जन्मापर्यंत तुमची चित्रे देखील आशीर्वाद देत राहतात, थोड्या
वेळासाठी सुख-शांतीचा अनुभव करून देतात. तर तुमची होळी आणि दुनियावाल्यांची होळी
यात किती फरक आहे! भले मनोरंजनासाठी तुम्ही देखील थोडीफार साजरी करता, परंतु खरी
होळी परमात्म संगाच्या रंगाची आणि कंबाइंड स्वरूपाची यथार्थ होळी तुम्ही साजरी करता.
होळीला लोक देखील भिन्न-भिन्न रूपाने साजरी करतात, तसे तुम्ही जाणता की ‘होली’
शब्दाचे देखील रहस्य आहे, जे केवळ तुम्हीच जाणता, तुम्हीच साजरे करता. ‘होली’चा
अर्थ आहे, ‘हो ली’, जे झाले ते होऊन गेले. तर तुम्ही सर्वांनी जुने जीवन, जुन्या
गोष्टी, जुने संस्कार, जुने व्यर्थ संकल्प यांना ‘हो ली’ केले आहे ना. ‘जे झाले ते
झाले’ म्हणणे अर्थात ‘हो ली’. तर असे केले आहे का? की अजूनही कधी चुकीने जुने
संस्कार येतात? जेव्हा आपला जन्मच नवीन आहे, तुम्ही सर्व मरजीवा बनला आहात ना! बनला
आहात? मरजीवा बनला आहात? हात वर करा. अच्छा. नवीन जन्म झाला तर मग जुना जन्म का
आठवतो आहे? जुना, जुना झाला. जर होऊन गेलेल्या गोष्टी किंवा संकल्प, संस्कार इमर्ज
होत असेल तर काय म्हणणार? होळी साजरी केलीत? ‘हो ली’ (जे झाले ते झाले) असे अजून
केलेले नाहीये. परमात्म संगाचा रंग चांगल्या तऱ्हेने लागलेला नाहीये. परमात्म संगाचा
रंग लागणे अर्थात जुना जन्म विसरून जाणे. जुन्या गोष्टी विसरून जाणे कारण मरजीवा
झालात ना. जसे शरीराने एक जन्म सोडून दुसरा घेता तेव्हा काय जुना जन्म लक्षात राहतो
का? तर तुम्ही सर्व आता ब्राह्मण जन्म धारण करणारे आहात. मग मागील जन्माचे संस्कार
ज्याला तुम्ही चुकीने म्हणता - ‘माझे संस्कार आहेत’, हे काय तुमचे आहेत? ब्राह्मण
जीवनाचे हे संस्कार आहेत का? कधी निष्काळजीपणा, कधी रॉयल आळस, आळसाची खूप विविध रूपे
आहेत. कधीतरी यावर क्लास करा. आळस किती प्रकारचे असतात आणि किती रॉयल रूपाने येतात!
तर ब्राह्मण जीवन
अर्थात नवीन जीवन, यामध्ये जुने काहीही असू शकत नाही. तर आज होळी साजरी करण्यासाठी
आला आहात ना! तर होली अर्थात ‘हो ली’, तर आज होळी साजरी करणे अर्थात जुन्या
संस्कारांची होळी पेटवणे. पेटवल्यानंतरच साजरी करायची असते. तर हे आता तुमच्या साजरे
करण्याचे स्वरूप आहे. जाळून टाकले, आता साजरे करायचे आहे. प्रभूच्या संगतीच्या
रंगाची मजा घेणारे आहात. कंबाइंड राहण्याचा अनुभव घेणारे आहात, असे का? होलीएस्ट
बाबांनी तुम्हाला होली बनण्याचा, पवित्र बनण्याचा रंग लावला आहे.
तर आज कोणती होळी
साजरी करत आहात? आजपासून विशेष कोणत्याही जुन्या संस्काराला येऊ देऊ नका, अशी होळी
साजरी करायची आहे. साजरी करू शकता की कधी-कधी जुने संस्कार परत येतील? हा रॉयल शब्द
की, ‘मी करू इच्छित नव्हते, मी करू इच्छित नव्हतो परंतु माझे संस्कार तसे आहेत’. हा
शब्द आज दृढ संकल्पाच्या विधीद्वारे नाहीसा करून टाका. आज अशी होळी कायमसाठी साजरी
करण्याची हिंमत ठेवता का? की कधी-कधी साजरी करणार? जे समजतात की आजपासून जुन्या
संस्कारांची होळी, ‘हो ली’, झाले ते झाले, नवीन जन्म आहे, तो जुना जन्म संपला. अशी
हिंमत ठेवणारी तुम्ही बाबांची गोड-गोड लाडकी सिकीलधी मुले आहात ना! तर हा संकल्प
नाही, दृढ संकल्प करण्याची हिंमत आहे का? हात वर करा. पहा, सर्वांनी हिंमत ठेवली आहे.
चला थोडे राहिले देखील आहेत, परंतु तुम्ही सर्व सोबती तर आहात ना. पक्के सोबती,
दोन्ही हात वर करा. या सर्वांचा फोटो काढा. छान. डबल विदेशी सुद्धा हात वर करत आहेत.
तर बापदादा तुम्हाला
पद्म-पद्मपटीने मुबारक देत आहेत, होळीच्या आणि हो ली साजरी करण्याच्या. आता चुकून
सुद्धा आपल्या मुखातून हा शब्द काढू नका. माझे संस्कार, रावणाच्या संस्कारांना माझे
म्हणता, कमाल आहे! रावणाला शत्रू म्हटले जाते, शत्रूचा खजिना स्वतःचा बनवणे ही तर
आश्चर्याची गोष्ट आहे! तुम्हालाही आश्चर्य वाटते आहे ना की काय बोलत आहोत! चुकून
बोलून जाता. बोलून झाल्यावर मग आतून मन खाते सुद्धा, जाणीवही होते, बाबांशी बोलता
देखील, माफी देखील मागता - ‘बाबा, उद्यापासून करणार नाही’, तरीही तेच करता. आता
बापदादा तरी काय करणार? बघत राहील? आता या शब्दाला होळीमध्ये जाळून टाका. बघा
जाळण्याच्या बाबतीत देखील एक खूप छान गोष्ट सांगतात - ‘कोकी’ला धागा बांधून मग
त्याला भाजतात, तर कोकी भाजली की तिला बाहेर काढतात तेव्हा कोकी भाजलेली असते परंतु
धागा जळत नाही. हे देखील तुम्ही जो पहिला पाठ शिकला आहात की, आत्मा अविनाशी आहे आणि
शरीर विनाशी आहे, त्याचीच ही निशाणी बनवली आहे. तर बापदादा पाहतात की हे सण किंवा
शास्त्र बनविणाऱ्या मुलांची देखील कमाल काही कमी नाही आहे. आहेत तर तीही बाबांचीच
मुले परंतु तुम्ही आहात सिकीलधे (अतिप्रिय). तर भले त्या शास्त्रांमध्ये पिठात
मिठासारखे आहे परंतु खूप मनोरंजक बनवले आहे. तुम्ही बघा प्रत्येक सणाचे यादगार बनवले
आहे, परंतु बऱ्याच गोष्टी ज्या सूक्ष्म आहेत त्यांना स्थूल रूप दिले आहे. परंतु
यादगार तर बनवले आहे ना! भक्तीमध्ये देखील कमी तर केलेले नाहीये, भक्तीने तरीही
द्वापर-कलियुगामध्ये काही ना काही गतस्मृतीमधल्या गोष्टी जिवंत ठेवल्या आहेत,
ज्यांनी अति विकारी होण्यापासून वाचवले आहे. तर बापदादा या सामग्री, सण किंवा
शास्त्र बनविणाऱ्यांना देखील त्याचे फळ देतात. भक्तीमध्ये तरी देखील काही ना काही
गोष्टींची आठवण करतात, विकारांपासून काही काळासाठी दूर राहतात.
तर आज तुम्ही कोणती
होळी साजरी केलीत? कोणती होळी साजरी केलीत? ‘हो ली’, सर्वांनी म्हणा - ‘हो ली’. असे
करा (हाताचा इशारा करून) ‘हो ली’. पक्के आहे ना! साजरी केली? केलीत? अच्छा. आणि मग
उद्या माया येईल, कारण माया सुद्धा ऐकत आहे परंतु तुम्ही तसे करू नका (मायेला
स्वतःकडे बोलावू नका). मजा आहे ना, यामध्ये मजा आहे ना. तर मजेत रहा.
बाबांची आठवण ठेवा तर
बाबा आपल्यावर किती रूहानी रंग टाकत आहेत, ज्यामुळे तुम्ही होलीहंस बनला आहात.
होलीहंस अर्थात निर्णयशक्ती वाले होलीहंस. कोणतेही काम कराल ना, तर एक सीट फिक्स करा,
आधी त्या सीटवर सेट व्हा आणि नंतर निर्णय घ्या, ती सीट तुम्ही जाणता, ती सीट आहे
त्रिकालदर्शीची सीट. आधी त्रिकालदर्शीच्या सीटवर सेट होऊन तिन्ही काळांना बघा, फक्त
वर्तमान पाहू नका, आदि-मध्य-अंत, तिन्ही काळांना बघा, तिन्ही काळामध्ये फायदा आहे
की नुकसान आहे? बरीच मुले खूप चतुर आहेत. चतुराई सांगू का? काय म्हणतात, या कामाला
उरकून टाकायचे होते ना, म्हणून उरकून टाकले. बाकी मी समजते, मी समजतो की असे करायला
नको होते परंतु केले. परंतु कर्म केले आहे तर कर्माचे फळ तर मिळणारच ना! तर चतुराई
करू नका, मुले बाबांनाही खूप रिझवतात. चूक करतात ना मग बापदादांना अशा काही गोष्टी
ऐकवतात - ‘बाबा, तुम्ही तर दयाळू आहात ना! तुम्ही तर क्षमेचे सागर आहात ना! बाबांना
सुद्धा आठवण करून देतात की तुम्ही कोण आहात! तुम्हीच तर सांगितले आहे ना, मला
सांगून संपवून टाका. परंतु जाणीवपूर्वक सांगून संपवून टाका. एक शब्द पक्का करता,
सांगून तर टाकता परंतु आधी दृढ संकल्पाने स्वतःला परिवर्तन करून मग सांगा. रिझवतात
खूप, तुम्हीच सांगितले आहे ना! बाबांनाच आठवण करून देतात - तुम्ही हे सांगितले आहे
ना, तुम्ही तसे सांगितले आहे ना. खूप चतुराई करतात. आता चतुराई करायची नाही, हिंमत
ठेवायची. करायचेच आहे, ‘गे, गे’ (करू, बघू) करायचे नाही.
बापदादा सर्व
दिवसभरामध्ये ‘गे, गे’ ची गाणी खूप ऐकतात. करू, दाखवून देऊ, बनू, परंतु स्पीड कोणता
आहे? ‘गे गे’ वाले बाबांच्या सोबत येतील काय? बाबा तर एव्हररेडी आहेत आणि ‘गे गे’
वाले काही एव्हररेडी नाही झाले ना. मग बाबांसोबत कसे येणार? ते फक्त बघत राहतील,
बाबांसोबत जात आहेत. बाबांचे प्रत्येक मुलावर पद्मपटीने प्रेम आहे. बाबांना हे बरे
वाटत नाही की, माझी मुले आणि सोबत येणार नाहीत. आता जर घरी परतण्याची वेळ आली आहे
तर मग तुम्ही घरी येणार नाही काय? कारण घरी जाऊन पुन्हा राज्यामध्ये यायचे आहे. घरी
सोबत येणार नसाल तर मग ब्रह्मा बाबांसोबत राज्यामध्ये देखील येणार नाही, मागाहून
याल. मग तुमचा वायदा काय आहे? सोबत येणार की मागाहून येऊ... यामध्ये देखील ‘गे गे’
लावणार. पोहोचून जाऊ, बघा बाबा जरूर पोहोचू. तर ही भाषा आता थांबवा. अच्छा.
सर्व चोहो बाजूंच्या
मुलांना देखील बापदादा बघत आहेत की दूर बसून देखील सायन्सच्या साधनांद्वारे
बहुसंख्य ठिकाणी सेंटर्सवर ते सुद्धा बापदादांना बघत राहतात, तुम्ही टोली खाता ना
तर ते देखील टोली वाटतात. तर सर्वांना बापदादा देखील बघत आहेत की कसे दूर बसूनही
जवळ असल्याचा अनुभव करत आहेत. तर चोहो बाजूंच्या मुलांना जे - ‘सदैव बाप समान
संपन्न आणि संपूर्ण बनायचे आहे’, हा संकल्प धारण केलेला आहे आणि वेळोवेळी या
संकल्पाला दृढतेचे बळ देत राहतात, अशा चोहो बाजूंच्या शुभ संकल्प धारण करणाऱ्या,
त्याचसोबत बाबांच्या अपेक्षांना पूर्ण करणाऱ्या आशेच्या ताऱ्यांना, त्याचसोबत
दादींचे बोल - ‘कर्मातीत व्हायचेच आहे, व्हायचेच आहे, व्हायचेच आहे…’ आणि मम्मांचे
हे बोल की, ‘नेहमी जे काही करायचे आहे ते आज करा, उद्यावर सोडू नका’, आणि दीदीचे हे
बोल - ‘अब घर चलना है’, हे कानात घुमत राहिले पाहिजे. वारंवार ‘आता घरी जायचे आहे’.
तर अशी धून लावा की, ‘आता कर्मातीत व्हायचे आहे, आता घरी जायचे आहे’, हे शब्द
वारंवार स्मृतीमध्ये आणणाऱ्या समर्थ आत्म्यांना, बापदादांच्या होली मुलांना होळीची
मुबारक असो, आणि त्याच सोबत सर्वांना बापदादा मधुबनमध्ये ‘घेवर’ खाण्या अगोदरच
तुम्ही सर्वांनी तोंड उघडा आणि घेवर खा, खाल्ला, तर सर्वांना खूप-खूप पदमपटीने
बापदादांची आणि अॅडव्हान्स पार्टीच्या सर्व मुलांची प्रेमपूर्वक आठवण आणि बाबांचा
नमस्ते.
वरदान:-
सर्व
आत्म्यांप्रति स्नेह आणि शुभचिंतकाची भावना ठेवणारे देही-अभिमानी भव
जसे महिमा करणाऱ्या
आत्म्याप्रती स्नेहाची भावना असते, तसेच जेव्हा कोणी शिकवण देण्याचा इशारा देतो
तेव्हा त्यामध्ये देखील त्या आत्म्याप्रती अशीच स्नेहाची, शुभचिंतनाची भावना असावी
की, ‘हे माझ्यासाठी सर्वात मोठे शुभचिंतक आहेत’, अशा स्थितीला देही-अभिमानी म्हटले
जाते. जर देही-अभिमानी नसाल तर जरूर अभिमान आहे. अभिमान असणारा कधीही आपला अपमान
सहन करू शकत नाही.
सुविचार:-
सदैव परमात्म
प्रेमामध्ये हरवून जा तर दु:खाची दुनिया विसरून जाल.
हे अव्यक्त इशारे:-
“निश्चयाच्या फाउंडेशनला मजबूत करून सदैव निर्भय आणि निश्चिंत रहा”
जेव्हा एखाद्या
मोठ्यांचा हात हातात पकडलेला असतो तेव्हा छोट्याची स्थिती बेफिकीर, निश्चिंत असते.
तुम्हाला निश्चय आहे की प्रत्येक कर्मामध्ये बापदादा माझ्या सोबत देखील आहेत आणि
माझ्या या अलौकिक जीवनाचा हात त्यांच्या हातात आहे अर्थात जीवन त्यांच्या स्वाधीन
आहे तर जबाबदारी त्यांची होते. सर्व ओझे बाबांवर सोपवून स्वतःला हलके करा तर सदैव
निश्चिंत रहाल आणि प्रत्येक कार्य अचूक होईल.