01-05-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्ही बेहदच्या बाबांकडून बेहदचा वारसा घेण्यासाठी आला आहात, इथे हदची
काही कोणती गोष्ट नाही, तुम्ही अति उत्साहाने बाबांची आठवण करा तर जुनी दुनिया
विसरून जाल”
प्रश्न:-
कोणती एक
गोष्ट तुम्हाला वारंवार स्वतःशी घोटून पक्की केली पाहिजे?
उत्तर:-
आपण आत्मा आहोत, आम्ही परमात्मा बाबांकडून वारसा घेत आहोत. आत्मे आहेत मुले,
परमात्मा आहेत बाबा. आत्ता मुले आणि बाबांचे मिलन झाले आहे. ही गोष्ट वारंवार
घोटून-घोटून पक्की करा. जितके आत्म-अभिमानी बनत जाल, देह-अभिमान नाहीसा होईल.
गीत:-
जो पिया के
साथ है...
ओम शांती।
मुले जाणतात की, आपण बाबांसोबत बसलो आहोत - हे आहेत मोठ्यात मोठे बाबा, सर्वांचे
बाबा आहेत. बाबा आलेले आहेत. बाबांकडून काय मिळते, हा तर प्रश्नच उठू शकत नाही.
बाबांकडून मिळतोच मुळी वारसा. हे आहेत सर्वांचे बेहदचे बाबा, ज्यांच्याकडून बेहदचे
सुख, बेहदची प्रॉपर्टी मिळते. ती आहे हदची कमाई. कोणाकडे हजार, कोणाकडे ५ हजार
असतील. कोणाकडे १०-२०-५० करोड, अरब असतील. आता ते तर सर्व आहेत लौकिक पिता आणि हदची
मुले. इथे तुम्ही मुले समजता - आपण बेहदच्या बाबांकडे आलो आहोत बेहदची प्रॉपर्टी
घेण्यासाठी. मनामध्ये इच्छा तर असते ना. शाळा सोडून इतर सत्संग इत्यादीमध्ये काही
कोणती इच्छा असत नाही. म्हणतील शांति मिळू दे, ती तर मिळू शकत नाही. इथे तुम्ही मुले
समजता आपण आलो आहोत विश्व नविन दुनियेचा मालक बनण्यासाठी. नाही तर इथे का आलो.
मुलांची किती वृद्धी होत राहते! म्हणतात - ‘बाबा, आम्ही तर विश्वाचा मालक बनण्यासाठी
आलो आहोत’; हदची कोणती गोष्टच नाही. ‘बाबा, तुमच्याकडून आम्ही बेहद स्वर्गाचा वारसा
घेण्यासाठी आलो आहोत’. कल्प-कल्प आम्ही बाबांकडून वारसा घेतो मग माया मांजर
हिसकावून घेते म्हणून याला हार-जीतचा खेळ म्हटले जाते. बाबा बसून मुलांना समजावतात.
मुले देखील नंबरवार समजतात, हे काही साधू-संत नाही आहेत. जसे तुम्हाला कपडे आहेत
तसेच यांना देखील आहेत. हे तर बाबा आहेत ना. कोणी विचारले की, ‘कोणाकडे जाता?’ तर
म्हणतील - ‘आम्ही बापदादांकडे जातो’. ही तर फॅमिली झाली. कशासाठी जाता, काय
घेण्यासाठी जाता? हे तर इतर कोणीही समजू शकणार नाही. असे म्हणू शकणार नाहीत की आम्ही
बापदादांकडे जातो, वारसा त्यांच्याकडून मिळतो. आजोबांच्या प्रॉपर्टीवर सर्वांचा
हक्क आहे. शिवबाबांची अविनाशी मुले (आत्मे) तर आहातच मग प्रजापिता ब्रह्माचे
बनल्यामुळे त्यांची नातवंडे आहात. आता तुम्ही जाणता आपण आत्मा आहोत. हे तर चांगले
घोटून पक्के केले पाहिजे. आपण आत्मे परमात्मा बाबांकडून वारसा घेतो. आपण आत्मे
बाबांना येऊन भेटलो आहोत. अगोदर तर शरीराचे भान होते. अमुक-अमुक नावाचेच प्रॉपर्टी
घेतात. आता तर आहोत आत्मे, परमात्म्याकडून वारसा घेतो. आत्मे आहेत संतान, परमात्मा
आहेत पिता. मुलांची आणि पित्याची खूप काळानंतर एकदाच भेट घडते. भक्तिमार्गामध्ये मग
अनेक आर्टिफिशियल मेळावे भरत राहतात. हा आहे सर्वात अद्भुत मेळावा. ‘आत्मायें,
परमात्मा अलग रहे बहुकाल…’ कोण? तुम्ही आत्मे. हे तर तुम्ही समजता की, आपण आत्मे
आपल्या स्वीट सायलेन्स होममध्ये राहणारे आहोत. आता इथे पार्ट बजावता-बजावता थकून
गेलो आहोत. तर संन्यासी-गुरु इत्यादींकडे जाऊन शांती मागतात. समजतात ते घरदार सोडून
जंगलामध्ये जातात, त्यांच्याकडून शांती मिळेल. परंतु असे नाही आहे. आता तर सर्वजण
शहरामध्ये आले आहेत. जंगलामध्ये गुहा रिकाम्या पडल्या आहेत. गुरु बनून बसले आहेत.
अन्यथा त्यांनी निवृत्ती मार्गाचे ज्ञान देऊन पवित्रता शिकवायची आहे. आजकाल तर बघा
लग्न लावत राहतात.
तुम्ही मुले तर आपल्या
योगबलाने आपल्या कर्मेंद्रियांना वशमध्ये करता. कर्मेंद्रिये योगबलाने शीतल होतील.
कर्मेंद्रियांमध्ये चंचलता असते ना. आता कर्मेंद्रियांवर विजय मिळवायचा आहे,
जेणेकरून कोणतीही चंचलता होऊ नये. योगबळाशिवाय कर्मेंद्रिये वश होणे असंभव आहे. बाबा
म्हणतात - कर्मेंद्रियांची चंचलता योगबळानेच मोडेल. योगबळाची ताकद तर आहे ना.
यामध्ये खूप मेहनत करावी लागते. पुढे जाऊन कर्मेंद्रियांची चंचलता राहणार नाही.
सतयुगामध्ये तर कोणतेही घाणेरडे आजार नसतात. इथे तुम्ही कर्मेंद्रियांना वश करता
त्यामुळे तिथे कोणतीही घाणेरडी गोष्ट घडत नाही. नावच आहे स्वर्ग. त्याला
विसरल्यामुळे लाखो वर्षे म्हणतात. अजून पर्यंत मंदिर बनवत राहतात. जर लाखो वर्षे
झाली असतील तर मग गोष्टच आठवणार नाही. ही मंदिरे इत्यादी कशासाठी बनवतात? तर तिथे
कर्मेंद्रिये शीतल राहतात. कोणती चंचलता राहत नाही. शिवबाबांना तर कर्मेंद्रियेच
नाहीत. बाकी आत्म्यामध्ये ज्ञान तर सर्व आहे ना. तेच शांतीचे सागर, सुखाचे सागर
आहेत. ते लोक म्हणतात कर्मेंद्रिये वश होऊ शकत नाहीत. बाबा म्हणतात - योगबलाने
तुम्ही कर्मेंद्रियांना वश करा. बाबांच्या आठवणीमध्ये रहा. कर्मेंद्रियांद्वारे
कोणतेही अवैध काम करायचे नाही. अशा प्रेमळ बाबांची आठवण करता-करता प्रेमाने अश्रू
आले पाहिजेत. आत्मा परमात्म्यामध्ये काही लीन होत नाही. बाबा एकदाच भेटतात, जेव्हा
शरीराचे लोन घेतात तर अशा बाबांसोबत किती प्रेमाने वागले पाहिजे. बाबांना (ब्रह्मा
बाबांना) अत्यानंद झाला ना. ‘ओहो! बाबा विश्वाचा मालक बनवत आहेत मग ही धन-दौलत काय
करायची आहे, सगळे सोडून द्यावे’. जसे वेडे असतात ना. सर्वजण म्हणू लागले यांना
बसल्या-बसल्या काय झाले. धंदा इत्यादी सर्व सोडून आले. आनंदाचा पारा चढला.
साक्षात्कार होऊ लागले. राजाई मिळणार आहे परंतु कशी मिळणार, काय होईल? हे काहीच
माहिती नव्हते. बस्स, मिळणार आहे, त्याच आनंदामध्ये सर्व काही सोडून दिले. मग
हळू-हळू तुम्हाला नॉलेज मिळत राहते. तुम्ही मुले इथे स्कुलमध्ये आला आहात, एम
ऑब्जेक्ट तर आहे ना. हा आहे राजयोग. बेहदच्या बाबांकडून राजाई घेण्यासाठी तुम्ही आला
आहात. मुले जाणतात - आम्ही त्यांच्याकडून शिकत आहोत, ज्यांची आठवण करत होतो की बाबा
येऊन आमचे दुःख दूर करा सुख द्या. मुली म्हणतात - आम्हाला श्री कृष्णासारखा मुलगा
मिळावा. अरे तो तर वैकुंठामध्ये मिळणार ना. कृष्ण वैकुंठाचा आहे, त्याला तुम्ही झोके
देता तर त्याच्या सारखा मुलगा तर वैकुंठातच मिळेल ना. आता तुम्ही वैकुंठाची बादशाही
घेण्यासाठी आला आहात. तिथे जरूर प्रिन्स-प्रिन्सेसच मिळणार. पवित्र मुलगा मिळावा,
ही आशा देखील पूर्ण होते. तसे तर प्रिन्स-प्रिन्सेस इथेही खूप आहेत परंतु नरकवासी
आहेत. तुम्हाला हवा आहे स्वर्गवासी. शिक्षण तर खूप सोपे आहे. बाबा म्हणतात तुम्ही
खूप भक्ती केली आहे, त्रास सहन केला आहे. तुम्ही किती आनंदाने तीर्थयात्रा
इत्यादींवर जाता. अमरनाथला जातात, समजतात की शंकराने पार्वतीला अमर कथा ऐकवली.
अमरनाथची सत्य कथा तुम्ही आता ऐकत आहात. ही तर बाबा बसून तुम्हाला ऐकवत आहेत. तुम्ही
आला आहात - बाबांकडे. जाणता हा भाग्यशाली रथ आहे, यांनी हा लोनवर घेतला आहे. आम्ही
शिवबाबांकडे जातो, त्यांच्याच श्रीमतावर चालणार. काहीही विचारायचे असेल तर बाबांना
विचारू शकता. म्हणतात - ‘बाबा, आम्ही बोलू शकत नाही (कुणाला ज्ञान समजावून सांगू
शकत नाही)’. हा तर तुम्ही पुरुषार्थ करायचा आहे, यामध्ये बाबा काय करू शकतात.
बाबा तुम्हा मुलांना
श्रेष्ठ बनण्याचा सोपा मार्ग सांगतात - एक म्हणजे कर्मेंद्रियांना वश करा, दुसरे
दैवी गुण धारण करा. कोणी क्रोध इत्यादी केला तर ऐकू नका. एका कानाने ऐकून दुसऱ्याने
सोडून द्या. जी इव्हील गोष्ट चांगली वाटत नाही, ती ऐकूच नका. आता बघा, पती क्रोध
करतो, मारतो तर काय करायला हवे? जेव्हा बघावे तेव्हा पती रागावत असतो तर त्याच्यावर
फुलांचा वर्षाव करा. हसत रहा. युक्त्या तर खूप आहेत. कामेशु, क्रोधेशु असतात ना.
अबला बोलावतात. एकच द्रौपदी नाहीये, सगळ्या आहेत. आता बाबा आले आहेत विवस्त्र
होण्यापासून वाचविण्यासाठी. बाबा म्हणतात या मृत्युलोकामध्ये हा तुमचा अंतिम जन्म
आहे. मी तुम्हा मुलांना शांतीधामला घेऊन जाण्यासाठी आलो आहे. तिथे पतित आत्मे तर
जाऊ शकत नाहीत, म्हणून मी येऊन सर्वांना पावन बनवतो. ज्याला जो पार्ट मिळालेला आहे
तो पूर्ण करून आता सर्वांना परत जायचे आहे. संपूर्ण झाडाचे (मनुष्य सृष्टी रूपी
झाडाचे) रहस्य बुद्धीमध्ये आहे. बाकी झाडाची पाने थोडीच कोणी मोजू शकते. तर बाबा
सुद्धा मूळ गोष्ट समजावून सांगतात - बीज आणि झाड. बाकी मनुष्य तर पुष्कळ आहेत.
प्रत्येकाच्या अंतर्मनाला थोडेच वाचत बसतील. मनुष्य समजतात भगवान तर अंतर्यामी आहे,
प्रत्येकाच्या अंतर्मनातील गोष्टीला जाणतात. ही सर्व आहे अंधश्रद्धा.
बाबा म्हणतात - तुम्ही
मला बोलावता की येऊन आम्हाला पतितापासून पावन बनवा, राजयोग शिकवा. आता तुम्ही
राजयोग शिकत आहात. बाबा म्हणतात - माझी आठवण करा. बाबा हे मत देतात ना. बाबांची
श्रीमत आणि गत सर्वात निराळी आहे. मत अर्थात सल्ला, ज्याने आपली सद्गती होते. तेच
एक बाबा आपली सद्गती करणारे आहेत, दुसरे कोणी नाही. या वेळीच बोलावतात. सतयुगामध्ये
तर बोलवत नाहीत. आताच म्हणतात - सर्वांचा सद्गती दाता एक राम. जेव्हा माळा जपतात
तेव्हा जपता-जपता जेव्हा फुल येते तर त्याला राम म्हणून त्याचा डोळ्यांना स्पर्श
करतात. जप करायचा आहे एका फुलाचा. बाकी आहे त्यांची पवित्र रचना. माळेला तुम्ही
चांगल्या रीतीने जाणून घेतले आहे. जे बाबांसोबत सेवा करतात त्यांची ही माळा आहे.
शिवबाबांना रचता म्हणणार नाही. जर रचता म्हटले तर प्रश्न उठणार की कधी रचना केली?
प्रजापिता ब्रह्मा आता संगमावरच ब्राह्मणांना रचतात ना. शिवबाबांची रचना तर अनादि
आहेच. बाबा केवळ पतितापासून पावन बनविण्यासाठी येतात. आता तर आहे जुनी सृष्टी. नवीन
दुनियेमध्ये राहतात देवता. आता शूद्रांना देवता कोण बनवणार. आता तुम्ही पुन्हा बनत
आहात. जाणता, बाबा आपल्याला शुद्रापासून ब्राह्मण, ब्राह्मणापासून देवता बनवत आहेत.
आता तुम्ही ब्राह्मण बनला आहात, देवता बनण्यासाठी. मनुष्य सृष्टी रचणारे झाले
ब्रह्मा, जे मनुष्य सृष्टीचे हेड आहेत. बाकी आत्म्यांचे अविनाशी पिता तर ‘शिव’च
आहेत. या सर्व नवीन गोष्टी तुम्ही ऐकता. जे बुध्दीवान आहेत ते चांगल्या रीतीने धारण
करतात. हळू-हळू तुमची सुद्धा वृद्धी होत जाणार. आता तुम्हा मुलांना स्मृती आली आहे
की, वास्तविक आपण देवता होतो, मग ८४ जन्म कसे घेतो. सर्व रहस्य तुम्ही जाणता. जास्त
तपशिलामध्ये जाण्याची गरजच नाही.
बाबांकडून पूर्ण वारसा
घेण्यासाठी मुख्य गोष्ट बाबा सांगतात - एक तर माझी आठवण करा, दुसरे म्हणजे पवित्र
बना. स्वदर्शन चक्रधारी बना आणि आप समान बनवा. किती सोपे आहे. फक्त आठवण टिकत नाही.
नॉलेज तर खूप सोपे आहे. आता जुनी दुनिया नष्ट होणार आहे. मग सतयुगामध्ये नवीन
दुनियेमध्ये देवी-देवता राज्य करतील. या दुनियेमध्ये सगळ्यात पुरातन ही देवतांची
चित्रे आहेत अथवा यांचे महाल इत्यादी आहेत. तुम्ही म्हणाल - सर्वात पुरातन आम्ही
विश्वाचे महाराजा-महाराणी होतो. शरीरे तर नष्ट होतात. बाकी चित्रे बनवत राहतात. आता
हे थोडेच कोणाला माहित आहे, हे लक्ष्मी-नारायण जे राज्य करत होते ते कुठे गेले?
राजाई कशी मिळवली? बिर्ला एवढी मंदिरे बनवतात, परंतु जाणत नाहीत. पैसे मिळत जातात
आणखी बनवत राहतात. समजतात - या देवतांची कृपा आहे. एका शिवाची पूजा आहे अव्यभिचारी
भक्ती. ज्ञान देणारे ज्ञानाचा सागर तर एकच आहेत, बाकी आहे भक्तीमार्ग. ज्ञानाने
अर्धाकल्प सद्गती होते मग भक्तीची गरज राहत नाही. ज्ञान, भक्ती, वैराग्य. आता
भक्तीपासून, जुन्या दुनियेपासून वैराग्य. जुनी आता नष्ट होणार आहे, यामध्ये आसक्ती
का ठेवायची. आता तर नाटक पूर्ण होत आहे, आपण घरी जात आहोत. तो आनंद असतो. बरेचजण
समजतात मोक्ष मिळणे तर चांगले आहे आणि परत काही येणार नाही. आत्मा बुडबुडा आहे जो
सागरामध्ये विलीन होतो. या सर्व थापा आहेत. ॲक्टर तर ॲक्ट करणार नक्कीच. जो घरी
बसून राहतो तो काही ॲक्टर थोडाच झाला. मोक्ष काही असत नाही. हा ड्रामा अनादि बनलेला
आहे. इथे तुम्हाला किती नॉलेज मिळते. मनुष्यांच्या बुद्धीमध्ये तर काहीही नाही आहे.
तुमचा पार्टच आहे - बाबांकडून ज्ञान घेण्याचा, वारसा प्राप्त करण्याचा. तुम्ही
ड्रामामध्ये बंधायमान आहात. पुरुषार्थ जरूर कराल. असे तर नाही की, ड्रामामध्ये असेल
तर मिळेल. मग तर बसून रहा. परंतु कर्म केल्याशिवाय कोणीही राहू शकत नाही. कर्म
संन्यास होऊच शकत नाही. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) योगबलाच्या
ताकदीने आपल्या कर्मेंद्रियांना शीतल बनवायचे आहे. वश मध्ये ठेवायचे आहे. इव्हील
गोष्टी ऐकायच्याही नाहीत आणि ऐकवायच्या देखील नाहीत. जी गोष्ट आवडत नाही, तिला एका
कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचे आहे.
२) बाबांकडून संपूर्ण
वारसा घेण्यासाठी स्वदर्शन चक्रधारी बनायचे आहे, पवित्र बनून आप समान बनविण्याची
सेवा करायची आहे.
वरदान:-
मुरलीच्या
मधुर संगीताद्वारे मायेला सरेंडर करविणारे मुरलीधर भव
मुरल्या तर खूप ऐकल्या
आहेत आता असे मुरलीधर बना जेणेकरून माया, या मुरली समोर न्योछावर (सरेंडर) होईल.
मुरलीच्या रहस्याचे मधुर संगीत जर सदैव वाजवत रहाल तर माया कायमची सरेंडर होईल.
मायेचे मुख्य स्वरूप कारणाच्या रूपामध्ये येते. जर मुरलीद्वारे कारणाचे निवारण
मिळाले की मग माया कायमसाठी समाप्त होईल. ‘कारण’ समाप्त अर्थात ‘माया’ समाप्त.
बोधवाक्य:-
अनुभवी स्वरूप
बना तर चेहऱ्यावर सौभाग्याची झलक दिसून येईल.
अव्यक्त इशारे -
रूहानी रॉयल्टी आणि प्युरीटीची पर्सनॅलिटी धारण करा:-
संगमयुगी ब्राह्मण
जीवनाची विशेषता पवित्रता आहे. प्रवृत्तीमध्ये राहत असताना अपवित्रपणापासून निवृत्त
राहणे, स्वप्न मात्र देखील अपवित्रतेच्या संकल्पापासून मुक्त राहणे - हेच विश्वाला
चॅलेंज करण्याचे साधन आहे, हीच तुम्हा ब्राह्मणांची रुहानी रॉयल्टी आणि पर्सनॅलिटी
आहे (आत्मिक संपन्नता आणि व्यक्तिमत्व आहे).