01-04-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


प्रश्न:-
चोहो बाजूंना प्रत्यक्षतेचा आवाज केव्हा पसरेल?

उत्तर:-
१)जेव्हा लोकांना हे माहित होईल की स्वयं भगवान या जुन्या दुनियेचा विनाश करवून नवीन दुनियेची स्थापना करण्यासाठी आले आहेत. २) आम्हा सर्वांची सद्गती करणारे बाबा आपल्याला भक्तीचे फळ देण्यासाठी आले आहेत. हा निश्चय असेल तेव्हा प्रत्यक्षता होईल. चोहो बाजूंना खळबळ माजेल.

गीत:-
जो पिया के साथ है…

ओम शांती।
मुलांनी गाण्याच्या दोन ओळी ऐकल्या. ‘जो पिया के साथ है’, आता प्रियकर कोण आहे! हे दुनिया जाणत नाही. भले पुष्कळ मुले आहेत, त्यामध्ये देखील खूप असे आहेत जे हेच जाणत नाहीत की कशा प्रकारे बाबांची आठवण केली पाहिजे. तशी आठवण करता येत नाही. सारखे-सारखे विसरून जातात. बाबा समजावून सांगतात - ‘मुलांनो, स्वतःला आत्मा समजा, आपण बिंदू आहोत’. बाबा, ज्ञानाचा सागर आहेत, त्यांचीच आठवण करायची आहे. आठवण करण्याची अशी प्रॅक्टिस झाली पाहिजे ज्यामुळे निरंतर आठवण टिकून राहील. अखेरीला हीच आठवण राहावी की आपण आत्मा आहोत, शरीर तर आहे परंतु हे ज्ञान बुद्धीमध्ये ठेवायचे आहे की आपण आत्मा आहोत. बाबांचा आदेश मिळालेला आहे - मी जो आहे, त्या रूपामध्ये कोणी विरळेच आठवण करतात. मुले देह-अभिमानामध्ये खूप येतात. बाबांनी समजावून सांगितले आहे, जोपर्यंत कोणालाही बाबांचा परिचय देत नाही तोपर्यंत काहीही समजू शकणार नाहीत. सर्वात आधी तर त्यांना हे माहिती झाले पाहिजे की ते निराकार आपले पिता आहेत, गीतेचे भगवान आहेत, तेच सर्वांचे सद्गती दाता आहेत. ते यावेळेस सद्गती करण्याचा पार्ट बजावत आहेत. या पॉईंटवर निश्चय-बुद्धी होतील तर मग जे पण इतके साधुसंत इत्यादी आहेत सर्व एका सेकंदामध्ये येतील. भारतामध्ये मोठी खळबळ माजेल. आता कळून येईल की ही दुनिया नष्ट होणार आहे. या गोष्टीचा निश्चय झाला तर मग मुंबईपासून अबू पर्यंत क्यू लागेल. परंतु इतक्या लवकर कोणाला निश्चय होऊ शकत नाही. तुम्ही जाणता विनाश होणार आहे, हे सर्व घोर निद्रेमध्ये झोपूनच राहणार आहेत. मग अंतिम समयी तुमचा प्रभाव पडेल. गीतेचा भगवान परमपिता परमात्मा शिव आहेत, या गोष्टीवर निश्चय होणे हे काही मावशीचे घर नाहीये (हे काही इतके सोपे नाहीये). हे जर प्रसिद्ध झाले तर साऱ्या भारतामध्ये आवाज होईल. आता जर तुम्ही एकाला समजावून सांगितले तर दुसरा म्हणेल तुझ्यावर जादू केली आहे. हे झाड खूप हळूहळू वाढणार आहे. आता थोडा वेळ आहे तरी देखील पुरुषार्थ करण्यासाठी काही हरकत नाही. तुम्ही मोठ्या-मोठ्या लोकांना समजावून सांगता, परंतु ते काही समजतात थोडेच. मुलांमध्ये देखील बऱ्याच जणांना हे नॉलेजच समजत नाही. बाबांची आठवण नसेल तर ती अवस्था बनत नाही. बाबा जाणतात निश्चय कशाला म्हटले जाते. आता तर कोणी १-२ टक्के देखील मुश्किलीने बाबांची आठवण करतात. भले इथे बसले आहेत, बाबांवर ते प्रेम असत नाही. यामध्ये प्रेम पाहिजे, भाग्य पाहिजे. बाबांवर प्रेम असेल तर समजतील की, आपल्याला पावलो-पावली श्रीमतावर चालायचे आहे. आपण विश्वाचे मालक बनत आहोत. अर्ध्याकल्पाचा देह-अभिमान भरलेला आहे म्हणून आता देही-अभिमानी बनण्यामध्ये खूप मेहनत करावी लागत आहे. स्वतःला आत्मा समजून मोस्ट बिलवेड (अति प्रिय) बाबांची आठवण करणे काही मावशीचे घर नाहीये. तुमच्या चेहऱ्यावरच चमक येईल. कन्या जेव्हा लग्न करते, दागिने वगैरे घालते तर चेहऱ्यावर एकदम आनंद पसरतो. परंतु इथे तर साजनची आठवणच करत नाहीत तर तो चेहरा कोमेजलेला असतो. काही विचारू नका. कन्या लग्न करते तेव्हा तिचा चेहरा आनंदीत होतो. कोणाचा तर लग्नानंतर देखील चेहरा मेल्यासारखा असतो. तऱ्हे-तऱ्हेचे असतात. कोणी तर दुसऱ्या घरामध्ये जाऊन कोमेजून जातात. तर इथे देखील असेच आहे. बाबांची आठवण करण्यामध्ये मेहनत आहे. हे गायन अंतिम काळातील आहे की, अतींद्रिय सुख गोपी वल्लभच्या गोप-गोपींना विचारा. स्वतःला गोप-गोपी समजणे आणि निरंतर बाबांची आठवण करणे, ही अवस्था अजून व्हायची आहे. बाबांचा परिचय सर्वांना द्यायचा आहे. बाबा आलेले आहेत, ते वारसा देत आहेत. यातच सर्व नॉलेज येते. लक्ष्मी-नारायणाने जेव्हा ८४ जन्म पूर्ण केले तेव्हा बाबांनी अंतामध्ये येऊन त्यांना राजयोग शिकवून राजाई दिली. लक्ष्मी-नारायणाचे हे चित्र नंबर वन चित्र आहे. तुम्ही जाणता त्यांनी पूर्वीच्या जन्मामध्ये अशी कर्म केली आहेत, ती कर्म आता बाबा शिकवत आहेत. म्हणतात - मनमनाभव, पवित्र रहा. कोणतेही पाप करू नका कारण तुम्ही आता स्वर्गाचे मालक, पुण्य आत्मा बनत आहात. अर्धे कल्प माया रावण तुमच्याकडून पाप करवून घेत आली आहे. आता स्वतःला विचारायचे आहे - माझ्याकडून कोणते पाप तर होत नाही ना? मी पुण्याचे काम करतो का? आंधळ्यांची काठी बनलो आहे? बाबा म्हणतात - मनमनाभव. हे देखील विचारले पाहिजे की, ‘मनमनाभव’ हे कोणी म्हटले आहे? ते लोक म्हणतील श्रीकृष्णाने म्हटले आहे. तुम्ही मानता परमपिता परमात्मा शिव ने म्हटले आहे. रात्रं-दिवसाचा फरक आहे. शिवजयंती सोबत आहे गीता जयंती. गीता जयंती सोबत आहे श्रीकृष्ण जयंती.

तुम्ही जाणता आपण भविष्यामध्ये प्रिन्स बनणार आहोत. बेगर टू प्रिन्स बनायचे आहे. हे एम ऑब्जेक्टच राजयोगाचे आहे. तुम्ही सिद्ध करून सांगा की, गीतेचे भगवान श्रीकृष्ण नव्हते, ते तर निराकार होते. तर सर्वव्यापीचे ज्ञान उडून जाईल. सर्वांचे सद्गती दाता, पतित-पावन बाबा आहेत. म्हणतात देखील ते लिबरेटर आहेत, आणि मग सर्वव्यापी म्हणतात. जे काही बोलतात, ते समजत नाहीत. धर्माविषयी जे काही मनात येते, ते बोलतात. मुख्य धर्म आहेत तीन. देवी-देवता धर्म तर अर्धा कल्प चालतो. तुम्ही जाणता बाबा ब्राह्मण, देवता, क्षत्रिय धर्म स्थापन करतात. हे दुनिया जाणत नाही. ते तर सतयुगालाच लाखो वर्षांचे आहे असे म्हणतात. आदि सनातन देवी-देवता धर्म सर्वात श्रेष्ठ धर्म आहे, परंतु ते आपल्या धर्माला विसरून इरिलीजियस (अधर्मी) बनले आहेत. ख्रिश्चन लोक आपल्या धर्माला सोडत नाहीत. ते जाणतात - आमचा धर्म क्राईस्टने स्थापन केला होता. इस्लामी, बौद्धी, मग ख्रिश्चन, हे आहेत मुख्य धर्म. बाकी तर छोटे छोटे खूप आहेत. याची कुठून वृद्धी झाली? हे कोणीही जाणत नाही. मोहम्मदला देखील आता थोडा काळ झाला आहे, इस्लामी जुने आहेत. ख्रिश्चन देखील प्रसिद्ध आहेत. बाकी तर कितीतरी असंख्य आहेत. सर्वांचा आपला-आपला धर्म आहे. आपले विविध धर्म, विविध नावे आहेत त्यामुळे गोंधळून गेले आहेत. हेच जाणत नाहीत की मुख्य धर्मशास्त्रच मुळी ४ आहेत. यामध्ये डीटीज्म, ब्राह्मणीज्म देखील येतात. ब्राह्मण सो देवता, देवता सो क्षत्रिय, हे कोणालाच ठाऊक नाहीये. गातात - ब्राह्मण देवताय नमः. परमपित्याने ब्राह्मण, देवता, क्षत्रिय धर्माची स्थापना केली, शब्द आहेत परंतु असे वाचतात जसे की पोपट आहेत.

हे आहे काट्यांचे जंगल. भारत गार्डन ऑफ फ्लॉवर (फुलांचा बगीचा) होता, हे देखील मानतात. परंतु तो कधी, कसा, कोणी बनविला; परमात्मा काय चीज आहे, हे कोणीही जाणत नाहीत. तर अनाथ झाले ना म्हणून हे भांडण-तंटे इत्यादी आहेत. फक्त भक्तीमध्ये खुश होत असतात. आता बाबा आले आहेत प्रकाश करण्यासाठी, सेकंदामध्ये जीवनमुक्त बनवितात. ज्ञान अंजन सद्गुरु दिया, अज्ञान अंधेर विनाश. आता तुम्ही जाणता आपण प्रकाशामध्ये आहोत. बाबांनी तिसरा नेत्र दिला आहे. भले देवतांना तिसरा नेत्र दाखवतात परंतु अर्थ जाणत नाहीत. खरेतर तिसरा नेत्र तुम्हाला आहे. त्यांनी मग दिला आहे देवतांना. गीतेमध्ये ब्राह्मणांची कोणती गोष्टच नाहीये. त्यामध्ये तर मग कौरव, पांडव इत्यादींचे युद्ध, घोडे-गाडी इत्यादी लिहिले आहे, काहीही समजत नाहीत. तुम्ही समजावून सांगाल तर म्हणतील तुम्ही शास्त्र इत्यादीला मानत नाही. तुम्ही म्हणू शकता आम्ही शास्त्रांना का नाही मानत, कारण जाणतो की, ही सर्व भक्ती मार्गाची सामग्री आहे. गायले गेले आहे - ज्ञान आणि भक्ती. जेव्हा रावणाचे राज्य असते तेव्हा भक्ती सुरु होते. भारतवासी वाममार्गामध्ये जाऊन धर्मभ्रष्ट आणि कर्मभ्रष्ट बनतात म्हणून आता त्यांना हिंदू असे संबोधले आहे. पतित बनले आहेत. पतित कोणी बनविले? रावणाने. रावणाला जाळतात देखील, समजतात की हे परंपरेने चालत आले आहे. परंतु सतयुगामध्ये तर रावणराज्यच नव्हते. काहीही समजत नाहीत. माया एकदम पत्थर-बुद्धी बनवते. पत्थर पासून पारस बाबाच बनवितात. जेव्हा आयरन एज्डमध्ये याल तेव्हाच तर येऊन गोल्डन एज्ड स्थापन करतील. बाबा समजावून सांगतात तरी देखील मोठ्या मुश्किलीने कोणाच्या बुद्धीमध्ये बसते.

तुम्हा कुमारींचा आता साखरपुडा झाला आहे. तुम्हाला पट्टराणी बनवतात. तुम्हाला पळवून नेले अर्थात तुम्हा आत्म्यांना म्हणतात - तुम्ही माझे होता नंतर मग तुम्ही मला विसरून गेले आहात. देह-अभिमानी बनून मायेचे बनले आहात. बाकी पळवून नेणे इत्यादीचा तर प्रश्नच नाही. मामेकम् (मज एकाची) आठवण करा. आठवणीचीच मेहनत आहे. बरेचजण देह-अभिमानामध्ये येऊन विकर्म करतात. बाबा जाणतात ही आत्मा माझी आठवण करत नाही. देह अभिमानामध्ये येऊन खूप पापे करतात तर पापाचा घडा १०० पटीने भरतो. इतरांना रस्ता दाखविण्याऐवजी स्वतःच विसरून जातात. आणखीनच जास्त दुर्गती होते. खूप उच्च ध्येय आहे. ‘चढे तो चाखे वैकुंठ रस, गिरे तो चकनाचुर’. ही राजाई स्थापन होत आहे. यामध्ये फरक बघा किती पडतो. कोणी तर शिकून आसमानामध्ये चढून जातात, आणि कोणी तर जमिनीवर कोसळतात. बुद्धी डल होते तर मग शिकू शकत नाहीत. काहीजण तर म्हणतात - बाबा, आम्ही कोणालाही हे ज्ञान समजावून सांगू शकत नाही. मी म्हणतो - ठीक आहे, फक्त स्वतःला आत्मा समजा आणि मज पित्याची आठवण करा; तर मी तुम्हाला सुख देईन. परंतु आठवणच करत नाहीत. आठवण करतील तर इतरांना देखील आठवण करून देत राहतील. बाबांची आठवण करतील तर पापे नष्ट होतील. त्यांच्या आठवणी शिवाय तुम्ही सुखधाममध्ये जाऊ शकत नाही. २१ जन्मांचा वारसा निराकार बाबांकडूनच मिळू शकतो. बाकी तर सर्व अल्पकाळाचे सुख देणारे आहेत. कोणाला रिद्धी-सिद्धीने मुलाची प्राप्ती झाली किंवा आशीर्वादाने लॉटरी लागली तर बस्स, लगेच विश्वास बसतो. कोणाला दोन-चार करोडचा फायदा झाला तर बस्स त्यांचीच खूप महिमा करतील. परंतु ते तर आहे अल्पकाळासाठी. २१ जन्मांसाठी हेल्थ-वेल्थ तर मिळू शकत नाही ना. परंतु मनुष्य हे जाणत नाही. दोषही देऊ शकत नाही. अल्पकाळाच्या सुखामध्येच खुश होतात. बाबा तुम्हा मुलांना राजयोग शिकवून स्वर्गाची बादशाही देतात. किती सोपी गोष्ट आहे. कोणी तर इतरांना अजिबात समजावून सांगू शकत नाहीत. कोणी सांगतात देखील परंतु योग पूर्ण नसल्याकारणाने कोणाला तीर लागत नाहीत (ज्ञान काळजाला भिडत नाही). देह-अभिमानामध्ये आल्यामुळे काही ना काही पाप होत राहतात. योगच मुख्य आहे. तुम्ही योगबलाने विश्वाचे मालक बनता. प्राचीन योग भगवंताने शिकवला होता, श्रीकृष्णाने नाही. आठवणीची यात्रा खूप चांगली आहे. तुम्ही ड्रामा (चित्रपट) बघून याल तर बुद्धीमध्ये सर्व समोर उभे राहील. कोणाला सांगण्यामध्ये वेळ लागेल. हे देखील असेच आहे. हे चक्र खूप क्लियर आहे. शांतीधाम, सुखधाम, दुःखधाम… सेकंदाचे काम आहे ना. परंतु लक्षात सुद्धा राहिले पाहिजे ना. मुख्य गोष्टच आहे - बाबांचा परिचय. बाबा म्हणतात - माझी आठवण केल्यामुळे तुम्ही सर्व काही जाणाल. अच्छा!

शिवबाबा तुम्हा मुलांची आठवण करतात, ब्रह्मा बाबा आठवण करत नाहीत. शिवबाबा जाणतात माझी सपूत मुले कोण-कोण आहेत. सेवाभावी सपूत मुलांची तर आठवण करतात. हे (ब्रह्मा बाबा) थोडेच कोणाची आठवण करतील. यांच्या आत्म्याला तर डायरेक्शन आहे - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) भाग्यवान बनण्यासाठी एका बाबांवर खरे-खरे प्रेम करायचे आहे. प्रेम करणे अर्थात पावलो-पावली एकाच्याच श्रीमतावर चालत राहणे.

२) दररोज पुण्याचे काम अवश्य करायचे आहे. सर्वात मोठे पुण्य आहे सर्वांना बाबांचा परिचय देणे. बाबांची आठवण करणे सर्वांना बाबांची आठवण करून देणे.

वरदान:-
आपल्या दृष्टीच्या आणि वृत्तीच्या परिवर्तनाद्वारे सृष्टीला बदलणारे साक्षात्कारमूर्त भव

आपल्या वृत्तीच्या परिवर्तनाने दृष्टीला दिव्य बनवा तर दृष्टीद्वारे अनेक आत्म्यांना आपले यथार्थ रूप, यथार्थ घर तथा यथार्थ राजधानी दिसेल. असा यथार्थ साक्षात्कार घडविण्याकरिता वृत्तीमध्ये जरा सुद्धा देह-अभिमानाची चंचलता नसावी. तर वृत्तीला सुधारून दिव्यदृष्टी बनवा तेव्हाच या सृष्टीचे परिवर्तन होईल. बघणारे अनुभव करतील की हे डोळे नाहीत परंतु जादूच्या डब्ब्या आहेत. हे डोळे साक्षात्काराचे साधन बनतील.

बोधवाक्य:-
सेवेच्या उमंग-उत्साहा सोबत, बेहदची वैराग्यवृतीच सफलतेचा आधार आहे.

हे अव्यक्त इशारे - महान बनण्याकरिता मधुरतेचा आणि नम्रतेचा गुण धारण करा

मधुरतेच्या गुणाला धारण करणारेच इथे देखील महान बनतात आणि तिथे देखील पद मिळवितात. मधुरता असणाऱ्यांना सर्व जण महान रूपा प्रमाणे बघतात. तर हा मधुरतेचा विशेष गुण प्रत्येक मुलामध्ये असला पाहिजे. मधुरतेचे मधु ज्यांच्या सोबत आहे त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये सफलताच सफलता मिळते. त्यांच्या जीवनातून असफलता नाहीशी होईल.