01-04-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबा नॉलेजफुल आहेत, त्यांना जानी-जाननहार म्हणणे, ही उलटी महिमा आहे, बाबा येतातच तुम्हाला पतितापासून पावन बनविण्यासाठी”

प्रश्न:-
बाबांसोबतच सर्वात जास्त महिमा आणखी कोणाची होते आणि कशी?

उत्तर:-
१. बाबांसोबतच भारताची महिमा देखील खूप आहे. भारतच अविनाशी खंड आहे. भारतच स्वर्ग बनतो. बाबांनी भारतवासियांनाच श्रीमंत, सुखी आणि पवित्र बनविले आहे. २. गीतेची देखील अपरंपार महिमा आहे, सर्वशास्त्रमई शिरोमणी गीता आहे. ३. तुम्हा चैतन्य ज्ञान गंगांची देखील खूप महिमा आहे. तुम्ही डायरेक्ट ज्ञान सागरातून निघाल्या आहात.

ओम शांती।
‘ओम् शांती’चा अर्थ तर नवीन आणि जुन्या मुलांना समजला आहे. तुम्हा मुलांनी जाणले आहे - आपण सर्व आत्मे परमात्म्याची संतान आहोत. परमात्मा उच्च ते उच्च आणि सर्वात प्रिय सर्वांचा माशुक आहे. मुलांना ज्ञान आणि भक्तीचे रहस्य तर सांगितले आहे, ज्ञान अर्थात दिवस - सतयुग-त्रेता, भक्ती अर्थात रात्र - द्वापर-कलियुग. भारताचीच गोष्ट आहे. सर्वप्रथम तुम्ही भारतवासीच येता. ८४ चे चक्र देखील तुम्हा भारतवासीयांसाठीच आहे. भारतच अविनाशी खंड आहे. भारत खंडच स्वर्ग बनतो, दुसरा कोणताही खंड स्वर्ग बनत नाही. मुलांना समजावून सांगितले गेले आहे - सतयुगामध्ये नवीन दुनिया भारतच असतो. भारतालाच स्वर्ग म्हटले जाते. भारतवासीच मग ८४ जन्म घेतात, नरकवासी बनतात. तेच मग स्वर्गवासी बनतील. यावेळेस सर्व नरकवासी आहेत तरी देखील इतर सर्व खंडांचा विनाश होऊन भारतच बाकी राहील. भारत खंडाची महिमा अपरंपार आहे. भारतातच बाबा येऊन तुम्हाला राजयोग शिकवतात. हे गीतेचे पुरुषोत्तम संगमयुग आहे. भारतच मग पुरुषोत्तम बनणार आहे. आता तो आदि सनातन देवी-देवता धर्म सुद्धा नाही आहे, राज्य देखील नाही तर ते युग देखील नाही. तुम्ही मुले जाणता वर्ल्ड ऑलमाइटी ऑथॉरिटी एक भगवंतालाच म्हटले जाते. भारतवासी ही खूप मोठी चूक करतात जे म्हणतात ते अंतर्यामी आहेत. ते सर्वांचे अंतर्मन जाणतात. बाबा म्हणतात - मी कोणाचेही अंतर्मन जाणत नाही. माझे तर कामच आहे पतितांना पावन बनविणे. बरेचजण म्हणतात - ‘शिवबाबा, तुम्ही तर अंतर्यामी आहात’. बाबा म्हणतात - ‘मी नसतोच, मी कोणाच्याही अंतर्मनाला जाणत नाही. मी तर फक्त येऊन पतितांना पावन बनवतो. मला बोलवतातच मुळी पतित दुनियेमध्ये. आणि मी एकदाच येतो, जेव्हा जुन्या दुनियेला नवीन बनवायचे असते’. मनुष्याला हे माहित नाही आहे की, ही जी जुनी दुनिया आहे ती नव्या पासून जुनी, जुन्या पासून नवीन केव्हा होते? प्रत्येक गोष्ट नव्या पासून जुनी सतो, रजो, तमोमध्ये जरूर येते. मनुष्य देखील असेच असतात. बालक सतोप्रधान असतात मग युवा होतात नंतर मग वृद्ध होतात अर्थात रजो, तमो मध्ये येतात. शरीर वृद्ध होते तर मग ते सोडून पुन्हा बाळ बनतील. मुले जाणतात नवीन दुनियेमध्ये भारत किती उच्च होता. भारताची महिमा अपरंपार आहे. इतका सुखी, श्रीमंत, पवित्र दुसरा कोणता खंड नाही. मग सतोप्रधान बनविण्यासाठी बाबा आले आहेत. सतोप्रधान दुनियेची स्थापना होत आहे. त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू, शंकराला कोणी रचले? उच्च ते उच्च तर शिव आहेत. म्हणतात - ‘त्रिमूर्ती ब्रह्मा’, परंतु अर्थ काहीच समजत नाहीत. वास्तविक म्हटले पाहिजे त्रिमूर्ती शिव, ना की ब्रह्मा. आता गातात - ‘देव-देव महादेव’. शंकराला उच्च स्थानी ठेवतात तर मग ‘त्रिमूर्ती शंकर’ म्हणा ना. मग ‘त्रिमूर्ती ब्रह्मा’ असे का म्हणतात? शिव आहेत रचयिता. गातात देखील परमपिता परमात्मा ब्रह्मा द्वारा स्थापना करतात ब्राह्मणांची. भक्तीमार्गांमध्ये नॉलेज फुल बाबांना जानी-जाननहार म्हणतात; आता ती महिमा काही अर्थासहित नाही आहे. तुम्ही मुले जाणता बाबांकडून आपल्याला वारसा मिळतो, ते स्वतः आम्हा ब्राह्मणांना शिकवतात कारण ते पिता देखील आहेत, सुप्रीम टीचर देखील आहेत, जगाचा इतिहास-भूगोल कसा फिरतो, ते देखील समजावून सांगतात, तेच नॉलेजफुल आहेत. बाकी असे नाही की ते जानी-जाननहार आहेत. हे चुकीचे आहे. मी तर फक्त येऊन पतितांना पावन बनवतो, २१ जन्मांकरिता राज्य-भाग्य देतो. भक्तीमार्गामध्ये आहे अल्पकाळाचे सुख, ज्याला संन्यासी, हठयोगी जाणत नाहीत. ‘ब्रह्म’ची आठवण करतात. आता ‘ब्रह्म’ काही भगवान तर नाहीत. भगवान तर एक निराकार शिव आहेत, जे सर्व आत्म्यांचे पिता आहेत. आम्हा आत्म्यांचे राहण्याचे स्थान ब्रह्मांड स्वीट होम आहे. तिथून आपण आत्मे इथे पार्ट बजावण्यासाठी येतो. आत्मा म्हणते - मी एक शरीर सोडून दुसरे-तिसरे घेते. ८४ जन्म देखील भारतवासियांचेच आहेत, ज्यांनी खूप भक्ती केली आहे तेच मग ज्ञान देखील जास्त घेतील.

बाबा म्हणतात - गृहस्थ व्यवहारामध्ये भले रहा परंतु श्रीमतावर चाला. तुम्ही सर्व आत्मे आशिक आहात एक परमात्मा माशुकचे. भक्ती मार्गापासून तुम्ही आठवण करत आला आहात. आत्मा बाबांची आठवण करते. हे आहेच दुःखधाम. आपण आत्मे खरेतर शांती-धामची निवासी आहोत. अगोदर आलो सुखधाम मध्ये, नंतर मग आपण ८४ जन्म घेतले. ‘हम सो, सो हम’ चा अर्थ देखील समजावून सांगितला आहे. ते तर असे म्हणतात आत्मा सो परमात्मा, परमात्मा सो आत्मा. आता बाबांनी समजावून सांगितले आहे - हम सो देवता, क्षत्रिय, वैश्य सो शूद्र. आता आपण सो ब्राह्मण बनलो आहोत सो देवता बनण्यासाठी. हा आहे यथार्थ अर्थ. तो एकदम चुकीचा आहे. सतयुगामध्ये एक देवी-देवता धर्म, अद्वैत धर्म होता. नंतर आणखी धर्म आले तर द्वैत झाले ना. द्वापरपासून आसुरी रावण राज्य सुरु होते. सतयुगामध्ये रावणराज्यच नसते त्यामुळे ५ विकार देखील असू शकत नाहीत. ते (देवी-देवता) आहेतच संपूर्ण निर्विकारी.

आता तुम्ही आहात गॉडली स्टुडंट. तर हे टीचर देखील झाले, पिता देखील झाले. मग तुम्हा मुलांना सद्गती देऊन, स्वर्गामध्ये घेऊन जातात तर पिता, टीचर, गुरु तिन्ही झाले ना. तुम्ही त्यांची संतान बनला आहात तर तुम्हाला किती आनंद झाला पाहिजे. मनुष्य तर काहीही जाणत नाहीत, रावण राज्य आहे ना. दरवर्षी रावणाला जाळतात परंतु रावण कोण आहे, हे जाणत नाहीत. तुम्ही मुले जाणता - हा रावण भारताचा सर्वात मोठा शत्रू आहे. हे नॉलेज तुम्हा मुलांनाच नॉलेजफूल बाबांकडून मिळते. ते बाबाच ज्ञानाचा सागर, आनंदाचा सागर आहेत. ज्ञान सागराकडून तुम्ही ढग भरून मग जाऊन वर्षा करता. ज्ञानगंगा तुम्ही आहात, तुमचीच महिमा आहे. बाबा म्हणतात मी तुम्हाला आता पावन बनविण्यासाठी आलो आहे, हा एक जन्म पवित्र बना, माझी आठवण करा तर तुम्ही तमोप्रधानापासून सतोप्रधान बनाल. मीच पतित-पावन आहे, जितकी होईल तितकी आठवण वाढवा. मुखाने शिवबाबा देखील म्हणायचे नाहीये. जसे आशिक माशुकची आठवण करतात, एकदा बघितले, बस्स मग तर बुद्धीमध्ये त्याचीच आठवण राहते. भक्तीमार्गामध्ये जे ज्या देवतेची आठवण करतात, पूजा करतात, त्यांचा साक्षात्कार होतो. ते आहे अल्पकाळासाठी. भक्ती करत खाली उतरत आले आहेत. आता तर मृत्यू समोर उभा आहे. हाय-हाय नंतर मग जय-जयकार होणार आहे. भारतामध्येच रक्ताच्या नद्या वाहणार आहेत. सिव्हिल वॉर (गृहयुद्धाची) चिन्हे आता दिसत आहेत. तमोप्रधान बनले आहेत. आता तुम्ही सतोप्रधान बनत आहात. जे कल्पापूर्वी देवता बनले आहेत, तेच येऊन बाबांकडून वारसा घेतील. कमी भक्ती केली असेल तर ज्ञान देखील थोडेच आत्मसात करतील. मग प्रजेमध्ये देखील नंबरवार पद मिळवतील. चांगले पुरुषार्थी श्रीमतावर चालून चांगले पद मिळवतील. मॅनर्स देखील चांगले हवेत. दैवी गुण देखील धारण करायचे आहेत ते मग २१ जन्म चालतील. आता आहेत सर्वांचे आसुरी गुण. आसुरी दुनिया, पतित दुनिया आहे ना. तुम्हा मुलांना जगाचा इतिहास-भूगोलही समजावून सांगितला गेला आहे. यावेळी बाबा म्हणतात - आठवण करण्याची मेहनत करा तर तुम्ही खरे सोने बनाल. सतयुग आहे गोल्डन एज, खरे सोने आणि मग त्रेतामध्ये चांदीची भेसळ पडते. कला कमी होत जाते. आता तर कोणतीच कला नाही आहे, जेव्हा अशी हालत होते तेव्हा बाबा येतात, हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे.

या रावण राज्यामध्ये सगळे अडाणी बनले आहेत, जे बेहदच्या ड्रामाचे पार्टधारी असून देखील ड्रामाच्या आदि-मध्य-अंताला जाणत नाहीत. तुम्ही ॲक्टर्स आहात ना. तुम्ही जाणता आपण इथे पार्ट बजावण्यासाठी आलो आहोत. परंतु पार्टधारी असूनही जाणत नाही. तर बेहदचे बाबा म्हणतील ना की तुम्ही किती अडाणी बनला आहात. आता मी तुम्हाला हुशार हिऱ्यासमान बनवतो. मग रावण कवडी समान बनवतो. मीच येऊन सर्वांना सोबत घेऊन जातो मग ही पतित दुनिया सुद्धा नष्ट होते. मच्छरांसदृश्य सर्वांना घेऊन जातो. तुमचे एम ऑब्जेक्ट समोर उभे आहे. असे तुम्हाला बनायचे आहे तेव्हाच तर तुम्ही स्वर्गवासी बनाल. तुम्ही ब्रह्माकुमार-कुमारी हा पुरुषार्थ करत आहात. मनुष्यांची बुद्धी तमोप्रधान आहे तर समजत नाहीत. इतके बी.के. आहेत तर जरूर प्रजापिता ब्रह्मा देखील असेल. ब्राह्मण आहेत शेंडी, ब्राह्मण मग देवता… चित्रांमध्ये ब्राह्मणांना आणि शिवाला नाहीसे केले आहे. तुम्ही ब्राह्मण आता भारताला स्वर्ग बनवत आहात. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) उच्च पद प्राप्त करण्यासाठी श्रीमतावर चालून चांगले मॅनर्स धारण करायचे आहेत.

२) सच्चा आशिक बनून एका माशुकचीच आठवण करायची आहे. जितके शक्य असेल आठवणीचा अभ्यास वाढवत जायचा आहे.

वरदान:-
‘निमित्तपणा’च्या स्मृतीने मायेचे गेट बंद करणारे डबल लाईट भव

जे नेहमी स्वतःला निमित्त समजून चालतात त्यांना आपोआप डबल लाईट स्थितीचा अनुभव होतो. करन-करावनहार करत आहेत, मी निमित्त आहे - याच स्मृतीने सफलता मिळते. ‘मी’पणा आला अर्थात मायेचे गेट उघडले, ‘निमित्त’ समजले अर्थात मायेचे गेट बंद झाले. तर निमित्त समजल्याने मायाजीत देखील बनता आणि डबल लाईट देखील बनता. त्याच सोबत सफलता देखील अवश्य मिळते. हीच स्मृती नंबरवन घेण्याचा आधार बनते.

बोधवाक्य:-
त्रिकालदर्शी बनून प्रत्येक कर्म करा तर सफलता सहज मिळत राहील.

मातेश्वरीजींची महावाक्ये -

१) “मनुष्य आत्मा आपल्या पूर्ण कमाई अनुसार भविष्य प्रारब्ध भोगतो”

आता बघा, खूप मनुष्य असे समजतात आपल्या पूर्व जन्मांच्या चांगल्या कमाईमुळे आता हे ज्ञान प्राप्त झाले आहे परंतु अशी गोष्टच नाही, पूर्व जन्माचे चांगले फळ आहे हे तर आपण जाणतो. कल्पाचे चक्र फिरत राहते सतो, रजो, तमोमध्ये बदलत राहते परंतु ड्रामा अनुसार पुरुषार्थाने प्रारब्ध बनविण्याची मार्जिन ठेवली आहे; तेव्हाच तर तिथे सतयुगामध्ये कोणी राजा-राणी, कोणी दासी, कोणी प्रजा पद प्राप्त करतात. तर हीच पुरुषार्थाची सिद्धी आहे तिथे द्वैत, इर्षा असत नाही, तिथे प्रजा देखील सुखी असते. राजा-राणी प्रजेची अशी काळजी घेतात जसे आई-वडील आपल्या मुलांची काळजी घेतात, तिथे गरीब, श्रीमंत सर्व संतुष्ट आहेत. या एका जन्माच्या पुरुषार्थाने २१ पिढ्यांसाठी सुख भोगाल, ही आहे अविनाशी कमाई; जी या अविनाशी कमाई मध्ये अविनाशी ज्ञानाद्वारे अविनाशी पद मिळते, आता आपण सतयुगी दुनियेमध्ये जात आहोत, हा आता प्रॅक्टिकलमध्ये खेळ चालू आहे, इथे काही छू-मंत्राचा प्रश्नच नाही.

२) “गुरु मत, शास्त्रांचे मत काही परमात्म्याचे मत नाहीये”

परमात्मा म्हणतात - माझ्या मुलांनो, हे गुरु मत, शास्त्र मत काही माझे मत नाही आहे. हे तर फक्त माझ्या नावाने मत देतात परंतु माझे मत तर मी जाणतो, मला भेटण्याचा पत्ता मी येऊन देतो, त्या आधी माझा ॲड्रेस कोणीही जाणत नाही. गीतेमध्ये भले भगवानुवाच आहे परंतु गीता देखील मनुष्यांनी बनविली आहे, भगवान तर स्वयं ज्ञानाचे सागर आहेत, भगवंताने जी महावाक्ये ऐकविली आहेत त्याचे यादगार (स्मृती) म्हणून मग गीता बनली आहे. हे विद्वान, पंडित, आचार्य म्हणतात की, परमात्म्याने संस्कृतमध्ये महावाक्ये उच्चारण केली, ते शिकल्याशिवाय परमात्मा भेटू शकणार नाही. हे तर अजूनच उलटे कर्मकांडामध्ये फसवतात. वेद, शास्त्र शिकून जर शिडी चढेल तर मग तितकेच उतरावे लागेल अर्थात त्याला विसरून एका परमात्म्याशी बुद्धियोग जोडावा लागेल कारण परमात्मा स्पष्टपणे सांगतात या कर्मकांड, वेद, शास्त्र वाचल्याने माझी प्राप्ती होत नाही. बघा ध्रुव, प्रल्हाद, मीरा यांनी कोणते शास्त्र वाचले? इथे तर सर्व वाचलेले देखील विसरावे लागते. जसे अर्जुन जे शिकला होता ते त्यालाही विसरावे लागले. भगवंताचे स्पष्ट महावाक्य आहे - ‘श्वासोश्वास माझी आठवण करा’, यामध्ये काहीही करण्याची गरज नाही. जोपर्यंत हे ज्ञान नाही तोपर्यंत भक्तीमार्ग चालतो परंतु ज्ञानाचा दीपक जेव्हा जागृत होतो तेव्हा कर्मकांड सुटते. कारण कर्मकांड करता-करता जर शरीर सुटले तर फायदा काय झाला? प्रारब्ध तर बनले नाही, कर्मबंधनाच्या हिशोबा पासून मुक्ती काही मिळाली नाही. लोक तर असे समजतात - खोटे न बोलणे, चोरी न करणे, कोणाला दुःख न देणे… ही चांगली कर्मे आहेत. परंतु इथे तर कायमसाठी कर्मांच्या बंधनांमधून सुटायचे आहे आणि विकर्मांच्या बीजाला नष्ट करायचे आहे. आपली तर आता अशी इच्छा आहे, असे बीज पेरावे ज्यामुळे चांगल्या कर्मांचे झाड उगवेल, त्यामुळे मनुष्य जीवनाच्या कार्याला जाणून श्रेष्ठ कर्म करायची आहेत. अच्छा - ओम् शांती.

अव्यक्त इशारे - कंबाइंड रुपाच्या स्मृती द्वारे सदैव विजयी बना:-

‘शिवशक्ती’ याचा अर्थच आहे कंबाइंड. बाबा आणि तुम्ही - दोघांना मिळून म्हणतात - ‘शिवशक्ती’. तर जो कंबाइंड आहे, त्याला कोणीही वेगळे करू शकत नाही. हेच लक्षात ठेवा की, आपण कंबाइंड राहण्याचे अधिकारी बनलो. आधी शोधणारे होतो आणि आता सोबत राहणारे आहोत - हा सदैव नशा रहावा.